16-01-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही जे काही कर्म करता त्याचे फळ अवश्य मिळते, निष्काम सेवा तर केवळ
एक बाबाच करतात”
प्रश्न:-
हा क्लास
अतिशय वंडरफूल आहे, तो कसा? इथे प्रामुख्याने कोणती मेहनत करायची आहे?
उत्तर:-
हाच एक असा क्लास आहे ज्यामध्ये लहान मुले देखील बसली आहेत तर वृद्ध देखील बसले
आहेत. हा क्लास असा वंडरफुल आहे जे यामध्ये अहिल्या, कुब्जा, साधू देखील एके दिवशी
येऊन बसतील. इथे मुख्य आहेच आठवणीची मेहनत. आठवण केल्यानेच आत्म्याचे आणि शरीराचे
नेचरक्युअर होते (नैसर्गिक उपचार होतो) परंतु आठवण करण्यासाठी देखील ज्ञान पाहिजे.
गीत:-
रात के राही…
ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांनी गाणे ऐकले. रुहानी बाबा मुलांना याचा अर्थ देखील सांगत आहेत.
आश्चर्य तर हे आहे की, गीता किंवा शास्त्र इत्यादी बनवणारेच याचा अर्थ जाणत नाहीत.
प्रत्येक गोष्टीतून अनर्थच काढतात. रूहानी बाबा जे ज्ञानाचा सागर पतित-पावन आहेत,
ते बसून याचा अर्थ सांगतात. राजयोग देखील बाबाच शिकवत आहेत. तुम्ही मुले जाणता - आता
आपण पुन्हा राजांचाही राजा बनत आहोत, इतर शाळांमध्ये असे कोणी थोडेच म्हणतील की,
आम्ही पुन्हा बॅरिस्टर बनतो. ‘पुन्हा’ हा शब्द कोणी म्हणू शकणार नाही. तुम्ही म्हणता
- आम्ही ५ हजार वर्षांपूर्वी प्रमाणे पुन्हा बेहदच्या बाबांकडून शिकत आहोत. हा
विनाश देखील पुन्हा होणार आहे जरूर. किती मोठ-मोठे बॉम्ब्स बनवत राहतात. खूप
शक्तिशाली बॉम्ब्स बनवतात. तसेच ठेवण्यासाठी तर बनवत नाहीत ना. हा विनाश देखील शुभ
कार्यासाठी आहे ना. तुम्हा मुलांना घाबरण्याची काही गरज नाही. ही आहे कल्याणकारी
लढाई. बाबा येतातच कल्याण करण्याकरिता. म्हणतात देखील - ‘बाबा येऊन ब्रह्मा द्वारे
स्थापना, शंकरा द्वारे विनाशाचे कर्तव्य करत आहेत’. तर हे बॉम्ब्स इत्यादी आहेतच
विनाशासाठी. यापेक्षा जास्त प्रबळ दुसरी कोणती वस्तूच नाही. त्याच सोबत नैसर्गिक
आपत्ती देखील येतात. त्याला काही ईश्वरीय आपत्ती म्हणणार नाही. ही नैसर्गिक संकटे
ड्रामामध्ये नोंदलेली आहेत. ही काही नवीन गोष्ट नाहीये. किती मोठे-मोठे बॉम्ब्स
इत्यादी बनवत राहतात. म्हणतात - आम्ही शहरेच्या शहरे नष्ट करून टाकू. आता जे
जपानच्या युद्धामध्ये बॉम्ब्स वापरले - ते तर खूप छोटे होते. आता तर खूप मोठे-मोठे
बॉम्ब्स बनवले आहेत. जेव्हा जास्त अडचणीमध्ये येतात, सहन करू शकत नाहीत तेव्हा मग
बॉम्ब्स वापरायला सुरू करतात. किती नुकसान होईल. ते देखील ट्रायल करून पाहत आहेत.
अरबोंनी रुपये खर्च करतात. हे बनवणाऱ्यांचा पगार देखील खूप जास्त असतो. तर तुम्हा
मुलांना आनंद झाला पाहिजे. जुन्या दुनियेचाच विनाश होणार आहे. तुम्ही मुले नवीन
दुनियेकरिता पुरुषार्थ करत आहात. विवेक देखील म्हणतो जुनी दुनिया नष्ट होणार आहे
जरूर. मुले समजतात कलियुगामध्ये काय आहे, सतयुगामध्ये काय असेल. तुम्ही आता संगमावर
उभे आहात. तुम्ही जाणता सतयुगामध्ये इतके मनुष्य असणार नाहीत, तर या सर्वांचा विनाश
होईल. या नैसर्गिक आपदा कल्पापूर्वी देखील झाल्या होत्या. जुनी दुनिया नष्ट होणारच
आहे. अशा आपत्ती तर पूर्वी देखील खूप होत आल्या आहेत. परंतु त्या थोड्या मर्यादित
प्रमाणात घडतात. आता तर ही जुनी दुनिया सगळी नष्ट होणार आहे. तुम्हा मुलांना तर खूप
आनंद झाला पाहिजे. आम्हा रूहानी मुलांना परमपिता परमात्मा बाबा बसून समजावून सांगत
आहेत, हा विनाश तुमच्यासाठीच होत आहे. हे देखील गायन आहे - रुद्र ज्ञान यज्ञातून
विनाश ज्वाळा प्रज्वलित झाली. अशा कितीतरी गोष्टी गीतेमध्ये आहेत ज्याचा अर्थ खूप
चांगला आहे, परंतु कोणी समजतात थोडेच. ते शांती मागत राहतात. तुम्ही म्हणता लवकर
विनाश होईल तर आम्ही जाऊन सुखी होऊ. बाबा म्हणतात सुखी तेव्हा व्हाल जेव्हा
सतोप्रधान व्हाल. बाबा अनेक प्रकारचे पॉईंट्स देतात; मग कोणाच्या बुद्धीमध्ये
चांगल्या रीतीने बसतात, कोणाच्या बुद्धीमध्ये कमी. वृद्ध माता समजतात - शिवबाबांची
आठवण करायची आहे, बस्स. त्यासाठी सांगितले जाते - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण
करा. तरी देखील वारसा तर घेतात ना. घरी पती सोबत राहते. प्रदर्शनीमध्ये सगळे येतील.
अजामिल सारख्या पाप आत्म्यांचा, गणिकांचा इत्यादी सर्वांचा उद्धार होणार आहे. मेहतर
(सफाई कामगार) देखील चांगले कपडे घालून येतात. गांधीजींनी अस्पृश्यांना मुक्त केले.
सोबत बसून खात देखील होते. बाबा तर अजूनच मनाई करत नाहीत. समजतात यांचा देखील
उद्धार करायचा आहे. कामाचा काहीच संबंध नाही. यामध्ये सर्व काही बाबांसोबत
बुद्धी-योग लावण्यावर अवलंबून आहे. बाबांची आठवण करायची आहे. आत्मा म्हणते मी अछुत
आहे. आता आपण समजतो पहिले आपण सतोप्रधान देवी-देवता होतो. मग पुनर्जन्म घेत-घेत
शेवटी येऊन पतित बनलो आहोत. आता पुन्हा मज आत्म्याला पावन बनायचे आहे. तुम्हाला
ठाऊक आहे - सिंधमध्ये एक भिल्लीण येत होती, ध्यानामध्ये जात होती. धावत येऊन भेटत
असे. सांगितले जात असे - हिच्यामध्ये (त्या भिल्लिणीमध्ये) देखील आत्माच तर आहे ना.
आत्म्याला आपल्या पित्याकडून वारसा घेण्याचा अधिकार आहे. तिच्या घरच्यांना सांगितले
गेले की, हिला ज्ञान घेऊ द्या. तर म्हणाले आमच्या जमातीमध्ये गदारोळ माजेल. घाबरून
तिला घेऊन गेले. तर तुमच्याकडे असे येतात, तुम्ही त्यांना मनाई करू शकत नाही. गायले
गेले आहे - अबला, अहिल्या, गणिका, भिल्लिणी, साधू इत्यादी सर्वांचा उद्धार करतो.
साधू लोकांपासून भिल्लिणींपर्यंत.
तुम्ही मुले आता
यज्ञाची सेवा करता तर या सेवेद्वारे खूप प्राप्ती होते. अनेकांचे कल्याण होते.
दिवसें-दिवस प्रदर्शनीद्वारे सेवेची खूप वृद्धी होईल. बाबा बॅज देखील बनवत राहतात.
कुठेही जाल तर यावर समजावून सांगायचे आहे. हे बाबा, हे दादा आणि हा बाबांचा वारसा.
आता बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनाल. गीतेमध्ये देखील आहे -
मामेकम् (मज एकाची) आठवण करा. फक्त त्यातून माझे नाव काढून मुलाचे नाव टाकले आहे.
भारतवासीयांना देखील हे ठाऊक नाहीये की, राधे-कृष्णाचे आपसामध्ये काय नाते आहे.
त्यांच्या विवाह इत्यादीची हिस्ट्री काहीच सांगत नाहीत. दोघेही वेगवेगळ्या राजधानीचे
आहेत. या गोष्टी बाबा बसून समजावून सांगतात. जर हे समजले आणि म्हणाला की, ‘शिव
भगवानुवाच’, तर सगळे त्याला पळवून लावतील. म्हणतील - ‘तुम्ही हे मग कुठून शिकले
आहात?’ हे कोणते गुरु आहेत? आणि तुम्ही म्हणालात की, बी.के. आहेत, तर सगळेच चिडतील.
या (या दुनियेतील) गुरूंची तर राजाईच चट होईल. असे पुष्कळ येतात. लिहून देखील देतात
तरी देखील गायब होतात.
बाबा मुलांना कोणताही
त्रास देत नाहीत. खूप सोपी युक्ती सांगतात. कोणाला मूल होत नाही तर भगवंताला
म्हणतात आम्हाला मूल द्या. आणि मग मूल होते तर त्याचे खूप चांगले पालनपोषण करतात.
शिकवतात. जेव्हा मोठा होईल तेव्हा म्हणतील - आता तू तुझा धंदा कर. बाबा मुलांचे
पालनपोषण करून त्याला लायक बनवतात तर मुलांचा सेवक झाले ना. हे बाबा तर मुलांची सेवा
करून सोबत घेऊन जातात. ते लौकिक पिता समजतील मुलगा मोठा होऊन आपल्या कामधंद्याला
लागावा; आणि जेव्हा आम्ही वृद्ध होऊ तेव्हा तो आमची सेवा करेल. हे बाबा तर सेवा
मागत नाहीत. हे आहेतच निष्काम. लौकिक पिता समजतात - जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
आमचा संभाळ करणे हे मुलांचे कर्तव्य आहे. अशी इच्छा ठेवतात. हे बाबा तर म्हणतात मी
निष्काम सेवा करतो. मी राज्य करत नाही. मी किती निष्काम आहे. बाकीचे जे काही करतात
तर त्याचे फळ त्यांना जरूर मिळते. हे तर आहेत सर्वांचे पिता. म्हणतात - मी तुम्हा
मुलांना स्वर्गाची राजाई देतो. तुम्ही किती उच्च पद प्राप्त करता. मी तर फक्त
ब्रह्मांडाचा मालक आहे, ते तर तुम्ही देखील आहात परंतु तुम्ही राजाई घेता आणि गमावता.
मी तर राजाई घेतही नाही आणि गमावत सुद्धा नाही. माझा ड्रामामध्ये हा पार्ट आहे.
तुम्ही मुले सुखाचा वारसा प्राप्त करण्याकरिता पुरुषार्थ करता. बाकीचे सर्व केवळ
शांती मागतात. ते गुरु लोक म्हणतात सुख काग विष्ठा समान आहे म्हणून ते शांतीच
मागतात. ते हे नॉलेज घेऊ शकत नाहीत. त्यांना सुखा बद्दल तर ठाऊक सुद्धा नाहीये. बाबा
समजावून सांगतात शांती आणि सुखाचा वारसा देणारा एक मीच आहे. सतयुग-त्रेतामध्ये गुरु
असत नाहीत, तिथे रावणच नाहीये. ते आहेच ईश्वरीय राज्य. हा ड्रामा बनलेला आहे. या
गोष्टी इतर कोणाच्या बुद्धीमध्ये बसणारही नाहीत. तर मुलांनी चांगल्या रीतीने धारण
करून उच्च पद प्राप्त करायचे आहे. आता तुम्ही आहात संगमावर. तुम्ही जाणता नवीन
दुनियेची राजधानी स्थापन होत आहे. तर तुम्ही आहातच मुळी संगमयुगावर. बाकी सर्व आहेत
कलियुगामध्ये. ते तर कल्पाचा कालावधी लाखो वर्षे आहे असे म्हणतात. घोर अंधारामध्ये
आहेत ना. गायले देखील आहे - कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपलेले आहेत. विजय तर
पांडवांचा गायला गेला आहे.
तुम्ही आहात ब्राह्मण.
यज्ञ ब्राह्मणच रचतात. हा तर आहे सर्वात मोठा बेहदचा जबरदस्त ईश्वरीय रुद्र यज्ञ.
ते हदचे यज्ञ अनेक प्रकारचे असतात. हा रुद्र यज्ञ एकदाच होतो. सतयुग-त्रेतामध्ये मग
कोणताही यज्ञ होत नाही कारण तिथे कोणती संकटे इत्यादीची गोष्टच नाही. ते आहेत सर्व
हदचे यज्ञ. हा आहे बेहदचा यज्ञ. हा बेहदच्या बाबांनी रचलेला यज्ञ आहे, ज्यामध्ये
बेहदची आहुती पडणार आहे. नंतर मग अर्धा कल्प कोणताच यज्ञ होणार नाही. तिथे रावण
राज्यच नाहीये. रावण राज्य सुरु झाल्यावर मग हे सर्व सुरू होते. बेहदचा यज्ञ एकदाच
रचला जातो, यामध्ये ही सारी जुनी सृष्टी स्वाहा होते. हा आहे बेहदचा रुद्र ज्ञान
यज्ञ. यामध्ये मुख्य आहे ज्ञान आणि योगाची गोष्ट. योग अर्थात आठवण. आठवण शब्द खूप
गोड आहे. योग शब्द कॉमन झाला आहे. ‘योग’चा अर्थ कोणालाही समजत नाही. तुम्ही समजावून
सांगू शकता - योग अर्थात बाबांची आठवण करणे. बाबा तुम्ही तर आम्हाला बेहदचा वारसा
देता. आत्मा बोलते - ‘बाबा, तुम्ही पुन्हा आले आहात, आम्ही तर तुम्हाला विसरलो होतो.
तुम्ही आम्हाला बादशाही दिली होती. आता पुन्हा येऊन भेटला आहात. तुमच्या श्रीमतावर
आम्ही जरूर चालणार’. अशा प्रकारे मनातल्या मनात आपल्याशीच गोष्टी करायच्या आहेत.
बाबा, तुम्ही तर आम्हाला खूप चांगला रस्ता सांगता. आम्ही कल्प-कल्प विसरून जातो. आता
बाबा पुन्हा अभुल (अचूक) बनवत आहेत म्हणून आता बाबांचीच आठवण करायची आहे. आठवण
केल्यानेच वारसा मिळेल. मी जेव्हा सन्मुख येतो तेव्हा तुम्हाला समजावून सांगतो.
तोपर्यंत गात राहतात - तुम्ही दु:ख हर्ता, सुख कर्ता आहात. महिमा गातात परंतु ना
आत्म्याला, ना परमात्म्याला जाणतात. आता तुम्ही समजता - इतक्या छोट्याशा बिंदूमध्ये
अविनाशी पार्ट नोंदलेला आहे. हे देखील बाबा समजावून सांगतात. त्यांना म्हटले जाते -
परमपिता परमात्मा अर्थात परम-आत्मा. बाकी मी काही अजस्त्र हजारो सूर्यांप्रमाणे नाही
आहे. मी तर टीचर प्रमाणे शिकवत आहे. किती असंख्य मुले आहेत. हा क्लास तर पहा किती
वंडरफुल आहे. इथे कोण-कोण शिकतात? अबला, कुब्जा, साधू देखील एके दिवशी येऊन बसतील.
वृद्ध माता, लहान मुले इत्यादी सर्व बसले आहेत. असे स्कूल कधी पाहिले आहे? इथे आहे
आठवणीची मेहनत. ही आठवणच वेळ घेते. आठवणीचा पुरुषार्थ करणे हे देखील ज्ञान आहे ना.
आठवणीसाठी देखील ज्ञान. चक्र समजावून सांगण्यासाठी देखील ज्ञान. नॅचरल खरेखुरे
नेचरक्युअर (नैसर्गिक उपचार) याला म्हटले जाते. तुमची आत्मा एकदम प्युअर बनते. तो
असतो शरीराचा उपचार. हा आहे आत्म्याचा उपचार. आत्म्यामध्येच खाद पडते. खऱ्या
सोन्याचा खरा दागिना असतो. आता इथे मुले जाणतात शिवबाबा सन्मुख आलेले आहेत. मुलांनी
बाबांची जरूर आठवण करायची आहे. आपल्याला आता परत घरी जायचे आहे. या बाजूने त्या
दुसऱ्या बाजूला जायचे आहे. बाबांची, वारशाची आणि घराची देखील आठवण करा. ते आहे
स्वीट सायलेन्स होम. दुःख होते अशांती मुळे, सुख होते शांती मुळे. सतयुगामध्ये सुख,
शांती, संपत्ती सर्व काही आहे. तिथे भांडण-तंट्याची काही गोष्टच नाही. मुलांना हीच
चिंता असली पाहिजे - आपल्याला सतोप्रधान, खरे सोने बनायचे आहे तेव्हाच उच्च पद
मिळेल. हे रूहानी भोजन मिळते, त्याचे मग चिंतन केले पाहिजे. आज कोण-कोणते मुख्य
पॉईंट्स ऐकले! हे देखील समजावून सांगितले आहे - यात्रा दोन प्रकारच्या आहेत - रूहानी
आणि जिस्मानी. ही रूहानी यात्राच कामी येईल (उपयोगी पडेल). भगवानुवाच - मनमनाभव.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) हा विनाश
देखील शुभ कार्यासाठी आहे त्यामुळे घाबरायचे नाही, कल्याणकारी बाबा नेहमी
कल्याणाचेच कार्य करवून घेतात, याच स्मृतीमध्ये सदैव आनंदात रहायचे आहे.
२) नेहमी एकच चिंता
ठेवायची आहे की, सतोप्रधान खरे सोने बनून उच्च पद प्राप्त करायचे आहे. जे रूहानी
भोजन मिळते (मुरली मिळते) त्याचे चिंतन करायचे आहे.
वरदान:-
स्वतःला
जबाबदार समजून प्रत्येक कर्म यथार्थ विधीने करणारे संपूर्ण सिद्धी स्वरूप भव
यावेळी तुम्हा
संगमयुगी श्रेष्ठ आत्म्यांचे प्रत्येक श्रेष्ठ कर्म पूर्ण कल्पाकरिता विधान बनत आहे.
तर स्वतःला विधानाचे रचयिता समजून प्रत्येक कर्म करा, यामुळे आळस स्वतः समाप्त होईल.
संगमयुगावर आपण विधानाचे रचयिता, जबाबदार आत्मे आहोत - या निश्चयाने प्रत्येक कर्म
करा म्हणजे मग यथार्थ विधीद्वारे केलेल्या कर्माची संपूर्ण सिद्धी अवश्य प्राप्त
होईल.
बोधवाक्य:-
सर्वशक्तिमान
बाबा सोबत असतील तर माया पेपर-टायगर बनेल.
अव्यक्त इशारे:- या
अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.
नेहमी जीवन-मुक्त
राहण्याचे सहज साधन आहे - ‘मी’ आणि ‘माझे बाबा’! कारण ‘माझे-माझे’ हेच बंधन आहे.
माझे बाबा झाले तर सर्व ‘माझे’पणा नष्ट. जेव्हा ‘एक माझे’ मध्ये सर्व ‘माझे-माझे’
समाप्त होईल, तर बंधन मुक्त झाले. तर हीच आठवण ठेवायची आहे की आपण ब्राह्मण
जीवन-मुक्त आत्मा आहोत.