20-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही ईश्वरीय सॅलवेशन आर्मी आहात, तुम्हाला सर्वांना सद्गती द्यायची आहे, सर्वांची प्रीत एका बाबांशी जोडायची आहे”

प्रश्न:-
मनुष्य आपली बुद्धिमत्ता कोणत्या गोष्टीमध्ये लावतात आणि तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता कुठे लावायची आहे?

उत्तर:-
मनुष्य तर आपली बुद्धिमत्ता आकाश आणि सृष्टीचा अंत शोधण्यासाठी लावत आहेत परंतु याने तर काहीच फायदा नाही. याचा अंत काही मिळू शकणार नाही. तुम्ही मुले आपली बुद्धिमत्ता लावता - पूज्य बनण्याकरिता. त्यांची तर दुनिया पूजा करणार नाही. तुम्ही मुले तर पूज्य देवता बनता.

गीत:-
तुम्हें पाके हमने…

ओम शांती।
मुलांना समजले आहे, हा आहे ज्ञान मार्ग. तो आहे भक्तीमार्ग. आता प्रश्न उठतो की भक्तिमार्ग चांगला की ज्ञान मार्ग चांगला? दोन गोष्टी झाल्या ना. म्हटले जाते - ज्ञानाने सद्गती होते. तर जरूर म्हणतील की भक्ती आणि ज्ञान दोन्ही वेग-वेगळे आहे. मनुष्य समजतात की भक्ती केल्याने ज्ञान मिळेल तेव्हाच सद्गती होईल. भक्तीमध्ये ज्ञान येऊ शकत नाही. भक्ती सर्वांसाठी आहे, ज्ञान देखील सर्वांसाठी आहे. यावेळी आहे देखील कलियुगाचा अंत तर जरूर सर्वांची दुर्गती झाली असेल म्हणूनच तर बोलावतात देखील आणि गातात देखील की, ‘और संग तोड़ अब तुम संग जोड़ें’. आता ते कोण आहेत? कोणाशी सोबत जोडणार? हे काही समजत नाहीत. जास्त करून बुद्धी श्रीकृष्णाकडे जाते. आम्ही खरी प्रीत तुमच्याशीच जोडणार. तर जेव्हा श्रीकृष्णाशीच प्रीत जोडतात तेव्हा मग गुरु गोसावी बाकी इतर कोणाचीही गरजच नाही. श्रीकृष्णाचीच आठवण करायची आहे. श्रीकृष्णाचे चित्र तर सर्वांकडे आहे. श्रीकृष्ण जयंती देखील साजरी करतात तर दुसऱ्या कोणाकडे जाण्याची गरजच नाही. जशी मीराबाईने एकाशीच संग जोडला. सर्व कामकाज करत असताना श्रीकृष्णाचीच आठवण करत राहिली. घरामध्ये राहणे-करणे, खाणे-पिणे तर होतेच. खरी प्रीत एका श्रीकृष्णाशीच जोडली. जणूकाही ती आशिक आणि ते माशुक झाले. श्रीकृष्णाची आठवण केल्याने फळ देखील मिळते. श्रीकृष्णाला तर सर्वजण ओळखतात. गातात देखील - खरी प्रीत आम्ही तुमच्याशीच जोडली बाकी सर्व संगत तोडली आहे. आता उच्च ते उच्च खरे तर परमपिताच आहेत. सर्वांना वारसा देणारे एक बाबाच आहेत. त्यांना कोणीही जाणत नाहीत. भले म्हणतात - परमपिता परमात्मा शिव, परंतु केव्हा येतात, हे जाणत नाहीत. शिव जयंती साजरी करतात तर जरूर येत असणारच. कधी, कसे येतात, येऊन काय करतात? कोणालाच ठाऊक नाही. कोणीही मनुष्य मात्र जाणत नाहीत की सर्वांची सद्गती करतात. परंतु कसे करतात? सद्गतीचा अर्थ काय आहे. काहीच समजत नाहीत. शिवबाबांनी तर जरूर स्वर्गाची बादशाही दिली असेल ना. तुम्ही मुले जी त्या धर्माची होता, तुम्हाला हे काहीच माहित नव्हते, विसरून गेला होता तर मग बाकीचे कसे काय जाणू शकतील. आता शिवबाबांद्वारे तुम्ही जाणले आहे आणि इतरांना देखील सांगता. तुम्ही आहात ईश्वरीय सॅलवेशन आर्मी (ईश्वरीय मुक्ती सेना). सॅलवेशन म्हणा अथवा सद्गतीची आर्मी म्हणा. आता रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हा मुलांची आहे. तुम्ही चित्रांवर देखील समजावून सांगू शकता. भाषा अनेक आहेत. मुख्य भाषांमध्ये चित्रे बनवावी लागतात. भाषांचे देखील खूप झंझट आहे, म्हणून प्रदर्शनी देखील बनवावी लागेल. चित्रांवरून समजावून सांगणे खूप सोपे होते. गोळ्याच्या चित्रामध्ये देखील सर्व ज्ञान आहे, शिडी फक्त भारतवासीयांसाठीच आहे. यामध्ये दुसरा कोणताही धर्मच नाहीये. असे थोडेच आहे की, फक्त भारत तमोप्रधान बनतो आणि इतर तमोप्रधान बनत नाहीत. तमोप्रधान तर सर्वच बनतात. तर त्यांच्या बाबतीतही तसेच होत असले पाहिजे. हे सर्व सेवेचे विचार बुद्धीमध्ये आले पाहिजेत. दोन पित्याचे रहस्य देखील समजावून सांगायचे आहे. वारसा रचयित्याकडून मिळतो. हे देखील सर्व धर्मवाले जाणतात की लक्ष्मी-नारायण भारताचे पहिले महाराजा-महाराणी होते किंवा भगवान-भगवती होते. अच्छा त्यांना हे स्वर्गाचे राज्य कसे मिळाले? जरूर भगवंताद्वारे मिळाले. कसे आणि कधी मिळाले, हे कोणालाच ठाऊक नाहीये. गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव टाकून मग प्रलय झालेला दाखवला आहे. शेवटी रिझल्ट तर काहीच नाही. हे तुम्हा मुलांनी समजावून सांगायचे आहे. चित्र तर सर्वत्र आहेत. लक्ष्मी-नारायणाचे चित्र देखील असेल. भले ड्रेस, फीचर्स इत्यादी वेगळी असतील. ज्याच्या मनामध्ये जे आले ते बसून बनवले आहे. श्रीनाथ-श्रीनाथिनी तर हे राधे-कृष्ण आहेत ना. श्री राधे, श्रीकृष्ण काही मुकुटवाले नाही आहेत. काळे देखील नाही आहेत. राजधानी लक्ष्मी-नारायणाची आहे, ना की राधे-कृष्णाची. मंदिरे तर अनेक प्रकाराची बनवली आहेत. नाव तर एकच ठेवतील - लक्ष्मी-नारायण. डिनायस्टी लक्ष्मी-नारायणाची म्हटली जाईल. राम-सीतेचे घराणे, लक्ष्मी-नारायणाचे घराणे, राधे-कृष्णाचे काही घराणे नसते. या गोष्टी मनुष्यांच्या डोक्यात सुद्धा नाही आहेत. तुम्ही मुले देखील नंबरवार पुरुषार्थानुसार जाणता, ज्यांना सेवेची आवड आहे - ते तर अत्यंत उत्साही असतात. कोणी म्हणतात आम्हाला समजते, परंतु हळूहळू तोंड उघडण्याच्या देखील (ज्ञान सांगण्याच्या देखील) युक्त्या रचाव्या लागतात. बरेचजण असे समजतात की, वेद-शास्त्र अध्ययन केल्याने, यज्ञ-तो इत्यादी केल्याने, तीर्थ इत्यादी केल्याने परमात्म्याला प्राप्त करू शकतो. परंतु भगवान म्हणतात - हे सर्व मार्ग माझ्या पासून दूर करण्याचे मार्ग आहेत. ड्रामामध्ये सर्वांना दुर्गतीला प्राप्त करायचेच आहे त्यामुळे मग अशा गोष्टी सांगतात. अगोदर आपण देखील म्हणत होतो की, भगवान जसे की उंच शिखर आहेत, कोणी कुठूनही जावे, तर मनुष्यांनी अनेक प्रकाराचे रस्ते पकडले आहेत. भक्ती मार्गाचे रस्ते पकडून-पकडून जेव्हा थकतात तेव्हा मग भगवंतालाच बोलावतात की, हे पतित-पावन, तुम्ही येऊन पावन बनण्याचा मार्ग सांगा. तुमच्याशिवाय आम्ही पावन बनू शकत नाही, थकलो आहोत. दिवसें-दिवस भक्ती तुम्हाला पूर्णपणे थकवेल. आता तर मेळावे-जत्रा इत्यादी ठिकाणी कीती लाखो जाऊन गोळा होतात. किती कचरा होतो. आता तर आहे अंत. दुनियेचे परिवर्तन होणार आहे. वास्तविक दुनिया एकच आहे. दोन भाग बनविले आहेत. तर मनुष्य समजतील स्वर्ग आणि नरक या दोन वेगवेगळ्या दुनिया आहेत परंतु हे अर्धे-अर्धे आहे. वरती सतयुग मग त्रेता, द्वापर, कलियुग. कलियुगामध्ये तमोप्रधान बनायचेच आहे. सृष्टी जुनी होते, या गोष्टींना कुणीच समजत नाही. गोंधळून गेलेले आहेत. कोणी श्रीकृष्णाला भगवान, तर कोणी श्रीरामाला भगवान म्हणतात. आजकाल तर मनुष्य स्वतःलाच भगवान म्हणवून घेतात. आपण ईश्वराचे अवतार आहोत. देवतांपेक्षाही मनुष्य हुशार झाले आहेत. देवतांना तरीही देवताच म्हणणार. हे तर मग मनुष्यालाच भगवान म्हणतात. हा आहे भक्ती मार्ग. देवता तर स्वर्गामध्ये राहणारे होते. आता कलियुग आइरन एज्डमध्ये मग मनुष्य, भगवान कसे होऊ शकतील? बाबा म्हणतात - मी येतोच संगमयुगावर, जेव्हा की मला येऊन दुनियेला ट्रान्सफर करायचे आहे. कलियुग सतयुगामध्ये परिवर्तन होऊन बाकी सर्व आत्मे शांतीधाम मध्ये निघून जातील. ती आहेच निराकारी दुनिया. ही आहे साकारी दुनिया. निराकारी झाड देखील समजावून सांगण्याकरिता मोठे बनवावे लागेल. ब्रह्म महतत्व देखील इतके मोठे आहे, जितके मोठे आकाश आहे. दोन्हीचा अंत प्राप्त करू शकत नाहीत. भले प्रयत्न करतात - एरोप्लेन इत्यादी मधून जातील परंतु अंत मिळणार नाही. समुद्रच समुद्र… आकाशच आकाश आहे. तिथे तर काहीच नाही आहे. भले प्रयत्न खूप करतात परंतु या सर्व गोष्टीतून फायदाच काय. समजतात आम्ही आमची बुद्धिमत्ता दाखवतो. ही आहे मनुष्यांची बुद्धिमत्ता, विज्ञानाची घमेंड देखील मनुष्यामध्ये आहे. भले कितीही कोणी अंत शोधून काढेल, परंतु त्यांची सारी दुनिया काही पूजा तर करणार नाही. देवतांची तर पूजा होते. बाबा तुम्हा मुलांना किती उच्च बनवतात. सर्वांना शांतीधाम मध्ये घेऊन जातात. भले हे सर्व जाणतात, आपण मूलवतनमधून आलो आहोत; परंतु ज्याप्रकारे तुम्ही समजता तसे दुनियेला समजत नाही. ते काय आहे, तिथे आत्मे कसे राहतात आणि मग नंबरवार येतात, हे कोणीही जाणत नाही. ब्रह्म महतत्त्वामध्ये निराकारी झाड आहे. हे समजत नाहीत की, सतयुगामध्ये फार थोडे असतात. बाकी सर्व आत्मे मूलवतनमध्ये राहतात. जसे हे साकारी वतन आहे तसेच मूलवतन आहे. वतन कधी रिकामे होत नाही, ना ते, ना हे. जेव्हा शेवट होतो तेव्हा ट्रान्सफर होतात. थोडे तरी या वतनमध्ये राहतात. जर पूर्ण वतन रिकामे झाले तर मग प्रलयच होईल. प्रलय कधी होत नाही. अविनाशी खंड आहे ना. या सर्व गोष्टी बुद्धीमध्ये ठेवायच्या आहेत. संपूर्ण दिवस हेच विचार चालत रहावेत की, आपण कोणाचे तरी कल्याण करावे. तुमच्याशी प्रीत जुळली आहे तर त्यांचा परिचय द्यावा ना. ते पिता आहेत, त्यांच्याकडून वारसा मिळतो. कसा मिळतो, ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो. सांगणाऱ्यांमध्ये देखील नंबरवार आहेत. कोणी तर खूप चांगल्या रीतीने भाषण करतात, तर कोणी नाही करू शकत तर मग शिकावे लागेल. प्रत्येक मुलाला आपले कल्याण करायचे आहे. जेव्हा की मार्ग मिळाला आहे तर एक-दोघांचे कल्याण करायचे आहे. मन होते इतरांना देखील बाबांकडून वारसा द्यावा. रुहानी सेवा करावी. सर्व एकमेकांची सेवा करतात.

बाबा येऊन रूहानी सेवा शिकवतात इतर कोणीही रूहानी सेवा जाणत नाहीत. रूहानी बाबाच आत्म्यांची सेवा करतात. जिस्मानी सेवा तर जन्म-जन्मांतर खूप केली, आता या अंतिम जन्मामध्ये रूहानी सेवा करायची आहे, जी बाबांनी शिकवली आहे. कल्याण यामध्ये आहे इतर कोणत्याच गोष्टी मध्ये फायदा नाही. गृहस्थ व्यवहारामध्ये देखील राहायचे आहे, तोड निभावायची आहे. त्यांना देखील हेच ज्ञान समजावून सांगून त्यांचे कल्याण करायचे आहे. बुद्धीची प्रीत असेल तर थोडेतरी ऐकतील. बरेचजण तर घाबरतात की, माहित नाही आपल्याला सुद्धा संन्यास करावा लागू नये. आजकाल तर संन्यासी खूप झाले आहेत ना. कफनी घालून दोन शब्द ऐकवले, जेवण तर कुठून ना कुठून मिळतेच. कोणी दुकानावर जाईल, दोन पुऱ्या देतील. मग दुसरीकडे जातील, पोट पूजा तर होते. भीक मागणारे देखील अनेक प्रकारचे असतात. या बाबांकडून तर एकच प्रकारचा वारसा मिळतो. बेहदची बादशाही मिळते, कायमचे निरोगी बनतात. श्रीमंत मुश्किलीने तयार होतात. गरिबांचे देखील कल्याण केले पाहिजे. बाबा प्रदर्शनी तर भरपूर प्रमाणात बनवून घेत आहेत कारण अनेक गावे आहेत ना. मिनिस्टर इत्यादी समजतील की, हे ज्ञान तर चांगले आहे तर सर्वजण ऐकायला लागतील. हो, पुढे चालून तुमचे नाव प्रसिद्ध होईल, मग पुष्कळजण येतील. गंज काढून टाकण्यासाठी वेळ लागतो. रात्रं-दिवस जर कोणी या सेवेला लागतील तर कदाचित कोणी निघतील. आत्मा पवित्र बनेल तर हे शरीर देखील सोडून देईल. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत प्रदर्शनीमध्ये देखील समजावून सांगायचे आहे. मुख्य आहे साऱ्या भारताची गोष्ट. भारताचे राईज (उत्थान) होते तेव्हा सर्वांचे उत्थान होते. प्रदर्शनीमध्ये प्रोजेक्टरद्वारे सुद्धा खूप सेवा होऊ शकते. हळूहळू वृद्धी होत जाईल. दिवसें-दिवस तुमचे नाव प्रसिद्ध होत जाईल. हे देखील लिहायचे आहे की, ५ हजार वर्षांपूर्वी देखील असेच झाले होते. या तर खूप वंडरफुल गोष्टी आहेत. बाबा इशारा देतात. मुले खूप गोष्टी विसरून जातात. काहीही झाले तर म्हणतील - आज पासून ५ हजार वर्षांपूर्वी देखील असेच झाले होते. आहे खूप क्लिअर गोष्ट. परंतु जेव्हा कोणाच्या बुद्धीमध्ये हे पक्के होईल तेव्हा. वर्तमानपत्रांमध्ये देखील देऊ शकता, थोडेतरी समजतील तर खरे. ज्ञान मार्गामध्ये एकदम फर्स्टक्लास अवस्था पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टींची आठवण करून हर्षित राहायचे आहे. सवय झाली की मग अवस्था खूप खुशमिजाज (प्रसन्नचित्त) होते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) इतर सर्वांशी बुद्धीची प्रीत तोडून एका बाबांशी जोडायची आहे आणि सर्वांची प्रीत एका बाबांशी जोडण्याची सेवा करायची आहे.

२) खरे-खरे रूहानी खिदमतगार बनायचे आहे. आपले देखील कल्याण करायचे आहे आणि इतरांना देखील रस्ता सांगायचा आहे. अवस्था खूप प्रसन्नचित्त बनवायची आहे.

वरदान:-
आपल्या श्रेष्ठ व्यवहाराद्वारे सर्व आत्म्यांना सुख देणारे महान आत्मा भव

जे महान आत्मे असतात त्यांच्या प्रत्येक व्यवहारातून सर्व आत्म्यांना सुखाचे दान मिळते. ते सुख देतात आणि सुख घेतात. तर चेक करा की, महान आत्म्याच्या दृष्टिकोनातून मी पूर्ण दिवसभरामध्ये सर्वांना सुख दिले, पुण्याचे काम केले का? पुण्य अर्थात कोणाला अशी वस्तू देणे ज्यामुळे त्या आत्म्याकडून आशीर्वाद मिळतील. तर चेक करा की, प्रत्येक आत्म्याकडून आशीर्वाद मिळत आहेत. कोणालाही दुःख दिले अथवा घेतले तर नाही ना! तेव्हाच म्हणणार महान आत्मा.

बोधवाक्य:-
कर्म केल्या नंतर विचार करणे हे पश्चातापाचे रूप आहे.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

संस्कार अथवा नेचर (स्वभाव) तर प्रत्येकाचा आपला-आपला असतो परंतु सर्वांचा स्नेही बनणे आणि सर्व गोष्टींमध्ये, नात्यांमध्ये सफल, मनसामध्ये विजयी होणे आणि वाणीमध्ये मधुरता येणे हे तेव्हाच येऊ शकते जेव्हा इझी नेचर (सरळ स्वभाव) असेल. इझी नेचर अर्थात जशी वेळ, जशी व्यक्ती, जशी परिस्थिती त्याला ओळखत असताना स्वतःला इझी करेल (जुळवून घेईल). इजी अर्थात मिलनसार, स्वतःला मोल्ड करणारे. इझी अर्थात बेफिकीर नसणारे.