19-11-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो,
आतून-बाहेरून स्वच्छ बना, आता तुमच्यामध्ये कोणतीही वाईट सवय असता कामा नये”
प्रश्न:-
ब्राह्मण
मुलांना बाबांकडून संपूर्ण वारसा घेण्यासाठी कोणकोणत्या धारणांवर लक्ष ठेवायचे आहे?
उत्तर:-
१- या
जन्मामध्ये बाबांचे बनून असे कोणतेही पाप कर्म होऊ नये ज्याची शंभर पट शिक्षा भोगावी
लागेल. २- बाबा जे अति गोड आहेत ते तुम्हाला आपसमान गोड बनवतात, त्यामुळे मुखातून
कोणताही कटू शब्द निघू नये ज्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल. ३- दुःख हर्ता, सुख
कर्त्याची मुले बनून सर्वांची दुःख दूर करायची आहेत. मनसा-वाचा-कर्मणा सुख द्यायचे
आहे. ४- निंदा-स्तुती दोन्ही परिस्थितीमध्ये समतोल राहायचे आहे.
ओम शांती।
सतगुरुवारला
वृक्षपती डे देखील म्हटले जाते. वृक्षपती डे अर्थात बाबांचा दिवस. अमावास्येच्या
दिवशी अंधारी रात्र संपते आणि मग दिवस सुरू होतो. चंद्रोदय होण्यास सुरुवात होते.
आणि आजकाल ज्यांचे पितर असते त्यांना (दिवंगत आत्म्यांना आमंत्रित करून) खाऊ-पिऊ
घालून त्यांच्या इच्छा पूर्ण करतात जेणेकरून त्यांना कशाचीही मागणी करण्याची गरज उरू
नये. सर्वांना तृप्त केले जाते. दिवसा निघून गेले मग रात्री परत येण्याची गरजच काय
आहे. खरा नियम हा आहे की, १२ महिन्यांचा काळ जेव्हा पूर्ण होतो तेव्हा त्यांना खाऊ
घालून, संपवायचे असते. मग अंधाऱ्या रात्रीमध्ये कशासाठी बोलावले जाते. परंतु
ब्राह्मणांनी हा देखील रीती-रिवाज बनवला आहे, तो चालत आला आहे. दक्षिणा इत्यादी
मिळत राहील. ती आहे हदची अमावास्या. आता बाबा आले आहेत बेहदच्या अमावस्येमध्ये. बाबा
येतात तेव्हा अर्ध्या कल्पाचा अंधार संपुष्टात येतो. मग सतयुगामध्ये प्रकाशच प्रकाश
असतो. तिथे कधी कोणी पितर इत्यादी खाऊ घालणार नाहीत. ही तर आहे बेहदची अमावास्या.
ब्रह्माची रात्र सो ब्राह्मणांची रात्र संपून दिवस येतो. मग कोणी पितर इत्यादी खाऊ
घालत नाहीत, तिथे ब्राह्मणच नसतात. असे नाही की कोणाचा मृत्यू होत नाही, परंतु हा
रीती-रिवाज नसतो. इथे तर अनेक प्रकारचे ब्राह्मण देखील आहेत. आता वाटते आहे की, एकच
जग असावे, एक राष्ट्र असावे. आता इतक्या सर्वांचे एक राष्ट्र तर होऊ शकत नाही. हां,
जेव्हा सतयुग होते तेव्हा एक राज्य, एक रीती-रिवाज होता. ते तर बाबाच येऊन स्थापन
करतात. तिथे सगळे अगदी गोड असतात, दुःखाची गोष्ट नसते. कधी कटू बोलत नाहीत, पाप करत
नाहीत. आता जे जितका पुरुषार्थ करतील तितके नंबरवार पद प्राप्त करतील. असे नाही की
तिथे कोणी चोरी इत्यादी करतील. नाही. आतून-बाहेरून स्वच्छ असतात. इथे मात्र, आतून
एक आणि बाहेरून दुसरेच असतात. एकमेकांचे किती नुकसान करतात. ही सर्व आहे रावण
राज्यातील घाणेरडी सवय. बाबा आता याला पूर्णपणे नष्ट करतात. सर्वांच्याच वाईट सवयी
काही अशा ताबडतोब नष्ट होत नाहीत. वेळ लागतो, जितके-जितके योग मध्ये रहाल,
पावलोपावली तपासत रहाल की, आपण योगमध्ये राहतो का! कोणते पाप कर्म तर करत नाही ना!
स्वतः गोड बनून मग इतरांना गोड बनवतो का? स्वतःच कडू असेल तर इतरांना गोड कसा काय
बनवेल. इथे असे लगेचच प्रत्यक्ष होतात, लपून राहू शकत नाहीत.
बाबा म्हणतात - माझे
मूल बनून, मग जर कोणते उलटे-सुलट काम कराल तर खूप कडक शिक्षा भोगावी लागेल. पद
देखील भ्रष्ट होईल. आम्हाला देवता बनविण्याकरिता स्वयं भगवान स्वतः बसून शिकवत आहेत.
देवतांची महिमा गातात - सर्वगुण संपन्न... अहिंसा परमोधर्म. हिंसा दोन प्रकारची असते
- एक तर काम कटारीच्या हिंसेमुळे मनुष्य आदि-मध्य-अंत दुःख भोगतो. दुसरी मग
क्रोधामध्ये येऊन एकमेकांना मारतात दुःख देतात, दुःखी होतात. इथे तर मुलांना
सांगितले जाते - मनसा-वाचा-कर्मणा असे कोणतेही काम करायचे नाही. कोणाला दुःख द्यायचे
नाही. आपण आहोतच दुःख हर्ता, सुख कर्त्याची मुले. तर सर्वांना हीच युक्ती सांगायची
आहे - तुम्ही कसे इतरांचे दुःख दूर करून सुख द्यावे. केलेल्या कर्मांचा हिशोब चुकता
होतो. इथे बाबा समजावून सांगत आहेत - या जन्मामध्ये जी काही पाप कर्म केली आहेत, ती
बाबांना सांगितल्याने अर्धे माफ होईल. परंतु मागील अनेक जन्मांमध्ये केलेली पाप
कर्मे तर डोक्यावर खूप आहेत ना! आता बाबा समजावून सांगतात की, या जन्मामध्ये देखील
असे कर्म करता कामा नये ज्याचे पाप बनेल; आणि मग योगबलाने अनेक जन्मांची पाप कर्म
भस्म करायची आहेत. या जन्मामध्ये बाबांचे बनून कोणतेही पाप कर्म करायचे नाही.
ब्राह्मण बनल्याशिवाय वारसा मिळू शकत नाही. हे बाप-दादा आहेत ना. वारसा तुम्हाला
त्यांच्याकडून (शिवबाबांकडून) मिळतो, यांच्याकडून (ब्रह्मा बाबांकडून) नाही. हे
स्वतःला काहीही म्हणवून घेत नाहीत. हा तर फक्त रथ आहे, यांच्याकडून तुम्हाला काही
मिळत नाही. रथाचे देखील गायन तर केले जाते. हुसेनच्या रथाची मिरवणूक काढतात ना.
घोड्याला किती सजवतात. हे (ब्रह्मा बाबांचे तन) तर पतित तन आहे ना. हे देखील आता
सजत आहे. स्वतःच्या पुरुषार्थानेच सजतात. यांची बाबा बाजू घेत नाहीत. हे तर बाबा
कधी-कधी विनोद करतात की भाडे तर मिळेल ना. परंतु तुम्हाला जसा पुरुषार्थ करायचा आहे,
तसा यांना देखील करावा लागतो. ही हाव नसते की आम्हाला भाडे देतील. हा तर बाबा विनोद
करतात. आत्म्याला योगबलानेच सतोप्रधान बनायचे आहे. जितका योग असेल तितके पावन बनाल
आणि मग आप समान देखील बनवायचे आहे. तुम्ही मुले जाणता - जी चांगली-चांगली सेवा
करणारी मुले आहेत, ती नामिग्रामी आहेत. बाबा सेवेवर पाठवून देतात. अतिशय गोड बोलायचे
आहे. कोणाशीही भांडण-तंटा करायचा नाही. ब्राह्मण जर कटू वचन बोलले, तर म्हणतील
यांच्यामध्ये तर क्रोधाचे भूत आहे. निंदा-स्तुती दोन्ही परिस्थितीमध्ये समतोल राहिले
पाहिजे. बऱ्याचजणांमध्ये क्रोधाचे भूत आहे, त्यामुळे खूप चिडतात. असे नाही की
सर्वांचा क्रोध निघून गेला आहे. जोपर्यंत संपूर्ण बनण्याची वेळ येत नाही तोपर्यंत
हळूहळू भेसळ निघून जात राहील. असे कोणी म्हणू शकत नाही की, आमच्यामध्ये क्रोध नाहीये.
कोणामध्ये जास्त असतो, कोणामध्ये कमी असतो. एखाद्याचा आवाजच असा असतो जसे काही
भांडण करत आहेत. मुलांनी खूप-खूप गोड बनायचे आहे. इथेच सर्वगुणसंपन्न बनायचे आहे.
विकार तर अनेक प्रकारचे आहेत ना. क्रोध करणे, खोटे बोलणे हे सर्व विकार आहेत.
बाबा म्हणतात -
मुलांनो, आता कोणते विकर्म कराल तर खूप शिक्षा भोगावी लागेल. तिथे तर माझ्यासोबत
दंड देणारा धर्मराज आहे. इथे प्रत्यक्षपणे सजा मिळते आणि धर्मराजाकडून गुप्तपणे सजा
मिळते, गर्भ-जेलमध्ये सुद्धा सजा भोगतात. कोणाला आजार इत्यादी होतो - तो देखील
कर्मभोग आहे. धर्मराजाद्वारे दंड मिळतो. पूर्वीच्या कर्मांचा देखील आता दंड मिळतो.
आत्ताच्या कर्मांचा दंड देखील आत्ताच मिळू शकतो. आणि पुन्हा गर्भ-जेलमध्ये सुद्धा
मिळतो; तो दंड गुप्त आहे, धर्मराज तिथे (गर्भ-जेलमध्ये) तर सजा देणार नाहीत ना. इथे
मग शरीराद्वारे भोग भोगावे लागतात. आता बाबा आपल्याला यातून सोडवत आहेत. परमपिता
परमात्मा आणि धर्मराज बाबा दोघेही उपस्थित आहेत. आता सर्वांच्या कयामतची वेळ (अंतिम
निकालाची वेळ) आहे. प्रत्येकाची जजमेंट होते (न्याय-निवाडा होतो). हे देखील
ड्रामामध्ये नोंदलेले आहे. जेव्हा की तुम्ही मुले समजता - संपूर्ण बनायचे आहे, तर
कोणतेही पापकर्म करू नका. स्वतःच्या कल्याणासाठी जितका होईल, तितका पूर्ण पुरुषार्थ
केला पाहिजे. कल्प-कल्पांतराची गोष्ट आहे. ते शिक्षण (लौकिक शिक्षण) असते एका
जन्मासाठी, दुसऱ्या जन्मामध्ये पुन्हा तेच शिक्षण परत शिकावे लागते; हे शिक्षण आहे
२१ जन्मांचे. अविनाशी बाबा अविनाशी शिक्षण शिकवतात, ज्यामुळे २१ जन्मांसाठी अविनाशी
पद देखील मिळते. बाबांकडून २१ जन्मांसाठी वारसा मिळतो. तुम्ही मुले जाणता ही जुनी
दुनिया आहे, नवीन दुनियेमध्ये भारत एकटा होता. आता पुन्हा हे चक्र फिरणार आहे. नविन
सृष्टी स्थापन होऊन जुन्याचा विनाश होईल. हे तर गायले गेले आहे - परमपिता परमात्मा
येऊन ब्रह्माद्वारे नवीन दुनिया स्थापना करतात. ब्राह्मण तर जरूर हवेत. तर जरूर
पवित्र देखील बनत असतील, राजयोग देखील शिकत असतील. आपण ब्रह्माकुमार-कुमारी तर
पवित्र बनत आहोत. बाबा असे सांगत नाहीत की, घरदार सोडा. नाही, गृहस्थ व्यवहारामध्ये
राहत असताना कमलपुष्प समान राहा. ‘बाप-दादा’, हे नाव खूप छान आहे. आजोबांकडून वारसा
मिळतो. ते आहेत उच्च ते उच्च. ब्रह्मा तर पतित होते ना. हे सर्वात आधी श्रेष्ठाचारी
पूज्य महाराजा होते. आता शेवटी येऊन पतित बनले आहेत. हा यांचा शेवटचा जन्म आहे. या
दुनियेमध्ये कोणी पावन आहेच कुठे. पावन दुनियेमध्ये कोणीही आठवण करत नाही. गायलेले
देखील आहे - ‘आत्मा-परमात्मा अलग रहे बहुकाल…’ याचा हिशोब देखील तुम्हाला समजला आहे.
सूर्यवंशी जे आहेत ते सर्वात आधी आपला वारसा घेण्यासाठी येतील. आता आत्मा शरीर
सोडून गेली, तर म्हणतात - स्वर्गवासी झाला. मग त्यांना नरकामध्ये काही मागण्याची
गरजच काय आहे. काहीही समजत नाहीत. साधू-संत इत्यादींचा देखील मृत्यू होतो तेव्हा
त्यांची देखील पुण्यतिथी साजरी करतात, भोग लावत असतील. जर का असे म्हणतात की,
ज्योति-ज्योतिमध्ये विलीन झाली; मग भोग कशासाठी लावतात? पुण्यतिथी का साजरी करतात?
शरीर तर नष्ट झाले - आत्मा देखील गेली, मग आत्म्याला बोलावण्याची गरजच काय आहे.
ज्योतिमध्ये विलीन झाली, मग परत कशी काय येऊ शकते. अनेकानेक मते आहेत. असे देखील
म्हणतात - मनुष्याला जेव्हा मोक्ष मिळतो तेव्हा मग तो परत येत नाही. मोक्ष मिळाला
तर अजूनच आनंद साजरा केला पाहिजे, पार्ट बजावण्यापासून सुटला. मग तर त्यांची आठवण
सुद्धा करता कामा नये. हे देखील तुम्ही जाणता. सर्व मनुष्यमात्र एका पित्याची आठवण
जरूर करतात. हे मानतात देखील की, आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत. तर भावांना पित्याकडून
वारसा जरूर मिळाला पाहिजे. सर्व आत्म्यांचा सद्गती दाता एक आहे. सर्व आत्म्यांना
परत जायचेच आहे. मनुष्य, मनुष्याला सद्गती कशी बरे देऊ शकतो; म्हणून सर्वांच्या
सद्गती दात्याचे एकच नाव प्रसिद्ध आहे. तेच ज्ञानाचा सागर, पतित-पावन आहेत. ते बाबा
येऊन राजयोग शिकवतात. सर्वांना रावण-राज्यामधून सोडवतात, याला बेहदची अमावास्या
म्हणणार. अर्धा कल्प आहे बेहदची रात्र, मग अर्धा कल्प आहे बेहदचा दिवस. हा खेळ आहे.
जेव्हा रिलीजियस कॉन्फरन्स वाले (धार्मिक परिषदवाले) - ‘शांती कशी व्हावी?’ यावर
बोलण्यासाठी आमंत्रण देतात तेव्हा तिथे हे सांगितले पाहिजे की, ‘एक धर्म, एक मत
सतयुगामध्येच असते. त्याला आता ५ हजार वर्षे झाली आहेत. तिथे सुख-शांती सर्व होते,
बाकी सर्व आत्मे शांतिधाममध्ये होते. नवीन दुनियेमध्ये एकच धर्म होता’. जुन्या
दुनियेमध्ये झाडाचा किती विस्तार होतो. अनेक धर्म आहेत. आता अनेक धर्मांचा विनाश आणि
एका धर्माची स्थापना, हे बाबांचेच काम आहे. शिवबाबा म्हणतात - हे माझे काम आहे. मी
कल्प-कल्प येऊन हे काम करतो. सतयुगी राजधानीसाठी, राजयोग जरूर संगमावरच शिकवतील.
सर्व पतितांना पावन बनवतात. म्हणतात - ‘मी, यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) अनेक
जन्मांतील अंतिम जन्मामध्ये अंताला येतो. ज्याने पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत,
त्यांच्या रथामध्येच येऊन समजावून सांगतो’. नवीन दुनिया तर अस्तित्वातच नाहीये.
जुन्या दुनियेमधेच येऊन नवीन दुनिया बनवतो. पतित दुनियेला पावन बनवतो. माझे नावच आहे
दुःख हर्ता, सुख कर्ता. सुखामध्ये कोणीही माझी आठवण करत नाही, दुःखामध्ये माझी आठवण
करतात. जरूर सुख मिळाले होते.
बाबा म्हणतात - मी
शिकविण्यासाठी आलो आहे. आता शिकणे तुमचे काम आहे. मनुष्य तर घोर अंधारामध्ये आहेत,
तुम्ही देखील काहीच जाणत नव्हता. यावेळी संपूर्ण दुनियेची नाव बुडालेली आहे, किती
दुःखी आहेत. तुम्ही सर्वांची नाव पार लावता, सर्वजण शांतीधाममध्ये निघून जातील. या
गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये आहेत, त्याही नंबरवार. जे लाईट हाऊस बनले असतील, ते
इतरांना देखील मार्ग सांगत राहतील. त्यांचे कामच आहे मार्ग सांगणे. मुलांना बाबा कसे
शिकवतात, हा तर स्थायी आनंद राहिला पाहिजे. इथे येऊन खूप रिफ्रेश होतात, बाहेर
गेल्यावर नशाच नाहीसा होतो. बाबांकडून संपूर्ण वारसा मिळवण्याची आकांक्षा बाळगली
पाहिजे. पावलोपावली बाबांचा सल्ला घेत राहायचे आहे. पूर्वी तीर्थक्षेत्रांवर पायी
जात असत, खूप काळजीपूर्वक जायचे. आता तर बस, ट्रेन मधून जातात. या वेळी मायेचा भपका
खूप आहे. सतयुगामध्ये भपका होता, मग द्वापरपासून घसरत गेला. आता पुन्हा शेवटच्या
काळात सुरू झाला आहे, याला मायेचा डामडौल म्हटले जाते. कोणाला म्हटले - स्वर्गामध्ये
चला, तर म्हणतात - आम्हाला इथेच सर्व सुख आहे. गाड्या, विमाने इत्यादी सर्व आहे.
आमच्यासाठी इथेच स्वर्ग आहे. धन-दौलत, दाग-दागिने इत्यादी सर्व आहे.
लक्ष्मी-नारायणाला देखील दाग-दागिने आहेत ना. आम्ही देखील घालू शकतो. कितीही
समजावून सांगा तरीही विषच (विकारच) लक्षात राहते. विषा शिवाय (विकारा शिवाय) राहू
शकत नाहीत. बाबा म्हणतात - तुम्ही माझे म्हणणे ऐकत नाही. पावन बनत नाही तर मला
बोलावताच कशाला की, ‘हे पतित-पावन या’. लक्षात ठेवा आता ऐकले नाहीत तर
धर्मराजाद्वारे सजा देईन. घाबरवतात सुद्धा. बरीच मुले विकारामध्ये जातच राहतात,
भीतीच वाटत नाही. ते किती चाबकाचे फटके खातील, काही विचारूच नका. पद देखील भ्रष्ट
होईल. पुरुषार्थ करून उच्च पद मिळवले पाहिजे ना. संगदोषामध्ये येऊन इतके घसरतात जे
एकदम आपले पदच गमावतात. तुम्ही जाणता आता हिरे इत्यादीच्या खाणी रिकाम्या होत
चालल्या आहेत त्या पुन्हा भरतील. सोन्याचे, हिऱ्यांचे पर्वत असतात. हिरे जेव्हा
खोदून काढतात तेव्हा आधी दगड असतात मग त्यांना साफ करून (तासून) हिरा बनवतात.
तुम्हाला देखील ज्ञानाच्या सहाणीवर घासतात तर तुम्ही किती सुंदर बनता. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आता कयामतची
वेळ (महाविनाशाची वेळ) आहे त्यामुळे कोणतेही पाप कर्म करायचे नाही. आपल्या
कल्याणासाठी पुरुषार्थ करायचा आहे, अतिशय गोड बनायचे आहे. क्रोध सोडून द्यायचा आहे.
२) बाबांकडून संपूर्ण
वारसा घेण्याची आकांक्षा ठेवायची आहे. पावलोपावली बाबांचा सल्ला घ्यायचा आहे.
पित्यासमान दुःख हर्ता, सुख कर्ता बनायचे आहे.
वरदान:-
आपले भाग्य आणि
भाग्यविधात्याच्या स्मृतीद्वारे सर्व गुंत्यांपासून मुक्त राहणारे मास्टर रचयिता भव
सदैव ‘वाह माझे भाग्य’
आणि ‘वाह भाग्यविधाता!’ या मनातील सूक्ष्म आवाजाला ऐकत राहा आणि आनंदाने नाचत राहा.
जाणायचे होते ते जाणले, मिळवायचे होते ते मिळवले - याच अनुभवांमध्ये रहाल तर सर्व
गुंत्यांमधून मुक्त व्हाल. आता तर अडकलेल्या आत्म्यांना बाहेर काढण्याची वेळ आहे,
त्यामुळे ‘मी मास्टर सर्वशक्तिमान आहे’, ‘मास्टर रचयिता आहे’, या स्मृतीमध्ये रहा;
छोट्या-छोट्या बालिश गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नका.
बोधवाक्य:-
कमल आसनधारीच
मायेच्या आकर्षणापासून न्यारे, बाबांच्या प्रेमाने युक्त असे प्रिय आणि श्रेष्ठ
कर्मयोगी आहेत.
हे अव्यक्त इशारे -
ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.
पुरुषार्थामध्ये
सरळपणा, ब्रह्मा बाबांसारखे उपराम आणि साक्षी-दृष्टाचे संस्कार, हीच संपूर्ण स्टेजची
निशाणी आणि लक्षण आहे. तर आता या संस्कारांमध्ये समानता आणायची आहे. याद्वारेच
सर्वांचे हृदय जिंकाल, जे संगमावर सर्वांचे हृदय जिंकतात तेच भविष्यामध्ये विश्व
महाराजन् बनतात.