21-10-2025      
प्रभात: मराठी मुरली        
ओम 
शान्ति
       
बापदादा 
मधुबन
“गोड 
मुलांनो - पहाटे उठून बाबांसोबत गोड-गोड गोष्टी करा, विचार सागर मंथन करण्यासाठी 
पहाटेची वेळ खूप चांगली आहे”
प्रश्न:-
भक्त देखील 
भगवंताला सर्वशक्तिमान म्हणतात आणि तुम्ही मुले देखील, परंतु दोन्हीमध्ये कोणता फरक 
आहे?
उत्तर:-
ते म्हणतात भगवान तर जे पाहिजे ते करू शकतात. सर्व काही त्यांच्या हातामध्ये आहे. 
परंतु तुम्ही जाणता बाबांनी सांगितले आहे मी देखील ड्रामामध्ये बंधायमान आहे. ड्रामा 
सर्वशक्तिमान आहे. बाबांना सर्वशक्तिमान यासाठी म्हटले जाते कारण त्यांच्याकडे 
सर्वांना सद्गती देण्याची शक्ती आहे. तुम्ही असे राज्य स्थापन करता ज्याला कधी कोणी 
हिरावून घेऊ शकत नाही.
ओम शांती।
कोणी म्हटले? बाबांनी. ओम् शांती - हे कोणी म्हटले? दादांनी. आता तुम्ही मुलांनी हे 
ओळखले आहे. उच्च ते उच्च असणाऱ्याची महिमा तर खूप मोठी आहे. म्हणतात - सर्वशक्तिमान 
आहे तर काय नाही करू शकत. आता हे भक्तीमार्गवाले तर सर्वशक्तिमान चा अर्थ खूप मोठा 
काढत असतील. बाबा म्हणतात - ड्रामा अनुसार सर्व काही होते, मी काहीही करत नाही. मी 
देखील ड्रामाच्या बंधनामध्ये आहे. फक्त तुम्ही बाबांची आठवण केल्यामुळे 
सर्वशक्तिमान बनता. पवित्र बनल्यामुळे तमोप्रधानापासून सतोप्रधान बनता. बाबा 
सर्वशक्तिमान आहेत, त्यांना शिकवावे लागते. मुलांनो, माझी आठवण करा तर विकर्म विनाश 
होतील आणि मग सर्वशक्तिमान बनून विश्वावर राज्य कराल. शक्ती नसेल तर तुम्ही राज्य 
कसे करणार. शक्ती मिळते योगाद्वारे म्हणून भारताचा प्राचीन योग खूप गायला जातो. 
तुम्ही मुले नंबरवार आठवण करून अजूनच आनंदामध्ये येता. तुम्ही जाणता आपण आत्मे 
बाबांची आठवण केल्यामुळे विश्वावर राज्य प्राप्त करू शकतो. कोणाची ताकद नाही जे 
हिरावून घेऊ शकतील. उच्च ते उच्च बाबांची महिमा सर्व जण करतात परंतु समजत काहीच 
नाहीत. एकही मनुष्य नाही ज्याला हे माहिती असेल की हे नाटक आहे. जर समजत असाल की हे 
नाटक आहे तर मग सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याची आठवण राहिली पाहिजे. नाही तर नाटक 
म्हणणेच चुकीचे ठरते. म्हणतात देखील हे नाटक आहे, आम्ही पार्ट बजावण्यासाठी आलो 
आहोत. तर त्या नाटकाच्या आदि-मध्य-अंताला देखील जाणले पाहिजे ना. असे देखील म्हणतात 
की, ‘आम्ही वरून येतो’, तेव्हाच तर वृद्धी होत राहते ना. सतयुगामध्ये तर फार थोडे 
मनुष्य होते. इतके सर्व आत्मे कोठून आले, हे कोणीही समजत नाहीत की हा अनादि 
पूर्वनियोजित अविनाशी ड्रामा आहे. जो आदिपासून अंतापर्यंत रिपीट होत राहतो. तुम्ही 
चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि पुन्हा रिवाईंड करून जर बघाल तर चक्र 
जरूर हुबेहूब रिपीट होईल. जरा सुद्धा फरक असणार नाही.
बाबा गोड-गोड मुलांना बसून कसे समजावून सांगतात. बाबा किती गोड आहेत. बाबा तुम्ही 
किती गोड आहात. बाबा बस्स, आता तर आम्ही आपल्या सुखधाममध्ये जाणार. आता हे ठाऊक झाले 
आहे की, आत्मा पावन बनली की तिथे दूध देखील पावन मिळेल. श्रेष्ठाचारी माता खूप 
प्रेमळ असतात, स्वतः आपल्या बाळाला वेळेवर दूध पाजतात. मुलांना दुधासाठी रडावे लागत 
नाही. अशाप्रकारे याच्यावर देखील विचार सागर मंथन करायचे असते. पहाटे बाबांसोबत 
गोष्टी करताना खूप मजा येते. बाबा, तुम्ही श्रेष्ठाचारी राज्य स्थापन करण्याची किती 
सुंदर युक्ती सांगता. तेव्हा मग आम्ही श्रेष्ठाचारी मातांच्या गोदीमध्ये जाणार. 
अनेक वेळा आम्हीच त्या नवीन सृष्टीमध्ये गेलो आहोत. आता आमचे आनंदाचे दिवस येत आहेत. 
हा खुशीचा खुराक आहे म्हणून गायन देखील आहे अतींद्रिय सुख विचारायचे असेल तर 
गोप-गोपींना विचारा. आता आपल्याला बेहदचे बाबा मिळाले आहेत. आम्हाला पुन्हा एकदा 
स्वर्गाचा मालक श्रेष्ठाचारी बनवितात. कल्प-कल्प आम्ही आपले राज्य-भाग्य घेतो. हार 
खातो आणि नंतर मग विजय प्राप्त करतो. आता बाबांची आठवण करूनच रावणावर विजय प्राप्त 
करायचा आहे तेव्हा मग आपण पावन बनणार. तिथे युद्ध, दुःख इत्यादींचे नावही नाही, 
कोणता खर्चही नाही. भक्ती मार्गामध्ये जन्म-जन्मांतर किती खर्च केला, किती धक्के 
खाल्ले, किती गुरु केले. आता परत अर्धाकल्प आम्ही कोणता गुरु करणार नाही. शांतीधाम, 
सुखधामला जाणार. बाबा म्हणतात - तुम्ही सुखधामाचे प्रवासी आहात. आता दुःखधाम मधून 
सुखधाम मध्ये जायचे आहे. वाह आमचे बाबा, कसे आम्हाला शिकवत आहेत. आपले यादगार (स्मारक) 
देखील इथे आहे. हे तर खूप वंडर आहे. या दिलवाडा मंदिराची तर अपरंपार महिमा आहे. आता 
आपण राजयोग शिकत आहोत. त्याचे यादगार तर जरूर बनणार ना. हे आमचे हुबेहूब यादगार आहे. 
बाबा, मम्मा आणि मुले बसली आहेत. खाली योग शिकत आहेत, वरती स्वर्गाची राजाई आहे. 
झाडाच्या चित्रामध्ये देखील किती क्लिअर आहे. बाबांनी कसे साक्षात्कार करवून मग तशी 
चित्रे बनवून घेतली आहेत. बाबांनीच साक्षात्कार करविला आणि मग दुरुस्ती देखील केली. 
किती वंडर आहे. संपूर्ण नवीन नॉलेज आहे. कोणालाही या नॉलेज विषयी माहिती नाही आहे. 
बाबाच बसून समजावून सांगतात, मनुष्य किती तमोप्रधान बनत जातात. मनुष्य सृष्टी वाढत 
जाते. भक्तीची देखील वृद्धी होता-होता तमोप्रधान बनत जाते. इथे आता तुम्ही 
सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करता. गीतेमध्ये देखील हा शब्द आहे - मनमनाभव. फक्त 
हे जाणत नाहीत की भगवान कोण आहेत. आता तुम्हा मुलांना पहाटे उठून विचार सागर मंथन 
करायचे आहे की लोकांना ईश्वराचा परिचय कसा द्यावा. भक्तीमध्ये देखील लोक पहाटे उठून 
देवघरामध्ये बसून भक्ती करतात. ते देखील विचार सागर मंथन झाले ना. आता तुम्हाला 
ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळतो आहे. बाबा तिसरा नेत्र देण्याची कथा ऐकवतात. यालाच मग 
तिजरीची कथा म्हटले आहे. तीजरीची कथा, अमरकथा, सत्यनारायणाची कथा देखील प्रसिद्ध आहे. 
ऐकविणारे एक बाबाच आहेत जी नंतर भक्ती मार्गामध्ये चालते. ज्ञानाद्वारे तुम्ही मुले 
सॉल्व्हन्ट (पवित्र) बनता, म्हणून देवतांना पदमपती म्हणतात. देवता अतिशय धनवान, 
पदमपती बनतात. कलियुगाला देखील बघा आणि सतयुगाला देखील बघा - रात्रं-दिवसाचा फरक आहे. 
साऱ्या दुनियेची सफाई होण्यासाठी वेळ लागतो ना. ही बेहदची दुनिया आहे. भारत आहेच 
मुळी अविनाशी खंड. हा कधीही प्राय: लोप होत नाही. अर्धा कल्प एकच खंड राहतो. नंतर 
मग इतर खंड नंबरवार इमर्ज होतील. तुम्हा मुलांना किती ज्ञान मिळते. बोला - जगाचा 
इतिहास-भूगोल कसा फिरतो ते - येऊन समजून घ्या. प्राचीन ऋषी मुनींचा किती मान आहे, 
परंतु ते देखील सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाहीत. ते हठयोगी आहेत. होय बाकी 
त्यांच्यामध्ये पवित्रतेची ताकद आहे ज्याद्वारे भारताला थोपवून धरतात. नाही तर 
माहित नाही भारताचे काय झाले असते. घराला रंगरंगोटी इत्यादी केली जाते तेव्हा घर 
सुंदर दिसते ना. भारत महान पवित्र होता, आता तोच पतित बनला आहे. तिथे तुम्हाला सुख 
देखील जास्त काळ मिळते. तुमच्याकडे पुष्कळ धन असते. तुम्ही भारतामध्येच राहत होता. 
तुमचे राज्य होते, कालचीच गोष्ट आहे. नंतर मग इतर धर्म आले. त्यांनी येऊन काही 
सुधारणा करून स्वतःचे नाव प्रसिद्ध केले. आता ते देखील सर्व तमोप्रधान बनले आहेत. 
आता तुम्हा मुलांना किती आनंद झाला पाहिजे. या सर्व गोष्टी नवीन जिज्ञासुला 
ऐकवायच्या नाहीत. सर्वप्रथम तर बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबांचे नाव, रूप, देश, 
काळ जाणता का? उच्च ते उच्च बाबांचा पार्ट तर प्रसिद्ध आहे ना. आता तुम्ही जाणता - 
ते बाबाच आपल्याला डायरेक्शन देत आहेत. तुम्ही पुन्हा आपली राजधानी स्थापन करत आहात. 
तुम्ही मुले माझी मदतगार आहात. तुम्ही पवित्र बनता. तुमच्यासाठी पवित्र दुनिया जरूर 
स्थापन होणार आहे. तुम्ही हे लिहू शकता की, आता ही जुनी दुनिया बदलत आहे. मग हे 
सूर्यवंशी-चंद्रवंशी राज्य असेल. त्यानंतर मग रावण राज्य असेल. चित्रांवर समजावून 
सांगणे खूप गोड चांगले वाटते, यामध्ये तिथी-तारीख सर्व लिहिलेले आहे. भारताचा 
प्राचीन राजयोग अर्थात आठवण. आठवणीद्वारे विकर्म विनाश होतात आणि शिक्षणाद्वारे 
स्टेटस मिळते. दैवी गुण धारण करायचे आहेत. होय, इतके जरूर आहे की मायेची वादळे 
येतील. पहाटे उठून बाबांसोबत गोष्टी करणे खूप चांगले आहे. भक्ती आणि ज्ञान 
दोन्हीकरिता ही वेळ चांगली आहे. गोड-गोड गोष्टी केल्या पाहिजेत. आता आपण 
श्रेष्ठाचारी दुनियेमध्ये जाणार. वृद्धांच्या मनामध्ये तर हे असते की आपण शरीर 
सोडून गर्भामध्ये जाणार. बाबा किती नशा चढवतात. अशा प्रकारे बसून तुम्ही गोष्टी करा 
तरीही जमा होईल. शिवबाबा आपल्याला नरकवासी पासून स्वर्गवासी बनवत आहेत. सर्वप्रथम 
आपणच येतो, संपूर्ण ऑल राऊंड पार्ट आपण बजावला आहे. आता बाबा म्हणतात - या छी-छी 
शरीराला (विकारी शरीराला) सोडून द्या. देहा सहित साऱ्या दुनियेला विसरून जा. हा आहे 
बेहदचा संन्यास. तिथे देखील तुम्ही वृद्ध व्हाल तर साक्षात्कार होईल - आपण छोटे बाळ 
बनणार. आनंद होतो. बालपण तर सर्वात चांगले आहे. अशा प्रकारे पहाटे बसून विचार सागर 
मंथन करायचे आहे. पॉईंट्स सुचले की तुम्हाला खूप आनंद होईल. आनंदाने तास-दीड तास 
निघून जातो. जितकी प्रॅक्टिस होत जाईल तितका आनंद वाढत जाईल. खूप मजा येईल आणि मग 
चालता-फिरता आठवण करायची आहे. सवड खूप आहे, होय, विघ्ने पडतील, यामध्ये कोणती शंका 
नाही. धंदा करत असताना मनुष्याला झोप येत नाही. आळशी लोक झोप काढतात. तुम्ही जितके 
शक्य असेल शिवबाबांची आठवण करत रहा. तुमच्या बुद्धिमध्ये असते - शिवबाबांसाठी मी 
भोजन बनवत आहे. शिवबाबांसाठी मी हे करत आहे. भोजन देखील शुद्धतेने बनवायचे आहे. अशी 
कोणती गोष्ट असू नये ज्यामुळे कटकट होईल. स्वतः बाबा (ब्रह्माबाबा) देखील आठवण 
करतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक 
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य 
सारांश:-
१) पहाटे उठून 
बाबांसोबत गोड-गोड गोष्टी करायच्या आहेत. रोज खुशीचा खुराक खात अतींद्रिय सुखाचा 
अनुभव करायचा आहे.
२) सतयुगी राजधानी 
स्थापन करण्यामध्ये बाबांचा पूर्णपणे मदतगार बनण्याकरिता पावन बनायचे आहे, आठवणी 
द्वारे विकर्म विनाश करायची आहेत, भोजन देखील शुद्धतेने बनवायचे आहे.
वरदान:-
दिव्य 
गुणांच्या आवाहनाद्वारे सर्व अवगुणांची आहुती देणारे संतुष्ट आत्मा भव
जसे दिवाळीला सफाईवर 
आणि कमाईवर विशेष लक्ष देतात. तसे तुम्ही देखील सर्व प्रकारच्या सफाईचे आणि कमाईचे 
लक्ष्य ठेऊन संतुष्ट आत्मा बना. संतुष्टतेद्वारेच सर्व गुणांचे आवाहन करू शकाल. आणि 
मग स्वतःच अवगुणांची आहुती पडेल. तुमच्यामध्ये ज्या कमजोरी, कमतरता, दुबळेपणा, 
कोमलता राहिलेल्या आहेत, त्या सर्वांना नष्ट करून आता नवीन खाते सुरु करा आणि नवीन 
संस्कारांची नवीन वस्त्रे धारण करून खरी दिवाळी साजरी करा.
बोधवाक्य:-
ाच्या सीट वर 
कायम सेट रहायचे असेल तर दृढ संकल्पाचा बेल्ट चांगल्या तऱ्हेने बांधा.
मातेश्वरीजींची अनमोल 
महावाक्ये:-
“हे अविनाशी ईश्वरीय 
ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणतीही भाषा शिकावी लागत नाही” 
आपले जे ईश्वरीय ज्ञान आहे, ते खूप सोपे आणि गोड आहे, याच्या द्वारे 
जन्म-जन्मांतरासाठी कमाई जमा होते. हे ज्ञान इतके सोपे आहे जे कोणीही महान आत्मा, 
अहिल्ये सारखी जड-बुद्धीवाली, कोणत्याही धर्माच्या बालकापासून वृद्धापर्यंत कोणीही 
प्राप्त करू शकतो. बघा, इतके सोपे ज्ञान असतानाही दुनियावाले याला खूप अवघड समजतात. 
कोणी तर समजतात - आम्ही तर पुष्कळ वेद-शास्त्रे, उपनिषद शिकून मोठ-मोठे विद्वान बनलो 
आहोत, आणि या ज्ञानासाठी मग भाषा शिकावी लागेल. खूप हठयोग करावा लागेल तेव्हाच 
प्राप्ती होऊ शकेल; परंतु हे तर आम्ही आमच्या अनुभवाने ओळखले आहे की हे ज्ञान खूपच 
सोपे आणि सरळ आहे कारण स्वयं परमात्मा शिकवत आहेत, यामध्ये ना कोणती हठ-क्रिया, ना 
जप-तप, ना शास्त्रवादी पंडित असण्याची गरज आहे, ना यासाठी कोणती संस्कृत भाषा 
शिकण्याची गरज आहे, यामध्ये तर आत्म्याला आपल्या परमपिता परमात्म्यासोबत नॅचरल योग 
लावायचा आहे. भले कोणी या ज्ञानाला धारण जरी करू शकत नसतील तरी देखील फक्त योग 
लावल्याने देखील खूप फायदा होईल. यामुळे एक तर पवित्र बनतात, दुसरे म्हणजे कर्मबंधने 
भस्मीभूत होतात आणि कर्मातीत बनतात; इतकी ताकद या सर्वशक्तिवान परमात्म्याच्या 
आठवणीमध्ये आहे. भले ते आपल्या साकार ब्रह्मा तनाद्वारे आम्हाला योग शिकवत आहेत 
परंतु तरीही आठवण डायरेक्ट त्या ज्योती स्वरूप शिव परमात्म्याची करायची आहे, त्या 
आठवणीनेच कर्मबंधनाची घाण उतरेल. अच्छा! ओम् शांती.
अव्यक्त इशारे:-
स्वयं प्रति आणि 
सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा. शांतीच्या शक्तीचा प्रयोग 
अगोदर स्वतःवर, तनाच्या व्याधीवर करून पहा. या शक्तीद्वारे कर्मबंधनाचे रूप मग गोड 
संबंधाच्या रूपामध्ये बदलेल. हा कर्मभोग, कर्माचे कठोर बंधन सायलेन्सच्या 
शक्तीद्वारे पाण्यावरील रेषेप्रमाणे अनुभव होईल. भोगणारे रूप नाही, भोगना भोगत आहे 
- असे नाही परंतु साक्षी दृष्टा होऊन या हिशोबाचे दृश्य देखील बघत रहाल.