25-10-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - संगमयुगावरच तुम्हाला आत्म-अभिमानी बनण्याची मेहनत करावी लागते सतयुग
किंवा कलियुगामध्ये ही मेहनत करावी लागत नाही”
प्रश्न:-
श्रीकृष्णाचे
नाव त्याच्या माता-पित्या पेक्षाही जास्त प्रसिद्ध आहे, कशामुळे?
उत्तर:-
१. कारण श्रीकृष्णाच्या अगोदर ज्यांचा पण जन्म होतो त्यांचा जन्म योगबलाद्वारे होत
नाही. श्रीकृष्णाच्या माता-पित्याने काही योगबलाद्वारे जन्म घेतलेला नाहीये. २.
संपूर्ण कर्मातीत अवस्था असणारे फक्त राधे-कृष्णच आहेत, तेच सद्गतीला प्राप्त करतात.
जेव्हा सर्व पाप-आत्मे नष्ट होतात तेव्हा गुलगुल (पावन) नवीन दुनियेमध्ये
श्रीकृष्णाचा जन्म होतो, त्यालाच वैकुंठ म्हटले जाते. ३. संगमावर श्रीकृष्णाच्या
आत्म्याने, सर्वात जास्त पुरुषार्थ केला आहे म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध आहे.
ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांना रूहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत. ५ हजार वर्षानंतर
एकदाच मुलांना येऊन शिकवतात; बोलावतात देखील की, ‘आम्हा पतितांना येऊन पावन बनवा’.
तर सिद्ध होते की ही पतित दुनिया आहे. नवीन दुनिया, पावन दुनिया होती. नवीन घर
सुंदर असते. जुने जसे मोडकळीस आल्यासारखे होते. पावसाळ्यात खाली कोसळते. आता तुम्ही
मुले जाणता बाबा आले आहेत नवीन दुनिया बनविण्याकरिता. आता शिकवत आहेत. पुन्हा ५
हजार वर्षानंतर शिकवतील. असे कधी कोणी साधू-संत इत्यादी आपल्या फॉलोअर्सला शिकवणार
नाहीत. त्यांना हे माहीतच नाही आहे. ना खेळा विषयी माहिती आहे कारण
निवृत्तीमार्गवाले आहेत. बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे
रहस्य समजावून सांगू शकत नाही. आत्म-अभिमानी बनण्यामध्येच मुलांना मेहनत आहे कारण
अर्ध्या कल्पामध्ये तुम्ही कधी आत्म-अभिमानी बनलेले नाहीत. आता बाबा म्हणतात -
स्वतःला आत्मा समजा. असे नाही की, आत्मा सो परमात्मा. नाही, स्वतःला आत्मा समजून
परमपिता परमात्मा शिवबाबांची आठवण करायची आहे. आठवणीची यात्रा मुख्य आहे, ज्यामुळे
तुम्ही पतितापासून पावन बनता. यामध्ये कोणती स्थूल गोष्ट नाहीये. नाक-कान इत्यादी
काही बंद करायचे नाहीये. मूळ गोष्ट आहे - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे.
तुम्हाला अर्ध्या कल्पापासून देह-अभिमानामध्ये राहण्याची सवय जडली आहे. पहिले
स्वतःला आत्मा समजाल तेव्हा बाबांची आठवण करू शकाल. भक्तीमार्गामध्ये देखील
बाबा-बाबा म्हणत आले आहेत. मुले जाणतात सतयुगामध्ये एकच लौकिक पिता आहेत. तिथे
पारलौकिक पित्याची आठवण करत नाहीत कारण सुख आहे. भक्तीमार्गामध्ये मग दोन पिता
बनतात. लौकिक आणि पारलौकिक. दुःखामध्ये सर्व पारलौकिक पित्याची आठवण करतात.
सतयुगामध्ये भक्ती असत नाही. तिथे तर आहेच ज्ञानाचे प्रारब्ध. असे नाही की ज्ञान
असते. या वेळच्या ज्ञानाचे प्रारब्ध मिळते. बाबा तर एकदाच येतात. अर्धा कल्प
बेहदच्या बाबांचा, सुखाचा वारसा असतो. नंतर मग लौकिक पित्याकडून अल्पकाळाचा वारसा
मिळतो. हे मनुष्य समजावून सांगू शकत नाहीत. या आहेत नवीन गोष्टी, ५ हजार वर्षांमध्ये
संगमयुगावर एकदाच बाबा येतात, जेव्हा कलियुगाचा अंत आणि सतयुग आदिचा संगम असतो
तेव्हाच बाबा येतात - नवीन दुनिया पुन्हा स्थापन करण्याकरिता. नवीन दुनियेमध्ये या
लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, मग त्रेतामध्ये रामराज्य होते. बाकी देवता इत्यादींची
जी इतकी चित्रे बनवली आहेत ती सर्व आहे भक्तिमार्गाची सामग्री. बाबा म्हणतात - या
सर्वांना विसरून जा. आता आपल्या घराची आणि नवीन दुनियेची आठवण करा.
ज्ञानमार्ग आहे
शहाणपणाचा मार्ग, ज्याद्वारे तुम्ही २१ जन्म शहाणे बनता. कोणतेच दुःख राहत नाही.
सतयुगामध्ये कधी कोणीच असे म्हणणार नाही की, आम्हाला शांती पाहिजे. म्हटले जाते ना
- ‘मांगने से मरना भला’. बाबा तुम्हाला असे श्रीमंत बनवतात जे देवतांना भगवंताकडे
कोणती वस्तू मागण्याची गरज राहत नाही. इथे तर आशीर्वाद (कृपा) मागतात ना. पोप
इत्यादी येतात तर किती आशीर्वाद घेण्यासाठी जातात. पोप कितीतरी जणांचे विवाह करवून
देतात. बाबा काही असे काम करत नाहीत. भक्तीमार्गामध्ये जे पास्ट झाले आहे ते आताही
होत आहे, तेच पुन्हा रिपीट होईल. दिवसें-दिवस भारताची किती अधोगती होत जाते. आता
तुम्ही आहात संगमावर. बाकी सर्व आहेत कलियुगी मनुष्य. जोपर्यंत इथे येणार नाहीत
तोपर्यंत काहीच समजू शकणार नाहीत की आता संगमयुग आहे की कलियुग आहे? एकाच घरामध्ये
मुले समजतात संगमयुगावर आहोत आणि वडील म्हणतील आम्ही कलियुगामध्ये आहोत तर किती
त्रास होतो. खाणे-पिणे इत्यादीचे झंझट होऊन बसते. तुम्ही संगमयुगी आहात, शुद्ध
पवित्र भोजन खाणारे. देवता कधी कांदा इत्यादी थोडेच खातात. या देवतांना म्हटलेच जाते
निर्विकारी. भक्तीमार्गामध्ये सगळे तमोप्रधान बनले आहेत. आता बाबा म्हणतात
सतोप्रधान बना. कोणीही असा नाहीये की जो समजेल की, आत्मा अगोदर सतोप्रधान होती,
नंतर मग तमोप्रधान बनली आहे; कारण ते तर आत्म्याला निर्लेप समजतात. आत्मा सो
परमात्मा आहे, असे म्हणतात.
बाबा म्हणतात -
ज्ञानाचा सागर मीच आहे, जे या देवी-देवता धर्माचे असतील ते सर्व येऊन पुन्हा आपला
वारसा घेतील. आता (सैपलींग) कलम लावले जात आहे. तुम्ही समजू शकाल - हे इतके उच्च पद
प्राप्त करण्यासाठी लायक नाही आहेत. घरी जाऊन लग्न इत्यादी करून छी-छी बनत राहतात (विकारामध्ये
जात राहतात). तर सांगितले जाते की, तुम्ही उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. ही
राजाई स्थापन होत आहे. बाबा म्हणतात - मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो तर प्रजा
जरूर बनवावी लागेल. नाही तर राज्य कसे मिळवाल. हे गीतेचे शब्द आहेत ना - यालाच
म्हटले जाते गीतेचे युग. तुम्ही राजयोग शिकत आहात - जाणता आदि सनातन देवी-देवता
धर्माचे फाउंडेशन घातले जात आहे. सूर्यवंशी-चंद्रवंशी दोन्ही राजाई स्थापन होत आहे.
ब्राह्मण कुळ स्थापन झालेले आहे. ब्राह्मणच मग सूर्यवंशी-चंद्रवंशी बनतात. जे
चांगल्या रीतीने मेहनत करतील तेच सूर्यवंशी बनतील. इतर धर्माचे जे येतात ते येतातच
मुळी आपला धर्म स्थापन करण्याकरिता. त्यांच्या मागून त्या धर्माचे आत्मे येत राहतात,
धर्माची वृद्धी होत जाते. समजा कोणी ख्रिश्चन आहेत तर त्यांचे बीजरुप क्राइस्ट झाला.
तुमचे बीज रूप कोण आहेत? बाबा. कारण बाबाच येऊन स्वर्गाची स्थापना करतात ब्रह्मा
द्वारे. ब्रह्मालाच प्रजापिता म्हटले जाते. रचता म्हणता येत नाही. यांच्या द्वारेच
(ब्रह्मा द्वारेच) मुलांना ॲडॉप्ट केले जाते. ब्रह्माला देखील क्रिएट करतात (रचतात)
ना. बाबा येऊन प्रवेश करून ही रचना रचतात. शिवबाबा म्हणतात तुम्ही माझी मुले आहात.
ब्रह्मा देखील म्हणतात - तुम्ही माझी साकारी मुले आहात. आता तुम्ही काळे छी-छी (मलीन
विकारी) बनले आहात. आता पुन्हा ब्राह्मण बनले आहात. या संगमावरच तुम्ही पुरुषोत्तम
देवी-देवता बनण्याची मेहनत करता. देवतांना आणि शुद्रांना काही मेहनत करावी लागत नाही,
तुम्हा ब्राह्मणांनाच मेहनत करावी लागते देवता बनण्याकरिता. बाबा येतातच संगमयुगावर.
हे आहे खूप छोटे युग म्हणून याला लिप युग म्हटले जाते. याला कोणीही जाणत नाही.
बाबांना देखील मेहनत करावी लागते. असे नाही की ताबडतोब नवीन दुनिया निर्माण होते.
तुम्हाला देवता बनण्यासाठी वेळ लागतो. जे चांगली कर्म करतात ते चांगल्या कुळामध्ये
जन्म घेतात. आता तुम्ही नंबरवार पुरुषार्था नुसार गुल-गुल (फूल) बनत आहात. आत्माच
बनते. आता तुमची आत्मा चांगली कर्म शिकत आहे. आत्माच चांगले किंवा वाईट संस्कार
घेऊन जाते. आता तुम्ही गुल-गुल फूल बनून चांगल्या घरी जन्म घेत रहाल. इथे जे चांगला
पुरुषार्थ करतात, ते जरूर चांगल्या कुळामध्ये जन्म घेत असतील. नंबरवार तर आहेत ना.
जसे-जसे कर्म करतात तसा जन्म घेतात. जेव्हा वाईट कर्म करणारे पूर्णपणे नष्ट होतात
तेव्हा काटछाट करून मग स्वर्ग स्थापन होतो. जे पण तमोप्रधान आहेत ते नष्ट होतात.
नंतर मग नवीन देवतांचे येणे सुरू होते. जेव्हा सगळे भ्रष्टाचारी नष्ट होतात तेव्हा
श्रीकृष्णाचा जन्म होतो, तोपर्यंत अदली-बदली होत राहते. जेव्हा कोणीच छी-छी (विकारी)
राहणार नाहीत तेव्हा श्रीकृष्ण येईल, तोपर्यंत तुम्ही येत-जात रहाल. श्रीकृष्णाला
रिसिव्ह करणारे आई-वडील देखील अगोदरच पाहिजेत ना. पुन्हा सगळेच चांगले-चांगले
राहतील. बाकी सर्व निघून जातील, तेव्हाच त्याला स्वर्ग म्हटले जाईल. तुम्ही
श्रीकृष्णाला रिसिव्ह करणारे असाल. भले तुमचा छी-छी जन्म (विकारातून जन्म) असेल
कारण रावण राज्य आहे ना. शुद्ध जन्म तर होऊ शकत नाही. गुल-गुल पवित्र जन्म
सर्वप्रथम श्रीकृष्णाचाच होतो. त्याच्या नंतर नवीन दुनिया वैकुंठ म्हटले जाते.
श्रीकृष्ण एकदम गुल-गुल (पवित्र) नवीन दुनियेमध्ये येईल. रावण संप्रदाय एकदम नष्ट
होऊन जाईल. श्रीकृष्णाचे नाव त्याच्या माता-पित्यापेक्षाही खूप प्रसिद्ध आहे.
श्रीकृष्णाच्या माता-पित्याचे नाव इतके प्रसिद्ध नाही आहे. श्रीकृष्णाच्या अगोदर
ज्यांचा पण जन्म होतो तो योगबलाने जन्म म्हणता येणार नाही. असे नाही श्रीकृष्णाच्या
माता-पित्याने योगबलाने जन्म घेतला आहे. नाही, जर असे असते तर त्यांचे देखील नाव
प्रसिद्ध झाले असते. तर सिद्ध होते श्रीकृष्णाच्या माता-पित्याने इतका पुरुषार्थ
केलेला नाही जितका श्रीकृष्णाने केला आहे. या सर्व गोष्टी पुढे चालून तुम्हाला समजत
जातील. संपूर्ण कर्मातीत अवस्थावाले राधा-कृष्णच आहेत. तेच सद्गतीमध्ये येतात.
जेव्हा सगळे पाप-आत्मे नष्ट होतात तेव्हाच त्यांचा जन्म होतो. तेव्हा मग म्हणणार
पावन दुनिया; म्हणून श्रीकृष्णाचे नाव प्रसिद्ध आहे. माता-पित्याचे इतके नाव नाही.
पुढे चालून तुम्हाला खूप साक्षात्कार होतील. वेळ तर बाकी आहे. तुम्ही कोणालाही
समजावून सांगू शकता - आम्ही हे बनण्यासाठी शिकत आहोत. विश्वामध्ये यांचे राज्य आता
स्थापन होत आहे. आमच्यासाठी तर नवीन दुनिया पाहिजे. आता तुम्हाला दैवी संप्रदायाचे
म्हणणार नाही. तुम्ही आहात ब्राह्मण संप्रदाय; देवता बनणार आहात. दैवी संप्रदाय
बनाल तेव्हा तुमची आत्मा आणि शरीर दोन्ही स्वच्छ असतील. आता तुम्ही संगमयुगी
पुरुषोत्तम बनणारे आहात. ही सगळी मेहनतीची गोष्ट आहे. आठवणीद्वारेच विकर्माजीत
बनायचे आहे. तुम्ही स्वतः म्हणता - वारंवार आठवण विसरायला होते. बाबा पिकनिक करतात
तर बाबांना विचार येतो - आपण आठवणीमध्ये राहिलो नाही तर बाबा काय म्हणतील; म्हणून
बाबा म्हणतात - तुम्ही आठवणीमध्ये बसून पिकनिक करा. कर्म करत असताना माशुकची आठवण
करा तर विकर्म विनाश होतील. यामध्येच मेहनत आहे. आठवणीने आत्मा पवित्र होईल, अविनाशी
ज्ञान-धन देखील जमा होईल. आणि नंतर जर अपवित्र बनला तर सारे ज्ञानच वाहून जाते.
पवित्रताच मुख्य आहे. बाबा तर चांगल्या-चांगल्या गोष्टीच समजावून सांगतात. या
सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान इतर कोणालाच नाही आहे. इतर जे काही सत्संग इत्यादी
आहेत ते सर्व आहेत भक्तिमार्गाचे
बाबांनी समजावून
सांगितले आहे - भक्ती खरेतर प्रवृत्ती मार्गवाल्यांनीच करायची आहे. तुमच्यामध्ये तर
किती ताकद असते. घर बसल्या तुम्हाला सुख मिळते. सर्वशक्तिमान बाबांकडून तुम्ही इतकी
ताकद घेता. संन्याशांमध्ये देखील अगोदर ती ताकत होती, जंगलामध्ये राहत होते. आता तर
किती मोठ-मोठे फ्लॅट बनवून राहतात. आता ती ताकत नाही आहे. जसे तुमच्यामध्ये देखील
पहिले सुखाची ताकत असते, नंतर ती नाहीशी होते. त्यांच्यामध्ये (संन्याशांमध्ये)
देखील अगोदर शांतीची ताकद होती, आता ती ताकद राहिलेली नाहीये. पहिले तर खरे बोलत
होते की, रचता आणि रचनेला आम्ही जाणत नाही. आता तर स्वतःलाच भगवान शिवोहम् म्हणत
राहतात. बाबा समजावून सांगतात - यावेळी संपूर्ण झाड तमोप्रधान बनले आहे म्हणून
सर्वांचा उद्धार करण्यासाठी मी येतो. ही दुनियाच बदलणार आहे. सर्व आत्मे परत घरी
निघून जातील. असा एकही नाही ज्याला हे माहित असेल की आपल्या आत्म्यामध्ये अविनाशी
पार्ट भरलेला आहे, जो पुन्हा रिपीट करणार. आत्मा इतकी छोटी आहे, त्याच्यामध्ये
अविनाशी पार्ट भरलेला आहे जो कधी विनाश होत नाही. यामध्ये बुद्धी खूप शुद्ध पवित्र
पाहिजे. ती तेव्हाच होईल जेव्हा आठवणीच्या यात्रेमध्ये मग्न होऊन राहाल. मेहनत
केल्या शिवाय पद थोडेच मिळेल म्हणून म्हटले जाते - चढे तो चाखे वैकुंठ रस… कुठे
उच्च ते उच्च राजांचाही राजा डबल मुकुटधारी आणि कुठे प्रजा. शिकवणारे तर एकच आहेत.
यामध्ये बुद्धीची समज खूप चांगली पाहिजे. बाबा वारंवार समजावून सांगतात की मुख्य आहे
- आठवणीची यात्रा. मी तुम्हाला शिकवून विश्वाचा मालक बनवतो. तर टीचर गुरु देखील
असेल. बाबा तर आहेतच टीचरांचेही टीचर, पित्यांचेही पिता. हे तर तुम्ही मुले जाणता
आपले बाबा खूप गोड आहेत. अशा बाबांची तर खूप आठवण करायची आहे. शिकायचे देखील पूर्ण
आहे. बाबांची आठवण केली नाहीत तर पापे नष्ट होणार नाहीत. बाबा सर्व आत्म्यांना सोबत
घेऊन जातील. बाकी शरीरे सर्व नष्ट होतील. आत्मे आपापल्या धर्माच्या सेक्शनमध्ये
जाऊन निवास करतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बुद्धीला
पवित्र बनविण्याकरिता आठवणीच्या यात्रेमध्ये मग्न रहायचे आहे. कर्म करत असताना
देखील एक माशुकच आठवणीत राहावा - तेव्हा विकर्माजीत बनाल.
२) या छोट्याशा
युगामध्ये मनुष्या पासून देवता बनण्याची मेहनत करायची आहे. चांगल्या कर्मानुसार
चांगल्या संस्कारांना धारण करून चांगल्या कुळामध्ये जायचे आहे.
वरदान:-
आपल्या रुहानी
लाईट द्वारे वायुमंडळाला परिवर्तन करण्याची सेवा करणारे सहज सफलता मूर्त भव
जसे साकार सृष्टीमध्ये
ज्या रंगाची लाईट लावता त्याच रंगाचे वातावरण होते. जर हिरवी लाईट असते तर तेव्हा
सर्वत्र तोच प्रकाश पसरतो. लाल लाईट लावता तर योगाचे वातावरण बनते. तर जेव्हा स्थूल
लाईट वायुमंडळाला परिवर्तन करते तर तुम्ही लाईट हाऊस देखील पवित्रतेची लाईट आणि
सुखाच्या लाईट द्वारे वायुमंडळाला परिवर्तन करण्याची सेवा करा तर सफलता मूर्त बनाल.
स्थूल लाईट डोळ्यांनी बघता. रूहानी लाईट अनुभवाद्वारे जाणतील.
बोधवाक्य:-
व्यर्थ
गोष्टींमध्ये वेळ आणि संकल्प गमावणे - ही देखील अपवित्रता आहे.
अव्यक्त इशारे:- स्वयं
प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
कोणताही खजिना कमी
खर्च करून जास्त प्राप्ती करणे, हाच योगाचा प्रयोग आहे. मेहनत कमी, सफलता जास्त या
विधीने प्रयोग करा. जसे समय आणि संकल्प श्रेष्ठ खजिने आहेत, म्हणून संकल्प कमीत-कमी
खर्च व्हावेत परंतु प्राप्ती जास्त व्हावी. जशी साधारण व्यक्ती २-४ मिनिटे संकल्प
चालविल्या नंतर आणि विचार केल्या नंतर सफलता अथवा प्राप्ती करू शकते; तेच तुम्ही
१-२ सेकंदामध्ये करू शकता, यालाच म्हणतात - ‘कम खर्चा बाला नशीन’. खर्च कमी करा
परंतु प्राप्ती १०० पटीने असावी; यामुळे वेळेची आणि संकल्पाची जी बचत होईल, ती
इतरांच्या सेवेमध्ये वापरू शकाल, दान-पुण्य करू शकाल, हाच योगाचा प्रयोग आहे.