27-10-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - नाजूकपणा देखील देह-अभिमान आहे, रुसणे, रडणे हे सर्व आसुरी संस्कार
तुम्हा मुलांमध्ये असता कामा नयेत, सुख-दुःख, मान-अपमान सर्व सहन करायचे आहे”
प्रश्न:-
सेवेमध्ये
ढिलेपणा येण्याचे मुख्य कारण काय आहे?
उत्तर:-
जेव्हा देह-अभिमानामुळे एकमेकांच्या कमी-कमजोरी पाहू लागतात तेव्हा सेवेमध्ये
ढिलेपणा येतो. आपसामध्ये मतभेद होणे हा देखील देह-अभिमान आहे. मी अमक्या सोबत चालू
शकत नाही, मी इथे राहू शकत नाही… हा सर्व नाजूकपणा आहे. हे बोल मुखातून निघणे
अर्थात काटा बनणे, नाफरमानबरदार बनणे (अवज्ञा करणारा बनणे) आहे. बाबा म्हणतात -
मुलांनो, तुम्ही रूहानी मिलेट्री आहात त्यामुळे ऑर्डर मिळाली की लगेच हजर झाले
पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये आनाकानी (टाळाटाळ) करू नका.
ओम शांती।
रूहानी बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत. मुलांना सर्वप्रथम ही शिकवण मिळते
की, स्वतःला आत्मा निश्चय करा. देह-अभिमान सोडून देही-अभिमानी बनायचे आहे. आपण आत्मा
आहोत, देही-अभिमानी बनाल तेव्हाच बाबांची आठवण करू शकाल. तो आहे अज्ञान-काळ आणि हा
आहे ज्ञान-काळ. ज्ञान तर एक बाबाच देतात जे सर्वांची सद्गती करतात. आणि ते आहेत
निराकार अर्थात त्यांना कोणताच मनुष्य आकार नाही. ज्यांना मनुष्याचा आकार आहे
त्यांना भगवान म्हणू शकत नाही. आता आत्मे तर सर्व निराकारी आहेत. परंतु
देह-अभिमानामध्ये आल्याने आपण आत्मा आहोत हे विसरले आहेत. आता बाबा म्हणतात -
तुम्हाला परत घरी जायचे आहे. स्वतःला आत्मा समजा, आत्मा समजून बाबांची आठवण करा
तेव्हा जन्म-जन्मांतरीची पापे भस्म होतील, दुसरा कोणताच उपाय नाही. आत्माच पतित,
आत्माच पावन बनते. बाबांनी समजावून सांगितले आहे की पावन आत्मे आहेत
सतयुग-त्रेतामध्ये. रावण राज्यामध्ये आत्मा मग पतित बनते. शिडीच्या चित्रामध्ये
देखील समजावून सांगितले आहे जे पावन होते ते पतित बनले आहेत. ५ हजार वर्षांपूर्वी
तुम्ही सर्व आत्मे शांतीधाममध्ये पावन होता. त्याला म्हटलेच जाते निर्वाणधाम. मग
कलियुगामध्ये पतित बनतात तेव्हा ओरडू लागतात - ‘हे पतित-पावन या’. बाबा समजावून
सांगतात - मुलांनो, मी तुम्हाला पतितापासून पावन बनण्याचे जे ज्ञान देत आहे, ते
केवळ मीच देतो जे मग प्राय: लोप होते. बाबांनाच येऊन सांगावे लागते. इथे लोकांनी
असंख्य शास्त्रे बनवली आहेत. सतयुगामध्ये कोणतेही शास्त्र असतच नाही. तिथे
भक्तीमार्ग कणभर सुद्धा नाही.
आता बाबा म्हणतात -
तुम्ही माझ्याद्वारेच पतितापासून पावन बनू शकता. पावन दुनिया जरूर बनणारच आहे. मी
तर येऊन मुलांनाच राजयोग शिकवतो. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. रुसणे, रडणे हे
सर्व आसुरी स्वभाव आहेत. बाबा म्हणतात - मुलांनी सुख-दुःख, मान-अपमान सर्वकाही सहन
करायचे आहे. नाजूकपणा नको. मी अमक्या ठिकाणी राहू शकत नाही, हा देखील नाजूकपणा आहे.
यांचा स्वभाव असा आहे, हे असे आहेत, तसे आहेत, यापैकी काहीही असता कामा नये.
मुखावाटे सदैव फूलेच निघावीत. काटा निघता कामा नये. कितीतरी मुलांच्या मुखावाटे
खूपच काटे निघतात (कठोर शब्द बोलले जातात). कोणावर क्रोध करणे हा देखील काटा आहे.
मुलांचे एकमेकांमध्ये मतभेद खूप होतात. देह-अभिमान असल्या कारणाने, एकमेकांच्या
कमजोरींना बघत राहतात आणि स्वतःमध्ये अनेक प्रकारच्या कमी-कमजोरी राहून जातात,
म्हणून मग सेवा ढिली होते. बाबा समजावून सांगतात - हे देखील ड्रामा अनुसार होते.
सुधारायचे देखील आहे. मिलेट्रीचे लोक जेव्हा युद्धावर जातात तर त्यांचे कामच आहे
शत्रुशी लढणे. पूर येतो किंवा काही दंगल झाली तरी देखील मोठ्या प्रमाणात मिलेट्रीला
बोलावतात. मग मिलेट्रीचे लोक मजूर इत्यादींचे काम देखील करू लागतात. गव्हर्मेंट
मिलेट्रीला ऑर्डर करते - ही सगळी माती भरा. जर कोणी आला नाही तर गोळीच्या तोंडी
देतात. गव्हर्मेंटची ऑर्डर मानावीच लागेल. बाबा म्हणतात - तुम्ही देखील सेवेसाठी
बांधील आहात. बाबा जिथे पण सेवेला जाण्यासाठी बोलतील, लगेच हजर झाले पाहिजे. ऐकले
नाहीत तर मिलेट्री म्हणता येणार नाही. ते मग हृदयामध्ये स्थान मिळवू शकत नाहीत.
तुम्ही सर्वांना संदेश देण्यासाठी बाबांचे मदतगार आहात. आता समजा कुठे मोठे
म्युझियम उघडतात, म्हणतात १० किलो मीटर दूर आहे, सेवेला तर जावेच लागेल ना. खर्चाचा
विचार थोडाच करायचा आहे. सर्वात मोठे गव्हर्मेंट बेहदच्या बाबांची ऑर्डर मिळते.
ज्यांचा मग राईट हँड आहे धर्मराज. त्यांच्या श्रीमतावर न चालल्याने मग कोसळतात (अधोगती
होते). श्रीमत म्हणते आपल्या डोळ्यांना सिव्हील (पवित्र) बनवा. काम विकारावर विजय
प्राप्त करण्याची हिंमत ठेवली पाहिजे. बाबांचा आदेश आहे, जर आपण आदेश मानला नाही तर
एकदम चक्काचूर होऊन जाऊ. २१ जन्मांच्या राजाईमध्ये रोला पडेल (घोटाळा होईल). बाबा
म्हणतात - मला मुलांशिवाय इतर कोणी ओळखूही शकणार नाही. कल्पापूर्वी जे होते तेच
हळू-हळू येत राहतील. या आहेत एकदम नवीन गोष्टी. हे आहे गीतेचे युग. परंतु
शास्त्रांमध्ये या संगमयुगाचे वर्णन नाही आहे. गीतेलाच द्वापर युगामध्ये घेऊन गेले
आहेत. परंतु जेव्हा राजयोग शिकवला तर जरूर संगमच असेल ना. परंतु कोणाच्याही
बुद्धीमध्ये या गोष्टी नाहीत. आता तुम्हाला ज्ञानाचा नशा चढलेला आहे. लोकांना आहे
भक्तीमार्गाचा नशा. म्हणतात - भगवान जरी आले तरी देखील आम्ही भक्ती सोडणार नाही. हे
उत्थान आणि पतनाची माहिती असलेले शिडीचे चित्र खूप चांगले आहे, तरी देखील लोकांचे
डोळे उघडत नाहीत. मायेच्या नशेमध्ये एकदम मश्गूल आहेत. ज्ञानाचा नशा फार उशिरा चढतो.
पहिले तर दैवी गुण देखील पाहिजेत. बाबांचा कोणताही आदेश मिळाला तर त्यामध्ये
टाळाटाळ करायची नाही. हे मी करू शकत नाही, याला म्हटले जाते नाफरमानबरदार (अवज्ञाकारी).
श्रीमत मिळते असे-असे करायचे आहे तर समजले पाहिजे की शिवबाबांचे श्रेष्ठ मत आहे. ते
आहेतच सद्गती दाता. दाता कधी उलटे मत देणार नाहीत. बाबा म्हणतात - मी यांच्या अनेक
जन्मांच्या अंतामध्ये प्रवेश करतो. लक्ष्मी देखील पहा यांच्यापेक्षाही पुढे जाते.
गायन देखील आहे - महिलांना प्राधान्य दिले जाते. अगोदर लक्ष्मी नंतर मग नारायण, यथा
राजा राणी तथा प्रजा असतात. तुम्हाला देखील असे श्रेष्ठ बनायचे आहे. यावेळी तर
संपूर्ण दुनियेमध्ये रावण राज्य आहे. सर्वजण म्हणतात रामराज्य पाहिजे. आता आहे संगम.
जेव्हा या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते तर तेव्हा रावण राज्य नव्हते. मग हा बदल कसा
होतो, हे कोणीही जाणत नाही. सर्वजण घोर अंधकारामध्ये आहेत. समजतात की कलियुग तर
अजून छोटे मूल आहे, रांगत आहे. तर मनुष्य अजूनच गाढ निद्रेमध्ये झोपी गेले आहेत. हे
रूहानी नॉलेज, रूहानी बाबाच आत्म्यांना देतात, राजयोग देखील शिकवितात. श्रीकृष्णाला
रूहानी पिता म्हणता येणार नाही. ते असे म्हणणार नाहीत की, ‘माझ्या रूहानी मुलांनो’.
हे देखील लिहिले पाहिजे की, रूहानी नॉलेजफुल बाबा स्पिरिच्युअल नॉलेज रुहानी मुलांना
देत आहेत.
बाबा म्हणतात -
दुनियेमध्ये सर्व मनुष्य आहेत देह-अभिमानी. मी आत्मा आहे, हे कोणीही जाणत नाही. बाबा
म्हणतात - कोणाचीही आत्मा लीन होत नाही. आता तुम्हा मुलांना समजावून सांगितले जाते,
दसरा, दिवाळी काय आहे. मनुष्य तर जी पण पूजा इत्यादी करतात, सर्व अंधश्रद्धेने,
ज्याला बाहुल्यांची पूजा म्हटले जाते, दगडाची पूजा म्हटले जाते. आता तुम्ही
पारस-बुद्धी बनता तर दगडाची पूजा करू शकत नाही. मुर्त्यांसमोर जाऊन माथा टेकवतात.
काहीच समजत नाही. म्हटले देखील जाते - ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. ज्ञान अर्धे कल्प
चालले नंतर मग भक्ती सुरू झाली. आता तुम्हाला ज्ञान मिळते तर भक्तीचे वैराग्य येते.
ही दुनियाच बदलते. कलियुगामध्ये भक्ती आहे. सतयुगामध्ये भक्ती असत नाही. तिथे आहेतच
पूज्य. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही कपाळ का टेकवता. अर्धे कल्प तुम्ही कपाळ
देखील घासले आहे, पैसे देखील गमावले आहेत, मिळाले काहीच नाही. मायेने एकदम डोकेच
फिरवले आहे. गरीब बनवले आहे. मग बाबा येऊन सर्वांचे डोके ठीक करतात. आता हळू-हळू
काही युरोपियन लोक सुद्धा समजू लागले आहेत. बाबांनी सांगितले आहे - हे भारतवासी तर
अगदीच तमोगुणी बनले आहेत. ते इतर धर्माचे तरीही उशिराने येतात त्यामुळे त्यांना सुख
देखील थोडे आणि दुःख देखील थोडे मिळते. भारतवासीयांना सुख खूप मिळते तर दुःखही खूप
आहे. सुरुवातीलाच किती श्रीमंत एकदम विश्वाचे मालक असतात. बाकीच्या धर्माचे कोणी
पहिले थोडेच असे श्रीमंत असतात. नंतर वृद्धी होत-होत आतासे कुठे श्रीमंत झाले आहेत.
आता पुन्हा सर्वात भिकारी देखील भारतच बनला आहे. अंधश्रद्धाळू देखील भारतच आहे. हा
देखील ड्रामा बनलेला आहे. बाबा म्हणतात - मी ज्याला स्वर्ग बनवले होते, तो आता नरक
बनला आहे. मनुष्य मर्कट-बुद्धी बनले आहेत, त्यांना मीच येऊन मंदिर लायक बनवतो.
विकार खूप गंभीर आहेत. क्रोध किती आहे. तुमच्यामध्ये अजिबात क्रोध असता कामा नये.
एकदम गोड, शांत, अति गोड बना. हे देखील जाणता - राजाई पद प्राप्त करणारे कोटींमध्ये
काहीच निघतात. बाबा म्हणतात - मी आलो आहे तुम्हाला नरापासून नारायण बनविण्याकरिता.
त्यामध्ये देखील मुख्य ८ रत्न गायले जातात. ८ रत्न आणि मध्यभागी आहेत बाबा. ८ आहेत
पास विद् ऑनर्स, ते देखील नंबरवार पुरुषार्थानुसार. देह-अभिमानाला तोडण्यासाठी खूप
मेहनत करावी लागते. देहाचे भान पूर्णतः निघून जावे. कोणी-कोणी जे पक्के ब्रह्म
ज्ञानी असतात, त्यांचे देखील असेच होते. बसल्या-बसल्या देहाचा त्याग करतात.
बसल्या-बसल्या असे शरीर सोडतात, वायुमंडळ एकदम शांत होते आणि जास्त करून पहाटेच्या
शुद्ध वेळी शरीर सोडतात. रात्रीला मनुष्य खूप घाणेरडे काम करतात, सकाळी स्नान
इत्यादी करून भगवंता-भगवंता असे म्हणू लागतात. पूजा करतात. बाबा सर्व गोष्टी
समजावून सांगत राहतात. प्रदर्शनी इत्यादी मध्ये देखील सर्वप्रथम तुम्ही अल्फचा
परिचय द्या. पहिले अल्फ नंतर बे. एक बाबाच तर निराकार आहेत. बाबा रचयिताच बसून
रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान समजावून सांगतात. तेच बाबा म्हणतात - मामेकम् (मज
एकाची) आठवण करा. देहाचे संबंध सोडून स्वतःला आत्मा समजून मामेकम् (मज एकाची) आठवण
करा. बाबांचा परिचय तुम्ही दिल्या नंतर मग कोणाला प्रश्नोत्तरे करण्याची हिंमतही
होणार नाही. अगोदर बाबांवरील निश्चय पक्का झाला की नंतर मग सांगा - ८४ जन्म असे
घेतले जातात. चक्राविषयी कळले, बाबांविषयी कळले की मग कोणताही प्रश्न मनामध्ये
उत्पन्न होणार नाही. बाबांचा परिचय दिल्या शिवाय तुम्ही बाकीची बकबक जास्त करता तर
त्यामध्ये तुमचा खूप वेळ वाया जातो. गळेच बंद होतात. सर्वात पहिली गोष्ट अल्फ विषयी
बोला. बक-बक केल्याने थोडेच समजू शकणार आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने आणि सावकाश
समजावून सांगितले पाहिजे, जे देही-अभिमानी असतील तेच चांगले समजावून सांगू शकतील.
मोठ्या-मोठ्या म्युझियममध्ये चांगले समजून सांगणाऱ्यांनी मदत केली पाहिजे. थोडे
दिवस आपले सेंटर सोडून मदत करण्यासाठी यायचे आहे. मागे कोणाला तरी सेंटर
सांभाळण्यासाठी ठेवा. जर गादी सांभाळण्यायोग्य कोणाला आप समान बनवले नसेल, तर बाबा
समजतील काही कामाचे नाहीत, सेवा केली नाही. बाबांना लिहितात - सेंटरची सेवा सोडून
कशी जाऊ! अरे बाबा आदेश देतात अमक्या ठिकाणी प्रदर्शनी आहे सेवेवर जा. जर कोणाला
गादीलायक बनवले नसेल, तर तुम्ही काय कामाचे. बाबांनी आदेश केला - लगेच धावले पाहिजे.
महारथी ब्राह्मणी त्यांना म्हटले जाते. बाकी तर सर्व आहेत घोडेस्वार, प्यादी.
सर्वांना सेवेमध्ये मदत द्यायची आहे. इतक्या वर्षांमध्ये तुम्ही कोणाला आपसमान बनवले
नाहीत तर मग करत काय होता. एवढ्या वेळामध्ये साधा एक मेसेंजर बनवला नाहीये, जो
सेंटर सांभाळू शकेल. कसली-कसली माणसे येतात - ज्यांच्याशी बोलण्याची देखील अक्कल
पाहिजे. मुरली देखील जरूर रोज वाचायची आहे किंवा ऐकायची आहे. मुरली वाचली नाही जणू
गैरहजेरी लागली. तुम्हा मुलांना साऱ्या विश्वाला घेराव घालायचा आहे. तुम्ही साऱ्या
विश्वाची सेवा करता ना. पतित दुनियेला पावन बनविणे हा घेराव घालणे आहे ना. सर्वांना
मुक्ती-जीवनमुक्ती धामचा रस्ता सांगायचा आहे, दुःखातून सोडवायचे आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) अतिशय गोड,
शांत, अति गोड स्वभावाचे बनायचे आहे. कधीही क्रोध करायचा नाही. आपल्या डोळ्यांना
खूप-खूप सिविल (पवित्र) बनवायचे आहे.
२) बाबा जो आदेश
देतील, तो लगेच अंमलात आणायचा आहे. साऱ्या विश्वाला पतितापासून पावन बनविण्याची सेवा
करायची आहे. अर्थात घेराव घालायचा आहे.
वरदान:-
बाबांच्या
आठवणी द्वारे असंतुष्टतेच्या परिस्थितींमध्ये, नेहमी सुखाची आणि संतुष्टतेची अनुभूती
करणारे महावीर भव
नेहमी बाबांच्या
आठवणीमध्ये राहणारे प्रत्येक परिस्थितीमध्ये नेहमी संतुष्ट राहतात कारण नॉलेजच्या
शक्तीच्या आधारे डोंगराएवढी परिस्थिती देखील राई प्रमाणे अनुभव होते, राई अर्थात
काहीच नाही. भले परिस्थिती असंतुष्टतेची असेल, दुःखाची घटना असेल परंतु दुःखाच्या
परिस्थितीमध्ये सुखाची स्थिती रहावी तेव्हा म्हणता येईल महावीर. काहीही होवो, नथिंग
न्यू सोबतच बाबांच्या स्मृती द्वारे सदैव एकरस स्थिती राहू शकते, म्हणजे मग दुःख
अशांतीची लाटही येणार नाही.
बोधवाक्य:-
आपले दैवी
स्वरूप नेहमी स्मृतीमध्ये रहावे तर कोणाचीही व्यर्थ नजर जाऊ शकणार नाही.
अव्यक्त इशारे:- स्वयं
प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
जसा सायन्सच्या
शक्तीचा प्रयोग लाईटच्या आधारे होतो. जर कम्प्युटर देखील चालतो तर कम्प्युटर माइट (शक्ती)
आहे परंतु आधार लाईट आहे. तसाच तुमच्या सायलेन्सच्या शक्तीचा आधार लाईट आहे. जर ती
प्रकृतीची लाईट, अनेक प्रकारचे प्रयोग प्रॅक्टिकल मध्ये करून दाखवते तर तुमची
अविनाशी परमात्म लाईट, आत्मिक लाईट आणि सोबतच प्रॅक्टिकल स्थिती लाईट (हलकी) असेल,
तर याद्वारे तुम्ही कोणता प्रयोग नाही करू शकणार!