24-04-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो - आता
परत घरी जायचे आहे, त्यामुळे आता देह-भानाला विसरून स्वतःला अशरीरी आत्मा समजा,
सर्वांमधून मोह काढून टाका”
प्रश्न:-
संगमयुगावर
तुम्ही मुले बाबांकडून कोणती कला शिकता?
उत्तर:-
तमोप्रधानापासून सतोप्रधान कसे बनावे, आपले भाग्य श्रेष्ठ कसे बनवावे, ही कला आताच
तुम्ही शिकता. जे जितके योगयुक्त आणि ज्ञानयुक्त बनतील, तितकी त्यांची उन्नती होत
राहते. उन्नती करणारी मुले कधीही लपून राहू शकत नाहीत. बाबा प्रत्येक मुलाच्या
वर्तनावरून समजतात की, कोणता मुलगा आपले श्रेष्ठ भाग्य बनवत आहे.
गीत:-
मरना तेरी गली
में…
ओम शांती।
सर्व मुलांनी हे गाणे ऐकले. ‘मुले’, म्हणताच सर्व सेंटरवरील मुले जाणतात की बाबा
आम्हा ब्राह्मणांना विचारत आहेत की, ‘मुलांनो, हे गाणे ऐकलेत - जिवंतपणी गळ्यातील
हार बनवण्याकरिता अर्थात मूलवतनमध्ये जाऊन बाबांच्या घरी राहण्याकरिता…’ ते
शिवबाबांचे घर आहे ना, ज्यामध्ये सर्व शाळिग्राम राहतात. मुले, ब्राह्मण कुलभूषण,
स्वदर्शन चक्रधारी जाणतात की, बरोबर तेच बाबा आलेले आहेत. बाबा म्हणतात - आता
तुम्हाला अशरीरी बनायचे आहे अर्थात देहाच्या भानाला विसरायचे आहे. ही जुनी दुनिया
तर नष्ट होईल. या शरीराला तर सोडायचे आहे अर्थात सर्वांना सोडायचे आहे कारण आता ही
जुनी दुनियाच नष्ट होणार आहे. तर आता परत घरी जायचे आहे. सर्व मुलांना आता आनंद होतो
कारण अर्धे कल्प घरी जाण्याकरिता खूप खस्ता खाल्ल्या आहेत. परंतु मार्ग सापडला नाही!
उलट भक्तिमार्गाचा दिखावा पाहून मनुष्य अजूनच अडकून पडतात. ही आहे भक्तीमार्गाची
दलदल; ज्यामध्ये मनुष्य मात्र गळ्यापर्यंत रुतले आहेत. आता मुले म्हणतात - बाबा,
आम्ही जुनी दुनिया, जुन्या शरीराला विसरून जातो. आता तुमच्या सोबत अशरीरी बनून घरी
येणार. सर्वांच्या बुद्धीमध्ये आहे - परमपिता परमात्मा आपल्याला घेऊन जाण्याकरिता
परमधामहून आले आहेत. फक्त एवढेच सांगतात की, ‘तुम्ही पवित्र बनून माझी आठवण करा’.
जिवंतपणी मरायचे आहे. तुम्ही जाणता तिथे घरी (परमधाममध्ये) आत्मे राहतात. ती आत्मा
देखील बिंदूच तर आहे. सर्व आत्मे निराकारी दुनियेमध्ये निघून जातील, जितके मनुष्य
आहेत तितकेच आत्मे तिथे असतील. आत्मे त्या मह-तत्वामधील कितीशी जागा घेतात. शरीर तर
इतके मोठे आहे, किती जागा व्यापते? बाकी आत्म्याला कितीशी जागा पाहिजे! आपण आत्मे
किती थोडीशी जागा घेतो? खूपच थोडी. मुलांना या सर्व गोष्टी बाबांकडून ऐकण्याचे
सौभाग्य आता मिळते. बाबाच सांगतात की तुम्ही अशरीरी नंगे (बिना शरीराचे) आला होता,
मग शरीर धारण करून पार्ट बजावलात, आता पुन्हा जिवंतपणी मरायचे आहे, सर्वांना
विसरायचे आहे. बाबा येऊन मरायला शिकवतात. म्हणतात आपल्या बाबांची आणि आपल्या घराची
आठवण करा. भरपूर पुरुषार्थ करा. योगामध्ये राहिल्यानेच पापे नष्ट होतील. मग आत्मा
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनेल. म्हणून बाबा सल्ला देतात - कल्पापूर्वी देखील
सांगितले होते की, ‘देहाची सर्व नाती सोडून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. सर्वांचा
एक पिता तर तेच आहेत ना. तुम्ही प्रजापिता ब्रह्माची मुख वंशावळी मुले आहात, जी
ज्ञान प्राप्त करत राहतात. शिवबाबांची मुले तर आहातच. हा तर सर्वांना निश्चय आहे
की, आपण भगवंताची मुले आहोत. परंतु त्यांचे नाव, रूप, देश, काळ हे सर्व विसरल्यामुळे
भगवंतावर कोणाचेच प्रेम राहत नाही. तरीही कोणाला दोषही देत नाहीत. हे देखील
ड्रामामध्ये नोंदलेले आहे.
बाबा समजावून सांगत
आहेत की, तुम्ही आत्मा किती छोटी बिंदू आहात, त्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट नोंदलेला
आहे. केवढे आश्चर्य आहे. आत्मा कशी शरीर धारण करून पार्ट बजावते. आता तुम्हाला
बेहदच्या पार्ट विषयी माहित झाले आहे. हे ज्ञान इतर कोणालाच नाही आहे. तुम्ही देखील
देह-अभिमानी होता. आता किती परिवर्तित झाले आहात. ते देखील प्रत्येकाच्या भाग्यावर
आहे. कल्पापूर्वीच्या भाग्याचा आता साक्षात्कार होत आहे. दुनियेमध्ये किती असंख्य
मनुष्य आहेत, प्रत्येकाचे आपले भाग्य आहे. जसे-जसे ज्याने कर्म केले आहे त्यानुसार
दुःखी, सुखी, श्रीमंत, गरीब बनतात. बनते आत्माच आहे. आत्मा कशी सुखामध्ये येते, मग
दुःखामध्ये येते, हे बाबा बसून समजावून सांगतात. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनण्याची
कला कल्पा पूर्वीप्रमाणे बाबाच शिकवतात. ज्याने जितकी कला अवगत केली असेल तितकीच आता
देखील प्राप्त करत आहे. शेवटपर्यंत प्रत्येकाच्या भाग्याला समजत जाल. मग म्हणाल
कल्प-कल्प असेच प्रत्येकाचे भाग्य असेल. जो चांगला योगयुक्त, ज्ञानयुक्त असेल तो
सेवा देखील करत राहील. शिक्षणामध्ये नेहमी उन्नती होत राहते. काही मुले खूप लवकर
प्रगती करतात, तर कोणी खूप संघर्ष करतात. इथे देखील असेच आहे. कल्पापूर्वी प्रमाणे
जे-जे आपली उन्नती करतात, ते लपून राहू शकत नाहीत. बाबा तर जाणतात ना - सर्वांचे
कनेक्शन शिवबाबांशीच आहे. हे (ब्रह्मा बाबा) देखील मुलांची अवस्था पाहून समजून
जातात, तर ते (शिवबाबा) देखील बघतात. यांच्यापासून (ब्रह्मा बाबांपासून) भले कोणी
लपवेल परंतु शिवबाबांपासून तर कोणी लपवू शकणार नाहीत. भक्तिमार्गामध्येच
ईश्वरापासून काही लपवू शकत नाहीत तर ज्ञानमार्गामध्ये कसे लपवू शकतील. बाबा समजावून
सांगत राहतात, शिक्षण तर खूप सोपे आहे. कर्म देखील करायचे आहे. राहायचे देखील
मित्र-नातेवाइकांसोबत जुन्या दुनियेमध्येच आहे. तिथे राहून मेहनत करायची आहे. इथे (बाबांच्या
घरी) राहून पुरुषार्थ करणाऱ्यांपेक्षा तिथे आपल्या घरी राहून पुरुषार्थ करणारे
हुशार बनू शकतात. जर अशी लगन (ओढ) असेल तर. शास्त्रांमध्ये अर्जुन आणि भिल्लाचे (एकलव्याचे)
उदाहरण आहे ना. भले एकलव्य बाहेर राहणारा होता परंतु तो तीर चालवण्यामध्ये अभ्यासाने
अर्जुना पेक्षाही जास्त हुशार झाला. तर गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमल पुष्प समान
राहायचे आहे. इथे देखील तुम्ही अशी उदाहरणे पाहाल. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून खूप
चांगली सेवा करू शकता. ते जास्त प्रगती करत राहतील. इथे राहणाऱ्यांना देखील माया
सोडत नाही. असे नाही की बाबांकडे आल्याने माये पासून सुटतात. नाही, प्रत्येकाचा
आपापला पुरुषार्थ आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहणारे इथे राहणाऱ्यांपेक्षा चांगला
पुरुषार्थ करु शकतात. खूप चांगली बहादुरी दाखवू शकतात; महावीर त्यांनाच म्हटले जाते,
जे गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान बनून दाखवतात. म्हणतात की ‘बाबा,
तुम्हीच तर आम्हाला सोडवले आहे’. बाबा म्हणतात - ‘मी कुठे सोडले आहे, मलाच सोडून
गेले आहेत’. बाबा काही कोणालाच सोडून आलेले नाहीत. बाबांच्या घरी अजून जास्तच मुले
आली आहेत. बाकी कन्यांसाठी तर बाबा म्हणतात की, तुम्ही ही ईश्वरीय सेवा करा. हे
देखील पिता आहेत, ते देखील पिता आहेत. कुमार देखील खूप आले, परंतु चालू शकत नाहीत.
कन्या तरी देखील चांगल्या आहेत. कन्या १०० ब्राह्मणांपेक्षा उत्तम समजल्या जातात.
तर कन्या ती जी २१ कुळांचा उद्धार करेल, ज्ञानाचे बाण मारेल. बाकी जे गृहस्थ
व्यवहारामध्ये राहतात ते देखील बी.के. झाले. पुढे चालून त्यांचे देखील बंधन नष्ट
होईल. सेवा तर करायची आहे ना. अशी बरीच सेवा करणारी मुले बापदादांच्या हृदयामध्ये
स्थान मिळवलेली आहेत, जी अनेकांचे कल्याण करत आहेत. तर अशा सेवाभावी मुलांना
आशीर्वाद देखील मिळत राहतात. ते हृदयामध्ये स्थान प्राप्त करतील. जे हृदयामध्ये
आहेत तेच तख्तावर बसतील. बाबा म्हणतात - सर्वांना मार्ग दाखविण्यासाठी आपसामध्ये
मिळून युक्त्या शोधून काढत रहा. चित्र देखील बनत राहतात. या सर्व प्रॅक्टिकल गोष्टी
आहेत.
आता तुम्ही समजता की
परमपिता परमात्मा निराकार आहेत, ते देखील बिंदू आहेत. परंतु ते नॉलेजफुल, पतित-पावन
आहेत. आत्मा देखील बिंदू आहे. मूल तरीही लहान असते. वडील आणि मुलामध्ये फरक तर असतो
ना. आजकाल तर १५-१६ वर्षाची मुले देखील बाप बनतात. तरी देखील त्याचे मूल त्याच्या
पेक्षा लहानच झाले ना. इथे आश्चर्य तर बघा - पिता देखील आत्मा,
आणि त्यांची संतान
देखील आत्मा. ते आहेत सुप्रीम आत्मा, नॉलेजफुल. बाकी सर्वजण आपल्या अभ्यासानुसार
नीच अथवा उच्च पद प्राप्त करतात. सर्व काही अभ्यासावर अवलंबून आहे. चांगले कर्म
केल्याने उच्च पद प्राप्त करतात. आता तुम्हा मुलांना सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे
ज्ञान आहे. स्वर्गामध्ये केवळ भारतच होता दुसरा कोणताच खंड नव्हता. तर लहान न्यू
इंडियामध्ये आपला स्वर्ग दाखवावा. जसे द्वारका नाव नको, तर लक्ष्मी-नारायणाच्या
घराण्याचे राज्य असे लिहिले पाहिजे. बुद्धी देखील म्हणते सतयुगामध्ये सर्वप्रथम डीटी
डिनायस्टीचे (दैवी घराण्याचे) राज्य असेल. त्यांची गावे असतील, छोटे-छोटे प्रदेश
असतील. यावर देखील विचार सागर मंथन करायचे आहे. त्याच सोबत शिवबाबांशी बुद्धीचा योग
सुद्धा लावायचा आहे. आपण आठवणी द्वारेच बादशाही घेतो. आठवणी द्वारेच गंज उतरणार आहे,
यामध्येच सगळी मेहनत आहे. कितीतरी जणांची बुद्धी बाहेर भटकत राहते, इथे बसलेले
असताना देखील सगळा वेळ आठवणीमध्ये राहू शकत नाहीत, बुद्धी दुसरीकडेच निघून जाईल.
भक्तीमार्गामध्ये देखील असेच होते. श्रीकृष्णाची भक्ती करता-करता बुद्धी दुसरीकडेच
जाते. नवधा भक्ती करणारे साक्षात्कार व्हावा यासाठी खूप मेहनत करतात. तासंतास बसून
राहतात की श्रीकृष्णाशिवाय दुसऱ्या कोणाचीच आठवण येऊ नये, खूप मेहनत आहे. यामध्ये ८
ची आणि मग १६,१०८ ची माळा असते. ते तर लाखोंची देखील माळा दाखवतात. परंतु ज्ञान
मार्गाची माळा खूप मौल्यवान आहे. भक्तीमार्गाची स्वस्त आहे कारण यामध्ये रुहानी
मेहनत आहे. श्रीकृष्णाला पाहून आनंदित होऊन डान्स करतात. भक्ती आणि ज्ञानामध्ये
रात्रं-दिवसाचा फरक आहे, तुम्हाला असे सांगितले जात नाही की, श्रीकृष्णाची आठवण
केल्याने गंज निघेल. इथे तर सांगितले जाते की, जितकी बाबांची आठवण कराल तितकी पापे
भस्म होतील.
तुम्ही मुले आता
योगबलाने विश्वाचे मालक बनता. असा तर कोणाला स्वप्नातही विचार आला नसेल.
लक्ष्मी-नारायणाने काही युद्ध इत्यादी केलेले नाही आहे. मग विश्वाचे मालक कसे बनले?
हे तर तुम्ही मुलेच जाणता. बाबा म्हणतात - योगबलाने तुम्हाला राजाई मिळेल. परंतु
भाग्यामध्ये नसेल तर पुरुषार्थ देखील करत नाहीत. सेवाभावी बनत नाहीत. बाबा तर
डायरेक्शन देत राहतात की अशा प्रकारे प्रदर्शनी करा. एका दिवसामध्ये कमीत-कमी
१५०-२०० प्रदर्शनी झाल्या पाहिजेत. गावा-गावामध्ये फेऱ्या मारा. जितकी सेंटर्स,
तितक्या प्रदर्शनी. प्रत्येक सेंटरवर प्रदर्शनी झाल्याने समजावून सांगण्यासाठी सोपे
होईल. सेंटर्स देखील दिवसें-दिवस मोठी होत जातील, जेणेकरून चित्रे इत्यादी ठेवू
शकाल. चित्रांचे नवनवीन शोधही लागत राहतात. वैकुंठामध्ये अतिशय सुंदर महाल इत्यादी
असलेले भारताचे चित्र बनविले पाहिजे. पुढे चालून समजावून सांगण्याकरिता
चांगली-चांगली चित्रे निघत राहतील. वानप्रस्थ अवस्था असणाऱ्यांनी तर फिरता-फिरता
सुद्धा सेवा करत राहावी, ज्यांचे भाग्य उदयास येईल ते निघतील. काही मुले कुकर्म
करून आपलीच अब्रू घालवतात, तर मग यज्ञाचीच अब्रू घालवतात. जसे वर्तन तसे पद. जे
अनेकांना सुख देतात, त्यांचे तर नाव गायले जाते ना. अजून काही सर्व गुणांमध्ये
संपन्न तर बनलेले नाही आहात ना. काहीजण खूप चांगली सेवा करत आहेत. अशा मुलांची नावे
ऐकून बाबा खुश होतात. सेवाभावी मुलांना पाहून बाबा खुश होतील ना. सेवेमध्ये खूप
चांगली मेहनत करत असतात. सेंटर देखील उघडत राहतात, ज्यामुळे हजारोंचे कल्याण होणार
आहे. त्यांच्या माध्यमातून मग अजून भरपूर जण निघत जातील. संपूर्ण तर कोणी बनलेले
नाहीत. काही ना काही चुका देखील होतात. माया सोडत नाही. जितकी सेवा करून आपली उन्नती
कराल तितकेच बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवतील. तितकेच उच्च पद प्राप्त करतील. मग
कल्प-कल्प असेच पद असेल. शिवबाबांपासून तर कोणीही लपवू शकत नाही. अखेरीला
प्रत्येकाला आपल्या कर्मांचा साक्षात्कार तर होतोच. तेव्हा मग काय करू शकणार! ढसाढसा
रडावे लागेल म्हणून बाबा समजावून सांगत राहतात की असे कोणतेही कर्म करू नका ज्यामुळे
अखेरीला सजेचे भागीदार बनावे लागेल, पश्चाताप करावा लागेल. परंतु कितीही समजावून
सांगा भाग्यामध्ये नसेल तर पुरुषार्थच करत नाहीत. आजकालचे मनुष्य तर बाबांना जाणतच
नाहीत. भगवंताला आठवण करतात परंतु जाणत नाहीत. त्यांचे म्हणणे मानत नाहीत. आता त्या
बेहदच्या बाबांकडून तुम्हाला सतयुगी स्वराज्याचा वारसा सेकंदामध्ये मिळतो.
शिवबाबांचे नाव तर सर्वांना आवडते ना. मुले जाणतात की त्या बेहदच्या पित्याकडून
स्वर्गाचा वारसा मिळत आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपल्या
वर्तनाद्वारे बाबांचे किंवा यज्ञाचे नाव प्रसिद्ध करायचे आहे, असे कोणतेही कर्म करू
नये ज्यामुळे बाबांची इज्जत जाईल. सेवेद्वारे आपले भाग्य आपणच बनवायचे आहे.
२) बाप समान
कल्याणकारी बनून सर्वांचे आशीर्वाद घेऊन पुढचा नंबर घ्यायचा आहे. गृहस्थ
व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान राहण्याची चांगली बहादुरी दाखवायची आहे.
वरदान:-
सतोप्रधान
स्थितीमध्ये स्थित राहून सदैव सुख-शांतीची अनुभूती करणारे डबल अहिंसक भव
नेहमी आपल्या
सतोप्रधान संस्कारांमध्ये स्थित राहून सुख-शांतीची अनुभूती करणे - हीच खरी अहिंसा
आहे. हिंसा अर्थात ज्यामुळे दुःख-अशांती निर्माण करते. तर चेक करा की, १) पूर्ण
दिवसभरामध्ये आपण कोणत्याही प्रकारची हिंसा तर करत नाही ना! जर एखाद्या शब्दाने जरी
कोणाच्या स्थितीला डगमग करता तर ही देखील हिंसा आहे. २) जर आपल्या सतोप्रधान
संस्कारांना दाबून ठेवून दुसऱ्याच संस्कारांना प्रॅक्टिकलमध्ये आणत असाल तर ही
देखील हिंसा आहे म्हणून महीनतेमध्ये (सूक्ष्ममध्ये) जाऊन महान आत्म्याच्या स्मृती
द्वारे डबल अहिंसक बना.
बोधवाक्य:-
सत्या सोबत
असत्य मिक्स होताच आनंदच नाहीसा होतो.
हे अव्यक्त इशारे -
महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.
तुमचा प्रत्येक शब्द
अलौकिक असावा, फरिश्त्यासमान असावा. प्रत्येक शब्द मधुर असावा. आता या गोष्टीवर
अंडरलाईन करा तेव्हाच प्रत्यक्षता होईल कारण आजूनपर्यंत वाणीची शक्ती व्यर्थ जात आहे,
त्यामुळे वाणीमध्ये बाबांना प्रत्यक्ष करण्याचे जौहर अथवा शक्ती असायला हवी ती कमी
आहे; वाचेला व्यर्थ पासून वाचवा तेव्हाच बाबांना प्रत्यक्ष करण्याचा आवाज बुलंद
होईल.