21-09-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर बाळगणे हा देखील एक दैवी गुण आहे, जे ज्ञानी आहेत आणि चांगल्या प्रकारे समजावून सांगतात, त्यांना फॉलो करायचे आहे”

प्रश्न:-
सतयुगामध्ये भक्तीमधली कोणतीही परंपरा नसते, असे का?

उत्तर:-
कारण ज्ञानाचे सागर बाबा, ज्ञान देऊन सद्गतीमध्ये पाठवतात. भक्तीचे फळ मिळते. ज्ञान मिळाल्याने भक्तीशी जणू डायव्होर्स होतो. जेव्हा आहेच ज्ञानाच्या प्रारब्धाचा काळ तर भक्ती, तप, दान-पुण्य करण्याची गरजच काय! तिथे ही कोणतीही परंपरा असू शकत नाही.

ओम शांती।
पतित-पावन शिव भगवानुवाच. आता बाबा बसून मुलांना ज्ञान ऐकवत आहेत. मुलांना समजावून सांगितले गेले आहे की, जेव्हा मी इथे येतो तेव्हा पतितांना पावन बनविण्याकरिता ज्ञान ऐकवतो, इतर कोणीही हे ज्ञान शिकवू शकणार नाही. ते (दुनियावाले) देखील भक्तीच शिकवतात. ज्ञान, केवळ तुम्ही मुलेच शिकता, जे तुम्ही स्वतःला ब्रह्माकुमार-कुमारी समजता. दिलवाडा मंदिर तुमच्यासमोर उभे आहे. तिथे देखील राजयोगाच्या तपस्येमध्ये बसले आहेत. जगत-अंबा देखील आहे, प्रजापिता देखील आहेत. कुमारी कन्या, अधर कुमारी देखील आहेत. बाबा राजयोग शिकवत आहेत. वरच्या बाजूला राजाईची चित्रे देखील उभी आहेत. बाबा काही भक्ती शिकवत नाहीत. भक्ती करतातच मुळी त्यांची जे शिकवून गेले आहेत. परंतु त्यांना हे ठाऊक नाही आहे की, राजयोग कोणी शिकवला आणि राजाई स्थापन करून गेले आहेत. तुम्ही मुले आता जाणता की भक्ती वेगळी गोष्ट आहे आणि ज्ञान वेगळी गोष्ट आहे. ज्ञान ऐकविणारे एकच आहेत, इतर कोणीही ऐकवू शकणार नाही. ज्ञानाचे सागर एकच आहेत. तेच येऊन ज्ञानाद्वारे पतितांना पावन बनवतात. बाकीचे जे काही सत्संग आहेत त्यामध्ये कोणीही ज्ञान शिकवू शकत नाहीत. भले स्वतःला श्री श्री १०८ जगतगुरु, भगवान असे देखील म्हणतात, परंतु असे कोणीही म्हणत नाही की, मी सर्वांचा परमपिता ज्ञानाचा सागर आहे; त्यांना कोणीही परमपिता तर म्हणत सुद्धा नाहीत. हे तर जाणतातच की परमपिता, पतित-पावन आहेत. हे पॉईंट्स बुद्धीमध्ये व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. मनुष्य म्हणतात की, या ब्रह्माकुमारी तर भक्तीला डायव्होर्स देतात (सोडचिठ्ठी देतात). परंतु जेव्हा की ज्ञान मिळत आहे तर तेव्हा भक्तीला डायव्होर्स द्यायचाच आहे. असे नाही की, जेव्हा आपण भक्तीमध्ये जातो तेव्हा त्यावेळी हे समजते की आपण ज्ञानाला डायव्होर्स देत आहोत. नाही, ते तर आपोआप रावण राज्यामध्ये येतात. आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे की, बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. राजयोगाचे ‘ज्ञान’ आहे, याला ‘भक्ती’ म्हणणार नाही. भगवान ज्ञानाचा सागर आहेत, ते कधीही भक्ती शिकवणार नाहीत. भक्तीचे फळ आहेच मुळी - ज्ञान. ज्ञानाद्वारे सद्गती होते. कलियुगाच्या अंताला सर्व दुःखी आहेत त्यामुळे या जुन्या दुनियेला दुःख धाम म्हटले जाते. या गोष्टींना आता तुम्हीच समजता. बाबा आलेले आहेत भक्तीचे फळ अर्थात सद्गती देण्याकरिता. राजयोग शिकवत आहेत. ही आहे जुनी दुनिया, जिचा विनाश होणार आहे. आपल्याला राज्य हवे आहे नवीन दुनियेमध्ये. हे राजयोगाचे ज्ञान आहे. ज्ञान शिकविणारे एकमेव परमपिता परमात्मा शिव आहेत. त्यांनाच ज्ञान-सागर म्हटले जाते, श्रीकृष्णाला नाही. श्रीकृष्णाची महिमा वेगळी आहे. जरूर मागील जन्मामध्ये असे कर्तव्य केले आहे ज्यामुळे प्रिन्स बनला आहे.

आता तुम्ही जाणता की, आपण राजयोगाचे ज्ञान घेऊन नवीन दुनियेमध्ये स्वर्गाचे प्रिन्स-प्रिन्सेस बनणार. स्वर्गाला सद्गती, नरकाला दुर्गती म्हटले जाते. आम्ही आपल्या स्वतःसाठी राज्य स्थापन करत आहोत. बाकी जे हे ज्ञान घेणार नाहीत, पावन बनणार नाहीत ते राजधानी मध्ये येऊ शकणार नाहीत; कारण सतयुगामध्ये फार थोडे मनुष्य असतील. कलियुगाच्या अंताला इतके जे असंख्य मनुष्य आहेत, ते जरूर मुक्तीधाम मध्ये असतील. गायब होत नाहीत, ते सर्व आपल्या घरी (परमधामला) निघून जातात. आता तर मुलांना घराची आठवण असते की, आता ८४ जन्मांचे चक्र संपत आले आहे. नाटक संपत आले आहे. अनेकदा या चक्राची फेरी मारली आहे. तुम्ही ब्राह्मण मुलेच हे जाणता. ब्राह्मण तर बनत जातात. १६१०८ ची माळ आहे. सतयुगामध्ये काही जास्त मनुष्य असणार नाहीत. सतयुगाचे मॉडेल रूप देखील दाखवतात ना. मोठ्या वास्तूचे मॉडेल छोटे असते ना. जशी सोन्याची द्वारका दाखवतात. असे म्हटले जाते की, द्वारकेमध्ये श्रीकृष्णाचे राज्य होते. आता द्वारकेमध्ये म्हणणार की दिल्लीमध्ये म्हणणार? यमुनेचा तीर तर इथे दिल्लीमध्ये आहे. तिथे (द्वारकेमध्ये) तर सागर आहे. हे तर मुले समजतात की, यमुनेच्या तीरावरच राजधानी होती. द्वारका काही राजधानी नाहीये. दिल्ली प्रसिद्ध आहे. यमुना नदी देखील पाहिजे. यमुनेची महिमा आहे. दिल्लीलाच ‘परिस्तान’ म्हटले जाते. मोठी गादी (सर्वोच्च सत्तेचे केंद्र) दिल्लीच असेल. आता तर मुले समजतात की, भक्ति-मार्ग संपुष्टात येऊन, ज्ञान-मार्ग सुरु होतो. ही दैवी राजधानी स्थापन होत आहे. बाबा म्हणतात - पुढे चालून तुम्हाला सर्व काही माहित होईल. कोण किती मार्कांनी पास होतात. शाळेमध्ये देखील माहित होते, अमके-अमके इतक्या मार्कांनी पास झाले. आता पुढच्या क्लासमध्ये जात आहेत. शेवटच्या समयी जास्ती माहीत होईल. कोण-कोण पास होतात जे मग ट्रान्सफर होतील. क्लास तर मोठा आहे ना. बेहदचा क्लास आहे. दिवसेंदिवस सेंटर्स वाढत जातील. काहीजण येऊन ७ दिवसांचा कोर्स खूप चांगल्या प्रकारे करतील. एक-दोन दिवसांचा कोर्स देखील काही कमी नाहीये. बघतात, कलियुगाचा विनाश समोर उभा आहे, आता सतोप्रधान बनायचे आहे. बाबांनी सांगितले आहे की, बुद्धियोग माझ्याशी जोडा, तेव्हाच सतोप्रधान बनाल. पवित्र दुनियेमध्ये याल, पार्ट तर बजावायचाच आहे. जसा ड्रामामध्ये कल्पापूर्वी पार्ट बजावला गेला आहे. भारतवासीच राज्य करत होते त्यानंतर मग वृद्धी होत गेली. झाडाची वृद्धी होत जाते. भारतवासी देवी-देवता धर्माचे आहेत. परंतु पावन नसल्याकारणाने त्या पावन देवतांची पूजा करतात. जसे ख्रिश्चन लोक क्राईस्टची पूजा करतात. आदि सनातन देवी-देवता धर्म आहे - सतयुगामध्ये. सतयुगाची स्थापना करणारे आहेत - बाबा. खरोखर, सतयुगामध्ये या देवतांचे राज्य होते. तर जरूर मागील जन्मामध्ये यांनी पुरुषार्थ केला असेल. जरूर ते संगमच असेल. जेव्हा की जुनी दुनिया परिवर्तित होऊन नवीन दुनिया बनते. कलियुग बदलून सतयुग येणार आहे तर कलियुगामध्ये जरूर पतितच असतील. बाबांनी समजावून सांगितले आहे की, जेव्हा हे लक्ष्मी-नारायणाचे चित्र बनवता अथवा लिटरेचर छापता तेव्हा त्यामध्ये हे लिहिले पाहिजे की, यांनी या सहज राजयोगाच्या ज्ञानाद्वारे मागील जन्मामध्ये हा पुरुषार्थ केला आहे. केवळ एक राजा-राणीच तर असणार नाहीत. प्रजा सुद्धा तर बनते ना. अज्ञानामध्ये तर मनुष्य काहीच जाणत नाहीत; फक्त पूजा करत राहतात. आता तुम्ही समजता ते लोक पूजा करतात तेव्हा फक्त लक्ष्मी-नारायणालाच बघत राहतात. ज्ञान काहीच नाही. लोक असे समजतात की भक्तीशिवाय भगवान भेटणारच नाही. तुम्ही एखाद्याला जेव्हा सांगता की, भगवान आलेले आहेत तर तुम्हाला ते हसतात. भगवान तर कलियुगाच्या अंताला येतील, मग आता कुठून आले! भगवान कलियुगाच्या अंतालाच येतील असे का म्हणतात, हे सुद्धा समजत नाहीत. ते तर श्रीकृष्णाला द्वापरमध्ये घेऊन गेले आहेत. माणसे काहीही समजून न घेता, जे येईल ते बोलतात; म्हणून बाबा म्हणतात की तुम्ही अगदीच बुद्धू बनला आहात. बाबांना सर्वव्यापी म्हणतात. भक्ती वरकरणी तर खूप सुंदर वाटते. भक्तीमध्ये झगमगाट किती आहे! तुमच्याकडे तर असे काहीच नाही. इतर कुठल्याही सत्संग इत्यादीमध्ये जाल तर जरूर गोंगाट असतो. गाणी गातील. इथे तर बाबांना रेकॉर्ड्स वाजवलेले देखील आवडत नाही. पुढे चालून कदाचित हे देखील बंद होईल.

बाबा म्हणतात - ही गाणी इत्यादींचे सर्व सार मी तुम्हाला समजावून सांगतो. तुम्ही अर्थ जाणता. हे शिक्षण आहे. मुले जाणतात - आपण राजयोग शिकत आहोत. जर कमी शिकलात तर प्रजेमध्ये निघून जाल त्यामुळे जे खूप हुशार आहेत त्यांना फॉलो केले पाहिजे; कारण त्यांचे अभ्यासामध्ये जास्त लक्ष असते त्यामुळे त्याचा फायदा होईल. जे चांगल्या रीतीने समजावून सांगणारे आहेत त्यांच्याकडून शिकले पाहिजे. जे चांगले समजावून सांगतात त्यांची सेंटर्सवाले आठवण करतात ना. तिथे ब्रह्माकुमारी तर उपस्थित आहे, तरी देखील म्हणतात - अमकी बहीण यावी. त्यांना वाटते की ही खूप हुशार आहे. असे आहे तर मग तिचा आदरही केला पाहिजे. मोठ्यांचा देखील योग्य तो मान राखला पाहिजे. हे ज्ञानामध्ये आपल्यापेक्षा हुशार आहेत, जरूर यांना उच्च पद मिळेल, यामध्ये अहंकार येता कामा नये. मोठ्यांची खूप इज्जत केली जाते. राष्ट्रपतींचा सन्मान निश्चितच जास्त केला जाईल. प्रत्येकाचा क्रमवारीने आदर असतो. एकमेकांचा आदर तर ठेवतील ना. बॅरिस्टर लोकांमध्ये देखील नंबरवार असतात. मोठ्या केस मध्ये खूप हुशार वकील घेतात. काहीजण तर लाखो रुपयांचे खटले देखील घेतात. जरूर नंबरवार असतात. आपल्यापेक्षा हुशार आहे तर आदर ठेवला पाहिजे. सेंटर सांभाळायचे आहे. सर्व काम देखील करायचे आहे. बाबांना पूर्ण दिवस विचार चालत असतात ना. प्रदर्शनी कशी तयार केली जावी, पूर्ण लक्ष द्यायचे आहे. आपण तमोप्रधाना पासून सतोप्रधान कसे बनावे. बाबा आलेलेच आहेत सतोप्रधान बनविण्याकरिता. पतित-पावन, एक बाबाच आहेत. इथे (भक्तीमध्ये) मग म्हणतात, ‘पतित-पावनी गंगा’, त्यातच जन्म-जन्मांतर स्नान करत आले आहेत. पावन तर कोणीही बनलेला नाही. ही सर्व आहे - भक्ती. जेव्हा म्हणतात की, ‘हे पतित-पावन या’. ते जरूर संगमावरच तर येतील, आणि एकदाच येतात. प्रत्येकाचे आपले-आपले रिती-रिवाज आहेत. जसे नेपाळमध्ये अष्टमीला बळी चढवतात. लहान मुलाच्या हातामध्ये बंदूक देऊन त्याला ती चालवण्याचा सराव करवला जातो जेणेकरून तो देखील बळी चढवेल. पुढे मोठा झाल्यावर तो एका घावात वासराचे मस्तक धडावेगळे करण्यास समर्थ होतो. एखाद्याने जर हळू घाव मारला, एका घावात जर मेला नाही, तर तो बळी मानला जात नाही, त्याला देवीवर अर्पण केले जात नाही. हा सर्व आहे भक्तिमार्ग. प्रत्येकाची आपली-आपली मते, धारणा आहेत. त्या धारणेनुसार फॉलोअर्स बनतात. इथे मग या नवीन गोष्टी आहेत. याला तर तुम्ही मुलेच जाणू शकता. एकच बाबा बसून सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवतात. तुम्हाला आनंद होतो की आपण स्वदर्शन चक्रधारी आहोत, इतर कोणीही स्वतःला असे समजू शकणार नाही. तुम्हाला सभेमध्ये आम्ही जर म्हटले - ‘सर्वोत्तम ब्राह्मण कुलभूषण, स्वदर्शन चक्रधारी’ तर याचा अर्थ तुम्हीच समजू शकाल. नवीन कोणी असेल तर गोंधळून जाईल की हे नक्की काय म्हटले जात आहे? स्वदर्शन चक्रधारी तर विष्णू आहे. ही नवीन गोष्ट आहे ना म्हणून तुमच्यासाठी म्हणतात - बाहेर मैदानावर या तेव्हा समजेल.

तुमचा आहे ज्ञान-मार्ग. तुम्ही ५ विकारांवर विजय प्राप्त करता. या असुरांसोबत (५ विकारांसोबत) तुमचे युद्ध आहे. त्यानंतर तुम्ही देवता बनता; आणि मग कोणत्याही युद्धाचा प्रश्नच उरत नाही. जिथे असुर आहेत तिथे देवता नसतात. तुम्ही आहात ब्राह्मण, देवता बनणारे. जे पुरुषार्थ करत आहात. रुद्र ज्ञान यज्ञामध्ये ब्राह्मण जरूर पाहिजेत. ब्राह्मणांशिवाय यज्ञ होऊच शकत नाही. रुद्र आहेत - शिव, मग श्रीकृष्णाचे नाव कुठून आले. तुम्ही या दुनियेपेक्षा खूपच वेगळे आहात. आणि तुम्ही आहात किती थोडे. चिमण्यांनी सागराला हप केले (गिळंकृत केले). शास्त्रांमध्ये किती दंतकथा आहेत. बाबा म्हणतात - आता ते सर्व विसरून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. आत्माच बाबांची आठवण करते. बाबा तर एकच आहेत ना. ‘हे परमात्मा’ अथवा ‘प्रभू’ असे जेव्हा म्हणतात तेव्हा त्यावेळी लिंगाची सुद्धा आठवण येत नाही. फक्त ‘ईश्वर’ अथवा ‘प्रभू’ म्हणतात. आत्म्याला बाबांकडून अर्ध्याकल्पाचे सुख मिळालेले आहे, त्यामुळे मग भक्तिमार्गामध्ये आत्मा आठवण करते. आता तुम्हाला नॉलेज मिळाले आहे - आत्मा काय आहे आणि परमात्मा काय आहे. आपण सर्व आत्मे मूलवतनमध्ये राहणारे आहोत, तिथून नंबरवार पार्ट बजावण्याकरिता येतो. सर्वप्रथम येतात देवी-देवता. असे म्हणतात की, क्राइस्टच्या अगोदर देवी-देवता धर्म होता. ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. ते लोक म्हणतात - ही ५० हजार वर्षांपूर्वीची जुनी वस्तू आहे. परंतु ५० हजार वर्षांची जुनी कोणती वस्तू असू शकत नाही. ड्रामा आहेच मुळी ५ हजार वर्षांचा. मुख्य धर्मच मुळी हा आहे. या धर्माच्या लोकांचीच घरे इत्यादी असतील. अगदी सुरुवातीला तर रजोगुणी बुद्धीचे होते. आता तर अजूनच तमोगुणी बुद्धीचे झाले आहेत. प्रदर्शनीमध्ये किती समजावून सांगतात. कोणाच्या लक्षात थोडेच येते. ब्राह्मणांचेच कलम लागणार आहे. तर मुलांना हे समजावून सांगितले गेले आहे - ज्ञान वेगळी गोष्ट आहे, भक्ती वेगळी गोष्ट आहे. ज्ञानाद्वारे सद्गती होते, त्यामुळे म्हणतात देखील - ‘हे पतित-पावन या, दुःखातून लिबरेट करा’. तर गाईड बनून सोबत घेऊन जातील. बाबा येऊन आत्म्यांना घेऊन जातात. शरीरे तर सर्व नष्ट होतील. विनाश होईल ना. शास्त्रांमध्ये एकच महाभारताची लढाई गायली गेली आहे. म्हणतात देखील - ही तीच महाभारताची लढाई आहे. ती तर होणारच आहे. सर्वांना बाबांचा परिचय देत राहा. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनवण्याचा उपाय तर हा एकच आहे. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि आत्मा माझ्यासोबत निघून जाईल. सर्वांना संदेश देत रहा म्हणजे मग अनेकांचे कल्याण होईल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जे अभ्यासामध्ये हुशार आहेत, चांगल्या प्रकारे समजावून सांगतात, त्यांची संगत करायची आहे, त्यांना रिगार्ड द्यायचा आहे. कधीही अहंकारामध्ये यायचे नाही.

२) ज्ञानाच्या नवीन-नवीन गोष्टींना व्यवस्थित समजून घ्यायचे आहे आणि समजावून सांगायचे आहे. याच आनंदामध्ये राहायचे आहे की, आम्ही स्वदर्शन चक्रधारी आहोत.

वरदान:-
न्यारे आणि प्यारे (अलिप्त आणि प्रिय) या योग्यते द्वारे लगावमुक्त बनणारे सहज योगी भव

सहजयोगी जीवनाचा अनुभव करण्यासाठी ज्ञानासहित न्यारे बना, केवळ वरकरणी न्यारे बनायचे नाही परंतु मनाची आसक्ती नसावी. जितका जो न्यारा बनतो तितका सर्वांचा प्रिय जरूर बनतो. न्यारी अवस्था खूप प्रिय वाटते. जे बाहेरच्या लगावा पासून (आसक्तीपासून) न्यारे बनत नाहीत ते प्रिय बनण्याऐवजी दुःखी होतात; त्यामुळे सहजयोगी अर्थात न्यारे आणि प्यारे पणाची योग्यता असणारे, सर्व आसक्तींपासून मुक्त.

बोधवाक्य:-
स्व पुरुषार्थ आणि सेवेच्या बॅलन्स द्वारे तुमचे बंधन नात्यामध्ये बदलेल.

अव्यक्त इशारे - आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.

दात्याच्या मुलांना प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक संकल्पामधून द्यायचे आहे. उदारचित्त, हा दात्याचा मुख्य गुण आहे. तो इतरांच्या उद्धारासाठी निमित्त बनेल. तर सदैव असे समजा की आम्ही दात्याची मुले आहोत, एक सेकंद देखील दिल्याशिवाय राहणार नाही, त्यांनाच म्हटले जाते - महादानी. सदैव देण्याचे दरवाजे उघडे असावेत, जसा मंदिराचा दरवाजा नेहमी उघडा असतो, तसा दात्याच्या मुलाचा देण्याचा दरवाजा कधीही बंद नसावा.