19-12-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आता घरी जायचे आहे त्यामुळे देही-अभिमानी बना, एका बाबांची आठवण करा तर ‘अंत मति सो गति’ होईल”

प्रश्न:-
वंडरफुल बाबांनी तुम्हाला कोणते एक वंडरफुल रहस्य सांगितले आहे?

उत्तर:-
बाबा म्हणतात - मुलांनो, हा अनादि अविनाशी ड्रामा पूर्वनियोजित आहे, यामध्ये प्रत्येकाचा पार्ट नोंदलेला आहे. जे काही होते नथिंग न्यू. बाबा म्हणतात - मुलांनो, यामध्ये माझा देखील कोणता मोठेपणा नाही, मी देखील ड्रामाच्या बंधनामध्ये आहे. बाबा हे वंडरफुल रहस्य ऐकवून जसे आपल्या पार्टला देखील महत्त्व देत नाहीत.

गीत:-
आखिर वह दिन आया आज…

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुले हे गाणे गात आहेत. मुले समजतात की कल्पानंतर पुन्हा आपल्याला धनवान, हेल्दी आणि वेल्दी बनविण्याकरिता पवित्रता, सुख, शांतीचा वारसा देण्यासाठी बाबा येतात. ब्राह्मण लोक देखील आशीर्वाद देतात ना की, आयुष्यमान भव, धनवान भव, पुत्रवान भव. तुम्हा मुलांना तर वारसा मिळत आहे, काही आशीर्वादाची गोष्ट नाहीये. मुले शिकत आहेत. जाणतात ५ हजार वर्षांपूर्वी देखील आपल्याला बाबांनी येऊन मनुष्यापासून देवता, नरापासून नारायण बनण्याचे शिक्षण दिले होते. मुले जे शिकतात, ते जाणतात की आपण काय शिकत आहोत. आपल्याला शिकवणारे कोण आहेत? त्यामध्ये देखील नंबरवार पुरुषार्था नुसार जाणतात. एवढे तर जरूर म्हणतीलच की, आम्हा मुलांना ठाऊक आहे - ही राजधानी स्थापन होत आहे किंवा डीटी किंगडम (दैवी साम्राज्य) स्थापन होत आहे. आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे. पहिले शूद्र होतो, मग ब्राह्मण बनलो आता पुन्हा देवता बनायचे आहे. दुनियेमध्ये कोणाला हेच ठाऊक नाहीये की आता आपण शूद्रवर्णाचे आहोत. तुम्ही मुले समजता ही तर खरी गोष्ट आहे. बाबा सत्य सांगून, सचखंडाची स्थापना करत आहेत. सतयुगामध्ये खोटेपणा, पाप इत्यादी काहीच नसते. कलियुगातच अजामिल, पाप आत्मे असतात. हा काळ पूर्णतः रौरव नरकाचाच आहे. दिवसेंदिवस रौरव नरक दिसून येईल. माणसे अशी काही कृत्ये करत राहतील ज्यावरून समजतील की, दुनिया एकदमच तमोप्रधान बनत चालली आहे. यामध्ये देखील काम विकार महाशत्रू आहे. कोणी मुश्किलीने पवित्र शुद्ध राहू शकतो. पूर्वी जंगम (फकीर ) लोक म्हणत होते - असे कलियुग येईल जेव्हा १२-१३ वर्षांच्या कुमारी मुलाला जन्म देतील. आता तो काळ चालू आहे. कुमार-कुमारी इत्यादी सर्व घाण करत राहतात. जेव्हा एकदमच तमोप्रधान बनतात तेव्हा बाबा म्हणतात - मी येतो, माझा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. मी देखील ड्रामाच्या बंधनामध्ये बांधिल आहे. तुम्हा मुलांकरिता काही नवीन गोष्ट नाहीये. बाबा असे समजावून सांगतात - चक्र फिरलात, नाटक पूर्ण झाले. आता बाबांची आठवण करा तर तुम्ही सतोप्रधान बनून, सतोप्रधान दुनियेचे मालक बनाल. किती सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. बाबा काही आपल्या पार्टला इतके महत्त्व देत नाहीत. हा तर माझा पार्ट आहे काही नवीन गोष्ट नाहीये. दर ५ हजार वर्षानंतर मला यावे लागते. ड्रामामध्ये मी कटिबद्ध आहे. येऊन तुम्हा मुलांना खूप सोपी आठवणीची यात्रा सांगतो. ‘अंत मति सो गति…’ हे यावेळेकरिताच म्हटले गेले आहे. हा अंतकाळ आहे ना. बाबा युक्ती सांगतात - मामेकम् आठवण करा तर सतोप्रधान बनाल. मुले देखील समजतात आपण नवीन दुनियेचे मालक बनणार आहोत. बाबा वारंवार सांगतात - नथिंग न्यू. एक जिन्नची कहाणी सांगतात ना - त्याने म्हटले की, मला काम द्या, तर त्याला सांगितले - शिडी उतर आणि चढ. बाबा देखील म्हणतात हा खेळ देखील उतरण्याचा आणि चढण्याचा आहे. पतितापासून पावन, पावनपासून पतित बनायचे आहे. ही काही अवघड गोष्ट नाहीये. आहे खूप सोपी, परंतु युद्ध कोणते आहे, हे न समजल्या कारणाने शास्त्रांमध्ये युद्धाच्या गोष्टी लिहिल्या आहेत. वास्तविक माया रावणावर विजय प्राप्त करणे तर खूप मोठी लढाई आहे. मुले बघतात आपण घडोघडी बाबांची आठवण करतो, आणि मग आठवण विसरते. माया दिवा विझवून टाकते. यावर गुलबकावलीची देखील एक कहाणी आहे. मुले विजय प्राप्त करतात. खूप चांगले चालतात आणि मग माया येऊन दिवा विझवून टाकते. मुले देखील म्हणतात - बाबा, मायेची वादळे तर खूप येतात. मुलांकडे वादळे देखील अनेक प्रकारची येतात. कधी-कधी तर असे जोराने वादळ येते जे ८-१० वर्षांची जुनी चांगली-चांगली झाडे देखील खाली कोसळतात. मुलेच जाणतात, वर्णन देखील करतात. चांगले-चांगले माळेचे मणी होते. आज अस्तित्वातच राहिलेले नाहीत. हे देखील उदाहरण आहे, हत्तीला मगरीने खाल्ले. ही आहेत मायेची वादळे.

बाबा म्हणतात - ५ विकारांपासून जपून रहा. आठवणीमध्ये रहाल तर मजबूत बनाल. देही-अभिमानी बना. बाबांची ही शिकवण एकदाच मिळते. इतर कोणीही असे कधी म्हणणार नाहीत की, तुम्ही आत्म-अभिमानी बना. सतयुगामध्ये देखील असे म्हणणार नाही. नाव, रुप, देश, काळ सर्व लक्षात राहतेच. यावेळी मी तुम्हाला सांगतो - आता घरी परत जायचे आहे. तुम्ही पहिले सतोप्रधान होता, सतो-रजो-तमोमध्ये तुम्ही पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत. त्यामध्ये देखील नंबरवन हे ब्रह्मा आहेत. इतरांचे ८३ जन्म देखील असू शकतात. यांच्यासाठी पूर्ण ८४ जन्म आहेत. हे सर्वात पहिले श्री नारायण होते. यांच्याकरिता सांगतात जणू सर्वांसाठी समजले जाते, अनेक जन्मांच्या अंतामध्ये ज्ञान घेऊन पुन्हा ते नारायण बनतात. झाडाच्या चित्रामध्ये देखील दाखवले आहे ना - इथे श्री नारायण आणि शेवटी ब्रह्मा उभे आहेत. खाली राजयोग शिकत आहेत. प्रजापित्याला कधी परमपिता म्हणणार नाही. परमपिता एकालाच म्हटले जाते. प्रजापिता मग यांना (ब्रह्माला) म्हटले जाते. हे देहधारी आहेत, ते विदेही, विचित्र आहेत. लौकिक पित्याला पिता म्हणता येईल, यांना प्रजापिता म्हणणार. ते परमपिता तर परमधाममध्ये राहतात. प्रजापिता ब्रह्मा परमधाममध्ये म्हटले जात नाहीत. ते तर इथे साकारी दुनियेमध्ये झाले. सूक्ष्मवतनमध्ये देखील नाहीत. प्रजा तर आहे स्थूलवतनमध्ये. प्रजापित्याला भगवान म्हटले जात नाही. भगवंताच्या शरीराचे कोणते नाव नाही. मनुष्य तन ज्याला नाव दिले जाते, त्यापासून ते न्यारे आहेत. आत्मे तिथे राहतात तर स्थूल नावा-रुपापासून न्यारे आहेत. परंतु आत्मा तर आहे ना. साधू-संत इत्यादी केवळ घरदार सोडतात, बाकी दुनियेतील विकाराविषयी तर अनुभवी आहेत ना. छोट्या मुलाला काहीही ठाऊक नसते म्हणून त्याला महात्मा म्हटले जाते. ५ विकारांविषयी त्याला ठाऊकच नसते म्हणून छोट्या मुलांना पवित्र म्हटले जाते. या वेळी तर कोणीही पवित्र आत्मा असू शकत नाही. लहानाचा मोठा झाला तरी देखील पतित तर म्हणणार ना. बाबा समजावून सांगत आहेत - सर्वांचा वेगवेगळा पार्ट या ड्रामामध्ये नोंदलेला आहे. या चक्रामध्ये किती शरीरे घेतो, किती कर्म करतो, जे सर्व पुन्हा रिपीट होणार आहे. सर्वप्रथम आत्म्याला ओळखायचे आहे. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा अविनाशी पार्ट भरलेला आहे. हीच आहे सर्वात वंडरफुल गोष्ट. आत्मा देखील अविनाशी आहे. ड्रामा देखील अविनाशी आहे, पूर्व-नियोजित आहे. असे म्हणणार नाही की हा कधीपासून सुरू झाला. कुदरत (प्रकृतीचा चमत्कार) म्हणतात ना. आत्मा कशी आहे, हा ड्रामा कसा बनलेला आहे, यामध्ये कोणी काहीही करू शकत नाही. जसे समुद्र किंवा आकाशाचा अंत काढू शकत नाहीत. हा अविनाशी ड्रामा आहे. किती वंडरफुल (अद्भुत) वाटते. जसे बाबा अद्भुत तसेच ज्ञान देखील खूप अद्भुत आहे. कधी कोणी सांगू शकणार नाही. इतके सर्व ॲक्टर्स आपापला पार्ट बजावतच राहतात. नाटक केव्हा बनले, असा कोणता प्रश्नच उत्पन्न होऊ शकत नाही. अनेकजण म्हणतात - भगवंताला एवढी काय गरज पडली होती जी सुख-दु:खाची दुनिया बसून बनवली. अरे, ही तर अनादि आहे. प्रलय इत्यादी होत नाही. पूर्व-नियोजित आहे, असे थोडेच म्हणू शकतो की का बनवली! आत्म्याचे ज्ञान देखील बाबा तुम्हाला तेव्हा सांगतात जेव्हा तुम्ही हुशार बनता. तर तुम्ही दिवसेंदिवस उन्नतीला प्राप्त करत राहता. अगदी सुरुवातीला तर बाबा फार थोडे-थोडे सांगत असत. वंडरफुल गोष्टी होत्या तरी देखील एक आकर्षण तर होते ना. त्याने खेचले. भट्टीचे देखील आकर्षण होते. शास्त्रांमध्ये मग दाखवले आहे की, कृष्णाला कंसपुरीतून घेऊन गेले. आता तुम्ही जाणता कंस इत्यादी तर तिथे असत सुद्धा नाहीत. गीता, भागवत, महाभारत यामध्ये हे सर्व संदर्भ दिलेले आहेत परंतु तसे काहीच नाहीये. समजतात हा दसरा इत्यादी तर परंपरेने चालत आला आहे. रावण काय चीज आहे, हे देखील कोणीही जाणत नाहीत. जे पण देवी-देवता होते ते खाली उतरत-उतरत पतित बनले आहेत. जास्त आळवणी देखील ते करतात जे जास्त पतित बनले आहेत म्हणून बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन’. या सर्व गोष्टी बाबाच बसून समजावून सांगतात. सृष्टी चक्राच्या आदि-मध्य-अंताला इतर कोणीही जाणत नाही. तुम्ही जाणल्याने चक्रवर्ती राजा बनता. त्रिमूर्तीच्या चित्रामध्ये लिहिलेले आहे - ‘हा तुमचा ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकार आहे’. ब्रह्मा द्वारे स्थापना, शंकरा द्वारे विनाश, विष्णु द्वारा पालना… विनाश देखील जरूर होणार आहे. नवीन दुनियेमध्ये फार थोडे असतात. आता तर अनेक धर्म आहेत. समजतात - फक्त एक आदि सनातन देवी-देवता धर्म नाही आहे. मग जरूर तो एक धर्म पाहिजे, महाभारत देखील गीतेशी संबंधित आहे. हे चक्र फिरत राहते. एक सेकंद देखील बंद होऊ शकत नाही. काही नवीन गोष्ट नाहीये, अनेकदा राजाई घेतली आहे, ज्यांचे पोट भरलेले असते, ते गंभीर राहतात. आतून समजतात की, आपण कितीदा राजाई घेतली होती, कालचीच गोष्ट आहे. कालच देवी-देवता होतो मग चक्र फिरून आज आम्ही पतित बनलो आहोत; आता पुन्हा आम्ही योगबलाने विश्वाची बादशाही घेतो. बाबा म्हणतात - कल्प-कल्प तुम्हीच बादशाही घेता. जरा देखील फरक पडू शकत नाही. राजाईमध्ये कोणी कमी पदवाले, कोणी उच्च पदवाले बनतील. हे पुरुषार्थानुसारच होते.

तुम्ही जाणता पहिले आपण माकडापेक्षा देखील अतिशय वाईट होतो. आता बाबा मंदिर लायक बनवत आहेत. जी चांगली-चांगली मुले आहेत त्यांची आत्मा रियलाइज करते, खरोखर आपण तर काहीच कामाचे नव्हतो. आता आपण वर्थ पाउण्ड बनत आहोत. कल्प-कल्प बाबा आपल्याला पेनी पासून पाउण्ड (कवडी पासून हिरा) बनवतात. जे कल्पापूर्वीचे असतील तेच या गोष्टींना चांगल्या रीतीने समजतील. तुम्ही देखील प्रदर्शनी इत्यादी करता, नथिंग न्यू. याद्वारेच तुम्ही अमरपुरीची स्थापना करत आहात. भक्तीमार्गामध्ये देवी इत्यादींची किती मंदिरे आहेत. ही सर्व आहे पुजारीपणाची सामग्री. पूज्यपणाची सामग्री काहीच नाही. बाबा म्हणतात - दिवसेंदिवस तुम्हाला गूढ पॉईंट्स समजावून सांगत राहतो. पूर्वीचे पुष्कळ पॉईंट्स तुमच्याकडे ठेवलेले आहेत. आता त्याचे काय करणार. असेच पडून राहतील. वर्तमानमध्ये तर बापदादा नवीन-नवीन पॉईंट्स समजावून सांगत राहतात. आत्मा इतकी छोटीशी बिंदू प्रमाणे आहे, तिच्यामध्ये सारा पार्ट भरलेला आहे. हा पॉईंट काही अगोदरच्या नोटबुकमध्ये थोडाच असेल. मग जुन्या पॉईंट्सचे तुम्ही काय करणार. भूतकाळातील तो रिझल्टच (अनुभवच) कामी येतो. बाबा म्हणतात - कल्पापूर्वी देखील तुम्हाला असेच ऐकवले होते. नंबरवार शिकत राहतात. काही सब्जेक्टमध्ये वर-खाली होत राहतात. व्यापारामध्ये देखील ग्रहचारी बसते, यामध्ये हार्ट फेल व्हायचे नाहीये. पुन्हा उठून पुरुषार्थ केला जातो. लोकांचे किती दिवाळे निघते मग पुन्हा धंदा इत्यादी करून खूप धनवान बनतात. इथे देखील कोणी विकारामध्ये कोसळतात तरी देखील बाबा म्हणतात - आता पुन्हा चांगल्या रीतीने पुरुषार्थ करून उच्च पद प्राप्त करा. पुन्हा चढायला सुरूवात केली पाहिजे. बाबा म्हणतात - घसरला आहात आता पुन्हा चढा. असे खूप आहेत, कोसळतात तर पुन्हा चढण्याचा प्रयत्न करतात. बाबा विरोध थोडाच करतील. बाबा जाणतात - असे देखील खूप येतील. बाबा म्हणतील - पुरुषार्थ करा. तरीही काही ना काही मदतगार तर बनतील ना. ड्रामा प्लॅन अनुसारच म्हणणार. बाबा म्हणतील - ‘ठीक आहे बाळा, आता तृप्त झालास, खूप गटांगळ्या खाल्ल्यास आता पुन्हा पुरुषार्थ कर’. बेहदचे बाबा तर असेच म्हणतील ना. बाबांकडे भेटण्यासाठी कितीतरी येतात. त्यांना म्हणतो - बेहदच्या बाबांचे म्हणणे मानणार नाहीस का, पवित्र बनणार नाहीस! बाबा आत्मा समजून आत्म्याला सांगतात तर तीर जरूर लागेल (मनाला जरूर भिडेल). समजा पत्नीला तीर लागतो (ज्ञान पटते) तर म्हणेल मी तर प्रतिज्ञा करते. परंतु पुरुषाला तीर लागत नाही. तर पुढे चालून त्यांना देखील ज्ञानाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतील. आणि मग असे देखील खूप येतात, ज्यांना पत्नी ज्ञानामध्ये घेऊन येते. तर ते म्हणतात - पत्नी माझी गुरु आहे. ते ब्राह्मण लोक धागा बांधताना म्हणतात - हा तुझा गुरु ईश्वर आहे. इथे बाबा म्हणतात - तुमचे एकच पिता सर्व काही आहेत. माझे तर एक दुसरे ना कोणी. सर्वजण त्यांचीच आठवण करतात. त्या एकाशीच योग लावायचा आहे. हा देह देखील माझा नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कोणतीही ग्रहचारी आली तर हताश होऊन बसायचे नाही. पुन्हा पुरुषार्थ करून, बाबांच्या आठवणीमध्ये राहून उच्च पद प्राप्त करायचे आहे.

२) आठवणीद्वारे आपली स्थिती इतकी मजबूत बनवायची आहे जेणेकरून कोणतेही मायेचे वादळ वार करु शकणार नाही. विकारांपासून स्वतःचा बचाव करत रहायचा आहे.

वरदान:-
सर्व शक्तींच्या लाईट द्वारे आत्म्यांना रस्ता दाखवणारे चैतन्य लाईट हाऊस भव

जर नेहमी याच स्मृतीमध्ये रहाल की, ‘मी आत्मा विश्व कल्याणाच्या सेवेकरिता परमधामहून अवतरीत झाले आहे’; तर जे काही संकल्प कराल, बोलाल त्यामध्ये विश्वकल्याण सामावलेले असेल. आणि हीच स्मृति लाईट हाऊसचे कार्य करेल. जसे त्या लाईट हाऊसमधून एका रंगाची लाईट निघते तसे तुम्हा चैतन्य लाईट हाऊस द्वारे सर्व शक्तींची लाईट आत्म्यांना प्रत्येक पावलाला रस्ता दाखवण्याचे कार्य करत राहील.

बोधवाक्य:-
स्नेह आणि सहयोगासोबतच शक्ती स्वरूप बना तर राजधानीमध्ये पुढचा नंबर मिळेल.

अव्यक्त इशारे:- आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.

जसे कर्मामध्ये येणे स्वाभाविक झाले आहे तसेच कर्मातीत होणे देखील स्वाभाविक व्हावे. कर्म देखील करा आणि आठवणीमध्ये देखील रहा. जे नेहमी कर्मयोगीच्या स्टेजमध्ये राहतात, ते सहजच कर्मातीत होऊ शकतात. जेव्हा पाहिजे तेव्हा कर्मामध्ये यावे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा न्यारे बनावे, ही प्रॅक्टिस कर्म करत असताना मधून-मधून करत रहा.