18-08-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - जसे बाबा गाईड आहेत, असे गाईड बनून सर्वांना घरचा रस्ता सांगायचा आहे, आंधळ्यांची काठी बनायचे आहे”

प्रश्न:-
या पूर्व-नियोजित अनादि ड्रामाचे रहस्य कोणते आहे, जे तुम्ही मुलेच जाणता?

उत्तर:-
हा पूर्व-नियोजित अनादि ड्रामा आहे यामध्ये ना कोणता ॲक्टर ॲड होऊ शकतो, ना कोणता कमी होऊ शकतो. मोक्ष कोणालाही मिळत नाही. कोणी म्हणेल की आम्ही या आवागमनाच्या चक्रामध्ये येऊच नये. बाबा म्हणतात - होय, काही काळासाठी. परंतु पार्टमधून कोणीही अजिबात सुटू शकत नाहीत. हे ड्रामाचे रहस्य तुम्ही मुलेच जाणता.

ओम शांती।
गोड-गोड मुले हे जाणतात की भोलानाथ कोणाला म्हटले जाते. तुम्ही संगमयुगी मुलेच जाणू शकता, कलियुगी मनुष्य रिंचक मात्र देखील जाणत नाहीत. ज्ञानाचे सागर एक बाबाच आहेत, तेच सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान समजावून सांगतात. स्वतःची ओळख देतात. तुम्ही मुले आता समजता, अगोदर काहीच जाणत नव्हते. बाबा म्हणतात - ‘मीच येऊन भारताला स्वर्ग बनवतो, बेहदचा वारसा देतो, जो तुम्ही आता घेत आहात’. जाणता आपण बेहदच्या बाबांकडून बेहद सुखाचा वारसा घेत आहोत. हा पूर्व-नियोजित ड्रामा आहे, एकही ॲक्टर ना ॲड होऊ शकणार, ना कमी होऊ शकणार. सर्वांना आपापला पार्ट मिळालेला आहे. मोक्ष कोणीही प्राप्त करू शकत नाही. जे-जे ज्या धर्माचे आहेत पुन्हा त्याच धर्मामध्ये जाणार आहेत. बौद्धी किंवा ख्रिश्चन इत्यादी इच्छा करतील की आपण स्वर्गामध्ये जावे, परंतु जाऊ शकत नाहीत. जेव्हा त्यांचे धर्म स्थापक येतात तेव्हाच त्यांचा पार्ट आहे. हे तुम्हा मुलांच्याच बुद्धीमध्ये आहे. साऱ्या दुनियेचे मनुष्य मात्र यावेळी नास्तिक आहेत अर्थात बेहदच्या बाबांना न जाणणारे आहेत. मनुष्यच जाणतील ना. ही नाटक-शाळा मनुष्यांची आहे. प्रत्येक आत्मा निर्वाणधामहून येते पार्ट बजावण्याकरिता. मग पुरुषार्थ करते निर्वाणधाममध्ये जाण्यासाठी. म्हणतात बुद्ध निर्वाणमध्ये गेले. आता बुद्धाचे शरीर तर गेले नाही, आत्मा गेली. परंतु बाबा समजावून सांगतात - जात कोणीच नाही. नाटकातून निघूच शकत नाहीत. मोक्ष प्राप्त करू शकत नाहीत. पूर्व-नियोजित ड्रामा आहे ना. कोणी मनुष्य समजतात मोक्ष मिळतो, म्हणून पुरुषार्थ करत राहतात. जसे जैन लोक पुरुषार्थ करत राहतात, त्यांचे आपले रीती-रिवाज आहेत, त्यांचा आपला गुरु आहे, ज्यांना मानतात. बाकी मोक्ष कोणालाही मिळत नाही. तुम्ही तर जाणता आपण या ड्रामामध्ये पार्टधारी आहोत. आपण कधी आलो मग कसे जाणार, हे कोणालाही माहित नाही आहे. पशु तर जाणणार नाहीत ना. मनुष्यच म्हणतात आपण ॲक्टर्स पार्टधारी आहोत. हे कर्मक्षेत्र आहे, जिथे आत्मे राहतात. त्याला कर्मक्षेत्र म्हटले जात नाही. ती तर निराकारी दुनिया आहे. तिथे काही खेळणे-बागडणे नाही आहे, निराकारी दुनियेतून साकारी दुनियेमध्ये येतात पार्ट बजावण्यासाठी, जो मग रिपीट होत राहतो, प्रलय कधी होतच नाही. शास्त्रांमध्ये दाखवतात - महाभारत लढाईमध्ये यादव आणि कौरव मेले, बाकी ५ पांडव वाचले, ते देखील डोंगरावर वितळून मेले. बाकी काहीही राहिले नाही. यामुळे समजतात प्रलय झाला. या सर्व गोष्टी बसून बनवलेल्या आहेत, आणि मग दाखवतात समुद्रामध्ये पिंपळाच्या पानावर एक बाळ अंगठा चोखत आले. आता त्याच्याद्वारे मग दुनिया कशी निर्माण होईल. मनुष्य जे काही ऐकतात तेच सत्-सत् करत राहतात. आता तुम्ही मुले जाणता की शास्त्रांमध्ये देखील काय-काय लिहिलेले आहे. ही सर्व आहेत भक्तीमार्गाची शास्त्रे. भक्तांना फळ देणारे एक भगवान बाबाच आहेत. कोणी मुक्तीमध्ये, कोणी जीवनमुक्ती मध्ये जातील. प्रत्येक पार्टधारी आत्म्याचा जेव्हा पार्ट येईल तेव्हा पुन्हा येतील. हे ड्रामाचे रहस्य तुम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणीही जाणत नाही. म्हणतात आम्ही रचता आणि रचनेला जाणत नाही. ड्रामाचे ॲक्टर्स असूनही ड्रामाचा आदि-मध्य-अंत, ड्युरेशन (कालावधी) इत्यादीला जाणत नसतील तर अडाणी म्हटले जाईल ना. समजावून सांगितले तरी देखील समजत नाहीत. ८४ लाख समजल्याकारणाने कालावधीला देखील लाखो वर्षे देतात.

आता तुम्ही समजता बाबा आम्ही तुमच्याकडून कल्प-कल्प येऊन स्वर्गाची बादशाही घेतो. ५ हजार वर्षांपूर्वी देखील तुम्हाला भेटलो होतो, बेहदचा वारसा घेण्यासाठी. यथा राजा-राणी तथा प्रजा सर्व विश्वाचे मालक बनतात. प्रजा देखील म्हणेल आम्ही विश्वाचे मालक आहोत. तुम्ही जेव्हा विश्वाचे मालक बनता, त्यावेळी चंद्रवंशी राज्य नसते. तुम्ही मुले ड्रामाच्या संपूर्ण आदि-मध्य-अंताला जाणता. मनुष्य भक्तीमार्गामध्ये ज्याची पूजा करतात त्याला देखील जाणत नाहीत. ज्यांची भक्ती करायची आहे तर त्यांच्या बायोग्राफीला (जीवन चरित्राला) देखील जाणले पाहिजे. तुम्ही मुले आता बाबांद्वारे सर्वांची बायोग्राफी जाणता. तुम्ही बाबांचे बनले आहात. बाबांच्या बायोग्राफी विषयी देखील ठाऊक आहे. ते बाबा आहेत पतित-पावन, लिबरेटर, गाईड. तुम्हाला पांडव म्हटले जाते. तुम्ही सर्वांचे गाईड बनता, आंधळ्यांची काठी बनता सर्वांना रस्ता सांगण्यासाठी. जसे बाबा गाईड आहेत तसे तुम्हा मुलांना देखील बनायचे आहे. सर्वांना रस्ता सांगायचा आहे. तुम्ही आत्मा आहात, ते परमात्मा आहेत, त्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळतो. भारतामध्ये बेहदचे राज्य होते, आता नाही आहे. तुम्ही मुलेच जाणता आपण बेहदच्या बाबांकडून बेहद सुखाचा वारसा घेतो अर्थात मनुष्या पासून देवता बनतो. आपणच देवता होतो मग ८४ जन्म घेऊन शूद्र बनलो आहोत. बाबा येऊन शूद्रापासून ब्राह्मण बनवितात. यज्ञामध्ये ब्राह्मण जरूर पाहिजेत. हा आहे ज्ञान यज्ञ, भारतामध्ये यज्ञ खूप रचतात. यामध्ये खास आर्य समाजी खूप यज्ञ करतात. आता हा तर आहे रुद्र ज्ञान यज्ञ. ज्यामध्ये सारी जुनी दुनिया स्वाहा होणार आहे. आता बुद्धीने विचार करावा लागतो. कलियुगामध्ये तर असंख्य मनुष्य आहेत, एवढी सारी जुनी दुनिया नष्ट होणार आहे. कोणतीही वस्तू उपयोगाला येणार नाही. सतयुगामध्ये तर मग सर्व काही नवीन असेल. इथे तर किती घाण आहे. मनुष्य कसे घाणेरडे राहतात. श्रीमंत खूप चांगल्या बंगल्यांमध्ये राहतात. गरीब तर बिचारे घाणीमध्ये, झोपड्यांमध्ये राहत आहेत. आता या झोपड्यांना नष्ट करत राहतात. त्यांना दुसरीकडे जागा देऊन ती जमीन मग विकत राहतात. निघाले नाहीत तर जबरदस्तीने जायला लावतात. गरीब खूप दुःखी आहेत, जे सुखी आहे ते देखील स्थाई सुखी नाही आहेत. जर सुख असते तर का म्हटले असते की, हे कागविष्ठा समान सुख आहे.

शिव भगवानुवाच, या मातांच्या द्वारे स्वर्गाचे दरवाजे उघडत आहेत. मातांवर कलश ठेवला आहे. त्या मग सर्वांना ज्ञान अमृत पाजतात. परंतु तुमचा आहे प्रवृत्ती मार्ग. तुम्ही आहात खरे-खरे ब्राह्मण, तर सर्वांना ज्ञान-चितेवर बसवता. आता तुम्ही बनता दैवी संप्रदाय. आसुरी संप्रदाय अर्थात रावण राज्य. गांधीजी देखील म्हणत होते राम राज्य असावे. बोलावतात - ‘हे पतित-पावन या’, परंतु स्वतःला पतित थोडेच समजतात. बाबा मुलांना जागृत करतात, तुम्ही घोर अंधारातून प्रकाशामध्ये आला आहात. मनुष्य तर समजतात गंगा स्नान केल्याने पावन बनाल. असेच गंगेमध्ये हरिद्वारचा सारा कचरा पडतो . काही ठिकाणी मग तो सारा कचरा शेतामध्ये घेऊन जातात. सतयुगामध्ये असली कामे नसतात. तिथे तर धान्य विपुल प्रमाणात असते. पैसा थोडाच खर्च करावा लागतो. बाबा अनुभवी आहेत ना. पूर्वी धान्य किती स्वस्त होते. सतयुगामध्ये फार थोडे मनुष्य आहेत, प्रत्येक वस्तू स्वस्त असते. तर बाबा म्हणतात - गोड मुलांनो, आता तुम्हाला पतितापासून पावन बनायचे आहे. युक्ती अतिशय सोपी सांगतात, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. आत्म्यामध्ये खाद पडल्याने मुलाम्याची बनली आहे. जे पारस-बुद्धी होते तेच आता पत्थर-बुद्धी बनले आहेत. तुम्ही मुले आता बाबांकडे पत्थरनाथ पासून पारसनाथ बनण्यासाठी आला आहात. बेहदचे बाबा तुम्हाला विश्वाचा मालक बनवितात, ते देखील गोल्डन एज्ड विश्वाचा. हे आहे आईरन एज्ड विश्व. बाबा बसून मुलांना पारसपुरीचा मालक बनवतात. तुम्ही जाणता इथले इतके गाडी-बंगले इत्यादी काहीही कामी येणार नाहीत. सर्वकाही नष्ट होईल. इथे काय ठेवले आहे! अमेरिके जवळ किती सोने आहे! इथे तर थोडे-फार सोने जे मातांजवळ आहे, ते देखील घेत राहतात कारण त्यांना तर कर्जामध्ये सोने द्यायचे आहे. तुमच्याकडे तिथे सोनेच सोने असते. इथे कवड्या, तिथे हिरे असतील. याला म्हटले जाते आईरन एज. भारतच अविनाशी खंड आहे, कधी विनाश होत नाही. भारत आहे सर्वात उच्च ते उच्च. तुम्ही माता साऱ्या विश्वाचा उद्धार करता. तुमच्यासाठी जरूर नवीन दुनिया पाहिजे. जुन्या दुनियेचा विनाश पाहिजे. किती समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. शरीर निर्वाह अर्थ धंदा इत्यादी देखील करायचा आहे. सोडायचे काहीच नाही. बाबा म्हणतात - सर्व काही करत असताना माझी आठवण करत रहा. भक्तिमार्गामध्ये देखील तुम्ही मज माशुकची आठवण करत आला आहात की आम्हाला येऊन सावळ्या पासून गोरे बनवा. त्यांना मुसाफिर (प्रवासी) म्हटले जाते. तुम्ही देखील सर्व प्रवासी आहात ना. तुमचे घर ते आहे, जिथे सर्व आत्मे राहतात.

तुम्हा सर्वांना ज्ञान-चितेवर बसवतात. सगळे हिशोब चुक्ता करून जाणार आहेत. पुन्हा नव्याने तुम्ही याल, जितके आठवणीमध्ये रहाल तितके पवित्र बनाल आणि उच्च पद प्राप्त कराल. मातांना तर वेळ असतो. पुरुषांची बुद्धी धंदा इत्यादीकडे फेरी मारत असते, म्हणून बाबांनी कलश देखील मातांना दिला आहे. इथे तर पत्नीला म्हणतात की, पतीच तुझा ईश्वर गुरु सर्व काही आहे. तू त्याची दासी आहेस. आता पुन्हा बाबा तुम्हा मातांना किती श्रेष्ठ बनवतात. तुम्ही नारीच भारताचा उद्धार करता. काहीजण बाबांना विचारतात - अवागमन पासून सुटू शकतो का? बाबा म्हणतात हो - काही काळासाठी. तुम्ही मुले तर ऑलराउंड आदि पासून अंतापर्यंत पार्ट बजावता. बाकीचे जे आहेत ते मुक्तिधाममध्ये राहतात. त्यांचा पार्टच थोडा आहे. ते स्वर्गामध्ये तर जाणारे नाहीत. आवागमन पासून मोक्ष त्याला म्हटले जाईल जे शेवटाला आले आणि हे गेले. ज्ञान इत्यादी तर ऐकू शकणार नाहीत. ऐकतात तेच जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पार्ट बजावतात. कोणी म्हणतात - आम्हाला तर हेच पसंत आहे. आम्ही तिथेच बसून रहाणार. असे थोडेच होऊ शकते. ड्रामामध्ये नोंदलेले आहे, जाऊन शेवटाला येणार जरूर. बाकी सारा वेळ शांतीधाममध्ये राहतात. हा बेहदचा ड्रामा आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) खरा-खरा ब्राह्मण बनून सर्वांना ज्ञान अमृत पाजायचे आहे. ज्ञान-चितेवर बसवायचे आहे.

२) शरीर निर्वाह अर्थ धंदा इत्यादी सर्व काही करत असताना पतितापासून पावन बनण्यासाठी बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे आणि सर्वांना बाबांची आठवण करून द्यायची आहे.

वरदान:-
विशेषतांच्या दाना द्वारे महान बनणारे महादानी भव

ज्ञान दान तर सर्वच करतात परंतु तुम्हा विशेष आत्म्यांना आपल्यातील विशेषतांचे दान करायचे आहे. जो कोणी तुमच्या समोर येईल त्याला तुमच्या द्वारे बाबांच्या स्नेहाचा अनुभव व्हावा, तुमच्या चेहऱ्या द्वारे बाबांचे चित्र आणि चलन द्वारे बाबांचे चरित्र दिसून यावे. तुमच्या विशेषतांना पाहून त्यांना विशेष आत्मा बनण्याची प्रेरणा प्राप्त व्हावी, असे महादानी बना तर आदि पासून अंतापर्यंत, पूज्य असताना देखील आणि पुजारी असताना देखील महान होऊन रहाल.

बोधवाक्य:-
सदैव आत्म-अभिमानी राहणाराच सर्वात मोठा ज्ञानी आहे.

अव्यक्त इशारे:- सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना.

जे कायम बाबांच्या आठवणीमध्ये लवलीन राहून ‘मी’पणाच्या त्यागी-वृत्तीमध्ये राहतात, त्यांच्या द्वारेच बाबा दिसून येतात. तुम्ही मुले नॉलेजच्या आधारे बाबांच्या आठवणीमध्ये सामावून जाता तर हे सामावणेच लवलीन स्थिती आहे, जेव्हा लव मध्ये लीन होता अर्थात लगन मध्ये मगन होता तेव्हा बाबांच्या समान बनता.