18-11-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो,
तुम्हाला मनसा-वाचा-कर्मणा ॲक्युरेट (अचूक) बनायचे आहे, कारण तुम्ही ब्राह्मण
देवतांपेक्षा देखील श्रेष्ठ, उच्च शिखर आहात”
प्रश्न:-
सर्वात गुप्त
आणि सूक्ष्म गोष्ट कोणती आहे जी मुले देखील मुश्किलीने समजतात?
उत्तर:-
शिवबाबा आणि
ब्रह्मा बाबा यांच्यातील भेद समजणे ही सर्वात गुप्त आणि सूक्ष्म गोष्ट आहे. यामध्ये
कित्येक मुले गोंधळून जातात. हे रहस्य स्वतः बाबा सांगतात की मी पहाटे लवकर या
तनाद्वारे तुम्हा मुलांना शिकवतो, बाकी असे नाही की मी पूर्ण दिवस यांच्यावर स्वार
होऊन राहतो.
ओम शांती।
रूहानी बाबा
रूहानी मुलांना समजावून सांगत आहेत. मुले कोण आहेत? ब्राह्मण. हे कधीही विसरू नका
की, आपण ब्राह्मण आहोत, देवता बनणार आहोत. वर्णांची देखील आठवण ठेवायची आहे. इथे
तुम्ही आपसामध्ये ब्राह्मणच ब्राह्मण आहात. ब्राह्मणांना बेहदचे बाबा शिकवत आहेत.
हे ब्रह्मा शिकवत नाहीत, शिवबाबा शिकवतात. ब्रह्माद्वारे ब्राह्मणांनाच शिकवतात.
शूद्रापासून ब्राह्मण बनल्याशिवाय देवता बनू शकत नाही. वारसा तर शिवबाबांकडून मिळतो.
शिवबाबा तर सर्वांचे पिता आहेत. या ब्रह्माला ‘ग्रँड फादर’ म्हटले जाते. लौकिक पिता
तर सर्वांना असतातच. पारलौकिक पित्याची भक्तिमार्गामध्ये आठवण करतात. आता तुम्ही
मुले समजता - हे अलौकिक पिता आहेत, ज्यांना कोणी जाणत नाहीत. भले ब्रह्माचे मंदिर
आहे. इथे देखील प्रजापिता आदि देवाचे मंदिर आहे. त्यांना महावीर देखील म्हणतात, कोणी
दिलवाला देखील म्हणतात. परंतु प्रत्यक्षात दिल घेणारे तर शिवबाबा आहेत, ब्रह्मा नाही.
सर्व आत्म्यांना सदैव सुखी करणारे, आनंद देणारे एकच बाबा आहेत. हे देखील फक्त तुम्ही
मुलेच जाणता. दुनियेमध्ये तर मनुष्य काहीच जाणत नाहीत. आम्ही ब्राह्मणच
शिवबाबांकडून वारसा घेत आहोत. तुम्ही देखील घडोघडी विसरून जाता. आठवण खूप सोपी आहे.
‘योग’ शब्द संन्याशांनी ठेवला आहे. तुम्ही तर बाबांची आठवण करता. ‘योग’ शब्द तर
कॉमन शब्द आहे, याला ‘योग आश्रम’ असे देखील म्हणणार नाही. मुले आणि बाबा बसले आहेत.
बेहदच्या बाबांची आठवण करणे हे मुलांचे कर्तव्य आहे. आपण ब्राह्मण आहोत, ब्रह्मा
द्वारा, आजोबांकडून वारसा घेतो; म्हणून शिवबाबा म्हणतात - जितकी शक्य असेल तितकी
आठवण करत रहा. भले चित्रांची देखील आठवण ठेवा. आठवण तर राहील की, आपण ब्राह्मण आहोत,
बाबांकडून वारसा घेत आहोत. ब्राह्मण कधी आपल्या जातीला विसरतात का? तुम्ही
शूद्रांच्या संगतीमध्ये आल्यामुळे ब्राह्मण असल्याचे विसरून जाता. ब्राह्मण तर
देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत कारण तुम्ही नॉलेजफुल आहात. भगवंताला जानी-जाननहार (अंतर्यामी)
म्हणतात ना. याचा अर्थ असा नाही की सर्वांच्या मनात काय आहे हे बघत बसतात. नाही,
त्यांना सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज आहे. ते बीजरूप आहेत. बीज झाडाच्या
आदि-मध्य-अंताला जाणते. तर अशा बाबांची खूप-खूप आठवण करायची आहे. यांची आत्मा (ब्रह्मा
बाबांची आत्मा) देखील त्या बाबांची आठवण करते. ते बाबा म्हणतात - हे (ब्रह्मा)
देखील आठवण करतील तर हे पद प्राप्त करतील. तुम्ही देखील आठवण केली तर पद प्राप्त
कराल. सर्वात पहिले तुम्ही विना-शरीर (अशरीरी) आला होतात. आता पुन्हा अशरीरी बनून
परत जायचे आहे. इतर सर्व देहाचे नातेवाईक तुम्हाला दुःख देणारे आहेत, त्यांची आठवण
का करता, जेव्हा मी तुम्हाला प्राप्त झालो आहे! मी तुम्हाला नवीन दुनियेमध्ये घेऊन
जाण्यासाठी आलो आहे. तिथे कोणतेही दुःख नाहीये. ते आहे दैवी नाते. इथे पहिले दुःख
होते - पती आणि पत्नीच्या नात्यामध्ये, कारण विकारी बनतात. तुम्हाला मी आता त्या
दुनियेच्या लायक बनवत आहे, इथे विकाराची गोष्टच नसते. हा काम-विकार महाशत्रू गायला
गेला आहे, जो आदि-मध्य-अंत दुःख देतो. क्रोधासाठी असे म्हणणार नाही की, हा
आदि-मध्य-अंत दुःख देतो. नाही, काम-विकाराला जिंकायचे आहे, तोच आदि-मध्य-अंत दुःख
देतो. पतित बनवतो. ‘पतित’ हा शब्द काम विकारासाठी वापरला आहे. या शत्रूवर विजय
प्राप्त करायचा आहे. तुम्ही जाणता - आपण सतयुगाचे देवी-देवता बनत आहोत. जोपर्यंत हा
निश्चय नसेल तोपर्यंत काहीच प्राप्त करू शकणार नाही.
बाबा समजावून सांगत
आहेत - मुलांनी मनसा-वाचा-कर्मणा ॲक्युरेट बनायचे आहे. मेहनत आहे. दुनियेमध्ये हे
कोणालाही ठाऊक नाही की, तुम्ही भारताला स्वर्ग बनवत आहात. पुढे जाऊन समजतील, इच्छा
देखील आहे की एक जग, एक राज्य, एक धर्म, एक भाषा असावी. तुम्ही हे समजावून सांगू
शकता की, आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी एक राज्य, एक धर्म होता, ज्याला स्वर्ग म्हटले
जाते. राम-राज्य, रावण-राज्य यांना देखील कोणीही जाणत नाहीत. तुम्ही देखील जाणत
नव्हते. आता तुम्ही नंबरवार पुरुषार्थ अनुसार स्वच्छ-बुद्धी बनला आहात. बाबा बसून
तुम्हाला समजावून सांगत आहेत; तर जरूर बाबांच्या मतानुसार चाला. बाबा म्हणतात -
जुन्या दुनियेमध्ये राहत असताना कमलपुष्प समान पवित्र रहा. माझी आठवण देखील करत रहा.
बाबा, आत्म्यांना समजावून सांगतात. आत्म्यांनाच या कर्मेंद्रियांद्वारे
शिकविण्याकरिता आलो आहे. ही तर जुनी घाणेरडी दुनिया आहे, घाणेरडे शरीर आहे. तुम्ही
ब्राह्मण, पूजन योग्य नाही आहात, गायन योग्य आहात. पूजन योग्य देवता आहेत. तुम्ही
श्रीमतावर विश्वाला स्वर्ग बनवता म्हणून तुमचे गायन आहे परंतु पूजा होऊ शकत नाही.
गायन जरूर तुम्हा ब्राह्मणांचे आहे, देवतांचे नाही. बाबा तुम्हालाच शूद्रापासून
ब्राह्मण बनवतात. देवतांची आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र आहेत. आता तुमची आत्मा
पवित्र होत आहे. शरीर पवित्र नाहीये. आता तुम्ही ईश्वराच्या मतावर भारताला स्वर्ग
बनवत आहात. तुम्ही देखील स्वर्गाच्या लायक बनत आहात. सतोप्रधान जरूर बनायचे आहे.
केवळ तुम्ही ब्राह्मणच आहात ज्यांना बाबा बसून शिकवतात. ब्राह्मणांच्या झाडाची
वृद्धी होत राहील. जे ब्राह्मण पक्के बनतील तेच जाऊन देवता बनतील. हे नवीन झाड आहे,
मायेची वादळे देखील येतात. सतयुगामध्ये काही वादळ असत नाही. इथे माया बाबांच्या
आठवणीमध्ये राहू देत नाही. आपण जाणतो - बाबांच्या आठवणीद्वारेच तमोप्रधानापासून
सतोप्रधान बनलो आहोत. सर्व भिस्त आठवणीवर आहे. भारताचा प्राचीन योग देखील प्रसिद्ध
आहे ना. परदेशी लोकांची इच्छा असते की, कोणीतरी येऊन प्राचीन योग शिकवावा.
आता योगी दोन प्रकारचे
आहेत - एक आहेत - हठयोगी, दुसरे आहेत राजयोगी. तुम्ही राजयोगी आहात. ते (हठयोगी) तर
खूप काळापासून चालत येतात. राजयोगा विषयी तुम्हाला आत्ता माहीत झाले आहे. संन्याशी
राजयोगा विषयी काय जाणतील. बाबांनी येऊन सांगितले आहे - राजयोग मीच येऊन शिकवतो,
श्रीकृष्ण काही शिकवू शकत नाही. हा भारताचाच प्राचीन योग आहे, फक्त गीतेमध्ये माझ्या
ऐवजी श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे. किती फरक पडला आहे. शिवजयंती असते तेव्हा तुमच्या
वैकुंठाची देखील जयंती होते, ज्यामध्ये श्रीकृष्णाचे राज्य आहे. तुम्ही जाणता
शिवबाबांची जयंती आहे तर गीतेची देखील जयंती आहे, वैकुंठाची देखील जयंती होत आहे.
तुम्ही पवित्र बनाल, कल्पापूर्वी प्रमाणे स्थापना होत आहे; तर शिवबाबाची जयंती
अर्थात स्वर्गाची जयंती, बाबाच येऊन स्वर्गाची स्थापना करतात. आता बाबा म्हणतात -
माझी आठवण करा. आठवण न केल्यामुळे माया काही ना काही विकर्म करायला लावते. आठवण केली
नाही आणि थप्पड बसली. आठवणीमध्ये राहिल्याने थप्पड खाणार नाही. हे बॉक्सिंग चालू
असते. तुम्ही जाणता - आपला शत्रू कोणी मनुष्य नाही, रावण शत्रू आहे. लग्न
केल्यानंतर कुमार-कुमारी देखील पतित बनल्यामुळे एकमेकांचे शत्रू बनतात. लग्नात लाखो
रुपये खर्च करतात. बाबा म्हणतात - लग्न म्हणजे बरबादी आहे. आता पारलौकिक बाबांनी
वटहुकूम काढला आहे की, मुलांनो हा काम-विकार महाशत्रू आहे, याच्यावर विजय मिळवा आणि
पवित्रतेची प्रतिज्ञा करा. कोणीही पतित बनू नका. जन्म-जन्मांतर तुम्ही या विकारामुळे
पतित बनला आहात, म्हणून काम महाशत्रू म्हटले जाते. बाबा तर खूप चांगल्या प्रकारे
समजावून सांगतात. तुम्ही ८४ जन्म कसे घेतले आहेत. आता परत जायचे आहे. तुम्हाला तर
खूपच शुद्ध अहंकार असला पाहिजे. आम्ही आत्मे बाबांच्या श्रीमतावर चालून भारताला
स्वर्ग बनवत आहोत. आम्हीच मग स्वर्गामध्ये राज्य करू. जितकी मेहनत कराल तितके पद
प्राप्त कराल. भले मग राजा-राणी बना, नाहीतर प्रजा बना. राजा-राणी कसे बनतात ते
देखील बघत आहात. फॉलो फादर गायले जाते. ती आत्ताची गोष्ट आहे. लौकिक नात्यासाठी असे
म्हटले जात नाही. हे बाबा मत देतात मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर विकर्म विनाश
होतील. तुम्ही समजता - आपण चांगल्या मतावर चालत आहोत, अनेकांची सेवा करत आहोत. मुले
बाबांकडे येतात तेव्हा शिवबाबा देखील रिफ्रेश करतात, तर हे (ब्रह्मा बाबा) देखील
रिफ्रेश करतात. हे देखील तर शिकत आहेत ना. शिवबाबा म्हणतात - मी सकाळी येतो. अच्छा,
मग कोणी भेटण्यासाठी आले तर हे ब्रह्मा समजावून सांगणार नाहीत काय? असे म्हणतील का
की, ‘बाबा, तुम्ही येऊन समजावून सांगा, मी काही समजावून सांगणार नाही’. या खूप
गुप्त गूढ गोष्टी आहेत ना. मी तर सर्वात चांगले समजावून सांगू शकतो. तुम्ही असे का
समजता की, शिवबाबाच समजावून सांगतात, हे (ब्रह्मा बाबा) समजावून सांगत नसतील काय!
हे देखील जाणता की, कल्पापूर्वी यांनी समजावून सांगितले आहे तेव्हाच तर हे पद
प्राप्त केले आहे. मम्मा देखील समजावून सांगत होती ना. ती देखील उच्च पद मिळवते.
तिथे बाबांना सूक्ष्म वतनमध्ये बघता तर मुलांनी फॉलो करायचे आहे. गरीबच समर्पित
होतात. श्रीमंत काही समर्पित होऊ शकत नाहीत. गरीबच म्हणतात - बाबा, हे सर्व काही
तुमचे आहे. शिवबाबा तर दाता आहेत, ते कधी घेत नाहीत. मुलांना म्हणतात हे सर्व काही
तुमचे आहे. माझ्यासाठी इथे किंवा तिथे महाल बनवत नाही. तुम्हालाच स्वर्गाचा मालक
बनवतो. आता या ज्ञान-रत्नांनी झोळी भरायची आहे. मंदिरामध्ये जाऊन म्हणतात - ‘झोळी
भरून द्या’. परंतु कोणत्या प्रकारची, कोणत्या गोष्टीने झोळी भरून द्या? आता झोळी
भरणारी तर लक्ष्मी आहे, जी धन देते. ‘शिव’कडे काही जात नाहीत. श्रीकृष्णासाठी
म्हणतात की, गीता ऐकवली. परंतु श्रीकृष्णाला म्हणत नाहीत की, झोळी भरून द्या,
शंकराकडे जाऊन म्हणतात. समजतात शिव आणि शंकर एक आहेत. शंकर तर झोळी रिकामी करणारा
आहे, आमची झोळी तर कोणी रिकामी करू शकत नाही. विनाश तर होणारच आहे. गायले देखील आहे
रुद्र ज्ञान यज्ञातून विनाश ज्वाळा निघाली. परंतु असे कोणी समजतात थोडेच?
तुम्हा मुलांना
गृहस्थ व्यवहारामध्ये देखील राहायचे आहे. धंदा देखील करायचा आहे. बाबा प्रत्येकाची
नाडी बघून सल्ला देतात; कारण बाबा समजतात - मी सांगितले आणि करू शकले नाहीत असा
सल्लाच कशाला देऊ? नाडी बघूनच सल्ला देतात. यांच्याकडे (ब्रह्मा बाबांकडे) तर यावे
लागेल. ते व्यवस्थित सल्ला देतील. सर्वांनी विचारले पाहिजे - ‘बाबा, या
परिस्थितीमध्ये मला काय केले पाहिजे! आता काय करू?’ बाबा स्वर्गामध्ये तर घेऊन
जातात. तुम्ही जाणता आम्ही स्वर्गवासी तर बनणार आहोत, आता आम्ही नरकवासी आहोत. आता
तुम्ही ना नरकामध्ये आहात ना स्वर्गामध्ये आहात. जे-जे ब्राह्मण बनतात त्यांचा
नांगर या घाणेरड्या दुनियेमधून उचलला गेला आहे. तुम्ही कलियुगी दुनियेचा किनारा आता
सोडला आहे. काही ब्राह्मण वेगाने जात आहेत, काही आठवणीच्या यात्रेमध्ये कमजोर आहेत.
कोणी हात सोडून देतात तर गुदमरून बुडून मरतात अर्थात पुन्हा कलियुगामध्ये निघून
जातात. तुम्ही जाणता आता आम्हाला खिवैया (नावाडी) घेऊन जात आहेत. त्या यात्रा तर
अनेक प्रकारच्या आहेत. तुमची यात्रा एकच आहे, ही एकदमच वेगळी यात्रा आहे. हां, वादळे
येतात जी आठवणीला तोडून टाकतात. या आठवणीच्या यात्रेला चांगल्या प्रकारे पक्के करा,
मेहनत घ्या. तुम्ही कर्मयोगी आहात. जितके होईल तितके - ‘हथ कार डे, दिल यार डे’.
अर्ध्याकल्पा पासून तुम्ही आशिक बनून माशूकची आठवण करत आला आहात. बाबा, आम्हाला इथे
खूप दुःख आहे, आता आम्हाला सुखधामचा मालक बनवा. आठवणीच्या यात्रेमध्ये राहिलात तर
तुमची पापे नष्ट होतील. तुम्हीच स्वर्गाचा वारसा मिळवला होता, आता गमावला आहे. भारत
स्वर्ग होता म्हणून तर म्हणतात - प्राचीन भारत. भारताला खूप मान देतात, सर्वात मोठा
देखील आहे, सर्वात जुना देखील आहे. हे तर तुम्ही जाणता - विनाश समोर उभा आहे. जे
चांगल्या प्रकारे समजतात त्यांना आतून खूप आनंद वाटत असतो. प्रदर्शनीमध्ये किती
येतात! अहमदाबाद मध्ये बघा किती साधू-संत इत्यादी सर्व प्रकारचे आले. म्हणतात -
तुम्ही तर सत्य सांगत आहात. परंतु, आपल्याला बाबांकडून वारसा घ्यायचा आहे, हे थोडेच
बुद्धीमध्ये येते? इथून बाहेर गेले आणि खलास. आता तुम्ही जाणता की, बाबा आम्हाला
स्वर्गामध्ये घेऊन जात आहेत. तिथे ना गर्भ-जेल ना दुसरी जेल असेल. पुन्हा कधी जेलचे
तोंड बघायला मिळणार नाही. दोन्ही जेल अस्तित्वात नसतील. इथे हा सर्व आहे मायेचा भपका.
आज-काल प्रत्येक गोष्ट पटापट होते. मृत्यू देखील पटापट होत असतात. सतयुगामध्ये
कोणतेही उपद्रव असतच नाहीत. इथे मृत्यू देखील लवकर, तर दुःख देखील जास्त असणारच.
सर्व नष्ट होतील. पूर्ण धरणी नवीन होईल. सतयुगामध्ये देवी-देवतांची राजधानी होती,
ती जरूर पुन्हा अस्तित्वात येईल. पुढे जाऊन बघा काय-काय होते! अत्यंत भयावह दृष्य
आहे. तुम्हा मुलांनी साक्षात्कार केला आहे. मुलांसाठी मुख्य आहे आठवणीची यात्रा. ही
आहे चढत्या कलेची यात्रा. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) नेहमी याच
स्मृतीमध्ये रहायचे आहे की, आम्ही ब्राह्मण आहोत. आम्हा ब्राह्मणांनाच भगवान
शिकवतात. आम्ही आता ब्राह्मण सो देवता बनत आहोत.
२) ज्ञान-रत्नांनी
आपली झोळी भरून दान करायचे आहे. या कलियुगी पतित दुनियेचा किनारा (आधार) सोडून
द्यायचा आहे. मायेच्या वादळांना घाबरायचे नाही.
वरदान:-
जन्मसिद्ध
अधिकाराच्या नशेद्वारे लक्ष्य आणि लक्षण एकसमान बनविणारे श्रेष्ठ भाग्यवान भव
जसे लौकिक जन्मामध्ये
स्थूल संपत्ती जन्मसिद्ध अधिकार असतो, तसा ब्राह्मण जन्मामध्ये दिव्यगुण रूपी
संपत्ती, ईश्वरीय सुख आणि शक्ती हा जन्मसिद्ध अधिकार आहे. जन्मसिद्ध अधिकाराचा नशा
नॅचरल रूपामध्ये असावा म्हणजे मग मेहनत करण्याची गरज पडणार नाही. या नशेमध्ये
राहिल्याने लक्ष्य आणि लक्षण एकसमान होतील. मी जो आहे, जसा आहे, ज्या श्रेष्ठ
पित्याचा आणि परिवाराचा आहे तसा स्वतःला ओळखून आणि स्वीकारून श्रेष्ठ भाग्यवान बना.
बोधवाक्य:-
प्रत्येक कर्म
स्व स्थितीमध्ये स्थित होऊन करा म्हणजे मग सहजच सफलतेचे तारे बनाल.
अव्यक्त इशारे -
ब्रह्माबाबांसारखा संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.
एका सेकंदामध्ये
आवाजामध्ये या आणि एका सेकंदामध्ये आवाजाच्या पलीकडे जा; आत्ता-आत्ता आवाजामध्ये,
आत्ता-आत्ता आवाजाच्या पलीकडे... जेव्हा हा अभ्यास सरळ आणि सोपा होईल तेव्हा समजा
संपूर्णता समीप आहे. आता तुमच्या प्रत्येक कर्मेंद्रियाने - ‘जी हजूर’, ‘जी हाजिर’
करत चालावे. अशी ही कर्मेंद्रिये जेव्हा तुम्हा राज्य अधिकारींचे स्वागत करतील
अर्थात सलाम करतील तेव्हा संपन्न आणि संपूर्ण कर्मातीत बनू शकाल.