19-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - ‘आत्म-अभिमानी भव’, चालता-फिरता, उठता-बसता हाच अभ्यास करत राहाल तर तुमची खूप उन्नती होत राहील”

प्रश्न:-
बाबांची ॲक्युरेट आठवण कोणत्या मुलांच्या बुद्धीमध्ये राहील?

उत्तर:-
ज्या मुलांनी बाबांना ॲक्युरेट जाणले आहे. बरीच मुले म्हणतात की, बिंदूची कशी बरे आठवण करावी. भक्तीमध्ये तर अखंड ज्योती समजूनच आठवण करत आले आहेत, आणि आता बिंदू म्हटल्याने गोंधळून जातात म्हणून सर्वात पहिला हाच निश्चय व्हावा की, बाबा अखंड ज्योती नाहीत, ते तर अति सूक्ष्म बिंदू आहेत; तेव्हाच आठवण ॲक्युरेट राहू शकते.

ओम शांती।
सर्व मुले आठवणीमध्ये बसली आहेत. मनमनाभव. वास्तविक हा संस्कृत शब्द नाहीये. जेव्हा की बाबांनी सहज राजयोग शिकवला आहे तर मग हा संस्कृत शब्द बोलणारच नाहीत. हे तर संस्कृत जाणत देखील नाहीत. बाबा तर हिंदीतूनच समजावून सांगतात. भले हा रथ (ब्रह्मा बाबा) हिंदी, सिंधी तथा इंग्लिश जाणणारा आहे परंतु बाबा हिंदीतूनच समजावून सांगतात. जे ज्या धर्माचे आहेत त्यांची आपली भाषा आहे. इथे हिंदी भाषाच चालते, ही भाषा समजणे सोपे आहे आणि स्कूल देखील वंडरफुल आहे. या ठिकाणी कोणताही कागद, पेन्सिल, पाने इत्यादीची गरज राहत नाही. इथे तर तुम्हाला फक्त एक शब्द लक्षात ठेवायचा आहे अर्थात बाबांची आठवण करायची आहे. गॉडचे अथवा ईश्वराचे अथवा परमपिता परमात्म्याचे कोणी स्मरण करत नसेल - हे तर कठीण आहे, आठवण तर सर्व जण करतात परंतु त्यांचा परिचय नाहीये. बाबाच येऊन आपला परिचय देतात. शास्त्रांमध्ये कल्पाचा कालावधी जो इतका जास्त लिहिलेला आहे, ते बाबाच येऊन समजावून सांगतात. खूप मोठी गोष्ट सुद्धा नाही आहे. अहिल्या, वृद्ध मातांना कसे काय समजणार. हे तर खूपच सोपे आहे. कोणी लहान मुले देखील समजू शकतात. ‘बाबा’ शब्द काही नवीन नाही. शिवाच्या मंदिरामध्ये जातात तर बुद्धीमध्ये येते की, हे शिवबाबा आहेत, आणि ते निराकार आहेत. सर्व मनुष्यमात्र त्यांना ‘बाबा’ म्हणतात. आम्हा सर्व आत्म्यांचे पिता एकच आहेत. सर्व जीव-आत्मे जे शरीरामध्ये निवास करतात, ते सर्व बाबांची आठवण करतात. सर्व धर्माचे जे पण आहेत, ते सर्व परमपिता परमात्म्याची आठवण जरूर करतात. ते आहेत परमधाम मध्ये राहणारे पिता. आपण देखील तिथलेच रहिवासी आहोत. तर आता फक्त बाबांची आठवण करायची आहे. सर्वांना वाटते देखील की, आपण पावन बनावे. बोलावतात देखील - ‘हे पतितांना पावन करणारे, या’. नवीन दुनिया पावन होती, आता मग जुनी झाली आहे, याला काही नवीन म्हणणार नाही. भारतवासीच जाणतात - नवीन भारतामध्ये देवी-देवता राज्य करत होते. जेव्हा नवीन भारत होता तर मग त्याच्या अगोदर काय होते? संगम. यापेक्षाही सोपे करून सांगितले पाहिजे. नवीन दुनियेच्या अगोदर जुनी दुनिया होती. संगमयुगा विषयी लोकांना इतके लगेच लक्षात येणार नाही. नवीन दुनिया आणि जुनी दुनिया, या दोघांच्या मधल्या काळाला मग संगम म्हटले आहे. बाबांसाठी म्हणतात - ‘हे पतित-पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा. आम्ही पतित बनलो आहोत’. नवीन दुनियेमध्ये कोणीही असे बोलावणार नाही. आता तुमच्या लक्षात आले आहे की हा भारत पावन होता. ‘हे पतित-पावन या’, असे तर बऱ्याच काळापासून बोलावत आले आहेत. त्यांना हे ठाऊक नाही की, पतित दुनिया केव्हा समाप्त होईल. म्हणतात - शास्त्रांमध्ये असे लिहिलेले आहे की, कलियुग (पतित दुनिया) अजून ४० हजार वर्षे चालणार आहे. बिल्कुलच घोर अंधारामध्ये आहेत. आता तुम्ही प्रकाशामध्ये आहात. बाबांनी तुम्हाला आता प्रकाशामध्ये आणले आहे. हे सृष्टीचे चक्र ५ हजार वर्षांमध्ये पूर्ण होते. कालचीच गोष्ट आहे. तुम्ही राज्य करत होता, खरोखर या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, स्वर्ग होता. पावन दुनियेमध्ये कसल्याही प्रकारचा उपद्रव इत्यादी होऊ शकत नाही. उपद्रव होतोच मुळी रावण राज्यामध्ये. इथे तुम्हाला बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही सन्मुख कानाने ऐकता. कोण ऐकते? आत्मा. आत्म्याला खूप आनंद होतो की, आम्हाला बाबा पुन्हा येऊन भेटले आहेत. बाबांकडून वारसा घेतला होता; आता बाबा म्हणत आहेत - ‘माझी आठवण करा’. यामध्ये लिहिण्या-वाचण्याची काहीच गरज नाही. जेव्हा कोणी येतात तर त्यांना विचारले जाते की, ‘तुम्ही कसे येणे केलेत?’ तर म्हणतात - इथल्या महात्माजींना भेटण्यासाठी आलो आहोत? कशासाठी? तुम्हाला काय पाहिजे. सांगा कोणती भिक्षा पाहिजे? संन्यासी असेल तर भाकरी-तुकडा पाहिजे. संन्याशी कोणाकडे जातात किंवा वाटेत भेटतात तर धार्मिक लोकांना वाटते की, हा पवित्र मनुष्य आहे, याला भोजन खाऊ घालणे चांगले आहे. आता तर पवित्रता सुद्धा राहिलेली नाही. एकदमच तमोप्रधान दुनिया आहे, इथे खूप घाण आहे. मनुष्य किती हैराण होतात. इथे तर हैराण होण्याचा काही प्रश्नच नाही. बाबा म्हणतात - काही लिहिण्या-करण्याची गरजच नाही. हे पॉईंट्स इत्यादी लिहितात - धारण करण्याकरिता. जसे डॉक्टर लोकांकडे देखील किती औषधे असतात, इतकी सर्व औषधे लक्षात राहतात. बॅरिस्टरच्या बुद्धीमध्ये किती कायद्याच्या गोष्टी लक्षात राहतात. तुम्हाला लक्षात काय ठेवायचे आहे, एकच गोष्ट, ती देखील खूप सोपी आहे. तुम्ही म्हणता - एका शिवबाबांची आठवण करा. ते म्हणतात शिवबाबा कसे येतील. हे देखील तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाच माहीत नाही. ईश्वर कुठे आहेत? ते तर म्हणतील - ईश्वर नावा-रुपापासून न्यारे आहेत, नाहीतर मग म्हणतील - सर्वव्यापी आहेत. दोन्ही शब्दांमध्ये दिवस-रात्री इतका फरक होतो. नावा-रूपा पासून न्यारी तर कोणतीच वस्तू नाही. तरी देखील म्हणतात - कुत्रा-मांजर सर्वांमध्ये परमात्मा आहे. दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध झाल्या. तर बाबा आपला परिचय देऊन म्हणतात - माझी आठवण करा. गायले देखील जाते - सहज राजयोग. बाबा म्हणतात - ‘योग’ शब्द काढून टाका, आठवण करा. ज्याप्रमाणे लहान मूल आई-बाबांना बघताच गळ्याला मिठी मारते. ते अगोदर असा विचार करेल का की नक्की माझेच आई-बाबा आहेत ना? नाही, यामध्ये विचार करण्याची गरजच नाही. तुम्हाला देखील फक्त शिवबाबांची आठवण करायची आहे. भक्तीमार्गामध्ये देखील तुम्ही शिवबाबांवर फूल वाहत आले आहात. सोमनाथाचे मंदिर किती भारदस्त बनवले आहे, जे नंतर मोहम्मद गजनवीने येऊन लुटले होते. सोमनाथाचे मंदिर भारतामध्ये प्रसिद्ध आहे. सर्वात अगोदर तर शिवाची पूजा केली गेली पाहिजे. हे सर्व नॉलेज आता मुलांच्या बुद्धीमध्ये आले आहे. भले पूजा इत्यादी करत आला आहात परंतु तुम्हाला हे माहीतच नव्हते की हे जड चित्र आहे. जरूर चैतन्यमध्ये आले असतील तेव्हाच तर वर्षानुवर्षे शिवजयंती देखील साजरी करतात. हे देखील सांगतात की, शिव परमात्मा निराकार आहेत. आत्मा जाणते आपण देखील निराकार आहोत. आता तुम्ही आत्म-अभिमानी बनता, खूप सोपे आहे. ते तर आपले बाबा आहेत. ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर, पतित-पावन आहेत. त्यांची खूप महिमा आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकराची इतकी महिमा नाही. एकाचीच महिमा गात असतात.

आता तुम्ही मुले जाणता - बाबा येऊन आपल्याला वारसा देत आहेत. जसे लौकिक पिता मुलांचे पालन-पोषण करतात, परंतु स्वतः शिकवत नाहीत. शिक्षणासाठी स्कूलमध्ये जातात आणि मग वानप्रस्थमध्ये गुरु केला जातो. आजकाल तर लहान-मोठे सर्व गुरु करतात. इथे तर तुम्हा मुलांना सांगितले जाते - शिवबाबांची आठवण करा, सर्वांचा हक्क आहे. तुम्ही सर्व माझी संतान आहात. तुमच्यामध्ये देखील कोणी आहेत जे चांगल्या रीतीने आठवण करतात. काही जण तर म्हणतात - ‘बाबा, कोणाची आठवण करावी? बिंदूची कशी आठवण करायची? मोठ्या वस्तूची आठवण करता येते. ठीक आहे, परमात्मा, ज्यांची तुम्ही आठवण करता, ती काय चीज आहे? तर म्हणतात - अखंड ज्योती स्वरूप आहे, परंतु असे नाही आहे. अखंड ज्योतीची आठवण करणे चुकीचे ठरते.

आठवण तर ॲक्युरेट पाहिजे. पहिले तर ॲक्युरेट जाणून घेतले पाहिजे. बाबाच येऊन आपला परिचय देतात, आणि मग मुलांना सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचा समाचार देखील ऐकवतात. डिटेल मध्ये देखील तसेच शॉर्टमध्ये देखील. आता बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्हाला पावन बनायचे असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे - माझी आठवण करा; मला म्हणताच मुळी पतित-पावन या. आत्म्याला पावन बनायचे आहे. आत्माच म्हणते - आम्ही पतित बनलो आहोत. आम्ही पावन होतो, आता पतित आहोत. सर्व तमोप्रधान आहेत. प्रत्येक वस्तू पहिली सतोप्रधान असते नंतर मग तमोप्रधान होते. आत्मा स्वतः म्हणते - ‘मी पतित बनले आहे, मला पावन बनवा’. शांतीधाममध्ये पतित नसतात. इथे पतित आहेत त्यामुळे दुःखी आहेत. जेव्हा पावन होते तेव्हा सुखी होते. तर आत्माच म्हणते - ‘आम्हाला पावन बनवा, म्हणजे मग आमची दुःखा पासून सुटका होईल’. आता तुम्ही समजता आत्माच सर्व काही करते. आत्मा जज, बॅरिस्टर इत्यादी बनते. आत्माच म्हणते - मी राजा आहे, मी अमका आहे. आता हे शरीर सोडून दुसरे घ्यायचे आहे. याला म्हटले जाते आत्म-अभिमानी. देह असताना देखील आत्म-अभिमानी. रावणाच्या राज्यामध्ये देह-अभिमानी असतात. आत्म-अभिमानी आता यावेळीच बाबा बनवत आहेत. यावेळी आत्मा पतित दुःखी आहे त्यामुळे बोलावत आहे - ‘ओ बाबा, या’. हे देखील तुम्ही जाणता - ड्रामा प्लॅन अनुसार पतितापासून पावन, पावन पासून पतित बनत आले आहेत. चक्र फिरतच राहते. आता तुमच्या बुद्धीमध्ये पक्के झाले आहे की, आपले ८४ जन्म कसे झाले आहेत. या गोष्टीला आता विसरू नका. स्वदर्शन चक्रधारी बनून रहा, उठता-बसता, चालता-फिरता बुद्धीमध्ये आपल्याला सारे नॉलेज आहे. तुम्ही समजता बेहदच्या बाबांकडून आपण बेहदचा वारसा घेत आहोत. बाबा मुलांना समजावून सांगतात की, तुम्हाला एका बाबांचीच आठवण करायची आहे. बाबांची आठवण करायची आहे आणि भाकरी-तुकडा खायचा आहे, बस्स.

गोड-गोड सिकिलध्या मुलांना बाबा वारंवार सांगतात - मुलांनो, पोटाला फक्त भाकरी-तुकडा खायचा आहे. पोट काही जास्त खात नाही. एक-पाव पीठाने बनवलेले खाते. चटणी-भाकरी, बस्स; १० रुपयांमध्ये देखील माणूस पोट भरू शकतो, तर १० हजारांमध्ये देखील पोट भरू शकते. गरीब लोक काय खातात. तरी देखील धष्ट-पुष्ट निरोगी असतात. वेगवेगळे पदार्थ खाणारे लोक तर जास्तच आजारी पडतात. डॉक्टर लोक देखील सांगतात - एकाच प्रकारचे भोजन खा, म्हणजे मग आजारी पडणार नाही. तर बाबा देखील समजावून सांगतात - भाकरी-तुकडा खा. जे मिळेल त्यामध्ये आनंदी रहा. चटणी-भाकरी सारखा दुसरा कोणता पदार्थ नसेल. जास्त लोभ देखील ठेवता कामा नये. संन्याशी लोक काय करतात? घरदार सोडून जंगलामध्ये निघून जातात. ब्रह्म तत्त्वला परमात्मा समजून आठवण करतात, समजतात ब्रह्म मध्ये लीन होणार. परंतु असे तर होत नाही. आत्मा अमर आहे. लीन होण्याची गोष्टच नाही. बाकी आत्मा पवित्र आणि अपवित्र बनते. तुम्हाला किती चांगले ज्ञान मिळाले आहे. तुम्हीच प्रारब्ध उपभोगता आणि नंतर मग हे ज्ञानच विसरून जाते. मग शिडी उतरावी लागते. आता तुमच्या बुद्धीमध्ये हे सारे ज्ञान पक्के झालेले आहे. आपण ८४ जन्म कसे भोगतो. हा पार्ट कधीही कोणाचा बंद होत नाही. हा पूर्व-नियोजित ड्रामा आहे जो फिरतच राहतो. असे म्हणू शकत नाही की, भगवंताने हा ड्रामा कधी, कसा आणि कुठे बसून बनवला? नाही. हा तर चालतच आला आहे. दुनियेचा इतिहास-भूगोल रिपीट होतच राहतो. या गोष्टींना कोणी समजतच नाहीत. तुम्ही जाणता - आपण ड्रामा प्लॅन अनुसार आलो आहोत. आता पुन्हा ड्रामा अनुसार राज्य घेत आहोत. या गोष्टी इतर कोणीही समजू शकत नाही. विचारले जाते - ‘ड्रामा सर्वशक्तिमान आहे की ईश्वर?’ तर म्हणतात - ‘ईश्वर सर्वशक्तिमान आहे’. समजतात की ते सर्व काही करू शकतात. बाबा म्हणतात मी देखील ड्रामाच्या बंधनामध्ये बांधलेला आहे. पतितांना पावन बनविण्याकरिता मला यावेच लागते. तुम्ही सतयुगामध्ये सुखी बनता. मी देखील परमधाम मध्ये जाऊन विश्राम करतो. तुम्ही बाबांच्या खांद्यावर चढून बसता. तुम्ही सिंहावर स्वार झाले आहात.

तुम्ही जाणता - सेकंद बाय सेकंद जे काही घडते ते ड्रामाची भावी आहे. तुम्हा मुलांना किती चांगले नॉलेज आहे. आता फक्त बाबांची आणि वारशाची आठवण करा. बस्स. कागद, पेन्सिल इत्यादीची काहीच गरज नाही. ब्रह्मा बाबा देखील शिकतात, हे तर काहीच ठेवत नाहीत. फक्त बाबांची आठवण करायची आहे तर वारसा मिळेल. किती सोपे आहे. आठवण केल्याने तुम्ही एव्हर हेल्दी बनाल. ही आहे धारणेची गोष्ट. लिहून काय फायदा, हे तर सर्व नष्ट होईल. परंतु काही जण लक्षात ठेवण्यासाठी लिहितात. जसे कोणती गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर गाठ बांधतात. तुम्ही देखील गाठ बांधा की, शिवबाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे. हे तर खूप सोपे आहे - योग अर्थात आठवण. म्हणतात - बाबा आठवण टिकत नाही. योगामध्ये कसे बसावे? अरे, लौकिक पित्याची आठवण उठता-बसता, चालता-फिरता राहते, तुम्ही देखील फक्त आठवण करा. बस्स. बेडा पार होईल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) स्वदर्शन चक्रधारी बनून ८४ जन्मांचे चक्र बुद्धीमध्ये फिरवत राहायचे आहे. बेहद बाबांची आठवण करून बेहदचा वारसा घ्यायचा आहे, पावन बनायचे आहे.

२) कोणत्याही वस्तूचा लोभ ठेवायचा नाही, जे मिळेल त्यात आनंदी राहायचे आहे. भाकरी-तुकडा खायचा आहे, बाबांच्या आठवणी मध्ये राहायचे आहे.

वरदान:-
सर्वांच्या मनातील रहस्याला (भावाला) जाणून सर्वांना राजी करणारे (संतुष्ट करणारे) सदा विजयी भव

विजयी बनण्याकरिता प्रत्येकाच्या मनातील रहस्याला (भावाला) जाणून घ्यायचे आहे. कोणाच्या मुखाद्वारे निघणाऱ्या आवाजा पेक्षा त्याच्या मनातील भावाला ओळखा तर विजयी बनू शकाल; परंतु मनातील भावाला ओळखण्याकरिता अंतर्मुखता पाहिजे. जितके अंतर्मुखी रहाल तितके प्रत्येकाच्या मनातील रहस्याला (भावाला) जाणून त्याला राजी (संतुष्ट) करू शकाल. राजी करणारेच विजयी बनतात.

बोधवाक्य:-
वैराग्य ही एक अशी योग्य धरणी आहे ज्यामध्ये जे पण फळ (बीज) टाकाल ते फलीभूत अवश्य होईल.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

नेहमी उमंग-उत्साहामध्ये राहण्याकरिता जे कोणी संपर्कामध्ये येतात - भले स्टुडंट असोत, अथवा साथी-सोबती असोत सर्वांना संतुष्ट करण्याची इच्छा असली पाहिजे. ज्याला पण पाहाल त्याच्याकडून प्रत्येक वेळी गुण उचलत रहा. सर्वांच्या गुणांचे बळ मिळाल्याने नेहमी करिता तुमचा उत्साह एकरस राहील. गुणग्राही बना. अवगुणांना दिसत असतानाही पाहू नका.