20-08-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - श्रीमतावर चालून सर्वांना मुक्ती-जीवनमुक्ती प्राप्त करण्याचा रस्ता सांगा, संपूर्ण दिवस हाच धंदा करत रहा”

प्रश्न:-
बाबांनी कोणत्या सूक्ष्म गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या चांगल्या समजून घेण्यासारख्या आहेत?

उत्तर:-
१. सतयुग अमरलोक आहे, तिथे आत्मा एक शरीर बदलून दुसरे घेते. परंतु मृत्यूचे नाव नसते म्हणून त्याला मृत्यूलोक म्हटले जात नाही. २. शिवबाबांची बेहद रचना आहे, ब्रह्माची रचना यावेळी केवळ तुम्ही ब्राह्मण आहात. ‘त्रिमूर्ती शिव’ म्हटले जाते, ‘त्रिमूर्ती ब्रह्मा’ नाही. या सर्व अति सूक्ष्म गोष्टी बाबांनी सांगितल्या आहेत. अशा काही गोष्टींवर विचार करून बुद्धीसाठी स्वतःच भोजन तयार करायचे आहे.

ओम शांती।
त्रिमूर्ती शिव भगवानुवाच. आता ते लोक त्रिमूर्ती ब्रह्मा म्हणतात. बाबा म्हणतात - त्रिमूर्ती शिव भगवानुवाच. त्रिमूर्ती ब्रह्मा भगवानुवाच म्हटले जात नाही. तुम्ही त्रिमूर्ती शिव भगवानुवाच म्हणू शकता. ते लोक तर शिव-शंकर असे म्हणून दोन्ही एकत्र करतात. हे तर स्पष्ट आहे. त्रिमूर्ती ब्रह्मा ऐवजी त्रिमूर्ती शिव भगवानुवाच आहे. मनुष्य तर म्हणतात - शंकर डोळे उघडतात तर विनाश होतो. हा सर्व बुद्धीने विचार केला जातो. तिघांचाच मुख्य पार्ट आहे. ब्रह्मा आणि विष्णूचा तर मोठा पार्ट आहे ८४ जन्मांचा. विष्णूचा आणि प्रजापिता ब्रह्माचा अर्थ देखील समजला आहे, पार्ट आहे या तिघांचा. ब्रह्माचे तर नाव गायले गेले आहे - आदि देव, एडम. प्रजापिताचे मंदिर देखील आहे. हा आहे विष्णूचा किंवा कृष्णाचा अंतिम ८४ वा जन्म, ज्यांचे नाव ब्रह्मा ठेवले आहे. सिद्ध तर करायचेच आहे - ब्रह्मा आणि विष्णू. आता ब्रह्माला तर ॲडॉप्टेड म्हटले जाईल. ही दोन्ही मुले आहेत शिवाची. वास्तविक मुलगा एकच आहे. हिशोब कराल तर ब्रह्मा आहे शिवाचा मुलगा. बाप आणि दादा. विष्णूचे नाव सुद्धा येत नाही. प्रजापिता ब्रह्मा द्वारे शिवबाबा स्थापना करत आहेत. विष्णू द्वारे स्थापना करत नाहीत. शिवाची देखील मुले आहेत, ब्रह्माची देखील मुले आहेत. विष्णूची मुले म्हणू शकत नाही. आणि ना लक्ष्मी-नारायणाला सुद्धा अनेक मुले असू शकतात. हे आहे बुद्धीसाठी भोजन. आपणच भोजन बनवले पाहिजे. सर्वात मोठा पार्ट म्हणता येईल विष्णूचा. ८४ जन्मांचे विराट रूप देखील विष्णूचेच दाखवतात, ना की ब्रह्माचे. विराट रूप विष्णूचेच बनवतात कारण सर्वप्रथम प्रजापिता ब्रह्माचे नाव धारण करतात. ब्रह्माचा तर खूप थोडासा पार्ट आहे त्यामुळे विराट रूप विष्णूचेच दाखवितात. चतुर्भुज देखील विष्णूलाच बनवतात. वास्तविक हे अलंकार तर तुमचे आहेत. या देखील खूप समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. कोणताही मनुष्य हे सांगू शकणार नाही. बाबा नवीन-नवीन पद्धतीने समजावून सांगत राहतात. बाबा म्हणतात - ‘त्रिमूर्ती शिव भगवानुवाच’ राइट आहे ना. विष्णू, ब्रह्मा आणि शिव. यांच्यामध्ये देखील प्रजापिता ब्रह्माच मुलगा आहे. विष्णूला मुलगा म्हणता येणार नाही. भले क्रिएशन (रचना) म्हणता येईल परंतु रचना तर ब्रह्माचीच असेल ना. जी मग विविध नाम-रूप धारण करते. मुख्य पार्ट तर त्यांचा आहे. ब्रह्माचा पार्ट देखील खूप थोडा आहे या वेळचा. विष्णूचे किती काळ राज्य आहे! संपूर्ण झाडाचे बीज रूप आहेत शिवबाबा. त्यांच्या रचनेला शाळीग्राम म्हटले जाईल. ब्रह्माच्या रचनेला ब्राह्मण-ब्राह्मणी म्हटले जाईल. आता जितकी शिवाची रचना आहे तितकी ब्रह्माची नाही. शिवाची रचना तर खूप आहे. सर्व आत्मे त्यांचेच औलाद आहेत. ब्रह्माची रचना तर केवळ तुम्ही ब्राह्मणच बनता. हदमध्ये आलात ना. शिवबाबांची बेहदची रचना आहे - सर्व आत्मे. बेहदच्या आत्म्यांचे कल्याण करतात. ब्रह्मा द्वारे स्वर्गाची स्थापना करतात. तुम्ही ब्राह्मणच जाऊन स्वर्गवासी बनाल. अजून कोणाला तर स्वर्गवासी म्हणणार नाही, निर्वाणवासी किंवा शांतीधामवासी तर सगळेच बनतात. सर्वात उच्च सेवा शिवबाबांची असते. सर्व आत्म्यांना घेऊन जातात. सर्वांचा पार्ट वेग-वेगळा आहे. शिवबाबा देखील म्हणतात माझा पार्ट वेगळा आहे. सर्वांचा हिशोब चुक्ता करवून तुम्हाला पतितापासून पावन बनवून घेऊन जातो. तुम्ही इथे मेहनत करत आहात पावन बनण्यासाठी. बाकीचे सर्व महाविनाशाच्या वेळेला हिशोब चुक्ता करून जातील. मग मुक्तिधाम मध्ये बसून राहतील. सृष्टीचे चक्र तर फिरणारच आहे.

तुम्ही मुले ब्रह्मा द्वारे ब्राह्मण बनून मग देवता बनता. तुम्ही ब्राह्मण श्रीमतावर सेवा करता. फक्त मनुष्यांना रस्ता सांगता - मुक्ती आणि जीवनमुक्तीला प्राप्त करायचे असेल तर असे प्राप्त करू शकता. दोन्ही चाव्या हातामध्ये आहेत. हे देखील जाणता कोण-कोण मुक्ती मध्ये, कोण-कोण जीवनमुक्ती मध्ये जातील. तुमचा पूर्ण दिवसभर हाच धंदा आहे. कोणी धान्य इत्यादीचा धंदा करतात तर बुद्धीमध्ये संपूर्ण दिवस तेच असते. तुमचा धंदा आहे रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणणे आणि कोणालाही मुक्ती-जीवनमुक्तीचा रस्ता सांगणे. जे या धर्माचे असतील तेच निघून येतील. बऱ्याच धर्मांचे असे आहेत जे बदलू शकत नाहीत. जसे अँग्लो ख्रिश्चन काळे असतात. रूप तर बदलत नाही. फक्त असेच धर्म बदलतील. असे नाही की फीचर्स बदलतात. फक्त धर्माला मानतात. बरेचजण बौद्ध धर्माला मानतात कारण देवी-देवता धर्म तर प्राय: लोप आहे ना. एकही असा नाही जो म्हणेल आम्ही आदि सनातन देवी-देवता धर्माचे आहोत. देवतांची चित्रे कामाला येतात, आत्मा तर अविनाशी आहे, ती कधी मरत नाही. एक शरीर सोडून मग दुसरे घेऊन पार्ट बजावते. त्याला मृत्यूलोक म्हटले जात नाही. ते आहेच अमरलोक. फक्त शरीर बदलते. या गोष्टी अगदी बारकाईने समजून घेतल्या पाहिजेत. मुट्टा (घाऊक) नाही आहे. जसे लग्न करतात तेव्हा कोणाला किरकोळ, कोणाला घाऊक देतात. कोणी सर्व दाखवून देतात, कोणी बंद पेटीच देतात. विविध प्रकारचे असतात. तुम्हाला तर वारसा मिळतो घाऊक, कारण तुम्ही सर्व ब्राईड्स (वधू) आहात. बाबा आहेत ब्राईडग्रुम (वर). तुम्हा मुलांचा श्रृंगार करून विश्वाची बादशाही घाऊकमध्ये देतात. विश्वाचे मालक तुम्ही बनता.

मुख्य गोष्ट आहे आठवणीची. ज्ञान तर खूप सोपे आहे. भले आहे तर फक्त अल्फची आठवण करणे. परंतु विचार केला जातो आठवणच लगेच निसटून जाते. अनेकजण म्हणतात - ‘बाबा, आठवण विसरायला होते. तुम्ही कोणालाही समजावून सांगाल तर नेहमी ‘आठवण’ शब्द बोला. ‘योग’ शब्द चुकीचा आहे. टीचरला स्टूडेंटची आठवण राहते. फादर आहेत सुप्रीम सोल. तुम्ही आत्मा सुप्रीम नाही आहात. तुम्ही आहात पतित. आता बाबांची आठवण करा. टीचरची, पित्याची, गुरुची आठवण केली जाते. गुरु लोक बसून शास्त्र ऐकवतील, मंत्र देतील. बाबांचा मंत्र एकच आहे - मनमनाभव. त्यानंतर काय होईल? मध्याजी भव. तुम्ही विष्णुपुरीमध्ये निघून जाल. तुम्ही सर्वच काही राजा-राणी बनणार नाही. राजा-राणी आणि प्रजा असते. तर मुख्य आहे त्रिमूर्ती. शिवबाबांच्या नंतर आहेत ब्रह्मा जे मग मनुष्य सृष्टी अर्थात ब्राह्मण रचतात. ब्राह्मणांना बसून शिकवतात. ही नवीन गोष्ट आहे ना. तुम्ही ब्राह्मण-ब्राह्मणी भाऊ-बहिणी आहात. वृद्ध देखील म्हणतील - आम्ही भाऊ-बहीणी आहोत. हे आतून समजून घ्यायचे आहे. कोणालाही फालतू असेच म्हणायचे नाहीये. भगवंताने प्रजापिता ब्रह्मा द्वारे सृष्टी रचली तर भाऊ-बहीणी झाले ना. जेव्हा की एका प्रजापिता ब्रह्माची मुले आहेत, या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. तुम्हा मुलांना तर खूप आनंद झाला पाहिजे - आपल्याला कोण शिकवत आहेत? शिवबाबा. त्रिमूर्ती शिव. ब्रह्माचा देखील खूप थोड्या काळाचा पार्ट आहे. विष्णूचा सतयुगी राजधानीमध्ये ८ जन्मांचा पार्ट चालतो. (८ गाद्या चालतात) ब्रह्माचा तर एकाच जन्माचा पार्ट आहे. विष्णूचा पार्ट जास्त म्हणता येईल. त्रिमूर्ती शिव आहेत मुख्य. त्यानंतर येतो ब्रह्माचा पार्ट जे तुम्हा मुलांना विष्णुपुरीचा मालक बनवितात. ब्रह्मा द्वारेच ब्राह्मण सो मग देवता बनतात. तर हे झाले अलौकिक फादर. थोडा वेळ हे फादर आहेत ज्यांना आता मानतात. आदि देव, आदम आणि बीबी. यांच्याशिवाय सृष्टी कसे रचतील. आदि देव आणि आदि देवी आहेत ना. ब्रह्माचा पार्ट देखील आता संगम वेळेचा आहे. देवतांचा पार्ट तरीही खूप चालतो. देवतांना देखील फक्त सतयुगामध्येच म्हणता येईल. त्रेतामध्ये क्षत्रिय म्हटले जाते. हे खूप गुह्य-गुह्य पॉईंट्स मिळतात. सर्वच पॉईंट्स काही एकाच वेळी वर्णन करू शकणार नाहीत. ते ‘त्रिमूर्ती ब्रह्मा’ म्हणतात. शिवाला काढून टाकले आहे. आपण मग ‘त्रिमूर्ती शिव’ म्हणतो. ही चित्रे इत्यादी सर्व आहेत भक्तीमार्गाची. प्रजेला रचतात ब्रह्मा द्वारे मग तुम्ही देवता बनता. विनाशाच्या वेळी नैसर्गिक आपत्ती देखील येतात. विनाश तर होणारच आहे, कलियुगा नंतर मग सतयुग येईल. एवढ्या सर्व शरीरांचा विनाश तर होणारच आहे. सर्व काही प्रॅक्टिकल मध्ये पाहिजे ना. फक्त डोळे उघडल्याने थोडाच विनाश होऊ शकतो. जेव्हा स्वर्ग गुप्त होतो तर त्यावेळी देखील धरणीकंप इत्यादी होतो तर काय त्यावेळी देखील शंकराने असे डोळे मिचकावले असतील. गातात ना द्वारका अर्थात लंका पाण्याखाली गेली.

आता बाबा समजावून सांगत आहेत - मी आलो आहे पत्थर-बुद्धी असणाऱ्यांना पारस-बुद्धी बनविण्यासाठी. मनुष्य बोलावतात - ‘हे पतित-पावन या, येऊन पावन दुनिया बनवा’. परंतु हे समजत नाहीत की आता कलियुग आहे याच्या नंतर सतयुग येईल. तुम्हा मुलांनी आनंदाने नाचले पाहिजे. बॅरिस्टर इत्यादी परीक्षा पास होतात तर विचार करतात ना - मी पैसे कमवेन, मग घर बांधेन. मी हे करेन. तर तुम्ही आता खरी कमाई करत आहात. स्वर्गामध्ये तर तुम्हाला सर्व काही नवीन मिळेल. विचार करा सोमनाथाचे मंदिर काय होते! एक मंदिर तर नसेल. त्या मंदिराला २५०० वर्षे झाली. बनवण्यासाठी वेळ तर लागला असेल ना. पूजा केली असेल त्याच्या नंतर मग ते लुटून घेऊन गेले. लगेचच तर आले नसतील. पुष्कळ मंदिरे असतील. पूजेसाठी बसून मंदिरे बनवली आहेत. आता तुम्ही जाणता - बाबांची आठवण करत-करत आपण गोल्डन एज्ड मध्ये निघून जाणार. आत्मा पवित्र बनेल. मेहनत करावी लागते. मेहनती शिवाय काम होणार नाही, गायले देखील जाते - सेकंदामध्ये जीवनमुक्ती. परंतु अशी थोडीच मिळते, हे समजून येते - जर संतान बनलो तर जरूर मिळेल. तुम्ही आता मेहनत करत आहात मुक्तीधाममध्ये जाण्यासाठी. बाबांच्या आठवणीमध्ये रहावे लागते. दिवसेंदिवस बाबा तुम्हा मुलांना रिफाईन-बुद्धी (स्वच्छ-बुद्धी) बनवितात. बाबा म्हणतात - तुम्हाला अनेक गुह्य गोष्टी ऐकवतो. अगोदर थोडेच हे सांगितले होते की, आत्मा देखील बिंदू आहे, परमात्मा देखील बिंदू आहेत. म्हणतील अगोदर का नाही हे सांगितले. ड्रामामध्ये नव्हते. आधीच तुम्हाला सांगितले तर तुम्ही समजू शकला नसता. हळू-हळू समजावून सांगत राहतात. हे आहे रावण राज्य. रावण राज्यामध्ये सर्व देह-अभिमानी बनतात. सतयुगामध्ये असतात आत्म-अभिमानी. स्वतःला आत्मा समजतात. आपले शरीर मोठे झाले, आता हे सोडून मग लहान घ्यायचे आहे. आत्म्याचे शरीर पहिले लहान असते मग मोठे होते. इथे तर कोणाचे आयुष्य किती, कोणाचे किती. कोणाचा अकाली मृत्यू होतो. कोणा-कोणाचे १२५ वर्षे देखील आयुष्य असते. तर बाबा म्हणतात - बाबांकडून वारसा घेण्याचा तर तुम्हाला खूप आनंद झाला पाहिजे. गंधर्व विवाह केला ही काही आनंदाची गोष्ट नाहीये, ही तर कमजोरी आहे. कुमारी जर म्हणाली की, मी पवित्र राहू इच्छिते तर कोणी मारतील थोडेच. ज्ञान कमी असेल तर घाबरतात. छोट्या कुमारीला देखील जर कोणी मारले, रक्त इत्यादी निघाले तर पोलिसांकडे रिपोर्ट करा तर त्याची देखील सजा मिळू शकते. प्राण्यांना देखील जर कोणी मारतात तर त्यांच्या वर केस होते, दंड होतो. तुम्हा मुलांना देखील कोणी मारू शकत नाहीत. कुमाराला देखील मारू शकत नाहीत. ते तर आपली कमाई करू शकतात. शरीर निर्वाह करू शकतात. पोट काही जास्त खात नाही - एखाद्या माणसाचे पोट ४-५ रुपयाचे, तर एखाद्या माणसाचे पोट ४००-५०० रुपयाचे. पैसे खूप असतील तर लोभ होतो. गरिबांकडे पैसेच नाहीत तर लोभ देखील नाही. ते शिळ्या भाकरीमध्येच आनंदीत होतात. मुलांनी जास्त खाण्या-पिण्याच्या गोंधळामध्ये देखील जाता कामा नये. खाण्याचा शौक असता कामा नये.

तुम्ही जाणता तिथे आपल्याला काय नाही मिळणार! बेहदची बादशाही, बेहदचे सुख मिळते. तिथे कोणता रोग इत्यादी नाही. हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस सर्व असते. वृद्ध अवस्था देखील तिथे खूप चांगली असते. आनंद असतो. कोणत्याही प्रकारचा त्रास नसतो. प्रजा देखील अशीच बनते. परंतु असे देखील नाही - ठीक आहे, प्रजा तर प्रजा, तेही चालेल. मग तर असे होतील जसे की इथले भिल्ल. सूर्यवंशी लक्ष्मी-नारायण बनायचे असेल तर मग इतका पुरुषार्थ केला पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपण ब्रह्माची नवीन रचना आपसामध्ये भाऊ-बहीणी आहोत, हे समजून घ्यायचे आहे कोणाला सांगण्याची गरज नाही. नेहमी याच आनंदामध्ये रहायचे आहे की, आम्हाला शिवबाबा शिकवत आहेत.

२) खाण्या-पिण्याच्या गोंधळामध्ये जास्त जायचे नाही. लोभ सोडून बेहद बादशाहीच्या सुखाची आठवण करायची आहे.

वरदान:-
अनेक प्रकारच्या प्रवृत्ती मधून निवृत्त होणारे नष्टोमोहा स्मृती स्वरूप भव

स्वतःची प्रवृत्ती, दैवी परिवाराची प्रवृत्ती, सेवेची प्रवृत्ती, हदच्या प्राप्तींची प्रवृत्ती या सर्वांपासून नष्टोमोहा अर्थात न्यारे बनण्यासाठी बापदादांच्या प्रेमळ रूपाला समोर ठेवून स्मृती स्वरूप बना. स्मृतीस्वरूप बनल्याने नष्टोमोहा स्वतः बनाल. प्रवृत्ती पासून निवृत्त होणे अर्थात ‘मी’पणाला समाप्त करून नष्टोमोहा बनणे. अशी नष्टोमोहा बनणारी मुलेच दीर्घकाळाच्या पुरुषार्था द्वारे दीर्घकालीन प्रारब्धाच्या प्राप्तीचे अधिकारी बनतील.

बोधवाक्य:-
कमलपुष्प समान न्यारे रहा तर प्रभू प्रेम मिळत राहील.

अव्यक्त इशारे:- सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना. जे नंबर वन परवाने आहेत त्यांना स्वतःचा अर्थात या देह-भानाचा, दिवस-रात्रीचा, तहान-भुकेचा, आपल्या सुखाच्या साधनांचा, आरामाचा, कोणत्याही गोष्टीचा आधार नको असतो. ते सर्व प्रकारच्या देहाच्या स्मृती पासून हरवलेले अर्थात निरंतर शमेच्या ज्योतीमध्ये लवलीन राहतात. जणूकाही शमा ज्योती स्वरूप आहे, लाईट-माईट रूप आहे, तसे शमे प्रमाणे स्वतः देखील लाईट-माईट रूप बनतात.