18-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - या रूहानी नशेमध्ये राहा की आपण ईश्वरीय फॅमिलीचे आहोत, आपण आपली गुप्त दैवी राजधानी स्थापन करत आहोत”

प्रश्न:-
मुलांमध्ये कोणती सवय पक्की असेल तर पूर्ण दिवस आनंद टिकून राहील?

उत्तर:-
जर पहाटे लवकर उठून विचार सागर मंथन करण्याची सवय असेल तर पूर्ण दिवस अपार आनंद होत राहील. बाबांचे श्रीमत आहे - मुलांनो, अमृतवेलेला उठून आपल्या बाबांशी गोड-गोड गोष्टी करा. विचार करा - आपण आता कोणत्या फॅमिलीचे आहोत, आपले कर्तव्य काय आहे. जर बुद्धीमध्ये हे राहिले की, आपली ही ईश्वरीय फॅमिली आहे, आपण आपली नवीन राजधानी स्थापन करत आहोत तर पूर्ण दिवस आनंद टिकून राहील.

ओम शांती।
मुले जाणतात की हा रूहानी परिवार आहे, ते सर्व आहेत भौतिक परिवार. हा आहे रुहानी बाबांचा परिवार, रूहानी परिवार. जसे लौकिक घरामध्ये आई-वडील, मुले असतात, तो झाला हदचा परिवार. तुम्ही आता बेहदच्या फॅमिलीचे आहात. मुले गातात देखील - ‘तुम मात-पिता…’ तर जणू फॅमिलीचे झाले. क्रियेटरचे क्रिएशन झाले (रचयित्याची रचना झाले). असे तर मुले त्यांची क्रिएशन आहेत, परंतु जाणत नाहीत. तुम्ही मुले आता जाणता, खरोखर बेहदच्या बाबांची ही फॅमिली आहे. ईश्वरीय विश्वविद्यालय. यासाठी गायले जाते - ‘विनाशकाले प्रीत-बुद्धी विजयन्ती’. अशी फॅमिली कधी गीतेमध्ये गायली गेलेली नाही. तुम्ही ईश्वरीय फॅमिलीचे, गुप्त दैवी राजधानी स्थापन करत आहात. कोणालाच माहीत होत नाही. तुम्हाला नशा आहे, जे-जे बाबांची आठवण करतील, त्यांना नशा राहील. देह-अभिमानामध्ये आल्यामुळे तो नशा टिकणार नाही, उतरेल. ही ईश्वरीय फॅमिली आहे. आपल्याला आता घरी जायचे आहे, नंतर मग दैवी राजधानीमध्ये येणार. तिथे (सतयुगामध्ये) आहे - दैवी फॅमिली. ती (जुन्या दुनियेमध्ये) आहे - आसुरी फॅमिली, ही आहे तुमची ईश्वरीय फॅमिली. रुहानी बाप-दादांची मुले बहिण-भाऊ आहेत. बस्स, हा आहे रुहानी प्रवृत्ती मार्ग. सतयुगामध्ये काही ईश्वरीय फॅमिली म्हटले जाणार नाही. तिथे दैवी फॅमिली बनते. ही ईश्वरीय फॅमिली अत्यंत शक्तिशाली आहे. तुम्ही जाणता - आता आपण ईश्वरीय फॅमिली, दैवी राज्य स्थापन करत आहोत. अशा प्रकारे आपल्याशीच गोष्टी करत, विचार सागर मंथन केले पाहिजे. पहाटे उठून आठवणीमध्ये बसा म्हणजे मग विचार सागर मंथन करण्याची सवय होईल. उत्साहामध्ये येत जाल. जेव्हा बाकीचे सर्व मनुष्य निद्रेमध्ये झोपी गेलेले असतात, त्यावेळेस तुम्ही जागत असता. तुम्ही पहाटे लवकर उठून अशा प्रकारचे विचार केले पाहिजेत आणि मग बघा तुम्हाला किती आनंद होतो ते. जे काही श्रीमत मिळते त्यानुसार चालायचे आहे, म्हणजे मग तुम्हाला खूप आनंद होईल, ईश्वरीय फॅमिलीची आठवण येईल. आसुरी फॅमिली मधून मन उडून जाईल. नवीन घर जेव्हा पूर्ण तयार होते तेव्हा मग जुन्या घरातील आसक्ती निघून जाते. जोपर्यंत नवीन बनत नाही तोपर्यंत काही ना काही डागडुजी इत्यादी करत राहतात. आणि मग मन उडून जाते. ही जुनी दुनिया देखील अशीच आहे.

आता तुम्ही जाणता हे जुने घर आहे, आपण आता नवीन घरामध्ये जाणार. मग नवीन शरीर धारण करणार. हा देह सुद्धा जुना आहे. आता तुम्ही भविष्य २१ जन्मांसाठी राज्यभाग्य घेत आहात. तुम्हाला इथे काही राज्य करायचे नाहीये. इथे होते - स्थापना. ह्या गोष्टी फक्त तुम्हीच जाणता. ही आहे देखील गीता, राजयोग आहे ना. याला म्हटले जाते - ‘सहज राजयोग’. अनेक वेळा तुम्ही या राजयोग अभ्यासाद्वारे दैवी राज्य स्थापन करता. तिथे या गोष्टी लक्षात राहणार नाहीत. जर तिथे या गोष्टी आठवणीत राहिल्या तर मग सुखच भासणार नाही. चिंता लागून राहील. यावेळी तुम्हाला गुप्त नशा आहे. उच्च ते उच्च बाबांची ही फॅमिली आहे. याला म्हटले जाते ईश्वरीय गुप्त फॅमिली प्रकार. ईश्वरीय विश्वविद्यालय, ईश्वरीय यज्ञ देखील म्हणतात. फॅमिली आहे, आपल्याला खूप प्रेमळ बनायचे आहे. भविष्यामध्ये तुम्ही खूप प्रेमळ बनता. तुम्ही आहात रूप-बसंत. आत्मा रूप देखील आहे आणि बसंत देखील आहे. इतकी छोटीशी आत्मा अविनाशी पार्ट बजावते. यावेळी तुम्ही रूप-बसंत बनला आहात. बाबा ज्ञानाचा सागर आहेत. तर जरूर ते ज्ञान तेव्हाच देतील जेव्हा या शरीरामध्ये येतील. तुम्ही जाणता - ज्ञानरुपी पावसाची बरसात करतात. एक-एक रत्न लाखो रुपयांचे आहे. आता तुम्हा आत्म्यांना बाबांचा परिचय मिळाला आहे. बाबांनी स्मृति करवून दिली आहे. हे ८४ चे चक्र कसे फिरते हे तुमच्या बुद्धीमध्ये आहे, म्हणून तुमचे नावच आहे - स्वदर्शन चक्रधारी. विष्णू अथवा लक्ष्मी-नारायण स्वदर्शन चक्रधारी नव्हते, त्यांच्यामध्ये हे ज्ञान नसते. आता आत्म्याला हे ज्ञान प्राप्त होते. सृष्टीचे चक्र कसे फिरते. भले ‘त्रिमूर्ती’ म्हणतात तरी देखील शिवाला दाखवत नाहीत. त्रिमूर्तीची भरपूर चित्रे बघितली असतील. साकारमध्ये प्रजापिता ब्रह्मा तर इथे आहेत ना. हे झाले खूप जुने, ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. तर ही झाली प्रजापिता ब्रह्माची वंशावळ. बाबा सृष्टी रचतात, ब्रह्माद्वारे. तर ब्रह्मा मोठे झाले ना. वृद्ध असल्याचे देखील दाखवतात. यांनी ८४ जन्मांचे चक्र पूर्ण केले आहे. आता तुम्हाला या गोष्टी समजल्या आहेत. हे देखील जाणता की, सर्व मुले तर बाबांचीच आहेत. आत्म्यांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. आता भारताचे खूप मोठे कल्याण होत आहे. सर्व आत्मे पवित्र बनून मुक्तिधाम मध्ये निघून जातील. तुम्ही आहातच भारताच्या सेवेवर. भारत खास, दुनिया आम. तुम्ही आता फार थोडे आहात, जे या गोष्टींना समजता, आणि मग नटशेलमध्ये (थोडक्यात) समजावून सांगितले जाते की, मुलांनो, मनमनाभव. वेगळे देखील समजावून सांगितले जाते, जे काही आहे ते दैवी राजधानी स्थापन करण्याकरिता लावा. बापू गांधीजी काय करत होते! त्यांना देखील राम राज्य हवे होते. कसा वंडरफुल खेळ आहे ना! आता तुम्ही साक्षी होऊन खेळ बघता. तुम्हाला हसू येते. कुठल्या गोष्टी कुठे घेऊन जातात.

बाबा म्हणतात - ड्रामा अनुसार दुनियेची गती वाईट झाली आहे तर मग बाबा येऊन सद्गती करतात. तुम्हा मुलांना नशा चढलेला आहे. हे आहेत साऱ्या दुनियेचे निराकार बापूजी. हा ब्रह्मा देखील कोणाचा मुलगा आहे? शिवबाबांचा. तो कोणाचा मुलगा आहे? या माता म्हणतात - शिवबाबा आमचा मुलगा आहे. हा आहे शिवबाबांचा लपंडाव. बाकी ध्यान-साक्षात्कारामध्ये तर मायेची खूप प्रवेशता होते. हे जे म्हणतात - आमच्यामध्ये शिवबाबा येतात. शिवबाबा असे बोलतात. ही सर्व भुताची प्रवेशता आहे. तुम्हा मुलांनी सावध राहिले पाहिजे. हा भुताचा रोग असा आहे जो दोन्ही दुनियेपासून दूर फेकून देतो. हा विचार सुद्धा कधी येता कामा नये की, आपल्याला साक्षात्कार घडावा. हे सर्व भक्तीचे विचार आहेत. ज्ञानमार्गाला चांगल्या रीतीने समजून घ्यायचे आहे. माया अनेक प्रकारे धोका देते. साक्षात्कार इत्यादीने काहीच फायदा होत नाही. बाबा म्हणतात - यांच्याद्वारे (ब्रह्मा द्वारे) वचनबद्ध करवून घेतात. बाबांचा आदेश आहे - तुम्हाला कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाही. तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. स्वतःच्या कल्याणासाठी बाबांची आठवण करायची आहे. ही तर नीट समजून घेण्याची गोष्ट आहे. बाबांना कोणताही समाचार लिहू शकता. बऱ्याच मुलांना तर एवढी सुद्धा अक्कल नाही की, बेहदच्या बाबांना चिठ्ठीमध्ये आपला कुशल समाचार लिहावा. लौकिक पित्याला जर पत्र लिहिले नाही तर झोपच उडून जाते. हे देखील बेहदचे बाबा आहेत. बाबा जेव्हा बघतात की, महिना दीड महिना चिठ्ठीच येत नसेल तर समजतात की, यांना बहुतेक मायेने खाऊन टाकले आहे, ज्यामुळे अशा पारलौकिक पित्याला चिठ्ठीच लिहीत नाहीत. एवढे तरी लिहिले पाहिजे - बाबा, आम्ही नेहमी नारायणी नशेमध्ये राहतो. तुम्ही दिलेल्या युक्तीमध्येच आम्ही मग्न आहोत. म्हणजे मग बाबा समजतील की, आनंदात आणि समाधानी आहेत. चिठ्ठी लिहीली नाहीत तर बाबा समजतील की आजारी आहे. आठवणी मध्येच राहत नाहीत. नाहीतर बाबांना हा समाचार द्यायचा आहे की, ‘बाबा, आम्ही ही सेवा केली, यांना ज्ञान सांगितले, यांच्या बुद्धीमध्ये नीट बसलेले नाही’. तर मग बाबा हे देखील समजावून सांगतील की, ‘अशा-अशा पद्धतीने समजावून सांगा’.

भक्तिमार्गामध्ये जे काही बोलतात, ते समजत काहीच नाहीत. मुख्य गोष्ट - बाबांनाच जाणत नाहीत. बाबांना जाणल्याने भारताची सद्गती होते. बाबांना न जाणल्यामुळे भारताची पूर्णतः दुर्गती झाली आहे. आता बाबा तुम्हा मुलांना समजावून सांगत आहेत - ‘मी तुम्हाला सद्गतीमध्ये घेऊन जाणार, आणि बाकी सर्वांना मुक्तीमध्ये घेऊन जाणार’. भारत जीवनमुक्तीमध्ये असतो तेव्हा बाकी सर्व मुक्तीमध्ये असतात. हा बदल बाबांशिवाय इतर कोणीही करू शकत नाही. सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच आहेत. सर्वांची सद्गती जरूर कल्प-कल्प जरूर संगमावरच होईल.

तुम्ही जाणता आम्हा आत्म्यांचे रूहानी बाबा एकच आहेत. आत्माच त्यांची आठवण करते. तुम्हाला भक्तिमार्गामध्ये दोन पिता आहेत. सतयुगामध्ये आहे एक पिता. संगमावर आहेत तीन पिता. प्रजापिता ब्रह्मा देखील पिताच तर आहेत ना. शिव देखील पिता आहेत. ते आहेत सर्व आत्म्यांचे पिता, त्यांच्याकडूनच वारसा घ्यायचा आहे. त्यांची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील. ब्रह्माची आठवण केल्यामुळे विकर्म विनाश होणार नाहीत, म्हणून शिवबाबांचीच आठवण करायची आहे. आपण त्यांचे बनलो आहोत, हे आहे रूहानी बाबांचे रूहानी मुलांप्रति खरे-खरे सत्य ज्ञान. बाकी सर्व आहेत देह-अभिमानी. देह-अभिमानी पतित मनुष्य जे काही कर्म करतात ते पतित कर्मच करतात. दान-पुण्य इत्यादी जे काही करतात, ते सर्व पतितच बनविते. रावण राज्यामध्ये हेच घडते. आता बाबा येऊन ऑर्डीनन्स (वटहुकूम) काढतात. बाबा म्हणतात - मुलांनो सावध रहा, विकारामध्ये जायचे नाही, काम विकारावर विजय प्राप्त करायचा आहे. वादळे इत्यादी तर खूप येतील. यामध्ये फेल व्हायचे नाही. मायेचे इतके विकल्प येतील जे अज्ञान काळामध्ये देखील आले नसतील, असे देखील विकल्प येतात. म्हणतात - भक्तिमार्गामध्ये खूप आनंद असतो. आता आम्ही तुमची आठवण करण्याचा प्रयत्न करतो परंतु करू शकत नाही. बिंदूची आठवण करू शकत नाही. मोठी वस्तू असेल तर आठवण येईल.

बाबा म्हणतात की, तुम्ही ‘शिवबाबा’ असे म्हणून आठवण करा, या जुन्या दुनियेला विसरून जा. शांतीधाम मध्ये माझी आठवण करा. फक्त शांतीधामची आठवण करायची नाही, बाबांच्या आठवणीद्वारेच विकर्म विनाश होतील. आत्म्याचे स्वीट बाबांवर प्रेम असले पाहिजे. अर्ध्याकल्पाचे प्रेमी आहेत. आत्मा म्हणते - आम्ही अर्धाकल्प तुम्हाला विसरून गेलो होतो. इथे ब्राह्मणी ज्यांना घेऊन येते, तिने अत्यंत सावधगिरीने निश्चय-बुद्धी असणाऱ्यांनाच आणायचे आहे. जर इथे येऊन मग जाऊन कोणी पतित बनला तर त्याचा दंड ब्राह्मणीवर येईल; म्हणून ब्राह्मणीवर खूप मोठी जबाबदारी आहे. बाबांनी हा रथ (ब्रह्मा बाबांच्या तनाचा आधार) घेतला आहे. ते सर्व बाबतीत अनुभवी आहेत. इथे तर घाणेरड्या गोष्टी घडण्याचा प्रश्नच नाही. आपसात हसणे, खेळणे, बोलणे यासाठी काही मनाई नाही. परंतु थोडे जरी कोणत्या आत्म्याविषयी प्रेम वाटेल तर मग जास्त वाढत जाईल. त्याची आठवण येत राहील म्हणून या पासून देखील दूर रहायचे आहे.

आता तुम्ही या घरामध्ये बसले आहात की सतयुगामध्ये बसले आहात? (घरामध्ये) बाबा मुलांना घरामध्ये शिकवत आहेत. तुम्हा सर्वांचे हे घर आहे. जेव्हा बाहेर जाता तेव्हा असे म्हणणार नाही. इथे खूप चांगला नशा राहील. देहाचा अभिमान सोडायचा आहे. देही-अभिमानी बना म्हणजे मग जाती-पातीचा भेद सर्व निघून जाईल. जुनी दुनिया तमोप्रधान आहे, यामध्ये भेदभाव आणखीनच वाढत जातो. पूर्वी ब्रिटिश गव्हर्नर्मेंटच्या काळात भाषांवरून कोणताही संघर्ष नव्हता, परंतु आता दिवसेंदिवस दुफळी वाढत चालली आहे. आणि मग सतयुगामध्ये एकच भाषा असेल. कोणताही भेदभाव असणार नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कोणत्याही देहधारीची आठवण येऊ नये, यासाठी कोणावरही प्रेम करायचे नाही. याच्याही पलीकडे जायचे आहे. खूप सावधगिरी बाळगायची आहे. मायेच्या विकल्पांना घाबरायचे नाही, विजयी बनायचे आहे.

२) ध्यान-साक्षात्कारामध्ये मायेची खूप प्रवेशता होते, या भूत प्रवेशते पासून स्वतःला वाचवायचे आहे. बाबांना आपला खरा-खरा समाचार द्यायचा आहे.

वरदान:-
प्रत्येक गोष्टीमध्ये साराला (सारांशाला) ग्रहण करून ऑलराऊंडर बनणारे सरळ पुरुषार्थी भव

जी कोणती गोष्ट बघता, ऐकता - त्याचे सार (सारांशाला) समजून घ्या आणि जे शब्द बोलाल, जे कर्म कराल त्यामध्ये सार भरलेले असावे तेव्हाच पुरुषार्थ सरळ होईल. असा सरळ पुरुषार्थी सर्व गोष्टींमध्ये ऑलराऊंडर असतो. त्याच्यामध्ये कोणतीही कमतरता दिसून येत नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये हिंमत कमी होत नाही, मुखावाटे असे शब्द निघत नाहीत की, ‘मी हे करू शकत नाही’. असे सरळ पुरुषार्थी स्वतः देखील सरळ-चित्त राहतात आणि दुसऱ्यांना देखील सरळ-चित्त बनवितात.

बोधवाक्य:-
साधने युज करत असतानाही त्याच्या प्रभावापासून न्यारे आणि बाबांचे प्यारे बना.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

एकरस स्थिती बनविण्यासाठी एका व्यतिरिक्त इतर काहीही दिसत असताना देखील बघू नका. हे जे काही पाहत आहात ही कोणतीही वस्तू राहणारी नाहीये (शाश्वत नाहीये). तर एकरस, स्थेरियम तेव्हाच राहू शकाल जेव्हा कोणतेही दृश्य बघत असताना ‘का’, ‘कसे’ ची उत्पत्ती होऊ नये, हेच व्यर्थ संकल्पांची खळबळ माजविण्याचे कारण आहे. या ‘क्यू’ च्या समाप्ती नंतरच संपूर्णता येईल.