23-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - भोलेनाथ मोस्ट बिलवेड बाबा तुमच्या सन्मुख बसले आहेत, तुम्ही प्रेमाने आठवण करा तर प्रेम वाढत जाईल, विघ्न नष्ट होतील”

प्रश्न:-
ब्राह्मण मुलांच्या कोणती एक गोष्ट नेहमी लक्षात राहील तर कधीही विकर्म होणार नाहीत?

उत्तर:-
जी कर्म मी करेन, मला पाहून इतरही करतील - हे लक्षात राहील तर विकर्म होणार नाहीत. जर कोणी लपून देखील पाप कर्म करतात तर धर्मराजापासून लपू शकत नाही, लगेचच त्याची सजा मिळेल. पुढे चालून आणखीन मार्शल लॉ (लष्करी कायदा) लागू होईल. इंद्रप्रस्थ सभेमध्ये कोणीही पतित लपून बसू शकत नाही.

गीत:-
भोलेनाथ से निराला…

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुले जाणतात की आता रुहानी बाबा आपल्याला सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवत आहेत. त्यांचे नावच आहे भोलेनाथ. पिता खूप भोळे असतात, कितीही त्रास सहन करून देखील मुलांना शिकवतात, सांभाळतात. मग मुले जेव्हा मोठी होतात तर सर्व काही त्यांना देऊन स्वतः वानप्रस्थ अवस्था स्वीकारतात. समजतात की मी आपले कर्तव्य पूर्ण केले, आता मुले बघतील. तर पिता भोळेच झाले ना. हे देखील बाबा आता तुम्हाला समजावून सांगत आहेत कारण स्वतः भोलानाथ आहेत. तर हदच्या पित्यासाठी देखील सांगतात की ते किती भोळे आहेत. ते झाले हदचे भोळे. हे मग आहेत बेहदचे भोलेनाथ पिता. परमधामहून येतात, जुनी दुनिया, जुन्या शरीरामध्ये, म्हणून मनुष्य समजतात की जुन्या पतित शरीरामध्ये कसे काय येतील. न समजल्या कारणाने पावन शरीरअसणाऱ्या श्रीकृष्णाचे नाव लिहिले आहे. हीच गीता, वेद-शास्त्र इत्यादी तरीही पुन्हा बनतील. पहा, शिवबाबा किती भोळे आहेत. येतात, तरीही भासना असे देतात - जसे की बाबा इथेच बसले आहेत. हे साकार बाबा (ब्रह्मा बाबा) देखील भोळे आहेत ना. कोणता फेटा नाही, कसलाच टिळा इत्यादी नाही. उलट साधारण बाबा तर बाबाच आहेत. मुले जाणतात - इतके सारे नॉलेज शिवबाबाच देतात, इतर कोणाची ताकद नाही जे हे ज्ञान देऊ शकतील. दिवसें-दिवस मुलांचे प्रेम वाढत जाते. जितकी बाबांची आठवण कराल तितके प्रेम वाढेल. बिलवेड मोस्ट (अतिप्रिय) बाबा आहेत ना. ना केवळ आताच परंतु भक्तीमार्गामध्ये देखील तुम्ही बिलवेड मोस्ट समजत होता. म्हणत होता - ‘बाबा, तुम्ही जेव्हा याल ना तेव्हा आम्ही इतर सर्वांवरील प्रेम सोडून एका बाबांवर प्रेम करु. तुम्ही आता जाणता देखील, परंतु माया इतके प्रेम करू देत नाही. मायेला असे वाटत नाही की यांनी मला सोडून शिवबाबांची आठवण करावी. तिला वाटते की देह-अभिमानी बनून माझ्यावर प्रेम करावे. हेच मायेला हवे असते त्यामुळे किती विघ्न टाकते. तुम्हाला विघ्नांना पार करायचे आहे. मुलांनी काहीतरी मेहनत करायला हवी ना. पुरुषार्थानेच तुम्ही तुमचे प्रारब्ध प्राप्त करता. मुले जाणतात, उच्च पद प्राप्त करण्यासाठी किती पुरुषार्थ करायचा आहे. एक तर विकारांचे दान द्यायचे आहे, दुसरे बाबांकडून जे अविनाशी ज्ञान रत्नांचे धन मिळते, त्याचे दान करायचे आहे. ज्या अविनाशी धना द्वारेच तुम्ही इतके श्रीमंत बनता. नॉलेज आहे सोर्स ऑफ इन्कम. ती आहे शास्त्रांची फिलॉसॉफी (शास्त्रांचे तत्वज्ञान), हे आहे स्पिरिच्युअल नॉलेज (अध्यात्मिक ज्ञान). शास्त्र इत्यादी पठण करून देखील खूप कमाई करतात. एका पेटीमध्ये ग्रंथ इत्यादी ठेवले, थोडे काहीतरी ऐकवले, बस्स कमाई होईल. ते काही यथार्थ ज्ञान नाही आहे. यथार्थ ज्ञान तर एक बाबाच देतात. जोपर्यंत कोणाला हे रूहानी नॉलेज प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या शास्त्रांचे तत्त्वज्ञानच बुद्धीमध्ये असते. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी (ज्ञान) ऐकत नाहीत. तुम्ही फार थोडे आहात. हे तर १०० टक्के निश्चित आहे की हे रूहानी नॉलेज मुलांनी रुहानी बाबांकडून घेतले आहे. नॉलेज सोर्स ऑफ इन्कम आहे. खूप धन मिळते. योगाद्वारे सोर्स ऑफ हेल्थ अर्थात निरोगी काया मिळते. ज्ञाना द्वारे वेल्थ (संपत्ती). हे आहेत दोन मुख्य सब्जेक्ट. मग कोणी चांगल्या रीतीने धारण करतात, कोणी कमी धारण करतात. तर वेल्थ देखील कमी नंबरवार मिळते. सजा इत्यादी खाऊन पद मिळवतात. पूर्ण रीतीने आठवण करत नाहीत तर विकर्म विनाश होत नाहीत. मग सजा खावी लागेल. पद देखील भ्रष्ट होते. जसे स्कूलमध्ये होते. हे आहे बेहदचे नॉलेज. याद्वारे बेडा पार होतो. त्या नॉलेजमध्ये बॅरिस्टरी, डॉक्टरी, इंजिनिअरिंग इत्यादी शिकावे लागते. हे तर एकच शिक्षण आहे. योग आणि ज्ञानाद्वारे एव्हर हेल्दी, वेल्दी बनतात. प्रिन्स बनतात. तिथे स्वर्गामध्ये कोणी बॅरिस्टर, जज इत्यादी नसतात. तिथे धर्मराजाची देखील गरज राहत नाही. ना गर्भ-जेलची सजा, ना धर्मराज पुरीची सजा मिळते. गर्भ-महालामध्ये खूप सुखात असतात. इथे तर गर्भ-जेलमध्ये सजा खावी लागते. या सर्व गोष्टींना तुम्ही मुलेच आता समजत आहात. बाकी धर्म शास्त्रांमध्ये, संस्कृतमध्ये श्लोक इत्यादी मनुष्यांनीच बनवली आहेत. विचारतात सतयुगामध्ये भाषा कोणती असेल? बाबा समजावून सांगतात की, जी देवतांची भाषा असेल, तीच चालेल. तिथे जी भाषा असेल ती कुठेच असू शकत नाही. असे होऊ शकत नाही की तिथे संस्कृत भाषा असावी. देवता आणि पतित मनुष्यांची भाषा एक असू शकत नाही. तिथली जी भाषा असेल तीच चालेल. हे विचारण्याची गरज नाही. पहिले बाबांकडून वारसा तर घ्या. जे कल्पापूर्वी झाले असेल तेच होईल. पहिले वारसा घ्या, दुसरे कोणतीही गोष्ट विचारूच नका. ठीक आहे, ८४ जन्म नसतील, ८० नाहीतर ८२ असतील, या गोष्टींना तुम्ही सोडून द्या. बाबा म्हणतात, अल्फची (बाबांची) आठवण करा. स्वर्गाची बादशाही मिळते खरी ना. अनेकदा तुम्ही स्वर्गाची बादशाही घेतली आहे. चढावावरून नंतर उतरायचे देखील आहे. आता तुम्ही मास्टर ज्ञान सागर, मास्टर सुखाचा सागर बनता. तुम्ही पुरुषार्थी आहात. बाबा तर कम्प्लीट आहेत. बाबांमध्ये जे नॉलेज आहे ते मुलांमध्ये आहे. परंतु तुम्हाला सागर म्हणता येणार नाही. सागर तर एक असतो फक्त नावे अनेक ठेवली आहेत. बाकी तुम्ही आहात ज्ञान सागरातून निघालेल्या नद्या. तुम्ही आहात मानसरोवर, नद्या. नद्यांची नावे देखील आहेत. ब्रह्मपुत्रा खूप मोठी नदी आहे. कलकत्त्यामध्ये नदी आणि सागराचा संगम आहे. त्याचे नाव देखील आहे, डायमंड हार्बर. तुम्ही ब्रह्मामुखवंशावली हिऱ्या समान बनता. खूप मोठी जत्रा भरते. बाबा या ब्रह्मातनामध्ये येऊन मुलांना भेटतात. या सर्व गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. तरीही बाबा म्हणतात - मनमनाभव. बाबांची आठवण करत रहा. ते मोस्ट बिलवेड, सर्व नात्यांची सैक्रीन आहेत. ते(या दुनियेतील) सर्व नातेवाईक आहेत विकारी. त्यांच्याकडून दुःखच मिळते. बाबा तुम्हाला त्या सर्वांचा मोबदला देतात. सर्व नात्यांचे प्रेम देतात, किती सुख देतात. इतर कोणीही इतके सुख देऊ शकत नाही. आणि जरी कोणी दिले तरी ते अल्प काळासाठी. ज्याला संन्याशी कागविष्ठा समान सुख म्हणतात. दुःखधाममध्ये तर जरूर दुःखच असेल. तुम्ही मुले जाणता आपण हा पार्ट अनेकदा बजावलेला आहे. परंतु आपण उच्च पद कसे मिळवावे, याची चिंता लागून राहिली पाहिजे. खूप पुरुषार्थ करायचा आहे की कुठे आपण नापास होऊ नये. चांगल्या नंबरने पास व्हाल तर उच्च पद प्राप्त कराल आणि त्यांना आनंद देखील होईल. सगळेच एक सारखे असू शकत नाहीत, जितका योग असेल. खूप गोपिका आहेत ज्या कधी भेटलेल्या देखील नाहीत. बाबांना भेटण्यासाठी तळमळत असतात. साधू-संन्याशांना भेटण्यासाठी तळमळण्याचा प्रश्न येत नाही. इथे तर शिवबाबांना भेटण्यासाठी येतात. वंडरफुल गोष्ट आहे ना. घरी बसून आठवण करतात, शिवबाबा आम्ही तुमची मुले आहोत. आत्म्याला स्मृती येते. तुम्ही मुले जाणता - आपण शिवबाबांकडून कल्प-कल्प वारसा घेतो. तेच बाबा, आता पुन्हा कल्पानंतर आलेले आहेत. तर त्यांना पाहिल्या शिवाय राहू शकत नाहीत. आत्मा जाणते बाबा आलेले आहेत. शिव जयंती देखील साजरी करतात, परंतु काहीच जाणत नाहीत. शिवबाबा येऊन शिकवतात, हे काहीच जाणत नाहीत. फक्त नावापुरते शिवजयंती साजरी करतात, सुट्टी सुद्धा देत नाहीत. ज्यांनी वारसा दिला, त्यांचे अजिबात महत्त्व नाहीये. आणि ज्याला वारसा दिला (ज्या श्रीकृष्णाला वारसा दिला) त्याचे नाव प्रसिद्ध केले आहे. येऊन खास भारताला हेवन बनवला आहे. बाकी सर्वांना मुक्ती देतात. मुक्ती हवीशी देखील सर्वांनाच वाटते. तुम्ही जाणता मुक्ती नंतर जीवनमुक्ती मिळेल. बाबा येऊन मायेच्या बंधनातून मुक्त करतात. बाबांना म्हटले जाते सर्वांचा सद्गती दाता. जीवनमुक्ती तर सर्वांना मिळते, नंबरवार पुरुषार्था नुसार. बाबा म्हणतात, ही आहे पतित दुनिया दुःखधाम. सतयुगामध्ये तुम्हाला किती सुख मिळते. त्याला म्हटले जाते बहिश्त. अल्लाहा ने बहिश्त कशासाठी रचला? केवळ मुसलमानांसाठीच रचला काय? आपल्या-आपल्या भाषेमध्ये कोणी स्वर्ग म्हणतात, कोणी बहिश्त म्हणतात. तुम्ही जाणता हेवनमध्ये फक्त भारतच होता. या सर्व गोष्टी तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये नंबरवार पुरुषार्थानुसार बसल्या आहेत. एक मुसलमान देखील म्हणत असे - मी अल्लाहच्या गार्डनमध्ये गेलो होतो. हे सर्व साक्षात्कार होतात. ड्रामामध्ये पहिल्यापासूनच नोंदलेले आहे. ड्रामामध्ये जे घडते, सेकंद पास झाला, म्हणाल कल्पापूर्वी देखील असेच झाले होते. उद्या काय होणार आहे, हे माहीत नाहीये. ड्रामावर निश्चय पाहिजे, ज्यामुळे कोणतीही चिंता राहणार नाही. आपल्याला तर बाबांनी आदेश दिला आहे - मामेकम् (मज एकाची) आठवण करा आणि आपल्या वारशाची आठवण करा. मरायचे तर सर्वांनाच आहे. कोणीही एकमेकांसाठी रडू देखील शकणार नाही. मृत्यू आला आणि गेला, रडण्यासाठी वेळच राहणार नाही. आवाजच निघणार नाही. आजकाल तर मनुष्य अग्नी संस्कारा नंतर रक्षा सुद्धा घेऊन किती परिक्रमा करतात. भावना बसलेली आहे. सर्व वेस्ट ऑफ टाईम… यामध्ये ठेवलेच काय आहे. माती, मातीमध्ये मिसळून जाईल. याने भारत पवित्र बनेल काय? पतित दुनियेमध्ये जे काही काम करतात, पतितच करतील. दान-पुण्य इत्यादी देखील करत आले आहेत. परंतु याने भारत पावन बनला आहे काय? शिडी उतरायचीच आहे. सतयुगामध्ये सूर्यवंशी बनले. मग शिडी उतरावी लागली, हळूहळू खाली घसरतात (अधोगती होते). भले कितीही यज्ञ-तप इत्यादी करो, तरीही दुसऱ्या जन्मामध्ये अल्प काळाचे फळ मिळते. जेव्हा कोणी वाईट कर्म करतो तर त्याचे देखील फळ त्याला मिळते. बेहदचे बाबा जाणतात, मुलांना शिकविण्याकरिता आलो आहे. तन देखील साधारण घेतले आहे. कोणताही टिळा इत्यादी लावण्याची गरज नाही. भक्त लोक तर मोठे-मोठे टिळे लावतात, परंतु फसवतात किती. बाबांनी सांगितले आहे - ‘मी साधारण शरीरामध्ये येतो, येऊन मुलांना शिकवतो’. वानप्रस्थ अवस्था झाली ना. श्रीकृष्णाचे नाव का घातले आहे? इथे तपासून विचार करण्याची देखील बुद्धी नाही आहे. आता बाबांनी योग्य-अयोग्य तपासण्याची बुद्धी दिली आहे.

बाबा म्हणतात - तुम्ही यज्ञ-तप, दान-पुण्य करत, शास्त्र पठण करत आला आहात. त्या शास्त्रांमध्ये काहीतरी आहे काय? मी तर तुम्हाला राजयोग शिकवून विश्वाची बादशाही दिली की श्रीकृष्णाने दिली? विचार करा. म्हणतात - ‘बाबा, तुम्हीच आम्हाला सांगितले होते. श्रीकृष्ण तर छोटा प्रिन्स आहे, तो कसा सांगू शकेल! बाबा, तुम्हीच शिकविलेल्या राजयोगाद्वारे आम्ही असे बनतो’. बाबा म्हणतात - शरीरावर भरवसा नाही. खूप पुरुषार्थ करायचा आहे. बाबांना समाचार ऐकवतात - अमका खूप चांगला निश्चय-बुद्धी आहे. मी म्हणतो - अजिबात निश्चय नाही आहे, ज्यांच्यावर खूप प्रेम केले ते आज इथे नाही आहेत. बाबा तर सर्वांशी खूप प्रेमाने वागतात. जसे कर्म मी करेन, मला पाहून इतर करतील. बरेचजण तर विकारामध्ये जाऊन, मग लपून येऊन बसतात. बाबा तर लगेच संदेशीला सांगतात. अशी कर्म करणारे खूप कमकुवत होत जातील. पुढे चालू शकणार नाहीत. शेवटच्या नाजूक वेळेला जर कोण काही केले तर एकदम मार्शल लॉ (लष्करी कायदा) लागू करतील. पुढे चालून तुम्ही खूप पाहाल. बाबा काय-काय करत राहतात. बाबा थोडेच सजा देतील, धर्मराजाद्वारे देतात. ज्ञानामध्ये प्रेरणेचा प्रश्नच नाहीये. भगवंताला तर सर्व मनुष्य म्हणतात की, ‘हे पतित-पावन या, आम्हाला येऊन पावन बनवा’. सर्व आत्मे कर्मेंद्रियांद्वारे बोलावतात. बाबा आहेत ज्ञानाचे सागर. त्यांच्याकडे खूप वक्खर आहे (व्हरायटी सामान आहे). असे सामान तर इतर कोणाकडेच नाहीये. श्रीकृष्णाची महिमा एकदम वेगळी आहे. बाबांच्या शिकवणीनेच हे (लक्ष्मी-नारायण) कसे बनले? बनविणारे तर बाबाच आहेत. बाबाच येऊन कर्म, अकर्म, विकर्माची गती समजावून सांगतात. आता तुमचा तिसरा नेत्र उघडला आहे. तुम्ही जाणता ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. आता घरी जायचे आहे, पार्ट बजावायचा आहे. हे स्वदर्शन चक्र आहे ना. तुमचे नाव आहे - स्वदर्शन चक्रधारी, ब्राह्मण कुलभूषण, प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी. लाखोंच्या अंदाजामध्ये स्वदर्शनचक्रधारी बनतील. तुम्ही किती नॉलेज शिकता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आताचा हा काळ खूप नाजूक आहे त्यामुळे कोणतेही उलटे कर्म करायचे नाही. कर्म-विकर्माच्या गतीला लक्षात ठेवून नेहमी श्रेष्ठ कर्म करायची आहेत.

२) योगाद्वारे कायमसाठी आपली काया निरोगी बनवायची आहे. एक बिलवेड मोस्ट (अतिप्रिय) बाबांचीच आठवण करायची आहे. बाबांकडून जे अविनाशी ज्ञानाचे धन मिळते, त्याचे दान करायचे आहे.

वरदान:-
सहनशीलतेच्या गुणाद्वारे कठोर संस्काराला देखील शी तल बनविणारे संतुष्टमणी भव

ज्यांच्यामध्ये सहनशीलतेचा गुण असतो ते चेहऱ्यावरून नेहमी संतुष्ट दिसून येतात, जे स्वतः संतुष्ट मूर्त राहतात ते इतरांना देखील संतुष्ट बनवतात. संतुष्ट असणे अर्थात सफलता प्राप्त करणे. जे सहनशील असतात ते आपल्या सहनशीलतेच्या शक्तीने कठोर संस्काराला अथवा अवधड कार्याला शितल आणि सहज बनवतात. त्यांचा चेहराच गुणमूर्त असल्याचा दिसून येतो. तेच ड्रामा रुपी ढालीवर टिकून राहू शकतात.

बोधवाक्य:-
जे वाणीद्वारे बदलत नाहीत त्यांना शुभ व्हायब्रेशनद्वारे बदलू शकता.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

जसे ब्रह्मा बाबांचे बोल फरिश्त्यासारखे बोल होते, कमी बोलणे आणि मधुर बोलणे होते. असे यथार्थ बोल बोला. भले कार्यव्यवहारासाठी बोलावे लागते परंतु ते देखील जास्त वाढवू नका. प्रत्येक संकल्प, बोल आणि कर्मामध्ये फालो फादर करा. प्रत्येक शब्द मधुरता आणि नम्रतेने भरलेला महानतापूर्वक असावा. यासाठी स्वतःला निमित्त समजून प्रत्येक कार्य करा तेव्हाच महानते सोबत नम्रता येईल आणि सफलता मूर्त बनाल.