22-04-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो - तुम्ही
काटेकोरपणे बाबांच्या आठवणीमध्ये राहिलात तर तुमचा चेहरा नेहमी तेजस्वी आणि
प्रफुल्लित राहील”
प्रश्न:-
आठवणीमध्ये
बसण्याची विधी कोणती आहे तसेच त्यामुळे कोणकोणते फायदे होतात?
उत्तर:-
जेव्हा तुम्ही आठवणीमध्ये बसता तेव्हा डोक्यातून सर्व काम-धंदा इत्यादीची पंचाईत
विसरून स्वतःला देही (आत्मा) समजा. देह आणि देहाच्या नात्यांचे खूप मोठे जाळे आहे,
त्या जाळ्याला हप करून (नष्ट करून) या देह-अभिमानापासून परे व्हा अर्थात आप मुये मर
गई दुनिया. जिवंतपणी सर्व काही विसरून एका बाबांची आठवण राहणे, ही आहे अशरीरी अवस्था,
यामुळे आत्म्याची कट (गंज) उतरत जाईल.
गीत:-
रात के राही…
ओम शांती।
मुले आठवणीच्या यात्रेमध्ये बसले आहेत, ज्याला म्हणतात नेष्ठामध्ये अथवा शांतीमध्ये
बसले आहेत. फक्त शांतीमध्ये बसत नाहीत, काहीतरी करत आहेत. स्वधर्मामध्ये टिकून बसले
आहेत. परंतु यात्रेवर देखील आहेत. ही यात्रा शिकविणारे बाबा सोबत देखील घेऊन जातात.
ते (या दुनियेतील) असतात भौतिक ब्राह्मण, जे सोबत घेऊन जातात. तुम्ही आहात रूहानी
ब्राह्मण, ब्राह्मणांचा वर्ण अथवा कुळ म्हणणार. आता मुले आठवणीच्या यात्रेमध्ये बसले
आहेत, इतर सत्संगांमध्ये बसत असतील तेव्हा गुरुची आठवण येईल. गुरु येऊन प्रवचन
ऐकवतील. तो सर्व आहे भक्तिमार्ग. ही आहे आठवणीची यात्रा, ज्याद्वारे विकर्म विनाश
होतात. तुम्ही आठवणीमध्ये बसता, गंज अर्थात कट काढून टाकण्यासाठी. बाबांचा आदेश आहे
आठवणीनेच गंज निघेल कारण पतित-पावन मीच आहे. मी कोणाच्या आठवण करण्याने येत नाही.
माझे येणे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. जेव्हा पतित दुनिया बदलून पावन दुनिया
होणारच आहे, आदि सनातन देवी-देवता धर्म जो प्राय: लोप झाला आहे, त्याची पुन्हा
ब्रह्मा द्वारे स्थापना करतात. ज्या ब्रह्मासाठीच सांगितले आहे - ब्रह्मा सो विष्णु,
सेकंदामध्ये बनतात. मग परत विष्णू पासून ब्रह्मा बनण्यामध्ये ५ हजार वर्षे लागतात.
या देखील बुद्धीने समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. तुम्ही जे शूद्र होता, आता
ब्राह्मण वर्णामध्ये आला आहात. तुम्ही ब्राह्मण बनता तेव्हा तुमच्यातील भेसळ काढून
टाकण्यासाठी शिवबाबा ब्रह्मा द्वारे तुम्हाला आठवणीची यात्रा शिकवतात. हे रचनेचे
चक्र कसे फिरते ते तर तुम्हाला समजले आहे. यासाठी फारसा वेळ लागत नाही. खरोखर आता
आहे देखील कलियुग. ते फक्त म्हणतात की, कलियुगाची आता सुरुवात आहे आणि बाबा म्हणतात
- कलियुगाचा अंत आहे. घोर अंधार आहे. बाबा म्हणतात, तुम्हाला या सर्व
वेद-शास्त्रांचे सार समजावून सांगतो.
तुम्ही मुले पहाटे
जेव्हा इथे बसता तेव्हा आठवणीमध्ये बसले पाहिजे, नाहीतर मायेची वादळे येतील.
बुद्धियोग काम-धंद्याकडे जाईल. या सर्व बाहेरच्या पंचायती (कटकटी) आहेत ना. जसे कोळी
किती जाळे विणतो. आणि परत ते सर्व नष्टही करतो. देहाचा केवढा प्रपंच आहे. काका, चाचा,
मामा, गुरु-गोसावी… केवढे जाळे दिसून येते. ते सर्व आपल्या देहासहित पूर्ण नष्ट
करायचे आहे. एकटा देही बनायचे आहे. मनुष्य जेव्हा शरीर सोडतात - तर सर्व काही
विसरतात. आप मुये मर गई दुनिया. हे तर बुद्धीमध्ये ज्ञान आहे की ही दुनिया नष्ट
होणार आहे. बाबा समजावून सांगत आहेत - ज्यांचे तोंड उघडत नाही (ज्यांना हे ज्ञान
समजावून सांगता येत नाही) त्यांनी निदान आठवण तरी करा. जसे हे (ब्रह्मा बाबा)
बाबांची आठवण करतात. कन्या, पतीची आठवण करते कारण पती, परमेश्वर बनतो त्यामुळे मग
बाबांमधून बुद्धी निघून पतीमध्ये जाते. हे तर पतींचेही पती आहेत, ब्राईडग्रुम (नवरदेव)
आहेत ना. तुम्ही सर्वजण आहात ब्राईड्स (वधू), भगवंताची सर्वजण भक्ती करतात. सर्व
भक्तिणी रावणाच्या नजर कैदेत आहे तर बाबांना जरूर दया येईल ना. बाबा दयाळू आहेत,
त्यांनाच दयाळू म्हटले जाते. आता यावेळी गुरु तर अनेक प्रकारचे आहेत. जो कोणी शिकवण
देतात, त्यांना गुरु म्हणतात. इथे तर बाबा प्रॅक्टिकल मध्ये राजयोग शिकवत आहेत. हा
राजयोग तर परमात्म्याव्यतिरिक्त इतर कोणालाही शिकवताच येणार नाही. परमात्म्यानेच
येऊन राजयोग शिकवला होता. मग त्यामुळे काय झाले? हे कोणालाच ठाऊक नाहीये. अनेक लोक
पुरावा म्हणून गीतेचा दाखला देतात, छोट्या कुमारी देखील गीता तोंडपाठ करतात, तर तिची
थोडीफार महिमा होते. गीता काही नामशेष झालेली नाहीये. गीतेची खूप मोठी महिमा आहे.
गीता ज्ञानाद्वारेच बाबा साऱ्या दुनियेला रीज्युवनेट (पुनर्जीवित)करतात. तुमची काया
कल्पतरू, कल्पवृक्ष समान अथवा अमर बनवितात.
तुम्ही मुले बाबांच्या
आठवणीमध्ये राहता, बाबांचे आवाहन करत नाही. तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये राहून आपली
उन्नती करत आहात. बाबांच्या डायरेक्शन अनुसार चालण्याची आवड देखील असली पाहिजे.
आम्ही शिवबाबांची आठवण करूनच भोजन खाणार. जणू शिवबाबांसोबत खातात. ऑफिसमध्ये देखील
थोडा-थोडा वेळ मिळतो. बाबांना लिहितात - ‘खुर्चीवर बसतो तेव्हा आठवणीमध्ये बसतो.
अधिकारी येऊन बघतात, हे तर बसल्या-बसल्या हरवून जातात अर्थात अशरीरी होतात’. कोणाचे
डोळे मिटतात, कोणाचे उघडे राहतात. कोणी तर असा बसलेला असतो जणू काही त्याला काहीच
दिसत नाही. जणू काही ते हरवून गेले आहेत. असे घडते. बाबांनी दोरी खेचली आणि मजेत (अतींद्रिय
सुखामध्ये) बसला आहे. त्यांना जर विचारले तुम्हाला काय झाले? तर म्हणतील - मी तर
बाबांच्या आठवणीमध्ये बसलो होतो. बुद्धीमध्ये असते की आपल्याला जायचे आहे बाबांकडे.
बाबा म्हणतात, सोल कॉन्सेस (आत्म-अभिमानी) बनल्यामुळे तुम्ही माझ्याकडे याल. तिथे
पवित्र झाल्याशिवाय थोडेच जाऊ शकाल. आता पवित्र बनायचे कसे? ते तर बाबाच सांगू
शकतात, मनुष्य सांगू शकणार नाही. तुम्हाला थोडेफार समजलेले असेल तर इतरांचे देखील
कल्याण कराल. तुम्हाला कोणाचे कल्याण करण्याचा, बाबांचा परिचय देण्याचा पुरुषार्थ
जरूर करायचा आहे. भक्तीमार्गामध्ये देखील ‘ओ गॉड फादर’ असे म्हणून आठवण करतात. गॉड
फादर दया करा. बोलावण्याची एक सवय झाली आहे. बाबा तुम्हा मुलांना आपल्या सारखे
कल्याणकारी बनवतात. मायेने सर्वांना किती निर्बुद्ध बनवले आहे. लौकिक पिता देखील
मुलांचे वर्तन चांगले नसल्याचे बघतात तेव्हा म्हणतात की, तू तर निर्बुद्ध आहेस. एका
वर्षामध्येच पित्याची सर्व संपत्ती उडवून टाकतील. तर बेहदचे बाबा देखील म्हणतात -
तुम्हाला काय बनवले होते, आता आपले चलन (वर्तन) तर बघा. आता तुम्ही मुले समजता कसा
वंडरफुल खेळ आहे. भारताचा किती डाऊन फॉल होतो (अध:पतन होते). डाऊन फॉल ऑफ भारतवासी
(भारतवासीयांचे अध:पतन). परंतु ते (दुनियावाले) स्वतःला असे समजत नाहीत की आपण घसरलो
आहोत, आम्ही कलियुगी तमोप्रधान बनलो आहोत. भारत स्वर्ग होता अर्थात मनुष्य
स्वर्गवासी होते, तेच मनुष्य आता नरकवासी आहेत. हे ज्ञान कोणालाच नाहीये. हे बाबा (ब्रह्मा
बाबा) देखील जाणत नव्हते. आता बुद्धीमध्ये चमत्कार घडला आहे. ८४ जन्म घेत-घेत शिडी
तर जरूर उतरावी लागते, वर चढण्यासाठी जागा देखील नाहीये. उतरता-उतरता पतित बनायचे
आहे. ही गोष्ट कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीये. बाबांनी तुम्हा मुलांना समजावून
सांगितले आहे, तुम्ही मग भारतवासीयांना समजावून सांगता की, तुम्ही स्वर्गवासी होता
आता नरकवासी बनला आहात. ८४ जन्म देखील तुम्हीच घेतले आहेत. पुनर्जन्मला तर मानता
ना. तर जरूर खाली उतरायचे आहे. किती पुनर्जन्म घेतले आहेत, ते देखील बाबांनी
समजावून सांगितले आहे. यावेळेस तुम्ही अनुभव करता की, आपण पावन देवी-देवता होतो आणि
मग रावणाने पतित बनवले आहे. शूद्रापासून देवता बनविण्यासाठी बाबांनाच येऊन शिकवावे
लागते. बाबांना लिबरेटर, गाईड म्हणतात, परंतु अर्थ समजत नाहीत. आता ती वेळ लवकरच
येईल जेव्हा सर्वांना माहिती होईल, बघा कसे होतो आणि आता काय बनलो आहोत. ड्रामा कसा
बनलेला आहे, कोणाला स्वप्नातही नव्हते की आपण लक्ष्मी-नारायणासारखे बनू शकतो. बाबा
किती स्मृती जागृत करून देत आहेत. आता बाबांकडून वारसा घ्यायचा असेल तर श्रीमतावर
चालायचे आहे. आठवणीच्या यात्रेची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला माहिती आहे की
पाद्री लोक पायी चालण्यासाठी जातात, किती सायलेन्समध्ये चालत असतात. ते क्राईस्टच्या
आठवणीमध्ये राहतात. त्यांचे क्राइस्टवर प्रेम आहे. तुम्हा रूहानी पंड्यांची
प्रीत-बुद्धी आहे परमप्रिय परमपिता परमात्मा सोबत. मुले जाणतात, जितके पुरुषार्थ
करून श्रीमतावर चालू, तितके नंबरवार पुरुषार्थानुसार कल्पापूर्वी प्रमाणे राजधानी
जरूर स्थापन होईल. बाबा तर खूप चांगले-चांगले सल्ले देतात. तरी देखील अशी काही
ग्रहचारी बसते की श्रीमतावर चालतच नाहीत. तुम्ही जाणता श्रीमतावर चालण्यातच विजय आहे.
निश्चयामध्येच विजय आहे. बाबा म्हणतात - तुम्ही माझ्या मतावर चाला. असे का समजता
की, हे ब्रह्मा मत देतात? नेहमी असेच समजा की शिवबाबा सल्ला देत आहेत. ते (ब्रह्मा
बाबा) तर सेवे विषयीच सल्ला देतील. कोणी जर विचारेल की, ‘बाबा, हा व्यापार, धंदा मी
करू का?’ तर बाबा काही या गोष्टींसाठी मत देणार नाहीत. बाबा म्हणतात, मी आलोच आहे
पतिता पासून पावन बनविण्याची युक्ती सांगण्याकरिता, या गोष्टींसाठी मी आलेलो नाहीये.
मला बोलावता देखील - ‘हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा’; तर ती खूप सोपी युक्ती
मी सांगतो. तुमचे नावच आहे - गुप्त सेना. त्यांनी मग शस्त्रे, बाण इत्यादी दाखवले
आहेत. परंतु यामध्ये बाण इत्यादीची काही गोष्टच नाही. हा सर्व आहे भक्तीमार्ग.
बाबा येऊन खरा मार्ग
दाखवतात - ज्यामुळे अर्धा कल्प तुम्ही सचखंड मध्ये जाता. तिथे दुसरा कोणताही खंड
असतच नाही. कुणाला समजावून सांगाल तरीही मानतच नाहीत की, ‘हे कसे होऊ शकते की फक्त
भारतच होता’. क्राइस्टच्या आधी ३००० वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता ना, तेव्हा इतर
कोणताही धर्म नव्हता. मग झाडाची वृद्धी होत राहते. तुम्ही फक्त आपल्या पित्याला,
आपल्या धर्माला, कर्माला विसरले आहात. स्वतःला जर देवी-देवता धर्माचे समजले असते तर
मग घाणेरड्या गोष्टी इत्यादी काहीही खाल्ले नसते. परंतु खातात, कारण ते गुण राहिलेले
नाहीत म्हणून स्वतःला हिंदू म्हणतात. नाहीतर लाज वाटली पाहिजे की, आपले वरिष्ठ असे
पवित्र आणि आपण असे पतित बनलो आहोत. परंतु आपल्या धर्माला विसरले आहेत. आता तुम्ही
ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला चांगल्या प्रकारे समजला आहात. कोणतीही अशी गोष्ट असेल
तर तुम्ही म्हणू शकता की हे पॉईंट्स अजून बाबांनी सांगितलेले नाहीत. बस्स. नाहीतर
विनाकारण गोंधळून जाता. बोला, आम्ही आता शिकत आहोत. सर्वकाही आता जाणून घेतले तर मग
तर विनाशच होईल. परंतु नाही. अजून मार्जिन (वेळ) आहे. आम्ही शिकत आहोत. अंताला
संपूर्ण पवित्र होणार. नंबरवार पुरुषार्थानुसार गंज निघत जाईल तेव्हा मग सतोप्रधान
बनाल. मग या पतित दुनियेचा विनाश होईल. आजकाल म्हणतात देखील की, परमात्मा कुठेतरी
जरूर आलेले आहेत. परंतु गुप्त आहेत. ही वेळ तर बरोबर विनाशाची आहे ना. बाबाच
लिबरेटर, गाईड आहेत जे परत घेऊन जातील, मच्छरांसदृश्य मरतील. हे देखील जाणतात,
सगळेच काही एकरस आठवणीमध्ये बसत नाहीत. कोणाचा ॲक्युरेट योग असतो, कोणाचा अर्धा तास,
कोणाचा १५ मिनिटे. कोणी तर एक मिनिट सुद्धा आठवणीमध्ये राहत नाहीत. कोणी म्हणतात -
आम्ही पूर्ण वेळ बाबांच्या आठवणीमध्ये राहतो, तर त्यांचा चेहरा जरूर प्रफुल्लित आणि
चमकत राहील. अतींद्रीय सुख अशा मुलांना अनुभव होते. कुठेही बुद्धी भटकत नाही. ते
सुखाचा अनुभव करत असतील. बुद्धी देखील म्हणते - एका माशुकच्या आठवणीमध्ये बसून
राहिलो तर किती गंज उतरेल. मग सवय होईल. आठवणीच्या यात्रेने तुम्ही एव्हरहेल्दी,
एव्हरवेल्दी (निरोगी आणि समृद्ध) बनता. चक्राची देखील आठवण येते. फक्त आठवणीमध्ये
राहण्याची मेहनत आहे. बुद्धीमध्ये चक्र देखील फिरत राहील.
आता तुम्ही मास्टर
बीजरूप बनता. आठवणी सोबत स्वदर्शन चक्र देखील फिरवायचे आहे. तुम्ही भारतवासी लाईट
हाऊस आहात. तुम्ही स्पिरिच्युअल लाईट हाऊस सर्वांना घरचा रस्ता दाखवता. हे देखील
समजावून सांगावे लागेल ना. तुम्ही मुक्ती-जीवनमुक्तीचा रस्ता दाखवता म्हणून तुम्ही
आहात - स्पिरिच्युअल लाईट हाऊस. तुमचे स्वदर्शन चक्र फिरत राहते. नाव लिहायचे असेल
तर समजावून सांगावे देखील लागेल. बाबा समजावून सांगत राहतात, तुम्ही सन्मुख बसले
आहात. ‘जो पिया के साथ है उनके लिये सन्मुख बरसात है’. सर्वात जास्त मजा सन्मुख
असण्यामध्ये आहे. मग सेकंड नंबर आहे टेप वरून ऐकण्यामध्ये. थर्ड नंबर मुरली. शिवबाबा
ब्रह्मा द्वारे सर्व काही समजावून सांगतात. हे (ब्रह्मा बाबा) देखील जाणतात तर खरे
ना. तरी देखील तुम्ही हेच समजा की “शिवबाबा सांगत आहेत”, हे न समजल्यामुळे खूप
अवज्ञा करतात (आज्ञेचे उल्लंघन करतात). शिवबाबा जे सांगतात, ते कल्याणकारीच आहे. भले
कल्याण झाले, तरीही ते देखील कल्याणाच्या रूपामध्ये बदलेल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांच्या
प्रत्येक डायरेक्शन अनुसार चालून स्वतःची उन्नती करायची आहे. एका बाबांवर खरी-खरी
प्रीत करायची आहे. आठवणीमध्ये राहूनच भोजन बनवायचे आहे आणि खायचे आहे.
२) स्पिरिच्युअल लाईट
हाऊस बनवून सर्वांना मुक्ती-जीवनमुक्तीचा मार्ग दाखवायचा आहे. बाप समान कल्याणकारी
जरूर बनायचे आहे.
वरदान:-
ईश्वरीय
शानमध्ये स्थित राहून प्रत्येक कर्म शानदार बनविणारे सर्व चिंतांपासून मुक्त भव
सदा याच ईश्वरीय
शानमध्ये रहा की, मी बापदादांचा नूरे रत्न आहे, माझ्या डोळ्यांना अथवा नजरेला
कोणतीही वस्तू आकर्षित करू शकत नाही. या शानमध्ये राहिल्यामुळे विविध प्रकारच्या
चिंता स्वतःच समाप्त होतील. कोणत्याही प्रकारची तक्रार राहू शकत नाही. जितके जे
आपल्या उच्च शानमध्ये स्थित राहतात त्यांना मान देखील स्वतः प्राप्त होतो आणि
त्यांचे प्रत्येक कर्म शानदार होते.
बोधवाक्य:-
ट्रस्टी तो आहे
जो आपले सर्व काही बाबांच्या हवाली करतो.
हे अव्यक्त इशारे -
महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.
तुमच्या प्रत्येक
शब्दामध्ये मधुरता, संतुष्टता, सरळपणाची नवीनता असावी. ब्राह्मण आत्म्यांचे बोल
साधारण बोल नसावेत. हीच महानता आहे आणि हीच नवीनता आहे. मधुर बोल, मधुर संस्कार,
मधुर स्वभावानेच दुसऱ्यांचे देखील तोंड गोड करत रहा. “सदा अथक भव और मधुर भव” च्या
वरदानांनी पुढे जात रहा, उडत रहा.