23-11-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, संगमयुगावर तुम्हाला बाबांद्वारे उत्तम बुद्धी आणि श्रेष्ठ मत मिळते, ज्याद्वारे तुम्ही ब्राह्मणापासून देवता बनता”

प्रश्न:-
तुम्ही मुले कोणत्या मस्तीमध्ये (नशेमध्ये) राहाल तर तुमचे वर्तन अतिशय रॉयल बनेल?

उत्तर:-
तुम्हाला ज्ञानाची मस्ती (नशा) चढलेली असली पाहिजे. ओहो! आम्ही भगवंताच्या सन्मुख बसलो आहोत. आम्ही इथून जाणार, जाऊन विश्वाचा मालक, क्राऊन प्रिन्स बनणार. जेव्हा अशी मस्ती राहील तेव्हा तुमचे वर्तन स्वतः रॉयल बनेल. मुखाने अतिशय गोड शब्द निघतील. आपसामध्ये खूप प्रेम असेल.

गीत:-
महफिल में जल उठी शमा…

ओम शांती।
गोड-गोड मुलांनी, रुहानी मुलांनी येऊन ब्राह्मण बनून रुहानी बाबांकडून हे जरूर समजून घेतले आहे की, आम्ही संगमयुगी ब्राह्मण आहोत. बाबांनी आमच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे. आता आम्हाला समजले आहे की, हे संगमयुग आहे. जे कोणी मनुष्य पतित भ्रष्टाचारी आहेत, ते मग पावन बनून भविष्यामध्ये पावन श्रेष्ठाचारी पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातील. हे लक्ष्मी-नारायण कधीतरी पुरुषार्थ करून पुरुषोत्तम बनले आहेत ना. यांचा इतिहास जरूर पाहिजे. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य कधी स्थापन झाले? ना कलियुगामध्ये, ना सतयुगामध्ये. स्वर्ग स्थापना होतोच मुळी संगमावर. इतक्या विस्तारामध्ये कोणी जात नाहीत. तुम्ही जाणता हे संगमयुग आहे. कलियुगाच्या नंतर सतयुग नवीन दुनिया असते, तर जरूर संगमयुग देखील असेल. आणि मग नवीन दुनियेमध्ये नवीन राज्य असेल. बुद्धी चालली पाहिजे (विचार चालले पाहिजेत). तुम्ही जाणता बाबांकडून आम्हाला उत्तम बुद्धी आणि श्रीमत मिळत आहे. म्हणतात - ‘हे ईश्वरा यांना सदैव सुमत अथवा चांगले मत द्या’. ते साऱ्या दुनियेचे पिता आहेत. सर्वांना चांगले मत देणारे आहेत. संगमयुगावर येऊन आपल्या मुलांना चांगले मत देतात. ज्यांना पांडव संप्रदाय आणि दैवी संप्रदाय असे शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे. ब्राह्मण संप्रदाय आणि दैवी संप्रदाय यांना देखील कोणीही समजू शकत नाही. ब्रह्मा द्वारेच ब्राह्मण संप्रदायी बनू शकतो. परमपिता परमात्माच ब्रह्मा द्वारे ही रचना रचतात. प्रजापिता आहेत तेव्हाच तर इतके सारे ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी आहेत. जोपर्यंत कोणी येऊन तुम्हा ब्राह्मणांद्वारे ज्ञान घेत नाही तोपर्यंत सद्गती कशी होऊ शकेल. तुमच्याकडे भरपूर लोक येतील. बाबांकडून वारसा घेण्यासाठी संन्यासी देखील येतील आणि इतर धर्मांचे देखील येतील. स्वर्गामध्ये त्यांचा पार्ट नाहीये; परंतु सर्वांना संदेश द्यायचा आहे की, बाबा आलेले आहेत. यावेळी स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे कोणीही देवी-देवता धर्माला जाणतच नाहीत. ते जे अगोदर सतोप्रधान होते, ते नंतर मग तमोमध्ये आल्या कारणाने स्वतःला देवी-देवता म्हणू शकत नाहीत.

तुम्ही मुले जाणता रावणाचे राज्य देखील इथेच असते आणि परमपिता परमात्मा ज्यांना राम देखील म्हणतात, त्यांचा जन्म देखील इथेच होतो. गातात देखील - ‘पतित पावन सीताराम’. परंतु पतित कोणी बनवले, रावण कोण आहे, पतित-पावन बाबांना कशासाठी बोलावतात? हे कोणालाच ठाऊक नाहीये. कोणीही असे समजत नाही की, आमच्यामध्ये जे ५ विकार आहेत, तोच रावण आहे. ज्यांच्यामध्ये ५ विकार नाहीत ते राम संप्रदाय आहेत. आता रामराज्य नाहीये त्यामुळे सर्वांना वाटते की नवीन दुनिया, नवीन पवित्र राज्य हवे. राम म्हटले जाते शिवबाबांना, परंतु ते रामाला परमात्मा समजले आहेत त्यामुळे शिवबाबांना विसरायला झाले आहे. तुम्ही समजावून सांगू शकता की, रामराज्य कशाला म्हटले जाते. शास्त्रांमध्ये लिहिले आहे की रामाची सीता चोरीला गेली. असे होऊ शकते का की राजाच्या राणीला कोणी चोरून घेऊन जाईल? शास्त्रे देखील असंख्य आहेत. मुख्य शास्त्र आहे - गीता. शास्त्रांमध्ये लिहिले आहे की, ब्रह्मा द्वारे ब्राह्मण, देवता, क्षत्रिय धर्माची स्थापना करतात. तर प्रजापिता देखील इथेच पाहिजे ना. ब्रह्माला किती असंख्य मुले आहेत, तर ही आहे मुखवंशावळी, इतकी सारी कुखवंशावळी असू शकत नाही. जर का सरस्वती देखील मुखवंशावळी आहे तर मग ती ब्रह्माची पत्नी होऊ शकत नाही. आता बाबा म्हणतात - ब्रह्मा मुखाद्वारे तुम्ही ब्राह्मण बनता, माझी मुले बनता. तुम्ही मुले जाणता की, शिवबाबांची किती महिमा आहे. बाबा पतित-पावन, लिबरेटर देखील आहेत. हे सर्व गातात देखील परंतु समजत नाहीत; म्हणून सर्वात पहिला बाबांचा परिचय द्यायचा आहे की, ते पतित-पावन आहेत, गीतेचा भगवान देखील आहेत. निराकार शिवबाबा आहेत तर जरूर येऊन ज्ञान ऐकवले असेल. आता ज्या शरीराद्वारे ज्ञान ऐकवतात त्यांचे नाव ब्रह्मा ठेवले आहे. नाहीतर ब्रह्मा कुठून आले! ब्रह्माचा पिता कोण आहे? ब्रह्मा-विष्णू-शंकर यांचा रचयिता कोण आहे? हे आहेत गूढ प्रश्न. त्रिमूर्ती देवता असे तर म्हणतात, परंतु ते आले कुठून! आता बाबा समजावून सांगत आहेत - यांचा देखील रचयिता उच्च ते उच्च भगवानच आहेत, ज्यांना ‘शिव’ म्हटले जाते. हे तिन्ही देवता प्रकाशकायेमध्ये आहेत, यांच्यामध्ये हड्डी-मांस नाही आहे, परंतु मंद-बुद्धी असल्यामुळे समजू शकत नाहीत. यावरून हे समजावून सांगायचे आहे की, उच्च ते उच्च भगवान आहेत. ते ब्रह्मा द्वारे स्वर्गाचा वारसा देतात. गातात देखील - ‘मनुष्य से देवता किये…’ आणि मग दाखवतात की, विष्णूच्या नाभीमधून ब्रह्मा प्रकटला. असा कधी नाभीमधून मुलाचा जन्म होतो काय? आता बाबा बसून सर्व रहस्ये समजावून सांगत आहेत. परंतु कोणी समजेल तेव्हा ना.

तुम्ही जाणता आत्म्यालाच पाप-आत्मा, पुण्य-आत्मा म्हटले जाते. असे नाही की पवित्र आत्मा सो परमात्मा आहे. परमात्मा बाबा तर सदा पावन आहेत. तमोप्रधान असणाऱ्याला पतित म्हटले जाते. सतयुगामध्ये जेव्हा सुख होते तेव्हा दुःखाचे नाव सुद्धा नव्हते. मनुष्य तर म्हणतात - आत्ताच स्वर्ग आहे. काहीही समजत नाहीत, परंतु शेवटी येऊन बाबांकडून वारसा घेतील. तुम्ही मुलेच जाणता की आम्ही आमची राजधानी स्थापन करत आहोत. इतर कोणीही विश्वाचा मालक बनू शकत नाही. विश्वावर राज्य सतयुगामध्ये असते. कलियुगामध्ये साऱ्या विश्वावर राज्य करू शकत नाही. हे देखील कोणाला माहीत नाहीये. गीतेमध्ये देखील आहे की, महाभारत लढाई लागली होती तेव्हाच सर्व धर्म नष्ट होतात. जसे बांबूचे जंगल असते, ते जेव्हा सुकतात तेव्हा एकमेकांवर आपटल्यामुळे आग लागते आणि संपूर्ण जंगल जळून खाक होते. हे मनुष्य सृष्टीचे झाड देखील जडजडीभूत झाले आहे. याला देखील आता आग लागणार आहे, एकमेकांशी युद्ध करून नष्ट होतील. आग लागणारे सामान तयार करतच राहतात. आता अणुबॉम्ब द्वारा आग लागणार आहे, हे रहस्य ते जाणत नाहीत. आता कलियुग नरक परिवर्तित होऊन स्वर्ग बनणार आहे. या ज्ञानामध्ये मस्ती (नशा) खूप पाहिजे. स्वतःला पहायचे आहे की, मी त्या मस्तीमध्ये अथवा नशेमध्ये राहतो का? आपण परमात्म्याची संतान आहोत, स्वर्गाचा वारसा घेत आहोत. आपसामध्ये बोलण्याची रॉयल्टी पाहिजे. सर्व काही इथेच शिकायचे आहे. नंतर मग तेच संस्कार घेऊन जाल. अतिशय गोड बनायचे आहे, खूप नशा असला पाहिजे. शिवबाबांची आम्ही मुले आहोत. देवता पद प्राप्त करणारे आहोत, तर एकमेकांशी किती प्रेमाने बोलले पाहिजे. परंतु मुलांच्या मुखातून अजूनही फूल (गोड शब्द) निघतच नाहीत. तुम्ही किती श्रेष्ठ आहात. तुम्हाला हे लक्षात राहिले पाहिजे की आपण शिवबाबांची संतान आहोत, सतयुगामध्ये मग महाराजा बनणार आहोत. म्हणजे जणू आपण विश्वाचे क्राऊन प्रिन्स बनणार.

तुम्हा मुलांना एक आंतरिक आनंद वाटला पाहिजे की, आम्ही परमात्म्याच्या सन्मुख बसलो आहोत, ज्यांच्याकडून स्वर्गाचा वारसा मिळतो त्यांच्या श्रीमतावर चालायचे आहे. तुम्ही जाणता आपली राजधानी स्थापन होत आहे. राजधानीमध्ये सर्व पाहिजेत. परंतु तुम्हा मुलांच्या मुखातून सदैव रत्न निघाली पाहिजेत. बाबा ‘रूप’ देखील आहेत तर ‘बसंत’ देखील आहेत. या कहाण्या सर्व आताच्या आहेत. बाबा आहेत ज्ञानाचा सागर. ते ज्ञानाची वर्षा करतात. तो इंद्रदेव पाऊस पाडतो अशी काही गोष्ट नाहीये. हे ढग नैसर्गिकरित्या तयार होतात आणि पाऊस पडतो. सतयुगामध्ये ही ५ तत्वे देखील गुलाम बनतात आणि इथे मनुष्य सर्वांचे गुलाम बनले आहेत. इथे प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत करावी लागते. तिथे प्रत्येक गोष्ट आपोआप होते. तर मुलांना सदैव बाबांची आठवण राहिली पाहिजे, यामुळे सदैव आनंदाचा पारा चढलेला राहील. ते लोक (वैज्ञानिक) देखील मंथन करतात. मुलांना वाणीचे मंथन करायचे आहे. वाणीचा प्रवाह कधी-कधी खूप चांगला असतो, कधी कमी असतो, याला म्हटले जाते मंथन करणे. मुले बाबांच्या (ब्रह्मा बाबांच्या) अवस्थेला पाहत आहेत आणि बाबा आपला अनुभव ऐकवतात. तर कधी खूप उत्साहाचा प्रवाह असतो, कधी कमी असतो. कधी खूप चांगले पॉईंट्स निघतात. बाबा देखील मदतगार बनतात. तुम्ही देखील अनुभव करता. बाबा तर कधी मुरली हातात घेत नाहीत. मुले मासिकासाठी लेख लिहितात - तर बाबा कधी-कधी तपासून पाहतात की, मुले काही गडबड तर करत नाहीत ना. मासिकामध्ये देखील चांगले-चांगले मुरलीचे पॉईंट्स येतात आणि मुरली तर सर्व ठिकाणी जात असते. एखाद्या ठिकाणी मुरली जात नसेल तर बाबा म्हणतात - रचता आणि रचनेचे ज्ञान ७ दिवस समजून घेतले आहे ना. अजून काय पाहिजे. बाकी ५ विकारांना भस्म करण्याचा पुरुषार्थ करायचा आहे, अजून तर कोणता त्रास देत नाहीत.

तुम्ही मुले कोणत्याही सत्संगामध्ये जाऊ शकता, सेवा करण्याचा देखील उमंग आला पाहिजे. जेव्हा सर्व धर्मांचे लोक एकत्र येतात, तेव्हा त्यांना हे समजावून सांगितले पाहिजे की, प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. ते एकमेकांना भाऊ-भाऊ म्हणतात परंतु खऱ्या अर्थाने ते एक होऊ शकत नाहीत. ही फक्त बोलण्यापुरती गोष्ट आहे. बाबा म्हणतात - मी येऊन ब्राह्मण बनवून मग देवी-देवता धर्माची स्थापना करतो, तिथे दुसरा कोणताही धर्म असत नाही. ही तीच महाभारत लढाई आहे. गीतेमध्ये देखील याचे वर्णन केलेले आहे. हे एकच शिक्षण आहे. शिकविणारे देखील एकच आहेत. बाबा म्हणतात - हे ज्ञान जेव्हा सांगून पूर्ण होईल तेव्हा मी देखील निघून जाईन. मला कलियुगाच्या अंतामध्ये ज्ञान ऐकवायचे आहे, मला कल्प-कल्प यायचे आहे. एक सेकंद देखील कमी-जास्त होणार नाही. जेव्हा ज्ञान पूर्ण होईल तेव्हा मग कर्मातीत अवस्थेपर्यंत पोहोचाल, तेव्हा मग विनाश देखील होईल. दिवसेंदिवस तुमची सेवा वाढत जाईल. इथे तर ना कोणामध्ये पवित्रता आहे, ना दैवी गुणांची धारणा आहे. तिथे पवित्रते मधील अंतर बघा किती आहे. तुम्ही आता संगमावर बसला आहात, हेच पुरुषोत्तम युग आहे. आता तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात. परंतु तो करिष्मा, तसे आचरण देखील पाहिजे. कधीही मुखावाटे पत्थर (कठोर शब्द) बोलता कामा नये. मुखावाटे रत्नेच निघाली पाहिजेत. आता तुम्ही देवता समान गुल-गुल (फूल) बनत आहात. गॉड येऊन गॉड-गॉडेज बनवतात. देवतांनाच भगवान-भगवती म्हटले जाते. परंतु असे बनवतात कोण? हे कोणीही जाणत नाहीत. तुमच्या बुद्धीमध्ये रचता आणि रचनेचे संपूर्ण नॉलेज आहे तर मग इतरांना देखील आपसमान बनविण्याची जबाबदारी आहे. भरपूर लोक येत राहतील. ब्राह्मणच स्वदर्शन चक्रधारी बनतात. मायेची वादळे देखील मुलांनाच येतात. कुठे मग वादळ आल्याने हाड न् हाड तुटून जाते. चालता-चालता कोणी डिस-सर्व्हिस देखील करतात. बाबा म्हणतात - कोणतेही छी-छी काम (वाईट काम) करू नका. तुम्ही मुखवंशावळी ब्राह्मण आहात, ते आहेत कुखवंशावळी. किती फरक आहे. ते भौतिक यात्रेवर घेऊन जातात, तुमची आहे रुहानी यात्रा. तुम्ही बेहदच्या बाबांकडून वारसा घेत आहात. ही देखील कोणाला बुद्धी नाहीये ज्यामुळे समजतील की, ते (या दुनियेतील) देखील ब्राह्मण आहेत, आम्ही देखील ब्राह्मण आहोत. परंतु खरा ब्राह्मण कोण आहे? ते ब्राह्मण स्वतःला ब्रह्माकुमार म्हणू शकत नाहीत. तुम्ही स्वतःला ब्रह्माकुमार म्हणता तर जरूर ब्रह्मा देखील असेल. परंतु त्यांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी येत नाहीत, ज्यामुळे विचारतील. बाबा कल्प-कल्प येऊन तुम्हा मुलांना या गोष्टी समजावून सांगत आहेत की, तुम्ही ब्रह्माची संतान ब्राह्मण सर्व भाऊ-बहिणी आहात. मग ते विकारामध्ये कसे काय जाऊ शकतात. जर कोणी जात असतील तर ब्राह्मण कुळाला कलंकित करतात. स्वतःला ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारी संबोधून मग पतित बनू शकत नाहीत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) वाणीद्वारे जे ऐकता त्यावर मंथन करायचे आहे. पुरुषोत्तम बनत आहात त्यामुळे वर्तन खूप रॉयल बनवायचे आहे. मुखावाटे कधीही दगड (कटू शब्द) काढायचे नाहीत.

२) अनेकांना आपसमान बनविण्याची जबाबदारी ओळखून सेवेवर तत्पर राहायचे आहे. कोणतेही छी-छी काम (घाणेरडे काम) करून डिस-सर्व्हिस करायची नाही.

वरदान:-
अतींद्रिय सुखमय स्थिती द्वारा अनेक आत्म्यांना आवाहन करणारे विश्व कल्याणकारी भव

जितकी लास्ट कर्मातीत स्टेज समीप येत जाईल तितकी आवाजापासून परे शांत स्वरूप स्थिती अधिक प्रिय वाटेल - या स्थितीमध्ये सदैव अतींद्रीय सुखाची अनुभूती होईल आणि याच अतींद्रीय सुखमय स्थिती द्वारे अनेक आत्म्यांना सहज आवाहन करू शकाल. ही पॉवरफुल स्थितीच विश्व कल्याणकारी स्थिती आहे. या स्थिती द्वारे तुम्ही कितीही दूर राहणाऱ्या आत्म्याला संदेश पोहोचवू शकता.

बोधवाक्य:-
प्रत्येकाच्या विशेषतेला लक्षात ठेवून फेथफुल (निष्ठावान) बना म्हणजे मग संघटनमध्ये एकमत होईल.

हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

जसे ब्रह्मा बाबांसाठी सर्वांच्या मुखातून एकच आवाज निघतो - “माझे बाबा”. तशी तुम्हा प्रत्येक श्रेष्ठ आत्म्याप्रती इतरांच्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न व्हावी, जाणवावी. तुम्हा प्रत्येकामधून आपलेपणाचा आभास व्हावा. प्रत्येकाला असे वाटले पाहिजे की, ‘हे माझे शुभचिंतक आहेत, सहयोगी सेवेमधील साथीदार आहेत’; याला म्हटले जाते - पित्या समान. हीच आहे संपन्न अथवा संपूर्ण कर्मातीत स्टेज.