21-05-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो -
श्रीमतावर चालून सर्वांना सुख द्या, असुरीमतावर दुःख देत आलात, आता सुख द्या, सुख
घ्या”
प्रश्न:-
बुद्धिवान मुले
कोणत्या रहस्याला समजल्याकारणाने उच्च पद प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करतात?
उत्तर:-
ते समजतात की,
हा दुःख आणि सुख, हार आणि जीत चा खेळ आहे. आता अर्धे कल्प सुखाचा खेळ चालणार आहे.
तिथे कोणत्याही प्रकारचे दुःख नसेल. आता नवीन राजधानी येणार आहे, त्यासाठी बाबा आपले
परमधाम सोडून आम्हा मुलांना शिकविण्याकरिता आले आहेत, आता पुरुषार्थ करून उच्च पद
घ्यायचेच आहे.
गीत:-
बदल जाये
दुनिया न बदलेंगे हम…
ओम शांती।
गोड-गोड मुलांनी अर्थ समजून घेतला. इथे काही शपथ घेण्याची गरज नाही. ही तर
आत्म्यामध्ये समज पाहिजे. आत्मा तमोप्रधान असल्याकारणाने अगदीच निर्बुद्ध बनली आहे.
मुले जाणतात - आम्ही किती निर्बुद्ध होतो. आता किती बुद्धिवान बनलो आहोत. इतर
सत्संग इत्यादींमध्ये या गोष्टी असत नाहीत. ते शास्त्र, रामायण इत्यादी वाचतात. एका
कानाने ऐकले, दुसऱ्या कानाने निघून जाते. काहीच प्राप्ती नाही. यज्ञ, तप, दान-पुण्य
इत्यादी खूप करतात, खस्ता खात राहतात. प्राप्ती काहीच नाही. या दुनियेमध्ये कोणालाही
सुख नाहीये. आता बाबा सर्व बुद्धी देतात. सर्वांना सुख-शांती देणारे एक बाबाच आहेत.
मनुष्य तर अगदीच घोर अंधकारामध्ये आहेत. भक्तिमार्ग वाले देखील आठवण करतात - हे
दुःख हर्ता, सुख कर्ता, सद्गती दाता. बघा, दुनियेमध्ये काय-काय चालू आहे. सर्वजण
दुःखातच बुडालेले आहेत. जे काही मनुष्य मात्र आहेत, कोणालाही हे ठाऊक नाही की, पिता
कोण आहेत? पित्याकडून कोणता वारसा मिळतो? बेहदच्या पित्याला जाणतच नाहीत. शांतीसाठी
खस्ता खात राहतात. आता हे कोणी म्हटले की, ‘मनाची शांती हवी?’ आत्मा म्हणते; हे
देखील मनुष्य जाणत नाहीत. देह-अभिमान आहे ना. साधु-संत इत्यादी सर्व दुःखी आहेत.
सर्वांना शांती हवी आहे. आजार इत्यादी तर साधु-संतांना देखील होतात. एक्सीडेंट
होतात. दुनियेमध्ये दुःखाशिवाय अजून तर काहीच नाही आहे. आता तुम्ही बुद्धिमान बनले
आहात. बाबांनी समजावून सांगितले आहे ड्रामामध्ये नवीन दुनिया आणि जुनी दुनिया, सुख
आणि दुःखाचा खेळ बनलेला आहे. बाबांनी तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे आणि बाकी
सर्व मनुष्यमात्रांच्या बुद्धीला गोदरेजचे कुलूप लागलेले आहे, अगदीच तमोप्रधान
बुद्धी आहे. तुम्ही मुले नंबरवार पुरुषार्थानुसार जाणता. बरोबर बेहदचे बाबा भेटले
आहेत, ते आम्हाला सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य सांगतात की, हा खेळ कसा बनलेला
आहे. जेव्हा सुख असते तेव्हा दुःखाचे नावही नसते. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे
की आपण बाबांकडून सुख-शांती-संपत्तीचा वारसा घेत आहोत. सतयुगापासून त्रेताच्या
अखेरपर्यंत कोणतेही दुःख असणार नाही. आता तुम्ही प्रकाशामध्ये आहात. तुम्ही
पुरुषार्थ करत आहात की, आपल्या राजधानीमध्ये एकापेक्षा एक उच्च पद प्राप्त करावे.
हे आहे बेहदचे स्कूल. बेहदचे बाबा शिकवत आहेत. तुम्ही जाणता ते आमचे मोस्ट बिलवेड (सर्वात
प्रिय) बाबा आहेत, ज्यांची अपरंपार महिमा आहे. ते उच्च ते उच्च बाबा श्रीमत देत
आहेत. बाकी सर्व मनुष्य मात्र आसुरी मतावर एकमेकांना दुःखच देतात. तुम्हाला
श्रीमतानुसार सर्वांना सुख द्यायचे आहे. या ड्रामामध्ये आपण ॲक्टर्स आहोत, हे कोणीही
जाणत नाही. तुम्ही मुले आता समजता या ड्रामामध्ये भारतवासीयांचाच ऑलराऊंड पार्ट आहे.
पूर्वी तर तुम्ही काहीच जाणत नव्हता. आता तर मूलवतन पासून सूक्ष्म वतन, स्थूल वतन
सर्व गोष्टींना तुम्ही जाणले आहे. तुम्हाला खरे ज्ञान आहे. परमपिता परमात्मा आम्हाला
यांच्याद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) शिकवत आहेत. बाबा आम्हाला त्रिलोक विषयीचे
सर्व ज्ञान देत आहेत. हे आहेच काट्यांचे जंगल. मुले जाणतात - आता आम्ही
काट्यांपासून फूल अर्थात मनुष्यापासून देवता बनत आहोत. इथे तर लहान-मोठे सर्व दुःखच
देतात. गर्भामध्ये मातेला मुले दुःख देतात. ही खूपच छी-छी (घाणेरडी) जुनी दुनिया आहे.
या सृष्टी चक्राला कोणीही जाणत नाही. आपण कुठून आलो, किती जन्म घेतले, नंतर मग कुठे
जायचे आहे?... काहीही जाणत नाहीत, बेहदचे बाबा अर्थात सर्व सीतांचा एक राम, ते
निराकार आहेत. तुम्ही सर्व सीता आहात. बाबा आहेत ब्राईडग्रुम (नवरदेव). एका साजनच्या
सर्व सजण्या, भक्तीणी आहेत. ज्या पण सीता आहेत, सर्व रावणाच्या जेलमध्ये अडकून
शोकवाटिकेमध्ये आल्या आहेत. साऱ्या दुनियेतील सर्व मनुष्य मात्र एका भगवंताची आठवण
करतात. भगवंताला, भक्तांचा रक्षक म्हणतात. तुम्ही सर्व आता ब्रह्मा मुखवंशावळी
ब्राह्मण आहात. ब्राह्मण जाणतात - आम्हाला शिवबाबा शिकवत आहेत. बाबांकडून वारसा
जरूर मिळतो. शिवबाबा आहेत स्वर्गाचे रचयिता. स्वर्ग म्हणा अथवा दैवी राजधानी म्हणा
- ही स्वर्गाची राजधानी आहे ना. लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक आहेत. हे देखील आता
तुम्हीच समजता. इथे जेव्हा सतयुग होते तेव्हा लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. आता आहे
कलियुग. मनुष्य तर बिचारे घोर अंधारामध्ये असल्याकारणाने काहीच जाणत नाहीत की आता
कलियुगाचा अंत आहे. विनाश समोर उभा आहे. तुम्हा सर्व सीतांचा सद्गती दाता एक राम आहे.
सर्व सीता दुर्गतीमध्ये आहेत, परंतु असे कोणी समजतात थोडेच की आपण दुर्गतीमध्ये
आहोत. आपल्या श्रीमंतीचाच नशा आहे. आमची इतकी घरे आहेत, इतके धन आहे, इतके बंगले
आहेत; हे कोणालाच ठाऊक नाहीये की दुःखाची दुनिया आता बदलणार आहे. मृत्यू समोर उभा
आहे. सर्व मातीमोल होणार आहे. हे जे काही जुन्या दुनियेमध्ये बघता, ते सर्व विनाश
होणार आहे. विनाशासाठी पूर्ण तयारी चालू आहे. ही तीच महाभारत लढाई आहे. तेच गीतेचे
भगवान आहेत. परंतु पित्याच्या बायोग्राफीमध्ये (जीवन-चरित्रामध्ये) मुलाचे नाव टाकले
आहे. आता शिवबाबा तुम्हाला राजयोग शिकवत आहेत. मोठ्यात मोठी चूक हीच आहे जे भगवंताचे
नाव गायब केले आहे.
तुम्ही मुले जाणता -
आपल्याला कोणी मनुष्य, साधु-संत इत्यादी शिकवत नाहीत. शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत.
ते पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, सद्गुरु देखील आहेत; सर्व काही आहेत. हे तर
विसरता कामा नये ना. बाबा म्हणतात - सर्व मुले माझीच आहेत परंतु सर्वांना थोडेच
शिकवतील. बाबा म्हणतात - मी भारतवासियांना पुन्हा एकदा राजयोग शिकविण्यासाठी आलो आहे.
भारतवासी स्वर्गवासी होते, हिऱ्या समान होते, आता कवडी समान बनले आहेत. घरांमध्ये
किती अशांती आहे. म्हणतात - ‘बाबा, आम्हाला क्रोध येतो, मुलांना मारावे लागते. भीती
वाटते की, आम्ही ५ विकार शिवबाबांना दान दिले आहेत आणि मग आपण हे का करत आहोत?’ बाबा
म्हणतात - यावेळी सर्वांवर ५ विकारांचे ग्रहण लागलेले आहे. देह-अभिमानाचे भूत
आल्याने मग बाकीची सर्व भुते येऊन चिकटतात. आता बाबा म्हणतात - देही-अभिमानी बना.
आता तुम्हाला समज (बुद्धी) मिळाली आहे. सतयुगामध्ये देखील आपण आत्म-अभिमानी होतो.
समजतो - आत्म्याचे हे शरीर आता जुने झाले आहे. याचे आयुष्य पूर्ण झाले आहे म्हणून
हे शरीर सोडून आता नवीन घ्यायचे आहे. सापाचे उदाहरण आहे - सापाची एक कात जुनी होते
तर मग तो पुन्हा दुसरी घेतो. हा दृष्टांत आहे सतयुगासाठी. तिथे तुम्ही अशा प्रकारे
देह सोडता की, दुःखाची कोणती गोष्टच राहत नाही. इथे किती दुःख होते. रडणे-ओरडणे (आक्रोश)
इत्यादी चालूच असते. आता तुम्ही मुले जाणता - ही जुनी कातडी (शरीर) आहे. इथे कोणते
नवीन शरीर मिळणार नाही. ही शेवटची जुनी जुत्ती (शरीर) आहे. आता तुम्हाला त्याचा
कंटाळा आला आहे. तिथे (सतयुगामध्ये) तर आनंदाने एक शरीर सोडून दुसरे घेतात. या
गोष्टींना देखील तुम्हीच समजता. इथे किती नवीन येतात, परंतु त्यांना काही समजते
थोडेच. दोन-चार दिवस इथे येऊन ज्ञान ऐकून जातात, आणि मग विसरून जातात. हो, चांगल्या
रीतीने ऐकले असेल, आनंदीत झाले तर प्रजेमध्ये येतील. प्रजा देखील प्रचंड प्रमाणात
बनणार आहे ना. हे आहे ईश्वराचे दार अथवा घर, तुम्ही ईश्वराच्या घरामध्ये बसले आहात.
परम-पिता आपले परमधाम सोडून इथे साधारण तनामध्ये येऊन बसले आहेत. तिथे तर आत्मे
बाबांपाशी राहतात. इथे संगमावर बाबा स्वतः आले आहेत - पतितांना पावन बनविण्याकरिता.
त्यांना ‘शिव निराकार’ असेच म्हणतात. निराकार बाबांना आत्मे, ‘ओ गॉड फादर’ असे
म्हणून बोलावतात. मनुष्य न समजताच म्हणतात - ‘ओ गॉड फादर’. या लक्ष्मी-नारायणाला
देखील युरोपियन लोक भगवान-भगवती म्हणतात. यांना असे कोणी बनविले? या देवतांना
उद्देशून म्हणतात - ‘तुम्ही सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण आहात; आणि मग स्वतःला
काय म्हणतात? हे जाणत नाहीत की हे देखील मनुष्यच आहेत. भारतामध्येच राज्य करून गेले
आहेत. त्यांच्यासमोर जाऊन महिमा गातात. स्वतःला नीच पापी म्हणत राहतात.
श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन महिमा करतील. शिवाची अशी महिमा करणार नाहीत.
त्यांची महिमा वेगळी आहे. जास्ती करून शिवाच्या मंदिरात जातात तर म्हणतात - ‘भर दो
झोली’. आणि मग म्हणतात - ते भांग पिणारे आहेत, धोत्रा खाणारे आहेत. अरे तिथे
भांग-धोत्रा कुठून आला. काहीच समजत नाहीत. मागत राहतात - नवरा पाहिजे, हे पाहिजे…
दीपावली मध्ये सुद्धा लक्ष्मीचे आवाहन करतात ते कोण आहेत, हे कोणालाच माहीत नाहीये.
८-१० भुजा कधी कोणाला असतात का? हे चतुर्भुज रूप दाखवतात कारण प्रवृत्ती मार्ग आहे.
त्यांचे नाव विष्णू ठेवले आहे. लक्ष्मी-नारायण तर सतयुगामध्ये राहतात. मनुष्याला हे
माहीतच नाहीये की, विष्णूची दोन रूपे लक्ष्मी-नारायणा द्वारे पालना होते.
चित्रांमध्ये लक्ष्मीला चार भूजा दाखवतात. चार भुजा असणाऱ्याला जर मूल झाले तर
त्याला देखील चार भुजा असायला हव्यात. काहीच समजत नाहीत. तुम्हाला आता समजते आहे -
जोपर्यंत बाबा आलेले नव्हते तोपर्यंत आम्ही देखील काहीच जाणत नव्हतो. आता साऱ्या
विश्वाच्या आदि-मध्य-अंताला जाणले आहे. बाबा येऊन पतित दुनियेला पावन बनवतात.
बोलवतात देखील - ‘हे पतित पावन, या’. आता परमात्मा कसे येणार? कसे येऊन पतितांना
पावन बनवणार? बाबा म्हणतात - ‘५ हजार वर्षांपूर्वी मी दैवी स्वराज्य स्थापन केले
होते; मग त्यामध्ये तुम्ही ८४ जन्म कसे घेतले? ही समज तुमच्या बुद्धीमध्ये मुळीच
नव्हती. या ब्रह्माला देखील ठाऊक नव्हते. राधे-कृष्ण, लक्ष्मी-नारायणाची पूजा करत
राहतात. परंतु हे देखील ठाऊक नाहीये की, राधे-कृष्णच स्वयंवरा नंतर लक्ष्मी-नारायण
बनले आहेत, म्हणूनच प्रिन्सेस राधे, प्रिन्स श्रीकृष्ण म्हटले जाते. स्वयंवरानंतर
महाराजा-महाराणी बनतात. हे जे स्वतः बनत आहेत त्यांना देखील माहीत नव्हते. भले
कोणाला साक्षात्कार देखील होतो परंतु काहीच समजत नाहीत. तरी देखील भक्तांची भावना
अल्पकाळासाठी पूर्ण करण्याच्या हेतूने मी साक्षात्कार घडवतो. इथे (ज्ञानामध्ये) तर
ध्यान-साक्षात्काराची काही गोष्टच नाही. बाबा तर म्हणतात - साक्षात्कारामध्ये माया
प्रवेश करेल तर तुम्ही पदभ्रष्ट व्हाल. बरेच जण येऊन असे म्हणतात की, आम्हाला
शिवबाबांचा साक्षात्कार व्हावा. अरे तुम्हाला समजावून सांगितले जाते - काजवा किती
छोटा असतो, डोळ्यांनी बघता येतो. आत्मा तर त्याहीपेक्षा छोटा बिंदू आहे. जशी आत्मा
आहे तसेच परमात्म्याचे रूप आहे. साक्षात्कार जरी झाला तरी त्या छोट्या बिंदूचा होईल.
ही आत्मा तर अतिसूक्ष्म बिंदू आहे, जी भृकुटीच्या मध्यभागी राहते. आत्म्याचा
साक्षात्कार झाला तरीही काहीच समजणार नाहीत.
तुम्ही मुले जाणता -
आता आपण शिवबाबांची संतान आहोत. सर्व ब्रह्माकुमार-कुमारी शिवबाबांकडून वारसा घेत
आहोत. आमचे एम ऑब्जेक्टच हे आहे. विद्यार्थी आहोत ना. तुम्ही म्हणता - बाबांकडून
सहज राजयोग शिकण्यासाठी आलो आहोत. हा एम-ऑब्जेक्ट आहे, हे मुलांनी विसरता कामा नये.
भक्तिमार्गामध्ये भक्त लोक देवतांची चित्रे (फोटो) सोबत ठेवतात. मग तुम्हाला हे
त्रिमूर्तीचे चित्र आपल्या खिशामध्ये ठेवले पाहिजे. शिवबाबांद्वारे आम्ही असे
लक्ष्मी-नारायण बनत आहोत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) शिवबाबांना
विकारांचे दान देऊन पुन्हा कधीही परत घ्यायचे नाही. देह-अभिमानाच्या भुतापासून
वाचायचे आहे. या भुतामुळे बाकीची सर्वभूते येतात; म्हणून आत्म-अभिमानी बनण्याचा
अभ्यास करायचा आहे.
२)
ध्यान-साक्षात्काराची इच्छा बाळगायची नाही. एम-ऑब्जेक्टला समोर ठेवून पुरुषार्थ
करायचा आहे. श्रीमतानुसार सर्वांना सुख द्यायचे आहे.
वरदान:-
करावनहारच्या
स्मृतीद्वारे सेवेमध्ये सदैव निर्माणाचे कार्य करणारे कर्मयोगी भव
कोणतेही कर्म,
कर्मयोगीच्या स्टेजमध्ये परिवर्तन करा फक्त कर्म करणारेच नाहीत परंतु कर्मयोगी आहात.
कर्म अर्थात व्यवहार, आणि योग अर्थात परमार्थ दोन्हीचा बॅलन्स असावा. शरीर
निर्वाहाच्या मागे आत्म्याचा निर्वाह विसरून जाऊ नका. जे काही कर्म कराल ते ईश्वरीय
सेवार्थ असावे. यासाठी सेवेमध्ये ‘निमित्त मात्र’चा मंत्र अथवा करनहारच्या स्मृतीचा
संकल्प कायम लक्षात राहावा. ‘करावनहार’ला विसरला नाहीत तर मग सेवेमध्ये निर्माणच
निर्माण करत राहाल.
बोधवाक्य:-
सेवा आणि
संबंध-संपर्कामध्ये विघ्न येण्याचे मुख्य कारण आहे - जुने संस्कार; त्या
संस्कारांपासून वैराग्य असले पाहिजे.
हे अव्यक्त इशारे -
सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.
बापदादांचे
दिल-तख्तनशीन बनणे हेच सर्वात श्रेष्ठ तख्त आहे. परंतु या तख्तावर बसण्याकरिता पहिले
अचल, अडोल, एकरस स्थितीचे तख्त हवे. एकरस स्थितीच्या तख्तावर तेव्हाच स्थित राहू
शकाल जेव्हा अकाल तख्तनशीन बनण्याचा अभ्यास असेल. ज्याप्रमाणे ते तपस्वी नेहमी
आपल्या आसनावर बसतात, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आत्म्याच्या एकरस स्थितीच्या
आसनावर विराजमान होऊन राहा, या आसनाला सोडू नका, तेव्हाच तुम्हाला सिंहासन मिळेल.