27-03-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो - ज्ञान सागर बाबांद्वारे तुम्ही मास्टर ज्ञान सागर बनले आहात, तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, त्यामुळे तुम्ही त्रिनेत्री, त्रिकालदर्शी आणि त्रिलोकीनाथ आहात”

प्रश्न:-
विश्वाची रुहानी (आत्मिक) सेवा तुम्हा मुलांशिवाय कोणीही करू शकत नाही - असे का?

उत्तर:-
कारण तुम्हालाच सुप्रीम रुहची (शिवबाबांची) शक्ती मिळते. अगोदर तुम्हा आत्म्यांना सुप्रीम रुह कडून (परम आत्म्याकडून) ज्ञानाचे इंजेक्शन दिले जाते, ज्यामुळे तुम्ही ५ विकारांवर स्वतः देखील विजय प्राप्त करता आणि दुसऱ्यांना देखील विजय प्राप्त करवून देता. अशी सेवा इतर कोणीही करू शकत नाही. कल्प-कल्प तुम्ही मुलेच ही रुहानी सेवा (आत्मिक सेवा) करता.

ओम शांती।
बाबांच्या आठवणीमध्ये बसायचे आहे दुसऱ्या कोणत्याही देहधारीच्या आठवणीमध्ये बसायचे नाही. नवीन जे येतात ते तर बाबांना जाणतही नाहीत. त्यांचे नाव तर खूप सोपे आहे - शिवबाबा. बाबांना मुले जाणत नाहीत, किती अजब आहे. शिवबाबा उच्च ते उच्च, सर्वांचे सद्गती दाता आहेत. सर्व पतितांचे पावन कर्ता, सर्वांचे दुःख हर्ता देखील म्हटले जाते, परंतु ते कोण आहेत हे मात्र तुम्हा बी.कें. शिवाय इतर कोणीही जाणत नाहीत. तुम्ही आहात त्यांची नातवंडे. तर मग जरूर आपल्या पित्याला आणि त्यांच्या रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणतील. पित्याद्वारेच मुले सर्व काही जाणून घेतात. ही आहेच पतित दुनिया. सर्व कलियुगी पतितांना सतयुगी पावन कसे बनवितात ते तर तुम्हा बी.कें. शिवाय दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. कलियुगी दुर्गती मधून बाहेर काढणारा आणि सतयुगी सद्गती दाता एक बाबाच आहेत. शिवजयंती देखील भारतामध्येच होते. जरूर ते येतात परंतु येऊन भारताला काय देतात, हेच भारतवासी जाणत नाहीत. दरवर्षी शिवजयंती साजरी करतात परंतु ज्ञानाचा तिसरा नेत्रच नाहीये त्यामुळे बाबांना जाणत नाहीत.

गीत:- नयनहीन को राह दिखाओ…

हे मनुष्यांनीच बनवलेले गाणे आहे की आम्ही सर्व नयनहीन आहोत. हे स्थूल नेत्र तर सर्वांना आहेत परंतु तरीही स्वतःला नयन हीन का म्हणतात? ते बाबा बसून समजावून सांगत आहेत की, ज्ञानाचा तिसरा नेत्र कोणालाच नाही आहे. बाबांना न जाणणे हे झाले - अज्ञान. बाबांना बाबांद्वारे जाणणे याला म्हटले जाते - ज्ञान. बाबा ज्ञानाचा तिसरा नेत्र देतात, ज्याद्वारे तुम्ही साऱ्या रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणता. ज्ञान सागराची तुम्ही मुले मास्टर ज्ञान सागर बनता. तिसरा नेत्र अर्थात त्रिनेत्री, त्रिकालदर्शी, त्रिलोकीनाथ बनता. भारतवासी हे जाणत नाहीत की हे लक्ष्मी-नारायण जे सतयुगाचे मालक होते, यांना हा वारसा कसा मिळाला? ते कधी आले? आणि मग कुठे गेले? पुन्हा राज्य कसे घेतले? काहीही जाणत नाहीत. हे देवता पावन आहेत ना. पावन तर जरुर बाबाच बनवणार.

तुम्हा भारतवासीयांना बाबा बसून समजावून सांगत आहेत. जे देवतांना, शिवाला मानतात. शिवाचा जन्म देखील भारतामध्ये झाला आहे. उच्च ते उच्च आहेत भगवान. शिव जयंती देखील इथे साजरी करतात. जगत अंबा, जगत पिता ब्रह्मा आणि सरस्वती यांचा देखील जन्म इथेच होतो. लक्ष्मी-नारायणाचा जन्म देखील इथेच होतो, तेच राधे-कृष्ण आहेत, हे देखील भारतवासी जाणत नाहीत. म्हणतात - ‘पतित-पावन या’, तर जरूर सर्वजण पतित आहेत. साधू-संत, ऋषी-मुनी इत्यादी सर्वजण बोलावतात की, आम्हाला पावन बनविण्यासाठी या. आणि दुसऱ्या बाजूला पाप धुण्यासाठी कुंभमेळा इत्यादी ठिकाणी जातात. समजतात की गंगा पतित-पावनी आहे. बोलावतात की, ‘पतित-पावन या’, तर मनुष्य कसे कोणाला पावन बनवू शकतील? बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही अगोदर देवी-देवता धर्माचे होता तर सर्वजण पावन होता. आता पतित आहात. म्हणतात की, ‘राह बताओ प्रभू’. तर कोणता मार्ग? म्हणतात - ‘बाबा, जीवनमुक्तीचा मार्ग सांगा. आमच्यामध्ये ५ विकार आहेत. बाबा, आम्ही सर्व स्वर्गामध्ये होतो तेव्हा निर्विकारी होतो. आता विकारी पतित बनलो आहोत, याचे काही रहस्य तर समजावून सांगा’. या काही दंतकथा नाहीत. बाबा समजावून सांगतात - श्रीमद् भगवद गीता किंवा परमात्म्याने ऐकवलेली गीता आहे. पतितांना पावन बनविणारे आहेत निराकार भगवान. मनुष्याला भगवान म्हणू शकत नाही. बाबा म्हणतात - इतके मोठे-मोठे गुरु असून देखील भारत इतका पतित, कवडी समान का बनला आहे. कालचीच गोष्ट आहे की भारत खंड स्वर्ग होता. बाबांनी भारतवर्षाला स्वर्गाची सौगात (भेट) दिली होती. पतित भारतवासीयांना येऊन राजयोग शिकवून पावन बनविले होते. आता पुन्हा बाबा मुलांकडे सेवाधारी बनून आले आहेत. बाबा आहेत रुहानी सेवाधारी. बाकीचे तर सर्व मनुष्यमात्र आहेत देहधारी सेवाधारी. संन्यासी देखील देहधारी सेवाधारी आहेत. ते बसून ग्रंथ इत्यादी बसून ऐकवतात. बाबा म्हणतात की, ‘मी निराकार येऊन साकार साधारण वृद्ध तनामध्ये प्रवेश करून मुलांना समजावून सांगतो - माझ्या भारतवासी मुलांनो, पहा रुहानी बाबा आत्म्यांना बसून समजावून सांगत आहेत. हे ब्रह्मा ऐकवत नाहीत परंतु निराकार बाबा ते या तनाचा आधार घेतात. शिवाला तर स्वतःचे शरीर नाहीये. शाळीग्राम आत्म्यांना तर आपले-आपले शरीर आहे. पुनर्जन्मामध्ये येता-येता पतित बनतात. आता तर सारी दुनिया पतित आहे. एकही पावन नाही. तुम्ही सतोप्रधान होता नंतर मग भेसळ पडल्यामुळे सतो पासून रजो, तमो मध्ये आला आहात. तुम्हा भारतवासीयांकडे येऊन शिवबाबा शरीर धारण करतात ज्याला भागीरथ (भाग्यशाली रथ) असे देखील म्हणतात. मंदिरांमध्ये शंकराचे चित्र दाखवतात कारण ते शिव-शंकर एकच आहेत असे समजतात. हे समजत नाहीत की शिव तर निराकार आहेत, शंकर तर आकारी आहे. शिव-शंकर एकत्र कसे काय म्हणतात. अच्छा, तर मग नंदीवर स्वारी कोण करतात. शिव की शंकर? सूक्ष्मवतनमध्ये नंदी कुठून आला? शिव राहतात मूलवतन मध्ये, शंकर राहतात सूक्ष्मवतनामध्ये. मूलवतनामध्ये सर्व आत्मे आहेत. सूक्ष्मवतनामध्ये फक्त ब्रह्मा, विष्णू, शंकर आहेत, तिथे पशु असत नाहीत. बाबा म्हणतात - मी सामान्य वृद्ध तनामध्ये प्रवेश करून तुम्हाला समजावून सांगतो. तुम्ही मुले आपल्या जन्मांना जाणत नाही. सतयुगापासून तुम्ही किती जन्म घेतले आहेत? ८४ जन्म घेतले आहेत. आता हा आहे अखेरचा जन्म. भारत जो अमरलोक पावन होता, तो आता मृत्यूलोक, पतित आहे. सर्वांचे सद्गती दाता तर एक आहेत ना. रुद्रमाळा आहेच मुळी परमपिता परमात्मा निराकार शिव बाबांची. श्री श्री १०८ रुद्रमाळा म्हटली जाते. सर्वजण शिवबाबांच्या गळ्यातील हार आहेत. बाबा तर आहेत पतित-पावन सर्वांचे सद्गती दाता, सर्वांना वारसा देणारे. लौकिक पित्याकडून हदचा वारसा मिळतो ज्याला संन्यासी काग विष्ठा समान सुख समजतात. बाबा म्हणतात की, खरोखर हे तुमचे सुख काग-विष्ठे समान आहे. बाबाच येऊन पतितांना पावन किंवा काट्यांना ज्ञानाद्वारे फूल बनवतात. हे गीतेचे नॉलेज आहे. हे ज्ञान कोणताही मनुष्य सांगू शकत नाही. ज्ञान सागर पतित-पावन बाबाच समजावून सांगू शकतात. बाबांकडूनच वारसा मिळतो, जो तुम्ही घेत आहात. फक्त तुम्हीच सद्गतीकडे जात आहात. आता तर संगमावर आहात, ते तर कलियुगामध्ये आहेत. आता आहे कलियुगाचा अंत. महाभारत युद्ध देखील समोर उभे आहे. पाच हजार वर्षांपूर्वी देखील जेव्हा तुम्ही राजयोग शिकत होता तेव्हा भंभोरला (साऱ्या दुनियेला) आग लागली होती. आता तुम्ही असे लक्ष्मी-नारायण बनण्यासाठी राजयोग शिकत आहात. बाकीचा तर आहे भक्तिमार्ग. बाबा जेव्हा येतात तेव्हा येऊन स्वर्गाचे दार उघडतात. बाबा म्हणतात की ह्या ‘शिवशक्ती भारतमाता’ तर श्रीमतावर भारताला स्वर्ग बनवतात. तुम्ही आहात ‘शिवशक्ती भारतमाता’, ज्या साऱ्या विश्वाला स्वर्ग बनवत आहात. तुम्ही आहातच शिवाची संतान, त्यांचीच आठवण करता. शिवाकडून शक्ती घेऊन ५ विकार रूपी शत्रूंवर विजय मिळवता. तुम्ही मुलांनी ५ हजार वर्षांपूर्वी देखील भारताची रुहानी सेवा केली होती. ते सोशल वर्कर भौतिक सेवा करतात. ही आहे रुहानी सेवा. सुप्रीम रुह (परम आत्मा) येऊन आत्म्याला इंजेक्शन देतात, शिकवतात. आत्माच ऐकते. तुम्ही आत्मे आहात. तुम्हीच ८४ जन्म घेता. एक शरीर सोडून दुसरे घेता. ८४ जन्म घेऊन ८४ आई-वडील बनवले आहेत. सतयुग-त्रेतामध्ये तुम्ही स्वर्गाचे सुख प्राप्त केले, आता पुन्हा बेहदच्या बाबांकडून सुखाचा वारसा घेत आहात. बरोबर भारत खंडामध्ये या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. तिथे असूर इत्यादी कोणीही नव्हते. तुम्ही जाणता आता या जुन्या दुनियेला आग लागणार आहे. मी येऊन ज्ञान यज्ञ रचतो. तुम्ही सर्व पवित्र देवता बनत आहात. असे हजारो आहेत जे देवता बनण्याचा पुरुषार्थ करत आहेत. बाबा आले आहेत मुलांची सद्गती करण्याकरिता. तुम्हा मुलांना काट्यांपासून फूल बनवत आहेत. तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र देत आहेत ज्याद्वारे तुम्ही संपूर्ण ड्रामा आणि शिवबाबांचा पार्ट कसा बजावला जातो ते सर्व जाणता. ब्रह्मा आणि विष्णूचा काय संबंध आहे, ते देखील जाणता. ते (दुनियावाले) दाखवतात की विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा निघाला. ब्रह्माच पुढे जाऊन विष्णू बनतात. मग ब्राह्मण सो देवता. विष्णूला ब्रह्मा बनण्यासाठी ५ हजार वर्षे लागली. हे ज्ञान तुम्हाला आहे. तुम्हा ब्राह्मणांच्या नाभी कमळामधून विष्णुपुरी प्रकट होत आहे. त्यांनी तर चित्र बनवले आहे की विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा निघाला. आणि मग सर्व वेद-शास्त्रांचे सार ऐकवले. आता तुम्ही ब्रह्माद्वारे संपूर्ण सार समजता. बाबा म्हणतात - मुख्य धर्मशास्त्र ४ आहेत, पहिले आहे दैवी धर्माचे शास्त्र - गीता. गीता कोणी गायली? शिवबाबांनी. ज्ञान सागर, पतित पावन, सुखाचा सागर शिवबाबा आहेत. त्यांनी बसून भारतखंडाला स्वर्ग बनवले, श्रीकृष्णाने नाही. श्रीकृष्ण तर माझ्याकडून ज्ञान ऐकून मग श्रीकृष्ण बनला. तर ही गुप्त गोष्ट झाली ना. नवीन मुले या गोष्टींना समजू शकणार नाहीत.

शिवबाबांनी स्वर्गाची स्थापना केली, त्यामध्ये हे लक्ष्मी-नारायण राज्य करत होते. आता तुम्ही मनुष्या पासून देवता बनत आहात. बाबा म्हणतात - या मृत्युलोक, दुःखधाममध्ये तुमचा शेवटचा जन्म आहे. भारत अमरलोक होता. तिथे दुःखाचे नाव सुद्धा नव्हते. भारत परिस्तान होता, आता कब्रस्तान बनला आहे, पुन्हा परिस्तान होईल. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. ही आहे मनुष्या पासून देवता बनण्याची पाठशाळा. हा काही संन्याशांचा सत्संग नाहीये, जिथे बसून शास्त्र ऐकवतात. या गोष्टींना नवीन असणारा कोणीही समजू शकणार नाही जोपर्यंत ७ दिवसांचा कोर्स करत नाही. या वेळी भक्त तर सर्व मनुष्यमात्र आहेत, त्यांची आत्मा देखील आठवण करते. एका परमात्मा माशूकचे सर्व आशिक आहेत.

बाबा येऊन सचखंड बनवत आहेत. अर्ध्या कल्पानंतर पुन्हा रावण येऊन झूठ खंड बनवतो. आत्ता आहे संगम. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांच्या श्रीमतावर चालून खरी-खरी रुहानी सेवा करायची आहे. सर्वशक्तिमान बाबांकडून शक्ती घेऊन ५ विकाररूपी शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे.

२) मनुष्यापासून देवता बनण्यासाठी पवित्र जरूर बनायचे आहे. हे नॉलेज धारण करून काट्यापासून फूल बनायचे आहे आणि बनवायचे आहे.

वरदान:-
विनाशाच्या वेळी पेपरमध्ये पास होणारे आकारी लाइट रुपधारी भव

विनाशाच्या वेळी पेपरमध्ये पास होण्यासाठी किंवा सर्व परिस्थितींचा सामना करण्यासाठी आकारी लाइट रुपधारी बना. जेव्हा चालता-फिरता लाइट हाऊस बनाल तेव्हा तुमचे हे रूप (शरीर) दिसून येणार नाही. जसे पार्ट बजावते वेळी वस्त्र धारण करता, कार्य संपले वस्त्र उतरविले. एका सेकंदामध्ये धारण करा आणि एका सेकंदामध्ये न्यारे व्हा - जेव्हा असा अभ्यास होईल तेव्हा बघणारे अनुभव करतील की हे लाइटचे वस्त्रधारी आहेत, लाइटच यांचा शृंगार आहे.

बोधवाक्य:-
उमंग-उत्साहाचे पंख सदैव सोबत असतील तर प्रत्येक कार्यामध्ये सफलता सहजच मिळते.

हे अव्यक्त इशारे - “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”

बाबा सर्वशक्तिवान आहेत तर त्यांचा हात पकडणारे पोहोचले की पोहोचले - असा फेथ (विश्वास) ठेवा. भले स्वतः कमजोर जरी असाल परंतु सोबती तर मजबूत आहे ना! म्हणून पार होऊनच जाल. असे सदैव निश्चयबुद्धी विजयी रत्न आहे, याच स्मृतीमध्ये रहा. झाले ते झाले, बिंदू लावून पुढे जा.

विशेष नोट:- आज प्रिय बापदादांची अति लाडकी, देश विदेशच्या सर्व ब्राह्मण परिवाराची जान, आम्हा सर्वांच्या हृदयावर राज्य करणारी गोड दादी जानकीजी यांचा पुण्य स्मृती दिवस आहे. दादीजींनी १०४ वयापर्यंत विदेही आणि जीवनमुक्त स्थितीमध्ये राहून, ज्ञान दाना सोबत गुणांचे दान करत संपूर्ण परिवाराची अलौकिक पालना केली आहे. त्यांचे सार गर्भित अनेक ज्ञानाच्या गूढ रहस्यांनी भरपूर क्लासेस सर्वांचे मार्गदर्शन करत आहेत. आज देखील त्यांची छत्रछाया आणि त्यांच्याकडून मिळालेली अनमोल शिकवण अनेक ब्रह्मा वत्सांच्या कानामध्ये गुंजन करत आहे. दादीजीं सच्चाई, सफाई आणि सादगी यांची प्रतिमूर्ती होत्या. दादींकडून मिळालेल्या अनेक अनमोल शिकवणी मधून काही ज्ञान बिंदू लिहीत आहोत, सर्वांनी त्यांना आत्मसात करायचे आहे.

१) आपल्या सूक्ष्म अभिमानाला ओळखून त्याला लगेच नष्ट करणेच स्वतःवर आशीर्वाद करणे आहे.

२) जास्त विचार केल्याने, बोलण्याने आणि चिंता केल्याने शक्ती खर्च होते, सायलेन्स मध्ये राहाल तर शक्ती जमा होईल.

३) कोणाची चूक मनात ठेवू नये, चित्त (मन) साफ ठेवाल तर शांती मध्ये राहू शकाल.

४) समजच्या (ज्ञानाच्या) आधारे व्यर्थ आणि निगेटिव्हला संपवून टाका तर तुम्ही शांतीप्रिय बनाल.

५) बाबांकडून प्राइज घ्यायचे असेल तर नियमांचे पालन करा, कुठेही थोडी सुद्धा आसक्ती, मोह असू नये.

६) कर्म आणि संबंध यांच्या विषयी गुणांवरून समजते, म्हणूनच कर्मामध्ये रूहानियत आणि संबंधामध्ये सच्चाई असावी.

७) नम्रता आणि सत्यतेला आपले सोबती बनवा म्हणजे मग प्रत्येक गोष्ट अचूक होईल.

८) प्रेम मागण्याऐवजी स्वमानामध्ये रहा आणि सर्वांना मान द्या, तर प्रेमास पात्र बनाल.

९) जे सच्चे, स्वच्छ आणि सेवाभावी आहेत, तेच परमात्म प्रेमाचे पात्र आहेत.

१०) सेवा करत असताना ‘डबल लाईट’ राहणे, हीच सर्वात मोठी सेवा आहे.

११) मोठ्या गोष्टीला छोटी करा, तर सुळाचा काटा होईल.

१२) चिंतन साधनेत अडथळा निर्माण करते आणि ‘स्मरण’ साधनेद्वारे सिद्धी प्राप्त करून देते.

१३) आनंदाचा खजिना कायमस्वरूपी टिकवायचा असेल, तर पॉझिटिव्ह (सकारात्मक) विचार करण्याची पद्धत शिकून घ्या.

१४) आताची स्थितीच शेवटी कामी येईल त्यामुळे आपली स्थिती बनविण्याकडे लक्ष द्या.

१५) मनोबल असे वाढवा जेणेकरून काट्यांच्या जंगलामध्ये (कठीण परिस्थितीमध्ये) स्वतः देखील सुरक्षित रहाल आणि इतरांना देखील सहयोग देऊ शकाल.

१६) अपवित्रतेपासून मुक्त व्हायचे असेल, तर आंतरिक वैराग्य वृत्ती धारण करा.