17-11-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो, मी
तुम्हा मुलांसाठी तळहातावर बहिश्त (स्वर्ग) आणला आहे, तुम्ही माझी आठवण करा तर
स्वर्गाची बादशाही मिळेल”
प्रश्न:-
बेहदचा आनंद
कोणत्या मुलांना निरंतर राहू शकतो?
उत्तर:-
१) ज्यांनी
बेहदचा संन्यास केला आहे, इतर संग तोडून एक संग जोडला आहे, तेच निरंतर आनंदामध्ये
राहू शकतात. २) जे फॉलो फादर करतात, ज्यांना सेवेची आवड आहे, त्यांचा आनंद कधीही
गायब होऊ शकत नाही.
गीत:-
छोड़ भी दे
आकाश सिंहासन....
ओम शांती।
गोड-गोड रुहानी
मुलांनी गाणे ऐकले. हे कोणी म्हटले? बाबांनी मुलांना म्हटले की, ‘गाणे ऐकले का?’
जेव्हा अति दुःख होते तेव्हा बोलावतात. मुले जाणतात की बाबाच सुखधाम किंवा पावन
दुनिया रचतात अथवा भगवान-भगवतीचे राज्य स्थापन करतात. भगवान आणि भगवती जसे स्वर्गाचे
मालक झाले. तुम्ही पाहता लक्ष्मी-नारायण किती धनवान होते, किती मोठी राजधानी होती.
त्यांच्या राजधानीमध्ये कधी कोणता उपद्रव होत नाही. बाबा मुलांना वारसाच असा देतात
तर किती आनंदामध्ये राहिले पाहिजे. परंतु नंबरवार पुरुषार्थ अनुसार तर आहेतच. काही
जण तर संपूर्ण ज्ञान न घेतल्या कारणाने ना तिथल्या आनंदामध्ये राहतात आणि ना इथल्या
आनंदामध्ये राहतात. त्यांना म्हणतात - दोन्ही दुनियेतून गेलेले; कारण, बाबांकडून
वारसा घेता-घेता कोसळतात (पतन होते). दुनियेमध्ये हे कोणालाच माहीत नाही की भगवान
येऊन स्वर्ग स्थापन करत आहेत कारण ते येतातच मुळी गुप्त रूपामध्ये. म्हणतात - या
वेळी भगवान जरूर असायला हवा, कारण सर्वजण घोर अंधारामध्ये आहेत. रात्रीचे १२ वाजतात
तेव्हा त्याला घोर अंधार म्हटले जाते. रात्रीचा घोर अंधार आणि दिवसाचा लख्ख प्रकाश
असतो. मुले जाणतात आता भक्ती मार्गाची रात्र संपत आली आहे, ज्यामध्ये दुःखच दुःख आहे.
मनुष्य समजतात भक्ती नंतर भगवान भेटतो. तुम्ही जाणता - बाबाच येऊन आम्हा सर्वांची
सद्गती करतात. तुम्हा मुलांमध्ये देखील नंबरवार तर जरूर आहेत. कोणाचा तर आनंदाचा
पारा चढलेलाच राहतो. मेहनत देखील आनंदाने करतात. सेवेची आवड असते की कोणाला तरी
जाऊन हे ज्ञान समजावून सांगावे. म्हणूनच बाबा प्रदर्शनी, मेळ्यांचा देखील प्रबंध
करत राहतात जेणेकरून इतरांना हे ज्ञान समजावून सांगितल्याने आनंदाचा पारा चढावा. इथे
ज्यांच्याकडे धन आहे, ते समजतात आम्ही स्वर्गामध्ये बसलो आहोत. त्यांच्यासाठी ज्ञान
आत्मसात करणे मुश्किल आहे; म्हणूनच गायले गेले आहे कोटींमध्ये कोणीच इतके हुशार
बनून बाबांच्या वारशाचे अधिकारी बनतात. फॉलो फादर गायले गेले आहे. तर बाबांच्या
श्रीमतावर चालावे लागेल. जे चांगल्या प्रकारे श्रीमतावर चालतात त्यांनी फॉलो फादर
केले पाहिजे. जसा हा बच्चा (ब्रह्मा बाबा) चांगल्या प्रकारे चालत आहे. लौकिक मुले
मतानुसार चालली नाहीत तर म्हणाले - तुम्ही तुमची वाट धरा. रावणाच्या मतावर चालणारे
आणि रामाच्या मतावर चालणारे एकत्र राहू शकत नाहीत.
तुम्ही मुले समजता की
भारतातच आदि सनातन देवी-देवता धर्म होता. ते आता ८४ जन्म घेऊन पतित बनले आहेत,
तेव्हाच तर बोलावतात हे पतित-पावन या. आता तुम्ही मुले समजता की, आता फार थोडे दिवस
बाकी आहेत. दैवी राजधानी स्थापन करण्यासाठी वेळ तर लागतोच. हे आहे गुप्त. यामध्ये
युद्धाचा प्रश्नच नाही. असे नाही की, स्वारी करून राज्य घेतात. नाही, हे तर बाबा
येऊन राजांचाही राजा बनवतात. ज्या बाबांची आठवण करतात - ‘दुःख-हर्ता, सुख-कर्ता
या’. संन्यासी गुरू थोडेच दुःख-हर्ता असू शकतात? त्यांचा संन्यास आहे हदचा. तुमचा
आहे बेहदचा. यामध्ये बेहदचा आनंद असतो. हे लक्ष्मी-नारायण भगवती-भगवान यांना देखील
बेहदचा आनंद आहे ना. पतित मनुष्यांना तर जे सुचेल ते बोलतात. तुम्ही तर एक-एक शब्द
अर्थासहित बोलता. नव्या दुनियेमध्ये आहेच मुळी एक धर्म. त्याची कोणाशीही तुलना केली
जात नाही. जुन्या दुनियेमध्ये तुलना केली जाते. नव्या दुनियेमध्ये हे माहीत नसते की
जुन्या दुनियेमध्ये काय असेल. तिथे सर्व काही विसरून गेलेले असते. इथे तुम्हाला
सर्व काही सांगितले जाते की नवीन दुनिया केव्हा स्थापन होईल! जुनी दुनिया केव्हा
विनाश होईल! तुम्हाला सर्व नॉलेज आहे. आता तुम्हाला, स्वर्गाची स्थापना करणारे बाबा
भेटले आहेत. तर त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे वारसा घेतला पाहिजे. वारसा मिळणार
देखील त्यांनाच आहे ज्यांनी कल्पापूर्वी चांगल्या तऱ्हेने पुरुषार्थ केला होता.
त्यामध्ये देखील नंबरवार आहेत. ही आहे काट्यांची दुनिया. पहिल्या नंबरचा काटा तर
सर्वांमध्ये आहेच. जुनी दुनिया छी-छी (घाणेरडी) आहे, नवीन दुनिया चांगली असते.
स्वर्ग कशाला म्हटले जाते, हे देखील कोणाला ठाऊक नाहीये. असेच बोलून जातात की, अमका
स्वर्गवासी झाला. स्वर्ग आहे कुठे जो स्वर्गवासी झाला!
तुम्ही जाणता की,
स्वर्ग देखील याच भारतामध्ये होता. नरक देखील भारतामध्येच आहे. तर हे शब्द पकडून ते
लोक म्हणतात - स्वर्ग नरक इथेच आहे. ज्यांच्याकडे खूप धन आहे ते स्वर्गामध्ये आहेत;
परंतु असे नाहीये. भारत नवीन होता तेव्हा सतयुग होते, ज्याला स्वर्ग म्हटले जाते.
आता पतित दुनिया नरक आहे. दुनिया तर एकच आहे. नवीन दुनियेमध्ये लक्ष्मी-नारायणाचे
राज्य होते. जुन्या दुनियेमध्ये रावणाचे राज्य आहे. भगवानुवाच, मी तुम्हाला ८४
जन्मांचे रहस्य सांगतो. या राजयोगाने तुम्हाला राजांचाही राजा स्वर्गाचा मालक बनवतो.
तर नरकाचा जरूर विनाश झालाच पाहिजे. शास्त्रांमध्ये श्रीकृष्णाचे नाव घालून युद्ध
इत्यादी दाखवले आहे. पांडवांची कोणती सेना तर नाहीये. आजकाल कन्या, मातांची पलटन (फौजेची
तुकडी) बनवून त्यांना बंदूक इत्यादी चालवायला शिकवतात. इथे तुमच्या हातात बंदूक
इत्यादी काहीच नाहीये. त्यांना काय ठाऊक की, शिवशक्ती सेना कोण आहे? शिवबाबा तर कधी
हिंसा करू शकत नाहीत. युद्धाची तर कोणती गोष्टच नाही. तुम्ही जाणता की शिवबाबांची
रूहानी सेना आहे. शिवबाबा आम्हाला डबल अहिंसक बनवतात. त्यांना म्हटले जाते १०० टक्के
नॉन-व्हायोलन्स (अहिंसक). इथे आहे १०० टक्के व्हायोलन्स (हिंसा). एकाच बॉम्बने
कित्येकांचा विनाश करतात. बेहदचा नॉन-व्हायोलन्स आणि व्हायोलन्स यामध्ये किती फरक
आहे. तुम्ही आता यावेळी बेहदच्या सायलेन्समध्ये आहात. त्या बाजूला जेवढी युद्धाची
तयारी होत जाते, तितका आवाज वाढत जातो. विनाशामध्ये किती अराजकता माजते.
स्थापनेमध्ये तर किती सायलेन्समध्ये बसला आहात. हिंसेची कोणती गोष्टच नाही. तुमचे
आता प्रॅक्टिकल लाईफ आहे. बाबांकडून योगबलाद्वारे वारसा प्राप्त करत आहात. अल्फ
बाबांची आठवण केल्याने स्वर्गाची बादशाही मिळते, किती सहज आहे. बाबा किती मोस्ट
बिलवेड (अतिप्रिय) आहेत. किती दूरदेशातून येतात. जसे विलायत मधून कोणाचे वडील आले
तर मुले खूप आनंदी होतात. बाबा आमच्यासाठी विलायत मधून छान-छान सौगात आणतील. हे
बेहदचे बाबा तर एकदाच येतात. कोणती सौगात घेऊन येतात? म्हणतात - मी तुमच्यासाठी
तळहातावर बहिश्त घेऊन आलो आहे. जसे म्हणतात - हनुमान, संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन आला.
आता पर्वत काही कोणी उचलू शकत नाही. तसेच बाबा म्हणतात - मी तळहातावर बहिश्त घेऊन
आलो आहे. आता बहिश्त काही तळहातावर थोडाच उचलता येतो. ही तर समजून घेण्याची गोष्ट
आहे. मुले तर जाणतात बाबा आपल्यासाठी नंबर वन सौगात घेऊन आले आहेत. बाबा म्हणतात -
मी आलो आहे तुम्हाला पावन दुनियेचा मालक बनविण्यासाठी तर पावन बनावे लागेल. हा
राजयोग आहे ना. भारताचा प्राचीन राजयोग तर गीतेच्या भगवंतानेच शिकवला होता आणि
राज्य दिले होते. आता पुन्हा राजयोग शिकवत आहेत. तुम्ही म्हणता की आम्ही स्वर्ग
स्थापन करणाऱ्या पित्याची मुले आहोत, बाबा नवीन दुनिया स्थापन करतात तर जरूर कोणाला
तरी बादशाही मिळाली असेलच ना. असे देखील नाही की फक्त स्वर्गामध्ये राहणाऱ्यांनाच
बाबांनी दिले असेल. बाकीच्या पण सर्वांना बाबा देतातच ना. बाकी सर्वांना ड्रामा
अनुसार मुक्तीचा पार्ट मिळालेला आहे. सर्वजण मुक्त होतात. एकच बाबा सर्वांचे सद्गती
दाता आहेत, दुसरे कोणीही नाही. तुमच्याकडे प्रदर्शनीमध्ये ज्या नामिग्रामी व्यक्ती
येतात, जे मानतात की खरोखर गीतेचा भगवान श्रीकृष्ण नाही, शिव आहे, तर त्यांच्याकडून
लिहून घ्यायचे आहे. मोठ्या व्यक्तींचीच गोष्ट ऐकतील. गरिबाचे तर कोणी ऐकत नाहीत
म्हणून प्रदर्शनीमध्ये प्रयत्न करून हे लिहून घ्या की, गीतेचे भगवान एकच आहेत. ते
सर्वांचे पिता आहेत. आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता,
लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. आता तर संपूर्ण विश्वावर रावणाचे राज्य आहे, हाच
सर्वांचा शत्रू आहे, ज्याला वर्षानुवर्षे जाळतात. तरी देखील मरत नाही. आता भारताचा
मोठा शत्रू हा रावण आहे, ही गोष्ट फक्त तुम्हीच जाणता. आता राम, (pause घेणे)
परमपिता परमात्मा रावणावर विजय प्राप्त करून देत आहेत. म्हणतात - माझी आठवण करा तर
तुमची पापे नष्ट होतील, तुम्ही लायक बनाल, तर मग तुम्हाला नवीन दुनिया पाहिजे. जरूर
जुन्या दुनियेचा विनाश देखील झाला होता, तो होईल. महाभारत लढाई लागलीच तेव्हा आहे
जेव्हा रावण राज्याचा विनाश होऊन रामराज्य स्थापन होते. रावण राज्यामध्येच हाहाकार
सुरू होतो. हाहाकारा नंतर जयजयकार होतो, दुनिया परिवर्तित होते. जसे जुने घर पाडून
नवीन बनवले जाते आणि मग पुन्हा तेही पाडले जाते, त्याच धर्तीवर ही देखील स्थापना
होत आहे. बॉम्ब्स इत्यादी तयार करतच राहतात. तयारी चालू आहे. आता दसरा आला तर
रावणाचा पुतळा देखील बनवला आहे. तुमची आहे बेहदची गोष्ट. तुमच्या बुद्धीमध्ये येते
की, हे काय करत आहेत. तुम्ही जेव्हा समजावून सांगाल तेव्हा ते समजतील आम्ही हे काय
करत आहोत. हसू देखील येईल. कोणालाही समजावून सांगू शकता - एवढा मोठा रावण तर असतही
नाही. आता बाबा म्हणतात - तुम्ही रामराज्य घ्या. ५ विकारांचे दान द्या तर ग्रहण
सुटेल. बाबा येऊन समजावून सांगतात की, या ५ विकारांचे ग्रहण साऱ्या दुनियेला लागलेले
आहे; पूर्णपणे काळे होतात. तुम्हा मुलांना तर अपार आनंद झाला पाहिजे. थोडे दिवस बाकी
राहिले आहेत.
तुम्ही आता क्रिएटर,
डायरेक्टर, मुख्य एक्टर्स, ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला जाणता, इतर कोणीही जाणत नाही.
तुमची आता स्वच्छ-बुद्धी बनली आहे. तुम्ही बाबांचे बनला आहात तर जरूर स्वर्गामध्ये
पाठवून देतील. ‘नॉलेज इज सोर्स ऑफ इनकम’, असे म्हटले जाते. हे आहे रूहानी नॉलेज, जे
बाबाच देतात. मनुष्य, मनुष्याला देऊ शकत नाही. दुनियेमध्ये सर्व मनुष्य,
मनुष्यांनाच नॉलेज देतात. तुम्हाला तर बाबा सुप्रीम सोल (परमपिता परमात्मा) येऊन
ज्ञान देतात. बाकी सर्व आहेत भक्तिमार्गाच्या दंतकथा ऐकवणारे. सत्यनारायणाची कथा,
रामायणाची कथा... जे घडून गेले आहे त्यावरून काही ना काही कथा बनवत राहतात. हे तर
आहे शिक्षण. अभ्यासक्रमामध्ये इतिहास-भूगोल शिकवला जातो. हा आहे जगाच्या दुनियेचा
इतिहास-भूगोल, खूप विस्तृत आहे. तुम्ही समजावून सांगता की, बाबांनी ५ हजार
वर्षांपूर्वी देखील सांगितले होते; ते गीता वाचणारे (दुनियावाले) थोडेच काही समजतात.
यादव, कौरव, पांडव कोणाला म्हटले जाते हे तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये बघत आहात.
युरोपवासी यादवांनी मुसळे (मिसाईल्स) तयार केली, विनाश झाला. विनाशानंतर काय झाले,
ते मात्र काहीच दाखवत नाहीत. ते समजतात की, प्रलय झाला. ते म्हणतात - ‘तुम्ही
शास्त्रांना मानता का?’ तर बोला - ‘हो, आम्ही शास्त्रांना जाणतो, आणि मानतो देखील,
ही सर्व शास्त्रे भक्तिमार्गाची आहेत’. ज्ञान तर एक बाबाच ऐकवतात, जे ज्ञानाचा सागर
आहेत. आता भक्ती संपून ज्ञान झिंदाबाद होत आहे. जुन्या दुनियेचा विनाश समोर उभा आहे,
नथिंग न्यू. आमची प्रीत बाबांवर आहे. आम्ही इतर सर्व संग तोडून एक संग जोडतो. बाबा
म्हणतात - स्वतःला आत्मा समजून माझ्याशी योग लावा - यालाच भारताचा प्राचीन योग
म्हटले जाते, जो बाबाच शिकवतात. श्रीकृष्णाची आत्मा देखील या वेळी अंतिम जन्मामध्ये
आहे; यांना (ब्रह्मा बाबांना) म्हणतात - ‘तू आपल्या जन्मांना जाणत नाहीस. हा तुझा
अनेक जन्मांतील अंतिम जन्म आहे’; म्हणून मी यांच्यामध्ये प्रवेश केला आहे. मी
यांच्यामध्ये बसून तुम्हा मुलांना ब्रह्मामुख वंशावली बनवून राज्य-भाग्य देतो.
बाबांशिवाय इतर कोणीही सांगू शकत नाही. हे तर बाबा स्वतः या मुखाद्वारे ऐकवत आहेत.
हे बाबा (ब्रह्मा बाबा) देखील आधी काहीही जाणत नव्हते, तुम्ही देखील काही जाणत
नव्हता. भारतवासीयांनाच समजावून सांगावे लागेल. ८४ जन्मांचे चक्र कसे फिरते, हे तेच
युद्ध आहे, ज्याद्वारे स्वर्गाचे गेट उघडले होते. जेव्हा बाबांनी येऊन राजयोग
शिकवून मनुष्यांना देवता बनवले होते. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) जे चांगल्या
प्रकारे श्रीमतावर चालतात, त्यांना फॉलो करायचे आहे. बेहदच्या आनंदामध्ये
राहण्यासाठी आप समान बनविण्याची सेवा करायची आहे.
२) प्रीत-बुद्धी बनून
इतर संग तोडून एका बाबांशी जोडायचे आहे. डबल अहिंसक बनून सायलेन्समध्ये बसून आपली
राजाई स्थापन करायची आहे.
वरदान:-
त्याग आणि
तपस्येद्वारे सेवेमध्ये सफलता प्राप्त करणारे सच्चे सेवाधारी भव
सेवेमध्ये सफलतेचे
मुख्य साधन आहे - त्याग आणि तपस्या. त्याग अर्थात मनसा संकल्पाने देखील त्याग,
कोणत्याही परिस्थितीमुळे, मर्यादेच्या कारणाने, मजबूरीने त्याग करणे हा काही त्याग
नाहीये, परंतु ज्ञान-स्वरूपाद्वारे, संकल्पाने देखील त्यागी बना आणि तपस्वी अर्थात
सदैव बाबांच्या गहिऱ्या प्रेमामध्ये लवलीन, ज्ञान, प्रेम, आनंद, सुख, शांतीच्या
सागरामध्ये सामावलेले. असे त्यागी, तपस्वीच सेवेमध्ये सफलता प्राप्त करणारे सच्चे
सेवाधारी आहेत.
बोधवाक्य:-
आपल्या
तपस्येद्वारे शांतीची व्हायब्रेशन्स पसरविणे म्हणजेच विश्व सेवाधारी बनणे आहे.
हे अव्यक्त इशारे -
ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.
तुम्हा संपूर्ण
आत्म्यांचे अंतिम वाहन आहे - कर्मबंधन मुक्त, कर्मातीत स्थिती. अशी स्थिती
बनविण्याकरिता ब्रह्माबाबांसारखे सर्व हदींवर (मर्यादांवर) विजय प्राप्त करणारे
विजयी रत्न बना, तेव्हाच अंतिम कर्मातीत स्वरूपाचे अनुभवी बनाल. अनेक प्रकारच्या
मर्यादा अर्थात अनेक प्रकारचे ‘माझे-माझे’. जेव्हा ‘मी’ आणि ‘माझे’, ‘तू’ आणि ‘तुझे’...
हे चार शब्द एक बाबा शब्दामध्ये सामावून जातील तेव्हाच संपूर्णता समीप येईल.