24-10-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“
गोड मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हाला घराचा रस्ता सांगण्यासाठी, तुम्ही
आत्म-अभिमानी होऊन रहा तर हा मार्ग सहजच दिसून येईल”
प्रश्न:-
संगमावर कोणते
असे नॉलेज मिळाले आहे ज्यामुळे सतयुगी देवतांना मोहजीत म्हटले गेले आहे?
उत्तर:-
संगमावर तुम्हाला बाबांनी अमरकथा ऐकवून अमर आत्म्याचे नॉलेज दिले. ज्ञान मिळाले की,
हा अविनाशी पूर्वनियोजित ड्रामा आहे, प्रत्येक आत्मा आपापला पार्ट बजावते. ती एक
शरीर सोडून दुसरे घेते, यासाठी रडण्याची गरज नाही. याच नॉलेजमुळे सतयुगी देवतांना
मोहजीत म्हटले जाते. तिथे मृत्यूचे नावही नाही. आनंदाने जुने शरीर सोडून नवीन घेतात.
गीत:-
नयन हीन को
राह दिखाओ…
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा म्हणतात की रस्ता तर दाखवतो परंतु आधी
स्वतःला आत्मा निश्चय करून बसा. देही-अभिमानी होऊन बसा तर मग तुम्हाला रस्ता खूप
सहजच दिसून येईल. भक्ती मार्गामध्ये अर्धा कल्प ठोकरा खाल्ल्या आहेत. भक्तिमार्गाची
अथाह सामुग्री आहे. आता बाबांनी समजावून सांगितले आहे. बेहदचे पिता एकच आहेत. बाबा
म्हणतात - तुम्हाला रस्ता सांगत आहे. दुनियेला हे देखील माहित नाहीये की कोणता रस्ता
सांगतात! मुक्ती-जीवनमुक्ती, गती-सद्गतीचा. मुक्ती म्हटले जाते शांतीधामला. आत्मा
शरीराविना काहीही बोलू शकत नाही. कर्मेंद्रियांद्वारेच आवाज होतो, मुखाने आवाज होतो.
मुख नसेल तर आवाज कुठून येईल. आत्म्याला ही कर्मेंद्रिये मिळाली आहेत कर्म
करण्याकरिता. रावणराज्यामध्ये तुम्ही विकर्म करता. ही विकर्मच छी-छी कर्म (नीच
कृत्य) होतात. सतयुगामध्ये रावणच नसतो तर कर्म अकर्म होतात. तिथे ५ विकार असत नाहीत.
त्याला म्हटले जाते - स्वर्ग. भारतवासी स्वर्गवासी होते, आता मग म्हणणार - नरकवासी.
विषय वैतरणी नदी मध्ये गटांगळ्या खात राहतात. सर्वजण एकमेकांना दुःख देत राहतात. आता
म्हणतात - बाबा अशा ठिकाणी घेऊन जा जिथे दुःखाचे नावही नसेल. तो तर भारत जेव्हा
स्वर्ग होता तेव्हा दुःखाचे नावच नव्हते. स्वर्गातून नरकामध्ये आलो आहोत, आता पुन्हा
स्वर्गामध्ये जायचे आहे. हा खेळ आहे. बाबाच मुलांना बसून समजावून सांगतात. खराखुरा
सत्संग हा आहे. तुम्ही इथे सत्य पित्याची आठवण करता तेच उच्च ते उच्च ईश्वर आहेत.
ते आहेत रचता, त्यांच्याकडून वारसा मिळतो. बाबाच मुलांना वारसा देतील. हद चे पिता
असूनही मग आठवण करतात - ‘हे भगवान, हे परमपिता परमात्मा दया करा’. भक्तीमार्गामध्ये
धक्के खाऊन-खाऊन हैराण झाले आहेत. म्हणतात - ‘ओ बाबा, आम्हाला सुख-शांतीचा वारसा
द्या’. तो तर बाबाच देऊ शकतात, तो देखील २१ जन्मांसाठी. हिशोब करायला हवा.
सतयुगामध्ये जेव्हा यांचे राज्य होते तर जरूर थोडे मनुष्य असतील. एक धर्म होता, एकच
राजाई होती. त्याला म्हटले जाते स्वर्ग, सुखधाम. नव्या दुनियेला म्हटले जाते -
सतोप्रधान, जुन्या दुनियेला तमोप्रधान म्हणतात. प्रत्येक गोष्ट आधी सतोप्रधान मग
सतो-रजो-तमो मध्ये येते. छोट्या मुलाला सतोप्रधान म्हणतात. छोट्या मुलाला
महात्म्यापेक्षाही श्रेष्ठ म्हटले जाते. महात्मे तर जन्म घेऊन मग मोठे होऊन
विकारांचा अनुभव करून घरदार सोडून पळून जातात. लहान मुलांना तर विकाराविषयी माहीतच
नाही आहे. एकदम इनोसंट (निष्कपट) आहेत म्हणून महात्म्यापेक्षाही श्रेष्ठ म्हटले जाते.
देवतांची महिमा गातात - सर्वगुण संपन्न… साधूंची कधी अशी महिमा करणार नाहीत. बाबांनी
हिंसा आणि अहिंसेचा अर्थ समजावून सांगितला आहे. कोणालाही मारणे याला हिंसा म्हटले
जाते. सर्वात मोठी हिंसा आहे काम कटारी चालविणे. देवता काही हिंसक नसतात. काम कटारी
चालवत नाहीत. बाबा म्हणतात - आता मी आलो आहे तुम्हाला मनुष्यापासून देवता
बनविण्यासाठी. देवता असतात सतयुगामध्ये. इथे कोणीही स्वतःला देवता म्हणू शकत नाही.
समजतात आपण नीच, पापी, विकारी आहोत. मग स्वतःला देवता कसे म्हणतील म्हणून हिंदू
धर्म म्हटला गेला आहे. वास्तविक आदि सनातन देवी-देवता धर्म होता. ‘हिंदू’ शब्द
‘हिंदुस्तान’ मधून काढला आहे. त्यांनी मग हिंदू धर्म म्हटले आहे. तुम्ही म्हणाल -
आम्ही देवता धर्माचे आहोत तरीही हिंदूच्या कॉलममध्येच टाकतील. म्हणतील आमच्याकडे
कॉलमच हिंदू धर्माचा आहे. पतित झाल्याकारणाने स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत.
आता तुम्ही जाणता -
आम्ही पूज्य देवता होतो, आता पुजारी बनलो आहोत. पूजा देखील पहिली फक्त शिवाचीच
करतात नंतर मग व्यभिचारी पुजारी बनले. बाबा एकच आहेत त्यांच्याकडून वारसा मिळतो.
बाकी तर अनेक प्रकारच्या देवी इत्यादी आहेत. त्यांच्याकडून काही वारसा मिळत नाही.
या ब्रह्माकडूनही तुम्हाला वारसा मिळत नाही. एक आहेत निराकारी पिता, दुसरे आहेत
साकारी पिता. साकारी पिता असूनही ‘हे भगवान’, ‘हे परम-पिता’ असे म्हणत राहतात.
लौकिक पित्याला असे म्हणणार नाहीत. तर वारसा पित्याकडून मिळतो. पती आणि पत्नी हाफ
पार्टनर असतात तर त्यांना अर्धा हिस्सा मिळाला पाहिजे. आधी अर्धा हिस्सा पत्नीचा
काढून मग उर्वरित अर्धा मुलांना दिला पाहिजे. परंतु आजकाल तर मुलांनाच सर्व धन देऊन
टाकतात. काहीजणांचा मोह खूप असतो, समजतात आम्ही मेल्यावर मूलांचाच हक्क असेल.
आजकालची मुले तर वडील गेल्या नंतर आईला विचारत देखील नाहीत. कोणी मातृ-स्नेही असतात,
कोणी मग मातृ-द्रोही असतात. आजकाल जास्त करून मातृ-द्रोही असतात. सगळे पैसे उडवून
टाकतात. काही-काही धर्माची मुले (दत्तक मुले) देखील अशी निघतात जी खूप त्रास देतात.
आता मुलांनी गाणे ऐकले, म्हणतात बाबा आम्हाला सुखाचा रस्ता सांगा - जिथे चैन (शांती)
असेल. रावण राज्यामध्ये तर सुख असू शकत नाही. भक्तीमार्गामध्ये तर एवढे सुद्धा समजत
नाहीत की शिव वेगळा आहे, शंकर वेगळा आहे. बस डोके टेकवत रहा, शास्त्रे वाचत रहा.
अच्छा, याच्याने काय मिळेल, काहीच माहित नाही. सर्वांसाठी शांती आणि सुखाचा दाता तर
एक बाबाच आहेत. सतयुगामध्ये सुखही आहे तर शांती देखील आहे. भारतामध्ये सुख-शांती
होती, आता नाही आहे म्हणून भक्ती करत दारोदार भटकत राहतात. आता तुम्ही जाणता
शांतीधाम, सुखधाम मध्ये घेऊन जाणारे एक बाबाच आहेत. बाबा आम्ही फक्त तुमचीच आठवण करू,
तुमच्याकडूनच वारसा घेऊ. बाबा म्हणतात - देहासहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून
जायचे आहे. एका बाबांची आठवण करायची आहे. आत्म्याला इथेच पवित्र बनायचे आहे. आठवण
केली नाहीत तर मग शिक्षा भोगाव्या लागतील. पद देखील भ्रष्ट होईल म्हणून बाबा
म्हणतात - आठवणीची मेहनत करा. आत्म्यांना समजावून सांगतात. इतर कोणताही सत्संग
इत्यादी असा नसेल जिथे असे म्हणतील की, ‘माझ्या रूहानी बाळांनो’. हे आहे रूहानी
ज्ञान, जे रुहानी बाबांकडूनच मुलांना मिळते. रूह अर्थात निराकार. शिव देखील निराकार
आहेत ना. तुमची आत्मा देखील बिंदू आहे, अति सूक्ष्म आहे. तिला कोणीही दिव्य दृष्टी
शिवाय पाहू शकत नाही. दिव्य दृष्टी बाबाच देतात. भक्त बसून हनुमान, गणेश इत्यादींची
पूजा करतात आता त्यांचा साक्षात्कार कसा होईल. बाबा म्हणतात - दिव्य दृष्टी दाता तर
मीच आहे. जे खूप भक्ती करतात तर मग मीच त्यांना साक्षात्कार घडवतो परंतु याने फायदा
तर काहीच नाही, फक्त खुश होतात. पाप तर तरी देखील करतात, मिळत काहीच नाही.
शिक्षणाशिवाय तुम्ही कोणी बनू थोडेच शकणार. देवता सर्वगुणसंपन्न आहेत. तुम्ही देखील
असे बना ना. बाकी तर तो आहे सर्व भक्तीमार्गाचा साक्षात्कार. खरोखरचे
श्रीकृष्णाकडून झोके घ्या, स्वर्गामध्ये त्याच्यासोबत राहा. ते तर अभ्यासावर आहे.
जितके श्रीमतावर चालाल तितके उच्च पद प्राप्त कराल. श्रीमत भगवंताचे गायले गेले आहे.
श्रीकृष्णाचे श्रीमत म्हणणार नाही. परमपिता परमात्म्याच्या श्रीमताद्वारे
श्रीकृष्णाच्या आत्म्याने हे पद प्राप्त केले आहे. तुमची आत्मा देखील देवता
धर्मामध्ये होती अर्थात श्रीकृष्णाच्या घराण्यामध्ये होती. भारतवासीयांना हे ठाऊक
नाही आहे की, राधे-कृष्णाचे आपसामध्ये काय नाते होते. दोघेही वेगवेगळ्या राज्यातील
होते. मग स्वयंवरानंतर लक्ष्मी-नारायण बनतात. या सर्व गोष्टी बाबाच येऊन समजावून
सांगतात. आता तुम्ही शिकताच मुळी स्वर्गाचे प्रिन्स-प्रिन्सेस बनण्याकरिता.
प्रिन्स-प्रिन्सेसचे जेव्हा स्वयंवर होते तेव्हा मग नाव बदलते. तर बाबा मुलांना असे
देवता बनवतात; जर बाबांच्या श्रीमतावर चालाल तर. तुम्ही आहात मुख-वंशावळी, ते आहेत
कुख-वंशावळी. ते ब्राह्मण लोक हथियाला (रक्षा सूत्र) बांधतात काम चितेवर
बसविण्याकरिता. आता तुम्ही खऱ्या-खऱ्या ब्राह्मणी काम चितेवरून उतरवून ज्ञान चितेवर
बसविण्यासाठी हथियाला (रक्षा सूत्र) बांधता. तर ते जुने सोडावे लागेल. इथली मुले तर
भांडण-तंटा करून पैसा देखील सर्व बरबाद करतात. आज-काल दुनियेमध्ये खूप घाण आहे.
सर्वात घाणेरडा आजार आहे चित्रपट. चांगली मुले देखील चित्रपट पाहिल्यामुळे बिघडतात.
म्हणून बी. कें. ना चित्रपटाला जाण्यास मनाई आहे. हां, जे मजबूत आहेत, त्यांना बाबा
म्हणतात तिथेही तुम्ही सेवा करा. त्यांना समजावून सांगा की, हा तर आहे हदचा चित्रपट.
एक बेहदचा चित्रपट सुद्धा आहे. बेहदच्या चित्रपटातूनच मग हे हदचे खोटे चित्रपट
निघाले आहेत.
आता तुम्हा मुलांना
बाबांनी समजावून सांगितले आहे - मूलवतन जिथे सर्व आत्मे राहतात मग मध्यभागी आहे
सूक्ष्मवतन. हे आहे - साकारवतन. खेळ सर्व इथे चालतो. हे चक्र फिरतच राहते. तुम्हा
ब्राह्मण मुलांनाच स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. देवतांना नाही. परंतु ब्राह्मणांना
हे अलंकार देत नाहीत कारण पुरुषार्थी आहेत. आज चांगले चालत असतात, उद्या कोसळतात
म्हणून हे अलंकार देवतांना देतात. श्रीकृष्णासाठी दाखवतात स्वदर्शन चक्राने
अकासुर-बकासुर इत्यादींना मारले. आता त्यांना तर अहिंसा परमोधर्म म्हटले जाते मग
हिंसा कशी करतील! ही सर्व आहे भक्तीमार्गाची सामग्री. जिथे जाल शिवाचेच लिंग असेल.
फक्त नावे किती वेगवेगळी ठेवली आहेत. मातीच्या देवी कित्ती बनवतात. शृंगार करतात,
हजारो रुपये खर्च करतात. उत्पत्तीची मग पूजा करतील, पालना करून मग जाऊन बुडवतात (पूजाअर्चा
करून मग विसर्जित करतात). बाहुल्यांच्या पूजेसाठी किती खर्च करतात. मिळाले तर काहीच
नाही. बाबा म्हणतात ही सर्व पैसे बरबाद करणारी भक्ती आहे, शिडी उतरतच आले आहेत. बाबा
येतात तेव्हा मग सर्वांची चढती कला होते. सर्वांना शांतीधाम-सुखधाममध्ये घेऊन जातात.
पैसे बरबाद करण्याचा प्रश्नच नाही. मग भक्ती मार्गामध्ये तुम्ही पैसे बरबाद
करता-करता इनसॉल्व्हंट (पतित) बनला आहात. सॉल्व्हंट आणि इनसॉल्व्हंट (पवित्र आणि
पतित) बनण्याची कथा बाबा बसून समजावून सांगतात. तुम्ही या लक्ष्मी-नारायणाच्या
डिनायस्टीचे (घराण्याचे) होता ना. आता तुम्हाला नरापासून नारायण बनण्याची शिकवण बाबा
देत आहेत. ते लोक तिजरीची कथा, अमर कथा ऐकवतात. आहे सर्व खोटी. तिजरीची कथा तर ही
आहे, ज्याद्वारे आत्म्याचा ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडतो. संपूर्ण चक्र बुद्धीमध्ये
येते. तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळत आहे, अमर कथा देखील ऐकत आहात. अमर बाबा
तुम्हाला कथा ऐकवत आहेत - अमरपुरीचा मालक बनवतात. तिथे तुम्हाला कधीही मृत्यूचा
सामना करावा लागत नाही. इथे तर लोकांना काळाची (मृत्यूची) किती भीती वाटते. तिथे
घाबरण्याची, रडण्याची गरज नाही. आनंदाने जुने शरीर सोडून नवीन घेतात. इथे माणसे किती
रडतात. ही आहेच रडण्याची दुनिया. बाबा म्हणतात - हा तर पूर्वनियोजित ड्रामा आहे.
प्रत्येकजण आपापला पार्ट बजावत असतात. हे देवता मोहजीत आहेत ना. इथे तर दुनियेमध्ये
अनेक गुरु आहेत ज्यांची अनेक मते मिळतात. प्रत्येकाचे मत आपले आहे. एक संतोषी देवी
देखील आहे जिची पूजा होते. आता संतोषी देवी तर सतयुगामध्ये असू शकतात, इथे कशा असू
शकतील. सतयुगामध्ये देवता सदैव संतुष्ट असतात. इथे तर काही ना काही आशा असते. तिथे
कोणतीही आशा असत नाही. बाबा सर्वांना संतुष्ट करतात. तुम्ही पद्मपती बनता. कोणतीही
अप्राप्त वस्तू राहत नाही ज्याच्या प्राप्तीची चिंता वाटेल. तिथे चिंता असत नाही.
बाबा म्हणतात - सर्वांचा सद्गती दाता तर मीच आहे. तुम्हा मुलांना २१ जन्मांसाठी
आनंदच आनंद देतात. अशा बाबांची आठवण देखील केली पाहिजे. आठवणीनेच तुमची पापे भस्म
होतील आणि तुम्ही सतोप्रधान बनाल. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. जितके इतरांना
जास्तीत-जास्त समजावून सांगाल तितकी प्रजा बनत जाईल आणि उच्च पद प्राप्त कराल. ही
काही साधू इत्यादीची कथा नाही आहे. स्वयं भगवान बसून यांच्या (ब्रह्मा बाबांच्या)
मुखाद्वारे समजावून सांगतात. आता तुम्ही संतुष्ट देवी-देवता बनत आहात. आता तुम्हाला
सदैव पवित्र राहण्याचे व्रत देखील ठेवले पाहिजे, कारण पावन दुनियेमध्ये जायचे आहे
तर पतित बनायचे नाहीये. बाबांनी हे व्रत शिकवले आहे. लोकांनी मग अनेक प्रकारची व्रते
बनवली आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) एका
बाबांच्या मतावर चालून सदैव संतुष्ट राहून संतोषी देवी बनायचे आहे. इथे कोणतीही आशा
ठेवायची नाही. बाबांकडून सर्व प्राप्ती करून पद्मपती बनायचे आहे.
२) सर्वात गलिच्छ
बनविणारा चित्रपट आहे. तुम्हाला चित्रपट बघण्याची मनाई आहे. तुम्ही बहाद्दूर असाल
तर हद आणि बेहदच्या चित्रपटाचे रहस्य समजून घेऊन मग इतरांना समजावून सांगा. सेवा करा.
वरदान:-
पुरुषार्थ आणि
सेवेमध्ये विधिपूर्वक वृद्धीला प्राप्त करणारे तीव्र पुरुषार्थी भव
ब्राह्मण अर्थात
विधीपूर्वक जीवन. कोणतेही कार्य सफल तेव्हा होते जेव्हा विधीने केले जाते. जर
कोणत्याही गोष्टीमध्ये स्वतःच्या पुरुषार्थामध्ये किंवा सेवेमध्ये वृद्धी होत नसेल
तर जरूर कोणत्यातरी विधीची कमी आहे; त्यामुळे चेक करा की अमृतवेले पासून
रात्रीपर्यंत मनसा, वाचा, कर्मणा आणि संपर्क विधीपूर्वक होता अर्थात वृद्धी झाली?
जर नसेल झाली तर कारणाचा विचार करून निवारण करा म्हणजे मग निराशा होणार नाही. जर
विधिपूर्वक जीवन असेल तर वृद्धी अवश्य होईल आणि तीव्र पुरुषार्थी बनाल.
बोधवाक्य:-
स्वच्छता आणि
सत्यता यामध्ये संपन्न बनणे हीच खरी पवित्रता आहे.
अव्यक्त इशारे:- स्वयं
प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
जिथे कोणतेही कार्य
वाणीद्वारे सिद्ध होत नाही तर म्हणता - हे सांगितल्याने समजणार नाहीत, शुभ भावनेने
परिवर्तन होतील. जिथे वाणी कार्याला सफल करू शकत नाही, तिथे सायलेन्सच्या शक्तीचे
साधन - शुभ-संकल्प, शुभ-भावना, नयनांची भाषा यांच्याद्वारे दया आणि स्नेहाची अनुभूती
कार्य सिद्ध करू शकते.