20-12-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - सद्गुरू आले आहेत तुमचे श्रेष्ठ भाग्य बनविण्याकरिता तर तुमचे वर्तन
अतिशय
प्रश्न:-
ड्रामाचा असा
कोणता प्लॅन बनलेला आहे ज्यामुळे कोणालाही दोष देऊ शकत नाही?
उत्तर:-
ड्रामामध्ये या जुन्या दुनियेच्या विनाशाचा प्लॅन बनलेला आहे, यामध्ये कोणाचाही दोष
नाही. यावेळी याचा विनाश करण्याकरिता प्रकृतीला खूप संताप आलेला आहे. सर्वत्र भूकंप
होतील, घरे कोसळतील, पूर येईल, दुष्काळ पडेल; म्हणून बाबा म्हणतात - ‘मुलांनो, आता
या जुन्या दुनियेतून तुम्ही तुमचा बुद्धियोग काढा, सद्गुरूच्या श्रीमतावर चाला.
जिवंतपणी देहाचे भान सोडून स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ
करत रहा.
गीत:-
हमें उन राहों
पर चलना है…
ओम शांती।
कोणत्या मार्गावर चालायचे आहे? गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चालायचे आहे. हे कोणते
गुरु आहेत? उठता-बसता लोकांच्या मुखातून निघून जाते - ‘वाह गुरू’. गुरु तर अनेक
आहेत. वाह गुरू कोणाला म्हणता येईल? कोणाची महिमा गातील? सद्गुरू एक बाबाच आहेत.
भक्ती मार्गामध्ये अनेक गुरु आहेत. कोणी कोणाची महिमा करतात, कोणी कोणाची महिमा
करतात. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे सच्चे सद्गुरू ते एकच आहेत ज्यांची स्तुती केली
जाते. सच्चा सद्गुरू आहे तर जरूर खोटे देखील असतील. सच्चा सद्गुरू आहे संगमावर.
भक्तीमार्गामध्ये देखील सत्याची महिमा गातात. उच्च ते उच्च बाबाच सच्चे आहेत, तेच
लिबरेटर, गाईड देखील बनतात. आजकालचे गुरु लोक तर गंगास्नान करण्यासाठी किंवा तीर्थ
क्षेत्रांवर घेऊन जाणारे गाईड बनतात. हे सद्गुरू काही असे नाहीत. ज्यांची सर्वजण
आठवण करतात - ‘हे पतित-पावन या’. पतित-पावन, सद्गुरूलाच म्हटले जाते. तेच पावन बनवू
शकतात. ते गुरू लोक पावन बनवू शकत नाहीत. ते काही असे म्हणत नाहीत की, ‘मामेकम् (मज
एकाची) आठवण करा’. भले गीता देखील वाचतात परंतु अर्थ काहीच माहित नाही. जर समजत असते
की, सद्गुरू एक आहे तर स्वतःला गुरु म्हणवून घेतले नसते. ड्रामा अनुसार
भक्तिमार्गाचे डिपार्टमेंटच वेगळे आहे ज्यामध्ये अनेक गुरु, अनेक भक्त आहेत. इथे तर
एकच आहेत. मग हे देवी-देवता पहिल्या नंबरमध्ये येतात. आता लास्ट नंबरमध्ये आहेत.
बाबा येऊन यांना सतयुगाची बादशाही देतात. तर बाकी सर्वांना ऑटोमॅटिकली परत जायचे आहे.
म्हणून सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत असे म्हटले जाते. तुम्ही समजता कल्प-कल्प
संगमावरच देवी-देवता धर्माची स्थापना होते. तुम्ही पुरुषोत्तम बनता. बाकी अजून काही
काम करत नाही. गायले देखील जाते गती-सद्गती दाता एकच आहेत. ही बाबांचीच महिमा आहे.
गती-सद्गती संगमावरच मिळते. सतयुगामध्ये तर आहे एक धर्म. ही देखील समजून घेण्याची
गोष्ट आहे ना. परंतु ही बुद्धी देणार कोण? तुम्ही समजता बाबाच येऊन युक्ती सांगतात.
श्रीमत देतात कोणाला? आत्म्यांना. ते पिता देखील आहेत, सद्गुरू देखील आहेत, टीचर
देखील आहेत. ज्ञान शिकवतात ना. बाकी सर्व गुरु भक्तीच शिकवतात. बाबांच्या
ज्ञानाद्वारे तुमची सद्गती होते. आणि मग या जुन्या दुनियेमधून निघून जातात. तुमचा
हा बेहदचा संन्यास देखील आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे - तुमचे आता ८४ जन्मांचे
चक्र पूर्ण झाले आहे. आता ही दुनिया नष्ट होणार आहे. जसे कोणी पेशंट सिरियस होतो
तेव्हा म्हणतो - आता हा तर जाणार आहे, त्याची आठवण कसली करायची. शरीर नष्ट होईल.
बाकी आत्मा तर जाऊन दुसरे शरीर घेते. आशा भंग पावते. बंगालमध्ये तर जेव्हा बघतात की
काही आशा राहिली नाहीये तर गंगेवर जाऊन बुडवतात जेणेकरून प्राण निघून जावा.
मूर्तींची देखील पूजा करून मग जाऊन म्हणतात - बुडून जा… बुडून जा… आता तुम्ही जाणता
ही सारी दुनिया बुडणार आहे. पूर येईल, आग लागेल, माणसे उपासमारीने मरतील. या सर्व
परिस्थिती येणार आहेत. भूकंपामध्ये घरे इत्यादी कोसळतील. यावेळी प्रकृतीला संताप
येतो तर सर्वकाही नष्ट करून टाकते. या सर्व परिस्थिती सगळ्या दुनियेसाठी येणार आहेत.
अनेक स्वरूपामध्ये मृत्यू येतो. बॉम्ब्समध्ये देखील विष भरलेले आहे. थोडासा वास
आल्याने बेशुद्ध होतात. हे तुम्ही मुले जाणता की काय-काय होणार आहे. हे सर्व कोण
करून घेते? बाबा तर करून घेत नाहीत. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. कोणालाच दोष
देणार नाही. ड्रामाचा प्लॅन बनलेला आहे. जुनी दुनिया तीच मग नवीन जरूर होणार.
नैसर्गिक आपत्ती येतील. विनाश होणारच आहे. या जुन्या दुनियेतून बुद्धीचा योग काढून
टाका, याला बेहदचा संन्यास म्हटले जाते.
आता तुम्ही म्हणाल -
वाह सद्गुरू वाह! जो आम्हाला हा रस्ता सांगितलात. मुलांना देखील समजावून सांगतात -
असे वर्तन करू नका ज्यामुळे त्यांची निंदा होईल. तुम्ही इथे जिवंतपणी मरता. देहाला
सोडून स्वतःला आत्मा समजता. देहा पासून न्यारी आत्मा बनून बाबांची आठवण करायची आहे.
हे तर खूप चांगले सांगतात वाह सद्गुरू वाह! पारलौकिक सद्गुरूचीच वाह-वाह होते.
लौकिक गुरु तर पुष्कळ आहेत. सद्गुरू तर एकच आहेत खरे-खरे, ज्यांचे मग
भक्तिमार्गामध्ये देखील नाव चालत येते. साऱ्या सृष्टीचे पिता तर एकच आहेत. नवीन
सृष्टीची स्थापना कशी होते, हे देखील कोणाला माहित नाही आहे. शास्त्रांमध्ये तर
दाखवतात प्रलय झाला आणि मग पिंपळाच्या पानावर श्रीकृष्ण आला. आता तुम्ही समजता
पिंपळाच्या पानावर कसा येईल. श्रीकृष्णाची महिमा करुन काहीच फायदा होत नाही.
तुम्हाला आता चढत्या कलेमध्ये घेऊन जाण्याकरिता सद्गुरू मिळाले आहेत. म्हटले जाते
ना - ‘चढती कला तेरे भाने सर्व का भला’. तर रुहानी बाबा आत्म्यांना बसून समजावून
सांगतात. ८४ जन्म देखील आत्म्यानेच घेतले आहेत. प्रत्येक जन्मामध्ये नाव-रूप दुसरे
असते. असे म्हणणार नाही की, अमक्याने ८४ जन्म घेतले आहेत. नाही, आत्म्याने ८४ जन्म
घेतले. शरीरे तर बदलत जातात. तुमच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत. सारे नॉलेज
बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. कोणीही आले तर त्यांना समजावून सांगायचे आहे. आदि
काळामध्ये होतेच मुळी देवी-देवतांचे राज्य, नंतर मध्य काळामध्ये रावण राज्य झाले.
शिडी उतरत राहिलात. सतयुगामध्ये म्हणणार सतोप्रधान मग सतो, रजो, तमोमध्ये उतरत
येतात. चक्र फिरत राहते. कोणी-कोणी तर म्हणतात - बाबांना काय पडले होते जे ८४ च्या
चक्रामध्ये आम्हाला आणले. परंतु हे तर सृष्टीचे चक्र अनादि बनलेले आहे, याच्या
आदि-मध्य-अंताला जाणायचे आहे. मनुष्य असूनही जर जाणत नसेल तर तो नास्तिक आहे. हे
जाणल्याने तुम्हाला किती उच्च पद मिळते. हे शिक्षण किती श्रेष्ठ आहे. मोठी परीक्षा
पास करणाऱ्याच्या मनामध्ये आनंद असतो ना, आपण खूप मोठे पद प्राप्त करणार. तुम्ही
जाणता हे लक्ष्मी-नारायण आपल्या अगोदरच्या जन्मामध्ये शिकून मग मनुष्यापासून देवता
बनले.
या शिक्षणाने ही
राजधानी स्थापन होत आहे. शिक्षणाने किती उच्च पद मिळते. वंडर आहे ना. इतकी मोठी-मोठी
मंदिरे जे बांधतात किंवा जे मोठ-मोठे विद्वान इत्यादी आहेत त्यांना विचारा की,
सतयुगाच्या सुरुवातीला यांनी जन्म कसा घेतला तर सांगू शकणार नाहीत. तुम्ही जाणता हा
तर गीतेमध्ये वर्णन असलेलाच राजयोग आहे. गीता वाचत आले आहेत परंतु त्यापासून फायदा
काहीच नाही आहे. आता तुम्हाला बाबा बसून ऐकवत आहेत. तुम्ही म्हणता - ‘बाबा, आम्ही
तुम्हाला ५ हजार वर्षांपूर्वी देखील भेटलो होतो’. कशासाठी भेटला होता? स्वर्गाचा
वारसा घेण्यासाठी. लक्ष्मी-नारायण बनण्याकरिता. लहान, मोठे, वृद्ध इत्यादी कोणीही
येतात तर जरूर शिकून येतात. एम ऑब्जेक्टच हे आहे. सत्य नारायणाची सत्य कथा आहे ना.
हे देखील तुम्ही समजता, राजाई स्थापन होत आहे. ज्यांना चांगल्या रीतीने समजते
त्यांना आंतरिक आनंद होत असतो. बाबा विचारतील हिंमत आहे ना राजाई घेण्याची? म्हणतात
- ‘बाबा, का नाही, आम्ही शिकतोच आहोत नरापासून नारायण बनण्याकरिता. इतका वेळ आम्ही
स्वतःला देह समजून बसलो होतो आता बाबांनी आम्हाला सत्य मार्ग सांगितला आहे.
देही-अभिमानी बनण्यामध्ये मेहनत लागते. वारंवार आपल्या नावा-रूपामध्ये अडकून पडतात.
बाबा म्हणतात - या नावा-रूपापासून न्यारे बनायचे आहे. आता आत्मा हे देखील नाव तर आहे
ना. बाबा आहेत सुप्रीम परमपिता, लौकिक पित्याला परमपिता म्हणणार नाही. ‘परम’ शब्द
केवळ एका बाबांनाच दिला आहे. ‘वाह गुरु’ देखील यांनाच म्हटले जाते. तुम्ही शीख
लोकांना देखील समजावून सांगू शकता. ग्रंथ साहेब मध्ये तर पूर्ण वर्णन आहे. इतर
कोणत्या शास्त्रामध्ये इतके वर्णन नाही आहे जितके या ग्रंथ साहेब मध्ये, जप साहेब
सुखमणी मध्ये आहे. हे दोनच मोठे शब्द आहेत. बाबा म्हणतात - साहेबची आठवण करा तर
तुम्हाला २१ जन्मांसाठी सुख मिळेल. यामध्ये गोंधळून जाण्याचा तर प्रश्नच नाही. बाबा
खूप सोपे करून समजावून सांगतात. कित्येक हिंदू कन्व्हर्ट होऊन शीख बनले आहेत.
तुम्ही लोकांना रस्ता
सांगण्यासाठी किती चित्रे इत्यादी बनवता. किती सहजपणे समजावून सांगू शकता. तुम्ही
आत्मा आहात, मग विविध धर्मांमध्ये आला आहात. हे व्हरायटी धर्मांचे झाड आहे; इतर
कोणालाच हे ठाऊक नाही आहे की क्राइस्ट कसा येतो. बाबांनी सांगितले होते - नवीन
आत्म्याला कर्म भोग असू शकत नाही. क्राइस्टच्या आत्म्याने कोणते विकर्म थोडेच केले
ज्याची सजा मिळेल. ती तर सतोप्रधान आत्मा येते, ज्याच्यामध्ये ती येऊन प्रवेश करते
त्याला क्रॉस इत्यादीवर चढवतात, क्राईस्टला नाही. ती तर जाऊन दुसरा जन्म घेऊन मोठे
पद प्राप्त करते. पोपची देखील चित्रे आहेत.
या वेळी ही सारी
दुनिया एकदमच वर्थ नॉट ए पेनी (कवडी तुल्य) आहे. तुम्ही देखील होता. आता तुम्ही
वर्थ पाउंड (हिरे तुल्य) बनत आहात. असे नाही की त्यांचे वारसदार त्यांच्या मागे
खातील, असे काहीच होत नाही. तुम्ही तुमचे हात भरपूर करून जाता, बाकीचे सर्व रिकाम्या
हाताने जातील. तुम्ही भरपूर होण्यासाठीच शिकत आहात. हे देखील जाणता जे कल्पापूर्वी
आले आहेत तेच येतील. थोडे जरी ऐकले तरी देखील येतील. सर्वांना एकत्र तर पाहू देखील
शकणार नाही. तुम्ही असंख्य प्रजा बनवत जाता, बाबा सर्वांना थोडेच पाहू शकतात. थोडे
फार ऐकल्याने देखील प्रजा बनत जाते. तुम्ही मोजदाद सुद्धा करू शकणार नाही.
तुम्ही मुले सेवेवर
आहात, बाबा देखील सेवेवर आहेत. बाबा सेवेशिवाय राहू शकत नाहीत. रोज पहाटे सेवा
करण्यासाठी येतात. सत्संग इत्यादी देखील पहाटेच करतात. त्यावेळी सर्वांना वेळ असतो.
बाबा तर म्हणतात तुम्हा मुलांनी घरातून खूप पहाटे देखील यायचे नाही आणि रात्रीचे
देखील यायचे नाही कारण दिवसेंदिवस दुनिया खूप खराब होत जात आहे म्हणून गल्लोगल्ली
सेंटर असे जवळ असायला हवे, जे घरातून निघाले आणि सेंटरवर पोचले, सोपे व्हावे. तुमची
वृद्धी होईल तेव्हा राजधानी स्थापन होईल. बाबा सांगतात तर खूप सोप्या पद्धतीने आहेत.
या राजयोगा द्वारे स्थापना करत आहेत. बाकी ही सारी दुनिया असणारही नाही. प्रजा तर
किती प्रचंड बनते. माळा देखील बनणार आहे. मुख्य तर जे अनेकांची सेवा करून आपसमान
बनवतात, तेच माळेचे मणी बनतात. लोक माळा जपतात परंतु अर्थ थोडाच समजतात. बरेच गुरु
लोक माळा जपण्यासाठी देतात जेणेकरून त्यामध्ये बुद्धी एकाग्र होऊन रहावी. काम विकार
महाशत्रू आहे, दिवसेंदिवस खूप तीव्र होत जाईल. तमोप्रधान बनत जातात. ही दुनिया खूप
घाणेरडी आहे. बाबांना कित्येकजण सांगतात आम्ही तर खूप हैराण झालो आहोत, लवकर
सतयुगामध्ये घेऊन चला. बाबा म्हणतात - धीर धरा, स्थापना होणारच आहे याची खात्री आहे.
हा निश्चयच तुम्हाला घेऊन जाईल. मुलांना हे देखील सांगितले आहे तुम्ही आत्मे
परमधामहून आला आहात आता पुन्हा तिथेच जायचे आहे, मग परत येणार पार्ट बजावण्याकरिता.
तर परमधामची आठवण करावी लागेल. बाबा देखील म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा
तर विकर्म विनाश होतील. हाच संदेश सर्वांना द्यायचा आहे, अजून कोणी पैगंबर मेसेंजर
इत्यादी नाही आहेत. ते तर मुक्तिधाम मधून खालीच घेऊन येतात. मग त्यांना शिडी खाली
उतरायची आहे. जेव्हा पूर्ण तमोप्रधान बनतात तेव्हा मग बाबा येऊन सर्वांना सतोप्रधान
बनवतात. तुमच्यामुळे सर्वांना परत जावे लागते कारण तुम्हाला नवीन दुनिया हवी आहे ना
- हा देखील ड्रामा बनलेला आहे. मुलांना तर खूप नशा राहिला पाहिजे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या देहाच्या
नावा-रूपापासून न्यारे होऊन देही-अभिमानी बनायचे आहे. असे वर्तन करायचे नाही
ज्यामुळे सद्गुरूची निंदा होईल.
२) माळेचा मणी
बनण्याकरिता अनेकांना आपसमान बनविण्याची सेवा करायची आहे. याच आंतरिक आनंदामध्ये
रहायचे आहे की आम्ही राजाई घेण्यासाठी शिकत आहोत. हे शिक्षण आहेच नरापासून नारायण
बनण्याचे.
वरदान:-
निरंतर आठवणी
द्वारे अविनाशी कमाई जमा करणारे सर्व खजिन्यांचे अधिकारी भव
निरंतर आठवणीद्वारे
प्रत्येक पावलामध्ये कमाई जमा करत रहा तर सुख, शांती, आनंद, प्रेम… या सर्व
खजिन्यांच्या अधिकाराचा अनुभव करत रहाल. कोणतेही कष्ट (दुःख), दुःख म्हणून अनुभव
होणार नाही. संगमावर ब्राह्मणांना कोणतेही कष्ट होऊ शकत नाहीत. आणि कोणते दुःख आले
जरी तरी बाबांची आठवण करून देण्याकरिता, जसे गुलाबाच्या फुला सोबत काटे असतात जे
त्याच्या सुरक्षिततेचे साधन असते. तसेच हे कष्ट अजूनच बाबांची आठवण करून देण्यासाठी
निमित्त बनतात.
बोधवाक्य:-
स्नेह रूपाचा
अनुभव तर ऐकवता आता शक्ती रूपाचा अनुभव ऐकवा.
अव्यक्त इशारे:- आता
संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.
जसे साकारमध्ये पाहिले
अखेरचा कर्मातीत स्टेजचा पार्ट केवळ ब्लेसिंग देण्याचाच होता, बॅलन्सची देखील
विशेषता आणि ब्लेसिंगची देखील कमाल होती. असे फॉलो फादर. सोपी आणि शक्तिशाली सेवा
तर हीच आहे. आता विशेष आत्म्यांचा पार्ट आहे ब्लेसिंग देण्याचा. भले नेत्रांद्वारे
द्या, नाहीतर मस्तक-मणी द्वारे.