17-09-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो, आता ही
दुनिया एक होपलेस केस आहे, सर्वांचा मृत्यू होईल त्यामुळे यातून आसक्ती काढून टाका,
मामेकम् (मज एकाची) आठवण करा”
प्रश्न:-
सेवेचा उत्साह
न येण्याचे कारण कोणते आहे?
उत्तर:-
१) जर लक्षण
ठीक नसेल, बाबांची आठवण करत नसतील तर सेवेचा उत्साह येऊ शकत नाही. कोणती ना कोणती
उलटी कामे होत राहतात त्यामुळे सेवा करू शकत नाहीत. २) बाबांचे जे पहिले डायरेक्शन
आहे - ‘आप मुये मर गई दुनिया’ याला अंमलात आणत नाहीत. बुद्धी देह आणि देहाच्या
नात्यांमध्ये अडकलेली आहे त्यामुळे सेवा करू शकत नाहीत.
गीत:-
ओम् नमो शिवाय…
ओम शांती।
आता हे
भक्तिमार्गाचे गाणे ऐकले. शिवाय नमः म्हणतात. वारंवार शिवाचे नाव घेतात. दररोज
शिवाच्या मंदिरामध्ये जातात आणि जे सणवार आहेत ते वर्षानुवर्षे साजरे करतात.
पुरुषोत्तम महिना देखील असतो, पुरुषोत्तम वर्ष देखील असते. ‘शिवाय नम:’ तर रोज
म्हणत असतात. ‘शिव’चे भरपूर पुजारी आहेत. रचयिता आहेत शिव, उच्च ते उच्च भगवान.
म्हणतात देखील - पतित-पावन परमपिता परमात्मा शिव आहेत. दररोज पूजा देखील करतात.
तुम्ही मुले जाणता - हे संगमयुग आहे पुरुषोत्तम बनण्याचे. जसे भौतिक शिक्षणाने कोणते
ना कोणते उच्च पद मिळवतात ना. त्या लक्ष्मी-नारायणाने हे पद कसे प्राप्त केले,
विश्वाचे मालक कसे बनले, हे कोणालाच ठाऊक नाहीये. शिवाय नमः देखील म्हणतात. ‘तुम
माता पिता…’ अशी रोज महिमा गातात परंतु हे जाणत नाहीत की ते कधी येऊन मात-पिता बनून
वारसा देतात. तुम्हाला ठाऊक आहे की या दुनियेतील मनुष्य तर काहीही जाणत नाहीत.
भक्तिमार्गामध्ये किती खस्ता खातात. अमरनाथला किती झुंडच्या झुंड जाते, किती खस्ता
खातात. कोणाला जर असे म्हटले तर चिडतील. तुम्ही फार थोडी मुले आहात ज्यांना आतून
खूप आनंद होत आहे. लिहीत देखील असतात की बाबा, जेव्हापासून तुम्हाला ओळखले आहे, आता
तर आमच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. काहीही त्रास इत्यादी झाला तरीही आनंदात
राहिले पाहिजे.
आपण बाबांचे बनलो
आहोत हे कधीही विसरता कामा नये. जेव्हा की तुम्ही मुले जाणता की आपण शिवबाबांना
प्राप्त केले आहे. तर आनंदाचा पारा चढलेला राहिला पाहिजे. माया वारंवार विसरायला
लावते. भले लिहितात - आम्हाला निश्चय आहे, बाबांना आम्ही जाणतो, आणि तरी देखील
चालता-चालता थंड पडतात. ६-८ महिने, २-३ वर्षे येतच नाहीत, तर मग बाबा समजून जातात
की हे पूर्ण निश्चयबुद्धी नाहीत. पूर्ण नशा चढलेला नाहीये. असे बेहदचे बाबा,
ज्यांच्याकडून २१ जन्मांचा वारसा मिळतो. निश्चय झाला तर मग अतिशय आनंद मिश्रित
अभिमान वाटला पाहिजे. जसे एखाद्याच्या मुलाला राजा दत्तक घेऊ इच्छितो. मुलाला माहीत
होते की, आपल्यासाठी काही बोलणे चालू आहे की राजाची इच्छा आहे की या मुलाला आपण
वारस बनवावे. तर मुलाला खूप आनंद होईल ना. मी राजाचा मुलगा बनतो. जेव्हा गरीबाचा
मुलगा श्रीमंताकडे दत्तक जातो तेव्हा खूप आनंद होतो ना. ओळखतो की मला अमका दत्तक
घेत आहे तर मग गरिबीचे दुःख विसरायला होते. ती तर तरीही एका जन्माची गोष्ट आहे. इथे
मुलांना २१ जन्म वारसा घेण्याचा आनंद होत असतो. बेहदच्या बाबांची आठवण करायची आहे
आणि मग इतरांना मार्ग सांगायचा आहे. पतित-पावन शिवबाबा आलेले आहेत. ते समजावून
सांगत आहेत की, मी तुमचा पिता आहे. कोणताही मनुष्य असे म्हणू शकत नाही की, मी तुमचा
बेहदचा पिता आहे. बाबाच स्पष्टीकरण देतात की मी ५ हजार वर्षांपूर्वी आलो होतो.
तुम्हाला हाच शब्द सांगितला होता की, ‘मामेकम् याद करो’ (मज एकाची आठवण करा). मज
पतित-पावन पित्याची आठवण केल्यानेच तुम्ही पतितापासून पावन बनाल; पतितापासून पावन
बनण्याचा दुसरा कोणताही उपाय नाही. पतित-पावन एक बाबाच आहेत. एकच पतित-पावन, गीतेचे
भगवान पुनर्जन्म रहित आहेत. सर्वप्रथम ही गोष्ट लिहून घ्या. मोठमोठ्या व्यक्तींनी
लिहिलेली मते बघतील तर समजतील की, हे बरोबर आहे. एखाद्या साधारण व्यक्तीने लिहिलेले
मत बघतील तर म्हणतील ब्रह्माकुमारींनी यांच्यावर जादू केली आहे तेव्हाच तर लिहिले
आहे; मोठ्या व्यक्तीसाठी असे म्हणणार नाहीत. तुम्ही काहीही सांगता तेव्हा असे
समजतात की, लहान तोंडातून मोठ्या गोष्टी करत आहेत की, भगवान आले आहेत. तुम्हा
मुलांनी फक्त ‘भगवान आलेले आहेत’, असे सांगायचे नाही; कारण एवढ्याने काही कोणाला
समजणारही नाही आणि तुमच्यावर हसतीलही. असे समजावून सांगायचे आहे की, दोन पिता आहेत.
सुरुवातीलाच अगदी एका फटक्यात सरळ असे सांगायचे नाही की, ‘भगवान आलेले आहेत’; कारण
आजकाल दुनियेमध्ये देखील स्वतःला भगवान म्हणवून घेणारे पुष्कळ झाले आहेत. सगळे
स्वतःला भगवंताचा अवतार समजतात, त्यामुळे युक्तीने दोन पित्यांचे रहस्य समजावून
सांगितले पाहिजे. एक आहेत देहाचे पिता, दुसरे आहेत बेहदचे पिता. त्या पित्याचे नाव
आहे - शिव. ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत तर जरूर मुलांना वारसा देत असतील. शिवजयंती
देखील साजरी करतात. तेच येऊन स्वर्गाची स्थापना करतात, तर जरूर नरकाचा विनाश होणार
आहे. त्याची देखील निशाणी म्हणून ही महाभारत लढाई आहे. केवळ ‘भगवान आले आहेत’, असे
म्हटल्याने कोणालाही समजणार नाही. आरडाओरडा करत राहतात. अशा चुकीच्या पद्धतीने उलटी
सेवा केल्याने मग अजूनच सेवेमध्ये शिथिलता येते. एका बाजूला म्हणतात - ‘भगवान आलेले
आहेत, भगवान शिकवत आहेत’, आणि मग जाऊन लग्न करतात. तर मग लोकं म्हणतील - ‘तुम्हाला
मग काय झाले, तुम्ही तर म्हणत होता की, भगवान शिकवत आहेत!’ तर म्हणतात - आम्ही जे
ऐकले होते ते सांगितले. आपल्याच मुलांकडून अनेक प्रकारची विघ्ने देखील पडतात. जसे
हिंदू धर्मवाल्यांनी आपणच आपल्या तोंडावर चपराक मारली आहे ना. वास्तविक आहेत
देवी-देवता धर्माचे परंतु म्हणतात की आम्ही हिंदू आहोत. स्वतःच्याच तोंडावर चपराक
मारली आहे ना. आता तुम्ही जाणता - आपणच पूज्य होतो तेव्हा श्रेष्ठ कर्म, श्रेष्ठ
धर्म होता. आता आसुरी मतावर धर्म भ्रष्ट, कर्म भ्रष्ट बनले आहेत. आसुरी मायेच्या
मतामुळे आपणच आपल्या धर्माची निंदा सुरू करतात, म्हणून बाबांनी स्वतः सांगितले आहे
- तो आहे आसुरी संप्रदाय. हा आहे दैवी संप्रदाय, ज्यांना मी राजयोग शिकवतो. आता आहे
कलियुग. जे येऊन हे नॉलेज ऐकतात ते असुरा पासून बदलून देवता बनतात. हे नॉलेज आहेच
मुळी देवता बनण्याकरिता. ५ विकारांवर विजय प्राप्त केल्याने देवता बनतात, बाकी
असुरांचे आणि देवतांचे काही युद्ध झालेले नाहीये. ही देखील चूक केली आहे; आणि मग
दाखवतात ज्यांच्या बाजूने साक्षात भगवान आहेत त्यांचा विजय झाला, त्यामध्ये नाव
श्रीकृष्णाचे घातले आहे. वास्तविक तुमचे हे मायेसोबत युद्ध चालले आहे.
बाबा बसून मुलांना
कितीतरी गोष्टी समजावून सांगतात परंतु असे तमोप्रधान आहेत जे अजिबात समजतच नाहीत.
बाबांची आठवण करू शकत नाहीत. समजतात देखील की, आपली इतकी तमोप्रधान बुद्धी आहे
ज्यामुळे आठवणच टिकत नाही, म्हणून उलटे काम करत राहतो. चांगली-चांगली मुले देखील
अजिबात आठवण करत नाहीत. लक्षण सुधारतच नाहीत, त्यामुळे मग सेवेचा उमंग येत नाही.
बाबा म्हणतात - देहा सहित देहाची जी काही नाती आहेत, त्यांना मारून टाका अथवा
विसरून जा. आता मारून टाका हा शब्द खरेतर नाहीये. फक्त असे म्हणतात - ‘आप मुये मर
गई दुनिया’. हे बाबा बसून समजावून सांगत आहेत, बुद्धीने विसरायचे आहे. जेव्हा की
तुम्ही माझे बनला आहात तर या सर्वांना विसरा, एका बाबांची आठवण करा. जसे एखाद्या
आजारपणामध्ये व्यक्ती होपलेस केस होते तेव्हा मग त्या व्यक्तीमधून आसक्ती काढून
टाकायची असते. आणि मग त्याला सांगतात आता - राम-राम म्हण. बाबा देखील म्हणतात - या
दुनियेची केस खूप होपलेस आहे, ही नष्ट होणारच आहे; सर्वांचाच मृत्यू होणार आहे,
त्यामुळे यांच्यामधून आसक्ती काढून टाका. ते तर राम-रामची धून लावतात. इथे काही
एकाचीच गोष्ट नाहीये. साऱ्या दुनियेचा विनाश होणार आहे म्हणून तुम्हाला एकच मंत्र
देतो - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा. किती विविध प्रकारे स्पष्ट करून सांगत राहतात.
आता पुरुषोत्तम महिना आला आहे, तर पुरुषोत्तम युगाविषयी देखील स्पष्ट करून सांगत
राहतात. समजावून सांगण्यासाठी खूप कौशल्य पाहिजे. धारणा चांगली पाहिजे. कोणतेही पाप
कर्म करता कामा नये. परवानगी शिवाय कोणती वस्तू उचलणे, खाणे हे देखील खूप गुप्त पाप
आहे. नियम अतिशय कडक आहेत, पाप करतात तरी देखील सांगत नाहीत, तर मग पापाची वृद्धी
होत जाते. इथे तर तुम्हा मुलांना पुण्य-आत्मा बनायचे आहे. मला पुण्य-आत्मे प्रिय
आहेत, पाप-आत्म्यासाठी विरोध आहे. भक्तिमार्गामध्ये देखील जाणतात की चांगले कर्म
केल्यामुळे चांगले फळ मिळेल; म्हणून दान-पुण्य इत्यादी चांगले कर्म करतात ना. हा
ड्रामा आहे, तरी देखील म्हणतात, भगवान चांगल्या कर्मांचे फळ चांगलेच देतो. बाबा
म्हणतात - मी फक्त हा धंदा थोडाच बसून करतो. हे तर सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे.
ड्रामा अनुसार बाबांना जरूर यायचेच आहे.
बाबा म्हणतात - मला
येऊन सर्वांना मार्ग सांगायचा आहे. बाकी यामध्ये कृपा इत्यादीचा काही प्रश्नच नाही.
काहीजण लिहितात की, ‘बाबा, तुमची कृपा झाली तर आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाही’.
बाबा म्हणतात - मी कधी कृपा इत्यादी करत नाही, या तर भक्तिमार्गातील गोष्टी आहेत.
तुम्हाला स्वतःला स्वतःवर कृपा करायची आहे. बाबांची आठवण कराल तर विकर्म विनाश
होतील. भक्तिमार्गाच्या गोष्टी ज्ञानमार्गामध्ये असत नाहीत. ज्ञानमार्ग हा केवळ एक
अभ्यास आहे. टीचर काही कोणावर कृपा थोडाच करेल. प्रत्येकाला शिकायचे आहे. बाबा
श्रीमत देतात, त्यावर चालले पाहिजे ना. परंतु आपल्याच मतावर चालतात त्यामुळे अजिबात
सेवा करत नाहीत. मुलांनी पूर्णपणे पुण्य-आत्मा बनायचे आहे. जरासुद्धा कोणते पाप होऊ
नये. बरीच मुले आपले पाप कधीच सांगत नाहीत. बाबा देखील म्हणतात - ते कधीही उच्च पद
प्राप्त करू शकणार नाहीत. गायले गेले आहे - ‘चढे तो चाखे… मुले जाणतात, खूप उच्च पद
आहे. घसरतात (पतन होते) तेव्हा काहीच कामाचे राहत नाहीत. पहिल्या नंबरचा आहे -
अशुद्ध अहंकार, आणि मग काम, क्रोध, लोभ देखील काही कमी नाहीत. लोभ, मोह देखील
सत्यनाश करतात. मुले इत्यादीमध्ये मोह असेल तर त्यांचीच आठवण येत राहील. आत्मा तर
म्हणते - ‘माझे तर एक शिवबाबा, दुसरे कोणीही नाही’; आणि कोणाचीही आठवण येऊ नये, एवढा
पुरुषार्थ करायचा आहे. हे सर्व तर नष्ट होणार आहे. विनाश समोर उभा आहे, वारसा काही
घेऊ शकणार नाहीत. यामध्ये कसला मोह ठेवायचा. अशा प्रकारे स्वतःसोबत गोष्टी करायच्या
आहेत. साऱ्या दुनियेला बुद्धीने विसरायचे आहे. हे तर सर्व नष्ट होणारच आहेत. वादळे
तर अशी येतील जे सर्वकाही एकदम नष्ट होईल. कुठे आग लागते आणि जोराने वारा आला तर
एकदम खलास करून टाकते. अर्ध्या तासामध्ये १००-१५० झोपड्यांना नष्ट करून टाकते.
तुम्ही जाणता की या भंभोरला आग लागणारच आहे, नाहीतर इतके सर्व मनुष्य मरतील कसे? जी
चांगली मुले आहेत, लक्षणे देखील चांगली आहेत तर सेवा देखील चांगली करतात. तुम्हा
मुलांना नशा असला पाहिजे. पूर्ण नशा तर शेवटी राहील, जेव्हा कर्मातीत अवस्था होईल,
तरीही पुरुषार्थ करत राहतात. बनारसमध्ये शिवाच्या मंदिरामध्ये तर भरपूर लोक जातात,
कारण ते आहेत उच्च ते उच्च भगवान. तिथे शिवाची भक्ती मोठ्या प्रमाणात होते. बाबा तर
सांगत असतात तिथे जाऊन त्यांना हे ज्ञान समजावून सांगा. हे शिव भगवान या
लक्ष्मी-नारायणाला हा वारसा देत आहेत. हा वारसा संगमावरच त्यांच्याकडून मिळाला आहे.
हे समजावून सांगितल्यामुळे मग ब्रह्मा-सरस्वती बद्दलचेही स्पष्टीकरण त्यातच येते.
चित्रांवरून यांना हे राज्य कसे मिळाले हे अतिशय स्पष्टपणे तुम्ही समजावून सांगू
शकता. या लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये भक्तिमार्ग नव्हता. तर म्हणतील - भक्ती
तर अनादि आहेच आहे. आता तुम्हाला किती नॉलेज मिळाले आहे तर नशा चढला पाहिजे ना.
भगवान आम्हाला २१ जन्मांचे राज्यभाग्य देण्यासाठी शिकवत आहेत. तुम्ही स्टुडंट आहात
ना. ज्याला हा निश्चय असेल की, या ब्रह्माकुमारी ज्यांच्याद्वारे ऐकून आम्हाला
निश्चय पक्का करवतात, ते स्वतः कसे असतील! अशा बाबांना तर अगोदर जाऊन भेटावे.
जोपर्यंत पूर्ण निश्चय होत नाही तोपर्यंत पुढे जाऊ शकणार नाही. निश्चय असणाराच लगेच
धाव घेईल. अशा बाबांना जाऊन आम्ही भेटणार, सोडणार नाही. बस्स, बाबा मी तर तुमचा बनलो,
मी इथून जाणारच नाही. एक गाणे देखील आहे ना - ‘चाहे प्यार करो चाहे ठुकराओ, यह
दीवाना तेरा दर नही छोड़ेगा’. तरीही इथे बसवून तर घेऊ शकत नाही. सेवेवर पाठवावे
लागते. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान बनायचे आहे. असे लिहून
सुद्धा देतात आणि मग बाहेर गेल्यावर मायेच्या फेऱ्यामध्ये येतात. माया इतकी प्रबळ
आहे. मायेची खूप विघ्ने येतात. छोट्याशा दिव्याला मायेची किती वादळे येतात. या
गाण्यांचे सार देखील बाबा येऊन समजावून सांगतात. तुमचे पुरुषोत्तम युग चालू आहे.
भक्तांचा पुरुषोत्तम महिना निघून गेला. बाबा म्हणतात - या संगमयुगावरच मी, पतितांना
पावन बनविण्याकरिता येतो. स्पष्टीकरण किती चांगले आहे.
अच्छा, दिवसेंदिवस
सेवेच्या वृद्धीसाठी नवीन-नवीन युक्त्या निघत राहतील. चांगली-चांगली चित्रे बनत
जातील. असे म्हणतात ना - ‘देर पड़े काम दुरस्त होते हैं (एखादे कार्य पूर्ण होण्यास
जरी बराच वेळ लागला, तरी ते उत्तम प्रकारे संपन्न होते)’. तयार साहित्य उपलब्ध आहे,
ज्यावरून कोणालाही त्वरित समजू शकेल. शिडीचे चित्र अतिशय चांगले आहे. यावेळी कोणीही
असे म्हणू शकत नाही की, आम्ही पावन आहोत. पावन दुनिया सतयुगालाच म्हटले जाते. पावन
दुनियेचे मालक हे लक्ष्मी-नारायण आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) जरा सुद्धा
कोणते मोठे अथवा सूक्ष्म पाप होऊ नये, यावर खूप-खूप लक्ष ठेवायचे आहे. कधीही कोणतीही
वस्तू लपवून घ्यायची नाही. लोभ, मोह यापासून देखील सावधान राहायचे आहे.
२) अशुद्ध अहंकार जो
सत्यानाश करणारा आहे, त्याचा त्याग करायचा आहे. एका बाबांशिवाय दुसऱ्या कोणाचीही
आठवण येऊ नये, हाच पुरुषार्थ करायचा आहे.
वरदान:-
देहाच्या
भानाला अर्पण करून समर्पण होणारे योगयुक्त, बंधनमुक्त भव
जे देह-अभिमानाला
अर्पण करतात त्यांचे प्रत्येक कर्म आरशासारखे बनते. ज्याप्रमाणे कोणतीही वस्तू
अर्पण केली जाते तेव्हा मग ती अर्पण केलेली वस्तू आपली समजली जात नाही. तर देहाच्या
भानाला देखील अर्पण केल्यामुळे, जेव्हा ‘माझेपणा’ची भावना नाहीशी होते तेव्हा आसक्ती
देखील नष्ट होते. यालाच संपूर्ण समर्पण म्हटले जाते. अशा प्रकारे समर्पित होणारे
सदैव योगयुक्त आणि बंधनमुक्त असतात. त्यांचा प्रत्येक संकल्प, प्रत्येक कर्म
युक्तीयुक्त असते.
बोधवाक्य:-
सर्वशक्तीमानला
साथी बनवा, तर सफलता तुमच्या पायाशी लोळण घेईल.
अव्यक्त इशारे - आता
आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.
स्वतःला सदैव ‘दाता’
अथवा ‘महादानी’ समजायचे आहे. महादानी बनल्यानंतर महादानीचे कर्तव्य सुरु होते.
महादानीची पारख महादानी बनल्यामुळेच होते. आता तुमच्या मूर्तमध्ये (व्यक्तिमत्त्वामध्ये)
अशी झलक असली पाहिजे ज्यामुळे कोणीही आपला वारसा घेण्यापासून वंचित राहू नये. असे
स्वतःला दात्याची मुले दाता समजायचे आहे; देणाऱ्यांमध्ये जी फलक आणि झलक असते (जे
तेज आणि नशा असतो), आता त्या संस्कारांना इमर्ज करा.