17-08-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
16.11.2006 ओम
शान्ति
मधुबन
“आपल्या स्वमानाच्या
शान मध्ये रहा आणि वेळेच्या महत्वाला जाणून एव्हररेडी बना”
आज बापदादा चोहो
बाजूच्या आपल्या परमात्म प्रेमास पात्र स्वमानाच्या सीटवर सेट मुलांना बघत आहेत.
सीटवर सेट तर सर्व मुले आहेत परंतु बरीच मुले एकाग्र स्थितीमध्ये सेट आहेत आणि काही
मुले संकल्पामध्ये थोडी-थोडी अपसेट आहेत. बापदादा वर्तमान समयानुसार प्रत्येक मुलाला
एकाग्रतेच्या रूपामध्ये स्वमानधारी स्वरूपामध्ये सदैव पाहू इच्छितात. सर्व मुले
सुद्धा एकाग्रतेच्या स्थितीमध्ये स्थित होऊ इच्छितात. आपले वेगवेगळ्या प्रकारचे
स्वमान जाणतात देखील, विचारही करतात परंतु एकाग्रतेला हलचलमध्ये घेऊन येतात. सदैव
एकरस स्थिती कमी राहते. अनुभव होतो आणि अशी स्थिती हवी देखील आहे परंतु कधी-कधी का
होते, कारण! सदैव अटेंशनची कमी. जर स्वमानाची लिस्ट काढली तर किती मोठी आहे.
सर्वांत पहिला स्वमान आहे - ज्या बाबांची आठवण करत होता, त्यांची डायरेक्ट मुले बनला
आहात, नंबरवन संतान आहात. बापदादांनी तुम्हा कोटींमधून काही मुलांना कुठून-कुठून
शोधून आपले बनवले. ५ ही खंडातून डायरेक्ट बाबांनी आपल्या मुलांना आपले बनवले. किती
मोठे स्वमान आहे. सृष्टी रचत्याची पहिली रचना तुम्ही आहात. जाणता ना या स्वमानाला!
बापदादांनी आपल्या सोबतच तुम्हा मुलांना साऱ्या विश्वाच्या आत्म्यांचे पूर्वज बनवले
आहे. विश्वाचे पूर्वज आहात, पूज्य आहात. बापदादांनी प्रत्येक मुलाला विश्वाचे
आधारमुर्त, उदाहरणमुर्त बनवले आहे. नशा आहे ना? कधी थोडा-थोडा कमी होतो. विचार करा,
सर्वात अमूल्य जे साऱ्या कल्पामध्ये असे अमूल्य तख्त कोणालाच प्राप्त होत नाही, ते
परमात्म तख्त, लाइटचा ताज, स्मृतीचा तिलक दिला. स्मृती येत आहे ना - मी कोण! माझा
स्वमान काय! नशा चढत आहे ना! साऱ्या कल्पामध्ये कितीही सतयुगी अमूल्य तख्त आहेत
परंतु परमात्म दिलतख्त तुम्हा मुलांनाच प्राप्त होते.
बापदादा सदैव लास्ट
नंबर मुलाला देखील फरिश्ता सो देवता स्वरूपामध्ये पाहतात. आता-आता ब्राह्मण आहेत,
ब्राह्मणा पासून फरिश्ता, फरिश्त्या पासून देवता बनायचेच आहे. जाणता आपल्या
स्वमानाला? कारण बापदादा जाणतात की स्वमानाला विसरल्यामुळेच देहभान, देह-अभिमान येतो.
निराश देखील होतात, बापदादा पाहतात जेव्हा देह-अभिमान अथवा देहभान येते तर किती
निराश होतात. सर्व अनुभवी आहात ना! स्वमानाच्या शान मध्ये राहणे आणि या शानपासून परे
(दूर) निराश राहणे, दोन्हीला जाणता. बापदादा पाहतात की सर्व मुले मेजॉरिटी नॉलेजफुल
तर चांगली बनली आहेत, परंतु पॉवर मध्ये फुल, पॉवरफुल नाही आहेत. परसेंटेज मध्ये
आहेत.
बापदादांनी प्रत्येक
मुलाला आपल्या सर्व खजिन्यांचे बालक सो मालक बनवले, सर्वांना सगळे खजिने दिले आहेत,
कमी-जास्त दिलेले नाहीत कारण अगणित खजिना आहे, बेहद खजिना आहे म्हणून प्रत्येक
मुलाला बेहदचे बालक सो मालक बनवले आहे. बेहदचे बाबा आहेत, बेहदचा खजिना आहे, तर आता
आपणच आपल्याला चेक करा की तुमच्याकडे सुद्धा बेहद खजिना आहे? कायम आहे की कधी-कधी
काही चोरीला जातो? हरवून जातो? बाबा का अटेंशन (लक्ष) वेधून घेत आहेत? निराश न होता,
स्वमानाच्या सीटवर सेट रहा, अपसेट नाही. ६३ जन्म तर अपसेटचा अनुभव केला आहे ना! आता
अजून करू इच्छिता का? थकून गेला नाहीत? आता स्वमानामध्ये राहणे अर्थात आपल्या उच्च
ते उच्च शानमध्ये राहणे. का? किती काळ निघून गेला. सत्तरावे वर्ष साजरे करत आहात
ना! तर स्वतःची ओळख अर्थात स्वमानाची ओळख, स्वमानामध्ये स्थित राहणे. वेळेनुसार आता
‘सदैव’ शब्दाला प्रॅक्टिकल लाइफमध्ये आणा, शब्दाला अंडरलाईन करू नका परंतु
प्रॅक्टिकल लाईफ मध्ये अंडरलाईन करा. ‘रहायचे आहे, राहू, करत तर आहोत, करूच…’ हे
बेहदच्या बालक आणि मालकाचे बोल नाही आहेत. आता तर प्रत्येकाच्या हृदयातून हाच अनहद
शब्द निघावा, ‘पाना था सो पा लिया’ (जे हवे ते सर्व प्राप्त झाले). प्राप्त होत आहे…’
हे असे बेहद खजिन्याच्या बेहद बाबांची मुले बोलू शकत नाहीत. प्राप्त झाले, जर
बापदादांना प्राप्त केले, माझे बाबा म्हटले, मानले, जाणले सुद्धा, मानले सुद्धा, तर
हा अनहद शब्द - प्राप्त झाले... कारण बापदादा जाणतात की मुले स्वमानामध्ये कधी-कधी
राहत असल्या कारणाने वेळेच्या महत्वाला देखील कमी लक्षात ठेवतात. एक आहे - स्वतःचा
स्वमान, दुसरे आहे - वेळेचे महत्व. तुम्ही साधारण नाही आहात, पूर्वज आहात, तुम्हा
प्रत्येकाच्या मागे विश्वातील आत्मे आधारीत आहेत. विचार करा, जर तुम्ही हलचल मध्ये
आलात तर विश्वातील आत्म्यांची काय हालत होईल! असे समजू नका की जे महारथी म्हटले
जातात, त्यांच्याच मागे विश्व आधारीत आहे, जरी नवीन असले तरीही, कारण आज नवीन सुद्धा
भरपूर आले असतील. (पहिल्यांदा येणाऱ्यांनी हात वर केला) नवीन आहेत, ज्यांनी
अंतःकरणापासून मानले “माझे बाबा”. मानले आहे ना? जे नवीन आले आहेत ते मानतात का?
केवळ जाणतात एवढेच नाही तर मानतात सुद्धा - “माझे बाबा”, त्यांनी हात वर करा. उंच
वर करा. नवीन असलेले हात वर करत आहेत. जुने तर पक्के आहेतच ना, ज्यांनी अंतःकरणातून
मानले माझे बाबा आणि बाबांनी देखील मानले माझा मुलगा, ते सर्व जबाबदार आहेत.
कशाकरिता? जेव्हापासून तुम्ही म्हणता - मी ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारी आहे,
ब्रह्माकुमार आणि कुमारी आहात का शिवकुमार-शिवकुमारी आहात, का दोघांचेही आहात? मग
तर बांधले गेलात. जबाबदारीचा ताज घातला. घातला आहे ना? पांडव सांगा जबाबदारीचा ताज
घातला आहे? जड तर वाटत नाही ना? हलका आहे ना? आहेच लाईटचा. तर लाईट किती हलकी असते.
तर वेळेचे महत्व देखील लक्षात ठेवा. वेळ विचारून येणार नाही. बरीच मुले आता देखील
म्हणतात, विचार करतात, की थोडासा अंदाज तरी मिळाला पाहिजे. चला २० वर्षे आहेत, १०
वर्षे आहेत, थोडे माहित व्हायला हवे. परंतु बापदादा म्हणतात - वेळे विषयी, फायनल
विनाशाचे सोडून द्या, तुम्हाला तुमच्या शरीराच्या विनाशा विषयी माहिती आहे का? कोणी
आहे ज्याला माहिती आहे की मी अमुक तारखेला शरीर सोडणार, आहे माहिती? आणि आजकाल तर
ब्राह्मणांच्या जाण्याचा भोग खूप लावता. काहीच भरवसा नाही म्हणून वेळेच्या महत्वाला
जाणा. हे छोटेसे युग वयाने छोटे आहे, परंतु मोठ्यात मोठ्या प्राप्तीचे युग आहे कारण
मोठ्यात मोठे बाबा या छोटयाशा युगामध्येच येतात इतर मोठ्या युगांमध्ये येत नाहीत.
हेच छोटेसे युग आहे ज्यामध्ये साऱ्या कल्पाच्या प्राप्तीचे बीज पेरण्याची वेळ आहे.
भले मग विश्वाचे राज्य प्राप्त करा, नाहीतर पूज्य बना, साऱ्या कल्पाचे बीज पेरण्याची
वेळ हीच आहे आणि डबल फळ प्राप्त करण्याची वेळ आहे. भक्तीचे फळ देखील आता मिळते आणि
प्रत्यक्ष फळ सुद्धा आता मिळते. आता-लगेच केले, आता-लगेच प्रत्यक्ष फळ मिळते आणि
भविष्य देखील बनते. साऱ्या कल्पामध्ये पहा, असे कोणते युग आहे? कारण यावेळीच बाबांनी
प्रत्येक मुलाच्या हातावर मोठ्यात मोठी सौगात दिली आहे, आपली सौगात लक्षात आहे ना?
स्वर्गाचे राज्य-भाग्य. नवीन दुनियेच्या स्वर्गाची गिफ्ट, प्रत्येक मुलाच्या हातावर
दिली आहे. इतकी मोठी गिफ्ट कोणीही देत नाही आणि कधीच देऊ शकत नाही. आता मिळते. आता
तुम्ही मास्टर सर्वशक्तीवान बनता; इतर कोणत्याही युगामध्ये ‘मास्टर सर्वशक्तीवान’चा
दर्जा मिळत नाही. तर स्वतःच्या स्वमानामध्ये सुद्धा एकाग्र रहा आणि वेळेच्या
महत्वाला देखील जाणा. स्वतः आणि वेळ, स्वतःचा स्वमान आहे, वेळेचे महत्व आहे.
निष्काळजी बनू नका. ७० वर्षे होऊन गेली आहेत, आता जर निष्काळजी झालात तर आपली
प्राप्ती खूपच कमी कराल; कारण जितके पुढे जाता ना तितका एक तर ‘निष्काळजीपणा’ येतो,
‘खूप चांगले आहोत, खूप चांगले चालत आहोत, पोहोचून जाऊ, पहा मागे राहणार नाही, होऊन
जाईल…’ हा निष्काळजीपणा आणि दुसरे ‘रॉयल आळस’ येतो. निष्काळजीपणा आणि आळस. ‘कधी’
शब्द आहे - आळस, ‘आता’ शब्द आहे - तुरंत दान महापुण्य.
आता आज पहिला टर्न आहे
ना! तर बापदादा लक्ष वेधून घेत आहेत. या सीझनमध्ये ना स्वमानामधून खाली यायचे आहे,
ना वेळेच्या महत्त्वाला विसरायचे आहे. अलर्ट, हुशार, सावधान. प्रिय आहात ना!
ज्याच्यावर प्रेम असते ना त्याची जरा सुद्धा कमी-कमजोरी बघवत नाही. ऐकवले ना की
बापदादांचा लास्टचा मुलगा जरी असला तरीही त्याच्यावर सुद्धा अतिशय प्रेम आहे. मुलगा
तर आहे ना. तर आता या चालू असलेल्या सीझनमध्ये, सिझन भले इंडियावाल्यांचा आहे परंतु
डबल विदेशी देखील कमी नाही आहेत, बापदादांनी बघितले आहे, कोणताही टर्न असा नसतो
ज्यामध्ये डबल विदेशी नसतील. ही त्यांची कमाल आहे. आता हात वर करा डबल विदेशी. बघा
किती आहेत! स्पेशल सिझन होऊन गेला, तरी देखील पहा किती आहेत! मुबारक असो. भले आलात,
खूप-खूप मुबारक आहे.
तर ऐकले आता काय
करायचे आहे? या सीझनमध्ये काय-काय करायचे आहे, ते होमवर्क दिले आहे. स्वतःला
रियलाइज करा, स्वतःलाच करा, दुसऱ्याला नाही आणि रियल गोल्ड बना कारण बापदादा समजतात
ज्यांनी ‘माझे बाबा’ म्हटले, त्यांनी सोबत यावे, वराती होऊन येऊ नयेत. बापदादांच्या
सोबत श्रीमताचा हात पकडून सोबत यावे आणि मग ब्रह्मा बाबांच्या सोबत पहिल्या
राज्यामध्ये यावे. मजा तर पहिल्या नविन घरामध्ये असते ना. एका महिन्यानंतर देखील
म्हणतात एक महिना जुने आहे. नवीन घर, नवीन दुनिया, नवीन आचरण, नवीन रीतीरिवाज आणि
ब्रह्मा बाबांसोबत राज्यामध्ये यावे. सर्व जण म्हणतात ना - ब्रह्मा बाबांवर आमचे
खूप प्रेम आहे. तर प्रेमाची निशाणी काय असते? सोबत राहू, सोबत जाऊ, सोबत येऊ. हा आहे
प्रेमाचा पुरावा. पसंत आहे? सोबत राहणे, सोबत जाणे, सोबत येणे, पसंत आहे? आहे पसंत?
तर जी गोष्ट पसंत असते तिला थोडेच सोडून दिले जाते! तर बाबांची प्रत्येक मुलावर
प्रेमाची रीत हीच आहे की, सोबत यावे, पाठीमागून नाही. जर काही राहून गेले तर
धर्मराजाच्या सजेसाठी थांबावे लागेल. हातामध्ये हात नसेल, पाठीमागून येतील. मजा
कशामध्ये आहे? सोबत येण्यामध्ये आहे ना! तर पक्का वायदा आहे ना की सोबत यायचे आहे?
की पाठीमागून यायचे आहे? बघा हात तर खूप छान वर करतात. हात बघून बापदादा खुश तर
होतात परंतु श्रीमतचा हात वर करा. शिवबाबांना तर हात असणार नाही, ब्रह्मा बाबा,
आत्म्याला देखील हात नसणार, तुम्हाला देखील हा स्थूल हात नसणार, श्रीमतचा हात पकडून
सोबत चला. येणार ना! मान तर हलवा. अच्छा हात हलवत आहेत. बापदादा हेच इच्छितात की
एकाही मुलाने मागे राहू नये, सर्वांनी सोबत यावे. एव्हररेडी रहावे लागेल. अच्छा.
आता बापदादा चोहो
बाजूंच्या मुलांचे रजिस्टर पहात राहतील. वायदा केला, निभावला अर्थात फायदा घेतला.
फक्त वायदा करायचा नाही, फायदा घ्यायचा. अच्छा. आता सर्व दृढ संकल्प करणार! दृढ
संकल्पाच्या स्थितीमध्ये स्थित होऊन बसा, करायचेच आहे, जायचेच आहे. सोबत जायचे आहे.
आता हा दृढ संकल्प आपल्याशी करा, या स्थितीमध्ये बसा. ‘गे गे’ करायचे नाही, करायचेच
आहे. अच्छा.
सर्व बाजूंच्या डबल
सेवाधारी मुलांना, चोहो बाजूंच्या सदैव एकाग्र स्वमानाच्या सीटवर सेट राहणाऱ्या
बापदादांचे मस्तक मणी, चोहो बाजूंच्या वेळेच्या महत्वाला जाणून तीव्र पुरुषार्थाचे
प्रमाण देणाऱ्या सपूत मुलांना, चोहो बाजूंच्या उमंग-उत्साहाच्या पंखांनी सदैव
उडणाऱ्या, उडवणाऱ्या डबल लाइट फरिश्ता मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि
नमस्ते.
दादींसोबत संवाद:-
सर्वजण साथ देत चालत
आहेत - याचा बापदादांना आनंद आहे, प्रत्येकजण आपल्या विशेषतेचे बोट देत आहेत. (दादीजीं
सोबत) सर्वांना आदि रत्न बघून आनंद होतो ना. आदि पासून सेवेमध्ये आपली हाडे लावली
आहेत. हड्डी सेवा केली आहे, खूप चांगले आहे. पहा काहीही होते परंतु एक गोष्ट बघा,
भले बेडवर आहेत, नाहीतर अजून कुठेही आहेत परंतु बाबांना विसरले नाही आहेत. बाबा
हृदयामध्ये सामावलेले आहेत. असे आहे ना. पहा किती छान हसत आहे. बाकी आयुष्य मोठे आहे,
आणि धर्मराजपुरीला टाटा करून जायचे आहे, सजा खायची नाहीये, धर्मराजाला देखील मस्तक
झुकवावे लागेल. स्वागत करावे लागेल ना. टाटा करावे लागेल, म्हणून इथे थोडा-फार
बाबांच्या आठवणीमध्ये हिशोब पूर्ण करत आहेत. बाकी त्रास नाहीये, आजार भले आहे परंतु
दुःखाचा लवलेशही नाही. (परदादीजीं सोबत) या खूप हसत आहेत. सर्वांना दृष्टी द्या.
अच्छा.
वरदान:-
बाह्यमुखी
चतुराईपासून मुक्त राहणारे बाप पसंत खरे सौदागर भव
बापदादांना दुनियेची
बाह्यमुखी चतुराई पसंत नाही. म्हटले जाते भोळ्यांचा भगवान. चतुर सुजाणाला भोळी
मुलेच पसंत आहेत. परमात्म डिरेक्टरीमध्ये भोळी मुलेच विशेष व्ही.आय.पी. आहेत.
ज्यांच्यामध्ये दुनियावाल्यांची नजर जात नाहीत - तेच बाबांसोबत सौदा करून परमात्म
नेत्रांतील तारे बनले. भोळी मुलेच हृदयापासून म्हणतात “माझे बाबा”, याच एका
सेकंदाच्या, एका शब्दाने अगणित खजिन्यांचा सौदा करणारे खरे सौदागर बनलात.
सुविचार:-
सर्वांचा स्नेह
प्राप्त करायचा असेल तर मुखाने सदैव गोड बोल बोला.
अव्यक्त इशारे:-
सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना.
जे सदैव बाबांच्या
आठवणीमध्ये लवलीन अर्थात सामावलेले आहेत. अशा आत्म्यांच्या डोळ्यांमध्ये आणि
मुखाच्या प्रत्येक बोलामध्ये बाबा सामावलेले असल्याकारणाने शक्ति-स्वरूपा ऐवजी
सर्वशक्तिवान नजरेस येईल. जसे आदि स्थापनेमध्ये ब्रह्मा रूपामध्ये सदैव श्रीकृष्ण
दिसून येत होता, तसे तुम्हा मुलांच्या द्वारे सर्वशक्तिवान दिसून यावेत.
सूचना:- आज महिन्याचा
तिसरा रविवार आहे, सर्व राजयोगी तपस्वी भाऊ-बहिणी सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत,
विशेष योग अभ्यासाच्या वेळी आपल्या पूर्वजपणाच्या स्वमानामध्ये स्थित होऊन,
कल्पवृक्षाच्या मुळामध्ये बसून पूर्ण वृक्षाला शक्तिशाली योगाचे दान देत, आपल्या
वंशावळीची दिव्य पालना करा.