17-11-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - हे पुरुषोत्तम संगमयुग आहे, जुनी दुनिया बदलून आता नवी बनत आहे, तुम्हाला
आता पुरुषार्थ करून उत्तम देव पद प्राप्त करायचे आहे”
प्रश्न:-
सेवाभावी
मुलांच्या बुद्धीमध्ये कोणती एक गोष्ट सदैव लक्षात राहते?
उत्तर:-
सेवाभावी मुलांच्या लक्षात असते की, ‘धन दिल्याने धन खुंटत नाही…’ म्हणून ते
रात्रंदिवस झोपेचाही त्याग करून ज्ञान-धनाचे दान करत राहतात, थकत नाहीत. परंतु जर
स्वतःमध्ये कोणता अवगुण असेल तर सेवा करण्याचा देखील उमंग येऊ शकत नाही.
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांप्रती बाबा बसून समजावून सांगतात. मुले जाणतात परमपिता दररोज
समजावून सांगतात. जसे टीचर दररोज शिकवतात. बाबा फक्त शिकवतील, सांभाळतील कारण
बाबांच्या घरीच मुले राहतात. माता-पिता सोबत राहतात. इथे तर ही वंडरफुल गोष्ट आहे.
रुहानी बाबांजवळ तुम्ही राहता. एक तर रुहानी बाबांजवळ मुलवतनमध्ये राहता. मग
कल्पामध्ये एकदाच बाबा येतात - मुलांना वारसा देण्यासाठी किंवा पावन बनवण्यासाठी,
सुख आणि शांती देण्यासाठी. तर जरूर खाली (साकार वतनमध्ये) येऊन राहत असतील.
यामध्येच लोकांचा गोंधळ उडतो. गायन देखील आहे - साधारण तनामध्ये प्रवेश करतात. आता
साधारण तन कुठून उडून तर येत नाही. जरूर मनुष्याच्या तनामध्येच येतात. ते देखील
सांगतात - ‘मी या तनामध्ये प्रवेश करतो’. तुम्हा मुलांना देखील आता समजते आहे - बाबा
आम्हाला स्वर्गाचा वारसा देण्यासाठी आले आहेत. जरूर आम्ही लायक नाही आहोत, पतित बनलो
आहोत. सर्वजण म्हणतात देखील - हे पतित-पावन या, येऊन आम्हा पतितांना पावन बनवा. बाबा
म्हणतात - मला कल्प-कल्प पतितांना पावन करण्याची ड्युटी मिळाली आहे. माझ्या मुलांनो,
आता या पतित दुनियेला पावन बनवायचे आहे. जुन्या दुनियेला पतित, नवीन दुनियेला पावन
म्हणणार. म्हणजेच जुन्या दुनियेला नवीन बनविण्यासाठी बाबा आले आहेत. कलियुगाला काही
कोणी नवीन दुनिया म्हणणार नाही. ही तर समजण्यासारखी गोष्ट आहे ना. कलियुग आहे जुनी
दुनिया. बाबा देखील येतील जरूर - जुन्या आणि नव्याच्या संगमावर. जेव्हा कुठेही
तुम्ही हे समजावून सांगता तर बोला - हे पुरुषोत्तम संगमयुग आहे, बाबा आलेले आहेत.
साऱ्या दुनियेमध्ये असा कोणी मनुष्य नाही ज्याला हे माहित असेल की, हे पुरुषोत्तम
संगमयुग आहे. जरूर तुम्ही संगमयुगावर आहात तेव्हाच तर सांगता. मुख्य गोष्ट आहेच मुळी
संगमयुगाची. तर पॉईंट्स देखील खूप जरुरी आहेत. जी गोष्ट कोणीही जाणत नाहीत ती
सांगावी लागेल; म्हणून बाबांनी सांगितले होते की, हे जरूर लिहायचे आहे की आता
पुरुषोत्तम संगमयुग आहे. नवीन युगाची अर्थात सतयुगाची चित्रे देखील आहेत. लोकांना
कसे समजणार की हे लक्ष्मी-नारायण सतयुगी नवीन दुनियेचे मालक आहेत. त्या चित्रावरती
हे शब्द जरूर हवेत - ‘पुरुषोत्तम संगमयुग’. हे जरूर लिहायचे आहे कारण हीच मुख्य
गोष्ट आहे. मनुष्य समजतात की, कलियुगाला अजून पुष्कळ वर्षे बाकी आहेत. अगदीच घोर
अंधारामध्ये आहेत. तर समजावून सांगावे लागेल नव्या दुनियेचे मालक हे लक्ष्मी-नारायण
आहेत. ही आहे संपूर्ण निशाणी. तुम्ही म्हणता या राज्याची स्थापना होत आहे. एक गाणे
देखील आहे - ‘नवयुग आया, अज्ञान नींद से जागो’. हे तुम्ही जाणता आता संगम-युग आहे,
याला नवयुग म्हणणार नाही. संगमाला संगमयुगच म्हटले जाते. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग;
जेव्हा की जुनी दुनिया नष्ट होते आणि नवीन दुनिया स्थापन होते. मनुष्यापासून देवता
बनत आहेत, राजयोग शिकत आहेत. देवतांमध्ये देखील उत्तम पद आहेच या लक्ष्मी-नारायणाचे.
हे देखील आहेत तर मनुष्यच, यांच्यामध्ये दैवी गुण आहेत म्हणून देवी-देवता म्हटले
जाते. सर्वात उत्तम गुण आहे पवित्रतेचा, तेव्हाच तर मनुष्य देवतांच्या समोर जाऊन
माथा टेकवतात. हे सर्व पॉईंट्स बुद्धीमध्ये धारण त्यांचे होतील जे सेवा करत राहतात.
म्हटले जाते - ‘धन दिये धन ना खुटे…’ खूप स्पष्टीकरण मिळत राहते. नॉलेज तर खूप सोपे
आहे. परंतु कोणामध्ये धारणा चांगली होते, कोणामध्ये नाही होत. ज्यांच्यामध्ये अवगुण
आहेत ते तर सेंटर सांभाळू देखील शकत नाहीत. तर बाबा मुलांना समजावून सांगतात -
प्रदर्शनीमध्ये देखील साधे सोपे शब्द वापरले पाहिजेत. मुख्य तर पुरुषोत्तम संगमयुग
विषयी समजावून सांगितले पाहिजे. या संगमावर आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना
होत आहे. जेव्हा हा धर्म होता तेव्हा इतर कोणताही धर्म नव्हता. हे जे महाभारत युद्ध
आहे, त्याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. हे देखील आताच निघाले आहे, पूर्वी थोडेच
होते. १०० वर्षांच्या आत सर्वकाही नष्ट होते. संगमयुगला कमीत कमी १०० वर्ष तर हवीत
ना. संपूर्ण नवीन दुनिया बनणार आहे. नवी दिल्ली बनविण्यासाठी किती वर्षे लागली.
तुम्ही समजता
भारतामध्येच नवी दुनिया असते, मग जुनी नष्ट होईल. काही भाग तर बाकी राहतो ना. प्रलय
तर होत नाही. या सर्व गोष्टी बुद्धीमध्ये आहेत. आता आहे संगमयुग. नवीन दुनियेमध्ये
जरूर हे देवी-देवता होते, पुन्हा इथेच असतील. हा आहे राजयोगाचा अभ्यास. जर कोणी
डिटेलमध्ये समजावून सांगू शकत नसतील तर फक्त एक गोष्ट बोला - परमपिता परमात्मा जे
सर्वांचे पिता आहेत, त्यांची तर सर्वजण आठवण करतात. ते आम्हा सर्व मुलांना म्हणतात
- तुम्ही पतित बनले आहात. बोलावता सुद्धा - ‘हे पतित पावन या’. बरोबर कलियुगामध्ये
आहेत पतित, सतयुगामध्ये असतात पावन. आता परमपिता परमात्मा म्हणतात - ‘देहासहित ही
सर्व पतित नाती सोडून मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर पावन बनाल’. हे गीतेमधीलच
शब्द आहेत. आहे देखील गीतेचे युग. गीता संगमयुगावरच सांगितली गेली होती; जेव्हा की
विनाश झाला होता. बाबांनी राजयोग शिकवला होता. राजाई स्थापन झाली होती; पुन्हा जरूर
होईल. हे सर्व रुहानी बाबा समजावून सांगतात ना. चला, या तनामध्ये नाही आले दुसऱ्या
कोणत्या तरी तनामध्ये येऊ दे. समजावून सांगणारे तर बाबाच आहेत ना. मी यांचे नाव तर
घेत नाही. मी तर फक्त म्हणतो - बाबा म्हणतात की, माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनून
माझ्याकडे निघून याल. किती सोपे आहे. फक्त माझी आठवण करा आणि ८४ च्या चक्राचे ज्ञान
बुद्धीमध्ये असावे. जो धारणा करेल तो चक्रवर्ती राजा बनेल. हा मेसेज तर सर्व
धर्मीयांसाठी आहे. घरी तर सर्वांना जायचे आहे. आम्ही देखील घराचाच रस्ता सांगतो.
पाद्री इत्यादी कोणीही असो तुम्ही त्यांना बाबांचा संदेश देऊ शकता. तुम्हाला आनंदाचा
खूप पारा चढायला हवा - परमपिता परमात्मा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर
तुमची विकर्म विनाश होतील. सर्वांना हीच आठवण करून द्या. बाबांचा संदेश देणे हीच
नंबर वन सेवा आहे. गीतेचे युग देखील आत्ता आहे. बाबा आले आहेत म्हणून तेच चित्र
सुरुवातीला ठेवायला हवे. जे समजतात - आम्ही बाबांचा संदेश देऊ शकतो तर तयारीत राहिले
पाहिजे. मनामध्ये आले पाहिजे की आपण देखील आंधळ्यांची काठी बनावे. हा संदेश तर
कोणालाही देऊ शकता. बी. के. चे नाव ऐकूनच घाबरतात. बोला - आम्ही फक्त बाबांचा संदेश
देतो. परमपिता परमात्मा म्हणतात - माझी आठवण करा, बस्स. आम्ही कोणाची निंदा करत नाही.
बाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. मी सर्वश्रेष्ठ पतित-पावन आहे. माझी
आठवण केल्याने तुमची विकर्म विनाश होतील. हे नोट करा. ही खूप कामाची गोष्ट आहे.
हातावर किंवा दंडावर अक्षरे कोरून घेतात ना. हे देखील लिहा. फक्त एवढे जरी
सांगितलेत तरी देखील दयाळू, कल्याणकारी बनाल. स्वतःशी पण केला पाहिजे. सेवा जरूर
करायची आहे मग त्याची सवय होईल. इथे देखील तुम्ही समजावून सांगू शकता. चित्र देऊ
शकता. ही आहे संदेश देण्याची वस्तू. लाखो बनतील. घरोघरी जाऊन संदेश द्यायचा आहे.
पैसे कोणी देवो न देवो, बोला - बाबा तर आहेतच गरीब निवाज (गरिबांचा कैवारी). आमचे
कर्तव्य आहे - घरोघरी संदेश देणे. हे बापदादा, यांच्याकडून हा वारसा मिळतो. ८४ जन्म
हे घेतील. यांचा हा अंतिम जन्म आहे. आम्ही ब्राह्मण आहोत सो मग देवता बनणार. ब्रह्मा
देखील ब्राह्मण आहे. प्रजापिता ब्रह्मा एकटा तर असणार नाही ना. जरूर ब्राह्मण
वंशावळी देखील असेल ना. ब्रह्मा सो विष्णू देवता, ब्राह्मण आहेत शिखा. तेच देवता,
क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनतात. कोणी जरूर निघतील जे तुमच्या गोष्टींना समजतील.
पुरुष देखील सेवा करू शकतात. सकाळी उठून मनुष्य जेव्हा दुकान उघडतात तर म्हणतात -
‘सुबह का सांई…’ तुम्ही देखील पहाटे जाऊन बाबांचा संदेश ऐकवा. बोला तुमचा धंदा खूप
चांगला होईल. तुम्ही ‘सांई’ची आठवण करा तर २१ जन्मांचा वारसा मिळेल. अमृतवेळेची वेळ
चांगली असते. आजकाल कारखान्यांमध्ये माता देखील बसून काम करतात. हा बॅज देखील बनवणे
खूप सोपे आहे.
तुम्हा मुलांना तर
रात्रं-दिवस सेवेमध्ये लागले पाहिजे, झोप उडवून लावली पाहिजे. बाबांचा परिचय
मिळाल्याने मनुष्य धणके (धन्याचे) बनतात. तुम्ही कोणालाही संदेश देऊ शकता. तुमचे
ज्ञान तर खूप उच्च आहे. बोला, आम्ही तर एकाची आठवण करतो. क्राईस्टची आत्मा देखील
त्यांची संतान होती. सर्व आत्मे तर त्यांचीच संतान आहेत. तेच गॉड फादर म्हणत आहेत
की, दुसऱ्या कोणत्याही देहधारीची आठवण करू नका. तुम्ही स्वतःला आत्मा समजून मामेकम्
(मज एकाची) आठवण करा तर विकर्म विनाश होतील. माझ्याकडे याल. मनुष्य पुरुषार्थ
करतातच मुळी घरी जाण्यासाठी. परंतु जात कोणीच नाही. पाहिले जाते मुले अजून खूप थंड
आहेत, इतकी मेहनत घेत नाहीत, बहाणे करत राहतात, यामध्ये खूप सहन देखील करावे लागते.
धर्म स्थापकाला किती सहन करावे लागते. क्राईस्टसाठी देखील म्हणतात - त्यांना
क्रॉसवर चढवले. तुमचे काम आहे सर्वांना संदेश देणे. त्यासाठी बाबा युक्त्या सांगत
राहतात. कोण सेवा करत नसेल तर बाबा समजतात धारणा नाहीये. बाबा सल्ला देतात की, कसा
संदेश द्यावा. ट्रेनमध्ये देखील तुम्ही संदेश देत रहा. तुम्ही जाणता आम्ही
स्वर्गामध्ये जातो. कोणी शांतीधाममध्ये देखील जातील ना. रस्ता तर तुम्हीच सांगू शकता.
तुम्हा ब्राह्मणांनीच गेले पाहिजे. आहेत तर खूप. ब्राह्मणांना कुठेतरी ठेवतील ना.
ब्राह्मण, देवता, क्षत्रिय. प्रजापिता ब्रह्माची औलाद तर जरूर असतील ना. आदि मध्ये
(सुरुवातीला) आहेतच ब्राह्मण. तुम्ही ब्राह्मण आहात उच्च ते उच्च. ते ब्राह्मण आहेत
कुखवंशावळी. ब्राह्मण तर जरूर पाहिजेत ना. नाहीतर प्रजापिता ब्रह्माची मुले
ब्राह्मण कुठे गेली. ब्राह्मणांना तुम्ही बसून समजावून सांगा, तर ते लगेच समजतील.
बोला, तुम्ही देखील ब्राह्मण आहात, आम्ही देखील स्वतःला ब्राह्मण म्हणवतो. आता सांगा
तुमचा धर्म स्थापन करणारा कोण? ब्रह्मा शिवाय कोणाचे नावही घेणार नाहीत. तुम्ही
ट्रायल करून बघा. ब्राह्मणांची देखील खूप मोठी-मोठी कुळे असतात. पुजारी ब्राह्मण तर
असंख्य आहेत. अजमेरला पुष्कळ मुले जातात, कधी कोणी तसा अजून समाचार दिलेला नाहीये
की आम्ही ब्राह्मणांना भेटलो, त्यांना विचारले - तुमचा धर्म स्थापन करणारा कोण?
ब्राह्मण धर्म कोणी स्थापन केला? तुम्हाला तर माहित आहे, खरे ब्राह्मण कोण आहेत.
तुम्ही अनेकांचे कल्याण करू शकता. यात्रांवर भक्तच जातात. हे लक्ष्मी-नारायणाचे
चित्र तर खूप चांगले आहे. तुम्हाला माहित आहे जगत अंबा कोण आहे? लक्ष्मी कोण आहे?
अशा प्रकारे तुम्ही नोकरांना, भिल्लिणी इत्यादींना समजावून सांगू शकता.
तुमच्याशिवाय तर कोणीही नाही जो त्यांना सांगेल. खूप दयाळू बनायचे आहे. बोला, तुम्ही
देखील पावन बनून पावन दुनियेमध्ये जाऊ शकता. स्वतःला आत्मा समजा, शिवबाबांची आठवण
करा. कोणालाही रस्ता सांगण्याची खूप हौस असायला हवी. जे स्वतः आठवण करत असतील तेच
इतरांना आठवण करून देण्याचा पुरुषार्थ करतील. बाबा तर जाऊन बोलणार नाहीत. हे तर
तुम्हा मुलांचे काम आहे. गरिबांचे देखील कल्याण करायचे आहे. बिचारे खूप सुखी होतील.
थोडी आठवण केल्याने प्रजेमध्ये देखील आले, तर ते देखील चांगले आहे. हा धर्म तर खूप
सुख देणारा आहे. दिवसेंदिवस तुमचा आवाज वेगाने पसरेल. सर्वांना हाच संदेश देत रहा,
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. तुम्ही गोड-गोड मुले पद्मा-पदम भाग्यशाली
आहात. जेव्हा की महिमा ऐकता तर समजता, मग तरीही कोणत्या गोष्टीची चिंता कशाला केली
पाहिजे. हे आहे गुप्त ज्ञान, गुप्त खुशी. तुम्ही आहात इन्कॉग्नीटो वॉरीयर्स (गुप्त
योद्धे). तुम्हाला अननोन वॉरीयर्स (गुप्त योद्धे) म्हटले जाईल इतर कोणीही गुप्त
योद्धे असू शकत नाहीत. तुमचे दिलवाडा मंदिर पूर्ण यादगार आहे. दिल घेणाऱ्याचा
परिवार आहे ना. महावीर, महावीरनी आणि त्यांची संतान हे पूर्णपणे तीर्थ आहे. काशी
पेक्षाही श्रेष्ठ ठिकाण झाले. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) घरोघरी
जाऊन बाबांचा संदेश द्यायचा आहे. सेवा करण्याचा पण करा, सेवेसाठी कोणतेही कारण देऊ
नका.
२) कोणत्याही गोष्टीची
चिंता करायची नाही, गुप्त खुशीमध्ये रहायचे आहे. कोणत्याही देहधारीची आठवण करायची
नाही. एका बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे.
वरदान:-
कल्याणकारी
बाबा आणि वेळेच्या प्रत्येक सेकंदाचा फायदा घेणारे निश्चय-बुद्धी, निश्चिंत भव
जे काही दृश्य सुरु
आहे त्याला त्रिकालदर्शी बनून बघा, हिंमत आणि उल्हासामध्ये राहून स्वतः देखील समर्थ
आत्मा बना आणि विश्वाला सुद्धा समर्थ बनवा. आपल्याच वादळांनी डगमगू नका, अचल रहा.
जो वेळ मिळाला आहे, सोबत मिळाली आहे, अनेक प्रकारचे खजिने मिळत आहेत त्यांच्यापासून
संपत्तिवान आणि समर्थवान बना. संपूर्ण कल्पामध्ये असे दिवस पुन्हा येणार नाहीत
म्हणून आपल्या सर्व चिंता बाबांना देऊन निश्चय-बुद्धी बनून कायम निश्चिंत रहा;
कल्याणकारी बाबांचा आणि वेळेच्या प्रत्येक सेकंदाचा लाभ घ्या.
बोधवाक्य:-
बाबांच्या
संगाचा रंग लावा म्हणजे मग अवगुण स्वतः समाप्त होतील.
अव्यक्त इशारे:-
अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. विदेही बनण्याची विधी आहे - बिंदू बनणे.
अशरीरी बनता, कर्मातीत बनता या सर्वांची विधी बिंदू आहे; म्हणून बापदादा म्हणतात -
अमृतवेलेला बापदादांसोबत भेटीचा आनंद साजरा करता, रुहरिहान करता आणि नंतर जेव्हा
कार्यव्यवहारामध्ये येता तेव्हा अगोदर तीन बिंदूंचा तिलक मस्तकावर लावा आणि चेक करा
- कोणत्याही कारणाने हा स्मृतीचा तिलक पुसला तर जात नाही ना? अविनाशी, अवीट तिलक
रहावा.