27-10-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो, आपल्या
बुद्धीला ज्ञान मंथनामध्ये बिझी ठेवा म्हणजे मग सर्व चिं तां पासून मुक्त व्हाल,
सदैव आनंद टिकून राहील”
प्रश्न:-
जे स्वतःला
शिवबाबांच्या यज्ञाचा सर्व्हंट समजतात त्यांची निशाणी सांगा?
उत्तर:-
शिवबाबा या
ब्रह्मामुखा द्वारे जे काही सांगतात, त्याचा ते लगेच स्वीकार करतील. बाबा जे काही
म्हणतात - ते स्वीकारणे, यालाच श्रीमताचे पालन करणे म्हटले जाते. श्री-श्री
शिवबाबांच्या मतावर चालल्यानेच तुम्ही श्रेष्ठ बनता. श्रेष्ठ बनणे अर्थात
विजयीमाळेमध्ये येणे.
गीत:-
ओम् नमो शिवाय.....
ओम शांती।
शाळिग्रामांप्रती शिव भगवानुवाच. रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा समजावून सांगत आहेत.
आता तुम्हा मुलांनी जाणले आहे की, इथे आपल्याला आत्मा समजून बसायचे आहे. संपूर्ण
दुनियेमध्ये एकही असा मनुष्य नसेल जो स्वतःला आत्मा समजत असेल. आत्मा काय आहे, हेच
जाणत नाहीत तर मग परमात्म्याला तरी कसे काय जाणतील. बाबांद्वारेच तुम्हाला
आत्म्याविषयी स्पष्टीकरण मिळते की, मूळ गोष्ट काय आहे. मनुष्यांना काहीही माहीत
नसल्यामुळे किती दुःखी आहेत. तुम्ही मुले जाणता या ड्रामाचे अथवा सृष्टीरूपी
कल्पवृक्षाचे आयुष्य ५ हजार वर्षांचे आहे. जसे आंब्याचे बीज आहे, जर ते चैतन्य असते
तर त्याने सांगितले असते की, ‘मी बीज आहे, माझ्या पासून हे झाड असे तयार झाले’.
परंतु ते जड आहे. चैतन्य झाड एकच आहे. तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत या झाडाचे
संपूर्ण ज्ञान मिळाले आहे. नंबरवार पुरुषार्थानुसार समजू शकता. बाबा म्हणतात - मी,
या मनुष्य सृष्टीचे बीज सत्-चित्-आनंद स्वरूप आहे. मला ज्ञानाचा सागर म्हटले जाते.
ही निराकाराची महिमा आहे. तुम्ही जाणता बाबांची ही महिमा सर्वांपेक्षा न्यारी आहे.
मनुष्य तर बाबांच्या महिमेला मुळीच जाणत नाहीत. भले हे लक्ष्मी-नारायण इत्यादी देवता
आहेत. त्यांना देखील हे नॉलेज नाहीये. हे ड्रामाचे ज्ञान तुम्हालाच मिळाले आहे.
तुम्ही जाणता हे सृष्टीचे चक्र कसे फिरते. मग जेव्हा देवता बनाल तेव्हा तुम्हाला हे
ज्ञान असणार नाही. वंडर आहे ना. तुम्ही या ड्रामाचे ॲक्टर्स आहात ना. तुम्हाला
रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे. बाकी, ना शूद्र वर्णाला, ना देवता
वर्णाला हे ज्ञान आहे. असे नाही की ज्ञान परंपरेने चालत येते. जसे सणांच्या बाबतीत
म्हणतात की, ते परंपरेने चालत आले आहेत. आता तुम्ही समजता सतयुगामध्ये तर या सणांना
कोणी जाणत सुद्धा नाही. तिथे कशाचीही आठवण उरणार नाही. तिथे तर राज्य करतात. तुम्हा
प्रत्येकाच्या बुद्धीचे कुलूप उघडलेले आहे. मुख्य क्रिएटर, डायरेक्टर, प्रिन्सिपल ॲक्टरला
तुम्ही जाणता. तुम्हाला किती सुंदर नॉलेज मिळत आहे, या नॉलेजला जे जाणत नाहीत, ते
बुद्धू आहेत. तुम्ही देखील बुद्धू होता. आता देवता बनत आहात. हे नॉलेज ज्याच्या
बुद्धीमध्ये टपकत राहील त्याला अपार आनंद होईल. तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणीही या
नॉलेजला समजू शकणार नाही. गॉड फादरलाच वर्ल्ड ऑलमाइटी ऑथॉरिटी, नॉलेजफुल म्हटले जाते;
नॉलेज कशाचे आहे? त्यांना सर्व वेद-शास्त्रांचे, सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज
आहे. कोणत्याही शास्त्रांमध्ये देखील रचयिता आणि रचनेचे नॉलेज नाहीये, म्हणूनच
ऋषी-मुनी इत्यादी म्हणत आले आहेत - ‘आम्ही रचयिता आणि रचनेला जाणत नाही’. समजावून
सांगणारे एकच तर आहेत; बाकीचे कोणी जाणतील तरी कसे. हे नॉलेज तुम्हा मुलांशिवाय इतर
कोणीही देऊ शकत नाही; आणि तुम्हाला देणारे मग आहेत बाबा. ते किती प्रचंड ज्ञानी
आहेत. तुम्ही किती उच्च पद प्राप्त करता. किती आनंद झाला पाहिजे. आपण बेहदच्या
पित्याची संतान आहोत. ज्ञानाने बुद्धी भरपूर असली पाहिजे. अशी कोणतीही गोष्ट नाही
ज्याला तुम्ही जाणत नाही. आता तुम्ही मास्टर नॉलेजफुल बनत आहात. जी आत्मा तमोप्रधान
बनली आहे ती बाबांची आठवण करता-करता सतोप्रधान बनेल. नंबरवार तर असतात ना. कोणाची
तमो पासून रजो बुद्धी बनली असेल, कोणाची रजो पासून सतो बनली असेल. आता कोणाचीही
सतोप्रधान-बुद्धी नाहीये. सतोप्रधान जेव्हा बनाल तेव्हा तुमची कर्मातीत अवस्था होईल.
मग तर राज्य करण्यासाठी नवीन दुनिया पाहिजे. हा यज्ञ जेव्हा पूर्ण होईल तेव्हा
यामध्ये संपूर्ण जुन्या दुनियेची आहुती पडते. मग शिक्षण देखील नंबरवार पुरुषार्था
नुसार पूर्ण होते. जसे स्कूलमध्ये स्टुडंट समजतात की, आपण ही परीक्षा पास करून मग
त्या क्लासमध्ये ट्रान्सफर होणार. तुमची देखील जेव्हा कर्मातीत अवस्था होईल तेव्हा
या मृत्युलोकमधून ट्रान्सफर होऊन अमरपुरीमध्ये निघून जाल. तुम्ही जाणता - आता इथून
ट्रान्सफर व्हायचे आहे. पवित्र बनून अमरलोकमध्ये जाल. मूळ आपण शांतीधामचे रहिवासी
होतो; आणि मग पार्ट बजावता-बजावता अमरलोक मधून मृत्युलोकमध्ये येऊन पोहोचलो आहोत.
तर हे संपूर्ण नॉलेज बुद्धीमध्ये राहिल्याने आनंद वाटेल. नॉलेज शिवाय दुसरे काही
सुचणार सुद्धा नाही. आता आम्ही शिकून नवीन दुनियेचे मालक बनणार, हे देखील समजावून
सांगितले पाहिजे. इथे आहेतच पतित. देवता तर कोणीही नाहीत. मनुष्यापासून देवता कोण
बनवेल? बाबाच बनवू शकतात. आता तुम्ही सांगू शकता - बरोबर स्वर्ग होता, जिथे
लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. त्याची स्थापना कोणी केली? हेवनली गॉडफादरने
पॅराडाईज स्थापन केला. जिथे देवी-देवता राज्य करतील; मग तिथे दुसरा कोणताही धर्म
नसेल. हे खूप मोठे बेहदचे नाटक आहे. तुम्ही चैतन्य आहात ना. तुम्ही जाणता या झाडाचे
बीज वर आहे. बाबा देखील इम्पेरिशबल (अविनाशी) आहेत. तुम्ही देखील अविनाशी आहात. आता
संपूर्ण झाड जडजडीभूत अवस्थेला पोहोचले आहे. या वेळी सर्व मनुष्य काट्यांसारखे बनले
आहेत. काट्यांचे जंगल आहे ना. सर्व एकमेकांना दुःख देणारे आहेत. बाबाच बागवान आहेत,
त्यांना खिवैया देखील म्हणतात. तुम्ही देखील बोट चालवायला शिकत आहात. प्रत्येकाची
नाव पार कशी जाईल, ते तुम्हाला बसून समजावून सांगत आहेत. ‘नाव’ म्हणजे काही हे शरीर
नाही. नाव, आत्मा आणि शरीर या दोन गोष्टींची बनलेली आहे. गातात देखील - ‘नईया मेरी
पार लगाओ’. आता आत्मा देखील पतित आहे आणि शरीर देखील पतित आहे. आता पार कसे व्हावे,
आणि कुठे जावे? आता तुम्हाला मूल वतन, सूक्ष्म वतन... सतयुगापासून ते कलियुगापर्यंत
सर्व रहस्ये समजली आहेत. तरी देखील तुमच्या हे बुद्धीमध्ये का राहत नाही! तुम्ही
विसरून का जाता? सदैव बुद्धीमध्ये हे टपकत राहिले तर तुम्ही आनंदामध्ये राहाल,
चिंतेपासून मुक्त व्हाल.
तुम्ही जाणता बाबा
आलेले आहेत, आपल्याला घेऊन जाण्याकरिता. जे नॉलेज बाबांमध्ये आहे ते आपल्याला देत
आहेत. या पूर्णपणे नवीन गोष्टी आहेत, ज्या बाबांशिवाय इतर कोणीही समजावून सांगू शकत
नाही. निराकार बाबा साकारद्वारे ऐकवतात. तुम्ही देखील या शरीराद्वारे ऐकता. तर बाबा
तुम्हा मुलांना देखील आप समान बनवतात. जी बाबांची महिमा आहे ती तुमची देखील असली
पाहिजे. कोणताही फरक नाही. बाबा म्हणतात - मी मात्र जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये
येत नाही, तुम्ही जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येता. तुम्ही मला म्हणता - ‘ज्ञानाचा
सागर, सुखाचा सागर…’, तर जरूर मी तुम्हाला ज्ञान देईन, कल्प-कल्प देतो. तुम्हाला
समजले आहे - बरोबर, ८४ चे चक्र फिरून आता आपण अंताला आलो आहोत. मग बाबा आम्हाला
पहिल्या नंबरला घेऊन जातात. हे नॉलेज आहे ना. नॉलेज इज सोर्स ऑफ इन्कम. जो जितके
जास्त शिकतो, तसे त्याचे तितके इन्कम असते. हे नॉलेज देखील आहे आणि धंदा देखील आहे.
तुम्ही कचरा बाबांना देता. जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या सर्व वस्तू
करनीघोरला (अंत्यसंस्कार करणाऱ्या ब्राह्मणाला) देतात ना. इथे तुम्हाला जिवंतपणी
द्यायचे आहे. खरे तर ही गोष्ट आताची आहे. बाबा म्हणतात - तुमच्याकडे जे काही आहे,
ते मरण्यापूर्वी देऊन टाका. तुम्ही ट्रस्टी बना. नाहीतर तुमच्याकडे जे सांभाळून
ठेवले असेल त्याचीच शेवटी आठवण येईल. जसे एखादा श्रीमंत मनुष्य आहे, तर तो ज्ञान
घेणार नाही. त्याची श्रीमंती देखील एका जन्मासाठीच आहे ना; तो देखील शरीर तर
सोडणारच आहे, माहीत नाही कर्मा अनुसार कुठे जाऊन जन्म घेईल. तुम्ही तर जाणता आपण आता
जितका पुरुषार्थ करू तितकी प्रारब्ध प्राप्त करू. यावेळी सर्वजण भौतिक सेवा करणारे
आहेत. रुहानी सेवेला तर कोणी जाणत सुद्धा नाहीत. सुप्रीम रुह येऊन तुम्हाला नॉलेज
समजावून सांगत आहेत. ते सुखाचा सागर, दुःख हर्ता, सुख कर्ता आहेत. त्यांची शिव जयंती
देखील साजरी करतात, परंतु बुद्धीमध्ये येत नाही. आता तुमच्या बुद्धीमध्ये हे आहे
की, बाबा आम्हाला पुन्हा ५ हजार वर्षानंतर येऊन हे ज्ञान ऐकवतील. सतयुगामध्ये हे
ज्ञान असणारही नाही; तर मग कलियुगामध्ये कुठून येईल! दुनियेमध्ये हे कोणीही जाणत
नाही की, आपण लक्ष्मी-नारायणाचे मंदिर का बनवतो. हे कोण होते, यांना हे राज्य कोणी
दिले? हे कर्मांचे फळ आहे ना. बाबा बसून आता तुम्हाला कर्म, अकर्म, विकर्माची गती
समजावून सांगत आहेत. भगवानुवाच आहे ना. गीते द्वारेच आदि सनातन देवी-देवता धर्माची
स्थापना होते. तिथे फार थोडे मनुष्य असतात. बाकी सर्व जरूर मुक्तीला प्राप्त होत
असतील. महाभारत युद्ध देखील लिहिलेले आहे, भरपूर आपत्ती येतील. नैसर्गिक आपत्ती
येतील. जुनी दुनिया नष्ट होईल. हे तेच बॉम्ब्स, मिसाइल्स आहेत, ही तीच विनाशाची वेळ
आहे, जेव्हा भगवंताने येऊन रुद्र ज्ञान-यज्ञ रचला होता, ज्यामधून विनाश ज्वाळा
प्रज्वलित झाली होती. भगवान यज्ञ रचतात सुख-शांतीकरिता. बाकी दुःख-अशांतीचा जरूर
विनाश झाला पाहिजे. या ईश्वरीय ज्ञान-यज्ञामध्ये संपूर्ण सृष्टी स्वाहा होईल. या
गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये आहेत.
आपण ब्राह्मण आहोत.
या शिवबाबांच्या यज्ञामध्ये आपण ब्राह्मण सर्व्हंट आहोत. आपण खरे-खरे मुखवंशावळी
ब्राह्मण आहोत. बाबा तुम्हा मुलांना मुखाद्वारे जे सांगतील ते स्वीकारले पाहिजे.
आपल्याला श्रीमतावरच चालायचे आहे. हे देखील तुम्ही जाणता की, श्री-श्री शिवबाबांच्या
मतावर आपण श्रेष्ठ बनून माळेचे मणी बनणार आहोत. माळेचे मणी सिजऱ्याला (वंशावळीला)
म्हटले जाते. वंशावळी असते ना, मग ती वाढत जाते. बाबांनी स्वतः सिजरा बनवला आहे (वंशावळी
बनवली आहे), हा देखील सिजरा आहे. वर आहेत निराकारी शिवबाबा, मग आहेत आत्मे. निराकारी
सिजरा पुन्हा साकारी होतो. सर्वात पहिल्या नंबरला आहेत - प्रजापिता; ते देहधारी, ते
रुहानी. रुहानी बाबा येऊन प्रजापिता ब्रह्मा द्वारा रचतात. म्हणतात देखील - ‘पतित
दुनियेला येऊन पावन बनवा’. प्रलय काही कधी होत नाही. जगाचा इतिहास-भूगोल रिपीट होतो.
जुनी दुनिया तीच मग नवीन बनते. आता तुम्ही, नवीन दुनियेकरिता पुरुषार्थ करत आहात.
हे बेहदचे नॉलेज बेहदचे बाबाच देतात. हदचा वारसा असून देखील बेहदच्या बाबांची आठवण
करतात. ‘हे भगवान’, असे म्हणतात ना. जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याला
सांगतात - गॉड फादरची आठवण करा, तर दोन फादर सिद्ध होतात ना. सर्व आत्मे ब्रदर्स
आहेत. आत्माच बोलावते - ‘हे दुःख हर्ता सुख कर्ता, हे लिबरेटर या, आम्हाला घरी
जाण्यासाठी गाइड करा’. आम्हाला आमचे घर आठवते, परंतु आम्ही तिथे जाऊ शकत नाही; कारण
मायेने आमचे पंख तोडून टाकले आहेत. कोणीही घरी परत जाऊ शकत नाही. आता तुम्हाला आपली
ज्योत स्वतःच प्रज्वलित करायची आहे. बाबांची आठवण केल्याने घृत पडेल. ज्योत पूर्णपणे
विझू शकत नाही. एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा दिवा लावतात. खास तिथे एकाला नेमून
ठेवतात की यामध्ये घृत घालत राहा, नाहीतर अंधार होईल. आता तर तुम्हाला योगबलाद्वारे
घृत घालायचे आहे; जेणेकरून घोर अंधाराचा लख्ख प्रकाश होईल, दीपमाळा बनेल. दीपमाळा
सतयुगामध्ये असेल. इथे नाही. जे काही उत्सव साजरे केले जातात, त्यांचे देखील रहस्य
तुम्हाला समजले आहे. ते (दुनियावाले) तर काहीच समजत नाहीत. तरी देखील समजावून
सांगितले जाते की, ही राखी इत्यादी पवित्र राहण्यासाठी आहे. मनुष्यांना ज्ञानाचे
इंजेक्शन अशा युक्तीने लावले पाहिजे की त्यांना जाणीव होईल की, खरोखर आपण तर
भ्रष्टाचारी आहोत. श्रेष्ठाचारी तर बाबाच बनवतात. बाबा म्हणतात - मनमनाभव, तर तुम्ही
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. युक्तीने तीर मारला पाहिजे, बोलण्याची ताकद पाहिजे.
आता तुम्ही सर्वशक्तिमान बाबांकडून शक्ती घेऊन मायेवर विजय प्राप्त करता. तेव्हाच
मग तुम्हाला राज्य-भाग्य मिळू शकते, बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही तुम्हाला विजय
मिळवून देऊ शकत नाही. बाबा म्हणतात - पहा, मुलांनो मी तुम्हाला कोणापासून कोण बनवतो.
आता अशा बाबांची निरंतर आठवण जरूर करायची आहे तेव्हाच विकर्म विनाश होतील. बाबा
म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा, तर ‘अंत मति सो गति’ होईल. जसे चिंतन केले
जाते तसे बनतात. तर बाबा म्हणतात - माझी आठवण करता-करता तुम्ही देखील तसे बनाल.
आठवणीने विकर्म देखील विनाश होतील आणि आपल्या घरी परत निघून जाल. हे नॉलेज, सोर्स
ऑफ इन्कम आहे. हेल्थ-वेल्थ आहे तर हॅपी देखील आहात. तिथे तुमचे आयुष्य खूप दीर्घ
असते. ‘योगेश्वर’ काही श्रीकृष्णाला म्हणता येणार नाही. ‘योगेश्वर’ तर तुम्ही आहात.
ईश्वर तुम्हाला योग शिकवत आहेत. हा राजयोग आहे. योग लावून तुम्ही राज्य-भाग्य
प्राप्त करता. ईश्वर तुम्हाला योग शिकवून राजाईचा वारसा देतात. तुम्हाला राज्य कोणी
दिले? बाबांनी. बाबा म्हणतात - अल्फची आठवण करा. बाबांची आणि वारशाची आठवण करा तर
पापे भस्म होत जातील. हे तर खूप सोपे आहे. तुमच्या बुद्धीमध्ये किती ज्ञान आहे.
भगवंताची तुम्ही मुले ‘मास्टर गॉड’ झालात. बाबांकडे बसून थोडेच राहायचे आहे.
आपल्याला तर पार्ट बजावायचा आहे, यामध्ये देही-अभिमानी बनायचे आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबा जे
ज्ञान देतात, सदैव त्याचेच मंथन करायचे आहे. युक्तीने बोलायचे आहे. अतिशय प्रेमाने
समजावून सांगायचे आहे.
२) आपल्याकडे जे काही
आहे ते जिवंतपणी बाबांना देऊन ट्रस्टी बनून एका बाबांची आठवण करायची आहे.
वरदान:-
देह-अभिमानाच्या ‘मी’पणाची संपूर्ण आहुती देणारे धारणा स्वरूप भव
जेव्हा संकल्प आणि
स्वप्नामध्ये देखील देह-अभिमानाचा ‘मी’पणा नसेल, अनादि आत्मिक स्वरूपाची स्मृती
असेल. ‘बाबा-बाबा’ असा अनहद शब्द निघत राहील तेव्हा म्हणता येईल धारणा स्वरूप, खरे
ब्राह्मण. ‘मी’पणा अर्थात जुन्या स्वभाव, संस्कार रूपी सृष्टीला जेव्हा तुम्ही
ब्राह्मण या महायज्ञामध्ये स्वाहा कराल तेव्हा या जुन्या सृष्टीची आहुती पडेल. तर
जसे यज्ञ रचण्यासाठी निमित्त बनला आहात, तसे आता अंतिम आहुती देऊन समाप्ती साठी
देखील निमित्त बना.
बोधवाक्य:-
स्वतः कडून,
सेवेकडून आणि सर्वांकडून संतुष्टतेचे सर्टिफिकेट घेणे, म्हणजेच सिद्धि स्वरूप बनणे
आहे.
हे अव्यक्त इशारे -
परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.
योगी जीवनाचे अतिउच्च
ध्येय प्राप्त करणाऱ्या आत्म्यांनी टिकेला स्तुती मध्ये, निंदेला कौतुकाच्या
रूपामध्ये, तिरस्काराला सत्कारामध्ये, अपमानाला स्वाभिमानामध्ये, अपकाराला
उपकारामध्ये परिवर्तित करून पित्या समान सदैव विजयी, अष्ट रत्न आणि भक्तांचे इष्ट
बना. अशी भावना ठेवू नका की, थोडे याने देखील बदलावे, तेव्हा मी बदलेन, ही घेण्याची
भावना आहे. मला तर व्हायब्रेशन द्यायचे आहे. मला दयाळू बनायचे आहे. मला गुणांचा,
शक्तींचा सहयोग द्यायचा आहे, यामध्ये मास्टर दाता, फ्राक दिल बना (मोठ्या मनाचे बना).