16-09-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आपसामध्ये एकमेकांना बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याचा इशारा देत, सावध करत उन्नती करत राहा”

प्रश्न:-
पित्या समान नॉलेजफुल बनणाऱ्या मुलांच्या जीवनाची मुख्य धारणा सांगा?

उत्तर:-
ते सदैव हसतमुख राहतात, कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना रडू येऊ शकत नाही. काहीही घडले तरी नथिंग न्यू. असे जे आता नॉलेजफुल अर्थात रोना-प्रूफ (रडू न येणारे) बनतात, कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये अशांत होत नाहीत, त्यांनाच स्वर्गाची बादशाही मिळते. जिन रोया तिन खोया (जे रडले त्यांनी गमावले), रडणारे आपले पद गमावतात.

गीत:-
तुम्हें पाके हमने…

ओम शांती।
गोड-गोड मुलांनी आपणच गायलेले गाणे ऐकले. मुले जाणतात - आपण बेहदच्या बाबांच्या समोर बसलो आहोत; तर मुले म्हणतात - ‘बाबा, तुमच्याकडून जी विश्वाची बादशाही मिळवली होती, ती आता पुन्हा मिळवत आहोत’. सतयुगामध्ये तर असे गाणार नाहीत. हे संगमयुगावरच तुम्ही गाऊ शकता. तुम्ही जाणता की, आपण घर बसल्या अथवा नोकरी करत असताना बेहदच्या बाबांकडून पुन्हा बेहदचा वारसा घेत आहोत. सेंटर्सना देखील इशारा मिळतो की, ‘बाबांची आठवण करा आणि आपण विश्वाचे मालक बनत आहोत, हे लक्षात ठेवा’. काही नवीन गोष्ट नाहीये. आम्ही कल्प-कल्प बाबांकडून विश्वाची बादशाही घेतो. नवीन कोणी ऐकेल तर त्याला वाटेल की, हे यांना (ब्रह्मा बाबांना) शिवबाबा म्हणतात. आता ते तर आहेत निराकार आत्म्यांचे पिता. आत्मा निराकार आहे तर परमात्मा बाबा देखील निराकार आहेत. आत्म्याला निराकार तोपर्यंत म्हणणार जोपर्यंत साकारी रूप घेतलेले नाही. तर मुलांना हे समजले आहे की, आपण बेहदच्या बाबांकडून हे ज्ञान ऐकत आहोत. रूहानी टीचर शिकवत आहेत जेणेकरून तुम्ही एकमेकांना सावध करू शकाल. पहिली ही रूहानी सावधानी मिळते. सर्व बेहदच्या बाबांच्या आठवणीतच राहतात आणि इशारा देतात - ‘बाबांच्या आठवणीमध्ये राहा, इतर कुठेही बुद्धी जाता कामा नये’. म्हणून म्हटले जाते - आत्म-अभिमानी भव आणि बाबांची आठवण करा. ते आहेत पतित-पावन बाबा. आता ते समोर बसून म्हणतात - माझी आठवण करा; किती सोपी युक्ती आहे. ‘मनमनाभव’ शब्द देखील आहे, परंतु जेव्हा कोणी समजेल तेव्हा. आठवणीची यात्रा शिकविणारे एक बाबाच आहेत. तुम्ही मुलेच जाणता की आपण रूहानी यात्रेवर आहोत. ती आहे भौतिक यात्रा, आता आपण दैहिक यात्री नाही आहोत. आम्ही आहोत रूहानी यात्री. या आठवणीद्वारेच विकर्म विनाश होतील. तुम्ही विकर्माजीत बनाल. दुसरा कोणताही उपाय नाही ज्यामुळे तुम्ही विकर्माजीत बनाल. एक आहे - विकर्माजीत संवत, दुसरा आहे - विक्रम संवत, त्यानंतर मग विकर्म सुरू होतात. रावण राज्य सुरू झाले आणि विकार सुरू झाले. आता तुम्ही विकर्माजीत बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. तिथे कोणतेही विकर्म केले जात नाही, कारण तिथे रावण अस्तित्वातच नाहीये. दुनियेमध्ये हे कोणीही जाणत नाही. आता तुम्हाला बाबांकडून सर्व काही माहित झाले आहे. बाबांनाच नॉलेजफुल म्हटले जाते, तर मुलांनाच ज्ञान देतील ना. गॉड फादरचे नाव देखील पाहिजे ना. नावा-रूपा पासून वेगळे थोडेच आहेत. पूजा करतात, त्यांचे नाव आहे - शिव. तेच पतित-पावन, ज्ञानाचा सागर आहेत. आत्मा, त्या परमपिता परमात्मा बाबांची आठवण करते. आत्मा बाबांची महिमा करते. ते सुख-शांतीचे सागर आहेत. बाबा तर मुलांना जरूर वारसाच देतील. जे होऊन जातात, त्यांची स्मारके बनवतात. एक शिवबाबाच आहेत ज्यांचे गायन देखील होते आणि पूजा देखील होते. जरूर ते शरीराद्वारे कर्तव्य करतात म्हणूनच तर त्यांचे गायन आहे. ते एव्हर-प्युअर (सदा पावन) आहेत. बाबा कधी पुजारी बनत नाहीत, ते सदैव पूज्य आहेत. बाबा म्हणतात - मी कधीही पुजारी बनत नाही. माझे पूजन केले जाते. पुजारी लोक माझी पूजा करतात. सतयुगामध्ये काही तुम्ही माझी पूजा करत नाही. भक्तिमार्गामध्ये मज पतित-पावन बाबांची आठवण करता. सर्वात आधी अव्यभिचारी भक्ती त्या एकाचीच होते नंतर मग व्यभिचारी भक्ती बनते. ब्रह्मा-सरस्वतीला देखील ते शिवबाबा विश्वाचा मालक बनवतात. भक्तीचा केवढा मोठा विस्तार आहे. बीजाचा काही विस्तार नाहीये.

बाबा म्हणतात - माझी आठवण करा आणि वारशाची आठवण करा. बस, जसा झाडाचा विस्तार होतो तसा भक्तीचा देखील खूप मोठा विस्तार आहे. ज्ञान आहे - बीज. जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळते तेव्हा सद्गती प्राप्त करता. तुम्हाला काही डोकेफोड करावी लागत नाही. ज्ञान आणि भक्ती आहे ना. सतयुग-त्रेतामध्ये भक्तीचे झाड नसते. हे भक्तीचे झाड अर्धाकल्प चालते. सर्व धर्मियांचा आपापला रीत-रिवाज आहे. भक्ती तर किती विशाल आहे. ज्ञान तर सर्वांसाठी एकच आहे - बस्स, मनमनाभव. अल्फ बाबांची आठवण करा. बाबांची आठवण कराल तर जरूर वारसा देखील आठवेल. वारशाचा विस्तार होतो ना. ती असते हदची मालमत्ता. इथे तुम्हाला बेहदच्या मालमत्तेची आठवण येते. बेहदचे बाबा येऊन बेहदचा वारसा भारतवासीयांना देतात. त्यांचा जन्म देखील इथेच गायला जातो; ही या ड्रामामध्ये अनादि नोंद आहे. जसे भगवान उच्च ते उच्च आहेत, तसे भारत खंड देखील उच्च ते उच्च आहे, जिथे बाबा येऊन संपूर्ण दुनियेची सद्गती करतात. तर सर्वात मोठे तीर्थ झाले ना. म्हणतात - ओ गॉड फादर, आम्हाला आपल्या घरी घेऊन जा. भारतावर सर्वांचे प्रेम आहे. बाबा देखील भारतामध्येच येतात. आता तुम्ही मेहनत करत आहात. गोपी-वल्लभच्या गोप-गोपी तुम्ही आहात. सतयुगामध्ये तर गोप-गोपींचा प्रश्नच उद्भवत नाही. तिथे तर कायद्यानुसार राज्य चालते. लीला काही श्रीकृष्णाच्या नाहीत, लीला एका बाबांच्या आहेत. त्यांच्या त्या दिव्य लीला अत्यंत श्रेष्ठ आहेत. साऱ्या पतित सृष्टीला पावन बनवतात. ही केवढी मोठी किमया आहे. यावेळी सर्व मनुष्यमात्र अजामिल सारखे पापी आहेत. मनुष्य समजतात हे साधू इत्यादी श्रेष्ठाचारी आहेत. बाबा म्हणतात - यांचा देखील उद्धार मलाच करायचा आहे. जसे तुम्ही ॲक्टर्स आहात, बाबा देखील ॲक्टर आहेत ना. तुम्ही ८४ जन्म घेऊन पार्ट बजावता. ते देखील क्रिएटर, डायरेक्टर, मुख्य ॲक्टर आहेत, करनकरावनहार आहेत ना. काय करतात? पतितांना पावन बनवतात. बाबा म्हणतात - तुम्ही मला बोलावता - ‘येऊन आम्हाला पावन बनवा’. मी देखील या पार्टमध्ये बांधलेला आहे. असे कोणी म्हणू शकत नाही की, हा ड्रामा का बनला? कधी बनला? हा तर अनादि पूर्वनियोजित ड्रामा आहे. याचा आदि-मध्य-अंत नाही, प्रलय होत नाही. आत्मा अविनाशी आहे, तिचा कधीही विनाश होऊ शकत नाही. यांना पार्ट देखील अविनाशी मिळालेला आहे. हा बेहदचा ड्रामा आहे ना. या ड्रामाचा पार्ट कसा चालतो ते बाबा बसून नटशेलमध्ये (थोडक्यात) समजावून सांगतात. बाकी असे नाही की, परमात्मा आहेत तर मेलेल्याला जिवंत करू शकतात. अशा अंधश्रद्धेच्या आणि रिद्धी-सिद्धीच्या गोष्टी इथे नाहीत. मला तर बोलावतातच मुळी - ‘हे पतित-पावन या, येऊन आम्हाला पतिता पासून पावन बनवा’; तर खरोखर ते येतात. गीता सर्वशास्त्रमयी शिरोमणी आहे. भगवंतानेच गीता ऐकवली आहे. अच्छा, सहज राजयोग कधी शिकवला? हे देखील तुम्ही जाणता. बाबा येतातच कल्पाच्या संगमयुगावर. जेव्हा येऊन पावन दुनिया नवीन राजधानी स्थापन करतात. सतयुगामध्ये तर स्थापन करणार नाहीत ना! तिथे तर आहेच पावन दुनिया. कल्पाच्या संगमयुगातच कुंभमेळा भरतो. तो कुंभमेळा १२ वर्षांनंतर भरतो. हा मोठा कुंभचा मेळा ५ हजार वर्षांनंतर भरतो. हा आहे आत्म्यांचा आणि परमात्म्याचा मेळा. जेव्हा परमपिता परमात्मा येऊन सर्व आत्म्यांना पावन बनवून घेऊन जातात. कल्पाचा कालावधी प्रदीर्घ केल्यामुळेच मनुष्य गोंधळून गेले आहेत. आता तुम्ही समजता. तुमचे मॅगझिन जे निघते ते देखील तुम्ही मुलेच समजू शकाल इतर कोणीही समजू शकणार नाही. बाबांनी सांगितले, असे लिहा - ‘जे काही झाले ५ हजार वर्षांपूर्वीप्रमाणे झाले, नथिंग न्यू’. जे ५ हजार वर्षांपूर्वी झाले होते तेच आता रिपीट होते. कोणालाही हे समजून घ्यायचे असेल तर येऊन समजून घ्यावे. अशा प्रकारच्या युक्त्या असल्या पाहिजेत. आपण वर्तमानपत्रामध्ये काय टाकावे! तुम्ही हे देखील लिहू शकता - ‘ही महाभारत लढाई पावन दुनियेचे गेट कसे उघडते. सतयुगाची स्थापना कल्पापूर्वीप्रमाणे कशी होते, कशी देवी-देवतांची राजधानी स्थापन होत आहे, हे येऊन समजून घ्या’. गॉडफादर कडून बर्थ राईट (जन्मसिद्ध अधिकार) घ्यायचा असेल तर येऊन घ्या. अशा प्रकारे विचार सागर मंथन केले पाहिजे. ते लोक स्टोरी इत्यादी बनवतात, जो पार्ट बजावतात, ते देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. व्यासांनी देखील ड्रामा प्लॅन अनुसार शास्त्रे इत्यादी बनवली आहेत. पार्टच तसा मिळाला आहे. आता तुम्हाला ड्रामा समजला आहे, पुन्हा तोच ड्रामा रिपीट होईल. आता तुम्ही आला आहात पुन्हा ज्ञान ऐकत आहात. तुम्ही जाणता पुन्हा या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होईल. बाकीचे सर्व धर्म नष्ट होतील.

आता तुम्ही नॉलेजफुल बनत आहात. बाबा तुम्हाला आप समान नॉलेजफुल बनवत आहेत. तुम्ही जाणता अर्धे कल्प आपण पीसफुल राहू. कोणत्याही प्रकारची अशांती असणार नाही. तिथे मुले इत्यादी कधीही रडत नाहीत, सदैव हसत राहतील. इथे (संगमावर) देखील तुम्हाला रडायचे नाहीये. गायन देखील आहे - ‘अम्मा मरे तो भी हलुआ खाओ…, जिन रोया तिन खोया’. पद देखील भ्रष्ट होईल. तुम्हाला पतींचाही पती मिळाला आहे, जे स्वर्गाची बादशाही देतात. ते तर कधी मरत देखील नाहीत, मग रडण्याची काय गरज आहे; जे ‘रोना-प्रूफ’ (रडू न येणारे) बनतात तेच बादशाही घेतात. बाकीचे तर प्रजेमध्ये निघून जातील. बाबांना जर कोणी विचारले की, या परिस्थितीमध्ये मी काय बनणार? तर बाबा सांगतील. मुलांना शेवटी सर्व साक्षात्कार होतील. जसे शाळेमध्ये सर्वांना समजून येते ना. रुद्रमाळा कोणाची बनते, ते शेवटी तुम्हाला माहीत होईल. जेव्हा शेवटचे दिवस असतात तेव्हा खूप पुरुषार्थ करतात. समजतात - आपण अमुक सब्जेक्टमध्ये नापास होणार. तुम्हाला देखील माहीत होईल. बरेच जण म्हणतात - आमचा मुलांमध्ये मोह आहे. तो तर काढून टाकावाच लागेल. मोह ठेवायचा आहे एकामध्ये, बाकी ट्रस्टी बनून सांभाळायचे आहे. म्हणतात देखील ना - हे सर्व काही बाबांनी दिले आहे, तर मग ट्रस्टी बनून चाला. ममत्व काढून टाका. बाबा स्वतः येऊन म्हणतात - यांच्यामधून मोह काढून टाका. असे समजा की हे सर्व त्यांचे (शिवबाबांचे) आहे, त्यांच्या मतावरच चाला. त्यांच्या कार्यामध्येच व्यस्त राहा. अविनाशी ज्ञान-रत्नांचे दान करत राहा. इथे कन्यांसाठी बाबांना सर्वात जास्त रिगार्ड आहे. कन्या कर्मबंधना पासून फ्री असते. मुलांना तर लौकिक पित्याच्या वारशाचा नशा असतो. कन्येला लौकिक पित्याचा वारसा मिळत नाही. इथे या बाबांकडे मेल-फीमेल असा भेद नाही. बाबा आत्म्यांना बसून समजावून सांगतात. तुम्ही जाणता - आपण सर्व ब्रदर्स आहोत, बाबांकडून वारसा घेत आहोत. आत्मा शिकते, बाबांकडून वारसा घेते. जितका जास्त वारसा घ्याल तितके उच्च पद प्राप्त कराल. बाबा येऊन सर्व गोष्टी समजावून सांगतात. शिवबाबा आहेत निराकार, त्यांची पूजा देखील करतात. सोमनाथाचे मंदिर बनवले आहे. हे आता तुम्हीच जाणता की, शिवबाबांनी येऊन काय केले! त्यांचे यादगार मंदिर कशासाठी बनवले आहे? हे देखील तुम्ही समजता. कल्प-कल्प असेच होईल. ड्रामामध्ये नोंद आहे, तेच रिपीट होत आहे. बाबांना यायचेच आहे. जुन्या दुनियेचा विनाश होणारच आहे. काही दुःखाची गोष्ट नाहीये. हा खूनेनाहेक खेळ आहे (रक्तरंजित खेळ आहे). विनाकारण सर्वांचा खून होईल. नाहीतर कोणी एखाद्याचा खून केला तर त्याला फाशीची सजा होईल. इथे आता कोणाला पकडणार. या नॅचरल कॅलॅमिटीज (नैसर्गिक आपत्ती) तर येणारच आहेत. विनाश तर होणारच आहे. अमरलोक, मृत्यूलोक यांच्या अर्थाला देखील कोणी जाणत नाहीत. तुम्ही जाणता आज आम्ही मृत्यूलोकामध्ये आहोत, उद्या आपण अमरलोकामध्ये असणार, म्हणून आपण शिकत आहोत. मनुष्य तर घोर अंधारामध्ये आहेत. तुम्ही ज्ञान-अमृत पाजता, हो-हो करून मग निद्रेमध्ये झोपी जातात. ऐकतात देखील बेहदचे बाबा वारसा देत आहेत. ही तीच महाभारताची लढाई आहे ज्याद्वारे स्वर्गाचे दरवाजे उघडतात. ऐकणारे लिहितात देखील - ‘खूप छान आहे, असे ज्ञान कोणी देऊ शकत नाही. आम्ही मानतो’; बस्स. स्वतः काही ज्ञान घेत नाहीत आणि झोपून जातात, याला म्हटले जाते कुंभकर्ण. तुम्ही सांगू शकता की लिहून तर देता परंतु असे नाही परत जाल तर घरी जाऊन झोपून जा. कुंभकर्णाच्या चित्रासमोर घेऊन गेले पाहिजे, याच्यासारखे झोपून जाऊ नका. समजावून सांगण्याची खूप चांगली युक्ती केली पाहीजे ना.

बाबा म्हणतात - मुलांनो, आपल्या दुकानांमध्ये देखील मुख्य-मुख्य चित्रे ठेवा. जो कोणी येईल त्याला त्यावर समजावून सांगा. तो देखील सौदा करा, हा देखील सच्चा सौदा आहे. याने तुम्ही अनेकांचे कल्याण करू शकता. यामध्ये लाज वाटण्याचा तर काही प्रश्नच नाही. कोणी म्हणतात - बी. के. बनला आहात. बोला, अरे, प्रजापिता ब्रह्माचे कुमार-कुमारी तर तुम्ही देखील आहात ना. बाबा नवीन सृष्टी रचत आहेत. जुन्याला आग लागत आहे. तुम्ही देखील जोपर्यंत बी. के. बनत नाही तोपर्यंत स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. अशा प्रकारे दुकानांमध्ये सेवा करा तर किती बेहदची सेवा होईल. आपसात सल्ला-मसलत करा, दुकान छोटे असले तरी देखील भिंतीवर चित्र लावू शकता. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सर्वप्रथम त्यांचे कल्याण करायचे आहे. बाबा म्हणतात - आता कोणत्याही देहधारीची आठवण करू नका. शिवबाबांची आठवण करा, ज्यांच्याकडून वारसा मिळतो. मनुष्य तर बिचारे गोंधळून गेले आहेत. सांगायचे आहे - डीटी वर्ल्ड सावरंटी (दैवी दुनियेचे साम्राज्य) मिळवायचे असेल, नरापासून नारायण बनायचे असेल, तर येऊन बना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) एका बाबांमध्येच शुद्ध, खरा मोह (प्रेम) ठेवायचा आहे, त्यांचीच आठवण करायची आहे. देहधारींमधून मोह काढून टाकायचा आहे. ट्रस्टी होऊन सांभाळ करायचा आहे.

२) विकर्माजीत बनायचे आहे, त्यामुळे कर्मेंद्रियांकडून कोणतेही विकर्म घडू नये, याची खूप-खूप काळजी घ्यायची आहे.

वरदान:-
आपल्या श्रेष्ठ स्वरूपामध्ये अथवा श्रेष्ठ नशेमध्ये स्थित राहून अलौकिकतेचा अनुभव करविणारे अंतर्मुखी भव

जसे ताऱ्यांच्या समूहामध्ये काही विशेष ताऱ्यांचे तेज दुरूनच अद्वितीय आणि सुंदर दिसते; तसेच तुम्ही तारे, साधारण आत्म्यांमध्ये एक विशेष आत्मा दिसून यावे, साधारण रूपामध्ये असतानाही असाधारण आणि अलौकिक स्थिती असावी; तेव्हाच समूहामध्ये तुम्ही अल्लाह लोक (ईश्वराची मुले) दिसून याल. यासाठी अंतर्मुखी बनून मग बाह्यमुखतेमध्ये येण्याचा अभ्यास असावा. सदैव आपल्या श्रेष्ठ स्वरूपामध्ये अथवा नशेमध्ये स्थित होऊन, ‘नॉलेजफुल’ सोबतच ‘पॉवरफुल’ बनून ज्ञान द्या, तेव्हाच अनेक आत्म्यांना अनुभवी बनवू शकाल.

बोधवाक्य:-
रावणाची मालमत्ता जर स्वतःजवळ ठेवली असेल, तर तुमच्या हृदयामध्ये ‘दिलाराम’ टिकू शकणार नाहीत.

अव्यक्त इशारे - आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.

तुम्ही दात्याची मुले सर्वांना देणारे ‘मास्टर दाता’ आहात. तुम्ही आपल्या एका सेकंदाच्या दृष्टीद्वारे, अनमोल शब्दांद्वारे तहानलेल्या आत्म्यांची तहान भागवा. कोणतीही दाराशी आलेली भुकेलेली आत्मा रिकाम्या हाताने जाऊ नये. जसे साकारमध्ये करून दाखवले, कोणतीही आत्मा असंतुष्ट होऊन गेली नाही. तर भले कोणतीही, कशीही आत्मा असो, परंतु ती संतुष्ट होऊनच परत जावी.