22-10-2025      
प्रभात: मराठी मुरली        
ओम 
शान्ति 
       
बापदादा 
मधुबन
“गोड 
मुलांनो - तुम्ही जेव्हा कोणालाही ज्ञान समजावून सांगता किंवा भाषण करता तर 
‘बाबा-बाबा’ असे म्हणत समजावून सांगा, बाबांची महिमा करा तेव्हा तीर लागेल”
प्रश्न:-
बाबा भारतवासी 
मुलांना विशेष कोणते प्रश्न विचारतात?
उत्तर:-
तुम्ही भारतवासी मुले जी इतकी श्रीमंत होता, सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण देवता 
धर्माचे होता, तुम्ही पवित्र होता, काम कटारी चालवत नव्हता, अतिशय श्रीमंत होता. मग 
तुमचे इतके दिवाळे कसे निघाले आहे याचे कारण ठाऊक आहे? मुलांनो, तुम्ही गुलाम कसे 
काय बनलात? इतकी सर्व धन-संपत्ती कुठे गमावलीत? विचार करा तुम्ही पावन असणारे पतित 
कसे बनलात? तुम्ही मुले देखील अशा प्रकारच्या गोष्टी ‘बाबा-बाबा’ असे म्हणत इतरांना 
देखील समजावून सांगा - तर त्यांना सहज समजेल.
ओम शांती।
ओम् शांती म्हटले तरी देखील बाबांची जरूर आठवण आली पाहिजे. बाबांचे सर्वात पहिले 
म्हणणे आहे - मनमनाभव. जरूर या पूर्वी देखील संगितले आहे तेव्हाच तर आता देखील 
सांगत आहेत ना. तुम्ही मुले बाबांना जाणता, जेव्हा कुठे सभेमध्ये भाषण करण्यासाठी 
जाता, तर ते लोक काही बाबांना जाणत नाहीत. तर त्यांना देखील सांगताना असे म्हटले 
पाहिजे की, ‘शिवबाबा म्हणतात की तेच पतित-पावन आहेत’. जरूर पावन बनविण्याकरिता इथे 
येऊन समजावून सांगतात. जसे इथे बाबा तुम्हाला म्हणतात - ‘माझ्या मुलांनो, तुम्हाला 
स्वर्गाचा मालक बनवले होते, तुम्ही आदि सनातन देवी-देवता धर्मावाले विश्वाचे मालक 
होता’; असेच तुम्ही देखील बोलले पाहिजे की, ‘बाबा असे म्हणतात’. असा समाचार अजून 
कोणाच्याच भाषणाचा आलेला नाही. शिवबाबा म्हणतात - मला सर्वश्रेष्ठ मानता, पतित-पावन 
देखील मानता, मी येतो देखील भारतामध्ये आणि राजयोग शिकविण्यासाठी येतो, म्हणतो 
मामेकम् (मज एकाची) आठवण करा, मज सर्वोच्च पित्याची आठवण करा कारण ते पिता देणारे 
दाता आहेत. खरोखर भारतामध्ये तुम्ही विश्वाचे मालक होता ना. इतर कोणताही धर्म नव्हता. 
बाबा आम्हा मुलांना समजावून सांगतात, ते मग आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. बाबा 
म्हणतात तुम्ही भारतवासी किती श्रीमंत होता. सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण… देवता 
धर्म होता, तुम्ही पवित्र होता, काम कटारी चालवत नव्हता. खूप धनवान होता. मग बाबा 
म्हणतात - तुमचे इतके दिवाळे कसे निघाले आहे - याचे कारण माहित आहे का? तुम्ही 
विश्वाचे मालक होता. आता तुम्ही विश्वाचे गुलाम का बनला आहात? सर्वांकडून कर्ज घेत 
राहता. इतके सर्व पैसे कुठे गेले? जसे बाबा भाषण करत आहेत तसेच तुम्ही देखील भाषण 
करा तर भरपूर लोक आकर्षित होतील. तुम्ही मुले बाबांची आठवण करत नाही त्यामुळे कोणाला 
तीर लागत नाही. ती ताकद मिळत नाही. खरेतर तुमचे असे एकच भाषण ऐकतील तर कमाल होईल. 
शिवबाबा समजावून सांगतात भगवान तर एकच आहेत. जे दुःख-हर्ता, सुख-कर्ता आहेत, नवीन 
दुनिया स्थापन करणारे आहेत. याच भारतामध्ये स्वर्ग होता. हिरे-माणकांचे महाल होते. 
एकच राज्य होते. सर्वजण क्षीरखंड होते. जशी बाबांची महिमा अपरंपार आहे, तशीच भारताची 
महिमा देखील अपरंपार आहे. भारताची महिमा ऐकून खुश होतील. बाबा मुलांना विचारत आहेत 
- इतकी धन-दौलत कुठे गमावलीत? भक्ती मार्गामध्ये तुम्ही किती खर्च करत आला आहात. 
किती मंदिरे बनवता. बाबा म्हणतात विचार करा - तुम्ही पावन असणारे पतित कसे बनलात? 
म्हणता देखील ना - बाबा दुःखामध्ये तुमची आठवण करतो, सुखामध्ये करत नाही. परंतु 
तुम्हाला दुःखी बनवतो कोण? वारंवार बाबांचे नाव घेत रहा. तुम्ही बाबांचा संदेश देत 
आहात. बाबा म्हणतात - मी तर स्वर्ग शिवालय स्थापन केले, स्वर्गामध्ये या 
लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते ना. तुम्ही हे देखील विसरला आहात. तुम्हाला हे देखील 
ठाऊक नाही आहे की, राधा-कृष्णच स्वयंवरा नंतर लक्ष्मी-नारायण बनतात. श्रीकृष्ण जो 
विश्वाचा मालक होता, त्याला बसून कलंक लावता, मला देखील कलंक लावता. मी तुमचा सद्गती 
दाता आहे आणि तुम्ही मला कुत्र्या-मांजरामध्ये, कणा-कणामध्ये आहे असे म्हणता. बाबा 
म्हणतात - तुम्ही किती पतित बनला आहात. बाबा म्हणतात - सर्वांचा सद्गती दाता, 
पतित-पावन मी आहे. तुम्ही मग गंगेला पतित-पावनी म्हणता. माझ्याशी योग न लावल्याने 
तुम्ही अजूनच पतित बनता. माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. वारंवार 
बाबांचे नाव घेऊन समजावून सांगा तेव्हा शिवबाबा लक्षात राहील. बोला, आम्ही बाबांची 
महिमा करतो, बाबा स्वतः म्हणतात मी कसा साधारण पतित शरीरामध्ये अनेक जन्मांच्या 
अंतामध्ये येतो. यांचेच (ब्रह्मा बाबांचेच) अनेक जन्म आहेत. हे आता माझे बनले आहेत 
तर या रथाद्वारे तुम्हाला समजावून सांगतो. हे (ब्रह्मा बाबा) आपल्या जन्मांना जाणत 
नाहीत. भागीरथ हे आहेत, यांच्या वानप्रस्थ अवस्थेमध्ये मी येतो. शिवबाबा असे 
समजावून सांगतात. असे भाषण कधी कोणाचे ऐकलेले नाही. बाबांचे तर कोणी नावच घेत नाहीत. 
संपूर्ण दिवस बाबांची तर अजिबात आठवणच करत नाहीत. झरमुई-झगमुई (व्यर्थ गोष्टी) करत 
राहतात आणि लिहितात की आम्ही असे भाषण केले, आम्ही हे-हे समजावून सांगितले. बाबा 
समजतात की, अजून तर तुम्ही मुंग्या आहात, कोळी सुद्धा बनलेले नाही आहात (मुंगी एवढे 
छोटे आहात अजून कोळ्या एवढे सुद्धा मोठे झालेले नाही आहात) आणि अहंकार केवढा असतो. 
समजत नाहीत की शिवबाबा ब्रह्मा द्वारे सांगत आहेत. शिवबाबांना तुम्ही विसरून जाता. 
ब्रह्मावर लगेच रागावतात. बाबा म्हणतात - तू फक्त माझीच आठवण कर, तुझे काम माझ्याशी 
आहे. माझी आठवण करता ना. परंतु तुम्हाला देखील माहित नाही आहे की बाबा काय चीज आहेत, 
कधी येतात. गुरु लोक तुम्हाला म्हणतात की, कल्प लाखो वर्षांचे आहे आणि बाबा म्हणतात 
की कल्प आहेच ५ हजार वर्षांचे. जुनी दुनिया सो मग नवीन होईल. नवीन सो मग जुनी होते. 
आता नवी दिल्ली आहे कुठे? दिल्ली जेव्हा परिस्तान बनेल तेव्हा नवी दिल्ली म्हणणार. 
नवीन दुनियेमध्ये नवी दिल्ली होती, यमुनेच्या तीरावर. तिथे लक्ष्मी-नारायणाचे महाल 
होते. परिस्तान होते. आता तर कब्रस्तान होणार आहे, सर्व जमिनीमध्ये गाडले जाणार 
आहेत; म्हणून बाबा म्हणतात - मज सर्वोच्च पित्याची आठवण करा तर पावन बनाल. नेहमी असे 
‘बाबा-बाबा’ म्हणत समजावून सांगा. सांगताना तुम्ही ‘बाबा’ असे नाव बोलत नाही म्हणून 
तुमचे कोणी ऐकत नाही. बाबांची आठवण न राहिल्याने तुमच्यामध्ये ते जौहर (ती ताकद) 
भरत नाही. तुम्ही देह-अभिमानामध्ये येता. बंधनात असणाऱ्या ज्या मार खातात त्या 
तुमच्या पेक्षा जास्त आठवणीमध्ये राहतात, किती धावा करतात. बाबा म्हणतात - तुम्ही 
सर्व द्रौपदी आहात ना. आता तुम्हाला विवस्त्र होण्यापासून वाचवतात. काही माता देखील 
अशा असतात ज्यांना कल्पापूर्वी देखील पुतना इत्यादी नावे दिली होती. तुम्ही विसरला 
आहात.
बाबा म्हणतात - भारत 
जेव्हा शिवालय होता तेव्हा त्याला स्वर्ग म्हटले जात होते. इथे मग ज्यांच्याकडे 
बंगला, विमान इत्यादी आहे ते समजतात आम्ही तर स्वर्गामध्ये आहोत. किती मूढमती (बुद्धू) 
आहेत. प्रत्येक गोष्ट सांगत असताना बोला - बाबा म्हणतात की, हे हठयोगी तुम्हाला 
मुक्ती थोडीच देऊ शकतील. जर का सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत तर मग गुरु कशासाठी 
करता? काय तुम्हाला संन्यासी बनायचे आहे की हठयोग शिकून ब्रह्ममध्ये लीन व्हायचे आहे? 
लीन तर कोणी होऊ शकत नाही. पार्ट सर्वांना बजावायचाच आहे. सर्व ॲक्टर्स अविनाशी 
आहेत. हा अनादि अविनाशी ड्रामा आहे, मोक्ष कोणाला कसा बरे मिळू शकेल. बाबा म्हणतात 
- मी या साधूंचा देखील उद्धार करण्यासाठी येतो. मग गंगा पतित-पावनी कशी होऊ शकते. 
तुम्ही ‘पतित-पावन’ मला म्हणता ना. तुमचा माझ्याशी योग तुटल्याने हे हाल झाले आहेत. 
आता पुन्हा माझ्याशी योग लावा तर विकर्म विनाश होतील. मुक्तिधाममध्ये पवित्र आत्मे 
राहतात. आता तर सारी दुनियाच पतित आहे. पावन दुनिये विषयी तर तुम्हाला माहीतच नाही 
आहे. तुम्ही सर्व पुजारी आहात, एकही पूज्य नाही. तुम्ही बाबांचे नाव घेऊन सर्वांना 
जागृत करू शकता. बाबा जे विश्वाचा मालक बनवितात - त्यांची तुम्ही ग्लानी करत बसता. 
श्रीकृष्ण छोटा मुलगा, सर्वगुण संपन्न तो असा धंदा कसा बरे करेल. आणि श्रीकृष्ण 
सर्वांचा पिता कसा असू शकतो. ईश्वर तर एकच असतो ना. जोपर्यंत तुम्ही माझ्या श्रीमता 
नुसार चालत नाही तोपर्यंत गंज कशी उतरणार. तुम्ही सर्वांची पूजा करत राहता तर काय 
हालत झाली आहे, म्हणून पुन्हा मला यावे लागते. तुम्ही किती धर्म भ्रष्ट, कर्म 
भ्रष्ट झाला आहात. तुम्ही विचारा - हिंदू धर्म कोणी आणि कधी स्थापन केला? असे चांगले 
ललकारून (जोरदार आव्हान देऊन) भाषण करा. तुम्हाला सतत बाबांची आठवणच येत नाही. 
कधी-कधी कोणी लिहितात की माझ्यामध्ये तर जसे बाबांनी येऊन भाषण केले. बाबा खूप मदत 
करत राहतात. तुम्ही आठवणीच्या यात्रेमध्ये राहत नाही म्हणून मुंगीच्या पावलाने सेवा 
करता. बाबांचे नाव घ्याल तेव्हाच कोणाला तीर लागेल (ज्ञान काळजाला भिडेल). बाबा 
समजावून सांगतात - ‘मुलांनो तुम्हीच ऑल राऊंड ८४ चे चक्र फिरला आहात तर तुम्हालाच 
येऊन समजावून सांगावे लागेल. मी भारतातच येतो. जे पूज्य होते ते पुजारी बनतात. मी 
काही पूज्य आणि पुजारी बनत नाही.
“बाबा सांगतात, बाबा 
सांगतात”, अशी तर धुन लावली पाहिजे. तुम्ही अशा प्रकारे भाषण करा, जेव्हा असे मी 
ऐकेन तेव्हा समजेन की, तुम्ही आता मुंगी पासून कोळी बनला आहात. बाबा म्हणतात - मी 
तुम्हाला शिकवतो, तुम्ही फक्त मामेकम् (मज एकाची) आठवण करा. या रथाद्वारे तुम्हाला 
फक्त एवढेच सांगतो की, ‘माझी आठवण करा’. रथाची थोडीच आठवण करायची आहे. ‘बाबा असे 
म्हणतात’, ‘बाबा असे समजावून सांगतात’, अशा प्रकारे तुम्ही बोला मग बघा तुमचा किती 
प्रभाव दिसून येईल. बाबा म्हणतात - देहा सहित सर्व संबंधांमधून बुद्धीचा योग तोडा. 
आपला देह सुद्धा सोडला तर बाकी राहिली आत्मा. स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण 
करा. बरेचजण म्हणतात, “अहम् ब्रह्मास्मि”, आम्ही मायेचे मालक आहोत. बाबा म्हणतात - 
तुम्ही हे देखील जाणत नाही की माया कशाला म्हटले जाते आणि संपत्ती कशाला म्हटले जाते! 
तुम्ही धनाला माया म्हणता. अशा प्रकारे तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता. खूप 
चांगली-चांगली मुले मुरली सुद्धा वाचत नाहीत. बाबांची आठवण करत नाहीत त्यामुळे तीर 
लागत नाही कारण आठवणीचे बळ मिळत नाही. बळ मिळते आठवण केल्याने. ज्या योगबलाने तुम्ही 
विश्वाचे मालक बनता. मुलांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये बाबांचे नाव घेत रहा म्हणजे कधी 
कोणी काही बोलू शकणार नाही. सर्वांचे ईश्वर पिता तर एकच आहेत की सर्वच भगवान आहेत. 
म्हणतात - आम्ही अमक्या संन्याशाचे फॉलोअर्स आहोत. आता ते संन्यासी आणि तुम्ही 
गृहस्थी तर मग तुम्ही फॉलोअर्स कसे झालात? गातात देखील - ‘झूठी माया, झूठी काया, 
झूठा सब संसार’. सत्य तर एक बाबाच आहेत. ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आपण सच्चे 
बनू शकत नाही. मुक्ती-जीवनमुक्ती दाता एकच आहेत. बाकी कोणीही थोडीच मुक्ती देतात 
ज्यासाठी आपण त्यांचे बनावे. बाबा म्हणतात हे देखील ड्रामामध्ये होते. आता सावध व्हा, 
डोळे उघडा. ‘बाबा असे सांगतात’, असे म्हटल्याने तुम्ही सुटाल. तुमच्या पुढे कोणी 
बकवास करणार नाही. ‘त्रिमूर्ती शिवबाबा’ म्हणायचे आहे, नुसते ‘शिव’ नाही. 
त्रिमूर्तीला कोणी रचले? ब्रह्माद्वारे स्थापना कोण करतात? काय ब्रह्मा क्रिएटर 
आहेत? अशा पद्धतीने अभिमानाने बोला तेव्हाच काम करू शकाल. नाहीतर देह-अभिमानामध्ये 
बसून भाषण करता.
बाबा समजावून सांगतात 
हा अनेक धर्मांचा कल्पवृक्ष आहे. सर्वप्रथम आहे देवी-देवता धर्म. आता तो देवता धर्म 
कुठे गेला? लाखो वर्षे म्हणतात, ही तर ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. तुम्ही त्यांची 
मंदिरे देखील बनवत राहता. दाखवतात पांडव आणि कौरवांचे युद्ध लागले. पांडव डोंगरावर 
वितळून मेले, मग पुढे काय झाले? मी कशी हिंसा करेन. मी तर तुम्हाला अहिंसक वैष्णव 
बनवतो. काम कटारी न चालवणे, त्यालाच वैष्णव म्हणतात. ती आहे विष्णूची वंशावळी. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप 
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. 
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य 
सारांश:-
१) सेवेमध्ये 
सफलता प्राप्त करण्यासाठी अहंकाराला सोडून प्रत्येक गोष्टीमध्ये बाबांचे नाव घ्यायचे 
आहे. आठवणीमध्ये राहून सेवा करायची आहे. झरमुई-झगमुई मध्ये (व्यर्थ गोष्टींमध्ये) 
आपला वेळ वाया घालवायचा नाही.
२) खराखुरा वैष्णव 
बनायचे आहे. कोणतीही हिंसा करायची नाही. देहा सहित सर्व संबंधांमधून बुद्धियोग 
तोडायचा आहे.
वरदान:-
‘हां जी’ च्या 
पाठाद्वारे सेवेमध्ये महान बनणारे सर्वांच्या आशीर्वादांचे पात्र भव
कोणतीही सेवा आनंदाने 
आणि उत्साहाने करत असताना नेहमी लक्षात रहावे की, जी सेवा असेल त्यामध्ये सर्वांचे 
आशीर्वाद मिळावेत, कारण जिथे आशीर्वाद असतील तिथे मेहनत नसेल. आता हेच लक्ष्य असावे 
की ज्याच्या पण संपर्कामध्ये याल त्याचे आशीर्वाद घेत राहणे. ‘हां जी’ चा पाठच 
आशीर्वाद घेण्याचे साधन आहे. भले कोणी चुकीचा देखील असेल तरीही त्याला चुकीचा 
म्हणून धक्का देण्या ऐवजी आधार देऊन उभे करा. सहयोगी बना. तर त्याद्वारे सुद्धा 
संतुष्टतेचे आशीर्वाद मिळतील. जे आशीर्वाद घेण्यामध्ये महान बनतात ते स्वतः महान 
बनतात.
बोधवाक्य:-
हार्ड-वर्कर 
असण्यासोबतच आपली स्थिती देखील हार्ड (मजबूत) बनविण्याचे लक्ष्य ठेवा.
अव्यक्त इशारे:- स्वयं 
प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
योगाचा प्रयोग अर्थात 
आपल्या शुद्ध संकल्पाचा प्रयोग शरीरावर, मनावर, संस्कारांवर अनुभव करत पुढे जात रहा, 
यामध्ये इतरांना पाहू नका. हे काय करतात, हे करत नाहीत, जुने करतात की नाही करत, हे 
पाहू नका. ‘पहिला मी’ या अनुभवामध्ये पुढे यावे कारण ही आपल्या आंतरिक पुरुषार्थाची 
गोष्ट आहे. जेव्हा अशा व्यक्तिगत रूपामध्ये याच प्रयोगामध्ये व्यस्त व्हाल, वृद्धीला 
प्राप्त करत रहाल तेव्हा प्रत्येकाच्या शांतीच्या शक्तीचा संघटित रूपामध्ये विश्वा 
समोर प्रभाव पडेल.