22-12-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - बाबा जे आहेत, जसे आहेत, त्यांना यथार्थ रित्या जाणून आठवण करा, यासाठी
आपल्या बुद्धीला विशाल बनवा”
प्रश्न:-
बाबांना
गरीब-निवाज का म्हटले गेले आहे?
उत्तर:-
कारण यावेळी जेव्हा सारी दुनिया गरीब अर्थात दुःखी बनली आहे तेव्हाच सर्वांना
दुःखातून सोडविण्याकरिता बाबा आलेले आहेत. बाकी कोणावर दया येऊन कपडे देणे, पैसे
देणे ही काही नवलाची गोष्ट नाहीये. याने काही ते श्रीमंत बनत नाहीत. मी या भिल्लांना
पैसे देऊन स्वतःला गरीब-निवाज म्हणवून घेणार, असे काही नाही आहे. मी तर गरीब अर्थात
पतितांना, ज्यांना ज्ञान नाहीये, त्यांना ज्ञान देऊन पावन बनवतो.
गीत:-
यही बहार है
दुनिया को भूल जाने की…
ओम शांती।
गोड-गोड मुलांनी गाणे ऐकले. मुले जाणतात गाणे तर दुनियावी मनुष्यांनी गायले आहे.
शब्द खूप सुंदर आहेत, या जुन्या दुनियेला विसरायचे आहे. यापूर्वी असे समजत नव्हतो.
कलियुगी लोकांच्याही लक्षात येत नाही की, नवीन दुनियेमध्ये जायचे असेल तर जुन्या
दुनियेला विसरावे लागेल. एवढे जरूर समजतात की जुन्या दुनियेला सोडायचे आहे, परंतु
ते समजतात अजून खूप वेळ बाकी आहे. नवीन सो जुनी होईल, हे तर समजतात परंतु इतका
प्रदीर्घ काळ सांगितल्याने विसरले आहेत. तुम्हाला आता स्मृती दिली जाते, आता नवी
दुनिया स्थापन होत आहे त्यामुळे जुन्या दुनियेला विसरायचे आहे. विसरल्याने काय होईल?
आपण हे शरीर सोडून नवीन दुनियेमध्ये जाऊ. परंतु अज्ञान काळामध्ये अशा गोष्टींच्या
अर्थावर कोणाचे लक्ष जात नाही. ज्या प्रकारे बाबा समजावून सांगतात, असे कोणीही
समजावून सांगणारा नाहीये. तुम्ही याच्या अर्थाला समजू शकता. हे देखील मुले जाणतात -
बाबा आहेत खूप साधारण. अनन्य, चांगली-चांगली मुले सुद्धा पूर्णपणे समजू शकत नाहीत.
विसरून जातात की, यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) शिवबाबा येतात. कोणतेही
डायरेक्शन देतात तर समजत नाहीत की हे शिवबाबांनी दिलेले डायरेक्शन आहे. शिवबाबांना
संपूर्ण दिवस जसे काही विसरूनच गेले आहेत. पूर्णपणे न समजल्या कारणाने ते काम करत
नाहीत. माया आठवण करू देत नाही. ती आठवण स्थायी राहत नाही. मेहनत करता-करता अखेरीला
ती अवस्था शेवटी जरूर होणार आहे. असा कोणीही नाही जो यावेळी कर्मातीत अवस्थेला
प्राप्त करेल. बाबा जे आहेत, जसे आहेत त्यांना जाणण्यासाठी बुद्धीमत्ता पाहिजे.
तुम्हाला विचारतील
बापदादा गरम कपडे घालतात का? म्हणतील - दोघांनीही घातले आहेत. शिवबाबा म्हणतील मी
थोडेच गरम कपडे घालेन. मला थंडी वाजत नाही. हो, ज्यांच्यामध्ये प्रवेश केला आहे
त्यांना थंडी वाजेल. मला तर ना भूक, ना तहान काहीच लागत नाही. मी तर निर्लेप आहे.
सेवा करत असताना देखील या सर्व गोष्टींपासून न्यारा आहे. मी खात-पित नाही. जसे एक
साधू सुद्धा म्हणत होता ना, मी ना खातो, ना पितो… त्यांनी मग आर्टिफिशिअल वेष धारण
केला आहे. देवतांची देखील नावे अनेकांनी स्वतःला ठेवली आहेत. इतर कोणत्या धर्मामध्ये
देवी-देवता बनत नाहीत. इथे कितीतरी मंदिरे आहेत. बाहेर (परदेशात) तर एका
शिवबाबांनाच मानतात. बुद्धी देखील म्हणते फादर तर एक असतो. फादरकडूनच वारसा मिळतो.
तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे - कल्पाच्या या पुरुषोत्तम संगमयुगावरच बाबांकडून
वारसा मिळतो. जेव्हा आपण सुखधाममध्ये जातो तेव्हा बाकी सर्व शांतीधाममध्ये राहतात.
तुमच्यातही ही जाणीव नंबरवार आहे. जर ज्ञानाच्या विचारांमध्ये राहिले तर त्यांचे
शब्दच तसे निघतील. तुम्ही रूप बसंत बनत आहात - बाबांद्वारे. तुम्ही रूप देखील आहात
आणि बसंत सुद्धा आहात. दुनियेमध्ये इतर कोणीही म्हणू शकणार नाही की आम्ही रूप-बसंत
आहोत. तुम्ही आता शिकत आहात, शेवटपर्यंत नंबरवार पुरुषार्थानुसार शिकाल. शिवबाबा
आम्हा आत्म्यांचे पिता आहेत ना. हे देखील मनाला भावते तर खरे ना. भक्तिमार्गामध्ये
थोडेच मनाला भावते. इथे तुम्ही सन्मुख बसले आहात. तुम्ही समजता बाबा पुन्हा यावेळीच
येतील, त्यानंतर इतर कोणत्याही वेळी बाबांना येण्याची गरजच नाही. सतयुगापासून
त्रेतापर्यंत यायचे नाहीये. द्वापारपासून कलियुगा पर्यंत सुद्धा यायचे नाहीये. ते
येतातच कल्पाच्या संगमयुगावर. बाबा आहेतच गरीब-निवाज अर्थात सर्व दुनिया जी दुःखी
गरीब होते त्यांचे पिता आहेत. यांच्या मनात काय असेल? मी गरीब-निवाज आहे. सर्वांचे
दुःख अथवा गरिबी नाहीशी व्हावी. ती तर ज्ञानाशिवाय कमी होऊ शकणार नाही. बाकी कपडे
इत्यादी दिल्याने काही कोणी श्रीमंत तर बनणार नाहीत ना. फारफार तर गरिबाला पाहून
वाटेल की याला कपडे द्यावे, कारण आठवते ना - मी गरीब-निवाज आहे. त्याच सोबत हे
देखील समजावून सांगतो - मी गरीब-निवाज काही या भिल्लांसाठीच नाहीये. मी गरीब-निवाज
आहे जे अगदीच पतित आहेत त्यांना पावन बनवतो. मी आहेच पतित-पावन. तर विचार चालतो, मी
गरीब-निवाज आहे परंतु पैसे इत्यादी कसे देऊ. पैसे इत्यादी देणारे तर दुनियेमध्ये
पुष्कळ आहेत. अनेक फंड्स काढतात, जे मग अनाथाश्रमामध्ये पाठवतात. जाणतात अनाथ असतात
अर्थात ज्यांना नाथ नाही. अनाथ अर्थात गरीब. तुमचा देखील नाथ नव्हता अर्थात पिता
नव्हता. तुम्ही गरीब होता, ज्ञान नव्हते. जे रूप-बसंत नाहीत, ते गरीब अनाथ आहेत. जे
रूप-बसंत आहेत त्यांना सनाथ म्हटले जाते. सनाथ श्रीमंताला आणि अनाथ गरिबाला म्हटले
जाते. तुमच्या बुद्धीमध्ये आहे आता सर्व गरीब आहेत, काहीतरी त्यांना द्यावे. बाबा
गरीब-निवाज आहेत तर म्हणतील - यांना अशा गोष्टी द्याव्या ज्यामुळे कायमसाठी श्रीमंत
बनतील. बाकी हे कपडे इत्यादी देणे तर कॉमन गोष्ट आहे. त्यामध्ये आपण का पडावे. आपण
तर त्यांना अनाथाचे सनाथ बनवावे. भले कितीही कोणी पद्मपती आहे, परंतु तो देखील सर्व
अल्पकाळासाठी आहे. ही आहेच अनाथांची दुनिया. जरी पैसेवाले आहेत, ते सुद्धा
अल्पकाळासाठी. तिथे आहेत सदैव सनाथ. तिथे अशी कर्म कुटत नाहीत (केलेल्या कर्माचा
पश्चाताप करत नाहीत). इथे किती गरीब आहेत. ज्यांच्याकडे धन आहे, त्यांना तर आपला
स्वतःचा नशा चढलेला असतो की, आम्ही स्वर्गामध्ये आहोत. परंतु खरे तर नाही आहेत, हे
तुम्हीच जाणता. यावेळी कोणीही मनुष्य सनाथ नाही आहे, सर्वजण अनाथ आहेत. हे पैसे
इत्यादी तर सर्व मातीमोल होणार आहे. मनुष्य समजतात आमच्याकडे इतके धन आहे जे
मुले-नातवंडे खात राहतील. परंपरा चालत राहील. परंतु असे चालणार नाहीये. हे तर सर्व
विनाश होईल म्हणून तुम्हाला या सर्व जुन्या दुनियेपासून वैराग्य आहे.
तुम्ही जाणता नवीन
दुनियेला स्वर्ग, जुन्या दुनियेला नरक म्हटले जाते. आम्हाला बाबा नवीन दुनियेसाठी
श्रीमंत बनवत आहेत. ही जुनी दुनिया तर नष्ट होणार आहे. बाबा किती श्रीमंत बनवतात.
हे लक्ष्मी-नारायण इतके श्रीमंत कसे बनले? काय कोणत्या सावकाराकडून वारसा मिळाला का
युद्ध केले? जसे बाकीचे राजसिंहासन मिळवतात, तर असे राजसिंहासन मिळवले काय? की
कर्मानुसार हे धन मिळाले? बाबांची कर्म शिकविण्याची पद्धत तर अगदीच न्यारी आहे.
कर्म-अकर्म-विकर्म शब्द देखील क्लियर आहेत ना. शास्त्रांमध्ये काही शब्द आहेत,
पिठामध्ये मिठा इतके उरतात. कुठे इतके करोडो मनुष्य, बाकी नऊ लाख उरतात. एक
चतुर्थांश सुद्धा नाही. म्हणून याला म्हटले जाते - पिठात मीठ. सारी दुनिया नष्ट होते.
फार थोडे संगमयुगामध्ये राहतात. कोणी अगोदरच शरीर सोडून जातात. ते मग रिसिव्ह करतील.
जसे एक मुलगी फार छोटी होती, चांगली होती तर जन्म खूप चांगल्या घरामध्ये घेतला असेल.
नंबरवार सुखामध्येच जन्म घेतात. तेच तर सुख बघणार आहेत, थोडेसे दुःख सुद्धा बघायचे
आहे. कर्मातीत अवस्था तर कोणाची झालेली नाहीये. मोठ्या सुखवस्तू घरामध्ये जाऊन जन्म
घेतील. असे समजू नका इथे काही सुखवस्तू घर नाहीये. अनेक परिवार इतके चांगले असतात,
काही विचारू नका. बाबांनी पाहिलेले आहे. सुना एकाच घरामध्ये अशा शांत मिळून-मिसळून
राहतात की बस्स, सगळ्याजणी एकत्र भक्ती करतात, गीता वाचतात… बाबांनी विचारले -
इतक्या सर्व जणी एकत्र राहतात, भांडणे होत नाहीत! म्हणतात - आमच्याकडे तर स्वर्ग आहे,
आम्ही सगळे एकत्र राहतो. कधी भांडण-तंटा करत नाही, शांतीने राहतो. म्हणतात - इथे तर
जसा स्वर्ग आहे तर जरूर स्वर्ग भूतकाळात होऊन गेला आहे तेव्हाच तर बोलण्यात येते ना
की, इथे तर जसा स्वर्ग अवतरित झाला आहे. परंतु इथे तर अनेकांचा स्वभाव स्वर्गवासी
होण्याचा दिसून येत नाही. दास-दासी सुद्धा तर बनणार आहेत ना. ही राजधानी स्थापन होत
आहे. बाकी जे ब्राह्मण बनतात ते दैवी घराण्यामध्ये येणार आहेत. परंतु नंबरवार आहेत.
कोणी तर खूप गोड असतात, सर्वांवर प्रेम करत राहतील. कधी कोणावर रागावणार नाहीत.
रागावल्याने दुःख होते. जे मनसा-वाचा-कर्मणा कोणालाही दुःखच देत राहतात - त्यांना
म्हटले जाते दुःखी-आत्मा. जसे पुण्य-आत्मा, पाप-आत्मा म्हणतात ना. शरीराचे नाव
घेतात का? वास्तविक आत्माच बनते, सगळेच पाप-आत्मे काही एकसारखे असत नाहीत.
पुण्य-आत्मा देखील सगळे एकसारखे असत नाहीत. नंबरवार पुरुषार्थानुसार असतात. स्टुडंट
स्वतः समजत असतील ना की आपले चारित्र्य, आपली अवस्था कशी आहे? आपण कसे चालतो?
सर्वांशी गोड बोलतो का? कोणी काही म्हटले तर आपण उलट-सुलट उत्तर तर देत नाही ना?
बाबांना कितीतरी मुले म्हणतात - ‘मुलांवर राग येतो’. बाबा म्हणतात - शक्य तितके
प्रेमाने वागा. निर्मोही देखील बनायला हवे.
हे तर तुम्ही मुले
समजता - आम्हाला असे लक्ष्मी-नारायण बनायचे आहे. एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे. किती
उच्च एम ऑब्जेक्ट आहे. शिकवणारे देखील हाईएस्ट (सर्वोच्च) आहेत ना. श्रीकृष्णाची
महिमा किती गातात - सर्व गुण संपन्न, १६ कला संपूर्ण… आता तुम्ही मुले जाणता, आम्ही
तसे बनत आहोत. तुम्ही इथे आलाच आहात हे बनण्यासाठी. तुमची ही खरी सत्यनारायणाची कथा
आहेच मुळी नरापासून नारायण बनण्याची. अमरकथा आहे अमरपुरीला जाण्याची. कोणी संन्यासी
इत्यादी या गोष्टींना जाणत नाहीत. कोणत्याही मनुष्यमात्राला ज्ञानाचा सागर किंवा
पतित-पावन म्हणणार नाही. जेव्हा की सारी सृष्टीच पतित आहे तर आपण पतित-पावन कोणाला
म्हणावे? इथे कोणीही पुण्य-आत्मा असू शकत नाही. बाबा समजावून सांगतात - ही दुनिया
पतित आहे. श्रीकृष्ण आहे अव्वल नंबर. त्यांना देखील भगवान म्हणू शकत नाही. जन्म-मरण
रहित एकच निराकार बाबा आहेत. गायले जाते शिव परमात्माए नमः, ब्रह्मा-विष्णू-शंकराला
देवता म्हणून मग शिवाला परमात्मा म्हणतात. तर शिव सर्वात उच्च झाले ना. ते आहेत
सर्वांचे पिता. वारसा देखील बाबांकडून मिळणार आहे, सर्वव्यापी म्हटल्याने वारसा
मिळत नाही. बाबा स्वर्गाची स्थापना करणारे आहेत तर जरूर स्वर्गाचाच वारसा देतील. हे
लक्ष्मी-नारायण आहेत नंबरवन. शिक्षणाद्वारे हे पद प्राप्त केले. भारताचा प्राचीन
योग का नाही प्रसिद्ध होणार ज्याने मनुष्य विश्वाचा मालक बनतात; त्याला म्हणतात सहज
योग, सहज ज्ञान. आहे देखील खूप सोपा, एकाच जन्मातील पुरुषार्थाने केवढी प्राप्ती
होते. भक्तिमार्गामध्ये तर जन्मोजन्मी खस्ता खात आले, मिळत तर काहीच नाही. हे तर
एकाच जन्मामध्ये मिळते म्हणून ‘सहज’ म्हटले जाते. सेकंदामध्ये जीवनमुक्ती म्हटले
जाते. आजकाल तर बघा कसले-कसले शोध लावत राहतात. विज्ञान देखील एक आश्चर्य आहे.
सायलेन्सचे आश्चर्य देखील बघा कसे आहे? ते सर्व (विज्ञानाचे शोध) सगळे दिसून येतात.
इथे असे काहीच नाहीये. तुम्ही शांतीमध्ये बसला आहात, नोकरी इत्यादी सुद्धा करता,
‘हथ कार डे…’ आणि आत्म्याचे मन प्रियकराकडे, आशिक-माशुक सुद्धा गायले गेले आहेत ना.
ते एकमेकांच्या चेहऱ्यावर आशिक होतात, विकाराची गोष्ट नसते. कुठेही बसले तरी आठवण
येईल. जेवत असतील, बस्स, समोर त्यालाच बघत राहतील. शेवटी तुमची ही अवस्था होईल.
बस्स, बाबांचीच आठवण करत राहणार. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) रूप-बसंत
बनून मुखावाटे सदैव सुखदायी बोल बोलायचे आहेत, दुःखदायी बनायचे नाही. ज्ञानाच्या
विचारांमध्ये रहायचे आहे, मुखावाटे ज्ञान-रत्नच काढायची आहेत.
२) निर्मोही बनायचे
आहे, प्रत्येकाशी प्रेमाने वागायचे आहे, रागवायचे नाही. अनाथाला सनाथ बनविण्याची
सेवा करायची आहे.
वरदान:-
आपल्या फरिश्ता
रूपाद्वारे गती-सद्गतीचा प्रसाद वाटणारे मास्टर गती-सद्गती दाता भव
वर्तमान समय
विश्वातील अनेक आत्मे परिस्थिती वश ओरडत आहेत, कोणी महागाईमुळे, कोणी भुकेमुळे, कोणी
शारीरिक व्याधीमुळे, कोणी मनाच्या अशांतीमुळे… सर्वांची नजर ‘टॉवर ऑफ पीस’च्या
दिशेने जात आहे. सर्वजण बघत आहेत हाहाकारा नंतर जय-जयकार केव्हा होईल. तर आता आपल्या
साकारी फरिश्ता रूपाद्वारे विश्वाचे दुःख दूर करा, मास्टर गती-सद्गती दाता बनून
भक्तांना गती आणि सद्गतीचा प्रसाद वाटा.
बोधवाक्य:-
मनाला इतके
शक्तिशाली बनवा जेणेकरून कोणतीही परिस्थिती मनाला अशांतीमध्ये आणू शकणार नाही.
अव्यक्त इशारे:- आता
संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. आता सेवेच्या कर्माच्या सुद्धा बंधनामध्ये
येऊ नका. आमचे स्थान, आमची सेवा, आमचे विद्यार्थी, आमचे सहयोगी आत्मे, हे देखील
सेवेच्या कर्माचे बंधन आहे, या कर्म बंधनापासून कर्मातीत. तर कर्मातीत बनायचे आहे
आणि “हे तेच आहेत, हेच सर्व काही आहेत”, ही जाणीव करून देऊन आत्म्यांना निर्धारित
ठिकाणाच्या जवळ आणायचे आहे.