15-11-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आपले कॅरेक्टर (चारित्र्य) सुधारण्यासाठी आठवणीच्या यात्रेमध्ये रहायचे आहे, बाबांची आठवणच तुम्हाला कायमची सौभाग्यशाली बनवेल”

प्रश्न:-
अवस्थेची परख कोणत्या वेळी होते? चांगली अवस्था कोणाची म्हणता येईल?

उत्तर:-
अवस्थेची परख आजारपणाच्या वेळी होते. आजारपणामध्ये आनंद टिकून राहील आणि खुशमिजाज (प्रसन्नचित्त) चेहऱ्याने सर्वांना बाबांची आठवण करून देत रहाल, ही आहे उत्तम अवस्था. तुम्हीच जर रडाल, उदास व्हाल तर तुम्ही दुसऱ्यांना खुशमिजाज कसे बनवाल? काहीही झाले तरीही रडायचे नाहीये.

ओम शांती।
दोन शब्द गायले जातात - दुर्भाग्यशाली आणि सौभाग्यशाली. सौभाग्य पुसले जाते तेव्हा दुर्भाग्य (दुर्दैवी) म्हटले जाते. पत्नीच्या पतीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याला देखील दुर्भाग्य म्हटले जाते. एकटी होते. आता तुम्ही जाणता आपण कायमसाठी सौभाग्यशाली बनतो. तिथे दुःखाची गोष्टच नाही. मृत्यूचे नाव सुद्धा नसते. विधवा नावच नसते. विधवेला दुःख होते, रडत राहते. भले साधू-संत आहेत, असे नाही की त्यांना कोणते दुःख होत नाही . कोणी वेडे होतात, आजारी रोगी देखील होतात, ही आहेच रोगी दुनिया. सतयुग आहे निरोगी दुनिया. तुम्ही मुले समजता आपण भारताला पुन्हा श्रीमतावर निरोगी बनवत आहोत. यावेळी लोकांची कॅरेक्टर्स (चारित्र्य) खूप खराब आहेत. आता कॅरेक्टर्स (चारित्र्य) सुधारण्याचे देखील जरूर डिपार्टमेंट असेल. शाळांमध्ये देखील स्टुडंटचे रजिस्टर ठेवले जाते. त्यांच्या कॅरेक्टर विषयी (वर्तना विषयी) माहिती होते; म्हणून बाबांनी देखील रजिस्टर ठेवायला सांगितले होते. प्रत्येकाने आपले रजिस्टर ठेवा. कॅरेक्टर (वर्तन) पहायचे आहे की आपण कोणती चूक तर करत नाही आहोत. पहिली गोष्ट तर बाबांची आठवण करणे आहे. त्यानेच तुमचे कॅरेक्टर (वर्तन) सुधारते. एकाच्या आठवणी द्वारे आयुष्य देखील वाढते. ही तर आहेत ज्ञान-रत्न. आठवणीला रत्न म्हटले जात नाही. आठवणी द्वारेच तुमचे कॅरेक्टर (चारित्र्य) सुधारते. हे ८४ जन्मांचे चक्र तुमच्या शिवाय दुसरा कोणीही समजावून सांगू शकणार नाही. विष्णू आणि ब्रह्मा यावरच समजावून सांगायचे आहे. शंकराचे काही कॅरेक्टर म्हणणार नाही. तुम्ही मुले जाणता ब्रह्मा आणि विष्णूचे आपसामध्ये काय कनेक्शन आहे. विष्णूची दोन रूपे आहेत - हे लक्ष्मी-नारायण. तेच मग ८४ जन्म घेतात. ८४ जन्मांमध्ये आपे ही पूज्य आणि आपे ही पुजारी बनतात. प्रजापिता ब्रह्मा तर जरूर इथेच पाहिजे ना. साधारण तन पाहिजे. जास्त करून यामध्येच गोंधळून जातात. ब्रह्मा तर आहेच पतित-पावन बाबांचा रथ. म्हणतात देखील - ‘दूर देश का रहने वाला आया देश पराये…’ पावन दुनिया बनविणारे पतित-पावन बाबा पतित दुनियेमध्ये आले आहेत. पतित दुनियेमध्ये एकही पावन असू शकत नाही. आता तुम्हा मुलांना समजले आहे की ८४ जन्म आपण कसे घेतो. कोणी तर घेत असतील ना. जे सर्वात पहिले येत असतील त्यांचेच ८४ जन्म असतील. सतयुगामध्ये देवी-देवताच येतात. लोकांचा थोडा देखील विचार चालत नाही की ८४ जन्म कोण घेतील. समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. पुनर्जन्म तर सर्वजण मानतात. ८४ पुनर्जन्म झाले ही गोष्ट खूप युक्तीने समजावून सांगायची आहे. ८४ जन्म तर सगळेच काही घेणार नाहीत ना. सर्व एकत्र थोडेच येतील आणि शरीर सोडतील. भगवानुवाच देखील आहे की तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही, स्वयं भगवानच बसून समजावून सांगतात. तुम्ही आत्मे ८४ जन्म घेता. ही ८४ ची कहाणी बाबा तुम्हा मुलांना बसून ऐकवतात. हे देखील एक शिक्षण आहे. ८४ चे चक्र समजून घेणे खूप सोपे आहे. इतर धर्माचे या गोष्टींना समजणार नाहीत. तुमच्यामध्ये देखील सर्वच काही ८४ जन्म घेत नाहीत. सर्वांचेच ८४ जन्म असतील तर सर्व एकत्र येतील. असे देखील होऊ शकत नाही. सर्वकाही अभ्यास आणि आठवणीवर अवलंबून आहे. त्यामध्ये देखील नंबर वन आहे आठवण. अवघड विषयासाठी जास्त मार्क्स असतात. त्याचा परिणाम देखील होतो. उत्तम, मध्यम, कनिष्ठ सब्जेक्ट असतात ना. यामध्ये आहेत दोन मुख्य सब्जेक्ट. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर संपूर्ण निर्विकारी बनाल आणि मग विजयी माळेमध्ये ओवले जाल. ही आहे शर्यत. पहिले तर स्वतःला पहायचे आहे की, मी कितपत धारणा करतो? किती आठवण करतो? माझे कॅरेक्टर (चारित्र्य) कसे आहे? जर माझ्यातच रडण्याची सवय असेल तर दुसऱ्यांना मी खुशमिजाज कसे बनवू शकेन? बाबा म्हणतात - ‘जो रोते हे सो खोते है (जे रडतात ते गमावून बसतात)’. काहीही होवो परंतु रडण्याची गरज नाही. आजारपणामध्ये देखील आनंदाने इतके तर सांगू शकता की, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. आजारपणामध्येच अवस्थेची परख होते. वेदना होतात तेव्हा थोडा कण्हण्याचा आवाज भले येतो परंतु स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. बाबांनी पैगाम (संदेश) दिला आहे. पैगंबर-मेसेंजर एक शिवबाबा आहेत, दुसरे कोणीच नाही. बाकीचे जे काही ऐकवतात, त्या सर्व भक्तिमार्गाच्या गोष्टी आहेत. या दुनियेतील ज्या काही गोष्टी आहेत सर्व विनाशी आहेत. आता तुम्हाला तिथे घेऊन जातात जिथे मोड-तोड नसते. तिथे तर वस्तूच अशा सुंदर बनतील ज्या मोडण्याचे नावच नसेल. इथे सायन्सद्वारे किती वस्तू बनतात, तिथे देखील सायन्स तर जरूर असेल कारण तुमच्यासाठी खूप सुख पाहिजे. बाबा म्हणतात - तुम्हा मुलांना देखील काहीही ठाऊक नव्हते. भक्तीमार्ग कधी सुरू झाला, तुम्ही किती दुःख पाहिले - या सर्व गोष्टी आता तुमच्या बुद्धीमध्ये आहेत. देवतांना म्हटलेच जाते सर्वगुण संपन्न… मग त्या कला कमी कशा झाल्या? आता तर एकही कला राहिली नाहीये. चंद्राची देखील कला हळूहळू कमी होते ना.

तुम्ही जाणता की ही दुनिया देखील सुरुवातीला नवीन असते तेव्हा तिथे प्रत्येक वस्तू सतोप्रधान फर्स्टक्लास असते. नंतर जुनी होत-होत कला कमी होत जातात. सर्वगुण संपन्न हे लक्ष्मी-नारायण आहेत ना. आता बाबा तुम्हाला खरी-खरी सत्य नारायणाची कथा ऐकवत आहेत. आता आहे रात्र नंतर दिवस होतो. तुम्ही संपूर्ण बनता तर तुमच्यासाठी मग सृष्टी देखील अशीच पाहिजे. ५ तत्व देखील सतोप्रधान (१६ कला संपूर्ण) बनतात त्यामुळे तुमची शरीरे देखील ब्युटीफुल (सुंदर) असतात. सतोप्रधान असतात. ही सारी दुनिया १६ कला संपूर्ण बनते. आता तर कोणतीही कला नाही आहे; ज्या कोणी मोठ्यात-मोठ्या व्यक्ती आहेत अथवा महात्मा इत्यादी आहेत, त्यांच्या नशिबामध्येच हे बाबांचे नॉलेज नाही आहे. त्यांना आपलीच घमेंड आहे. जास्त करून गरिबांच्या भाग्यामध्येच आहे. कोणी म्हणतात इतके उच्च बाबा, त्यांना तर एखाद्या मोठ्या राजाच्या अथवा पवित्र ऋषी इत्यादींच्या तनामध्ये आले पाहिजे. पवित्र असतातच संन्यासी. बाबा बसून समजावून सांगतात की, मी कोणामध्ये येतो. मी येतोच त्यांच्यामध्ये जे पूर्ण ८४ जन्म घेतात. एकही दिवस कमी नाही. श्रीकृष्ण ज्यावेळी जन्मला त्यावेळेपासून १६ कला संपूर्ण आहे. नंतर मग सतो, रजो, तमो मध्ये येतात. प्रत्येक गोष्ट पहिले सतोप्रधान नंतर सतो, रजो, तमो मध्ये येते. सतयुगामध्ये देखील असे असते. मुलगा सतोप्रधान आहे मग मोठा झाला की म्हणेल - आता मी हे शरीर सोडून सतोप्रधान बाळ बनतो. तुम्हा मुलांना इतका नशा नाहीये. आनंदाचा पारा चढत नाही. जे चांगली मेहनत करतात, त्यांचा आनंदाचा पारा चढलेला असतो. चेहरा देखील प्रफुल्लित असतो. पुढे जाऊन तुम्हाला साक्षात्कार होत राहतील. जसे घराच्या जवळ येऊन पोहोचतो तेव्हा मग ते घराचे आवार, घर इत्यादी इत्यादींची आठवण येते ना. हे देखील असेच आहे. पुरुषार्थ करता-करता तुमचे प्रारब्ध जेव्हा समिप असेल तेव्हा खूप साक्षात्कार होत राहतील. आनंदामध्ये राहाल. जे नापास होतात ते लाजेने बुडून मरतात. तुम्हाला देखील बाबा सांगत आहेत नंतर खूप पश्चाताप करावा लागेल. आपल्या भविष्याचा साक्षात्कार कराल की, आपण काय बनणार? बाबा दाखवतील ही-ही विकर्मे इत्यादी केली आहेस. व्यवस्थित अभ्यास केला नाहीस, ट्रेटर बनलास, म्हणून ही सजा मिळत आहे. सगळा साक्षात्कार होईल साक्षात्कारा शिवाय सजा कशी देणार? कोर्टामध्ये देखील सांगतात - तू हे-हे केले आहेस, त्याची सजा आहे. जोपर्यंत कर्मातीत अवस्था होईल तोपर्यंत काही ना काही निशाणी राहील. आत्मा पवित्र झाली मग तर शरीर सोडावे लागेल. इथे राहू शकणार नाही. ती अवस्था तुम्हाला धारण करायची आहे. आता तुम्ही परत जाऊन नंतर मग नवीन दुनियेमध्ये येण्यासाठी तयारी करत आहात. तुमचा पुरुषार्थच हा आहे की आपण लवकरात लवकर जावे, आणि लवकरात लवकर यावे. जसे मुलांना खेळामध्ये धावायला लावतात ना. निशाणी पर्यंत जाऊन परत यायचे आहे. तुम्हाला देखील लवकर-लवकर जायचे आहे, आणि मग पहिल्या नंबर मध्ये यायचे आहे. तर तुमची शर्यत ही आहे. शाळेमध्ये देखील शर्यत लावतात ना. तुमचा हा आहे प्रवृत्ती मार्ग. तुमचा सर्वप्रथम पवित्र गृहस्थ धर्म होता. आता आहे विशश (विकारी) नंतर व्हाइसलेस (निर्विकारी) दुनिया बनेल. या गोष्टींचे तुम्ही मनन करत रहा तरी देखील खूप आनंद वाटेल. आपण देखील राज्य घेतो आणि मग गमावतो. हिरो-हिरॉईन म्हणतात ना. हिऱ्यासमान जन्म घेऊन मग कवडी समान जन्म घेत जन्मामध्ये येतात.

आता बाबा म्हणतात - तुम्ही कवड्यांच्या मागे वेळ वाया घालवू नका. हे (ब्रह्मा बाबा) म्हणतात - मी देखील वेळ वाया घालवत होतो. तर मला देखील सांगितले - आता तू माझा बनून हा रुहानी धंदा कर. तर झटक्यात सर्व काही सोडून दिले. पैसे काही कोणी फेकून देणार नाही. पैसे तर कामी येतात. पैशां शिवाय कोणाला घर इत्यादी थोडेच मिळू शकते. पुढे चालून मोठ-मोठे श्रीमंत येतील. तुम्हाला मदत देत राहतील. एक दिवस तुम्हाला मोठ-मोठ्या कॉलेजेस, युनिव्हर्सिटीमध्ये देखील जाऊन भाषण करावे लागेल की हे सृष्टीचे चक्र कसे फिरते. इतिहास आदिपासून अंतापर्यंत रिपीट होतो. गोल्डन एज पासून आयरन एज पर्यंत सृष्टीचा इतिहास-भूगोल आम्ही सांगू शकतो. कॅरेक्टर्स वर (चारित्र्यावर) तर तुम्ही पुष्कळ काही सांगू शकता. या लक्ष्मी-नारायणाची महिमा करा भारत किती पावन होता, दैवी कॅरेक्टर्स (चारित्र्य) होते. आता तर विशश कॅरेक्टर (विकारी चारित्र्य) आहेत. पुन्हा जरूर चक्र रिपीट होईल. आम्ही दुनियेचा इतिहास-भूगोल सांगू शकतो. चांगले हुशार असणाऱ्यांनी तिथे गेले पाहिजे. जसे थियोसोफिकल सोसायटी नावाची एक संस्था आहे, तिथे तुम्ही भाषण करा. श्रीकृष्ण तर देवता होता, सतयुगामध्ये होता. सर्वात पहिला आहे श्रीकृष्ण, जे मग नारायण बनतात. आम्ही तुम्हाला श्रीकृष्णाच्या ८४ जन्मांची कहाणी ऐकवतो, जी इतर कोणीही सांगू शकणार नाही. हा टॉपिक किती मोठा आहे. हुशार असणाऱ्याने भाषण केले पाहिजे.

आता तुमच्या मनामध्ये येते, आपण विश्वाचे मालक बनणार, किती आनंद झाला पाहिजे. अंतर्मनामध्ये हा मंत्र जप करत रहा, म्हणजे मग तुम्हाला या दुनियेमध्ये काहीही वाटणार नाही. इथे तुम्ही येताच मुळी परमपिता परमात्म्याद्वारे विश्वाचा मालक बनण्याकरिता. विश्व तर या दुनियेलाच म्हटले जाते. ब्रह्मलोक अथवा सूक्ष्मलोकला विश्व म्हणणार नाही. बाबा म्हणतात - मी विश्वाचा मालक बनत नाही. या विश्वाचा मालक तुम्हा मुलांना बनवतो. किती गुह्य गोष्टी आहेत. तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो. नंतर मग तुम्ही मायेचे दास बनता. इथे जेव्हा समोर योगासाठी बसवता तेव्हा देखील आठवण करून द्यायची आहे - आत्म-अभिमानी होऊन बसा, बाबांची आठवण करा. पाच मिनिटा नंतर पुन्हा बोला. तुमच्या योगाचे प्रोग्राम चालतात ना. अनेकांची बुद्धी बाहेर निघून जाते त्यामुळे पाच-दहा मिनिटा नंतर पुन्हा सावध केले पाहिजे. स्वतःला आत्मा समजून बसला आहात? बाबांची आठवण करत आहात? तर स्वतःवर देखील लक्ष राहील. बाबा या सर्व युक्त्या सांगत आहेत. वारंवार सावध करा. स्वतःला आत्मा समजून शिवबाबांच्या आठवणी मध्ये बसला आहात? तर जितका बुद्धियोग भटकत असेल तर तो स्थिर होईल. वारंवार ही आठवण करून दिली पाहिजे. बाबांच्या आठवणीनेच तुम्ही पार पलीकडे निघून जाल. गातात देखील - ‘खिवैया, नईया मेरी पार लगाओ’. परंतु अर्थ जाणत नाहीत. मुक्तीधाम मध्ये जाण्यासाठी अर्धाकल्प भक्ती केली आहे. आता बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर मुक्तीधाममध्ये निघून जाल. तुम्ही बसलाच आहात मुळी पापे नष्ट करण्यासाठी, तर मग पुन्हा पापे थोडीच केली पाहिजेत. नंबरवन पुरुषार्थ आहे - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. असे सावध करत राहिल्याने आपले देखील लक्ष राहील. स्वतःला देखील सावध करायचे आहे. स्वतः देखील आठवणीमध्ये बसतील तेव्हाच तर इतरांनाही बसवतील. मी आत्मा आहे, आपल्या घरी जात आहे. मग येऊन राज्य करणार. स्वतःला शरीर समजणे - हा देखील एक गंभीर आजार आहे म्हणूनच सर्व रसातळाला गेले आहेत. त्यांना मग सैलवेज करायचे आहे (मदत करायची आहे). अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपला वेळ रुहानी धंद्यामध्ये सफल करायचा आहे. हिऱ्या समान जीवन बनवायचे आहे. स्वतःला सावध करत रहायचे आहे. शरीर समजण्याच्या गंभीर आजारापासून वाचण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.

२) कधीही मायेचा दास बनायचे नाही, अंतर्मनामध्ये मंत्र जप करायचा आहे की, ‘मी आत्मा आहे’. आपण गरिबापासून प्रिन्स बनत आहोत, याचा आनंद राहावा.

वरदान:-
अनुभवांच्या गुढतेच्या प्रयोगशाळेमध्ये राहून नवीन संशोधन करणारे अंतर्मुखी भव

जेव्हा स्वतःमध्ये पहिले सर्व अनुभव प्रत्यक्ष होतील तेव्हा प्रत्यक्षता होईल - याकरिता अंतर्मुखी बनून आठवणीची यात्रा आणि प्रत्येक प्राप्तीच्या गुह्यतेमध्ये जाऊन संशोधन करा, संकल्प धारण करा आणि मग त्याचा परिणाम अथवा सिद्धी पहा की जो संकल्प केला तो सिद्ध झाला की नाही? असे अनुभवांच्या गुह्यतेच्या प्रयोगशाळेमध्ये राहा, ज्यामुळे जाणीव होईल की हे सर्व कोणी विशेष गहिऱ्या स्नेहामध्ये मग्न या संसारापासून उपराम आहेत. कर्म करत असताना योगाच्या पॉवरफुल स्टेजमध्ये राहण्याचा अभ्यास वाढवा. जसे वाणीमध्ये येण्याचा अभ्यास आहे, तसा रुहानियतमध्ये राहण्याचा अभ्यास अंगवळणी पाडा.

बोधवाक्य:-
संतुष्टतेच्या सीटवर बसून परिस्थितींचा खेळ बघणारेच संतुष्टमणी आहेत.

अव्यक्त इशारे:- अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा.

जसे हठयोगी आपल्या श्वासाला जितका वेळ पाहिजे तितका वेळ रोखू शकतात. तुम्ही सहजयोगी, स्वतः योगी, सदा-योगी, कर्म-योगी, श्रेष्ठ-योगी आपल्या संकल्पाला, श्वासाला प्राणेश्वर बाबांच्या ज्ञानाच्या आधारे जो संकल्प, जसा संकल्प, जितका वेळ करू इच्छिता तितका वेळ त्याच संकल्पामध्ये स्थित व्हा. आता-आता शुद्ध संकल्पामध्ये मनन करा, आता-आता एकाच धून मध्ये अर्थात एकाच बाबांना भेटण्याच्या शुद्ध संकल्पामध्ये, एकाच अशरीरी बनण्याच्या शुद्ध संकल्पामध्ये स्थित व्हा.