23-10-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हां मुलांना पोहायला शिकविण्याकरिता, ज्याच्यामुळे तुम्ही ह्या दुनियेतून पार होता, तुमच्यासाठी दुनियाच बदलून जाते”

प्रश्न:-
जे बाबांचे मदतगार बनतात, त्यांना मदतीच्या बदल्यात काय प्राप्त होते?

उत्तर:-
जी मुले आत्ता बाबांचे मदतगार बनतात, त्यांना बाबा असे बनवतात की अर्धेकल्प कोणाची मदत घेण्याची किंवा सल्ला घेण्याची आवश्यकताच रहात नाही. बाबा किती श्रेष्ठ आहेत, म्हणतात मुलांनो, तुम्ही माझे मदतगार बनला नसता तर मी स्वर्गाची स्थापना कशी केली असती?

ओम शांती।
गोड-गोड नंबरवार अती गोड रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा समजावून सांगत आहेत कारण बरीच मुले निर्बुद्ध बनली आहेत. रावणाने खूप निर्बुद्ध बनवले आहे. आता आम्हाला बाबा किती बुद्धिवान बनवत आहेत. कोणी आय. सी. एस. च्या परीक्षेत पास होतात तर समजतात खूप मोठी परिक्षा पास झालो आहे. आता तुम्ही तर बघा किती मोठी परिक्षा पास करत आहात. जरा विचार तर करा शिकवणारे कोण आहेत! शिकणारे कोण आहेत! हा देखील निश्चय आहे - आम्ही कल्प-कल्प दर ५ हजार वर्षानंतर पिता, टीचर, सद्गुरूंना पुन्हा भेटतच राहतो. फक्त तुम्ही मुलेच जाणता - आम्ही किती सर्वोच्च बाबांकडून सर्वश्रेष्ठ वारसा प्राप्त करतो. टीचर सुद्धा शिकवून वारसा देतात ना. तुम्हाला देखील शिकवून तुमच्यासाठी दुनियेलाच बदलून टाकतात, नवीन दुनियेमध्ये राज्य करण्यासाठी. भक्तीमार्गामध्ये किती महिमा गातात. तुम्ही त्यांच्याकडून आपला वारसा मिळवत आहात. हे देखील तुम्ही मुले जाणता की जुनी दुनिया बदलत आहे. तुम्ही म्हणता आम्ही सर्व शिवबाबांची मुले आहोत. बाबांना देखील जुन्या दुनियेला नवीन बनविण्याकरिता यावे लागते. त्रिमूर्तीच्या चित्रामध्ये सुद्धा दाखवतात की ब्रह्मा द्वारे नव्या दुनियेची स्थापना. तर जरूर ब्रह्मामुखवंशावली ब्राह्मण-ब्राह्मणी पाहिजेत. ब्रह्मा काही नवीन दुनिया स्थापन करत नाहीत. रचता आहेतच मुळी बाबा. म्हणतात - ‘मी येऊन युक्तीने जुन्या दुनियेचा विनाश घडवून नवीन दुनिया बनवतो’. नवीन दुनियेमध्ये फार थोडे रहिवासी असतात. गव्हर्मेंट प्रयत्न करत रहाते की लोकसंख्या कमी व्हावी. आता कमी तर होणार नाही. युद्धामध्ये करोडोंनी माणसे मरतात परंतु माणसे कमी थोडीच होतात, लोकसंख्या तर तरी सुद्धा वाढत रहाते. हे देखील तुम्हीच जाणता. तुमच्या बुद्धीमध्ये विश्वाच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे. तुम्ही स्वतःला विद्यार्थी सुद्धा समजता. पोहणे देखील शिकता. म्हणतात ना - ‘नईया मेरी पार करो’. जे पोहायला शिकतात, ते खूप प्रसिद्ध असतात. आता तुमचे पोहणे बघा कसे आहे, एकदम वरती निघून जाता आणि मग इथे येता. ते तर दाखवतात इतके मैल वर गेले. तुम्ही आत्मे किती मैल वरती जाता. त्या तर स्थूल वस्तू आहेत, ज्यांची मोजदाद करतात. तुमचे तर अगणित आहे. तुम्ही जाणता आम्ही आत्मे आपल्या घरी निघून जाणार, जिथे सूर्य-चंद्र इत्यादी असत नाहीत. तुम्हाला आनंद आहे - ते आपले घर आहे. आम्ही तिथले रहिवासी आहोत. मनुष्य भक्ती करतात, मुक्तिधाम मध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करतात. परंतु कोणीही जाऊ शकत नाही. मुक्तीधाम मध्ये भगवंताला भेटण्याचा प्रयत्न करतात. अनेक प्रकारचे प्रयत्न करतात. कोणी म्हणतात - आपण ज्योती ज्योतीमध्ये विलीन व्हावे. कोणी म्हणतात मुक्तिधाम मध्ये जावे. मुक्तिधाम विषयी कोणाला ठाऊकही नाही आहे. तुम्ही मुले जाणता बाबा आलेले आहेत, आपल्या घरी घेऊन जातील. गोड-गोड बाबा आलेले आहेत, आम्हाला घरी नेण्यालायक बनवत आहेत. ज्याच्यासाठी अर्धा कल्प पुरुषार्थ करून सुद्धा बनू शकलो नाही. ना कोणी ज्योतीमध्ये विलीन होऊ शकत, ना मुक्तीधाममध्ये जाऊ शकत, ना मोक्ष प्राप्त करू शकत. जो काही पुरुषार्थ केला, तो व्यर्थ. आता तुम्हा ब्राह्मण कुलभूषणांचा पुरुषार्थ सत्य सिद्ध होत आहे. हा खेळ कसा बनलेला आहे. तुम्हाला आता आस्तिक म्हटले जाते. बाबांना चांगल्या रीतीने तुम्हीच जाणता आणि बाबांद्वारे सृष्टीचक्रालाही जाणले आहे. बाबा म्हणतात - मुक्ती-जीवनमुक्तीचे ज्ञान कोणालाच नाहीये. देवतांना देखील नाहीये. बाबांना कोणी जाणतच नाहीत, तर मग कोणाला घेऊन कसे बरें जातील? किती असंख्य गुरु लोक आहेत, त्यांचे किती फॉलोअर्स (अनुयायी), बनतात. खरे-खुरे सद्गुरू आहेत शिवबाबा. त्यांना काही आपले स्वतःचे पाय नाही आहेत. ते म्हणतात - ‘मला काही पाय नाहीत’. मी माझी पूजा कशी करायला लावू. मुले तर विश्वाचे मालक बनतात, त्यांच्याकडून थोडीच पूजा करून घेणार. भक्तीमार्गामध्ये मुले वडिलांच्या पाया पडतात. खरे तर पित्याच्या प्रॉपर्टीची मालक मुले आहेत. परंतु नम्रता दाखवतात. छोटी मुले इत्यादी सगळे जाऊन पाया पडतात. इथे बाबा म्हणतात - तुमची पाया पडण्यापासून सुद्धा सुटका करतो. किती मोठे बाबा आहेत. म्हणतात, तुम्ही मुले माझे मदतगार आहात. जर तुम्ही मदतगार बनला नसता तर मी स्वर्गाची स्थापना कशी केली असती. बाबा समजावून सांगतात - आता तुम्ही मदतगार बना मग मी तुम्हाला असे बनवतो की कोणाची मदत घेण्याची आवश्यकताच रहाणार नाही. तुम्हाला कोणाच्या सल्ल्याची सुध्दा गरज राहणार नाही. इथे बाबा मुलांची मदत घेत आहेत. म्हणतात - मुलांनो, आता छी-छी (विकारी) बनू नका. मायेकडून हार खावू नका. नाही तर नाव बदनाम कराल. बॉक्सिंग असते त्यात जेव्हा कोणी जिंकतात तर त्यांची वाह-वाह होते (स्तुती होते). हार खाणाऱ्याचे तोंड पिवळे पडते. इथे देखील हार खातात. इथे हार खाणाऱ्याला म्हटले जाते - तोंड काळे केले. आले आहेत गोरे बनण्यासाठी (पावन बनण्यासाठी) आणि मग काय करून बसतात. केलेली सर्व कमाई नष्ट होते, मग नव्याने सुरू करावी लागते. बाबांचे मदतगार बनून मग हार खाऊन नाव बदनाम करतात. दोन पार्ट्या (गट) आहेत. एक आहेत मायेचे मुरीद (गुलाम), एक आहेत ईश्वराचे भक्त. तुम्ही बाबांवर प्रेम करता. गायन देखील आहे - ‘विनाश काले विपरीत बुद्धी’. तुमची आहे प्रीत-बुद्धी. तर तुम्हाला नाव बदनाम थोडेच करायचे आहे. तुम्ही प्रीत-बुद्धी मग माये कडून हार का खाता? हरणाऱ्याला दुःख होते. जिंकणाऱ्यासाठी टाळी वाजवून वाह-वाह करतात. तुम्ही मुले समजता आम्ही तर पैलवान आहोत. आता मायेला जरूर जिंकायचे आहे. बाबा म्हणतात देहासहित जे काही बघता, त्या सर्वांना विसरून जा. मामेकम् (मज एकाची) आठवण करा. मायेने तुम्हाला सतोप्रधानापासून तमोप्रधान बनवले आहे. आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. माया जीते जगतजीत बनायचे आहे. हा आहेच सुख-दुःखाचा, जय आणि पराजयाचा खेळ. रावण राज्यामध्ये हार खाता. आता बाबा पुन्हा वर्थ पाउंड बनवत आहेत. बाबांनी समजावून सांगितले आहे - एक शिवबाबांची जयंतीच वर्थ पाउंड आहे. आता तुम्हा मुलांना असे लक्ष्मी-नारायण बनायचे आहे. तिथे घरोघरी दीपमाळा असते, सर्वांची ज्योत जागृत होते. मेन पॉवर द्वारे ज्योत जागृत होते. बाबा किती सोप्या पद्धतीने बसून समजावून सांगत आहेत. बाबांव्यतिरिक्त मुलांना - ‘गोड-गोड लाडक्या सिकीलध्या मुलांनो’ असे कोण म्हणेल. रुहानी बाबाच म्हणतात - ‘ओ माझ्या गोड लाडक्या मुलांनो, तुम्ही अर्ध्या कल्पापासून भक्ती करत आला आहात. परत एक सुद्धा जाऊ शकत नाही. बाबाच येऊन सर्वांना घेऊन जातात.

तुम्ही संगमयुगा विषयी चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता. बाबा कसे येऊन सर्व आत्म्यांना घेऊन जातात. दुनियेमध्ये या बेहदच्या नाटकाविषयी कोणालाच माहिती नाही आहे, हा बेहदचा ड्रामा आहे. हे देखील तुम्हीच समजता, इतर कोणीही सांगू शकणार नाही. जर म्हणाले बेहदचा ड्रामा आहे तर मग ते ड्रामाचे वर्णन कसे काय करतील. इथे तुम्ही ८४ च्या चक्राला जाणता. तुम्ही मुलांनी जाणले आहे, तुम्हालाच आठवण करायची आहे. बाबा किती सोपे करून सांगतात. भक्तीमार्गामध्ये तुम्ही किती धक्के खाता. तुम्ही किती दूर स्नान करण्यासाठी जाता. एक तलाव आहे म्हणतात की, त्याच्यामध्ये डुबकी मारल्याने परी बनतात. आता तुम्ही ज्ञान सागरामधे डुबकी मारून परी बनता. कोणी छान फॅशन केली तर म्हणतात ही तर जशी परी बनली आहे. आता तुम्ही रत्न बनता. बाकी मानवाला उडण्याचे पंख इत्यादी असू शकत नाहीत. असे उडू शकणार नाही. उडणारी आहेच आत्मा. आत्मा जिला रॉकेट सुद्धा म्हटले जाते, आत्मा किती छोटी आहे. जेव्हा सर्व आत्मे जातील तेव्हा होऊ शकते की तुम्हा मुलांना साक्षात्कार सुद्धा होईल. बुद्धीने समजू शकता - इथे तुम्ही वर्णन करू शकता, होऊ शकते जसा विनाश बघितला जातो तशी आत्म्यांची झुंड देखील पाहू शकता की कसे जातात. हनुमान, गणेश इत्यादी असे काही कोणी नाही आहेत. परंतु त्यांचा भावनेनुसार साक्षात्कार होतो. बाबा तर आहेतच बिंदू, त्यांचे तुम्ही काय वर्णन करणार. म्हणतात देखील छोटासा स्टार आहे ज्याला या डोळ्यांनी पाहू शकत नाही. देह किती मोठा आहे, ज्याद्वारे कर्म करायचे आहे. आत्मा किती छोटी आहे त्यामध्ये ८४ चे चक्र नोंदलेले आहे. एकही मनुष्य नसेल ज्याच्या बुद्धीमध्ये असेल की आम्ही ८४ जन्म कसे घेतो. आत्म्यामध्ये कसा पार्ट भरलेला आहे. वंडर आहे. आत्माच शरीर घेऊन पार्ट बजावते. ते असते हदचे नाटक, हे आहे बेहदचे. बेहदचे बाबा स्वतः येऊन आपला परिचय देतात. जी चांगली सेवाभावी मुले आहेत, ती विचार सागर मंथन करत राहतात. कोणाला कशा प्रकारे समजावून सांगावे. तुम्ही एकेकासाठी किती डोकेफोड करता. तरी देखील म्हणतात बाबा आम्हाला समजतच नाही. कोणी शिकत नसेल तर म्हटले जाते हा तर पत्थर-बुद्धी आहे. तुम्ही पाहता इथे देखील कोणी ७ दिवसांमध्येच खूप आनंदीत होऊन म्हणतात - बाबांकडे जाऊ या. काहींना तर काहीही समजत नाही. मनुष्य तर केवळ म्हणतात पत्थर-बुद्धी, पारस-बुद्धी परंतु अर्थ जाणत नाहीत. आत्मा पवित्र बनते तर पारसनाथ बनते. पारसनाथचे मंदिर सुद्धा आहे. संपूर्ण सोन्याचे मंदिर नसते. वरवर थोडे सोने लावतात. तुम्ही मुले जाणता आम्हाला बागवान (बगिच्याचे मालक) मिळाले आहेत, काट्यापासून फूल बनण्याची युक्ती सांगतात. गायन देखील आहे ना - ‘गार्डन ऑफ अल्लाह’. तुमच्याकडे सुरुवातीला एक मुसलमान ध्यानात जात होता - म्हणत असे खुदा ने मला फूल दिले. उभ्या-उभ्या खाली पडत असे, खुदाचा बगीचा बघत असे. आता खुदाचा बगीचा दाखवणारा तर स्वतः खुदाच असणार. दुसरा कोणी कसे दाखवू शकेल. तुम्हाला वैकुंठाचा साक्षात्कार घडवतात. खुदाच घेऊन जातात. स्वतः तर तिथे रहात नाहीत. खुदा तर शांतीधाममध्ये राहतात. तुम्हाला वैकुंठाचा मालक बनवतात. किती चांगल्या-चांगल्या गोष्टी तुम्हाला समजतात. आनंद होतो. आतून खूप आनंद झाला पाहिजे - आता आम्ही सुखधाममध्ये जातो. तिथे दुःखाची गोष्ट नसते. बाबा म्हणतात - सुखधाम, शांतीधामची आठवण करा. घराची का नाही आठवण करणार. आत्मा घरी जाण्यासाठी किती डोकेफोड करते. जप-तप इत्यादी खूप मेहनत करते परंतु कोणीही जाऊ शकत नाही. झाडामधून (मनुष्य सृष्टी रूपी झाडामधून) नंबरवार आत्मे येत राहतात मग मधूनच जाऊ कसे शकतील. जेव्हा की बाबाच इथे आहेत. तुम्हा मुलांना रोज समजावून सांगत राहतात - शांतीधाम आणि सुखधामची आठवण करा. बाबांना विसरल्याकारणानेच मग दुःखी होतात. मायेचा तडाखा बसतो. आता तर मायेचा जरा सुद्धा फटका खायचा नाही. मूळ आहे देह-अभिमान.

तुम्ही आतापर्यंत ज्या बाबांची आठवण करत होता - हे पतित-पावन या, त्या बाबांकडून तुम्ही शिकत आहात. तुमचा ओबिडियंट सर्व्हेंट टीचर सुद्धा आहेत. ओबिडियंट सर्व्हेंट पिता देखील आहेत. मोठ्या व्यक्ती नेहमी सही करताना खाली लिहितात - ‘ओबिडियंट सर्व्हेंट’. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हा मुलांना बघा कसा समजावून सांगतो’. सपूत मुलांवरच (लायक मुलांवरच) पित्याचे प्रेम असते, जे कपूत (कुपुत्र) असतात अर्थात बाबांचे बनून नंतर ट्रेटर बनतात, विकारामध्ये जातात तर बाबा म्हणतील असा मुलगा तर जन्माला आला नसता तर चांगले झाले असते. एकामुळे किती नाव बदनाम होते. किती जणांना त्रास होतो. इथे तुम्ही किती श्रेष्ठ काम करत आहात. विश्वाचा उद्धार करत आहात आणि तुम्हाला पृथ्वीची ३ पावले सुद्धा मिळत नाहीत. तुम्ही मुले कोणाचे घरदार तर तोडत नाही. तुम्ही राजांना देखील म्हणता - तुम्ही डबल मुकुटधारी होता, आता पुजारी बनला आहात. आता बाबा पुन्हा पूज्य बनवत आहेत तर बनले पाहिजे ना. थोडा वेळ बाकी आहे. आम्ही इथे कोणाकडून लाख घेऊन काय करणार.(?) गरिबांना राजाई मिळणार आहे. बाबा गरीब निवाज आहेत ना. तुम्ही अर्थासहित समजता की बाबांना गरीब निवाज का म्हटले जाते! भारत सुद्धा किती गरीब आहे, त्यामध्ये तुम्ही गरीब माता आहात. जे श्रीमंत आहेत ते या ज्ञानाला समजू शकणार नाहीत. गरीब अबला किती येतात, त्यांच्यावर अत्याचार होतात. बाबा म्हणतात - मातांना पुढे करायचे आहे. प्रभात फेरीमध्ये सुद्धा सर्वात पुढे माता असाव्यात. तुमचे बॅज सुद्धा फर्स्टक्लास आहेत. हे ट्रान्सलाईटचे चित्र तुमच्या समोर असावे. सर्वांना ऐकवा - दुनिया बदलत आहे. बाबांकडून कल्पापूर्वी प्रमाणे वारसा मिळत आहे. मुलांना विचार सागर मंथन करायचे आहे - सेवेला कसे अंमलात आणायचे. वेळ तर लागतो ना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पूर्णपणे बाबांवर प्रीत ठेवून मदतगार बनायचे आहे. मायेकडून हार पत्करून कधी नाव बदनाम करायचे नाही. पुरुषार्थ करून देहासहित जे काही दिसून येते त्याला विसरून जायचे आहे.

२) आंतरिक आनंद व्हावा की आता आपण शांतीधाम, सुखधाम मध्ये जात आहोत. बाबा ओबिडियंट टीचर बनून आम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी लायक बनवत आहेत. लायक, सुपुत्र बनायचे आहे, कुपुत्र नाही.

वरदान:-
प्रत्येक संकल्प, समय, वृत्ती आणि कर्माद्वारे सेवा करणारे निरंतर सेवाधारी भव

जसे बाबा अति प्रिय वाटतात बाबांशिवाय जीवन नाही, असेच सेवेशिवाय जीवन नाही. निरंतर योगी असण्यासोबतच निरंतर सेवाधारी बना. झोपेत देखील सेवा व्हावी. झोपताना जर कोणी तुम्हाला पाहिले तर तुमच्या चेहेऱ्यावरून शांती, आनंदाचे व्हायब्रेशन अनुभवास यावे. प्रत्येक कर्मेंद्रिया द्वारे बाबांच्या आठवणीची स्मृती देण्याची सेवा करत राहा. आपल्या पॉवरफुल वृत्ती द्वारे व्हायब्रेशन पसरवत राहा, कर्माद्वारे ‘कर्मयोगी भव’चे वरदान देत राहा, प्रत्येक पावलामध्ये पद्मांची कमाई जमा करत राहा तेव्हाच म्हटले जाईल - निरंतर सेवाधारी अर्थात सर्व्हीसेबल.

बोधवाक्य:-
आपल्या रुहानी पर्सनॅलिटीला स्मृतीमध्ये ठेवा तर मायाजीत बनाल.


अव्यक्त इशारे:- स्वयं प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.

जशी वाणीची प्रॅक्टिस करत-करत वाणीमध्ये शक्तीशाली झाला आहात, तसे शांतीच्या शक्तीचे अभ्यासी बनत जा. पुढे जाऊन वाणीद्वारे किंवा स्थूल साधनांद्वारे सेवा करण्यासाठी वेळ मिळणार नाही. अशा वेळी शांतीच्या शक्तीच्या साधनांची गरज लागेल कारण जितका जो महान शक्तीशाली असतो तो अति सूक्ष्म असतो. तर वाणी पेक्षा शुद्ध संकल्प सूक्ष्म आहेत त्यामुळे सूक्ष्मचा प्रभाव जास्त शक्तिशाली असेल.