27-04-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो -
तुम्हाला फूल बनून सर्वांना सुख द्यायचे आहे, फुला प्रमाणे असणारी मुले मुखातून
रत्नेच काढतील”
प्रश्न:-
फूल बनणाऱ्या
मुलांप्रती भगवंताची अशी कोणती शिकवण आहे, ज्यामुळे ते सदैव सुगंधित बनून राहतील?
उत्तर:-
हे माझ्या फूल मुलांनो, तुम्ही स्वतःच्या मनामध्ये डोकावून पहा - की माझ्यामध्ये
कोणता आसुरी अवगुण रुपी काटा तर नाही ना! जर आतमध्ये कोणता काटा असेल तर ज्याप्रमाणे
इतरांच्या अवगुणांचा तिरस्कार वाटतो तसा आपल्या मधील आसुरी अवगुणांचा तिरस्कार करा
तेव्हाच काटा निघून जाईल. स्वतःला बघत रहा - मनसा, वाचा, कर्मणा असे कोणतेही विकर्म
तर होत नाही ना, ज्याचा दंड भोगावा लागेल.
ओम शांती।
रुहानी मुलांप्रती रूहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत. यावेळी हे रावण राज्य
असल्या कारणाने सर्व मनुष्य देह-अभिमानी आहेत म्हणून त्यांना जंगलातील काटे म्हटले
जाते. हे कोण समजावून सांगत आहे? बेहदचे बाबा. जे आता काट्यांना फूल बनवत आहेत.
कुठे-कुठे माया अशी आहे जी फूल बनता-बनता झटक्यात पुन्हा काटा बनविते. याला म्हटलेच
जाते काट्यांचे जंगल, या जंगलामध्ये अनेक प्रकारचे पशूंसारखे मनुष्य राहतात. आहेत
मनुष्यच, परंतु आपापसात जनावरांसारखे भांडत राहतात. घरा-घरामध्ये भांडण सुरू आहे.
सर्वजण विषय-सागरामध्येच बुडालेले आहेत, ही सारी दुनिया खूप मोठा विषाचा सागर आहे,
ज्यामध्ये मनुष्य गटांगळ्या खात आहेत. यालाच पतित भ्रष्टाचारी दुनिया म्हटले जाते.
आता तुम्ही काट्यांपासून फूल बनत आहात. बाबांना बागवान देखील म्हटले जाते. बाबा
बसून समजावून सांगत आहेत - गीतेमध्ये आहेत ज्ञानाच्या गोष्टी, आणि इथे मनुष्यांचे
वागणे कसे आहे याचे वर्णन भागवतामध्ये आहे. काय-काय गोष्टी लिहून ठेवल्या आहेत.
सतयुगामध्ये असे थोडेच म्हणणार. सतयुग तर आहेच फुलांचा बगीचा. आता तुम्ही फूल बनत
आहात. तुम्ही फूल बनून मग पुन्हा काटे बनता. आज खूप चांगले चालतात आणि उद्या मग
मायेची वादळे येतात. बसल्या-बसल्या माया काय हालत करते. बाबा सांगत राहतात - मी
तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो. भारतवासीयांना म्हणतात - ‘तुम्ही विश्वाचे मालक होता.
कालचीच गोष्ट आहे. लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. हिरे-माणकांचे महाल होते. त्याला
म्हटलेच आहे गार्डन ऑफ अल्लाह. जंगल इथे आहे, मग बगीचा देखील इथेच असेल ना. भारत
स्वर्ग होता, त्यामध्ये फुलेच फुले होती. बाबाच फुलांचा बगीचा बनवतात. फुले
बनता-बनता मग संगदोषामध्ये येऊन खराब होतात. बस्स, बाबा, मी तर लग्न करणार. मायेचा
भपका बघतात ना. इथे तर आहे एकदम शांती. ही सारी दुनिया आहे जंगल. जंगलाला जरूर आग
लागेल. तर जंगलामध्ये राहणारे देखील नष्ट होतील ना. तीच आग लागणार आहे जी ५ हजार
वर्षांपूर्वी लागली होती, ज्याचे नाव ‘महाभारत लढाई’ ठेवले आहे. अणुबॉम्बची लढाई तर
पहिली यादवांचीच होते. त्याचे देखील गायन आहे. विज्ञानाने मिसाईल्स बनवली आहेत.
शास्त्रांमध्ये तर अनेक कथा आहेत. बाबा मुलांना समजावून सांगत आहेत, असे काही
पोटातून थोडेच मुसळ इत्यादी निघू शकते. आता तुम्ही बघत आहात विज्ञानाद्वारे किती
बॉम्ब्स इत्यादी बनवत आहेत. फक्त दोनच बॉम्ब्स टाकले तरीही किती शहरे नष्ट झाली.
किती मनुष्य मेले. लाखो मेले असतील. आता या इतक्या मोठ्या जंगलामध्ये करोडोनी
मनुष्य राहतात, याला आग लागणार आहे.
शिवबाबा समजावून
सांगत आहेत, बाबा तर तरीही दयाळू आहेत. बाबांना तर सर्वांचे कल्याण करायचे आहे.
तरीही जातील कुठे. जेव्हा बघतील की, खरोखर आग लागत आहे मग तरीही बाबांची शरण घेतील.
बाबा आहेत सर्वांचे सद्गती दाता, पुनर्जन्म रहीत. त्यांना मग ते सर्वव्यापी म्हणतात.
आता तुम्ही आहात संगमयुगी. तुमच्या बुद्धीमध्ये सारे ज्ञान आहे. मित्र-नातेवाईक
इत्यादींशी देखील तोड निभावायची आहे. त्यांच्यामध्ये आहेत आसुरी गुण, तुमच्यामध्ये
आहेत दैवी गुण. तुमचे काम आहे इतरांना देखील हेच शिकविणे. मंत्र देत रहा.
प्रदर्शनीद्वारे तुम्ही किती ज्ञान समजावून सांगता. भारतवासीयांचे ८४ जन्म पूर्ण
झाले आहेत. आता बाबा आले आहेत - मनुष्यापासून देवता बनविण्या करिता अर्थात नरकवासी
मनुष्यांना स्वर्गवासी बनवतात. देवता स्वर्गामध्ये राहतात. आता आपल्याला आसुरी
गुणांचा तिरस्कार वाटतो. स्वतःला पाहिले जाते, मी दैवी गुणवाला बनलो आहे?
माझ्यामध्ये कोणता अवगुण तर नाही ना? मनसा-वाचा-कर्मणा आपण असे कोणते कर्म तर केले
नाही ना जे आसुरी काम होईल? आपण काट्यांना फुले बनविण्याचा धंदा करतो की नाही? बाबा
आहेत बागवान आणि तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी माळी आहात. माळी देखील वेगवेगळ्या
प्रकारचे असतात. कोणी तर अडाणी आहेत जे कोणालाच आप समान बनवू शकत नाहीत.
प्रदर्शनीमध्ये स्वतः बागवान तर जाणार नाहीत. माळी जातील. हा माळी (ब्रह्मा बाबा)
देखील शिवबाबांच्या सोबत आहे, त्यामुळे हे देखील जाऊ शकत नाहीत. तुम्ही माळी जाता
सेवा करण्याकरिता. चांगल्या-चांगल्या माळ्यांनाच बोलावतात. बाबा देखील म्हणतात -
अडाणी असणाऱ्यांना बोलावू नका. बाबा नाव सांगत नाहीत. थर्ड क्लास माळी देखील आहेत
ना. बागवान प्रेम त्यांच्या वरच करतील जे चांगली-चांगली फुले बनवून दाखवतील.
त्यांच्यावर बागवान खुश देखील होईल. मुखातून सदैव रत्नेच काढत राहतात. कोणी मग
रत्नांच्या ऐवजी दगडच काढतील; तर बाबा काय म्हणतील. शिवबाबांवर धोत्र्याची फुले
देखील वाहतात ना. तर कोणी असे असणारे देखील बाबांचे बनतात ना. वर्तन तर बघा कसे आहे.
काटे देखील अर्पण होतात, अर्पण होऊन मग पुन्हा जंगलामध्ये निघून जातात. सतोप्रधान
बनण्याच्या ऐवजी अजूनच तमोप्रधान बनतात. त्यांची मग काय गती होईल!
बाबा म्हणतात - मी एक
तर निष्कामी आहे आणि दुसरे म्हणजे पर-उपकारी आहे. पर-उपकार करतो भारतवासीयांवर, जे
माझी निंदा करतात. बाबा म्हणतात - मी याचवेळी येऊन स्वर्गाची स्थापना करतो. कोणाला
म्हणा - स्वर्गामध्ये चला. तर म्हणतात - इथे आम्ही स्वर्गामध्येच तर आहोत ना. अरे,
स्वर्ग असतो सतयुगामध्ये. कलियुगामध्ये मग स्वर्ग कुठून आला? कलियुगाला म्हटलेच जाते
नरक. जुनी तमोप्रधान दुनिया आहे. मनुष्यांना ठाऊकच नाही की, स्वर्ग कुठे असतो.
स्वर्ग आकाशामध्ये आहे असे समजतात. दिलवाडा मंदिरामध्ये देखील स्वर्ग वरती छतावर
दाखवला आहे. खाली तपस्या करत आहेत. त्यामुळे मग मनुष्य देखील म्हणतात - अमका
स्वर्गामध्ये गेला. स्वर्ग कुठे आहे? सर्वांसाठी म्हणतात स्वर्गवासी झाला. हा आहेच
विषय-सागर. क्षीर सागर विष्णुपुरीला म्हटले जाते. त्यांनी मग पूजेसाठी एक मोठा तलाव
बनवला आहे. त्यामध्ये विष्णूला बसवले आहे. आता तुम्ही मुले स्वर्गामध्ये जाण्याची
तयारी करत आहात. जिथे दुधाच्या नद्या असतील. आता तुम्ही मुले फुले बनत जा. असे
कोणतेही वर्तन कधी करायचे नाही ज्यामुळे कोणी म्हणेल - हा तर काटा आहे. नेहमी फूल
बनण्यासाठी पुरुषार्थ करत रहा. माया काटा बनवते, त्यामुळे स्वतःची खूप-खूप काळजी
घ्यायची आहे.
बाबा म्हणतात -
गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र बनायचे आहे. बागवान बाबा,
काट्यांपासून फूल बनविण्याकरिता आले आहेत. तर स्वतःला पहायचे आहे की, मी फूल बनलो
आहे? सेवेसाठी जिकडे-तिकडे फुलांनाच बोलावतात. बाबा, गुलाबाचे फूल पाठवा. दिसून तर
येते ना - कोण, कोणते फुल आहे. बाबा म्हणतात - मी येतोच मुळी तुम्हाला राजयोग
शिकविण्याकरिता. ही आहेच मुळी सत्यनारायणाची कथा. सत्य प्रजेची कथा नाहीये.
राजा-राणी बनतील तर स्वाभाविकच प्रजा देखील बनेल. आता तुम्हाला समजते आहे की,
राजा-राणी तथा प्रजा कसे नंबरवार बनतात. जे गरीब असतात ज्यांच्या जवळ २-४ रुपये
देखील शिल्लक राहत नाहीत, ते काय देणार. परंतु त्यांना देखील तितकेच मिळते, जितके
हजार देणाऱ्याला मिळते. सर्वात जास्त गरीब भारत आहे. कोणाच्याही लक्षात नाहीये की
आपण भारतवासीच स्वर्गवासी होतो. देवतांची महिमा देखील गातात परंतु समजू शकत नाहीत.
जसेकाही बेडूक डराव-डराव करतात. बुलबुल किती गोड आवाज काढते, परंतु त्याला काहीच
अर्थ नसतो. आजकाल तर गीता ऐकविणारे किती आहेत. माता देखील आल्या आहेत. गीतेद्वारे
कोणता धर्म स्थापन झाला? हे काहीच जाणत नाहीत. थोडीशी रिद्धी-सिद्धी कोणी दाखवली तर
बस्स, समजतील हेच भगवान आहेत. गातात - पतित-पावन. तर मग पतित आहेत ना. बाबा म्हणतात
- विकारामध्ये जाणे हा एक नंबरचा पतितपणा आहे. ही सारी दुनिया पतित आहे. सर्वजण
बोलावतात - ‘हे पतित-पावन या’. आता पतित-पावनला यायचे आहे की गंगा स्नान करून पावन
बनायचे आहे? बाबांना मनुष्या पासून देवता बनविण्याकरिता किती मेहनत करावी लागते.
बाबा म्हणतात - माझी आठवण कराल तर तुम्ही काट्यांपासून फूल बनाल. मुखावाटे कधीही
दगड (कटू वचन) काढायचे नाहीत. फूल बना. हे देखील शिक्षण आहे ना. चालता-चालता
ग्रहचारी बसते तर मग नापास होतात. आशावादी पासून निराशावादी बनतात. नंतर मग म्हणतात
- मी बाबांकडे जाऊ. इंद्राच्या सभेमध्ये असे घाणेरडे थोडेच येऊ शकतात. ही इंद्रसभा
आहे ना. ब्राह्मणी जी अशांना घेऊन येते तिच्यावर देखील खूप मोठी जबाबदारी आहे. जर
तो विकारामध्ये गेला तर ब्राह्मणीवर देखील भार पडेल, त्यामुळे कोणालाही सावधगिरीने
घेऊन आले पाहिजे. पुढे चालून तुम्ही पहाल साधु-संत इत्यादी सर्व रांगेमध्ये उभे
राहतील. भीष्म-पितामह इत्यादींचे नाव तर आहे ना. मुलांची खूप विशाल बुद्धी असायला
हवी. तुम्ही कोणालाही सांगू शकता - भारत गार्डन ऑफ फ्लॉवर होता. देवी-देवता राहत
होते. आता तर काटे बनले आहेत. तुमच्यामध्ये ५ विकार आहेत ना. रावण राज्य अर्थात
जंगल. बाबा येऊन काट्यांना फूल बनवतात. विचार केला पाहिजे - आता जर आपण गुलाबाचे
फुल बनलो नाही तर जन्म-जन्मांतर धोत्र्याचे फुलच बनणार. प्रत्येकाने आपले स्वतःचे
कल्याण करायचे आहे. शिवबाबांवर थोडीच मेहेरबानी करत आहात. मेहेरबानी तर स्वतःवर
करायची आहे. आता श्रीमतावर चालायचे आहे. बगीच्यामध्ये कोणी जातील तर सुगंधी
फुलांनाच बघतील. धोत्र्याचे फूल थोडेच बघतील. फुलांचे प्रदर्शन असते ना. हे देखील
फुलांचे प्रदर्शन आहे. खूप जबरदस्त इनाम मिळते. अतिशय फर्स्टक्लास फूल बनायचे आहे.
वर्तन अतिशय गोड असले पाहिजे. क्रोधी व्यक्तीशी खूप नम्रपणे वागले पाहिजे. आम्ही
श्रीमतानुसार पवित्र बनून पवित्र दुनिया, स्वर्गाचे मालक बनू इच्छितो. युक्त्या तर
खूप असतात ना. मातांमध्ये डावपेच खूप असतात. चतुराईने पवित्र राहण्याचा पुरुषार्थ
करायचा आहे. तुम्ही सांगू शकता की, ‘भगवानुवाच काम महाशत्रू आहे, पवित्र बनाल तर
सतोप्रधान बनाल. तर मग आपण भगवंताचे ऐकणार नाही काय’! युक्तीने स्वतःला वाचवले
पाहिजे. विश्वाचा मालक बनण्याकरिता थोडे फार सहन केले तर काय झाले. तुम्ही
स्वतःसाठीच तर करत आहात ना. ते राज्यासाठी भांडतात; तुम्ही सर्व काही स्वतःसाठी करता.
तर तुम्हाला पुरुषार्थ केला पाहिजे. बाबांना विसरल्यानेच घसरता (अधोगती होते). नंतर
मग लाज वाटते. तर मग तुम्ही देवता कसे बनू शकाल? अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) मायेच्या
ग्रहचारी पासून वाचण्यासाठी मुखातून सदैव ज्ञान रत्नेच काढायची आहेत. संग दोषापासून
स्वतःचा सांभाळ करायचा आहे.
२) सुगंधी फूल
बनवण्याकरिता अवगुणांना काढून टाकत जायचे आहे. श्रीमतावर खूप-खूप नम्र बनायचे आहे.
काम महा-शत्रू समोर कधीही हार खायची नाही. स्वतःला युक्तीने वाचवायचे आहे.
वरदान:-
सर्व शक्तींना
चमत्कारा ऐवजी कर्तव्य समजून प्रयोग करणारे पूजन आणि गायन योग्य भव
आठवणीद्वारे शक्तींची
जी प्राप्ती होते त्याला चमत्कार समजून प्रयोग करु नका परंतु कर्तव्य समजून
कार्यामध्ये वापरायची आहे. त्या मनुष्यांकडे रिद्धी-सिद्धीचे चमत्कार असतात; परंतु
तुमच्याकडे आहे - श्रीमत. श्रीमताद्वारे शक्ती जरूर येतात म्हणूनच संकल्पाद्वारे
कार्य सिद्ध होतात. संकल्पाद्वारे एखाद्याला कार्य करण्याची प्रेरणा देऊ शकता, ही
देखील शक्ती आहे. परंतु श्रीमतामध्ये जेव्हा आपले मनमत मिक्स नसेल तेव्हा गायन आणि
पूजन योग्य बनाल.
बोधवाक्य:-
कोणत्याही
प्रकारच्या गोंधळामुळे खचून जाण्याऐवजी मोठ्या मनाचे बना.
हे अव्यक्त इशारे -
महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.
जे सरळ स्वभावाचे
असतात, तेच मधुरतेच्या गुणाने संपन्न असतात, तेच नेहमी हर्षितमुख असतात. हर्षितमुख
असल्यामुळे सर्वांना आकर्षित करतात. हर्षित याचा अर्थच आहे अतींद्रिय सुखामध्ये
झुलणे. ज्ञानाची आठवण करत, अव्यक्त स्थितीचा अनुभव करत, अतींद्रिय सुखामध्ये झुलणे,
यालाच म्हटले जाते हर्षित असणे. असा जो हर्षित राहतो तोच आकर्षित करतो.