21-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - ज्ञान सागर बाबा आले आहेत - तुम्हा मुलांसमोर ज्ञान- डान्स करण्याकरिता, तुम्ही हुशार सेवाभावी बनाल तर ज्ञानाचा डान्स देखील चांगला होईल”

प्रश्न:-
संगमयुगावर तुम्ही मुले स्वतःमध्ये कोणता छंद (सवय) विकसित करता?

उत्तर:-
आठवणीमध्ये राहण्याचा छंद. हीच आहे रूहानी हॉबी (आत्मिक छंद). या हॉबी सोबतच तुम्हाला दिव्य आणि अलौकिक कर्म देखील करायची आहेत. तुम्ही आहात ब्राह्मण, तुम्हाला आता इतर सर्वांना खरी-खरी कथा जरूर ऐकवायची आहे. तुम्हा मुलांना सेवेचा देखील छंद असायला हवा.

गीत:-
धीरज धर मनुवा…

ओम शांती।
जसे कोणी हॉस्पिटलमध्ये आजारी असतात तर पेशंंट दु:खातून सुटका होण्याची इच्छा ठेवतात. डॉक्टरांना विचारतात - काय परिस्थिती आहे, केव्हा हा आजार बरा होईल? त्या तर सर्व आहेत हदच्या गोष्टी. बाबा येऊन मुलांना सल्ला देतात. हे तर मुलांनी जाणले आहे की बरोबर हा सुख आणि दुःखाचा खेळ आहे. असे तर तुम्हा मुलांना सतयुगामध्ये जाण्यापेक्षाही जास्त फायदा इथे आहे. कारण जाणता की यावेळी आम्ही ईश्वरीय गोदीमध्ये आहोत, ईश्वरीय संतान आहोत. यावेळी आमची खूप उच्च ते उच्च गुप्त महिमा आहे. मनुष्य मात्र पित्याला शिव, ईश्वर, भगवान देखील म्हणतात, परंतु जाणत नाहीत. बोलावत राहतात. ड्रामा अनुसारच असे झाले आहे. ज्ञान आणि अज्ञान, दिवस आणि रात्र. गायले देखील जाते परंतु इतके तमोप्रधान-बुद्धी बनले आहेत की स्वतःला तमोप्रधान समजतच नाहीत. कोणाच्या भाग्यामध्ये बाबांचा वारसा मिळणार असेल तेव्हाच तर त्यांच्या बुद्धीमध्ये बसू शकेल. मुले जाणतात की आपण एकदम घोर अंधारामध्ये होतो. आता बाबा आले आहेत तर किती प्रकाश मिळाला आहे. बाबा जे नॉलेज समजावून सांगत आहेत ते कोणत्याही वेद, शास्त्र, ग्रंथ इत्यादीमध्ये नाही आहे. ते देखील बाबा सिद्ध करून सांगतात. तुम्हा मुलांना रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताच्या ज्ञानाचा प्रकाश देतो, तो मग प्राय: लोप होतो. त्यानंतर पुन्हा मग हे ज्ञान मी आल्या शिवाय कोणाला मिळू शकत नाही, पुन्हा हे ज्ञान प्राय: लोप होते. लक्षात येते की कलियुग पास्ट झाले (होऊन गेले); पुन्हा मग ५ हजार वर्षा नंतर रिपीट होईल. ही आहे नवीन गोष्ट, हे शास्त्रांमध्ये काही नाही आहे.

बाबा तर हे नॉलेज सर्वांनाच एक सारखे शिकवतात. परंतु धारण करण्यामध्ये नंबरवार आहेत. कोणी चांगली सेवाभावी मुले येतात तर बाबांचा डान्स देखील तसाच चालतो. डान्सिंग गर्लच्या समोर जेव्हा बघणारे शौकीन पुष्कळ असतात तेव्हा ती देखील आनंदाने खूप चांगला डान्स करते. थोडेच बसलेले असतील तर, सामान्य रीतीने थोडासाच डान्स करेल. जर खूपजण तारीफ करणारे असतील तर तीचा देखील उत्साह वाढेल. तर इथे देखील असेच आहे. मुरली सर्वच मुले ऐकतात, परंतु सन्मुख ऐकण्याची गोष्टच वेगळी आहे ना. असे देखील दाखवतात की, श्रीकृष्ण डान्स करत असे. डान्स म्हणजे काही तो शारीरिक डान्स नाही. खरेतर आहे ज्ञानाचा डान्स. शिवबाबा स्वतः सांगतात की मी ज्ञानाचा डान्स करण्याकरिता येतो, मी ज्ञानाचा सागर आहे, तर चांगले-चांगले पॉईंट्स निघतात. ही आहे ज्ञानाची मुरली, ही काही बांबूची मुरली नाहीये. पतित-पावन बाबा येऊन सहज राजयोग शिकवतील की बांबूची मुरली वाजवतील? हे कोणाच्या बुद्धीतही नसेल की बाबा येऊन असे राजयोग शिकवतात. आता तुम्ही जाणता इतर कोणत्याही मनुष्यमात्राच्या हे बुद्धीमध्ये येऊ शकत नाही. येणाऱ्यांमध्ये देखील नंबरवार पद प्राप्त करतात. जसा कल्पापूर्वी केला आहे तसाच आताही पुरुषार्थ करत राहतात. तुम्ही जाणता की कल्पापूर्वी प्रमाणे बाबा येतात, येऊन मुलांना सर्व रहस्ये उलगडून सांगतात. म्हणतात की, मी देखील बंधनामध्ये (कर्तव्यामध्ये) बांधलेला आहे. प्रत्येक जण या ड्रामाच्या बंधनामध्ये बांधलेला आहे. जे काही सतयुगामध्ये झाले होते, ते पुन्हा होईल. किती अनेक प्रकारच्या योनी आहेत. सतयुगामध्ये इतक्या योनी थोड्याच असतील. तिथे तर खूप कमी प्रकारची व्हरायटी असते. नंतर मग वृद्धी होत जाते. जसे धर्म देखील वाढत जातात ना. सतयुगामध्ये तर नव्हते. जे सतयुगामध्ये होते ते मग सतयुगातच बघाल. सतयुगामध्ये कोणतीही घाण करणारी गोष्ट असू शकत नाही. त्यांना देवी-देवतांना म्हटलेच जाते - भगवान-भगवती. इतर कोणत्याच खंडामध्ये कधीही कोणाला गॉड-गॉडेज म्हटले जात नाही. ते देवता जरूर स्वर्गामध्ये राज्य करत होते. त्यांचे पहा गायन किती आहे.

तुम्हा मुलांना आता धीर आला आहे. तुम्ही जाणता आपले पद किती उच्च दर्जाचे आहे की कमी दर्जाचे आहे. आपण इतक्या मार्क्सने पास होणार. प्रत्येक जण स्वतःला समजू तर शकतात ना की अमका चांगला सेवा करत आहे. हो, चालता-चालता वादळे देखील येतात. बाबा तर म्हणतात की मुलांनो, कोणावरही ग्रहचारी, वादळे इत्यादी येऊ नयेत. माया चांगल्या-चांगल्या मुलांना देखील खाली पाडते. तर बाबा धीर देत राहतात, बाकी थोडा वेळ आहे. तुम्हाला सेवा देखील करायची आहे. स्थापना झाली की मग तर जायचेच आहे. यामध्ये एक सेकंद देखील मागे-पुढे होऊ शकत नाही. हे रहस्य मुलेच समजू शकतात. आपण ड्रामातील ॲक्टर्स आहोत, यामध्ये आपला मुख्य पार्ट आहे. भारतावरच हार आणि जीत चा खेळ बनलेला आहे. भारतच पावन होता. किती पीस, प्युरिटी (शांती, पवित्रता) होती. ही कालचीच गोष्ट आहे. काल आपणच तर पार्ट बजावला होता. ५ हजार वर्षांचा संपूर्ण पार्ट नोंदलेला आहे. आपण पूर्ण चक्र फिरून आलो आहोत. आता पुन्हा बाबांशी योग लावत आहोत, या द्वारेच भेसळ निघून जाते. बाबांची आठवण येईल तर वारसा देखील जरूर आठवेल. सर्वप्रथम अल्फला (बाबांना) जाणून घ्यायचे आहे. बाबा म्हणतात, तुम्ही मला जाणल्याने मग माझ्याद्वारे सर्व काही जाणाल. ज्ञान तर खूप सोपे आहे, एक सेकंदाचे आहे. तरी देखील समजावून सांगत राहतात. पॉईंट्स देत राहतात. मुख्य पॉईंट आहे मनमनाभव, यामध्येच विघ्न पडतात. देह-अभिमान आल्याने मग अनेक प्रकारचे त्रास सुरु होतात, मग योगामध्ये राहू शकत नाहीत. जसे भक्तिमार्गामध्ये श्रीकृष्णाच्या आठवणीमध्ये बसतात तर बुद्धी कुठे-कुठे पळत राहते. भक्तीचा अनुभव तर सर्वांनाच आहे. या जन्माची गोष्ट आहे. या जन्माला जाणल्याने मग थोडेफार मागील जन्माला देखील समजू शकता. मुलांना छंद जडला आहे - बाबांची आठवण करण्याचा. जितकी आठवण करता तितका आनंद वाढतो. त्याच सोबत दिव्य, अलौकिक कर्म देखील करायचे आहेत. तुम्ही आहात ब्राह्मण. तुम्ही सत्यनारायणाची कथा, अमर कथा ऐकवता. मूळ गोष्ट एकच आहे - ज्यामध्ये सर्व काही येते. आठवणीनेच विकर्म विनाश होतात. हा एकच छंद, रुहानी आहे. बाबा म्हणतात की, नॉलेज तर खूप सोपे आहे. कन्यांचे नाव देखील गायले गेले आहे. अधर कुमारी, कुमारी कन्या, कुमारीचे नाव सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. त्यांना कोणतेच बंधन (जबाबदारी) नाहीये. ते पती तर विकारी बनवतात. हे बाबा तर स्वर्गामध्ये घेऊन जाण्याकरिता शृंगार करत आहेत. स्वीट सागरामध्ये घेऊन जातात. बाबा म्हणतात या जुन्या दुनियेला, जुन्या देहासहित पूर्णतः विसरून जा. आत्मा म्हणते की आम्ही ८४ जन्म पूर्ण केले आहेत. आता पुन्हा आम्ही बाबांकडून पूर्ण वारसा घेणार. हिंमत ठेवतात, तरीही मायेशी युद्ध तर आहे ना. सर्वात पुढे तर हे बाबा (ब्रह्मा बाबा) आहेत. सर्वात जास्त मायेची वादळे यांच्याकडे येतात. अनेक जण येऊन विचारतात की बाबा आम्हाला असे होते. बाबा म्हणतात की, मुलांनो, ही वादळे तर जरूर येतील. पहिली तर माझ्याकडे येतात. अंतामध्ये सर्व कर्मातीत अवस्थेला प्राप्त होतील. ही काही नवीन गोष्ट नाहीये. कल्पापूर्वी देखील झाले होते. ड्रामामध्ये पार्ट बजवला, आता पुन्हा घरी परत जात आहोत. मुले जाणतात - ही जुनी दुनिया नरक आहे. म्हणतात देखील की, हे लक्ष्मी-नारायण क्षीर सागरामध्ये राहत होते, यांची मंदिरे किती सुंदर-सुंदर बनवतात. सर्वात पहिले मंदिर बनवले असेल ते क्षीर (दुधाचा) तलाव बनवून विष्णूच्या मूर्तीला बसवले असेल. खूप सुंदर-सुंदर मुर्त्या बनवून पूजा करत होते. त्यावेळी तर खूपच स्वस्ताई होती. बाबांनी सर्व काही पाहिलेले आहे. बरोबर हा भारत किती पवित्र, दुधाचा सागर होता. दूधा-तुपाच्या जणूकाही नद्या वाहत होत्या. ही तर महिमा करताना उपमा दिलेली आहे. स्वर्गाचे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. तुम्हा मुलांना आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. तर बुद्धीमध्ये समज आली आहे. बुद्धी आपल्या घरी निघून जाते, पुन्हा स्वर्गामध्ये येणार. तिथे सर्व काही नवीनच नवीन असेल. बाबा (ब्रह्मा बाबा), श्री नारायणाची मूर्ती पाहून खूप आनंदित होत असत, अतिशय प्रेमाने सोबत ठेवत होते. हे समजत नव्हते की मीच हा बनणार आहे. हे ज्ञान तर आता बाबांकडून मिळाले आहे. तुम्हाला ब्रह्मांड आणि सृष्टी चक्राच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे. तुम्ही जाणता की आपण कसे चक्र फिरणार आहोत. बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. तुम्हा मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. बाकी थोडा वेळ आहे. शरीराला तर काही ना काही होतच राहते. आता हा तुमचा अंतिम जन्म आहे. आता तुमच्या सुखाचे दिवस येत आहेत, ड्रामा प्लॅन अनुसार. बघत आहात की, विनाश समोर उभा आहे. तुम्हाला तिसरा नेत्र मिळाला आहे. मूल वतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतन यांना चांगल्या प्रकारे जाणता. हे स्वदर्शन चक्र तुमच्या बुद्धीमध्ये फिरत राहते, आनंद होतो. यावेळी आपल्याला बेहदचे पिता, टीचर बनून शिकवत आहेत. परंतु नवीन गोष्ट असल्या कारणाने वारंवार विसरून जातात. नाही तर बाबा म्हटल्यानेच आनंदाचा पारा चढला पाहिजे. रामतीर्थ हा श्रीकृष्णाचा भक्त होता. तर श्रीकृष्णाचे दर्शन घडण्यासाठी किती मेहनत करत होते. त्यांना साक्षात्कार झाला आणि आनंद झाला. परंतु त्यामुळे काय झाले? मिळाले तर काहीच नाही. इथे तर तुम्हा मुलांना खुशी देखील आहे कारण जाणता की २१ जन्मांकरिता आपण इतके उच्च पद प्राप्त करतो. ३ हिस्सा तर तुम्ही सुखामध्ये राहता. जर अर्धे-अर्धे असेल तर मग काहीच फायदा नाही. तुम्ही ३ हिस्से सुखामध्ये राहता. तुमच्या सारखे सुख इतर कोणीही पाहू शकत नाही. तुमच्यासाठी तर सुख अपरंपार आहे. असीम सुखामध्ये तर दुःख कळतसुद्धा नाही. संगमावर तुम्ही दोन्ही गोष्टींना जाणू शकता की आता आपण दुःखातून सुखामध्ये जात आहोत. तोंड आहे दिवसाच्या दिशेने, पाय आहे रात्रीच्या दिशेने. या दुनियेला लाथ मारायची आहे अर्थात बुद्धीने विसरायचे आहे. आत्मा जाणते की आता घरी परत जायचे आहे, खूप पार्ट बजावला आहे. अशा प्रकारे स्वतःशी गोष्टी करायच्या आहेत. आता जितकी बाबांची आठवण कराल तेवढीच कट (गंज) निघून जाईल. जितके बाबांच्या सेवेमध्ये राहून बाप समान बनाल, तितकीच बाबांची प्रत्यक्षता कराल. बुद्धीमध्ये आहे की आता घरी जायचे आहे. तर घराचीच आठवण केली पाहिजे. जुने घर कोसळत राहते. आता कुठे नवीन घर, कुठे जुने घर. रात्रं-दिवसाचा फरक आहे. ही तर हुबेहूब विषय-वैतरणी नदी आहे. एकमेकांना मारतात, भांडण-तंटा करत राहतात. बाकी बाबा देखील आलेले आहेत तर युद्ध देखील जास्त प्रमाणात सुरू झाली आहेत. जर स्त्री विकार देत नसेल तर तिला किती हैराण करतात. किती लाथा मारतात. कल्पापूर्वी देखील अत्याचार झाले होते. ती आताचीच गोष्ट गायली जाते. तुम्ही बघत आहात की, किती धावा करतात. तोच ड्रामाचा पार्ट सुरू आहे. हे बाबांनाच ठाऊक आणि मुलांनाच ठाऊक, इतर कोणालाच माहिती नाही. पुढे चालून सर्वांना समजणारच आहे. गातात देखील - ‘पतित-पावन, सर्वांचे सद्गती दाता बाबा आहेत’. तुम्ही कोणालाही समजावून सांगू शकता की - इकडे या, म्हणजे मग आम्ही तुम्हाला भारतच स्वर्ग आणि नरक कसा बनतो, साऱ्या दुनियेचा इतिहास-भूगोल समजावून सांगतो. हा बेहदचा इतिहास-भूगोल ईश्वरच जाणे आणि ईश्वराची तुम्ही मुलेच जाणे. पवित्रता, सुख शांतीची स्थापना कशी होते. या इतिहास-भूगोलाला जाणल्याने तुम्हाला सर्व काही माहित होईल. बेहदच्या बाबांकडून तुम्ही जरूर बेहदचाच वारसा घ्याल. हे इथे येऊन समजून घ्या. टॉपिक तर खूप आहेत. तुम्हा मुलांची बुद्धी तर आता परिपक्व झाली आहे. आनंदाचा किती पारा चढतो. संपूर्ण नॉलेज तुम्हा मुलांकडेच आहे. नॉलेजफुल बाबांकडून नॉलेज मिळत आहे. मग आम्हीच जाऊन लक्ष्मी-नारायण बनणार. तिथे मग हे नॉलेज अजिबात असणार नाही. किती गूढ गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. तुम्हा मुलांना शिडी व्यवस्थित समजली आहे ना. तर हे चक्र ८४ जन्मांचे आहे. आता लोकांना देखील क्लियर करून समजावून सांगायचे आहे. याला आता स्वर्ग अथवा पावन दुनिया थोडीच म्हणता येईल. सतयुग वेगळे आहे, कलियुग वेगळे आहे. हे चक्र कसे फिरते, हे समजावून सांगण्यासाठी सोपे आहे. स्पष्टीकरण चांगले वाटते ना. परंतु पुरुषार्थ करून आठवणीच्या यात्रेमध्ये राहतील, हे बऱ्याचजणांकडून होऊ शकत नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) हा जुना देह आणि जुन्या दुनियेला बुद्धीने विसरून बाबांची आणि घराची आठवण करायची आहे. नेहमी याच आनंदामध्ये राहायचे आहे की, आता आपले सुखाचे दिवस आले की आले.

२) नॉलेजफुल बाबांकडून जे नॉलेज मिळाले आहे त्याचे चिंतन करून बुद्धीला पुर (परिपक्व) ठेवायचे आहे. देह-अभिमानामध्ये येऊन कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ द्यायचा नाही.

वरदान:-
नेहमी एकरस स्थितीच्या तख्तावर विराजमान होऊन राहणारे बापदादांचे दिलतख्तनशीन भव

सर्वात श्रेष्ठ तख्त आहे - बापदादांचे दिलतख्तनशीन बनणे. परंतु या तख्तावर बसण्याकरिता अचल, अडोल, एकरस स्थितीचे तख्त पाहिजे. जर या स्थितीच्या तख्तावर स्थित होऊ शकत नसाल तर बापदादांच्या दिल रुपी तख्तावर स्थित होऊ शकणार नाही. त्यासाठी आपल्या भृकुटीच्या तख्तावर अकालमूर्त बनून स्थित व्हा, या तख्तावरून वारंवार विचलित होऊ नका तेव्हाच बापदादांच्या दिल तख्तावर विराजमान होऊ शकाल.

बोधवाक्य:-
शुभ चिंतनाद्वारे निगेटिव्हला पॉझिटिव्हमध्ये परिवर्तन करा.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

ब्रह्मा बाबा आपल्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर, एक तर - नेहमी रुहानियतचे (आत्मिक) हास्य पाहू इच्छित आहेत आणि दुसरे - मुखावाटे नेहमी मधुर बोल ऐकू इच्छित आहेत. एकही शब्द मधुरते शिवाय नसावा. चेहऱ्यावर रुहानियत असावी, मुखामध्ये मधुरता असावी आणि मन-बुद्धीमध्ये नेहमी शुभ भावना, दयेची भावना, दातापणाची भावना असावी. प्रत्येक पावलामध्ये फॉलो फादर असावे. हेच पालनेचे रिटर्न द्या.