20-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आपणच आपल्याला विचारा की, मी किती वेळ बाबांच्या आठवणी मध्ये राहतो, देही-अभिमानी स्थिती किती वेळ राहते?”

प्रश्न:-
बाबांच्या कोणत्या डायरेक्शनचे पालन केवळ भाग्यवान मुलेच करतात?

उत्तर:-
बाबांचे डायरेक्शन आहे - गोड मुलांनो, आत्म-अभिमानी भव. तुम्ही सर्व आत्मे मेल आहात, फिमेल नाही. तुमच्या आत्म्यामध्येच सारा पार्ट भरलेला आहे. आता हीच मेहनत अथवा अभ्यास करा की, आपण देही-अभिमानी स्थितीमध्ये कसे राहावे. हेच मोठे ध्येय आहे.

गीत:-
तकदीर जगाकर आई हूँ…

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांनी गाणे ऐकले. रूहानी मुले अर्थात जीवाच्या आत्म्यांनी म्हटले की, आम्ही नवीन दुनियेचे भाग्य अर्थात स्वर्गाचे भाग्य बनवून रूहानी बाबांजवळ बसलो आहोत. आता मुलांना रुहानी-अभिमानी अर्थात आत्म-अभिमानी बनायचे आहे. मोठ्यात मोठी मेहनत हीच आहे. स्वतःला आत्मा समजा आणि असे समजा की, मज आत्म्याने ८४ जन्म घेतले आहेत. कधी बॅरिस्टर, कधी काय, कधी काय बनलो आहे. आत्मा मेल आहे, सर्व ब्रदर्स आहेत, ना की सिस्टर्स. आत्मा म्हणते हे माझे शरीर आहे तर त्या हिशेबाने आत्मा मेल आहे (पुरुष आहे) आणि हे शरीर फीमेल झाले (स्त्री झाले). प्रत्येक गोष्टीला चांगल्या रीतीने समजून घ्यायचे आहे. बाबा खूप विशाल आणि महीन बुद्धी बनवत आहेत. आता तुम्ही जाणता - मग आत्म्याने ८४ जन्म घेतले आहेत. चांगले अथवा वाईट संस्कार आत्म्यामध्येच असतात. त्या संस्कारानुसार शरीर देखील असेच मिळते. सर्व काही आत्म्यावर अवलंबून आहे. ही खूप मोठी मेहनत आहे. जन्म-जन्मांतर लौकिक पित्याची आठवण केली, आता पारलौकिक पित्याची आठवण करायची आहे. वारंवार स्वतःला आत्मा समजायचे आहे. आम्ही आत्मे हे शरीर धारण करतो. आता आम्हा आत्म्यांना बाबा शिकवत आहेत. हे आहे रूहानी ज्ञान, जे रुहानी बाबाच देतात. सर्वात पहिली मुख्य गोष्ट म्हणजे मुलांनी देही-अभिमानी बनून राहायचे आहे. देही-अभिमानी बनून राहणे, हे खूप उच्च ध्येय आहे. ज्ञानासाठी उच्च ध्येय म्हणणार नाही. ज्ञानामध्ये मेहनत नाहीये. सृष्टी चक्राला जाणणे - ही आहे हिस्ट्री-जिओग्राफी. उच्च ते उच्च बाबा आहेत. नंतर मग आहेत सूक्ष्मवतन मधील देवता. वर्ल्डची हिस्ट्री-जिओग्राफी तर मनुष्य सृष्टी मध्येच असते. मूलवतन, सूक्ष्मवतन मध्ये कोणतीच हिस्ट्री-जिओग्राफी नाहीये. ते आहेच शांतीधाम. सतयुग आहे - सुखधाम, कलियुग आहे - दु:खधाम. इथे रावण राज्यामध्ये कोणालाच शांती मिळू शकणार नाही.

आता तुम्हा मुलांना ज्ञान मिळाले आहे - आपण आत्मे आहोतच मुळी शांतीधाम मध्ये राहणारे. ही कर्मेंद्रिये कर्म करण्याकरिता आहेत. कर्म करो अथवा न करो. आपण तर आत्मा आहोत, आपला स्वधर्म शांत आहे. कर्मयोगी आहोत ना. कर्म देखील जरूर करायचे आहे. कर्म-संन्याशी कधी बनू शकत नाहीत. हा देखील या संन्याशांचा पार्ट आहे. घरदार सोडून जातात, भोजन बनवत नाहीत, गृहस्थींकडे भिक्षा मागतात; घरदार सोडतात तरीही त्या गृहस्थींकडचेच खातात ना. घरदार सोडतात, तरीही कर्म तर करतात. कर्म-संन्यास काही होऊ शकत नाही. कर्म-संन्यास तेव्हाच होईल जेव्हा आत्मा शांतीधाम मध्ये राहते. तिथे कर्मेंद्रियेच नाहीत तर कर्म कसे करणार, याला (साकार दुनियेला) कर्म-क्षेत्र म्हणतात. तर कर्म-क्षेत्रावर सर्वांना यावेच लागते. ते आहे शांतीधाम अर्थात मूलवतन. असे नाही की ‘ब्रह्म’ तत्वामध्ये आत्म्याला विलीन व्हायचे आहे. आत्मे शांतीधाम मध्ये राहणारे आहेत आणि मग इथे कर्म-क्षेत्रावर पार्ट बजावण्याकरिता येतात. या आहेत तपशीलवार गोष्टी. नटशेल मध्ये (थोडक्यात) तर हेच सांगतात की, ‘स्वतःला आत्मा निश्चय करा आणि बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील’. यालाच भारताचा प्राचीन योग म्हटले जाते. वास्तविक याला ‘योग’ देखील नाही परंतु ‘आठवण’ म्हटले पाहिजे, यामध्येच मेहनत आहे. योगी खूप कमी बनतात. सर्वप्रथम योगाचे शिक्षण पाहिजे, नंतर आहे ज्ञान. सर्वात पहिली आहे - बाबांची आठवण.

बाबा म्हणतात - देही-अभिमानी बना, ही आहे रूहानी आठवणीची यात्रा. ज्ञानाची यात्रा नाही, यामध्ये खूप मेहनत करावी लागेल. कोणी तर भले स्वतःला बी. के. म्हणतात परंतु बाबांची आठवण करत नाहीत. बाबा येऊन ब्रह्माद्वारे तुम्हा मुलांना देही-अभिमानी बनवतात. हे (ब्रह्मा बाबा) देह-अभिमानी होते. आता देही-अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ सुरू आहे. ब्रह्मा काही भगवान नाहीत. इथे तर सर्व मनुष्यमात्र पतित आहेत. पावन, श्रेष्ठाचारी एकही नाही. आत्म्यासाठीच म्हटले जाते - पुण्य-आत्मा, पाप-आत्मा. मनुष्य देखील म्हणतात - ‘माझ्या आत्म्याला त्रास देऊ नका’. परंतु हे समजत नाहीत की, मी कोण आहे? विचारले जाते - हे शरीराची आत्मा, तुम्ही कोणता धंदा करता? तर म्हणतील - ‘मी आत्मा या शरीरा द्वारे अमका धंदा करतो’. तर सर्वात पहिला हा निश्चय करून बाबांची आठवण करा. हे रूहानी नॉलेज बाबांशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही. बाबा येऊन देही-अभिमानी बनवितात. असे नाही की ज्ञानामध्ये कोणी हुशार होतात म्हणजे ते पक्के देही-अभिमानी बनले आहेत. देही-अभिमानी जे आहेत ते ज्ञानाला चांगल्या रीतीने धारण करतात. बाकी इतरही असे अनेक आहेत जे ज्ञानाला चांगल्या रीतीने समजतात, परंतु शिवबाबांची आठवण विसरून जातात. वारंवार स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे, याबाबतीत जिन्न प्रमाणे बनायचे आहे. जिन्नची कहाणी आहे. बाबा देखील हेच काम देतात - ‘माझी आठवण करा, नाहीतर माया तुम्हाला खाऊन टाकेल’. माया एक जिन्न आहे. जितकी शिवबाबांची आठवण कराल तितकी विकर्म विनाश होतील आणि तुम्हाला खूप आकर्षण वाटू लागेल. माया तुम्हाला उलटे करून अनेक वादळांमध्ये घेऊन येईल. तुमच्या बुद्धीमध्ये हेच लक्षात राहावे की, आपण आत्मे बाबांची संतान आहोत. बस्स, याच आनंदामध्ये राहायचे आहे.

देह-अभिमानामध्ये आल्याने माया चापट मारते. हातमताईचा खेळ देखील दाखवतात. मोहर तोंडात टाकल्यावर अदृश्य होतात. जर बाबांच्या आठवणीमध्ये राहाल तर तुम्हाला देखील माया त्रास देणार नाही. यावरच युद्ध चालते. तुम्ही पुरुषार्थ करता आठवण करण्याचा परंतु माया अशी काही नाकाला पकडते जी आठवणच करू देणार नाही, मग तुम्ही हैराण होऊन झोपून जाता. इतके मायेशी युद्ध चालेल. बाकी वर्ल्डची हिस्ट्री-जिओग्राफी तर अतिशय सोपी आहे. तुम्हाला वारंवार सांगितले जाते की, नेहमी असे समजा - आता आपले ८४ जन्म पूर्ण झाले आहेत, आता आपण बाबांना भेटण्यासाठी जात आहोत. हे लक्षात राहणेच अवघड आहे. बाकी कोणाला समजावून सांगणे काही अवघड नाहीये. असे नाही की, आम्ही तर ज्ञान खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतो. नाही, सर्वात पहिली गोष्ट आहेच मुळी आठवणीची. प्रदर्शनीमध्ये असंख्य येतात. सर्वात पहिला हाच धडा शिकवायचा आहे की, स्वतःला आत्मा निश्चय करून बाबांची आठवण करा तर तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. पहिला धडा हाच द्यायचा आहे. भारताचा प्राचीन योग कोणीही शिकवू शकत नाही. बाबा येऊन जेव्हा शिकवतील तेव्हाच शिकू शकतो. मनुष्य, मनुष्याला राजयोग शिकवू शकत नाहीत, इम्पॉसिबल आहे. सतयुगामध्ये तर आहेतच पावन, तिथे तर प्रारब्ध भोगतात. तिथे ज्ञान-अज्ञानाचा तर प्रश्नच नाही. भक्तिमार्गामध्येच बाबांना बोलावतात की, येऊन आमचे दुःख हरण करा, आम्हाला सुख द्या. सतयुग-त्रेतामध्ये काही गुरु-गोसावी असत नाहीत. तिथे तर सद्गती प्राप्त झालेली आहे. सद्गतीचा वारसा २१ जन्मांकरिता तुम्ही प्राप्त करू शकता. २१ पिढी, म्हटले जाते - ब्रह्माकुमारी ती आहे जी २१ पिढीचा उद्धार करेल. हे भारतामध्येच गायले जाते. भारतामध्येच तुम्हाला २१ पिढीचा वारसा मिळतो. तिथे तुम्ही एकच देवी-देवता धर्माचे असता, इतर कोणताही धर्म नसतो. बाबा येऊन तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवतात. पवित्र बनल्या शिवाय आपण परत घरी कसे काय जाऊ शकतो. इथे तर सर्व विकारी पतित आहेत. जे-जे धर्म स्थापक आहेत, ते मग पालना करतात, त्यांच्या धर्माची वृद्धी होत जाते. परत कोणीही जाऊ शकत नाही. एकही ॲक्टर परत घरी जाऊ शकत नाही. सर्वांना सतोप्रधान, सतो-रजो-तमो मध्ये यायचेच आहे. ब्रह्मासाठी देखील म्हणतात - ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची रात्र. तर मग सृष्टीमध्ये एकटे ब्रह्माच असतील काय? आता तुम्ही ब्राह्मण कुळाचे बनले आहात. तुम्ही रात्री मध्ये होता, आता दिवसामध्ये जात आहात.

तुम्हाला समजावून सांगितले आहे की, किती काळ तुम्ही पूज्य स्वरूपामध्ये असता, किती जन्म पुजारी बनता. जोपर्यंत बाबा येत नाहीत तोपर्यंत कोणीही भ्रष्टाचारी पासून श्रेष्ठाचारी बनू शकत नाही. भ्रष्टाचारी त्यांना म्हटले जाते - जे विकारातून जन्म घेतात म्हणून याला हेल (नरक) म्हटले जाते. हेल आणि हेवन दोन्हीमध्ये जर दुःख असेल तर मग त्याला हेवन म्हणताच येणार नाही. जोपर्यंत पूर्ण रीतीने समजून घेतलेले नाही, तोपर्यंत उलटे-सुलटे प्रश्न विचारत राहतील. तुम्ही त्यांना समजावून सांगायचे आहे की, भारत खूप श्रेष्ठ होता. ज्याप्रमाणे ईश्वराची महिमा अपरंपार आहे, तशी भारताची देखील महिमा अपरंपार आहे. भारत काय होता, इतका श्रेष्ठ कोणी बनविला? बाबांनी, ज्यांची महिमा गातात. बाबाच येऊन मुलांना विश्वाचा मालक बनवतात. मनुष्यमात्राला दुर्गतीमधून सद्गती मध्ये घेऊन जातात. शांतीधाम मध्ये घेऊन जातात, यासाठीच मनुष्य पुरुषार्थ करतात. त्याला अटळ सुख, अटळ शांती, अटळ पवित्रता म्हटले जाते. तिथे तुम्ही सुखामध्ये देखील आहात आणि शांतीमध्ये देखील आहात आणि बाकीचे आत्मे शांतीमध्येच राहतात. जास्तीत-जास्त जन्म तुम्हीच घेता. बाकी कमीतकमी जन्म घेणारे अटळ शांतीमध्ये राहतात. ते जणू मच्छरांसदृश्य आले, अर्धा-एक जन्म पार्ट बजावला की गेले; हे काय? त्यांची काहीच किंमत नाही. मच्छरांची काय किंमत आहे. रात्रीला जन्म घेतात, रात्रीलाच मरून जातात. यावेळी जास्त करून शांतीच सर्वांना हवी वाटते, कारण या वेळचे गुरु लोक शांतीमध्येच जाणारे आहेत.

तुम्ही इथे आला आहात स्वर्गवासी बनण्याकरिता. स्वर्गवासीला शांतीवासी म्हणता येणार नाही. शांतीवासी निराकारी दुनियेला म्हटले जाते. मुक्ती शब्द गुरु कडून शिकतात. माता व्रत-वैकल्ये करतात - वैकुंठपुरीमध्ये जाण्याकरिता. कोणाचा मृत्यू झाला तरी देखील म्हणतात - स्वर्गवासी झाला. परंतु असे कोणी स्वर्गवासी होत नाही, भारतवासी हेवनलाच मानतात. समजतात - भारत पॅराडाईज होता. शिवबाबा भारतातच येऊन स्वर्गाची रचना रचतात तर जरूर इथेच रचतील. स्वर्गामध्ये तर येणार नाहीत. म्हणतात - ‘मी येतो स्वर्ग आणि नरकाच्या संगमावर’. कल्प-कल्पाच्या संगमावर येतात. त्यांनी (दुनियावाल्यांनी) मग ‘युगे-युगे’ लिहिले आहे. ‘कल्प’ हा शब्दच विसरून गेले आहेत. हा देखील खेळ बनलेला आहे, पुन्हा तोच रिपीट होईल. या अंतिम जन्मामध्ये तुम्ही बाबांना आणि सृष्टी चक्राला जाणता. कशी नंबरवार स्थापना होते, ते तर आता तुम्हीच जाणता. हा सारा खेळ तुम्हा भारतवासीयांवरच बनलेला आहे. तुम्ही आता बाबांकडून राजयोग शिकत आहात. बाबांच्या आठवणी द्वारेच राज्य प्राप्त करता. चित्रे देखील उभी आहेत ना. ही सर्व चित्रे कोणी बनविली! यांचा (ब्रह्माबाबांचा) कोणी गुरु-गोसावी तर नाही आहे. जर कोणी गुरु असता तरी देखील गुरूला एकच शिष्य थोडाच असतो. भरपूर जण असतात ना. हे नॉलेज बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही जाणू शकत नाही. अनेक लोक विचारतात की, ही चित्रे तुमच्या दादांनी (ब्रह्माबाबांनी) बनवून घेतली आहेत काय? हा तर बाबांनी दिव्य दृष्टी द्वारे साक्षात्कार घडवला आहे. वैकुंठाचा देखील साक्षात्कार घडवला आहे. तिथे स्कूल कसे चालते, भाषा कोणती असते, सर्व साक्षात्कार घडवले आहेत. मुले भट्टीमध्ये होती तेव्हा बाबा मुलांना साक्षात्कार घडवून मुलांचे मनोरंजन करत होते. कराचीमध्ये केवळ तुम्हीच वेगळे स्वतंत्र राहिला होता, जशी आपली राजाई होती. आपली तात, आपली बात (आपल्या ज्ञानाचेच चिंतन आणि आपल्या ज्ञानाच्याच गोष्टी)… दुसरे कोणीही समजू शकणार नाही. समजत होते की, हे खुदा प्रस्थ आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे - तुम्ही नन्स आहात. नन बट वन. एका बाबांशिवाय इतर कोणाचीही आठवण करायची नाही. त्या नन्स क्राईस्टलाच ओळखतात, त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणालाच ओळखत नाहीत.

तुम्ही जाणता वारसा एका शिवबाबांकडूनच मिळतो. शिवबाबा तर आहेत बिंदू. ते देखील कोणाच्या तरी मार्फतच समजावून सांगतील ना. प्रजापिता ब्रह्मा तर जरूर इथेच असणार. बाबा म्हणतात - यांच्या अनेक जन्माच्या अंतीम जन्मामध्ये पतित शरीरामध्ये प्रवेश करतो. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ज्ञानाला चांगल्या रीतीने धारण करून देही-अभिमानी बनायचे आहे. हीच मेहनत आहे. हेच उच्च ध्येय आहे. या मेहनतीने आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे.

२) जिन्न बनून आठवणीची यात्रा करायची आहे. माया कितीही विघ्न टाकेल परंतु मुखामध्ये मुलहरा (मोहर) टाकून ठेवायची आहे. मायेमुळे विचलित व्हायचे नाही. एकाच्या आठवणीमध्ये राहून वादळे पार करायची आहेत.

वरदान:-
‘साधनां’ना युज करत असताना ‘साधने’ला आपला आधार बनविणारे सिद्धी स्वरूप भव

कोणतेही जुन्या दुनियेतील आकर्षित करणारे दृश्य, अल्पकालीन सुखाची साधने युज करत असताना अथवा पाहून त्या साधनांच्या अधीन होता. साधनांच्या आधारावर साधना अशी आहे जणू काही वाळूच्या फाउंडेशनवर बिल्डिंग; त्यामुळे कोणत्याही विनाशी साधनांच्या आधारावर अविनाशी साधना अवलंबून नसावी. साधनं निमित्त मात्र आहेत आणि साधना निर्माणतेचा आधार आहे; त्यामुळे साधनेला महत्त्व द्या म्हणजे मग साधना सिद्धी प्राप्त करून देण्यासाठी मदत करेल.

बोधवाक्य:-
कोणत्याही कमजोरीचा अंश जरी असेल तरी त्यातून वंश जन्माला येईल आणि पराधीन बनवेल.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

बुद्धीला एकाच ठिकाणी टिकवून ठेवण्याची जी युक्ती मिळाली आहे, ती लक्षात ठेवा. विचलित होऊ देऊ नका. देह आणि देहाच्या दुनियेपासून न्यारे बनून, मन-बुद्धीच्या विमानाद्वारे सेकंदामध्ये आकारी आणि निराकारी स्थितींचा अनुभव करा. बुद्धीला विचलित होऊ देऊ नका, नाहीतर युद्धामध्ये खूप वेळ वाया जातो. जसे तपस्वी नेहमी आसनावर बसतात अगदी तसेच आपल्या एकरस स्थितीच्या आसनावर विराजमान होऊन राहा, तेव्हाच भविष्य सिंहासन प्राप्त होईल.