26-04-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
31.12.2009 ओम
शान्ति
मधुबन
“नवीन वर्षामध्ये
सर्व आत्म्यांना संदेश देऊन गोल्डन वर्ल्डची गिफ्ट द्या, पित्या समान बनण्यासाठी
देही-अभिमानी होऊन राहण्याची नेचर नॅचरल बनवा”
आज बापदादा प्रत्येक
मुलाला स्नेह आणि बापदादांच्या प्रेमामध्ये लवलीन स्वरूपामध्ये पाहत आहेत. एक-एक
बच्चा परमात्म प्रेमामध्ये चमकत आहे. सर्व मुले प्रेमाच्या विमानामधून पोहोचले आहेत.
तसे तर न्यू ईयर साजरे करण्यासाठी आले आहेत परंतु सर्वांच्या डोळ्यांमध्ये काय
दिसून येत आहे? न्यू ईयर, नवीन वर्ष तर निमित्त मात्र आहे परंतु तुम्हा सर्वांच्या
डोळ्यांमध्ये कोणता उमंग आहे? तीन शुभेच्छा देत आहात. एक आपल्या नवीन जीवनाची
शुभेच्छा आणि दुसरी नवीन युगाची शुभेच्छा आणि तिसरी परिवाराला आणि बाबांना भेटण्याची
शुभेच्छा. तुमच्या डोळ्यांसमोर काय फिरत आहे? आपले नवीन युग समोर येत आहे ना!
मनामध्ये उमंग येत आहे की नवीन युग आले की आले. नवीन युगातील चमकणारा ड्रेस इतका
समोर स्पष्ट आहे की आज संगमयुगमध्ये आहोत आणि लवकरच हा चमकणारा ड्रेस घालायचा आहे.
समोर पाहून-पाहून आनंदीत होत आहेत. निरोप देखील देत आहात आणि शुभेच्छा देखील घेत
आहात. जसे जुन्या वर्षाला निरोप देतात मग ते वर्ष विसरून जाते, नवीन वर्षच समोर येते.
असेच तुमच्या समोर जुन्या दुनियेला शुभेच्छा नाहीत, परंतु नवीन दुनियेला शुभेच्छा
देत आहात. जुन्या दुनियेला निरोप देत आहात. तर आज सर्वांना उमंग-उत्साह आहे नवीन
युगाचा, लोक देखील नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात आणि सोबत गिफ्ट देखील देतात. तर
बापदादा देखील तुम्हा मुलांना जुन्या स्वभाव संस्काराला निरोप देऊन नवीन दुनियेमध्ये
जाण्याची गिफ्ट देत आहेत, ज्या नवीन दुनियेमध्ये प्राप्तीच प्राप्ती आहे. शॉर्टमध्ये
हेच म्हटले जाते - ‘नवीन दुनियेमध्ये कोणतीही वस्तू अप्राप्त नाही’. अशी गोल्डन
वर्ल्डची गिफ्ट बापदादांनी तुम्हा प्रत्येक मुलाला सौगातमधे दिली आहे. तुम्हाला
देखील नशा आहे ना की आम्ही गोल्डन वर्ल्डचे अधिकारी बनत आहोत. अशी गिफ्ट इतर कोणीही
देऊ शकत नाही. बाबांनी प्रत्येक मुलाला हे डायरेक्शन दिले आहे की सर्व आत्म्यांना
हा बाबांचा वारसा गोल्डन वर्ल्डचा संदेश देऊन त्यांना देखील तुम्ही गिफ्ट द्या.
तुमच्यापाशी कोणती गिफ्ट आहे? एक तर नवीन दुनियेची गिफ्ट द्या आणि दुसरे तुमच्यापाशी
भरपूर खजिने आहेत. गुणांचा खजिना, शक्तींचा खजिना, स्वमानाचे खजिने, किती खजिने
आहेत. तर सर्वांना कोणता ना कोणता गुण, कोणत्या ना कोणत्या शक्तीची गिफ्ट द्या ज्या
गिफ्टने त्यांचे जीवन बदलून जाईल आणि गोल्डन वर्ल्डचे अधिकारी बनतील कारण आजकाल बघत
आहात चोहो बाजूला दुःख, अशांती वाढत आहे. चोहो बाजूला प्रत्येकामध्ये भय आणि चिंता
भरून राहिलेली आहे. अशा दुःखी अशांत आत्म्यांना कमीत-कमी हा संदेश जरूर द्या की आता
बाबा आले आहेत आतापासून अविनाशी वारशाचे अधिकारी बना. असा संदेश प्रत्येक आत्म्याला
देतही आहात परंतु अजूनही कितीतरी बाबांची मुले संदेशापासून देखील वंचित राहिली आहेत.
तरी देखील एका पित्याची मुले आहात ना तर आपल्या भाऊ-बहिणींना ही संदेशाची गिफ्ट
जरूर द्या. कोणीही राहून जाऊ नये. सेवा करत आहात, बापदादा मुलांची सेवा पाहून खुश
आहेत परंतु बाबांची हीच इच्छा आहे की माझा एकही बच्चा संदेशाविना राहू नये. त्याने
तक्रार करू नये की, तुम्हाला गोल्डन वर्ल्डची सौगात मिळाली आणि आम्हाला कळलेच नाही.
आमचे बाबा आले परंतु आम्हाला संदेश मिळाला नाही म्हणून या नवीन वर्षामध्ये हाच
प्रयत्न करा, आपसात प्लॅन बनवा की कोणताही कानाकोपरा राहू नये. तक्रार ऐकावी लागू
नये, परंतु आनंदित व्हावेत, त्यांना समजू तर दे की आपले बाबा आले आहेत. वंचित राहू
नयेत. तर या नवीन वर्षामध्ये काय करणार? आपसात मिळून प्लॅन बनवा, बापदादांना
प्रत्येक मुला विषयी दया वाटत आहे. तर तुम्हाला देखील भाऊ-बहिणींवर आता विशेष दयाळू,
कल्याणकारी स्वरूप धारण करून सर्वांना संदेश द्यायचा आहे. कमीत-कमी अशी तरी तक्रार
करायला नकोत.
आज सर्व मुले नवीन
वर्ष साजरे करण्याच्या उमंग-उत्साहाने पोहोचले आहेत. बापदादा एका-एका मुलाला पाहून
कोणते गाणे गातात? जाणता ना! वाह मुलांनो वाह! जे पहिल्यांदा जरी आले आहेत त्यांना
देखील बापदादा म्हणत आहेत की, लक्की आहात जे वेळ समाप्त होण्यापूर्वी बाबांचे बनलात.
नवीन मुलांना बापदादा पद्म-पद्मपटीने लक्की (नशीबवान) बनण्याची मुबारक देत आहेत.
आजकाल बापदादा एक गोष्ट सर्व मुलांमध्ये पाहू इच्छित आहेत; जाणता कोणती गोष्ट आहे?
जसे प्रत्येकाच्या मनामध्ये उमंग आहे, लक्ष्य आहे की आम्ही पित्या समान बनणारच आहोत,
बनणार नाही, तर बनणारच आहोत; तर मग जसे लक्ष्य आहे, असे आता बापदादा लक्ष्या सोबत
लक्षण देखील पाहू इच्छित आहेत. जसे समान बनण्याचे ‘लक्ष्य’ आहे असेच समान बनण्याचे
‘लक्षण’ देखील असावे. आता लक्ष्य खूप उच्च आहे परंतु लक्षणावर विशेष अटेंशन द्यायचे
आहे. समान, जितके मोठे लक्ष्य तितकेच मोठे लक्षण असावे. आता काही-काही मुलांना
लक्षण धारण करावेसे वाटत आहे परंतु तरी देखील अधून-मधून असेही म्हणतात, इच्छा खूप
आहे परंतु… तर हा ‘परंतु’ निघून जावा. तुमचे वर्तन आणि चेहेरा दुरूनच जितके मोठे
लक्ष्य आहे, तितके लक्षण चेहेऱ्यावरून दिसून यावे, वर्तनामधून दिसून यावे. जसे
तुम्ही अगोदर देह-अभिमानामध्ये होता परंतु जेव्हा देह-अभिमानामध्ये होता तर
देह-अभिमानाची नेचर नॅचरल होती (देह-अभिमानाचा स्वभाव नैसर्गिक झाला होता), कधी
पुरुषार्थ केलात का की देह-अभिमान यावा, देह-अभिमान स्वाभाविक राहिला. अर्धा कल्प
यासाठी काही पुरुषार्थ केला नाहीत; असेच आता देखील देही-अभिमानी बनण्याचे नेचर
नॅचरल आहे! जर का देह-अभिमानाची नेचर नॅचरल राहिली, कधी आठवते का की
देह-अभिमानामध्ये यावे, असा पुरुषार्थ केला आहे? आता देखील देह-अभिमान आणि
देही-अभिमान, तर मग देही-अभिमानी बनण्यामध्ये देखील मेहनत का करावी लागत आहे! कारण
बापदादांपाशी समाचार येतात की, कधी-कधी देह-अभिमानाला नाहीसा करण्यासाठी मेहनत करावी
लागते. जर देह-अभिमान नॅचरल राहिला तर देही-अभिमानामध्ये मेहनत का? तर बापदादांना
मुलांची मेहनत आवडत नाही. मेहनत मुक्त बनावेत आणि नॅचरल नेचर बनावी, याला म्हटले
जाते लक्ष्य आणि लक्षण समान. मग तुम्ही बघाल पित्या समान बनणे खूप सोपे आणि नॅचरल
वाटेल. जसे ब्रह्मा बाबांना बघितले इतक्या मोठ्या परिवाराची जबाबदारी असून देखील
नॅचरल नेचर देही-अभिमानीचे राहिले. भले मुलांवर देखील जबाबदारी आहे परंतु ब्रह्मा
बाबांसमोर ती जबाबदारी काय वाटते! कोणतीही जबाबदारी आहे, समजा झोनची जबाबदारी आहे,
किंवा कोणती ऑफिशियल यज्ञ कार्यव्यवहाराची जबाबदारी आहे परंतु ती जबाबदारी ब्रह्मा
बाबांसमोर काय आहे! ब्रह्मा बाबांनी शिवबाबांच्या मदतीने प्रॅक्टिकलमध्ये दाखवून
दिले की, करावनहार करत आहेत, मी करनहार बनून पित्या समान न्यारा आणि प्यारा आहे. तर
जेव्हा पित्या समान बनू इच्छिता तर हे चेक करा की कोणत्याही भले मग मनसा, किंवा वाचा,
किंवा कर्मणा ड्यूटीज् आहेत परंतु मी करनहार आहे, ट्रस्टी आहे, करावनहार मालक
शिवबाबा आहेत, हा करावनहारचा धडा चालता-चालता विसरायला होतो. तर लक्ष्य आणि लक्षण
दोघांनाही समान बनवायचे आहे. आता जुन्या वर्षाला निरोप देण्यासोबत या लक्ष्याला
लक्षणामध्ये आणायचे आहे. नवीन वर्ष तर नवीन गोष्टी. ‘काय करू, माया येते, इच्छा नसते
परंतु येते…’ असे शब्द अथवा संकल्प जुन्या वर्षासोबत यांना देखील निरोप द्या. केवळ
वर्षाला निरोप देऊ नका. बापदादांनी सांगितले होते की माया देखील बापदादांपाशी येते
आणि काय म्हणते? मी तर समजते, माझी जाण्याची वेळ आली आहे, परंतु काहीकाही मुले माझे
आवाहन करतात तर मी काय करू. तर आज निरोप देण्यासोबत मायेच्या वेगवेगळ्या रूपांना
देखील निरोप द्यायचा आहे. आहे हिंमत? हिंमत आहे का? हात वर करा. निरोप देण्याची
हिंमत आहे? मागे बसणाऱ्यांमध्ये हिंमत आहे? ज्यांच्यामध्ये हिंमत आहे, त्यांनी हात
वर करा. तर बाबा या हिंमतीसाठी खूप पद्म-पद्म पटीने शुभेच्छा देत आहेत. कशासाठी? का
बापदादा यावर जोर देत आहेत? कारण तुम्ही सगळे बघत आहात दुनियेची हालत वेगाने
बिघडायला सुरुवात झाली आहे आणि बापदादांचे हे महावाक्य काही काळापासून चालू आहे की,
अचानक होणार आहे. मग अचानक होणार आहे आणि जर दीर्घकाळाचा अभ्यास नसेल तर सांगा बरें
अशा अचानकच्या वेळी अभ्यासाची गरज आहे ना! अलीकडेच बघा बापदादांनी होमवर्क दिला, १०
मिनिट, टोटल २४ वेळा १०-१० मिनिटाचा होमवर्क दिला, तर बऱ्याच मुलांना कठीण वाटत आहे.
तर विचार करा, जर १० मिनिटे अभ्यास होऊ शकत नाही तर अचानकच्या वेळी त्यावेळी काय
कराल? बापदादा जाणतात की २४ वेळा करण्यासाठी काहींना वेळ थोडा कमी मिळतो, परंतु
बापदादांनी ट्रायल केली आहे की, १० मिनिटे एकाच स्मृतीमध्ये जेव्हा हवे, जसे हवे तसे
करू शकता; बापदादा असे म्हणत नाहीत की, आताही १० मिनिटे करा, ठीक आहे, नाही होऊ शकत,
ज्यांना जमते आहे त्यांनी करा, जर नसेल जमत तर ५ मिनिटे करा, ५ मिनिटांपासून ६
मिनिटे, ७ मिनिटे, जितका वेळ वाढवू शकता तेवढा प्रयत्न करा. बापदादा स्वतःच सांगत
आहेत यामध्ये काही सक्तीची गोष्ट नाहीये. जर १० मिनिटे जास्त वेळ वाटत असेल तर चला
८ मिनिटे करा, ९ मिनिटे करा, जितके जास्त करू शकता तितकी सवय लावा कारण दीर्घकाळाचे
वरदान प्रॅक्टिकल मध्ये आताच वापरू शकता. आत्ता जर दीर्घकाळाचा अभ्यास नसेल तर
आताच्या दीर्घकाळाच्या पुरुषार्थाची प्राप्ती जी अर्ध्याकल्पासाठी आहे, त्या
दीर्घकाळामध्ये फरक पडेल. तर जितकी शक्य आहे तितकी बापदादांनी सूट दिलेली आहे, ५
मिनिटांपेक्षा जास्त करा, १० मिनिटे होऊ शकत नसेल तर ७ मिनिटे करा, ८ मिनिटे करा, ५
मिनिटांची देखील सूट आहे. परंतु कधीही जर १० मिनिटे होत असेल तर चांगलेच आहे. एकवेळ
अशी येईल जेव्हा तुम्हा लोकांना स्वतःसाठी आणि विश्वासाठी देखील किरणे द्यावी
लागतील. म्हणून बापदादा सूट देत आहेत, जितका जास्त वेळ करू शकता, तितकी प्रॅक्टिस
करा कारण आताचा दीर्घकाळ भविष्याचा आधार आहे. ठीक आहे? कठीण वाटते, काही हरकत नाही,
आता तरी काही हरकत नाही, आणि बाबांना सांगितलेत हे खूपच चांगले केले; कारण समजा १०
मिनिटे सुद्धा तुम्ही बसू शकत नसाल, विचार करण्यातच वेळ निघून गेला, तर ५ मिनिटे
देखील वाया गेली, म्हणून बाप-दादा म्हणतात कमीतकमी ५ मिनिटांपेक्षा कमी वेळ करू नका.
जितका वेळ वाढवू शकता तितका वाढवा. ठीक आहे, स्पष्ट झाले? कारण बापदादा प्रत्येकाला
खूप श्रेष्ठ स्वरूपामध्ये बघत आहेत. याची निशाणी म्हणजे बापदादांनी प्रत्येक मुलाला
किती स्वमान दिले आहेत. स्वमानाची लिस्ट जर काढाल तर किती मोठी आहे?
आज बापदादा अमृतवेलेला
फेरी मारण्यासाठी गेले. काय बघायला गेले? बापदादांनी स्वमानाची खूप मोठी माळा दिली
आहे. जर एका-एका स्वमानामध्ये स्थित होऊन त्या स्थितीमध्ये बसून रहा, चालत रहा; तर
स्वमान स्मरत जा आणि माळा फिरवत जा तर खूप मजा येईल. स्वमानाची लिस्ट ठेवली आहे
परंतु एक-एक स्वमान किती मोठा आहे आणि कोणी दिला आहे! वर्ल्ड ऑलमाइटी ऑथॉरिटीने
प्रत्येक मुलाला अनेक स्वमानांची लिस्ट दिली आहे. त्याला यूज करा कारण दुसरी कोणती
ऑथॉरिटी नाही जी तुमच्या या स्वमानाची ताकद कमी करू शकेल. इतर कोणालाही इतकी
स्वमानांची माळा मिळालेली नाहीये. तर बापदादांनी पाहिले सतयुगामध्ये तर राज्य भाग्य
मिळेल परंतु ही स्वमानाची माळा संगमयुगाची देणगी आहे. बापदादा जेव्हा पण मुलांना
बघतात तेव्हा प्रत्येक मुलाला स्वमानाच्या स्थितीप्रमाणे बघतात - वाह बच्चा वाह! तर
स्वमानाच्या ऑथॉरिटी मध्ये रहा, ‘मी कोण’! कधी कोणता स्वमान समोर ठेवा, कधी कोणता
स्वमान समोर ठेवा आणि चेक करा की, आज अमृतवेलेला जो विशेष स्वमान बुद्धीमध्ये ठेवला
होता, त्याला मी यूज केले का! हे स्वमान एक प्रकारे खजिना आहेत ना, कारण खजिना
वाढविण्याचे साधन आहे - जितके खजिन्याला कार्यामध्ये वापराल तितका खजिना वाढतो. तर
आज बापदादा बघत होते की, कोण-कोण मुले अशी आहेत, कोणाकडे स्वमानाच्या स्मृतीची माळा
मोठी होती, कोणाकडे छोटी. जिथे स्वमान असेल तिथे देहभान नष्ट होते. तर आज बापदादांनी
फेरी मारली आणि पाहिले; जसा स्वमानाचा खजिना आहे, तसा एक-एक शक्ती, एक-एक गुण त्याचा
वापर करा, कार्यामध्ये लावा. तर हा जो प्रॉब्लेम येतो की माया आली, तर माया येत नाही;
परंतु मायेच्या बाबतीत तर बाबांनी सांगितले आहे की, माया म्हणते - माझे आवाहन करतात
तेव्हा मी जाते, अशीच जात नाही, कोणताही हलका संकल्प करणे अर्थात मायेला आवाहन केले,
शक्तींना सोडले आणि मायेला आवाहन केले. इच्छा नसते परंतु येते. शक्तिशाली कोण? इच्छा
नसते परंतु येते, याचा अर्थ माया शक्तिशाली झाली की तुम्ही? तर आज जुने वर्ष समाप्त
होत आहे, नवीन वर्षामध्ये नवीन उमंग, नवीन उत्साह, कारण संगमयुगाचे गायन आहे,
प्रत्येक दिवस उत्साहाने भरलेला आहे अर्थात उत्सव आहे. तर उमंग-उत्साह आहे तर
प्रत्येक दिवस उत्सव आहे त्यामुळे तो टिकवून ठेवा, रोज आपला चालता-फिरता देखील
चार्ट पहा. चेक करा, चेक कराल तर चेंज कराल ना. चेकच केले नाहीत तर चेंज कसे कराल!
आज नवीन वर्षासाठी
बापदादांचा विशेष हाच संकल्प आहे की प्रत्येक मुलाने जसा जुन्या वर्षाला निरोप देता
तसा मायेला निरोप द्या. व्यर्थ संकल्पांना निरोप द्या कारण मेजॉरिटी हेच दिसून आले
आहे की, व्यर्थ संकल्प जास्त येतात. विकारी संकल्प कमी आहेत, परंतु व्यर्थ जे आहेत,
त्याचे नामोनिशाण समाप्त व्हावे, प्रत्येक संकल्प समर्थ असावा, व्यर्थ नसावा कारण
व्यर्थ संकल्पामध्ये, केवळ संकल्पच चालत नाही परंतु टाइम देखील व्यर्थ जातो आणि
पित्या समान बनण्यामध्ये अंतर निर्माण होते. तुमची इच्छा तर आहे समान बनावे,
त्यामुळे हात तर वर केला आहे. परंतु बापदादा नेहमी म्हणतात की, मनाचा हात वर करा,
हा स्थूल हात वर करणे तर सोपे आहे. तर निरोप देण्याची हिंमत आहे? आहे हिंमत? हात वर
करा. अच्छा, हिंमतवाले आहेत. बस्स, हिंमतीला टिकवून ठेवा. जर हिंमत असेल तर जे
लक्ष्य ठेवले आहे ते नक्कीच साध्य होईल; कारण बापदादा देखील सोबत आहेत. बापदादांची
इच्छा आहे की, माझ्या कोणत्याही मुलाने मागे राहू नये. हातात हात देऊन चालावा. शिव
बाबा निराकार आहेत, हात नाही आहेत परंतु श्रीमत हेच त्यांचे हात आहेत. पावलो-पावली
श्रीमतवर चालणे अर्थात हातामध्ये हात देऊन चालणे. तर सर्वांना नवीन वर्षाची नवीन
जीवनाची आणि नवीन युगाची तिन्हींची पद्म-पद्मपटीने मुबारक असो. अच्छा.
आता चोहो बाजूच्या
देश-विदेशातील बाबांच्या प्रत्येक प्रिय, बाबांच्या लाडक्या, बाबांच्या सिकीलध्या
मुलांना विदाई आणि बधाई (निरोप आणि शुभेच्छा). आणि बापदादांनी सांगितले आहे की,
जुन्या वर्षा सोबतच जुन्या संस्काराला देखील निरोप देणाऱ्या, स्वभावाला देखील निरोप
देणाऱ्या महावीर मुलांना, प्रत्येक पावलामध्ये पद्मांची कमाई करणाऱ्या, बापदादा जे
स्वमान देतात, त्या स्वमानामध्ये स्थित राहून त्याचा अनुभव करणाऱ्या, प्रत्येक
मुलाला बापदादा अशा रूपामध्ये पाहतात की हा प्रत्येक बच्चा २१ जन्मांच्या वारशाचा
अधिकारी, साऱ्या कल्पामध्ये २१ जन्मांसाठी अधिकारी बनण्याचा वारसा तुम्हा मुलांनाच
मिळतो. तर चोहो बाजूच्या अशा श्रेष्ठ अधिकारी मुलांना बापदादा, पिता, शिक्षक आणि
गुरूच्या रूपामध्ये तिन्ही रूपांनी प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते देत आहेत.
वरदान:-
सेवा आणि
पुरुषार्थामध्ये सफलता प्राप्त करणारे डबल ताजधारी भव
संगमयुगावर सदैव
स्वतःला डबल ताजधारी समजून चला; एक - लाइटचा ताज अर्थात प्युरिटीचा ताज आणि दुसरा -
जबाबदारीचा ताज. प्युरिटी आणि पॉवर - लाइट आणि माइटचा क्राऊन धारण करणाऱ्यांमध्ये
नेहमी डबल फोर्स कायम असतो. असे डबल फोर्स असणारे आत्मे नेहमीच शक्तिशाली असतात.
त्यांना सेवा आणि पुरुषार्थामध्ये सदैव सफलता प्राप्त होते.
सुविचार:-
दिव्य गुणांच्या
आधारावर मन-वचन आणि कर्म करणे - हीच दिव्यता आहे.
हे अव्यक्त इशारे -
महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.
कोणत्याही वस्तूला
गरम करून नरम केले जाते, नंतर मग मोल्ड केले जाते. इथे देखील गरम आहे - शक्ती रूप
आणि नरम आहे - निर्मानता अर्थात स्नेह रूप. ज्याच्यामध्ये प्रत्येक आत्म्याप्रती
स्नेह असेल तोच नम्रचित्त राहू शकतो. स्नेह नसेल तर ना दयाळू बनू शकणार, ना
नम्रचित्त. शक्तीरूपामध्ये आहे - मालकीपणा आणि नम्रतेमध्ये आहे - सेवेचा गुण. तर
जेव्हा असे नरम आणि गरम दोन्ही रहाल तेव्हाच प्रत्येक गोष्टीमध्ये मोल्ड होऊ शकाल.