28-03-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
प्रभात मुरली ओम् शांती
प्रश्न:-
आत्म्यावर
सर्वात खोलवर डाग कोणते आहेत, त्यांना नष्ट करण्यासाठी कोणती मेहनत कराल?
उत्तर:-
आत्म्यावर देह-अभिमानाचे अनेक डाग पडलेले आहेत, आत्मा वारंवार कोणत्याही देहधारीच्या
नावा-रूपामध्ये अडकत राहते. बाबांची आठवण न करता देहधारीची आठवण करत राहते.
एकमेकांच्या मनाला दुःख देते. या डागाला नष्ट करण्याकरिता देही-अभिमानी बनण्याची
मेहनत करा.
गीत:-
मुखडा देख ले
प्राणी…
ओम शांती।
सर्व सेंटर्सच्या गोड-गोड मुलांनी गाणे ऐकले. आता स्वतःला पहा की, मी किती पुण्य आहे
आणि किती पापे नष्ट झाली आहेत. सारी दुनिया, साधू-संत इत्यादी बोलावतात की, ‘हे
पतित-पावन’; पतितापासून पावन बनविणारे एक बाबाच आहेत. बाकी सर्वांमध्ये आहे पाप. हे
तर तुम्ही जाणता की आत्म्यामध्येच पाप आहे. पुण्य देखील आत्म्यामध्येच आहे. आत्माच
पावन, आत्माच पतित बनते. इथे सर्व आत्मे पतित आहेत. पापाचे डाग लागलेले आहेत म्हणून
पाप-आत्मा म्हटले जाते. आता पाप नष्ट होणार कसे? जेव्हा एखाद्या वस्तूवर शाई अथवा
तेल सांडते तेव्हा ब्लॉटिंग पेपर ठेवतात. तो पेपर सर्व काही शोषून घेतो. आता सर्व
मनुष्य आठवण करतात एकालाच कारण तोच ब्लॉटिंग पेपर आहे, पतित-पावन आहे. त्यांच्या
व्यतिरिक्त इतर कोणीही ब्लॉटिंग पेपर नाही. ते (दुनियावाले) तर जन्मो-जन्मी गंगा
स्नान करत अजूनच पतित झाले आहेत. पतितांना पावन करणारे एक शिवबाबाच ब्लॉटिंग पेपर
आहेत. आणि आहेत देखील सूक्ष्म ते सूक्ष्म एक बिंदू. सर्वांची पापे नष्ट करतात.
कोणत्या युक्ती द्वारे? फक्त एवढेच सांगतात - ‘मज ब्लॉटिंग पेपरची आठवण करा’. मी तर
चैतन्य आहे ना. तुम्हाला अजून कोणताच त्रास देत नाही. तुम्ही देखील आत्मा बिंदू आणि
बाबा देखील बिंदू आहेत. म्हणतात - फक्त माझी आठवण करा तर तुमची सर्व पापे नष्ट
होतील. आता प्रत्येकाने आपल्या मनाला विचारा की, आठवणी द्वारे किती पाप नष्ट झाले
आहे? अजून किती पाप आपण केले आहे? किती पाप बाकी राहिले आहे? हे समजणार कसे? इतरांना
देखील रस्ता सांगत रहा की, एका ब्लॉटिंग पेपरचीच आठवण करा. सर्वांना हा सल्ला देणे
तर चांगले आहे ना, हे देखील आश्चर्य आहे, ज्यांना सल्ला देतात ते तर बाबांची आठवण
करू लागतात, आणि हा सल्ला देणारे स्वतः मात्र आठवण करत नाहीत म्हणून पापे नष्ट होत
नाहीत. पतित-पावन तर एकालाच म्हटले जाते. अनेक पापे आहेत. काम विकाराचे पाप,
देह-अभिमानाचे तर पहिल्या नंबरचे पाप आहे, जे सर्वात वाईट आहे. आता बाबा म्हणतात -
देही-अभिमानी बना. जितके मामेकम् (मज एकाची) आठवण कराल तर जी तुमच्यामध्ये भेसळ पडली
आहे, ती भस्म होईल. आठवण करायची आहे. इतरांना देखील हा रस्ता सांगायचा आहे. जितके
इतरांना हे ज्ञान समजावून सांगाल तर तुमचे देखील भले होईल. याच धंद्याला लागा.
इतरांना देखील हे समजावून सांगायचे आहे की, बाबांची आठवण करा तर पुण्य आत्मा बनाल.
तुमचे काम आहे इतरांना देखील हे सांगणे की, पतित-पावन एकच आहेत. भले तुम्ही
ज्ञान-नद्या अनेक आहात परंतु तुम्ही सर्वांना सांगता की, एकाची आठवण करा. ते एकच
पतित-पावन आहेत. त्यांची खूप महिमा आहे. ज्ञानाचा सागर देखील तेच आहेत. त्या एका
पित्याची आठवण करणे, देही-अभिमानी बनून राहणे - ही एकच गोष्ट अवघड आहे. बाबा फक्त
तुमच्यासाठीच म्हणत नाहीत, परंतु बाबांच्या ध्यानात तर सर्व सेंटर्सची मुले आहेत.
बाबा तर सर्व मुलांना बघतात ना, कुठे चांगली सेवाभावी मुले असतात, हा शिवबाबांचा
फुलांचा बगीचा आहे ना. जो चांगला फुलांचा बगीचा असेल त्यांचीच बाबा आठवण करतील.
श्रीमंत व्यक्तीला ४-५ मुले असतील तर जो मोठा मुलगा असेल त्याची आठवण करेल. फुलांची
व्हरायटी असते ना. तर बाबा देखील आपल्या मोठ्या बगीच्याची आठवण करतात. कोणालाही हा
रस्ता सांगणे सोपे आहे, शिवबाबांची आठवण करा. तेच पतित-पावन आहेत. स्वतः सांगतात -
माझी आठवण केल्याने तुमची पापे भस्म होतील. साऱ्या दुनियेसाठी किती फर्स्ट क्लास
ब्लॉटिंग पेपर आहे. सर्व जण त्यांची आठवण करतात. कोणालाही हा रस्ता सांगणे सोपे आहे,
शिवबाबांची आठवण करा.
बाबांनी युक्ती सांगितली आहे की, माझी आठवण केल्याने तुमच्यावर जे देह-अभिमानाचे
डाग पडले आहेत ते नष्ट होतील. मेहनत आहे देही-अभिमानी बनण्याची. बाबांना कोणी खरे
काय ते सांगत नाहीत. काहीजण चार्ट लिहून पाठवतात आणि मग थकून जातात. मोठे ध्येय आहे.
माया एकदम नशाच उडवून लावते त्यामुळे मग लिहिणे देखील सोडून देतात. अर्ध्या कल्पाचा
देह-अभिमान आहे तो सुटत नाही. बाबा म्हणतात - फक्त हाच धंदा करत रहा. बाबांची आठवण
करा आणि इतरांना देखील आठवण करायला लावा. बस्स, सर्वात श्रेष्ठ धंदा हाच आहे. जे
स्वतः आठवण करत नाहीत ते हा धंदाच करणार नाहीत. बाबांची आठवण - हा आहे योग अग्नी,
ज्याद्वारे पापे भस्म होतील म्हणूनच विचारले जाते की, कितपत पापे भस्म झाली आहेत?
जितकी बाबांची आठवण कराल तितका आनंदाचा पारा चढलेला राहील. प्रत्येकाच्या मनाला ओळखू
शकता. इतरांना देखील त्यांच्या सेवेद्वारे ओळखू शकता. इतरांना रस्ता सांगता -
बाबांची आठवण करा. तेच पतित-पावन आहेत. इथे ही तर आहे पतित तमोप्रधान दुनिया. सर्व
आत्मे आणि शरीरे तमोप्रधान आहेत. आता परत जायचे आहे. तिथे सर्व आत्मे पवित्र असतात.
जेव्हा पवित्र बनाल तेव्हा घरी जाल. इतरांना देखील हाच रस्ता दाखविला पाहिजे. बाबा
युक्ती तर खूप सोपी सांगतात. शिवबाबांची आठवण करा. हाच ब्लॉटिंग पेपर ठेवा तर सर्व
पापे शोषून घेतली जातील. तुमची विकर्म विनाश होतील. मुख्य मोठी गोष्ट आहे - पावन
बनणे. मनुष्य पतित बनले आहेत तेव्हाच तर बोलावतात - ‘हे पतित-पावन या, येऊन सर्वांना
पावन बनवून सोबत घेऊन जा’. लिहिलेले देखील आहे. सर्व आत्म्यांना पावन बनवून घेऊन
जातात, त्यानंतर मग कोणतीही पतित आत्मा राहत नाही. हे देखील समजावून सांगितले आहे
की, सर्वात पहिले स्वर्गवासीच येतील. बाबा जे औषध देतात हे सर्वांकरिता आहे. जे कोणी
भेटतील त्यांना हेच औषध द्यायचे आहे. तुम्ही फादरकडे जाऊ इच्छिता परंतु आत्मा पतित
आहे म्हणून जाऊ शकत नाही. पावन बना तेव्हाच जाऊ शकाल. ‘माझ्या आत्म्यांनो, माझी
आठवण करा तेव्हाच मी घेऊन जाईन आणि तिथून मग तुम्हाला सुखामध्ये घेऊन जाईन’. मग
जेव्हा जुनी दुनिया होते तेव्हा तुम्ही दुःखी होता. मी कोणालाही दुःख देत नाही.
प्रत्येकाने स्वतःला पहा की मी आठवण करतो का? जितकी आठवण कराल तितका आनंदाचा पारा
चढेल. किती सोपे औषध आहे, इतर कोणीही साधु-संत इत्यादी या औषधा बद्दल जाणत नाहीत.
कुठेही लिहिलेले नाही आहे. ही अगदी नवीन गोष्ट आहे. पापाचे खाते काही शरीराला
लागलेले नाहीये. इतकी छोटीशी आत्मा बिंदूमध्येच सारा पार्ट भरलेला आहे. आत्मा पतित
असेल तर शरीरावर देखील परिणाम होईल. जेव्हा आत्मा पावन बनते तेव्हा मग शरीर देखील
पवित्र मिळते. दुःखी, सुखी आत्मा बनते. शरीराला जखम झाली तर आत्म्याला दुःखाचा
अनुभव होतो. म्हटले देखील जाते - ही दुःखी आत्मा आहे, ही सुखी आत्मा आहे. इतकी
छोटीशी आत्मा किती मोठा पार्ट बजावते, आश्चर्य आहे ना. बाबा आहेतच मुळी सुख देणारे,
म्हणूनच त्यांची आठवण करतात. दुःख देणारा आहे रावण. सर्वात पहिला येतो देह-अभिमान.
आता बाबा सांगत आहेत - तुम्हाला आत्म-अभिमानी बनायचे आहे, यामध्ये खूप मेहनत आहे.
बाबा जाणतात सच्च्या मनाने, ज्या युक्तीने आठवण केली पाहिजे, असे कोणी मुश्किलीने
आठवण करतात. इथे राहत असताना देखील बरेच जण विसरून जातात. जर देही-अभिमानी असते तर
कोणतेच पाप केले नसते. बाबांचा आदेश आहे - हियर नो ईविल… हे काही माकडासाठी तर
नाहीये. हे तर मनुष्यासाठी आहे. मनुष्य माकडा प्रमाणे आहेत म्हणून माकडाचे चित्र
बनवले आहे. असे बरेच जण आहेत जे पूर्ण दिवस झरमुई झगमुई (व्यर्थ गोष्टी) करतात. तर
बाबांना समज द्यावी लागते. सर्व सेंटर्सवर कोणी ना कोणी असे असतात जे एकमेकांना
दुःखच देत राहतात. काही चांगले देखील आहेत जे बाबांच्या आठवणीमध्ये राहतात. समजतात
मनसा, वाचा, कर्मणा कोणालाही दुःख द्यायचे नाही. वाणीने जरी कोणाला दुःख द्याल तर
दुःखी होऊन मराल. बाबा म्हणतात - तुम्हा मुलांनी सर्वांना सुख द्यायचे आहे. सर्वांना
सांगायचे आहे की देही-अभिमानी बना. बाबांची आठवण करा; बाकी पैशांची काही
देवाण-घेवाण करण्याची गोष्ट नाहीये. फक्त लाडक्या बाबांची आठवण करा तर तुमची विकर्म
विनाश होतील. तुम्ही विश्वाचे मालक बनाल. भगवानुवाच - मनमनाभव एका बाबांची आठवण करा
आणि वारशाची आठवण करा. बाकी काहीही आपसात बोलू नका फक्त बाबांची आठवण करा. इतरांचे
कल्याण करा.
तुम्हा मुलांची अवस्था अशी गोड असावी जे कोणीही येऊन पाहतील तर म्हणतील - बाबांची
मुले तर ब्लॉटिंग पेपर्स आहेत. आता अजून अशी अवस्था नाही आहे. बाबांना कोणी विचाराल
तर बाबा म्हणतील - ब्लॉटिंग पेपरच काय परंतु अजून कागद सुद्धा बनलेले नाहीत. बाबा
सर्व सेंटर्सच्या मुलांना समजावून सांगतात. मुंबई, कलकत्ता, दिल्ली सर्व ठिकाणी मुले
तर आहेत ना. रिपोर्ट येतो - ‘बाबा, अमके खूप त्रास देतात’. पुण्य-आत्मा बनण्याऐवजी
अजूनच पाप-आत्मा बनतात. बाबांना कोणी विचाराल तर बाबा लगेच सांगतील. शिवबाबा तर
सर्व काही जाणतात. त्यांच्याकडे सगळा हिशोब आहे. हे बाबा (ब्रह्मा बाबा) देखील सांगू
शकतात. चेहऱ्यावरूनच सर्व काही समजून येते. हे बाबांच्या आठवणीमध्ये मग्न आहेत यांचा
चेहराच अतिशय मनोहर देवतांप्रमाणे आहे. आत्मा खुश असेल तर शरीर देखील खुश दिसून
येईल. शरीराला दुःख झाल्याने आत्म्याला दुःख फील होते. ही एकच गोष्ट सर्वांना ऐकवत
रहा की, ‘शिवबाबा म्हणत आहेत - माझी आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील’. त्यांनी
लिहिले आहे - श्रीकृष्ण भगवानुवाच, श्रीकृष्णाची तर पुष्कळजण आठवण करतात परंतु पापे
काही नष्ट होत नाहीत, उलट जास्तच पतित बनले आहेत. त्यांना हेच ठाऊक नाहीये की कोणाची
आठवण करायची आहे, परमात्म्याचे रूप काय आहे. जर सर्वव्यापी म्हटले तरी देखील जशी
आत्मा स्टार आहे तसेच परमात्मा देखील स्टार आहेत कारण आत्मा सो परमात्मा म्हणतात तर
या हिशोबाने देखील बिंदू झाली. छोटीशी बिंदी प्रवेश करते, सर्व बिंदूंना (आत्म्यांना)
म्हणतात - ‘माझ्या मुलांनो, मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. कर्मेंद्रियांद्वारे
बोलतात. कर्मेंद्रियां शिवाय काही आत्मा बोलू शकणार नाही. तुम्ही सांगू शकता
आत्म्याचे आणि परमात्म्याचे रूप तर एकच आहे ना. परमात्म्याला मोठे लिंग अथवा इतर
काही म्हणू शकत नाही. बाबा म्हणतात - ‘मी देखील असाच तुमच्याप्रमाणे बिंदू आहे,
परंतु मी पतित-पावन आहे आणि तुम्हा सर्वांचे आत्मे पतित आहेत. किती सरळ गोष्ट आहे.
आता देही-अभिमानी बनून मज पित्याची आठवण करा, इतरांना देखील रस्ता सांगा. मी दोनच
शब्द सांगतो - मनमनाभव. आणि मग थोडे डिटेलमध्ये सांगतो की या शाखा-उपशाखा आहेत.
सुरुवातीला सतोप्रधान, सतो, रजो, तमो… मध्ये येतात. पाप आत्मा बनल्यामुळे किती डाग
पडतात. ते डाग काढणार कसे? ते (दुनियावाले) समजतात की, गंगा स्नान केल्याने पापे
नष्ट होतील. परंतु ते तर शरीराचे स्नान आहे. आत्मा बाबांची आठवण केल्यानेच पावन बनू
शकते. यालाच आठवणीची यात्रा म्हटले जाते. दररोज बाबा जे समजावून सांगत राहतात त्या
बघा किती सोप्या गोष्टी आहेत. गीतेमध्ये देखील यावरच जास्त भर दिला आहे - मनमनाभव.
वारसा तर मिळणारच फक्त माझी आठवण करा तर सर्व पापे नष्ट होतील. बाबा अविनाशी
ब्लॉटिंग पेपर आहेत ना. बाबा म्हणतात - माझी आठवण केल्याने तुम्ही पावन बनता आणि
नंतर मग रावण पतित बनवतो; तर अशा बाबांची आठवण केली पाहिजे ना. असे देखील होते जे
आठवण करत नाहीत त्यांचे काय हाल होतील. बाबा समजावून सांगतात - ‘मुलांनो, फक्त या
एका गोष्टीव्यतिरिक्त बाकी इतर सर्व गोष्टी सोडून द्या. देही-अभिमानी बना, मामेकम्
(मज एकाची) आठवण करा. बस्स’. हे तर जाणता आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. आत्माच
दुःख सुख भोगते. कधीही एकमेकांच्या मनाला दुखावता कामा नये. एकमेकांना सुख दिले
पाहिजे. हाच तुमचा धंदा आहे. असे बरेच आहेत जे एकमेकांना दुःख देत राहतात.
एकमेकांच्या देहामध्ये फसलेले असतात. पूर्ण दिवसभर एकमेकांची आठवण करत राहतात. माया
देखील शक्तिशाली आहे. बाबा नाव घेत नाहीत, म्हणून बाबा म्हणतात - ‘मुलांनो,
देही-अभिमानी भव’. ज्ञान तर खूप सोपे आहे. आठवणच अवघड आहे. ते (लौकिक) शिक्षण तरी
देखील १५-२० वर्षे शिकतात. कित्ती सब्जेक्ट्स असतात. हे नॉलेज तर खूप सोपे आहे.
ड्रामा विषयी जाणणे म्हणजे एक कहाणी आहे. मुरली चालवणे काही मोठी गोष्ट नाहीये.
आठवणीत राहणेच फार अवघड आहे. मग बाबा म्हणतात - ड्रामा. तरीही पुरुषार्थ करत रहा.
बाबांची आठवण करा तर योग अग्नी द्वारे तुमची पापे भस्म होतील. चांगली-चांगली मुले
यामध्ये नापास होतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कधीही
कोणाच्या मनाला दुःखी करायचे नाही. सर्वांना सुख द्यायचे आहे. एका बाबांच्या
आठवणीमध्ये रहायचे आहे आणि सर्वांना आठवण करून द्यायची आहे.
२) पापांचे डाग नष्ट
करण्याकरिता देही-अभिमानी बनून अविनाशी ब्लॉटिंग पेपर बाबांची आठवण करायची आहे. अशी
गोड अवस्था बनवायची आहे ज्यामुळे सर्वांचे कल्याण होत राहील.
वरदान:-
आपल्या
श्रेष्ठते द्वारे नवीनतेचा झेंडा फडकविणारे शक्ती स्वरूप भव
आता समयानुसार,
समीपतेनुसार शक्ती रूपाचा प्रभाव जेव्हा इतरांवर टाकाल तेव्हाच अंतिम प्रत्यक्षता
समीप आणू शकाल. जसे स्नेह आणि सहयोगाला प्रत्यक्ष केले आहे तसे सेवेच्या आरशामध्ये
शक्ती रूपाचा अनुभव करवा. जेव्हा आपल्या श्रेष्ठते द्वारे शक्ती रूपाच्या नवीनतेचा
झेंडा फडकवाल तेव्हाच प्रत्यक्षता होईल. आपल्या शक्ती स्वरूपा द्वारे सर्वशक्तिमान
बाबांचा साक्षात्कार घडवा.
बोधवाक्य:-
मनसा द्वारे
शक्तींचे आणि कर्मा द्वारे गुणांचे दान देणे हेच महादान आहे.
हे अव्यक्त इशारे -
“निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”
बाबांचा मुलांमध्ये
पूर्ण विश्वास आहे की हीच माझी मुले विघ्न-विनाशक आत्मे आहेत, पूज्य आत्मे आहेत, ही
मुले बाबांपेक्षाही पुढे आहेत. निमित्त बनलेले, सदैव बाबांना देखील निश्चिंत करणारे
आहेत, नेहमी खुशखबरी ऐकविणारे, प्रत्येक जण विशेष आत्मा आहेत. स्वतःमध्ये देखील असा
विश्वास ठेऊन याच स्मृती स्वरूपामध्ये रहा तर विजयी बनाल.