24-12-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - अविनाशी ज्ञान रत्नांचे दान हेच महादान आहे, या दानानेच राजाई प्राप्त होते म्हणून महादानी बना”

प्रश्न:-
ज्या मुलांना सेवेची हौस असेल त्यांची मुख्य लक्षणे काय असतील?

उत्तर:-
१) त्यांना जुन्या दुनियेचे वातावरण अजिबात आवडणार नाही, २) त्यांना अनेकांची सेवा करून त्यांना आपसमान बनविण्यामध्येच आनंद वाटेल, ३) त्यांना शिकण्यामध्ये आणि शिकविण्यामध्येच सुख वाटेल, ४) समजावून सांगता-सांगता गळा सुद्धा खराब झाला तरीही आनंदात असतील, ५) त्यांना कोणाची संपत्ती नको असते. ते कोणाच्या प्रॉपर्टीच्या मागे आपला वेळ घालवणार नाहीत. ६) त्यांची सगळ्यामधून आसक्ती नष्ट झालेली असेल. ७) ते बाप समान उदार चित्त असतील. त्यांना सेवेशिवाय दुसरे काहीच गोड वाटणार नाही.

गीत:-
ओम् नमो शिवाय…

ओम शांती।
रुहानी बाबा ज्यांची महिमा ऐकलीत ते बसून मुलांना पाठ शिकवत आहेत, ही पाठशाळा आहे ना. तुम्ही सर्वजण इथे शिक्षका कडून पाठ शिकत आहात. हे आहेत सुप्रीम टीचर, ज्यांना परमपिता सुद्धा म्हटले जाते. परमपिता रुहानी बाबांनाच म्हटले जाते. लौकिक पित्याला कधी परमपिता म्हणणार नाही. तुम्ही म्हणाल आता आम्ही पारलौकिक बाबांजवळ बसलो आहोत. कोणी बसले आहेत, कोणी पाहुणे बनून येतात. तुम्ही समजता आम्ही बेहदच्या बाबांजवळ बसलो आहोत, वारसा घेण्यासाठी. तर आतून किती आनंद झाला पाहिजे. मनुष्य तर बिचारे ओरडत राहतात. यावेळी दुनियेमध्ये सर्वजण म्हणतात की, दुनियेमध्ये शांती व्हावी. हे तर बिचाऱ्यांना माहितच नाहीये की, शांती काय चीज आहे. ज्ञानाचा सागर शांतीचा सागर बाबाच शांती स्थापन करणारे आहेत. निराकारी दुनियेमध्ये तर शांतीच आहे. इथे ओरडत असतात की, दुनियेमध्ये शांती कशी होईल? आता नवीन दुनिया सतयुगामध्ये तर शांती होती जेव्हा की एक धर्म होता. नवीन दुनियेला म्हणतात - पॅराडाईज, देवतांची दुनिया. शास्त्रांमध्ये जिकडे-तिकडे अशांतीच्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. दाखवतात की, द्वापरमध्ये कंस होता, मग हिरण्यकश्यपूला सतयुगामध्ये दाखवतात, त्रेतामध्ये रावणाचा हंगामा… सर्वत्र अशांती दाखवली आहे. मनुष्य बिचारे किती घोर अंधारात आहेत. बोलावतात सुद्धा बेहदच्या बाबांना. जेव्हा गॉड फादर येतील तेव्हा तेच येऊन शांती स्थापन करतील. ईश्वराला बिचारे जाणतच नाहीत. शांती असतेच नवीन दुनियेमध्ये. जुन्या दुनियेमध्ये असत नाही. नवीन दुनिया स्थापन करणारे तर बाबाच आहेत. त्यांनाच बोलवतात की येऊन शांती स्थापन करा. आर्य समाजी सुद्धा गातात - शांती देवा.

बाबा म्हणतात - सर्वप्रथम आहे पवित्रता. आता तुम्ही पवित्र बनत आहात. तिथे पवित्रता सुद्धा आहे, शांती सुद्धा आहे, हेल्थ-वेल्थ (आरोग्य-धनसंपदा) सर्व आहे. धना शिवाय तर माणसे उदास होतात. तुम्ही इथे येता या लक्ष्मी-नारायणा सारखे धनवान बनण्यासाठी. हे विश्वाचे मालक होते ना. तुम्ही आला आहात विश्वाचे मालक बनण्यासाठी. परंतु ती बुद्धी सर्वांची नंबरवार आहे. बाबांनी सांगितले होते - जेव्हा प्रभातफेरी काढता तर सोबत लक्ष्मी-नारायणाचे चित्र जरूर घेऊन जा. अशी युक्ती करा. आता मुलांची बुद्धी पारस-बुद्धी बनणार आहे. यावेळी अजून तमोप्रधानापासून रजो पर्यंत गेले आहेत. आता सतो, सतोप्रधान पर्यंत जायचे आहे. ती ताकद आता अजून नाही आहे. आठवणीमध्ये राहत नाहीत. योगबलाची खूप कमी आहे. लगेचच सतोप्रधान बनू शकत नाहीत. हे जे गायन आहे सेकंदामध्ये जीवनमुक्ती, ते तर ठीक आहे. तुम्ही ब्राह्मण बनला आहात तर जीवनमुक्त बनलाच आहात, मग जीवनमुक्तीमध्ये देखील सर्वोत्तम, मध्यम, कनिष्ठ असतात. जर बाबांचे बनतात तर जीवनमुक्ती मिळते जरूर. जरी बाबांचे बनून मग बाबांना सोडून देतात तरी देखील जीवनमुक्ती जरूर मिळेल. स्वर्गामध्ये झाडू मारणारे बनतील. स्वर्गात तर जातील. बाकी पद कमी मिळते. बाबा अविनाशी ज्ञान देतात, त्याचा कधी विनाश होत नाही. मुलांच्या अंतरंगात आनंदाचे ढोल वाजले पाहिजेत. हे हाय-हाय झाल्या नंतर मग वाह-वाह होणार आहे.

तुम्ही आता ईश्वरीय संतान आहात. नंतर मग बनाल दैवी संतान. यावेळी तुमचे हे जीवन हिरे तुल्य आहे. तुम्ही भारताची सेवा करून भारताला पीसफुल बनवता. तिथे पवित्रता, सुख, शांती सर्व असते. हे तुमचे जीवन देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहे. आता तुम्ही रचता बाबांना आणि सृष्टीचक्राला जाणता. म्हणतात - हे सणवार जे काही आहेत परंपरेने चालत येतात. परंतु केव्हा पासून? हे कोणीही जाणत नाही. समजतात जेव्हा पासून सृष्टीची सुरुवात झाली, रावणाला जाळणे इत्यादी देखील परंपरेने चालत येते. आता सतयुगामध्ये तर रावण असत नाही. तिथे कोणीही दुःखी नसते म्हणून ईश्वराची सुद्धा आठवण करत नाहीत. इथे सर्व ईश्वराची आठवण करत राहतात. समजतात ईश्वरच विश्वामध्ये शांती करतील, म्हणून म्हणतात - ‘येऊन दया करा’. आम्हाला दुःखापासून लिबरेट करा. मुलेच बाबांना बोलावतात कारण मुलांनीच सुख पाहिले आहे. बाबा म्हणतात - तुम्हाला पवित्र बनवून सोबत घेऊन जाईन. जे पवित्र बनणार नाहीत ते तर सजा भोगतील. यामध्ये मनसा, वाचा, कर्मणा पवित्र रहायचे आहे. मनसा देखील खूप चांगली पाहिजे. इतकी मेहनत करायची आहे जे मागाहून मनसामध्ये कोणताही व्यर्थ विचार चालू नये. एका बाबांशिवाय इतर काहीही आठवू नये. बाबा समजावतात आता मनसा पर्यंत तर येतील जोवर कर्मातीत अवस्था होईल. हनुमानाप्रमाणे अडोल बना, त्यामध्येच तर खूप मेहनत पाहिजे. जी आज्ञाधारक, प्रामाणिक, सपुत मुले असतात बाबांचे प्रेमसुद्धा त्यांच्यावर जास्त असते. ५ विकारांवर विजय प्राप्त न करणारे इतके प्रिय वाटणार नाहीत. तुम्ही मुले जाणता आम्ही कल्प-कल्प बाबांकडून हा वारसा घेतो तर आनंदाचा पारा किती चढायला हवा. हे देखील जाणता स्थापना तर जरूर होणार आहे. ही जुनी दुनिया कब्रदाखल होणार आहे जरूर. आपण परिस्तानमध्ये जाण्यासाठी कल्पापूर्वी प्रमाणे पुरुषार्थ करत राहतो. हे तर कब्रस्तान आहे ना. जुनी दुनिया आणि नवीन दुनिया याचे स्पष्टीकरण शिडीच्या चित्रामध्ये आहे. ही शिडी किती चांगली आहे तरी देखील मनुष्य समजत नाहीत. इथे सागराच्या कंठावर राहणारे देखील नीटसे समजत नाहीत. तुम्ही ज्ञान-धनाचे दान तर जरूर केले पाहिजे. ‘धन दिये धन ना खुटे’. दानी, महादानी म्हणतात ना. जे हॉस्पिटल, धर्मशाळा इत्यादी बनवतात, त्यांना महादानी म्हणतात. त्याचे फळ मग दुसऱ्या जन्मामध्ये अल्पकाळासाठी मिळते. समजा धर्मशाळा बनवतात तर दुसऱ्या जन्मामध्ये घराचे सुख मिळेल. कोणी पुष्कळ धनदान करतात तर राजाच्या घरामध्ये किंवा श्रीमंताच्या घरामध्ये जन्म घेतात. ते दानाद्वारे बनतात. तुम्ही शिक्षणाद्वारे राजाई पद मिळवता. शिक्षण सुद्धा आहे, दान सुद्धा आहे. इथे आहे डायरेक्ट, भक्ती मार्गामध्ये आहे इनडायरेक्ट. शिवबाबा तुम्हाला शिक्षणाने असे बनवतात. शिवबाबांकडे तर आहेतच अविनाशी ज्ञान रत्ने. एक-एक रत्न लाखो रुपयांचे आहे. भक्तीच्या बाबतीत असे म्हटले जात नाही. ज्ञान याला म्हटले जाते. शास्त्रांमध्ये भक्तीचे ज्ञान आहे, भक्ती कशी केली जावी त्यासाठी शिकवण मिळते. तुम्हा मुलांना ज्ञानाचा नखशिखांत नशा आहे. तुम्हाला भक्ती नंतर ज्ञान मिळते. ज्ञानाने विश्वाच्या बादशाहीचा नखशिखांत नशा चढतो. जे जास्त सेवा करतील, त्यांना नशा चढेल. प्रदर्शनी अथवा म्युझियममध्ये देखील चांगले भाषण करणाऱ्यांना बोलावतात ना. तिथे देखील जरूर नंबरवार असतील. महारथी, घोडेस्वार, प्यादे असतात. दिलवाडा मंदिरामध्ये सुद्धा यादगार बनलेले आहे. तुम्ही म्हणाल हे आहे चैतन्य दिलवाडा, ते आहे जड. तुम्ही आहात गुप्त म्हणून तुम्हाला जाणत नाहीत.

तुम्ही आहात राजऋषी, ते आहेत हठयोग ऋषी. आता तुम्ही ज्ञान-ज्ञानेश्वरी आहात. ज्ञानसागर तुम्हाला ज्ञान देत आहेत. तुम्ही अविनाशी सर्जनची मुले आहात. सर्जनच नाडी बघेल. जे स्वतःच्या नाडीला जाणत नाहीत ते मग दुसऱ्यांना कसे काय जाणतील. तुम्ही अविनाशी सर्जनची मुले आहात ना. ‘ज्ञान अंजन सद्गुरु दिया…’ हे ज्ञान इंजेक्शन आहे ना. आत्म्याला इंजेक्शन लागते ना. ही महिमा देखील आत्ताची आहे. सद्गुरूचीच महिमा आहे. गुरूंना देखील ज्ञान इंजेक्शन सद्गुरुच देतील. तुम्ही अविनाशी सर्जनची मुले आहात तर तुमचा धंदाच आहे ज्ञान इंजेक्शन लावणे. डॉक्टरांमध्ये देखील कोणी महिन्यामध्ये लाख, कोणी ५०० सुद्धा मुश्किलीने कमावतील. क्रमवारीने एकाच्या नंतर पुढे दुसऱ्याकडे जातात ना. हायकोर्ट, सुप्रीमकोर्टमध्ये निर्णय मिळतो - फाशीवर चढायचे आहे. मग प्रेसिडेंटकडे अपील करतात तर त्याला माफ सुद्धा करतात.

तुम्हा मुलांना तर नशा असला पाहिजे, उदारचित्त झाले पाहिजे. या भागीरथामध्ये बाबांचा प्रवेश झाला तर यांना बाबांनी उदारचित्त बनवले ना. स्वतः तर काहीही करू शकतात ना. ते यांच्यामध्ये प्रवेश करून मालक बनून बसले. चला हे सर्व भारताच्या कल्याणासाठी लावायचे आहे. तुम्ही धन लावता, भारताच्याच कल्याणासाठी. कोणी विचारले खर्चासाठी कुठून आणता? सांगा, आम्ही आमच्याच तन-मन-धनाने सेवा करतो. आम्ही राज्य करणार तर पैसा देखील आम्हीच लावणार. आम्ही आमचेच खर्च करतो. आम्ही ब्राह्मण श्रीमतावर राज्य स्थापन करतो. जे ब्राह्मण बनतील तेच खर्च करतील. शूद्रापासून ब्राह्मण बनलात मग देवता बनायचे आहे. बाबा तर म्हणतात सर्व चित्रे अशी ट्रान्सलाईटची बनवा जेणेकरून लोकांना आकर्षित करतील. कोणाला लगेचच तीर लागावा. कोणी जादूच्या भीतीने येणारही नाहीत. मनुष्यापासून देवता बनविणे - ही जादू आहे ना. भगवानुवाच, मी तुम्हाला राजयोग शिकवतो. हठयोगी कधी राजयोग शिकवू शकणार नाही. या गोष्टी आता तुम्हाला समजतात. तुम्ही मंदिर लायक बनत आहात. यावेळी हे सारे विश्व बेहदची लंका आहे. सर्व विश्वामध्ये रावणाचे राज्य आहे. बाकी सतयुग-त्रेतामध्ये हे रावण इत्यादी कसे असू शकतील.

बाबा म्हणतात - आता मी जे ऐकवतो, ते ऐका. या डोळ्यांनी काहीही पाहू नका. ही जुनी दुनियाच नष्ट होणार आहे, म्हणून आम्ही आमच्या शांतिधाम-सुखधामाचीच आठवण करतो. आता तुम्ही पुजारी पासून पूज्य बनत आहात. हे नंबर वन पुजारी होते, नारायणाची खूप पूजा करत होते. आता पुन्हा पूज्य नारायण बनत आहेत. तुम्ही देखील पुरुषार्थ करून बनू शकता. राजधानी तर चालते ना. जसे किंग एडवर्ड दि फर्स्ट, सेकंड, थर्ड चालतात. बाबा म्हणतात - तुम्ही सर्वव्यापी म्हणून माझा तिरस्कार करत आला आहात. तरी देखील मी तुमच्यावर उपकार करतो. हा खेळच असा वंडरफुल बनलेला आहे. पुरुषार्थ जरूर करायचा आहे. कल्पापूर्वी जो पुरुषार्थ केला आहे, तोच ड्रामा अनुसार करतील. ज्या मुलाला सेवेची हौस असते, त्याचे रात्रंदिवस हेच चिंतन चालते. तुम्हा मुलांना बाबांकडून रस्ता मिळाला आहे, तर तुम्हा मुलांना सेवे शिवाय इतर काहीच चांगले वाटत नाही. दुनियावी वातावरण चांगले वाटत नाही. सेवा करणाऱ्यांना तर सेवे शिवाय आराम वाटत नाही. शिक्षकाला शिकवण्यामध्ये मजा येते. आता तुम्ही बनला आहात खूप उच्च टीचर. तुमचा धंदाच हा आहे, चांगला टीचर जितका अनेकांना आपसमान बनवेल, तितकी त्याला पगार वाढ मिळते. त्यांना शिकवल्या शिवाय चैन पडणार नाही. प्रदर्शनी इत्यादी ठिकाणी रात्री १२ सुद्धा वाजतात तरीही आनंद होत असतो. थकवा येतो, गळा खराब होतो तरीही आनंदामध्ये राहतात. ईश्वरीय सेवा आहे ना. ही खूप उच्च सेवा आहे, त्यांना मग काहीच गोड लागत नाही. म्हणतील - आम्ही हे घर इत्यादी घेऊन तरी काय करणार, आम्हाला तर शिकवायचे आहे. हीच सेवा करायची आहे. प्रॉपर्टी इत्यादीमध्ये कलह बघतात तर म्हणतात हे सोने काय कामाचे जे कान कापेल. सेवेने तर बेडा (जीवनरूपी नौका) पार होणार आहे. बाबा म्हणतात, घर देखील भले त्यांच्या नावावर असू दे. बी. के. नी तर सेवा करायची आहे. या सेवेमध्ये बाहेरचे कोणतेही बंधन चांगले वाटत नाही. कोणाची तर आसक्ती जाते. कोणाची आसक्ती नष्ट झालेली असते. बाबा म्हणतात - मनमनाभव तर तुमची विकर्म विनाश होतील. खूप मदत मिळते. या सेवेमध्ये तर वाहून घेतले पाहिजे. यामध्ये खूप कमाई आहे. घर इत्यादीची गोष्ट नाही. घर देऊन अजूनच बंधनात टाकतील तर असे घेणार नाही. जे सेवा जाणत नाहीत ते तर आपल्या कामाचे नाहीत. टीचर आपसमान बनवतील. बनत नाहीत तर ते काय कामाचे. हँड्सची (मदतनीसची) खूप गरज असते ना. यामध्ये सुद्धा कन्या, मातांची जास्त गरज असते. मुले समजतात - बाबा टीचर आहेत, मुले देखील टीचर झाली पाहिजेत. असे नाही की टीचर दुसरे कोणते काम करू शकत नाही. सर्व काम केले पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) रात्रंदिवस सेवेच्या चिंतनामध्ये राहायचे आहे इतर सर्व आसक्ती नष्ट करायची आहे. सेवेशिवाय चैन नाही, सेवा करून आपसमान बनवायचे आहे.

२) बाप समान उदारचित्त बनायचे आहे. सर्वांची नाडी पाहून सेवा करायची आहे. आपले तन-मन-धन भारताच्या कल्याणासाठी लावायचे आहे. अचल-अडोल बनण्यासाठी आज्ञाधारक, प्रामाणिक बनायचे आहे.

वरदान:-
‘का’, ‘काय’ या प्रश्नांच्या जाळ्यातून कायम मुक्त राहणारे विश्व-सेवाधारी चक्रवर्ती भव

जेव्हा स्वदर्शन चक्र योग्य दिशेने चालण्याऐवजी चुकीच्या दिशेने चालते तेव्हा मायाजीत बनण्याऐवजी दुसऱ्याला पाहण्याच्या गोंधळात चक्रामध्ये अडकता ज्यामुळे ‘का’ आणि ‘काय’ च्या प्रश्नांचे जाळे बनते जे स्वतःच तयार करता आणि मग स्वतःच अडकता; त्यामुळे नॉलेजफुल बनून स्वदर्शन चक्र फिरवत रहा तर ‘का’, ‘काय’ च्या प्रश्नांच्या जाळ्यातून मुक्त होऊन योगयुक्त, जीवनमुक्त, चक्रवर्ती बनून बाबांसोबत विश्व कल्याणाच्या सेवेमध्ये चक्र लावत रहाल (फेऱ्या मारत रहाल). विश्व सेवाधारी चक्रवर्ती राजा बनाल.

बोधवाक्य:-
प्लेन बुद्धीने प्लॅनला प्रॅक्टिकल मध्ये आणा तर सफलता सामावलेली आहे.

अव्यक्त इशारे:- आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. जेव्हा कर्मातीत स्थितीच्या समीप पोहोचाल तेव्हा कोणत्याही आत्म्याकडे बुद्धीचा कल, कर्माचे बंधन निर्माण करणार नाही. कर्मातीत अर्थात सर्व कर्मबंधनांपासून मुक्त, न्यारे बनून, प्रकृतीद्वारे निमित्त मात्र कर्म करवून घेणे. कर्मातीत अवस्थेचा अनुभव करण्यासाठी न्यारे बनण्याचा पुरुषार्थ वारंवार करावा लागू नये, सहज आणि स्वतःच अनुभव व्हावा की करविणारा आणि करणारी ही कर्मेंद्रिये आहेतच मुळी वेगवेगळी.