20-09-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
30.11.2011 ओम
शान्ति
मधुबन
“अमृतवेलेला विशेष
सर्व शक्तींचे अनुभवी स्वरूप बनून योगची सकाश वायुमंडळामध्ये पसरवा, मनाला सदैव बिझी
ठेवा, काळाची हाक आहे - तीव्र पुरुषार्थी भव”
आज बापदादा चोहो
बाजूंच्या मुलांच्या मस्तकामध्ये भाग्याचे चमकणारे तारे पाहत आहेत. एक आहे - जन्माचा,
दुसरा आहे - नात्याचा आणि तिसरा आहे - प्राप्तींचा. तिन्ही भाग्यांना पाहून हर्षित
होत आहेत. जन्माचे भाग्य तर तुम्ही जाणता की तुम्हा सर्वांना हा दिव्य जन्म,
ब्राह्मण जन्म देणारे स्वयं भाग्यविधाता आहेत. तर विचार करा, किती मोठे भाग्य आहे!
त्यासोबतच नाते, याची विशेषता जाणता की तिन्ही नाती - पिता, शिक्षक आणि सद्गुरू,
तिन्ही नाती एका बाबांसोबत आहेत. एकामध्येच तिन्ही नाती आहेत. प्राप्तींना देखील
जाणता, जिथे बाबा आहेत तिथे प्राप्ती तर सर्वप्रकारच्या आणि बेहदच्या आहेत.
एकामध्येच
तिन्ही नाती आहेत. तसे देखील जीवनामध्ये ही तिन्ही नाती आवश्यक आहेत, परंतु
दुनियेतील लोकांचे प्रत्येक नाते वेगवेगळे आहे आणि तुमची तिन्ही नाती एकामध्येच
आहेत. एकामध्येच तिन्ही नाती असल्यामुळे आठवण देखील, अनुभव देखील सहज होतो. तुम्ही
सर्व तिन्ही नात्यांचे अनुभवी आहात ना! बाबांद्वारे काय मिळते? वारसा. वारसा देखील
किती उच्च मिळतो आणि हा वारसा किती काळ चालतो कारण परमात्मा पित्याद्वारे प्राप्त
होतो. दुसरे नाते आहे शिक्षकाचे, शिक्षणाला सोर्स ऑफ इन्कम म्हटले जाते. तर तुम्हा
सर्वांना शिक्षकाद्वारे किती उच्च प्राप्ती झाली आहे, जाणता ना! अशी उच्च प्राप्ती
परमात्मा पित्याशिवाय इतर कोणाकडूनही होऊ शकत नाही. शिक्षणाने पदाची प्राप्ती होते
आणि तुम्हा सर्वांना सर्वात श्रेष्ठ प्राप्ती आहे, दुनियेमध्ये देखील श्रेष्ठ
प्राप्ती ‘राज्यपदा’ला म्हटले जाते. तर तुम्हाला देखील शिक्षकाद्वारे राज्यपदाची
प्राप्ती झाली आहे. आत्ता देखील स्वराज्याचे राजे आहात, का? आत्मा राजयोगी
असल्यामुळे स्वराज्य अधिकारी बनते. स्व वर राज्य करते. कर्मेंद्रियांच्या वशीभूत
होत नाही, आत्मा मालक होऊन या कर्मेंद्रियांची राजा बनते. तर आत्ताचे स्वराज्य आणि
भविष्यामध्ये देखील राज्य भाग्य प्राप्त होते. तर डबल राज्य आत्ता देखील आणि
भविष्यामध्ये देखील पदाची प्राप्ती होते. आणि तिसरे नाते आहे - सद्गुरूचे. तिन्ही
नाती प्राप्त आहेत ना! आहेत का? पित्याचे, शिक्षकाचे आणि तिसरे आहे सद्गुरूचे.
सद्गुरूद्वारे गुरूचे श्रीमत मिळते. किती श्रेष्ठ मत मिळाले आहे? तर स्वतःला चेक करा
की, सदैव श्रीमतवर चालता की कधी मनमत परमताकडे बुद्धी जाते? चेक केले? जे समजतात की
सद्गुरु द्वारे नेहमीच श्रीमत श्रेष्ठ मतावर चालणारे आहोत, मनमत, परमतावर कधीही
स्वप्नात देखील जात नाही, त्यांनी हात वर करा, जे सदैव श्रीमतवरच चालतात, परमत,
मनमत नसते, त्यांनी हात वर करा.
पहा, मातांनी हात उठवला! थोडे-थोडे उठवत आहेत. कधी-कधी बुद्धी जाते आणि मग परमत,
मनमत धोका देते. आणि विशेष श्रीमत कोणते आहे? स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण
करा. तर सोपे आहे की कठीण आहे? कधी-कधी कठीण जाते! परंतु बाबांची हीच इच्छा आहे की
सदैव या तिन्ही नात्यांनी प्रत्येक मुलाने पुढे-पुढे उडत जावे. तर बापदादा विचारत
आहेत की ज्यांनी हात वर केलेला नाही ते आतापासून मनमत, परमताचा त्याग करू शकतात का?
करू शकता? त्यांनी हात वर करा. अच्छा! कारण बापदादांनी वेळेचा इशारा दिलेला आहे. आता
संगमाचा काळ अत्यंत मौल्यवान आहे आणि बापदादांनी हा देखील इशारा दिलेला आहे की
वर्तमान समयानुसार सर्व काही अचानक होणार आहे त्यामुळे कायम एव्हररेडी बनायचे आहे
ना! तुम्ही सर्वजण सोबत येणार ना की मागाहून येणार? बापदादांसोबत आपल्या घरी यायचे
आहे ना! रेडी आहात ना! सोबत येण्यासाठी रेडी आहात? एव्हर-रेडी! रेडी देखील नाही, तर
एव्हररेडी. तर बापदादा वेळेचा इशारा देत आहेत. या एका जन्मामध्ये २१ जन्मांचे
प्रारब्ध बनवायचे आहे. तर विचार करा किती अटेंशन द्यायचे आहे. बाबांचे प्रत्येक
मुलावर प्रेम आहे, बाबांची हीच इच्छा आहे की प्रत्येक मुलाने बाबांच्या सोबत चलावे
आणि सोबत मिळून राज्य-अधिकारी बनावे.
तर तुम्ही सोबत येण्यासाठी पित्यासमान संपूर्ण आणि संपन्न बनाल तेव्हाच तर सोबत
येणार ना! यावेळी या छोट्याशा जन्मामध्ये २१ जन्मांची प्राप्ती निश्चित आहे. तर
विचार करा संगमाचा हा छोटासा जन्म एक-एक मिनिट किती महान आहे! हिशोब लावा, या
जन्मामध्ये २१ जन्मांचे राज्यभाग्य मिळवायचे आहे तर संगमाचे एक मिनिट देखील किती
व्हॅल्युएबल आहे. तर या व्हॅल्यूला जाणून काय करावे लागेल?
बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे की, दोन गोष्टींवर विशेष लक्ष द्या. कोणत्या
दोन गोष्टी? आठवतात ना! एक आहे - समय आणि दुसरा आहे - संकल्प. संकल्प व्यर्थ जाऊ नये,
वेळ व्यर्थ जाऊ नये. एक-एक सेकंद सफल व्हावा. तर बोला इतके अटेंशन द्यावे लागेल ना!
बापदादांचे तर सर्व मुलांवर प्रेम आहे. बापदादा हेच इच्छितात की एकाही मुलाने सोबत
येण्यापासून वंचित राहू नये. सोबत आहोत, सोबत जाऊ, सोबत राज्य-अधिकारी बनून सदैव
जीवनामध्ये सुख-शांतीचा अनुभव करू. तर बोला, सोबत येणार ना! येणार? मागे तर राहणार
नाही ना? पाहा, तीन भाग्य तर प्रत्येकाच्या मस्तकावर चमकत आहेत. आपल्या मस्तकामध्ये
ही तिन्ही भाग्य दिसून येत आहेत ना! संगमयुगच भाग्यवान युग आहे. जे जितके भाग्य बनवू
इच्छितात तितके बनवू शकतात. परंतु दीर्घकाळ अटेन्शन हवे. तर सर्व मुलांनी
आपल्या-आपल्या पुरुषार्थामध्ये आता तीव्रता आणा. पुरुषार्थी आहात, बापदादा पाहतात
की पुरुषार्थ करत आहेत, परंतु आता सर्वांचा तीव्र (शक्तिशाली) पुरुषार्थ असायला हवा.
बापदादा प्रत्येक मुलाला बालक सो मालक पाहू इच्छितात. कशाचा मालक? सर्व खजिन्यांचा
मालक. कधी-कधी काही मुले बापदादांना म्हणतात की, बाबा, तुम्ही तर सर्व शक्ती दिल्या
आहेत आणि आम्ही देखील स्वतःला मास्टर सर्वशक्तिमान मानतो; परंतु बरीच मुले तक्रार
करतात की कधी-कधी ज्या वेळी ज्या शक्तीची आवश्यकता असते, ती वेळेवर येत नाही. परंतु
याचे कारण काय? बाबांनी प्रत्येकाला सर्व शक्ती दिल्या आहेत. दिल्या आहेत की कोणाला
कमी दिल्या आहेत, कोणाला जास्त दिल्या आहेत? सर्वशक्ती मिळाल्या आहेत, हात वर करा.
सर्वांना मिळाल्या आहेत परंतु वेळेवर का कामी येत नाहीत? याचे कारण काय? कारण जाणता
देखील परंतु त्यावेळी विसरून जाता. सर्वशक्तींचा खजिना प्रत्येक मुलाला वारशामध्ये
मिळाला आहे. बाबांनी सर्वांना सर्वशक्तींचा वारसा दिला आहे, कोणाला कमी, कोणाला
जास्त दिलेला नाहीये.
सर्वशक्ती दिल्या आहेत परंतु वेळेवर का येत नाहीत! तुम्ही विचार करा, जर एखादी
व्यक्ती आपल्या स्वमानाच्या सीटवर सेट नसेल तर त्याची ऑर्डर कोणी मानतो का? तर
ज्यावेळी शक्ती येत नाही, त्याचे कारण आहे की तुम्ही तुमच्या ‘मास्टर
सर्वशक्तिमान’च्या सीटवर सेट नसता, आणि म्हणून सीटशिवाय कोणीही ऑर्डर मानत नाही. तर
सदैव आपल्या सीटवर सेट राहा. कधी व्यर्थ विचार चालतात किंवा कधी टेन्शन येते तर
त्यामुळे स्वमानाची सीट निसटते. बापदादांनी प्रत्येकाला किती स्वमान दिले आहेत.
स्वमानाची किती मोठी लिस्ट आहे! मोजा, किती स्वमान बाबांनी दिले आहेत? स्वमानामध्ये
सेट होत नाही त्यामुळे जिथे स्वमान नाही तिथे काय असते? जाणता ना! देह-अभिमान येतो.
एकतर स्वमान असतो नाहीतर देह-भान असते. तर देह-भानाच्या सीटवरून ऑर्डर द्याल तर
शक्ती मानत नाहीत. नाहीतर मास्टर सर्वशक्तिवानचे शक्ती मानत नाही, असे होऊ शकत नाही.
सीटवर सेट होऊन राहणे, याचा नियमित अभ्यास करा. चेक करा, भले मग तुम्ही कर्मयोग
मध्ये असाल, सेवेमध्ये असाल नाहीतर स्वतःच्या मनन-मंथनामध्ये असाल, परंतु सीटवर सेट
राहता तेव्हाच सर्व शक्ती हजर होतात.
आज बापदादांनी पाहिले, अमृतवेलेला फेरी मारली. चोहो बाजूंना फेरी मारली, मग तो
विदेश असो अथवा देश असो. बापदादांना फेरी मारायला वेळ लागत नाही. तर काय पाहिले?
सांगू? सगळे मेजॉरिटी बसले तर होते, उठून आपापल्या जागी बसले होते, पुरुषार्थ देखील
करत होते की पूर्ण वेळ सर्व अनुभवीमूर्त होऊन बसावे, परंतु काय पाहिले? तुमच्यापैकी
काहीजणच अनुभवी मूर्त बनले होते, कारण सर्वात मोठी शक्ती अनुभवाची आहे. अनुभवी
स्वरूप, सर्व शक्तींचे अनुभवी स्वरूप, मास्टर नॉलेजफुल, मास्टर सर्वशक्ती स्वरूप;
तर अनुभवी स्वरूप बनण्यामध्ये काही कमतरता दिसून आल्या. पुरुषार्थ करतात, बापदादांनी
तरी सुद्धा मुबारक दिली; जे पुरुषार्थ करून मेजॉरिटी येतात, बसतात मेजॉरिटी आहेत,
परंतु बापदादांची हीच इच्छा आहे की, लाईट-माईट स्वरूपाचे अनुभवी मूर्त बनून बसावे,
कारण ही अमृतवेलेच्या योगची सकाश संपूर्ण वायुमंडळामध्ये पसरते. या अनुभवाला आणखी
जास्त वाढवा. जसे ब्रह्मा बाबांना पाहिले, किती पॉवरफुल फरिश्ता स्वरूपाची स्थिती
होती. तसेच या अमृतवेलेला आता आपापल्या पद्धतीने अजून अथक होऊन अटेन्शन द्या.
बापदादांनी पाहिले बरीच मुले लाईट-माईट स्वरूपामध्ये देखील बसतात, नाहीत असे नाही,
आहेत देखील; परंतु या वेळच्या पुरुषार्थावर अजून जास्त अटेंशन द्यावे लागेल. आणि
बापदादांनी यापूर्वी देखील इशारा दिला आहे की, आपल्या मनाला सदैव बिझी ठेवा. भले मग
मनसा सेवेद्वारे, वाचेद्वारे, अथवा मनन शक्तीमध्ये बिझी ठेवा. मनन करा. मनन शक्ती
मनाला एकाग्र बनवते. काही-काही मुले मनन चांगले करतात देखील परंतु मनन शक्तीला
देखील संपूर्ण दिवसभरामध्ये वाढवा कारण बापदादांचे शेवटच्या मुलावर सुद्धा प्रेम आहे.
लास्ट मुलाबाबत देखील बापदादांची हीच इच्छा आहे की सोबत यावे, मागे राहू नये.
पाठीमागे राहू नये. तर काय कराल? अटेन्शन!
आज बापदादा सभेला पाहून जाणतात की मुलांची वृद्धी होणारच आहे. ७५ वर्षांची जुबिली
साजरी केली. त्याची तर बापदादा मुलांना मुबारक देत आहेत. बापदादांनी सेवेची आवड
देखील पाहिली, प्रत्येक स्थानावरील मुलांना उमंग आहे, तसेच सेवेचे फळ आणि सेवेचे बळ
ते देखील दिसून येत आहे. विशेष बापदादांनी पाहिले की जिथेपण मुलांनी सेवा केली आहे
तिथे यावेळी गव्हर्मेंटचे निमित्त बनलेले आत्मे जास्त आले आहेत आणि रिझल्टमध्ये
मानतात देखील की सध्याच्या वेळेनुसार जेव्हा दुःख आणि अशांती वाढत आहे तेव्हा हा जो
टॉपिक ठेवला आहे तो आवश्यक आहे. कारण जितकी जास्त शांतीची अपेक्षा ठेवतात तितकीच
अशांतता वाढत आहे. अशांतता पसरवणारी कोणती ना कोणती गोष्ट उद्भवतेच आहे. यासाठी चोहो
बाजूला टेन्शन वाढत आहे आणि गव्हर्मेंटला देखील वाटते आहे की भारत टेन्शन-फ्री
व्हावा. तर सर्वांनी, ज्या मुलांनी सेवा केली आहे त्या सर्व मुलांना बापदादा मुबारक
देत आहेत आणि जे करणार आहेत त्यांना देखील ॲडव्हान्समध्ये मुबारक देत आहेत.
बापदादांना आता हेच हवे आहे की, प्रत्येक मुलाने फॉलो फादर करत पित्या समान संपन्न
जरूर बनावे. बापदादांनी पाहिले की सर्व मुले पुरुषार्थ देखील करत आहेत. पुरुषार्थाची
ओढ देखील आहे, स्वतःशी प्रॉमिस देखील खूप करतात, आता असे करणार नाही, आता असे करणार
नाही... परंतु कारण काय होते? याचे कारण आहे - पुरुषार्थामध्ये दृढतेची कमतरता आहे.
मधून-मधून निष्काळजीपणा येतो. होऊन जाऊ, बनून जाऊ... असा निष्काळजीपणा पुरुषार्थाला
शिथिल करतो. तर आता काय कराल? आता विशेष करून यावर अटेंशन द्या, स्वतःच स्वतःचा
प्रोग्राम बनवा, ज्यामध्ये मनाला पूर्ण दिवसभर बिझी ठेवा. स्वतःचा प्रोग्राम स्वतः
बनवा. मनाला बिझी ठेवण्याचे टाईमटेबल स्वतःचे स्वतः बनवा. भले मग मनन करा, सेवा करा,
अथवा एकमेकांचे लक्ष वेधून घ्या परंतु बिझी ठेवा, मनाने बिझी. शरीराने तर बिझी
असताच, परंतु मनाने बिझी रहा. मनाला बिझी ठेवण्याच्या बाबतीत नंबर वन बिझनेसमॅन बना.
हे करू शकता का? करणार? करणार? कारण तुम्ही जाणता ब्रह्मा बाबा देखील तुमची
प्रतीक्षा करत आहेत आणि तुमची ॲडव्हान्स पार्टी देखील तुमची प्रतीक्षा करत आहे, कधी
समयाला समीप आणता; कारण समयाला समीप आणण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. स्वतःला
संपन्न बनवणे अर्थात समयाला समीप आणणे.
तर बापदादांनी विशेष एक महिना दिलेला आहे. या एका महिन्यामध्ये प्रत्येकाला तीव्र
पुरुषार्थी बनून, ‘पुरुषार्थी’ नाही ‘तीव्र पुरुषार्थी’ बनायचेच आहे. मंजूर आहे? आहे
मंजूर? हात वर करा. अच्छा, मुबारक असो! आता प्रत्येकाने दृढ संकल्प करून दररोज
बापदादांना पूर्ण दिवसाचा आपला रिझल्ट कसा द्यायचा आहे? तीव्र पुरुषार्थाचा.
पुरुषार्थ नाही तीव्र पुरुषार्थ. यासाठी तयार आहात? आहात तयार? दोन्ही हात वर करा.
खूप छान. आता बापदादा अचानकच मधेच रिझल्ट मागवतील. डेट सांगणार नाहीत. अचानकच एका
महिन्याच्या आत कोणत्याही डेटला रिझल्ट मागवतील. करायचेच आहे. हे स्वतःच स्वतःशी
प्रॉमिस करा. बापदादा करवून घेतील, ते तर करवून घेतातच; परंतु आपणहून स्वतःशी हा
संकल्प करा आणि प्रॅक्टिकल करून दाखवा. करायचेच आहे. करू, करू-करू नाही... आता हे
करू-करू चांगले नाही. वेळ पुढे जात आहे, अती मध्ये जात आहे, तर समयाचे परिवर्तन
करणाऱ्या तुम्हा पूर्वजांना आपल्या दुःखी परिवारावर दया येत नाही काय? दयाळू बना.
दुःखी असणाऱ्यांना सुखाचा मार्ग सांगा, भले मग मनसाद्वारे असो, वाचेद्वारे असो, अथवा
संबंध-संपर्काद्वारे असो. आपला परिवार आहे ना! तर परिवाराचे दुःख नाहीसे करायचे आहे.
दयाळू बना. अच्छा.
आता जिथे पण जे बसले आहेत त्या सर्वांना, भले टी.व्ही.मध्ये पाहत आहेत, अथवा इथे
वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले आहेत ते देखील टी.व्ही.मध्ये पाहत आहेत, एका-एका मुलाला
बापदादा आज ‘तीव्र पुरुषार्थी’चे टायटल देत आहेत. आता याच टायटलला कायम लक्षात ठेवा.
कोणी विचारले तुम्ही कोण आहात? तर हेच बोला - ‘तीव्र पुरुषार्थी’. ठीक आहे, सर्वांना
मंजूर आहे? मंजूर आहे? आता ढिला पुरुषार्थ चालणार नाही, वेळ पुढे पळत आहे त्यामुळे
आता तीव्र पुरुषार्थी बनायचेच आहे, काळाची हाक आहे - ‘तीव्र पुरुषार्थी भव’. तर
सर्व मुलांना बापदादांची खूप-खूप प्रेमपूर्वक आठवण आणि तीव्र पुरुषार्थाची सौगात
देत आहेत. अच्छा - ओम् शांती.
वरदान:-
मायेच्या
नॉलेजपासून इनोसेंट आणि ज्ञानामध्ये सेंट (संत) बनणारे संपूर्ण पवित्र भव
जसे सतयुगी आत्मे
विकारांच्या गोष्टींच्या नॉलेजपासून इनोसेंट असतात, तेच संस्कार जर आता स्पष्ट
स्मृतीमध्ये राहिले तर मायेच्या नॉलेजपासून इनोसेंट बनाल. परंतु भविष्य संस्कार
स्मृतीमध्ये तेव्हा स्पष्ट राहतील जेव्हा आत्मिक स्वरूपाची स्मृती निरंतर आणि
स्पष्ट असेल. जसा देह स्पष्ट दिसून येतो तसे आपल्या आत्म्याचे स्वरूप स्पष्ट दिसून
यावे अर्थात अनुभवता यावे तेव्हा म्हणणार मायेपासून इनोसेंट आणि ज्ञानामध्ये सेंट
अर्थात संपूर्ण पवित्र.
सुविचार:-
आतील अशुद्धीच
संपूर्ण शुद्ध बनण्यामध्ये विघ्न आणते.
अव्यक्त इशारे - आता
आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.
तुम्ही ईश्वरीय
सेवाधारी सेवा करणारे आहात, सेवा घेणारे नाही. जर सेवा घेणारे बनता तर नावाप्रमाणे
तुमचे कर्तव्य झाले नाही. खुदाई-खिदमतगार कधी सेवा ‘घेत’ नाहीत, ‘देतात’, कारण
दात्याची मुले आहेत. जसे बाबा काही घेत नाहीत, ते तर सदैव देतात, तसे तुम्ही देखील
देणारे बना. जर कधी समस्या स्वरूप बनता तरी देखील सेवा घेता. कोणत्याही प्रकारची
एक्सट्रा सेवा घेणाऱ्यांना कधीही हा नशा राहणार नाही की, आम्ही दात्याची, वरदात्याची
मुले आहोत.
विशेष सूचना -
महिन्याच्या तिसऱ्या रविवारचा योग अभ्यास:-
आज महिन्याचा तिसरा
रविवार आहे, सर्व भाऊ-बहिणींनी संघटित रूपाने एकत्र येऊन सायंकाळी ६:३० ते ७:३०
वाजेपर्यंत आपल्या ज्ञान-स्वरूप स्थितीमध्ये स्थित होऊन, ज्ञानाची लाइट आणि योगची
माइट सर्व आत्म्यांना देऊन योग्य मार्ग दाखविण्याची अथवा त्यावर चालण्याची शक्ती
प्रत्येक आत्म्यापर्यंत पोहोचावी, अशा शुभ संकल्पांनी विश्वकल्याणाची सेवा करावी.