16-11-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.12.2007  ओम शान्ति   मधुबन


“समयाच्या महत्वाला जाणून, कर्मांच्या गहन गतीकडे लक्ष द्या, नष्टोमोहा, एव्हररेडी बना”


आज सर्व खजिन्यांचे दाता, ज्ञानाचा खजिना, शक्तींचा खजिना, सर्व गुणांचा खजिना, श्रेष्ठ संकल्पांचा खजिना देणारे बापदादा आपल्या चोहो बाजूच्या खजिन्यांचे बालक सो मालक अधिकारी मुलांना बघत आहेत. अखंड खजिन्यांचे मालक बाबा सर्व मुलांना सर्व खजिन्यांनी संपन्न करत आहेत. प्रत्येकाला सर्व खजिने देतात, कोणाला कमी, कोणाला जास्त देत नाहीत कारण अखंड खजिना आहे. चोहो बाजूची मुले बापदादांच्या नयनांमध्ये सामावून गेली आहेत. सर्व खजिन्यांनी भरपूर हर्षित होत आहेत.

आजकालच्या वेळेप्रमाणे सर्वात अमूल्य श्रेष्ठ खजिना आहे - पुरुषोत्तम संगमयुगातील वेळ, कारण या संगमावरच साऱ्या कल्पाचे प्रारब्ध बनवू शकता. या छोट्याशा युगातील प्राप्ती नुसार आणि प्रारब्धा नुसार एका सेकंदाची व्हॅल्यू एका वर्षा समान आहे. इतका हा वेळ अमूल्य आहे. या वेळेसाठीच गायन आहे - “अब नहीं तो कब नहीं” (“आता नाही तर कधीच नाही”). कारण यावेळीच परमात्म्याचा पार्ट नोंदलेला आहे. म्हणून या काळाला हिरेतुल्य म्हटले जाते. सतयुगाला गोल्डन एज म्हटले जाते. परंतु यावेळी, हा काळ देखील हिरेतुल्य आहे आणि तुम्ही सर्व मुले देखील हिरेतुल्य जीवनाचे अनुभवी आत्मे आहात. याच वेळी बऱ्याच काळापासून ताटातूट झालेले आत्मे परमात्म मिलन, परमात्म प्रेम, परमात्म नॉलेज, परमात्म खजिन्यांच्या प्राप्तीचे अधिकारी बनतात. साऱ्या कल्पामध्ये देव आत्मे, महान आत्मे आहेत परंतु यावेळी परमात्म ईश्वरीय परिवार आहे म्हणून जितके या वर्तमान समयाचे महत्व आहे, या महत्वाला ओळखून, जितके स्वतःला श्रेष्ठ बनवू इच्छिता तितके बनवू शकता. तुम्ही सर्व जण या महान युगाच्या परमात्म भाग्याला प्राप्त करणारे पद्मा-पदम भाग्यवान आहात ना! अशा आपल्या श्रेष्ठ भाग्याच्या रुहानी नशेला आणि भाग्याला जाणता, अनुभव करत आहात ना! आनंद होत आहे ना! मनामध्ये कोणते गाणे गाता? ‘वाह माझे भाग्य वाह!’ कारण यावेळच्या श्रेष्ठ भाग्यासमोर इतर कोणत्याही युगामध्ये असे श्रेष्ठ भाग्य प्राप्त होऊ शकत नाही.

तर बोला, सदैव आपल्या भाग्याला स्मृतीमध्ये ठेवून हर्षित होता ना! होता का? जे समजतात की, सदैव हर्षित होतो, कधी-कधी राहणारे नाही, जे सदैव हर्षित राहतात त्यांनी हात वर करा. सदैव, सदैव… अंडरलाइन करा - सदैव. आता टी. व्ही. मध्ये तुमचा फोटो येत आहे. “सदैव” राहणाऱ्यांचा फोटो येत आहे. मुबारक असो. मातांनो हात वर करा, शक्तिंनो हात वर करा, डबल फॉरेनर्स… कोणता शब्द लक्षात ठेवाल? सदैव. कधी-कधी राहणारे तर नंतर येणार आहेत.

बापदादांनी या अगोदर देखील सांगितले आहे की समयाचा वेग अतिशय तीव्र गतीने पुढे जात आहे. वेळेच्या गतीला जाणणारे स्वतःला चेक करा की, मज मास्टर सर्वशक्तीवानची गती तीव्र आहे का? पुरुषार्थ तर सर्व करत आहेत परंतु बापदादा काय पाहू इच्छितात? प्रत्येक मुलगा तीव्र पुरुषार्थी, प्रत्येक सब्जेक्टमध्ये पास विद ऑनर आहे का फक्त पास आहे? तीव्र पुरुषार्थीची विशेष दोन लक्षणे आहेत - एक - नष्टोमोहा, दुसरे - एव्हररेडी. सर्वात आधी या देहभान, देह-अभिमानापासून नष्टोमोहा असाल तर बाकीच्या गोष्टींमध्ये नष्टोमोहा होणे काही अवघड नाहीये. देह-भान असल्याची निशाणी आहे वेस्ट, व्यर्थ संकल्प, व्यर्थ समय, ही आपली चेकिंग आपणच चांगल्या रीतीने करू शकता. साधारण समय हा देखील नष्टोमोहा होऊ देत नाही. तर चेक करा प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्प, प्रत्येक कर्म, सफल झाले? कारण संगमयुगावर विशेष बाबांचे वरदान आहे, सफलता तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तर अधिकार सहज अनुभूती करवतो. आणि एव्हररेडी, एव्हररेडीचा अर्थ आहे - मन-वचन-कर्म, संबंध-संपर्कामध्ये काळाची ऑर्डर होईल - अचानक, (pause घेणे) तर एव्हररेडी, आणि अचानकच होणार आहे. जसे आपल्या दादीला पाहिले अचानक एव्हररेडी. प्रत्येक स्वभावामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये इझी राहिली, संपर्कामध्ये इझी, स्वभावामध्ये इझी, सेवेमध्ये इझी, संतुष्ट करण्यामध्ये इझी, संतुष्ट राहण्यामध्ये इझी; म्हणून बापदादा समयाच्या समीपतेचा वारंवार इशारा देत आहेत. स्व-पुरुषार्थाची वेळ खूप थोडी आहे, म्हणून आपल्या जमेच्या खात्याला चेक करा. खजिन्यांना जमा करण्याच्या तीन विधी या अगोदर सुद्धा सांगितल्या आहेत, पुन्हा सांगत आहे. त्या तिन्ही विधींना स्वतः चेक करा. एक आहे - स्वतःच्या पुरुषार्थाने प्रारब्धाचा खजिना जमा करणे. प्राप्तींचा खजिना जमा करणे. दुसरी आहे - संतुष्ट राहणे, यामध्ये देखील ‘सदैव’ शब्द ॲड करा आणि सर्वांना संतुष्ट करणे, याने पुण्याचे खाते जमा होते. आणि हे पुण्याचे खाते अनेक जन्मांच्या प्रारब्धाचा आधार असते. तिसरी विधी आहे - सदैव सेवेमध्ये अथक, निःस्वार्थ आणि मोठ्या मनाने सेवा करणे, याने ज्यांची सेवा करता त्यांच्याकडून आपोआपच आशीर्वाद मिळतात. या तीन विधी आहेत, स्वतःचा पुरुषार्थ, पुण्य आणि आशीर्वाद. ही तीनही खाती जमा आहेत? तर चेक करा की अचानक जर कोणताही पेपर आला तर पास विद ऑनर होऊ शकाल का? कारण आजकालच्या समयानुसार प्रकृतीच्या प्रकोपाच्या छोट्या-छोट्या गोष्टी कधीही येऊ शकतात म्हणून कर्मांच्या गतीचे नॉलेज विशेष लक्षात रहावे. कर्मांची गती खूप गहन आहे. जसे ड्रामाचे अटेंशन राहते, आत्मिक स्वरूपाचे अटेंशन राहते, धारणेचे अटेंशन राहते, असेच कर्मांच्या गहन गतीचे सुद्धा अटेंशन जरुरी आहे. साधारण कर्म, साधारण वेळ, साधारण संकल्प यामुळे प्रारब्धामध्ये फरक पडतो. यावेळी तुम्ही सर्व जे पुरुषार्थी आहात ते श्रेष्ठ विशेष आत्मे आहात, साधारण आत्मे नाही आहात. विश्व कल्याणाच्या निमित्त, विश्व परिवर्तनाच्या निमित्त बनलेले आत्मे आहात. केवळ स्वतःला परिवर्तन करणारे नाही आहात, विश्वाच्या परिवर्तनासाठी जबाबदार आहात त्यामुळे आपल्या श्रेष्ठ स्वमानाचे स्मृती स्वरूप बनायचेच आहे.

बापदादांनी पाहिले, सर्वांचे बापदादांवर आणि सेवेवर खूप प्रेम आहे. सेवेचे वातावरण चोहो बाजूला कोणत्या ना कोणत्या प्लॅन अनुसार चालू आहे. त्याच सोबत आता समयानुसार विश्वातील आत्मे जे दुःखी, अशांत होत आहेत त्या आत्म्यांना दुःख, अशांती पासून सोडविण्याकरिता आपल्या शक्तींद्वारे सकाश द्या. जसे प्रकृतीचा सूर्य सकाश द्वारा (उपस्थितीने) अंधाराला दूर करून प्रकाश आणतो. आपल्या किरणांच्या बळाने अनेक वस्तूंचे परिवर्तन करतो. असेच मास्टर ज्ञान सूर्य आपल्या प्राप्त झालेल्या सुख-शांतीच्या किरणांनी, सकाश द्वारे दुःख-अशांती पासून मुक्त करा. मनसा सेवेद्वारे, शक्तीशाली वृत्ती द्वारे वायुमंडळाला परिवर्तन करा. तर आता मनसा सेवा करा. जसा वाचा सेवेचा विस्तार केला आहे, तसे मनसा सकाश द्वारे आत्म्यांमध्ये हॅप्पी आणि होपची (आनंदाचे आणि आशेचे) तरंग पसरवा. यावर्षी जो हॅप्पी आणि होप (आनंद आणि आशा) हा जो टॉपिक ठेवला आहे त्यानुसार हिंमत द्या, उमंग-उत्साह आणा, बाबांचा वारसा - दुःख, अशांती पासून मुक्ती द्या. आता जास्त गरज सकाश देण्याची आहे. या सेवेमध्ये मनाला बिझी ठेवा तर मायाजीत विजयी आत्मा आपोआपच बनाल. बाकी छोट्या-छोट्या गोष्टी तर साइड सीन आहेत, साइड सीनमध्ये काही चांगले देखील येते, काही खराब गोष्टी देखील येतात. तर साइड सीनला क्रॉस करून लक्ष्यापर्यंत पोहोचायचे असते. साइड सीन बघण्यासाठी साक्षीदृष्टाच्या सीटवर सेट रहा, बस्स. तर साइड सीन एक मनोरंजन वाटेल. तर एव्हररेडी आहात ना? उद्या देखील काही झाले, एव्हररेडी आहात? पहिली लाईन, एव्हररेडी आहात? उद्या देखील काही झाले तर? टीचर्स तयार आहात तर चांगले आहे. हे विंग्जवाले तयार आहेत. जितक्या पण विंग्ज आल्या आहेत, एव्हररेडी. विचार करा. पहा दादींनो, बघत आहात सगळे हात हलवत आहेत. चांगले आहे, मुबारक असो. एव्हररेडी नसलात जरी ना तरी आज रात्रीपर्यंत व्हा कारण वेळ तुमची प्रतीक्षा करत आहे. बापदादा मुक्तीचे गेट उघडण्याची प्रतीक्षा करत आहेत. ॲडव्हान्स पार्टी तुमचे आवाहन करत आहे. काय करू शकत नाही… मास्टर सर्वशक्तीवान तर आहातच. दृढ संकल्प करा हे करायचे आहे, हे करायचे नाहीये, बस्स. करायचे नाहीये, तर दृढ संकल्पाने ‘नाही’ ला ‘नाहीसे’ करून दाखवा. मास्टर तर आहातच ना! अच्छा.

आज पहिल्यांदा कोण आले आहे? जे पहिल्यांदाच आले आहेत, त्यांनी हात वर करा. उंच हात वर करा, हलवा. इतके आले आहेत. छान आहे. जे पण पहिल्यांदा आले आहेत त्यांना पद्मपटीने मुबारक आहे, मुबारक आहे. बापदादा आनंदित होत आहेत, की कल्पापूर्वीची मुले पुन्हा आपल्या परिवारामध्ये पोहोचली आहेत; म्हणून आता मागाहून येणाऱ्यांनी कमाल करून दाखवा. मागे रहायचे नाही, मागाहून आला आहात परंतु मागे रहायचे नाही. पुढे-पुढे रहा. यासाठी तीव्र पुरुषार्थ करावा लागेल. हिंमत आहे ना! हिंमत आहे? चांगले आहे. हिंमत मुलांची मदत देणारे बापदादा आणि परिवार आहे. चांगले आहे कारण मुले घराची शोभा आहेत. तर जे देखील आले आहेत ते मधुबनचा शृंगार आहेत. अच्छा.

सेवेचा टर्न भोपा ळ झोनचा आहे:- अच्छा, पुष्कळ आले आहेत. (झेंडे हलवत आहेत) छान आहे गोल्डन चान्स तर मिळाला आहे ना. अच्छा, जे कोणी सेवेच्या निमित्त आले आहेत त्यांच्यापैकी सर्वांनी सेवेचे जे बळ आहे, फळ आहे - अतींद्रिय सुखाच्या अनुभूतीचे, त्याचा अनुभव केला आहे? केला का? आता भले हां करण्यासाठी झेंडा हलवा, ज्यांनी असा अनुभव केला आहे. अच्छा आता तर अतींद्रिय सुखाचा अनुभव केलात, तो सदैव राहील? का थोडा वेळ राहील? जे मनापासून प्रॉमिस करत आहेत, असेच उगाच हात वर करू नका, जे मनापासून समजतात की मी या प्राप्तीला सदैव कायम ठेवेन, विघ्न-विनाशक बनेन, त्यांनी भले झेंडा हलवा. अच्छा. बघा, तुम्ही टी. व्ही. मध्ये येत आहात मग हा टीव्हीचा फोटो पाठवणार. अच्छा. हा चान्स जो ठेवला आहे तो खूप चांगला आहे. चान्स घेतात देखील आनंदाने आणि टर्न बाय टर्न सर्वांना येण्याची खुल्या मनाने परवानगी देखील मिळते. अच्छा, आता कमाल काय करणार? (२००८ मध्ये तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवू) चांगले आहे, एकमेकांना सहयोग देऊन या वायद्याला पूर्ण करा. जरूर कराल. मास्टर सर्वशक्तीवानसाठी कोणताही वायदा निभावणे, काही मोठी गोष्ट नाहीये. फक्त दृढतेला सोबती बनवून ठेवा. दृढतेला सोडायचे नाही कारण दृढता सफलतेची चावी आहे. तर जिथे दृढता असेल तिथे सफलता आहेच. असे आहे ना! करून दाखवणार. बापदादांना देखील आनंद होतो, छान आहे. बघा किती जणांना चान्स मिळतो. अर्धा क्लास तर सेवा करणाऱ्यांचा असतो. चांगले आहे. बघा, साकार बाबांच्या उपस्थितीत खूप चांगला पार्ट बजावला आहे, सर्वात पहिले म्युझियम याने (महेंद्र भाऊने) तयार केले होते. तर बघा, साकार बाबांचे आशीर्वाद साऱ्या झोनला आहेत. आता काही नवीनता करून दाखवा. आता बराच काळ होऊन गेला, काही नवीन इन्व्हेन्शन काढलेली नाहीये. विंग्ज देखील आता जुने झाले आहे. प्रदर्शनी, मेळे, कॉन्फरन्स, स्नेह मिलन हे सर्व झाले. आता काही नवीन गोष्ट काढा. शॉर्ट आणि स्वीट, खर्च कमी आणि सेवा जास्त. रायबहाद्दूर आहात ना! तर रायबहाद्दूर नवीन राय (कल्पना) शोधून काढा. जसे प्रदर्शनी झाली, मग मेळा झाला, मग विंग्जनुसार झाले, आता असे काही नवीन इन्व्हेन्शन शोधून काढा. बघू कोण निमित्त बनते. चांगले आहे, हिंमतवाले आहात म्हणून बापदादा हिंमत ठेवणाऱ्यांना नेहमी ॲडव्हान्समध्ये मदतीची मुबारक देत आहेत. अच्छा.

आता एका सेकंदामध्ये सर्वांनी अतिशय गोड स्वीट सायलेन्सच्या स्टेजच्या अनुभवामध्ये हरवून जा (बापदादांनी ड्रिल करवून घेतली) अच्छा.

चोहो बाजूच्या सर्व तीव्र पुरुषार्थी, सदैव दृढ संकल्पाद्वारे सफलतेला प्राप्त करणाऱ्या, सदैव विजयाचे तिलकधारी, बापदादांचे दिल तख्तधारी, डबल ताजधारी, विश्व कल्याणकारी, सदैव लक्ष्य आणि लक्षणाला समान करणाऱ्या परमात्म प्रेमामध्ये वाढणाऱ्या अशा सर्व श्रेष्ठ मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, अंतःकरणापासून आशीर्वाद आणि नमस्ते.

दादींसोबत संवाद:- मुले हजर आहेत, तर बाबा देखील हजर आहेतच. ना बाबा मुलांपासून दूर होऊ शकतात, ना मुले बाबांपासून दूर होऊ शकतात. वायदा आहे - सोबत आहे, सोबत जाणार, अर्धा कल्प ब्रह्मा बाबांसोबत राहणार. (दादी जानकीजी म्हणाल्या - ‘ते शिवबाबा सुद्धा एकरूप झालेले सोबत तर आहेत’) तुमची ही अनुभूती बरोबर आहे. आता तर गॅरंटी आहे परंतु जेव्हा राज्य कराल तेव्हा येणार नाहीत. कोणी बघणारा देखील हवा ना. (वरती मन कसे लागेल?) ड्रामामध्ये पार्ट आहे. ब्रह्मा बाबा तर सोबत आहेत ना. बघा, ड्रामा काय करतो?

वरदान:-
रियल्टी द्वारे प्रत्येक कर्म अथवा बोलमध्ये रॉयल्टी दाखविणारे फर्स्ट डिव्हिजनचे अधिकारी भव

रियल्टी अर्थात आपल्या खऱ्या स्वरूपाची सदैव स्मृती, ज्यामुळे स्थूल चेहेऱ्यामध्ये देखील रॉयल्टी दिसून येईल. रियल्टी अर्थात एक बाबा दुसरे कोणी नाही. या स्मृतीमुळे प्रत्येक कर्म आणि बोलमध्ये रॉयल्टी दिसून येईल. जो कोणी संपर्कामध्ये येईल त्याला प्रत्येक कर्मामध्ये बाप समान चरित्र अनुभव होतील, प्रत्येक बोलमध्ये बाबांप्रमाणे ऑथॉरिटी आणि प्राप्तीची अनुभूती होईल. त्यांचा संग रियल असल्या कारणाने पारसचे काम करेल. अशी रियल्टी असलेले रॉयल आत्मेच फर्स्ट डिव्हिजनचे अधिकारी बनतात.

सुविचार:-
श्रेष्ठ कर्मांचे खाते वाढवा तर विकर्मांचे खाते समाप्त होईल.

अव्यक्त इशारे:- अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा.

चोहो बाजूला अशांती आहे, व्यक्तींचा, प्रकृतीचा गोंधळ वाढणारच आहे, अशा वेळी सेफ्टीचे साधन आहे सेकंदामध्ये स्वतःला विदेही, अशरीरी किंवा आत्म-अभिमानी बनविणे. तर मधून-मधून ट्रायल करा एका सेकंदामध्ये मन-बुद्धीला जिथे हवे तिथे स्थित करू शकता! यालाच साधना म्हटले जाते.

सूचना:- आज महिन्याचा तिसरा रविवार आहे, सर्व राजयोगी तपस्वी भाऊ-बहिणींनी सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत, विशेष योग अभ्यासाच्या वेळी आपल्या शुभ भावनेच्या श्रेष्ठ वृत्ती द्वारे मनसा महादानी बनून सर्वांना निर्भयतेचे वरदान देण्याची सेवा करा.