16-08-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुमचे एम ऑब्जेक्ट आहे वंडरफुल रंगीबेरंगी दुनियेचा (स्वर्गाचा) मालक
बनणे, तर नेहमी याच आनंदामध्ये हर्षित रहा, कोमेजलेले नको”
प्रश्न:-
भाग्यवान
मुलांना कोणता उत्साह सदैव कायम राहील?
उत्तर:-
बेहदचे बाबा नवीन दुनियेचा प्रिन्स-प्रिन्सेस बनविण्यासाठी शिकवत आहेत. तुम्ही याच
उत्साहाने सर्वांना समजावून सांगू शकता की या लढाईमध्ये स्वर्ग सामावलेला आहे. या
लढाई नंतर स्वर्गाचे द्वार उघडणार आहे - याच आनंदामध्ये रहायचे आहे आणि इतरांनाही
आनंदाने समजावून सांगायचे आहे.
गीत:-
दुनिया रंग
रंगीली बाबा…
ओम शांती।
हे बाबांना कोणी म्हटले, की दुनिया रंगीबेरंगी आहे. आता याचा अर्थ इतर कोणीही समजू
शकत नाही. बाबांनी समजावून सांगितले आहे हा खेळ रंग-रंगीला आहे. कोणताही चित्रपट
इत्यादी असतो तर खूप रंगीबेरंगी दृश्ये, देखावे इत्यादी असतात ना. आता या बेहदच्या
दुनियेला कोणी जाणतच नाहीत. तुमच्यामध्ये देखील नंबरवार पुरुषार्थानुसार साऱ्या
विश्वाचे आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे. तुम्ही समजता स्वर्ग किती रंगीबेरंगी आहे,
सुंदर आहे. ज्याला कोणीही जाणत नाही. कोणाच्याच बुद्धीमध्ये नाही आहे, ती आहे
वंडरफुल रंगीबेरंगी दुनिया. गायले जाते - ‘वंडर ऑफ द वर्ल्ड’, याला केवळ तुम्हीच
जाणता. तुम्हीच वंडर ऑफ वर्ल्डसाठी आपापल्या भाग्यानुसार पुरुषार्थ करत आहात. एम
ऑब्जेक्ट तर आहे. ते आहे वंडर ऑफ द वर्ल्ड, खूप रंगीबेरंगी दुनिया आहे, जिथे
हिरे-माणकांचे महाल असतात. तुम्ही एका सेकंदामध्ये वंडरफुल वैकुंठामध्ये निघून जाता.
खेळता, राम-विलास (नाच-गाणे) इत्यादी करता. खरोखर वंडरफुल दुनिया आहे ना. इथे आहे
मायेचे राज्य. हे देखील किती वंडरफुल आहे. मनुष्य काय-काय करत राहतात. दुनियेमध्ये
हे कोणी समजत नाहीत की आपण नाटकामध्ये खेळ करत आहोत. नाटक जर समजले तर नाटकाच्या
आदि-मध्य-अंताचे देखील ज्ञान पाहिजे. तुम्ही मुले जाणता बाबा देखील किती साधारण
आहेत. माया एकदमच विसरायला लावते. नाकाला पकडले आणि हा विसरून गेला. आता-आता
आठवणीमध्ये आहेत, खूप हर्षित राहतात. ओहो! आम्ही वंडर ऑफ वर्ल्ड स्वर्गाचे मालक बनत
आहोत, आणि मग विसरून जातात तर कोमेजून जातात. असे काही कोमेजून जातात की एखादा
भिल्ल सुद्धा असा कोमेजलेला नसेल. जसे की जरा सुद्धा समजतच नाहीत की आपण
स्वर्गामध्ये जाणारे आहोत. आपल्याला बेहदचे बाबा शिकवत आहेत. जणूकाही एकदम मुडदा
बनतात. तो आनंद, नशा राहत नाही. आता वंडर ऑफ वर्ल्डची स्थापना होत आहे. वंडर ऑफ
वर्ल्डचा श्रीकृष्ण प्रिन्स आहे. हे देखील तुम्हीच जाणता. श्रीकृष्ण जन्माष्टमीवर
देखील जे ज्ञानामध्ये हुशार आहेत तेच समजावून सांगत असतील. श्रीकृष्ण वंडर ऑफ
वर्ल्डचा प्रिन्स होता. ते सतयुग मग कुठे गेले! सतयुगापासून शिडी कसे उतरले.
सतयुगापासून कलियुग कसे झाले? उतरती कला कशी झाली? हे तर तुम्हा मुलांच्या
बुद्धीमध्येच येईल. त्याच आनंदाने समजावून सांगितले पाहिजे. श्रीकृष्ण येत आहेत.
श्रीकृष्णाचे राज्य पुन्हा स्थापन होत आहे. हे ऐकून भारतवासीयांना देखील आनंद झाला
पाहिजे. परंतु हा उत्साह त्यांना येईल जे भाग्यवान असतील. दुनियेतील मनुष्य तर
रत्नांना देखील दगड समजून फेकून देतात. ही अविनाशी ज्ञान-रत्न आहेत ना. या
ज्ञान-रत्नांचे सागर आहेत - बाबा. या ज्ञान-रत्नांची खूप व्हॅल्यू आहे. ही
ज्ञान-रत्न धारण करायची आहेत. आता तुम्ही ज्ञान सागरकडून डायरेक्ट ऐकता तर मग बाकी
काहीही ऐकण्याची आवश्यकता नाही. सतयुगामध्ये ही नसतात. ना तिथे एल. एल. बी. ना
सर्जन इत्यादी बनायचे आहे. तिथे हे नॉलेजच नाही. तिथे तर तुम्ही प्रारब्ध भोगता. तर
जन्माष्टमीवर मुलांनी चांगल्या रीतीने समजावून सांगायचे आहे. अनेकदा मुरली देखील
चालली आहे. मुलांना विचार सागर मंथन करायचे आहे, तेव्हाच पॉईंट्स निघतील. भाषण
करायचे आहे तर पहाटे उठून लिहिले पाहिजे, मग वाचले पाहिजे. विसरलेले पॉईंट्स पुन्हा
ॲड केले पाहिजेत. याने धारणा खूप चांगली होईल तरीही लिहिल्या प्रमाणे सर्व काही बोलू
शकणार नाही. काही ना काही पॉईंट्स विसरायला होतील. तर समजावून सांगायचे आहे -
श्रीकृष्ण कोण आहे, हा तर वंडर ऑफ वर्ल्ड चा मालक होता. भारतच पॅराडाईज होता आणि
त्या पॅराडाईजचा मालक श्रीकृष्ण होता. आम्ही तुम्हाला संदेश देत आहोत की, श्रीकृष्ण
येत आहेत. राजयोग भगवंतानेच शिकवला आहे. आता देखील शिकवत आहेत. पवित्रतेसाठी देखील
पुरुषार्थ करवून घेत आहेत, डबल मुकुटधारी देवता बनविण्यासाठी. हे सर्व मुलांच्या
स्मृतीमध्ये आले पाहिजे. ज्यांची प्रॅक्टिस असेल ते चांगल्या रीतीने समजावून सांगू
शकतील. श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये देखील एकदम फर्स्ट क्लास लिखाण आहे. या लढाईनंतर
स्वर्गाचे द्वार उघडणार आहे. या लढाईमध्ये जणू स्वर्ग सामावलेला आहे. मुलांनी देखील
खूप आनंदात राहिले पाहिजे, जन्माष्टमीवर मनुष्य कपडे इत्यादी नवीन घालतात. परंतु
तुम्ही जाणता की आता आपण हे जुने शरीर सोडून नवीन कांचन शरीर घेणार. ‘कांचन काया’
म्हटले जाते ना अर्थात सोन्याची काया. आत्मा देखील पवित्र, शरीर देखील पवित्र. आता
कांचन नाही आहे. नंबरवार बनत आहेत. कांचन बनणारच मुळी आठवणीच्या यात्रेने. बाबा
जाणतात बरेच आहेत ज्यांना आठवण करण्याची देखील बुद्धी नाहीये. आठवणीची जेव्हा मेहनत
कराल तेव्हाच वाणी जौहरदार (शक्तिशाली) होईल. आता ती ताकद कुठे आहे. योग नाही आहे.
लक्ष्मी-नारायण बनण्यासाठी लक्षण सुद्धा पाहिजे ना. अभ्यास पाहिजे. श्रीकृष्ण
जन्माष्टमीवर समजावून सांगणे खूप सोपे आहे. श्रीकृष्णासाठी म्हणतात - श्याम-सुंदर.
श्रीकृष्णाला सुद्धा काळा, नारायणाला देखील काळा, रामाला देखील काळा बनवले आहे. बाबा
स्वतः म्हणतात, ‘माझी मुले जी आधी ज्ञान-चितेवर बसून स्वर्गाचे मालक बनली ती मग गेली
कुठे’. काम चितेवर बसून नंबरवार घसरत आले (अधोगती होत गेली). सृष्टी देखील
सतोप्रधान, सतो, रजो, तमो बनते. तर मनुष्यांची अवस्था देखील अशीच होते. काम चितेवर
बसून सर्व श्याम अर्थात काळे बनले आहेत. आता मी आलो आहे सुंदर बनविण्यासाठी.
आत्म्याला सुंदर बनवले जाते. बाबा प्रत्येकाच्या वर्तनावरून समजून जातात - मनसा,
वाचा, कर्मणा कसे चालतात. कर्म कसे करतात, त्यावरून माहित होते. मुलांचे वर्तन तर
अतिशय फर्स्ट क्लास असले पाहिजे. मुखावाटे सदैव रत्न निघाली पाहिजेत. श्रीकृष्ण
जयंतीवर समजावून सांगणे खूप चांगले आहे. ‘श्याम आणि सुंदर’ असा टॉपिक असावा.
श्रीकृष्णाला देखील काळा आणि नारायणाला मग राधेला सुद्धा काळे का बनवतात? शिवलिंग
म्हणून देखील काळाच दगड ठेवतात. आता ते काही काळे थोडेच आहेत. शिव कोण आहेत आणि ते
काय चीज बनवत आहेत. या गोष्टींना तुम्ही मुलेच जाणता. काळा का बनवतात तुम्ही यावर
समजावून सांगू शकाल. आता बघणार मुले कशी सेवा करतात. बाबा तर म्हणतात - हे ज्ञान
सर्व धर्मवाल्यांसाठी आहे, त्यांना देखील सांगायचे आहे - ‘बाबा म्हणतात माझी आठवण
करा तर तुमची जन्म-जन्मांतरीची पापे नष्ट होतील’. पवित्र बनायचे आहे. कोणालाही
तुम्ही राखी बांधू शकता. युरोपियनला देखील बांधू शकता. कोणीही असेल त्यांना सांगायचे
आहे - भगवानुवाच, जरूर कोणत्या तरी शरीराद्वारेच बोलतील ना. म्हणतात - मामेकम् (मज
एकाची) आठवण करा. देहाचे सर्व धर्म सोडून स्वतःला आत्मा समजा. बाबा किती समजावून
सांगतात, तरीही समजत नाहीत, तर बाबा समजून जातात यांच्या भाग्यातच नाही आहे. एवढे
तर समजत असतील की शिवबाबा शिकवत आहेत. रथा शिवाय तर शिकवू शकणार नाहीत, इशारा देणेच
पुरेसे आहे. काही-काही मुलांना समजावून सांगण्याची प्रॅक्टिस चांगली आहे.
बाबा-मम्मासाठी तर समजता हे उच्च पद घेणारे आहेत. मम्मा देखील सेवा करत होती ना. या
गोष्टींना देखील समजावून सांगायचे आहे. मायेची देखील अनेक प्रकारची रूपे आहेत. असे
बरेचजण म्हणतात - माझ्यामध्ये मम्मा येते, शिवबाबा येतात परंतु नवीन-नवीन पॉईंट तर
मुकर्रर (पूर्वनियोजित) तनाद्वारेच ऐकवतील की दुसऱ्या कोणाद्वारे ऐकवतील. असे होऊ
शकत नाही. तसे तर मुली देखील खूप प्रकारचे पॉईंट्स आपले स्वतःचे सुद्धा ऐकवतात.
मॅगझीनमध्ये किती गोष्टी येतात. असे नाही की मम्मा-बाबा त्यांच्यामध्ये येतात, ते
लिहून घेतात. नाही. बाबा तर इथे डायरेक्ट येतात, तेव्हाच तर इथे ऐकण्यासाठी येता.
जर मम्मा-बाबा कोणामध्ये येतात तर मग तिथेच बसून त्यांच्याकडून शिका. नाही, इथे
येण्यासाठी सर्वांना ओढ लागते. दूर राहणाऱ्यांना तर जास्तच ओढ वाटते. तर मुले
जन्माष्टमीवर देखील खूप सेवा करू शकतात. श्रीकृष्णाचा जन्म कधी झाला, हे देखील
कोणाला माहित नाहीये. तुमची आता झोळी भरत आहे तर आनंद वाटला पाहिजे. परंतु बाबा
बघतात काही जणांना तर अजिबातच आनंद होत नाही. श्रीमतावर न चालण्याची तर जणू काही
शपथच घेतात. सेवाभावी मुलांना तर जशी सेवा आणि सेवाच सुचत राहील. त्यांना वाटते की,
बाबांची सेवा केली नाही, कोणाला रस्ता सांगितला नाही तर जसे की आपण आंधळे राहिलो.
या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ना. बॅजमध्ये देखील श्रीकृष्णाचे चित्र आहे, यावर
देखील तुम्ही समजावून सांगू शकता. कोणालाही विचारा यांना काळे का दाखवले आहे, सांगू
शकणार नाहीत. शास्त्रांमध्ये लिहिले आहे - रामाची पत्नी चोरीला गेली. परंतु अशी काही
गोष्ट तिथे घडत नाही.
तुम्ही भारतवासीच
परिस्तानी होता, आता कब्रस्तानी बनला आहात, मग ज्ञान चितेवर बसून दैवी गुण धारण
करून परिस्तानी बनता. सेवा तर मुलांना करायची आहे. सर्वांना संदेश द्यायचा आहे.
यामध्ये खूप चांगली बुद्धी पाहिजे. एवढा नशा पाहिजे - आपल्याला भगवान शिकवत आहेत.
भगवंताच्या सोबत राहतो. भगवंताची मुले देखील आहोत आणि मग शिकतो देखील. बोर्डिंगमध्ये
राहतात तर मग बाहेरची संगत लागत नाही. इथे देखील स्कूल आहे ना. ख्रिश्चन लोकांमध्ये
तरीही मॅनर्स असतात आता तर बिल्कुल नो मॅनर्स, तमोप्रधान पतित आहेत. देवतांच्या
समोर जाऊन डोके टेकतात. त्यांची किती महिमा आहे. सतयुगामध्ये सर्वांचे दैवी
कॅरेक्टर (चरित्र) होते, आता आसुरी चरित्र आहे. अशा प्रकारे तुम्ही भाषण करा तर
ऐकून खूप खुश होतील. लहान तोंडी मोठी गोष्ट - हे श्रीकृष्णासाठी म्हटले जाते. आता
तुम्ही किती मोठ्या गोष्टी ऐकता, इतके मोठे बनण्यासाठी. तुम्ही कोणालाही राखी बांधू
शकता. हा बाबांचा संदेश तर सर्वांना द्यायचा आहे. ही लढाई स्वर्गाचे द्वार उघडते.
आता पतितापासून पावन बनायचे आहे. बाबांची आठवण करायची आहे. देहधारीची आठवण करायची
नाही. एकच बाबा सर्वांची सद्गती करतात. हे आहेच आयरन एज्ड वर्ल्ड (कलियुगी दुनिया).
तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये देखील नंबरवार पुरुषार्थानुसार धारणा होते, स्कूलमध्ये
देखील स्कॉलरशिप घेण्यासाठी खूप मेहनत करतात. इथे देखील किती मोठी स्कॉलरशिप आहे.
सेवा पुष्कळ आहे. माता देखील खूप सेवा करू शकतात, सगळी चित्र सुद्धा घ्या.
श्रीकृष्णाचे काळे, नारायणाचे काळे, रामचंद्राचे सुद्धा काळे चित्र घ्या, शिवाचे
देखील काळे… आणि मग बसून समजावून सांगा. देवतांना काळे का दाखवले आहे? श्याम-सुंदर.
श्रीनाथद्वारे जाल तर एकदम काळे चित्र आहे. तर अशी काही चित्रे एकत्र केली पाहिजेत.
आपले सुद्धा दाखवले पाहिजे. श्याम-सुंदरचा अर्थ समजावून सांगा आणि मग बोला की,
तुम्ही देखील आता राखी बांधून, काम-चितेवरून उतरून ज्ञान-चितेवर बसाल तर गोरे बनाल.
इथे देखील तुम्ही सेवा करू शकता. भाषण खूप चांगल्या रीतीने करू शकता की, यांना काळे
का दाखवले आहे! शिवलिंगाला देखील काळे का दाखवले आहे! सुंदर आणि श्याम का म्हटले
जाते, आम्ही सांगतो. यामध्ये कोणी नाराज होणार नाही. सेवा तर खूप सोपी आहे. बाबा तर
समजावून सांगत राहतात - ‘मुलांनो, चांगले गुण धारण करा, कुळाचे नाव मोठे करा’.
तुम्ही जाणता आता आपण उच्च ते उच्च ब्राह्मण कुळाचे आहोत. मग रक्षाबंधनाचा अर्थ
तुम्ही कोणालाही समजावून सांगू शकता. वेश्यांना देखील समजावून सांगून राखी बांधू
शकता. चित्र देखील सोबत असावीत. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा - हा
आदेश मानल्यानेच तुम्ही गोरे बनाल. खूप युक्त्या आहेत. कोणीही नाराज होणार नाही. एका
बाबांव्यतिरिक्त कोणताही मनुष्यमात्र कोणाची सद्गती करू शकत नाही. भले रक्षाबंधनाचा
दिवस नसेलही, राखी कधीही बांधू शकता. हा तर अर्थ सांगायचा आहे. राखी जेव्हा हवी
तेव्हा बांधली जाऊ शकते. तुमचा धंदाच हा आहे. बोला, बाबांसोबत प्रतिज्ञा करा. बाबा
म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा, तर पवित्र बनाल. मस्जिदमध्ये देखील जाऊन
तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता - ‘आम्ही राखी बांधण्याकरिता आलो आहोत. ही गोष्ट
तुम्हाला देखील समजण्याचा अधिकार आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर पापे नष्ट
होतील, पावन बनून पावन दुनियेचे मालक बनाल. आता तर पतित दुनिया आहे ना. गोल्डन एज्ड
होती जरूर, आता आयरन एज्ड आहे. तुम्हाला गोल्डन एज्डमध्ये खुदा जवळ जायचे नाही आहे
का?’ असे ऐकवाल तर लगेच येऊन पाया पडतील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) ज्ञान -रत्नाच्या
सागराकडून जी अविनाशी रत्न प्राप्त होत आहेत, त्याची किंमत ठेवायची आहे. विचार सागर
मंथन करून स्वतःमध्ये ज्ञान-रत्न धारण करायची आहेत. मुखावाटे सदैव रत्नच काढायची
आहेत.
२) आठवणीच्या
यात्रेमध्ये राहून वाणीला जौहरदार (शक्तिशाली) बनवायचे आहे. आठवणीनेच आत्मा कांचन
बनेल, त्यामुळे आठवण करण्याची कला शिकायची आहे.
वरदान:-
‘माझे’पणाच्या
सूक्ष्म स्वरूपाचा देखील त्याग करणारे सदा निर्भय, निश्चिंत बादशहा भव
आजच्या दुनियेमध्ये
धन देखील आहे आणि भय देखील आहे. जितके धन तितकेच भीतीमध्येच खातात, भीतीमध्येच
झोपतात. जिथे ‘माझे’पणा आहे तिथे भय जरूर असेल. कोणते सोन्याचे हरीण देखील जर माझे
आहे तरी भीती आहे. परंतु जर ‘माझे एक शिवबाबा’ आहेत तर निर्भय बनाल. तर सूक्ष्म
रूपातील सुद्धा ‘माझे-माझे’ला तपासून त्याचा त्याग करा तर निर्भय, निश्चिंत बादशहा
बनून राहण्याचे वरदान मिळेल.
बोधवाक्य:-
दुसऱ्यांच्या
विचारांना सन्मान द्या - तर तुम्हाला स्वतः सन्मान प्राप्त होईल.
अव्यक्त इशारे:-
सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना. एकीकडे बेहदचे वैराग्य असावे,
तर दुसरीकडे बाबांप्रमाणे बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन रहा, एक सेकंद आणि एक संकल्प
देखील या लवलीन अवस्थेमधून खाली येऊ नका. अशा लवलीन मुलांचे संघटनच बाबांना
प्रत्यक्ष करेल. तुम्ही निमित्त आत्मे पवित्र प्रेम आणि आपल्या प्राप्तींच्या द्वारे
सर्वांना श्रेष्ठ पालना द्या. योग्य बनवा अर्थात योगी बनवा.