25-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा तुम्हा मुलांसाठी नवीन राज्य स्थापन करण्यासाठी दूर देशातून आले आहेत, तुम्ही आता स्वर्गाच्या लायक बनत आहात”

प्रश्न:-
ज्या मुलांचा शिवबाबांवर अतूट निश्चय आहे त्यांची निशाणी काय असेल?

उत्तर:-
ते डोळे बंद करून बाबांच्या श्रीमतावर चालत राहतील; जी आज्ञा मिळेल. कधी विचारही येणार नाही की, ‘यामुळे काही नुकसान होऊ नये’, कारण अशा निश्चयबुद्धी मुलांसाठी जबाबदार बाबा आहेत. त्यांना निश्चयाचे बळ मिळते. अवस्था अडोल आणि अचल होते.

गीत:-
तुम्हीं हो माता, तुम्हीं पिता हो…

ओम शांती।
ही महिमा कोणाची ऐकलीत? ज्यांना तुम्हा मुलांशिवाय दुनियेमध्ये इतर कोणीही जाणत नाहीत. ही आहे उच्च ते उच्च बाबांची महिमा. बाकी ज्यांची पण महिमा करतात ती निरर्थक ठरते. उच्च ते उच्च एक बाबाच आहेत. परंतु बाबांची ओळख कोण देणार! स्वतः येऊन आत्म्याची आणि स्वतःची ओळख देतात. कोणत्याही मनुष्याला आत्म्याची ओळख नाहीये. भले म्हणतात, महान-आत्मा, जीव-आत्मा. शरीर जेव्हा सोडतात तर म्हणतात - आत्मा निघून जाते. शरीर मृत होते. आत्मा अविनाशी आहे. ती कधीही नष्ट होत नाही. आत्मा जी स्टार सारखी आहे, ती अति सूक्ष्म आहे. या डोळ्यांनी दिसून येत नाही. सर्व कर्तव्य आत्मा करते. परंतु वारंवार देह-अभिमानामध्ये येतात तेव्हा मग म्हणतात - ‘मी अमका आहे, मी असे करतो’. वास्तविक करते सर्व आत्माच आहे. शरीर म्हणजे तर कर्मेंद्रिये आहेत. हे साधू इत्यादी देखील जाणतात की आत्मा अति सूक्ष्म आहे, जी भृकुटीच्या मध्यभागी राहते. परंतु त्यांना हे ज्ञान नाही आहे की आत्म्यामध्ये हे पार्ट बजावण्याचे संस्कार आहेत. कोणी म्हणतात - आत्म्यामध्ये संस्कार असत नाहीत, आत्मा निर्लेप आहे. कोणी म्हणतात - संस्कारानुसार जन्म मिळतो. खूप मतभेद आहेत. हे देखील कोणाला माहित नाही की कोणते आत्मे ८४ जन्म घेतात. तुम्ही जाणता की सूर्यवंशीयांनाच ८४ चे चक्र फिरावे लागते. आत्माच ८४ चे चक्र फिरून पतित बनते. त्यांना आता पावन कोण बनवणार? पतित-पावन उच्च ते उच्च एक बाबाच आहेत, त्यांची महिमा सर्वात श्रेष्ठ आहे. सगळेच काही ८४ जन्म घेत नाहीत. नंतर येणारे तर ८४ जन्म घेऊ शकणार नाहीत. सगळेच काही एकत्र तर येत नाहीत. जे सर्वात पहिले सतयुगामध्ये येतील, सूर्यवंशी राजे आणि प्रजा, त्यांचे ८४ जन्म असतात. मागाहून मग मनुष्यांची खूप वृद्धी होते ना. मग कोणाचे ८३, कोणाचे ८० जन्म असतात. तिथे सतयुगामध्ये तर पूर्ण १५० वर्षे आयुर्मान असते. कोणाचा लवकर मृत्यू होऊ शकत नाही. या गोष्टी बाबाच बसून समजावून सांगतात. आता कोणीही परमपिता परमात्म्यालाच जाणत नाहीत. बाबा म्हणतात की, जशी तुमची आत्मा आहे, तशी माझी देखील आत्मा आहे. तुम्ही फक्त जन्म-मरणामध्ये येता, मी येत नाही. मला बोलावतात देखील तेव्हा जेव्हा पतित बनतात. जेव्हा खूप दुःखी होतात तेव्हा बोलावतात. आता यावेळी तुम्हा मुलांना शिवबाबा शिकवत आहेत.

कोणी विचारतात की आम्ही कशावरून समजावे की परमात्मा येतात! तर त्यांना समजावून सांगायचे आहे की, ‘सर्व जण बोलावतात - हे पतित-पावन या. आता ते आहेत निराकार. त्यांना आपले स्वतःचे शरीर नाहीये, यायचे देखील आहे पतित दुनियेमध्ये. पावन दुनियेमध्ये तर येणार नाहीत’. असे समजावून सांगितले पाहिजे. हे देखील समजावून सांगायचे आहे की, परमात्मा इतके सूक्ष्म आहेत जशी आत्मा सूक्ष्म आहे, परंतु ते आहेत मनुष्य सृष्टीचे बीजरूप, नॉलेजफुल. बाबा म्हणतात की तुम्ही मला परमपिता परमात्मा म्हणता. बोलावता तर जरूर येणार ना. गायन देखील आहे की, ‘दूरदेश का रहनेवाला आया देश पराये’. आता बाबांकडून समजले आहे की आता आपण परक्या देशामध्ये अर्थात रावणाच्या देशामध्ये आहोत. सतयुग-त्रेतामध्ये आपण ईश्वरीय देश अर्थात आपल्या देशामध्ये होतो मग द्वापर पासून आपण परक्या देशामध्ये, परक्या राज्यामध्ये येतो. वाम मार्गामध्ये येतो. आणि मग भक्तीला सुरुवात होते. सर्वप्रथम शिवबाबांची भक्ती करू लागतात, ते लोक शिवाचे एवढे मोठे लिंग बनवतात, परंतु त्यांचा इतका मोठा आकार तर नाहीये. आता तुम्हाला समजले आहे की आत्मा आणि परमात्म्यामध्ये काय फरक आहे. ते नॉलेजफुल सदा पावन, सुखाचा सागर, आनंदाचा सागर आहेत. ही परम-आत्म्याची महिमा आहे ना. आता बोलावतात की हे पतित-पावन या. ते आहेत परमपिता जे कल्प-कल्प येतात. दूर देशात राहणाऱ्या प्रवाशाला बोलावतात, त्यांची महिमा गातात. ब्रह्मा, सरस्वतीला बोलावत नाहीत. बोलावतात निराकार परमात्म्याला. आत्मा बोलावते की, ‘दूरदेशामध्ये राहणारे आता तुम्ही परक्या देशामध्ये या, कारण सर्व जण पतित बनले आहेत’. मी येईन देखील तेव्हा, जेव्हा रावण राज्य नष्ट होणार असेल. मी येतो देखील - संगमयुगावर. हे कोणालाच ठाऊक नाहीये. म्हणतात देखील ते परम-आत्मा, बिंदू आहेत. आजकाल मग म्हणतात आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा. आत्मा सो परमात्मा असू शकत नाहीत. आत्मा, परमात्मा दोघे वेगळे-वेगळे आहेत. दोघांचेही रूप एकसारखे आहे. परंतु आत्मा पतित बनते, ८४ जन्मांचा पार्ट बजावावा लागतो. परमात्मा जन्म-मरण रहित आहेत. जर आत्मा सो परमात्मा म्हटले तर मग सतोप्रधान परमात्मा, तमोप्रधानतेमध्ये येतात. नाही, हे तर होऊ शकत नाही. बाबा म्हणतात की, मी तर येतो सर्व आत्म्यांची सेवा करण्यासाठी. माझा जन्म झाला असे देखील म्हटले जात नाही. मी येतोच नरकवासीयांना स्वर्गवासी बनविण्यासाठी. आपला स्वर्ग स्थापन करण्यासाठी परक्या देशामध्ये आले आहेत. बाबाच येऊन आम्हाला स्वर्गाच्या लायक बनवतात. हे देखील समजावून सांगितले आहे की दुसऱ्या आत्म्यांचा पार्ट आपला-आपला आहे. परमात्मा जन्म-मरण रहित आहेत. येतात देखील जरूर, तेव्हाच तर शिवरात्री साजरी करतात. परंतु ते केव्हा आले, हे कोणीही जाणत नाही. शिवजयंती अशीच साजरी करत आले आहेत. स्वर्ग स्थापन करण्यासाठी जरूर संगमावर आले असतील. पतितांना पावन बनविण्यासाठी जरूर संगमावरच येतील ना. पावन सृष्टी आहे - स्वर्ग. म्हणतात की, ‘पतित-पावन या’. तर जरूर पतित दुनियेच्या विनाशाची वेळ असेल, तेव्हाच पावन दुनिया स्थापन करतील. युगे-युगे काही येत नाहीत. बाबा म्हणतात - मला संगमावरच येऊन पतित दुनियेला पावन बनवायचे आहे. हा रावणाचा देश, परका देश आहे. परंतु हे काही मनुष्य थोडेच जाणतात की रावणाचे राज्य सुरू आहे. केव्हापासून हे रावणाचे राज्य सुरु झाले, काहीच ठाऊक नाहीये. सर्वप्रथम मुख्य गोष्ट आत्मा आणि परमात्म्याचे रहस्य समजावून सांगायचे आहे, त्यानंतर मग समजावून सांगायचे आहे की, ते पावन बनविण्यासाठी, कल्पाच्या संगमयुगावर येतात. हे काम त्यांचेच आहे, ना की श्रीकृष्णाचे. श्रीकृष्ण तर स्वतःच ८४ जन्म घेत खाली उतरतात. सर्व सूर्यवंशी खाली उतरतात. झाड अर्धे ताजे, अर्धे जुने थोडेच होणार. सर्वांचीच जडजडीभूत अवस्था असते. कल्पाच्या आयुर्माना विषयी देखील लोकांना ठाऊक नाही आहे. शास्त्रांमध्ये तर खूप प्रदीर्घ आयुष्य सांगितले आहे. हे बाबाच बसून समजावून सांगतात. यामध्ये अजून प्रश्न उपस्थित होऊ शकत नाहीत. रचता बाबा सत्यच बोलतात. आपण इतके बी.के. आहोत, सर्व जण हे मान्य करतात. तर जरूर बी.के. आहोत तेव्हाच तर मानतात. पुढे चालून जेव्हा विश्वास बसेल तेव्हा समजेल देखील. सर्वप्रथम लोकांना हे समजावून सांगायचे आहे की, परमपिता परमात्मा निराकार दूरदेशातून आले आहेत. परंतु कोणत्या शरीरामध्ये आले? सूक्ष्मवतनमध्ये येऊन काय करतील? जरूर इथेच यावे लागेल. प्रजापिता ब्रह्मा देखील इथे पाहिजेत. ब्रह्मा कोण आहेत, हे देखील बाबा बसून समजावून सांगतात. ज्यांच्यामध्ये प्रवेश केला आहे ते आपल्या स्वतःच्या जन्मांना जाणत नव्हते तर मुले देखील जाणत नव्हती. मुले देखील तेव्हा बनतात जेव्हा मी ॲडॉप्ट करतो. मी यांच्या सहित (साकार ब्रह्मा बाबांसहित) सर्व मुलांना म्हणतो की, तुम्ही सर्व आपल्या स्वतःच्या जन्मांना विसरले आहात काय? आता सृष्टीचे चक्र पूर्ण होत आहे मग पुन्हा रिपीट होईल. मी आलो आहे पावन बनविण्याकरिता, राजयोग शिकविण्याकरिता. पावन बनण्याचा आणखी दुसरा कोणताच मार्ग नाहीये. जर हे रहस्य मनुष्यांना कळले असते तर गंगा इत्यादीवर स्नान करण्यासाठी, मेळे इत्यादी ठिकाणी गेले नसते. या पाण्याच्या नद्यांमध्ये तर सदैव स्नान करत राहतात. द्वापर पासून करत आले आहेत. असे समजतात की, गंगेमध्ये डुबकी मारल्यामुळे पापे नष्ट होतील. परंतु कोणाचीही पापे नष्ट होत नाहीत. सर्वप्रथम तर आत्मा आणि परमात्म्याचेच रहस्य सांगा. आत्मेच परमात्मा पित्याला बोलावते, ते निराकार आहेत, आत्मा देखील निराकार आहे. या कर्मेंद्रियांद्वारे आत्मा बोलावते. भक्तीनंतर भगवंताला यायचेच आहे, हा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे.

बाबा म्हणतात - मला नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी यावे लागते. शास्त्रांमध्ये देखील आहे की भगवंताला संकल्प उत्पन्न झाला तर जरूर ड्रामा प्लॅन अनुसार संकल्प उत्पन्न झाला असेल. आधी या गोष्टींना तुम्ही थोडेच समजत होता. दिवसेंदिवस समजत जाता. बाबा म्हणतात - मी तुम्हाला नवीन-नवीन गुह्य ते गुह्य गोष्टी ऐकवतो. ऐकता-ऐकता समजत जाता. आधी असे म्हणत नव्हता की शिवबाबा शिकवत आहेत. आता तर व्यवस्थित समजले आहे, अजूनही खूप काही समजायचे बाकी आहे. रोज समजावून सांगत राहतात की, कसे कोणाला समजावून सांगितले पाहिजे. अगोदर त्यांचा हा विश्वास पक्का करा की बेहदचे बाबा समजावून सांगत आहेत तर जरूर ते सत्यच सांगतील. यामध्ये गोंधळून जाण्याचाही प्रश्नच नाही. मुले काही पक्की आहेत, काही कच्ची आहेत. कच्चे असतील तर कोणालाही समजावून सांगू शकत नाहीत. असे तर स्कूलमध्ये देखील नंबरवार असतात. खूप जणांना हा संशय येतो की आम्ही कसे समजावे की परमपिता परमात्मा येऊन शिकवत आहेत कारण त्यांच्या बुद्धीमध्ये आहे की श्रीकृष्णाने ज्ञान ऐकवले. आता पतित दुनियेमध्ये तर श्रीकृष्ण काही येऊ शकत नाही. हे त्यांना सिद्ध करून सांगा की, परमात्म्यालाच पतित दुनियेमध्ये आणि पतित शरीरामध्ये यावे लागते. बाबा हे देखील समजतात की प्रत्येकाची आपली-आपली बुद्धी आहे. कोणाला तर पटकन समजते. जितके शक्य असेल तितके समजावून सांगायचे आहे. सगळेच ब्राह्मण काही एकसारखे नसतात. परंतु मुलांमध्ये देह-अभिमान खूप आहे. हे बाबा देखील जाणतात की नंबरवार आहेत. मुलांना डायरेक्शन अनुसार चालावे लागेल. मोठे बाबा जे सांगतील, ते मानले पाहिजे. गुरू इत्यादींचे म्हणणे तर मानत आला आहात. आता बाबा जे स्वर्गामध्ये घेऊन जाणारे आहेत, त्यांचे म्हणणे तर डोळे बंद करून मानले पाहिजे. परंतु इतके निश्चय-बुद्धी नाही आहेत. भले त्यामध्ये फायदा होवो नाहीतर तोटा होवो, स्वीकारले पाहिजे. भले नुकसान जरी झाल्याचे समजले, तरी देखील बाबा म्हणतात ना - नेहमी असे समजा की शिवबाबाच म्हणतात, ब्रह्मा सांगत आहेत असे समजू नका. रिस्पॉन्सिबल शिवबाबा आहेत. त्यांचा हा रथ आहे, ते ठीक करतील. म्हणतील की, मी बसलो आहे. नेहमी असे समजा की शिवबाबाच सांगत आहेत, हे (ब्रह्मा बाबा) काहीच जाणत नाहीत, असेच समजा. एका बाजूला तरी निश्चय ठेवला पाहिजे, शिवबाबा म्हणतात - माझ्या मतानुसार चालत रहा तर तुमचे कल्याण होत राहील. हे ब्रह्मा देखील जर काही सांगत असतील, तर त्यासाठी देखील रिस्पॉन्सिबल मी आहे. तुम्ही मुलांनी चिंता करायची नाही. शिवबाबांची आठवण केल्यामुळे अवस्था अजूनच मजबूत होईल. निश्चयामुळे विकर्म देखील विनाश होतील, बळ देखील मिळेल. जितकी बाबांची आठवण कराल तितके जास्त बळ मिळेल. जे श्रीमतावर चालून सेवा करतात तेच उच्च पद मिळवतील. पुष्कळजणांमध्ये देह-अभिमान खूप असतो. बाबा (ब्रह्मा बाबा) बघा सर्व मुलांसोबत कसे प्रेमाने चालत आहेत. सर्वांशी बोलत राहतात. मुलांना विचारतात की नीट बसले आहात ना! काही अडचण तर नाही आहे ना. मुलांवर प्रेम असते. बेहदच्या बाबांचे मुलांवर खूप-खूप प्रेम आहे. जे जितकी श्रीमतावर सेवा करतात त्यानुसार प्रेम असते. सेवेमध्येच फायदा आहे. सेवेमध्ये हाडे द्यायची आहेत (खूप मेहनत करायची आहे). कोणतेही काम करत राहतील तर ते मग मनामध्ये देखील राहतात की हा मुलगा फर्स्टक्लास आहे. परंतु चालता चालता कोणाबरोबर ग्रहचारी देखील बसते.. मायेशी सामना होतो ना. ग्रहचारीमुळे मग ज्ञान झेपवू शकत नाहीत. बरेचजण तर मग कर्मणा सेवा अथक होऊन करतात.

तुमचे काम आहे सर्वांना सुखधामचा मालक बनविणे. कोणालाही दुःख द्यायचे नाही. ज्ञान नसेल तर मग खूप दुःख देतात. मग कितीही समजावून सांगा तरीही समजत नाहीत. सर्वप्रथम आत्मा आणि परमात्म्याचे स्पष्टीकरण द्यायचे आहे. आत्म्यामध्ये कसा ८४ जन्मांचा पार्ट भरलेला आहे, जो अविनाशी पार्ट आहे. कधीही बदलत नाही, ड्रामामध्ये नोंदलेला आहे. असा निश्चय असणारा कधीही डगमगणार नाही. खूप जण डगमगतात. शेवटी जेव्हा भंभोरला (दुनियेला) आग लागेल तेव्हा अचल बनतील. आता तर खूप युक्तीने समजावून सांगायचे आहे. चांगली-चांगली मुले तर सेवा करत राहतात. हृदयामध्ये स्थान मिळवून राहतात. खूप वेगाने पुढे जात राहतात. खूप मेहनत करतात. त्यांना सेवेची खूप आवड असते. ज्याच्यामध्ये जे गुण आहेत त्याचे बाबा वर्णन करतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सेवेमध्ये हाडे द्यायची आहेत (खूप मेहनत करायची आहे), कोणत्याही गोष्टीमध्ये संशय घ्यायचा नाही. सर्वांना सेवेद्वारे सुख द्यायचे आहे, दुःख नाही.

२) निश्चयाचा बळाद्वारे आपल्या अवस्थेला अडोल बनवायचे आहे. जे श्रीमत मिळते, त्यामध्ये कल्याण सामावलेले आहे, कारण रिस्पॉन्सिबल बाबा आहेत त्यामुळे काळजी करायची नाही.

वरदान:-
योगयुक्त स्थितीद्वारे सूक्ष्म आणि कडक बंधनांना क्रॉस करणारे बंधनमुक्त भव

१) योगयुक्त असण्याची निशाणी आहे - बंधनमुक्त. योगयुक्त बनण्यामध्ये सर्वात अंतिम बंधन आहे - स्वतःला हुशार समजून श्रीमताला आपल्या बुद्धीची कमाल समजणे अर्थात श्रीमतामध्ये आपली बुद्धी मिक्स करणे, ज्याला बुद्धीचा अभिमान म्हटले जाते. २) जेव्हा कधी कोणी एखाद्या त्रुटीचा इशारा देत असेल अथवा निंदा करत असेल आणि त्यावेळेस जर थोडा जरी व्यर्थ संकल्प चालला तर ते देखील बंधन आहे. जेव्हा या बंधनांना क्रॉस करून जय-पराजय, निंदा-स्तुती मध्ये समान स्थिती बनवाल तेव्हा म्हणणार संपूर्ण बंधनमुक्त.

बोधवाक्य:-
आधी विचार करणे नंतर मग कृती करणे - हाच ज्ञानी तू आत्म्याचा गुण आहे.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

जसे एखादे निरागस मूल हानिकारक गोष्टीला देखील खेळणे समजते, अशावेळी त्याला दुसरे काहीतरी देऊन सोडवावे लागते; अगदी तसेच जे अल्पकाळाचा मान-शान अथवा अल्पकाळाची इच्छा बाळगतात, त्यांना मान देऊन स्वतः निर्माण बना. त्यावेळी जर त्यांना शिकवण द्याल तर वादविवाद

उत्पन्न होईल म्हणून अशा वेळी युक्तीयुक्त व्यवहाराने, परोपकारी बनवून क्षमेच्या भावनेने सन्मान देऊन आधी त्यांना शहाणे बनवा, जेणेकरून त्यांना स्वतःलाच कळेल की ही गोष्ट हानीकारक आहे.