23-12-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - जो संकल्प ईश्वरीय सेवेअर्थ चालतो, त्याला शुद्ध संकल्प अथवा निरसंकल्पच म्हणणार, व्यर्थ नाही”

प्रश्न:-
विकर्मांपासून वाचण्याकरिता कोणते कर्तव्य पालन करत असताना देखील अनासक्त राहायचे आहे?

उत्तर:-
मित्र-संबंधींची सेवा भले करा परंतु अलौकिक ईश्वरीय दृष्टी ठेऊन करा, त्यामध्ये मोहाची रग असता कामा नये. जर कोणत्या विकारी नात्यातून एक संकल्प जरी चालला तर ते विकर्म बनते म्हणून अनासक्त होऊन कर्तव्य पालन करा. जितके शक्य असेल तितके देही-अभिमानी होऊन राहण्याचा पुरुषार्थ करा.

ओम शांती।
आज तुम्हा मुलांना संकल्प, विकल्प, निरसंकल्प अथवा कर्म, अकर्म आणि विकर्मांवर समजावून सांगितले जात आहे. जोपर्यंत तुम्ही इथे आहात तोपर्यंत तुमचे संकल्प जरूर चालणार. संकल्प धारण केल्याशिवाय कोणता मनुष्य एक क्षण देखील राहू शकत नाही. आता हे संकल्प इथे देखील चालणार, सतयुगामध्ये सुद्धा चालतील आणि अज्ञान काळामध्ये देखील चालतात परंतु ज्ञानामध्ये आल्याने संकल्प, संकल्प नाहीत, कारण तुम्ही ईश्वरीय सेवाअर्थ निमित्त बनला आहात तर जो यज्ञअर्थ संकल्प चालतो तो संकल्प, संकल्प नाही तो निरसंकल्पच आहे. बाकी जे फालतू संकल्प चालतात अर्थात कलियुगी संसार आणि कलियुगी मित्र-नातेवाईकां प्रती संकल्प चालतात त्यांना विकल्प म्हटले जाते; ज्याच्यामुळेच विकर्म बनतात आणि विकर्मांमुळे दुःख प्राप्त होते. बाकी जो यज्ञाप्रति अथवा ईश्वरीय सेवे प्रति संकल्प चालतो तो जणू निरसंकल्प झाला. शुद्ध संकल्प सेवेप्रती भले चालू दे. बघा, इथे बाबा बसले आहेत तुम्हा मुलांची काळजी घेण्यासाठी. त्यांची सेवा करण्याअर्थ आई-वडिलांचा जरूर संकल्प चालतो. परंतु हा संकल्प, संकल्प नाही याद्वारे विकर्म बनत नाही; परंतु जर कोणाचा विकारी नात्याप्रती संकल्प चालत असेल तर त्याचे विकर्म नक्कीच बनते.

बाबा तुम्हा मुलांना म्हणतात की, मित्र-नातेवाईकांची सेवा भले करा परंतु अलौकिक ईश्वरीय दृष्टीकोनातून करा. ती मोहाची रग असता कामा नये. अनासक्त होऊन आपली फर्ज-अदाई (कर्तव्य) पालन केले पाहिजे. परंतु जे कोणी इथे असतानाही, कर्म संबंधामध्ये असतानाही त्यांना नष्ट करू शकत नाहीत तरी देखील त्यांनी बाबांना सोडता कामा नये. हात पकडला असेल तर काही ना काही पद प्राप्त करणार. आता हे तर प्रत्येकजण स्वतःला जाणतात की माझ्यामध्ये कोणता विकार आहे. जर कोणामध्ये एक जरी विकार असेल तर तो जरूर देह-अभिमानी झाला, ज्याच्यामध्ये विकार नाही तो झाला देही-अभिमानी. जर कोणामध्ये कोणताही विकार असेल तर ते सजा जरूर खातील आणि जे विकारांरहित आहेत ते सजेपासून मुक्त होतील. जसे बघा काही-काही मुले आहेत, ज्यांच्यामध्ये ना काम विकार आहे, ना क्रोध आहे, ना लोभ आहे, ना मोह आहे…, ते खूप चांगली सेवा करू शकतात. आता त्यांची अतिशय ज्ञान विज्ञानमय अवस्था आहे. ते तर तुम्ही सर्वजण याला व्होट द्याल. आता हे तर जसे मी जाणतो तसे तुम्ही मुले देखील जाणता, चांगला असणाऱ्याला सर्वजण चांगलेच म्हणतील, ज्याच्यामध्ये काही खामी असेल त्याला देखील सर्व तसेच व्होट देतील. आता हा निश्चय करा ज्यांच्यामध्ये कोणता विकार आहे ते सेवा करू शकत नाहीत. जे विकार प्रूफ आहेत ते सेवा करून इतरांना आपसमान बनवू शकतील; त्यामुळे विकारांवर तुमचा पूर्णपणे विजय पाहिजे, विकल्पावर पूर्णपणे विजय पाहिजे. ईश्वर अर्थ संकल्पाला निरसंकल्प म्हणू शकता. वास्तविक निरसंकल्पता त्यालाच म्हटले जाते जे संकल्पच चालणार नाहीत, सुख-दुःखापासून न्यारा होईल, ते तर अखेरीला जेव्हा तुम्ही हिशोब चुकता करून निघून जाता, तिथे सुख-दुःखापासून न्याऱ्या अवस्थेमध्ये, तेव्हा कोणताही संकल्प चालत नाही. त्यावेळी कर्म अकर्म दोन्ही पासून परे अकर्मी अवस्थेमध्ये असता.

इथे तुमचे संकल्प जरूर चालतील कारण तुम्ही साऱ्या दुनियेला शुद्ध बनविण्याच्या निमित्त बनलेले आहात तर त्यासाठी तुमचे शुद्ध संकल्प जरूर चालतील. सतयुगामध्ये शुद्ध संकल्प चालल्यामुळे संकल्प, संकल्प नाही, कर्म करत असताना देखील कर्मबंधन बनत नाही. समजले. आता कर्म, अकर्म आणि विकर्माची गती तर बाबाच समजावून सांगू शकतात. तेच विकर्मांपासून सोडविणारे आहेत, जे या संगमावर तुम्हाला शिकवत आहेत; त्यामुळे मुलांनो, स्वतःवरच खूप कटाक्षाने लक्ष ठेवा. आपल्या हिशोबाला देखील बघत रहा, लक्ष ठेऊन रहा. तुम्ही इथे आला आहात हिशोब चुकता करण्यासाठी. असे तर नाही इथे येऊन देखील हिशोबच बनवत जाल तर सजा भोगावी लागेल. ही गर्भ-जेलची सजा काही कमी नाहीये. त्यामुळे खूपच पुरुषार्थ करायचा आहे. हे ध्येय खूप मोठे आहे त्यामुळे सावधगिरीने चालले पाहिजे. विकल्पांवर विजय जरूर प्राप्त करायचा आहे. आता तुम्ही विकल्पांवर कितपत विजय प्राप्त केला आहे, कितपत या निरसंकल्प अर्थात सुख-दुःखापासून न्याऱ्या अवस्थेमध्ये राहता, हे तुम्ही स्वतःला जाणता. जे स्वतःला समजू शकत नाहीत ते मम्मा, बाबांना विचारू शकतात कारण तुम्ही तर त्यांचे वारसदार आहात, तर ते सांगू शकतात.

निरसंकल्प अवस्थेमध्ये राहिल्याने तुम्ही आपल्याच तर काय परंतु कोणत्याही विकारीच्या विकर्मांना दग्ध करू शकता, कोणताही कामी पुरुष तुमच्या समोर आला, तरी त्याचा विकारी संकल्प चालणारच नाही. जसे कोणी देवतांजवळ गेला तर त्यांच्या समोर तो शांत होतो, तसे तुम्ही देखील गुप्त रूपामध्ये देवता आहात. तुमच्यासमोर कोणाचाही विकारी संकल्प चालू शकत नाही, परंतु असे पुष्कळ कामी पुरुष आहेत ज्यांचा थोडा संकल्प जर चालला तरी तो वार करू शकणार नाही, जर तुम्ही योगयुक्त होऊन उभे राहिलात तर.

बघा, मुलांनो तुम्ही इथे आला आहात परमात्म्याला विकारांची आहुती देण्यासाठी परंतु काहीजणांनी अजून नियम प्रमाण आहुती दिलेली नाहीये. त्यांचा योग परमपित्या सोबत जोडलेला नाहीये. पूर्ण दिवस बुद्धियोग भटकत राहतो अर्थात देही-अभिमानी बनलेले नाहीत. देह-अभिमानी असल्याकारणाने कोणाच्यातरी स्वभावाच्या प्रभावामध्ये येतात, ज्यामुळे परमात्म्यासोबत प्रीत निभावू शकत नाहीत अर्थात परमात्मा अर्थ सेवा करण्याचे अधिकारी बनू शकत नाहीत. तर जे परमात्म्याकडून सेवा घेऊन मग सेवा करत आहेत अर्थात पतितांना पावन बनवत आहेत तीच माझी खरी पक्की मुले आहेत. त्यांना खूप मोठे पद मिळते.

आता परमात्मा स्वतः येऊन तुमचे पिता बनले आहेत. त्या पित्याला साधारण रूपामध्ये न जाणता कोणत्याही प्रकारचा संकल्प उत्पन्न करणे म्हणजे विनाश ओढवून घेणे आहे. आता ती वेळ येईल जेव्हा १०८ ज्ञान गंगा पूर्ण अवस्थेला प्राप्त करतील. बाकी जे शिकलेले नाहीत ते स्वतःचीच बरबादी करतील.

हा निश्चय असावा की जो कोणी या ईश्वरीय यज्ञामध्ये लपवून काम करतो तर त्याला जानी-जाननहार बाबा बघतात, ते मग आपल्या साकार स्वरूप बाबांना टच करतात, सावधानी देण्यासाठी. तर कोणतीही गोष्ट लपवता कामा नये. भले चुका होतात परंतु त्या सांगितल्यामुळेच पुढे वाचू शकतात म्हणून मुलांनो, सावध रहा.

मुलांना आधी स्वतःला हे समजून घेतले पाहिजे की, ‘मी आहे कोण’, ‘व्हॉट एम आय’. “मी” शरीराला म्हणत नाहीत, “मी” म्हणतात - आत्म्याला. मी आत्मा कुठून आले आहे? कोणाची संतान आहे? आत्म्याला जेव्हा हे माहीत होईल की, मी आत्मा परमपिता परमात्म्याची संतान आहे तेव्हा आपल्या पित्याची आठवण करून आनंद होईल. मुलाला आनंद तेव्हा होतो जेव्हा पित्याच्या ऑक्युपेशनला जाणतो. जोपर्यंत लहान आहे, पित्याच्या ऑक्युपेशनला जाणत नाही तोपर्यंत इतका आनंद होत नाही. जसा-जसा मोठा होत जातो, पित्याच्या ऑक्युपेशनविषयी माहिती होते तेव्हा तो नशा, तो आनंद वाढत जातो. तर आधी त्यांच्या ऑक्युपेशनला जाणून घ्यायचे आहे की आपले पिता कोण आहेत? ते कुठे राहतात? जर असे म्हटले की आत्मा त्यांच्यामध्ये मर्ज होईल (विलीन होईल) तर मग आत्मा विनाशी झाली, मग आनंद कोणाला होईल.

तुमच्याकडे जे नवीन जिज्ञासू येतात त्यांना विचारले पाहिजे की तुम्ही इथे काय शिकता? याने कोणते स्टेट्स मिळते? त्या कॉलेजमध्ये शिकणारे तर सांगतात की, आम्ही डॉक्टर बनत आहोत, इंजिनिअर बनत आहोत… तर त्यांच्यावर विश्वास ठेवणार ना की हे बरोबर शिकत आहेत. इथे देखील स्टुडंट्स सांगतात की ही दुःखाची दुनिया आहे ज्याला नरक, हेल, अथवा डेव्हिल वर्ल्ड म्हणतात. त्याच्या विरुद्ध आहे हेवन अथवा डीटी वर्ल्ड, ज्याला स्वर्ग म्हणतात. हे तर सर्व जाणतात, समजू देखील शकतात की हा काही तो स्वर्ग नाहीये, हा नरक आहे अथवा दुःखाची दुनिया आहे, पाप आत्म्यांची दुनिया आहे तेव्हाच तर त्यांना बोलावतात की आम्हाला पुण्याच्या दुनियेमध्ये घेऊन चला. तर ही जी मुले शिकत आहेत ती जाणतात की आम्हाला बाबा त्या पुण्याच्या दुनियेमध्ये घेऊन जात आहेत. तर जे नवीन स्टुडंट्स येतात त्यांनी मुलांना विचारले पाहिजे, मुलांकडून शिकले पाहिजे. ते (दुनियावाले) आपल्या टिचरचे अथवा पित्याचे ऑक्युपेशन सांगू शकतात. बाबा थोडेच आपले कौतुक स्वतः करत बसतील, टिचर आपलीच महीमा स्वतःच ऐकवेल का! ते तर स्टुडंट्स ऐकवतील की हे टिचर असे आहेत, तेव्हाच तर म्हणतात - स्टुडंट्स शोज मास्टर. तुम्ही मुले जी इतका कोर्स शिकून आला आहात, तुमचे काम आहे नवीन लोकांना बसवून समजावून सांगणे. बाकी जे टिचर बी. ए., एम. ए. शिकवत आहेत ते नवीन स्टुडंट्सना ए.बी.सी.डी. शिकवत बसतील काय! काही-काही स्टुडंट्स चांगले हुशार असतात, ते दुसऱ्यांना देखील शिकवतात. त्यामध्ये माता गुरु तर प्रसिद्ध आहे. ही आहे डीटी धर्माची (देवता धर्माची) पहिली माता, जिला जगदंबा म्हणतात. मातेची खूप महिमा आहे. बंगालमध्ये काली, दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी या चार देवींची खूप पूजा करतात. आता त्या चौघींचे ऑक्युपेशन तर माहित असले पाहिजे. जशी लक्ष्मी आहे तर ती आहे - गॉडेज ऑफ वेल्थ. (धनाची देवता). ती तर इथेच राज्य करून गेली आहे. बाकी काली, दुर्गा इत्यादी ही तर सर्व हिलाच नावे दिली गेली आहेत. जर चार माता असतील तर त्यांचे चार पती देखील असले पाहिजेत. आता लक्ष्मीचा पती नारायण तर प्रसिद्ध आहे. कालीचा पती कोण आहे? (शंकर). परंतु शंकराला तर पार्वतीचा पती असल्याचे सांगतात. पार्वती काही काली नाहीये. असे अनेक आहेत जे कालीची पूजा करतात, मातेची आठवण करतात परंतु पित्याचा पत्ताच नाहीये. कालीचा एक तर पती असला पाहिजे किंवा पिता असला पाहिजे परंतु हे कुणालाच ठाऊक नाहीये.

तुम्ही सर्वांना समजावून सांगायचे आहे की, ही दुनिया एकच आहे, जी काही काळ दुःखाची दुनिया अथवा दोजक बनते तीच परत सतयुगामध्ये बहिश्त अथवा स्वर्ग बनते. लक्ष्मी-नारायण देखील याच सृष्टीवर सतयुगाच्या काळामध्ये राज्य करत होते. बाकी सूक्ष्ममध्ये तर काही वैकुंठ नाहीये जिथे सूक्ष्म लक्ष्मी-नारायण आहेत. त्यांची चित्रे इथेच आहेत तर जरूर इथेच राज्य करून गेले आहेत. सारा खेळ या कार्पोरियल वर्ल्डमध्ये (साकारी दुनियेमध्ये) चालतो. इतिहास-भूगोल या साकारी दुनियेचा आहे. सूक्ष्मवतनचा काही इतिहास-भूगोल असत नाही. परंतु सर्व गोष्टींना सोडून तुम्हाला नवीन जिज्ञासूंना आधी अल्फ (बाबा) शिकवायचे आहे नंतर मग बे (बादशाही) समजावून सांगायचे आहे. अल्फ आहेत गॉड, ते सुप्रीम सोल आहेत. जोपर्यंत हे पूर्णत: समजत नाही तोपर्यंत परमपित्याप्रति ते प्रेम जागृत होत नाही, तो आनंद होत नाही; कारण आधी जेव्हा बाबांना जाणतील तेव्हा त्यांच्या ऑक्युपेशनला देखील जाणून आनंदित होतील. तर आनंद आहे या पहिल्या गोष्टीला समजण्यामध्ये. गॉड तर एव्हर हॅपी आहेत, आनंद स्वरूप आहेत. त्यांची आपण मुले आहोत तर का नाही आनंद झाला पाहिजे! त्या गुदगुल्या का होत नाहीत. आय ॲम सन ऑफ गॉड (मी ईश्वराचा मुलगा आहे), आय ॲम एव्हर हॅपी मास्टर गॉड. तो आनंद होत नाही तर सिद्ध होते की स्वतःला सन (मुलगा) समजत नाहीत. गॉड इज एव्हर हॅपी बट आय एम नॉट हॅपी कारण फादरलाच जाणत नाही. गोष्ट तर सोपी आहे.

काहीजणांना हे ज्ञान ऐकण्याऐवजी शांती चांगली वाटते कारण असे बरेच आहेत जे ज्ञानाला धारण करू शकत नाहीत. इतका वेळ कुठे आहे. बस्स, या अल्फला जरी जाणून घेऊन मग सायलेन्समध्ये राहिले तर ते देखील चांगले आहे. जसे संन्यासी देखील पर्वतांच्या गुहांमध्ये जाऊन परमात्म्याच्या आठवणीमध्ये बसतात. तसे परमपिता परमात्म्याच्या, त्या सुप्रीम लाईटच्या आठवणीमध्ये राहिले तरी देखील चांगले आहे. त्यांच्या आठवणीने संन्यासी देखील निर्विकारी बनू शकतात. परंतु घरी बसून काही आठवण करू शकत नाहीत. तिथे तर मुला-बाळांमध्ये मोह जात राहील, म्हणून तर संन्यास घेतात. होली (पवित्र) बनतात तर त्यामध्ये सुख तर आहे ना. संन्यासी सर्वात चांगले आहेत. आदि देव देखील संन्यासी बनला आहे ना. हे समोर त्याचे (आदि देवाचे) मंदिर उभे आहे, जिथे तपस्या करत आहे. गीतेमध्ये देखील म्हणतात - ‘देहाच्या सर्व धर्मांचा संन्यास करा’. ते संन्यास करतात तर महात्मा बनतात. गृहस्थीला महात्मा म्हणणे बेकायदेशीर आहे. तुम्हाला तर परमात्म्याने येऊन संन्यास करविला आहे. संन्यास करतातच सुखासाठी. महात्मा कधी दुःखी होत नाहीत. राजा देखील संन्यास घेतात तर मुकुट इत्यादी फेकून देतात. जसे गोपीचंदने संन्यास घेतला, तर जरूर त्यामध्ये सुख आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कोणतेही उलटे काम लपून करायचे नाही. बापदादांपासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही. अतिशय सावध रहायचे आहे.

२) स्टुडंट शोज मास्टर, जे शिकला आहात ते इतरांना शिकवायचे आहे. एव्हर हॅपी गॉडची मुले आहोत, या स्मृतीने अपार आनंदामध्ये रहायचे आहे.

वरदान:-
विकार रुपी सापांना देखील शय्या बनविणारे विष्णू समान सदा विजयी, निश्चिंत भव विष्णूची जी शेष शय्या दाखवतात ती तुम्हा विजयी मुलांच्या सहजयोगी जीवनाचे यादगार आहे. सहजयोगाद्वारे विकार रुपी साप देखील अधीन होतात. जी मुले विकार रुपी सापांवर विजय प्राप्त करून त्यांना आरामदायी शय्या बनवतात ते सदा विष्णू समान हर्षित आणि निश्चिंत राहतात. तर नेहमी हे चित्र आपल्या समोर बघा की, मी विकारांना अधीन केलेला अधिकारी आहे. आत्मा सदैव आरामदायी स्थितीमध्ये निश्चिंत आहे.

बोधवाक्य:-
बालक सो मालकपणाच्या बॅलन्स द्वारे प्लॅनला प्रॅक्टिकलमध्ये आणा.

अव्यक्त इशारे:- आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. आपल्या प्रत्येक कर्मेंद्रियांच्या शक्तीला इशारा करा तर इशाऱ्यानेच जसे पाहिजे तसे चालवू शकाल. असे कर्मेंद्रियजित बना तेव्हा मग प्रकृतीजीत बनून कर्मातीत स्थितीचे आसनधारी सो विश्व राज्य अधिकारी बनाल. प्रत्येक कर्मेंद्रिय “जी हजूर”, “जी हाजिर” करत चालेल. तुम्हा राज्य अधिकाऱ्याचे सदैव स्वागत अर्थात सलाम करत राहील तेव्हाच कर्मातीत बनू शकाल.