15-08-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - पहाटे उठून हेच चिंतन करा की मी इतकी छोटीशी आत्मा किती मोठ्या शरीराला
चालवत आहे, मज आत्म्यामध्ये अविनाशी पार्ट नोंदलेला आहे”
प्रश्न:-
शिवबाबांना
कोणती प्रॅक्टिस आहे, कोणती नाही?
उत्तर:-
आत्म्याचा ज्ञान रत्नांनी श्रृंगार करण्याची प्रॅक्टिस शिवबाबांना आहे, बाकी शरीराचा
श्रृंगार करण्याची प्रॅक्टिस त्यांना नाही कारण बाबा म्हणतात मला तर माझे शरीर नाही
आहे. मी यांचे शरीर भले भाड्याने घेतो परंतु या शरीराचा श्रृंगार ही आत्मा स्वतः
करते, मी करत नाही. मी तर सदैव अशरीरी आहे.
गीत:-
बदल जाए दुनिया
न बदलेंगे हम…
ओम शांती।
मुलांनी गाणे ऐकले. कोणी ऐकले? आत्म्याने या शरीराच्या कानांद्वारे ऐकले. मुलांना
देखील हे ठाऊक झाले आहे की आत्मा किती छोटी आहे. ती आत्मा या शरीरामध्ये नसेल तर
शरीर काही कामाचे राहत नाही. किती छोट्याशा आत्म्याच्या आधारावर हे इतके मोठे शरीर
चालते. दुनियेमध्ये कोणालाच माहीत नाही की आत्मा काय चीज आहे जी या रथावर (शरीरामध्ये)
विराजमान असते. अकालमूर्त आत्म्याचे हे तख्त आहे. मुलांना देखील हे ज्ञान मिळते.
किती मनोरंजक आणि रहस्य युक्त आहे. जेव्हा अशी कोणती रहस्य युक्त गोष्ट ऐकली जाते
तर चिंतन चालते. तुम्हा मुलांचे देखील हेच चिंतन चालते - एवढ्या मोठ्या शरीरामध्ये
इतकी छोटीशी आत्मा आहे. आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट नोंदलेला आहे. शरीर तर
विनाश होते. बाकी आत्मा राहते. या खूप विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. पहाटे उठून
हा विचार केला पाहिजे. मुलांना स्मृती आली आहे आत्मा किती छोटी आहे, त्याला अविनाशी
पार्ट मिळालेला आहे. मी आत्मा किती वंडरफुल आहे. हे नवीन ज्ञान आहे. जे दुनियेमध्ये
कोणालाच माहीत नाही. बाबाच येऊन सांगतात, त्याचे चिंतन करायचे आहे. मी इतकी छोटीशी
आत्मा कसा पार्ट बजावते. शरीर ५ तत्वांचे बनते. बाबांना थोडेच माहीत होते.
शिवबाबांची आत्मा कशी येते-जाते. असे देखील नाही, कायम यांच्यामध्येच राहते. तर हेच
चिंतन करायचे आहे. तुम्हा मुलांना बाबा असे ज्ञान देतात जे कधी कोणाला मिळू शकणार
नाही. तुम्ही जाणता खरोखर हे ज्ञान यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) आत्म्यामध्ये देखील
नव्हते. इतर सत्संगांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टींकडे कोणाचे लक्षही जात नाही. आत्मा
आणि परमात्म्याचे किंचितही ज्ञान नाही. कोणतेही साधू-संन्यासी इत्यादी हे थोडेच
समजतात की, मी आत्मा शरीरा द्वारे यांना मंत्र देते आहे. आत्मा शरीराद्वारे ग्रंथ
वाचते. एकही मनुष्यमात्र आत्म-अभिमानी नाही. आत्म्याचे ज्ञान कोणालाच नाही, तर
बाबांचे ज्ञान कसे असेल.
तुम्ही मुले जाणता -
आम्हा आत्म्यांना बाबा म्हणतात - गोड-गोड मुलांनो! तुम्ही किती बुद्धिमान बनत आहात.
असे कोणता मनुष्य नाही, जो समजेल की या शरीरामध्ये जी आत्मा आहे, त्याला परमपिता
परमात्मा बसून शिकवतात. किती समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. परंतु तरी देखील धंदा
इत्यादीमध्ये गेल्यावर विसरून जातात. पहिले तर बाबा आत्म्याचे ज्ञान देतात जे
कोणत्याही मनुष्यमात्राला नाहीये. गायन देखील आहे ना, ‘आत्मायें-परमात्मा अलग रहे
बहुकाल…’ हिशोब आहे ना. तुम्ही मुले जाणता आत्माच बोलते शरीराद्वारे. आत्माच
शरीराद्वारे चांगले अथवा वाईट काम करते. बाबा येऊन आत्म्यांना किती गुल-गुल (फूल)
बनवतात. सर्वप्रथम तर बाबा म्हणतात - पहाटे उठून हीच प्रॅक्टिस करा किंवा विचार करा
की आत्मा काय आहे? जी या शरीराद्वारे ऐकते. आत्म्याचे पिता परमपिता परमात्मा आहेत,
ज्यांना पतित-पावन, ज्ञानाचा सागर म्हणतात. मग कोणत्याही मनुष्याला सुखाचा सागर,
शांतीचा सागर कसे म्हणू शकतो. काय लक्ष्मी-नारायणाला म्हणणार सदैव पवित्रतेचा सागर?
नाही. एक बाबाच सदैव पवित्रतेचा सागर आहेत. मनुष्य तर केवळ भक्तीमार्गातील
शास्त्रांचे वर्णन करत बसतात. प्रॅक्टिकल अनुभव काहीच नाही. असे समजणार नाहीत की
आपण आत्मा या शरीराद्वारे बाबांची महिमा करतो. ते आपले खूप गोड बाबा आहेत. तेच सुख
देणारे आहेत. बाबा म्हणतात - ‘हे आत्म्यांनो, आता माझ्या मतावर चाला’. हे अविनाशी
आत्म्याला अविनाशी बाबांद्वारे अविनाशी मत मिळते. ते विनाशी शरीरधाऱ्यांना विनाशी
शरीरधाऱ्यांचेच मत मिळते. सतयुगामध्ये तर तुम्ही इथलेच प्रारब्ध प्राप्त करता. तिथे
कधी उलटे मत मिळतच नाही. आताचे श्रीमतच अविनाशी बनते, जे अर्धा कल्प चालते. हे नवीन
ज्ञान आहे, याला ग्रहण करण्यासाठी किती बुद्धी पाहिजे. आणि ॲक्टमध्ये आले पाहिजे.
ज्यांनी सुरुवातीपासून खूप भक्ती केली असेल तेच चांगल्या रीतीने धारण करू शकतील. हे
समजले पाहिजे - जर माझ्या बुद्धीमध्ये व्यवस्थितपणे धारणा होत नसेल, तर नक्कीच मी
सुरुवातीपासून भक्ती केलेली नाही आहे. बाबा म्हणतात - जर कोणतीही गोष्ट समजत नसेल
तर बाबांना विचारा कारण बाबा अविनाशी सर्जन आहेत. त्यांना सुप्रीम सोल देखील म्हटले
जाते. आत्मा पवित्र बनते तर त्यांची महिमा होते. आत्म्याची महिमा असते तेव्हा
शरीराची देखील महिमा होते. आत्मा तमोप्रधान असते तेव्हा मग शरीराची देखील महिमा नसते.
यावेळी तुम्हा मुलांना अति गूढ-बुद्धी मिळते. आत्म्यालाच मिळते. आत्म्याला किती गोड
बनले पाहिजे. सर्वांना सुख दिले पाहिजे. बाबा किती गोड आहेत. आत्म्यांना देखील खूप
गोड बनवतात. आत्म्याने कोणतेही अकर्तव्य कार्य (बेजबाबदारपणाचे कृत्य) करू नये -
याची प्रॅक्टिस करायची आहे. चेक करायचे आहे की माझ्याकडून कोणते अकर्तव्य तर होत
नाही ना? शिवबाबा कधी अकर्तव्य कार्य (बेजबाबदारपणाचे कृत्य) करतील का? नाही. ते
येतातच उत्तम ते उत्तम कल्याणकारी कार्य करण्यासाठी. सर्वांना सद्गती देण्यासाठी.
तर जे बाबा कर्तव्य करतात, मुलांनी देखील तसेच कर्तव्य केले पाहिजे. हे देखील
समजावून सांगितले आहे, ज्यांनी सुरुवातीपासून खूप भक्ती केली आहे, त्यांच्याच
बुद्धीमध्ये हे ज्ञान टिकेल. आता देखील देवतांचे अनेक भक्त आहेत. आपले मुंडके कापून
द्यायला सुद्धा तयार असतात. खूप भक्ती करणाऱ्यांच्या मागे, कमी भक्ती करणारे फिरत
राहतात. त्यांची महिमा गातात. त्यांचे तर स्थूलमध्ये सर्व काही पाहण्यात येते. इथे
तुम्ही आहात गुप्त. तुमच्या बुद्धीमध्ये सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे सारे ज्ञान आहे.
हे देखील मुलांना माहित आहे - बाबा आपल्याला शिकविण्यासाठी आले आहेत. आता परत आपण
घरी जाणार. जिथून सर्व आत्मे येतात, ते आमचे घर आहे. तिथे शरीरच नाही तर आवाज कसा
असेल. आत्म्याशिवाय शरीर जड बनते. लोकांचा शरीरामध्ये किती मोह असतो! आत्मा
शरीरातून निघून गेली तर बाकी ५ तत्व, त्याच्यावर सुद्धा किती प्रेम असते. पत्नी
पतीच्या चितेवर चढण्यासाठी तयार होते. किती मोह असतो शरीरामध्ये. आता तुम्ही समजता
संपूर्ण दुनियेपासून नष्टोमोहा बनायचे आहे. हे शरीर तर नष्ट होणार आहे. तर त्यामधून
मोह नाहीसा झाला पाहिजे ना. परंतु खूप मोह राहतो. ब्राह्मणांना खाऊ घालतात. आठवण
करतात ना - अमक्याचे श्राद्ध आहे. आता तो थोडेच खाऊ शकतो. तुम्हा मुलांना तर आता या
गोष्टींपासून लांब राहिले पाहिजे. ड्रामामध्ये प्रत्येक जण आपला पार्ट बजावतात.
यावेळी तुम्हाला ज्ञान आहे, आपल्याला नष्टोमोहा बनायचे आहे. मोहजीत राजाची देखील
कहाणी आहे ना, अजून दुसरा कोणता मोहजीत राजा असत नाही. अशा तर अनेक कथा तयार केल्या
आहेत ना. तिथे अकाली मृत्यू होत नाही. तर विचारण्याचा सुद्धा प्रश्न राहत नाही.
यावेळी तुम्हाला मोहजीत बनवितात. स्वर्गामध्ये मोहजीत राजे होते, यथा राजा-राणी तथा
प्रजा असे आहेत. ती आहेच नष्टोमोहाची राजधानी. रावण राज्यामध्ये मोह असतो. तिथे तर
विकार असतही नाहीत, रावण राज्यच नाहीये. रावण राज्याचे राज्यच संपते. राम
राज्यामध्ये काय होते, काहीच माहिती नाही. बाबांव्यतिरिक्त इतर कोणी या गोष्टी सांगू
शकणार नाही. बाबा या शरीरामध्ये असताना देखील देही-अभिमानी आहेत. लोनवर किंवा
भाड्याने घर घेतात तर त्यामध्ये देखील मोह राहतो. घराला चांगले वेलफर्निश्ड (सुसज्ज)
करतात, यांना तर काही फर्निश्ड करायचे नाही आहे कारण बाबा तर अशरीरी आहेत ना. यांना
कोणताही श्रृंगार इत्यादी करण्याची प्रॅक्टिसच नाही. यांना तर अविनाशी ज्ञान
रत्नांद्वारे मुलांचा श्रृंगार करण्याची प्रॅक्टिस आहे. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे
रहस्य समजावून सांगतात. शरीर तर अपवित्रच आहे, यांना जेव्हा दुसरे नवीन शरीर मिळेल
तेव्हा पवित्र असेल. यावेळी तर ही जुनी दुनिया आहे, जी नष्ट होणार आहे. हे देखील
दुनियेमध्ये कोणाला माहितही नाही. हळू-हळू माहित होईल. नवीन दुनियेची स्थापना आणि
जुन्या दुनियेचा विनाश - हे तर बाबांचेच काम आहे. बाबा येऊन ब्रह्मा द्वारे प्रजा
रचून नवीन दुनियेची स्थापना करत आहेत. तुम्ही नवीन दुनियेमध्ये आहात का? नाही, नवीन
दुनिया स्थापन होत आहे. तर ब्राह्मणांची शिखा देखील श्रेष्ठ आहे. बाबांनी सांगितले
आहे, बाबांच्या सन्मुख येता तर अगोदर याची आठवण करायची आहे की आपण ईश्वर बाबांच्या
सन्मुख जात आहोत. शिवबाबा तर निराकार आहेत त्यांच्या सन्मुख आपण कसे जायचे. तर त्या
बाबांची (शिवबाबांची) आठवण करून मग बाबांच्या (ब्रह्मा बाबांच्या) सन्मुख यायचे आहे.
तुम्ही जाणता ते यांच्यामध्ये बसलेले आहेत. हे शरीर तर पतित आहे. शिवबाबांच्या
आठवणीमध्ये न राहता कोणतेही काम करता तर पाप लागते. आपण शिवबाबांकडे जातो. मग
दुसऱ्या जन्मामध्ये दुसरे नातलग असतील. तिथे देवतांच्या गोदमध्ये जाणार. ही ईश्वरीय
गोद एकदाच मिळते. मुखाने म्हणतात - ‘बाबा, मी तुमचा झालो’. असे पुष्कळ आहेत ज्यांनी
कधी पाहिले देखील नाही. बाहेर राहतात, लिहितात - ‘शिवबाबा, आम्ही तुमच्या गोदमधली
मुले झालो आहोत’. बुद्धीमध्ये ज्ञान आहे. आत्मा म्हणते - ‘मी शिवबाबांची झाले’.
यांच्या अगोदर आम्ही पतित गोदमध्ये होतो. भविष्यामध्ये पवित्र देवतांच्या गोदमध्ये
जाणार. हा जन्म दुर्लभ आहे. हिऱ्या समान तुम्ही इथे संगमयुगावरच बनता. संगमयुग काही
त्या पाण्याच्या सागराला किंवा नद्यांना म्हटले जात नाही. रात्रं-दिवसाचा फरक आहे.
ब्रह्मपुत्रा मोठ्यात मोठी नदी आहे, जी समुद्राला जाऊन मिळते. नद्या समुद्रामध्ये
जाऊन मिळतात. तुम्ही देखील समुद्रातून निघालेल्या ज्ञानाच्या नद्या आहात. ज्ञान
सागर शिवबाबा आहेत. मोठ्यातमोठी नदी आहे ब्रह्मपुत्रा. यांचे नाव ब्रह्मा आहे. यांचे
सागराशी किती साम्य आहे. तुम्हाला माहित आहे नद्या कुठून उगम पावतात. समुद्रातूनच
उगम पावतात, मग समुद्रालाच जाऊन मिळतात. सागरातून गोड पाणी शोषून घेतात. सागराची
मुले मग सागरामध्ये जाऊन मिळतात. तुम्ही देखील ज्ञान सागरातून निघाल्या आहात मग
सर्व तिथे निघून जाल, जिथे ते राहतात, तिथे तुम्ही आत्मे देखील राहता. ज्ञान सागर
येऊन तुम्हाला पवित्र गोड बनवतात. आत्मा जी खारट बनली आहे तिला गोड बनवतात. ५ विकार
रुपी घाणेरडा खारटपणा तुमच्यातून निघून जातो, तर तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान
बनता. बाबा पुरुषार्थ खूप करवून घेतात. तुम्ही किती सतोप्रधान होता, स्वर्गामध्ये
राहत होता. तुम्ही एकदम छी-छी (विकारी) बनला आहात. रावणाने तुम्हाला काय बनवले आहे.
भारतामध्येच गायले जाते - ‘हीरे जैसा जन्म अमोलक।’
बाबा सांगत राहतात
तुम्ही कवड्यांच्या मागे किती हैराण होता. कवड्या देखील जास्त थोड्याच हव्या आहेत.
गरीब लगेच समजून जातात. श्रीमंत तर म्हणतात आमच्यासाठी इथेच स्वर्ग आहे. तुम्ही मुले
जाणता जे पण मनुष्यमात्र आहेत सर्वांचा यावेळी कवडी समान जन्म आहे. आपण देखील असेच
होतो. आता बाबा आपल्याला काय बनवत आहेत. एम ऑब्जेक्ट तर आहे ना. आपण नरापासून
नारायण बनतो. भारत आता कवडी समान गरीब आहे ना. भारतवासी स्वतः थोडेच जाणतात. इथे
तुम्ही किती साधारण अबला आहात. कोणी मोठी व्यक्ती असेल तर त्यांना इथे बसण्याचे मन
होणार नाही. जिथे मोठ-मोठ्या व्यक्ती, संन्याशी-गुरु इत्यादी लोक असतील ते तिथल्या
मोठ-मोठ्या सभेमध्ये जातील. बाबा देखील म्हणतात - ‘मी गरीब निवाज आहे’. म्हणतात -
भगवान गरिबांची रक्षा करतात. आता तुम्ही जाणता आपण किती श्रीमंत होतो. आता पुन्हा
बनत आहोत. बाबा लिहितात देखील तुम्ही पद्मा-पदमपती बनता. तिथे काही मारामारी होत
नाही. इथे तर बघा पैशाच्या मागे किती मारामारी आहे. लाच किती मिळते. पैसे तर
मनुष्यांना पाहिजेत ना. तुम्ही मुले जाणता बाबा आपला खजिना भरपूर करतात. अर्ध्या
कल्पासाठी जितके पाहिजे तितके धन घ्या, परंतु पुरुषार्थ पूर्ण करा. चुका करू नका.
म्हटले जाते ना - फॉलो फादर. फादरला फॉलो करा तर हे जाऊन बनाल. नरापासून नारायण,
नारीपासून लक्ष्मी, खूप जबरदस्त परीक्षा आहे. यामध्ये जरा देखील चूक करता कामा नये.
बाबा श्रीमत देतात तर मग त्यावर चालायचे आहे. कायदे कानूनचे (नियम मर्यादांचे)
उल्लंघन करायचे नाही. श्रीमताद्वारेच तुम्ही श्री बनता. ध्येय खूप मोठे आहे. आपले
रोजचे खाते ठेवा. कमाई केली की नुकसान केले? बाबांची आठवण किती केली? किती जणांना
रस्ता सांगितला? आंधळ्यांची काठी तुम्ही आहात ना. तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र
मिळतो. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) जसे बाबा
गोड आहेत, असे गोड बनून सर्वांना सुख द्यायचे आहे. कोणतेही अकर्तव्य कार्य (बेजबाबदारपणाचे
कृत्य) करायचे नाही. उत्तम ते उत्तम कल्याणाचेच कार्य करायचे आहे.
२) कवड्यांच्या मागे
हैराण व्हायचे नाही. पुरुषार्थ करून आपले जीवन हिऱ्या समान बनवायचे आहे. चूक करायची
नाही.
वरदान:-
निश्चय रुपी
पावलाला अचल ठेवणारे सदा निश्चय बुद्धी निश्चिंत भव
सर्वात मोठा रोग आहे
- चिंता, याचे औषध डॉक्टरांकडे सुद्धा नाहीये. चिंता करणारे जितके प्राप्तीच्या मागे
धावतात तितकी प्राप्ती पुढे धावते म्हणूनच निश्चयाचे पाऊल सदैव अचल रहावे. सदैव ‘एक
बल एक भरोसा’ - हे पाऊल जर अचल असेल तर विजय निश्चित आहे. निश्चित विजयी नेहमीच
निश्चिंत आहेत. माया निश्चय रुपी पावलाला हलविण्यासाठी भिन्न-भिन्न रूपामध्ये येते
परंतु माया हलावी - तुमचे निश्चय रुपी पाऊल हलू नये तेव्हाच निश्चिंत राहण्याचे
वरदान मिळेल.
बोधवाक्य:-
प्रत्येकाच्या
विशेषतेला बघत जा तेव्हा विशेष आत्मा बनाल.
अव्यक्त इशारे:-
सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना.
तुम्हा गोप-गोपींचे
चरित्र गायले गेले आहे - बाबांद्वारे सर्व नात्यांचे सुख घेणे आणि त्यामध्ये निमग्न
राहणे अर्थात सर्व नात्यांच्या प्रेमामध्ये लवलीन राहणे. जेव्हा कोणी अतिशय प्रेमाने
भेटतात तर त्यावेळी प्रेमाच्या भेटीचे हेच शब्द असतात की एक दुसऱ्यामध्ये सामावून
गेले किंवा दोघे मिळून एकरूप झाले. तर बाबांच्या प्रेमामध्ये सामावून गेले अर्थात
बाबांचे स्वरूप बनले.