28-04-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो - पित्या
समान लवली (सुंदर) बनण्यासाठी स्वतःला आत्मा बिंदू समजून बिंदू बाबांची आठवण करा”
प्रश्न:-
प्रत्येक
मुलाने आठवणीमध्ये राहण्याची गुप्त हड्डी मेहनत (प्रचंड मेहनत) करायची आहे - ते का?
उत्तर:-
कारण आठवणीशिवाय आत्मा, पाप-आत्म्यापासून पुण्य-आत्मा बनू शकत नाही. जेव्हा गुप्त
आठवणीमध्ये रहाल, देही-अभिमानी बनाल, तेव्हा विकर्म विनाश होतील. धर्मराजाच्या
सजेपासून वाचण्याचे साधन देखील ही आठवण आहे. मायेची वादळे आठवणीमध्येच विघ्ने आणतात
म्हणून आठवणीची गुप्त मेहनत करा तेव्हाच लक्ष्मी-नारायणासारखे लवली (सुंदर) बनू
शकाल.
गीत:-
ओम् नमो शिवाय…
ओम शांती।
ही महिमा आहे सर्वांच्या पित्याची. आठवण केली जाते भगवंताची अर्थात पित्याची,
त्यांना माता-पिता म्हणतात ना. गॉड-फादर देखील म्हटले जाते. असे नाही की, सर्व
मनुष्यांना गॉड फादर म्हणायचे. ‘बाबा’ तर त्यांना (लौकिक पित्याला) देखील म्हणतात.
लौकिक पिता ज्यांना म्हणतात ते देखील पारलौकिक पित्याची आठवण करतात. वास्तविक आठवण
करणारी आत्मा आहे, जी लौकिक पित्याची देखील आठवण करते. ती आत्मा स्वतःच्या रुपाला,
ऑक्युपेशनला जाणत नाही. आत्मा जर स्वतःलाच जाणत नाही तर गॉड फादरला तरी कशी जाणेल.
आपल्या लौकिक पित्याला तर सर्व जाणतात, त्यांच्याकडून वारसा मिळतो. नाहीतर आठवण तरी
कशाला करतील. पारलौकिक पित्याकडून जरूर वारसा मिळत असेल. म्हणतात - ‘ओ गॉड फादर’.
त्यांच्याकडे दया, क्षमा मागतील कारण पाप करत राहतात. याची देखील ड्रामामध्ये नोंद
आहे. परंतु आत्म्याला जाणणे आणि मग परमात्म्याला जाणणे, हा अवघड विषय आहे. सोप्यात
सोपा आणि अवघडात अवघड. भले कितीही विज्ञान इत्यादी शिकतात, ज्याच्या आधारे चंद्रावर
जातात. तरी देखील या नॉलेजच्या समोर ते तुच्छ आहे. स्वतःला आणि बाबांना जाणणे खूप
अवघड आहे. जी पण मुले स्वतःला ब्रह्माकुमार-कुमारी म्हणतात, त्यांनी देखील स्वतःला
आत्मा निश्चय करावे. मी आत्मा बिंदू आहे, आपले पिता देखील बिंदू आहेत - हे विसरून
जातात. हा आहे डिफिकल्ट सब्जेक्ट (अवघड विषय). स्वतःला आत्मा समजणे विसरून जातात तर
बाबांची आठवण करायला देखील विसरतात. देही-अभिमानी बनण्याचा अभ्यास नाहीये. आत्मा
बिंदू आहे, तिच्यामध्येच ८४ जन्मांचा पार्ट नोंदलेला आहे. जो पार्ट मी आत्मा
भिन्न-भिन्न शरीर घेऊन बजावते, हेच सारखे-सारखे विसरायला होते. मुख्य गोष्ट हीच
समजून घेण्याची आहे. आत्मा आणि परमात्म्याला समजून घेतल्याशिवाय, बाकी नॉलेज तर
सर्वांच्या लक्षात येते. आपण ८४ जन्म घेतो, सूर्यवंशी, चंद्रवंशी… बनतो. हे चक्र तर
खूप सोपे आहे, समजते सुद्धा. परंतु फक्त चक्राला जाणून तितकासा फायदा होत नाही,
जितका स्वतःला आत्मा निश्चय करून बाबांची आठवण करण्यामध्ये फायदा आहे. मी आत्मा
स्टार आहे. आणि मग बाबा देखील स्टार अति सूक्ष्म आहेत. तेच सद्गती दाता आहेत.
त्यांची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होणार आहेत. अशा पद्धतीने कोणीही निरंतर आठवण
करत नाहीत. देही-अभिमानी बनत नाहीत. सतत याचीच आठवण रहावी की, ‘मी आत्मा आहे’.
बाबांचा आदेश आहे - माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. ‘मी बिंदू आहे. इथे येऊन
पार्टधारी बनलो आहे. माझ्यावर ५ विकारांची गंज चढलेली आहे. आता मी आयर्न एज्डमध्ये
आहे. आता गोल्डन एज्डमध्ये जायचे आहे म्हणून बाबांची खूप प्रेमाने आठवण करायची आहे’.
अशा पद्धतीने बाबांची आठवण कराल तर गंज निघून जाईल. ही आहे मेहनत. सेवेच्या तर बाता
खूप मारतात - ‘आज ही-ही सेवा केली, खूप प्रभावित झाले’; परंतु शिवबाबा समजतात की,
आत्मा आणि परमात्म्याच्या ज्ञानाविषयी अजिबात प्रभावित झालेले नाहीत. भारत हेवन आणि
हेल कसा बनतो. ८४ जन्म कसे घेतात, सतो-रजो-तमोमध्ये कसे येतात. फक्त हे ऐकून
प्रभावित होतात. परमात्मा निराकार आहेत, हे देखील त्यांना समजते. बाकी मी आत्मा आहे,
माझ्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट भरलेला आहे. बाबा देखील बिंदू आहेत, त्यांच्यामध्ये
सर्व ज्ञान आहे, त्यांची आठवण करायची आहे, या गोष्टी कोणीही समजत नाहीत. मुख्य
गोष्टच समजत नाहीत. जगाच्या इतिहास-भूगोलाचे नॉलेज बाबाच देतात. गव्हर्नमेंटला
देखील वाटते की जगाचा इतिहास-भूगोल असायला हवा. या तर त्याही पेक्षा सूक्ष्म गोष्टी
आहेत. आत्मा काय आहे, तिच्यामध्ये कसा ८४ जन्मांचा पार्ट भरलेला आहे. तो देखील
अविनाशी आहे. याची आठवण करणे, स्वतःला बिंदू समजणे आणि बाबांची आठवण करणे ज्यामुळे
विकर्म विनाश होतील - अशा प्रकारे योगामध्ये कोणीही तत्पर राहत नाहीत. या आठवणीमध्ये
राहिले तर खूप सुंदर होतील. हे लक्ष्मी-नारायण बघा किती सुंदर आहेत. इथले मनुष्य तर
बघा कसे आहेत. स्वतः देखील म्हणतात - आमच्यामध्ये काहीच गुण नाहीत. आम्ही जसे की
म्लेंच्छ आहोत, तुम्ही स्वच्छ आहात. जेव्हा स्वतःला आत्मा निश्चय करून बाबांची आठवण
कराल तेव्हा सफलता मिळेल. नाहीतर खूप कमी सफलता मिळते. समजतात की, आम्हाला खूप
चांगले ज्ञान आहे. जगाचा इतिहास-भूगोल आम्ही जाणतो. परंतु योगाचा चार्ट सांगत नाहीत.
फार मुश्किलीने कोणी या अवस्थेमध्ये राहतात अर्थात स्वतःला आत्मा समजून बाबांची
आठवण करतात. बऱ्याचजणांना याचा अभ्यास नाहीये. बाबा म्हणतात की, मुले फक्त या ज्ञाना
विषयीचे चक्र बुद्धीमध्ये फिरवतात. बाकी मी आत्मा आहे, बाबांसोबत आपल्याला योग
लावायचा आहे, ज्यामुळे आयर्न एज्ड मधून निघून गोल्डन एज्डमध्ये जाऊ. मज आत्म्याला
बाबांना जाणून घ्यायचे आहे, त्यांच्या आठवणीमधेच रहायचे आहे, हा अभ्यास खूप जणांचा
कमीच आहे. खूपजण येतात देखील. छान-छान असे म्हणतात देखील. बाकी त्यांना हे माहित
होत नाही की आतमध्ये किती गंज लागलेली आहे. सुंदर पासून श्याम बनले आहेत. मग परत
सुंदर कसे बनावे? हे कोणीही जाणत नाहीत. फक्त इतिहास-भूगोल जाणणे एवढेच काम नाहीये.
पावन कसे बनावे? सजा न खाण्याचा उपाय आहे - फक्त आठवणीमध्ये राहणे. योग ठीक नसेल तर
धर्मराजाच्या सजा खाल. हा खूप मोठा सब्जेक्ट आहे, ज्याला कोणी नीट आत्मसात करू शकत
नाही. ज्ञानामध्ये स्वतःला मियाँ-मिट्ठू समजतात, यामध्ये कोणतीच शंका नाही. मूळ
गोष्ट आहे योगाची. योगामध्ये खूप कच्चे आहेत म्हणून बाबा म्हणतात सावध रहा, केवळ
पंडित बनायचे नाही. मी आत्मा आहे, मला बाबांची आठवण करायची आहे. बाबांनी आदेश दिला
आहे - मनमनाभव. हा आहे महामंत्र. स्वतःला स्टार समजून बाबांना देखील स्टार समजा आणि
मग बाबांची आठवण करा. बाबांचे कोणतेही मोठे रूप समोर येत नाही. तर देही-अभिमानी
बनण्यामध्येच मेहनत आहे. विश्वाचे महाराजा-महाराणी एकच बनतात, ज्यांची लाखो प्रजा
बनते. प्रजा तर पुष्कळ आहे ना. इतिहास-भूगोलाला जाणून घेणे तर सोपे आहे परंतु जेव्हा
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण कराल तेव्हा पावन बनाल. हा अभ्यास खूप अवघड आहे.
आठवण करण्यासाठी बसाल तेव्हा खूप वादळे विघ्ने निर्माण करतील. कोणी अर्धा तास जरी
एकरस होऊन बसेल, खूप अवघड आहे. सारखे-सारखे विसरून जातील. यामध्ये खरी-खुरी गुप्त
मेहनत आहे. चक्राचे रहस्य जाणून घेणे सोपे आहे. बाकी देही-अभिमानी होऊन बाबांची
आठवण करणे, हे मुष्किलीने कोणाला समजते आणि ते कृतीमध्ये आणतात. बाबांच्या आठवणीनेच
तुम्ही पावन बनाल. निरोगी काया, दीर्घायुष्य मिळेल. केवळ दुनियेचा इतिहास-भूगोल
समजावून सांगितल्याने काही तुम्ही माळेचे मणी बनू शकणार नाही. मणी बनाल आठवणीने. ही
मेहनत कोणालाच साध्य होत नाही. स्वतः देखील समजतात की, आपण आठवणीमध्ये रहात नाही.
चांगले-चांगले महारथी या गोष्टीमध्ये ढिले आहेत (आळशी आहेत). मुख्य गोष्ट समजावून
सांगायला येतच नाही. ही गोष्ट आहे देखील अवघड. कल्पाचा कालावधी त्यांनी खूप मोठा
केला आहे. तुम्ही ५००० वर्षे सिद्ध करता. परंतु आत्मा-परमात्म्याचे रहस्य अजिबात
जाणत नाही, आठवणच करत नाही म्हणून अवस्था डगमगत राहते. देह-अभिमान खूप आहे.
देही-अभिमानी बनतील तेव्हाच माळेचे मणी बनू शकतील. असे नाही जगाचा इतिहास-भूगोल
समजावून सांगतो म्हणून आम्ही माळेमध्ये जवळच्या स्थानावर येऊ, नाही. आत्मा इतकी छोटी
आहे, यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट भरलेला आहे, सर्वप्रथम या गोष्टीला बुद्धीमध्ये
आणायचे आहे, आणि नंतर मग चक्राची आठवण करायची आहे. मूळ गोष्ट आहे योगाची. योगी
अवस्था पाहिजे. पाप आत्म्यापासून पुण्य आत्मा बनायचे आहे. आत्मा पवित्र होईल
योगाद्वारे. योगबळवालेच धर्मराजाच्या फटक्यांपासून वाचू शकतात. ही मेहनत फार
मुश्किलीने कोणाकडून केली जाते. मायेची वादळे देखील खूप येतील. ही अतिशय प्रचंड
गुप्त मेहनत आहे. लक्ष्मी-नारायण बनणे काही मावशीचे घर नाहीये (काही सोपी गोष्ट
नाहीये). हा अभ्यास जेव्हा होईल तेव्हा चालता-फिरता बाबांची आठवण येत राहील, यालाच
योग म्हटले जाते. बाकी या ज्ञानाच्या गोष्टी तर छोट्या-छोट्या मुलांना देखील समजू
शकते. चित्रांमध्ये सर्व युगे इत्यादी सर्व गोष्टी चित्रित केल्या आहेत. हे तर कॉमन
आहे. जेव्हा कोणत्याही कार्याची सुरुवात करतात तेव्हा स्वस्तिक काढतात. ही निशाणी
आहे सतयुग, त्रेता… ची आहे, बाकी वरच्या बाजूला आहे छोटेसे संगमयुग. तर पहिले
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत रहाल तेव्हाच ती शांती पसरू शकेल. योगाद्वारे
विकर्म विनाश होतील. सारी दुनिया आत्मा आणि परमात्म्याविषयीची गोष्ट विसरून गेली आहे;
कोणी म्हणतात परमात्मा हजारो सूर्यांपेक्षाही तेजोमय आहे, परंतु हे कसे शक्य आहे.
जर का असे म्हणतात की, आत्मा सो परमात्मा; मग तर दोघेही एक झाले ना. लहान-मोठा असा
भेद राहू शकत नाही. यावर देखील समजावून सांगायचे आहे. आत्म्याचे रूप बिंदू आहे.
आत्मा सो परमात्मा असेल तर परमात्मा देखील बिंदू प्रमाणे झाले ना. मग या दोघांमध्ये
काही भेद तर असू शकत नाही. सगळेच जर परमात्मा झाले तर सर्वजण क्रिएटर झाले. सर्वांची
सद्गती करणारे तर एक बाबाच आहेत ना. बाकी प्रत्येकाला तर आपापला पार्ट मिळालेला आहे.
हे बुद्धीमध्ये पक्के करावे लागेल, समजून घेण्याची गोष्ट आहे ना. बाबा म्हणतात -
माझी आठवण करा तर कट निघून जाईल. ही मेहनत करायची आहे. एक तर अर्धा कल्प देह-अभिमानी
होऊन राहिले आहात. सतयुगामध्ये देही-अभिमानी असताना देखील तुम्ही बाबांना जाणत नाही.
ज्ञानाला जाणत नाहीत. यावेळी तुम्हाला जे नॉलेज मिळत आहे ते नॉलेज लोप पावते. तिथे
फक्त इतकेच जाणतात की, मी आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेतो, पार्ट बजावतो. यामध्ये
चिंता करण्याची काय गरज आहे. प्रत्येकाला आपला-आपला पार्ट बजावायचा आहे. रडून काय
साध्य होणार आहे? हे समजावून सांगितले जाते जर थोडेफार काही समजले तरी शांती वाटेल.
स्वतःला समजले तर इतरांना देखील समजावून सांगतील. वृद्ध लोक समजावून सांगतात देखील,
रडण्याने थोडेच परत येतील. शरीर सोडून आत्मा निघून गेली, यामध्ये रडण्याची काय गरज
आहे. अज्ञानकाळामध्ये देखील असे समजतात. परंतु ते हे थोडेच जाणतात की आत्मा आणि
परमात्मा काय चीज आहे. आत्म्यामध्ये भेसळ पडली आहे, ते तर समजतात की, आत्मा निर्लेप
आहे. तर या अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत. बाबा जाणतात की खूप मुले आठवणीमध्ये रहात
नाहीत. फक्त ज्ञान सांगून काय उपयोग. खूप प्रभावित झाला, परंतु त्याने त्याचे काही
कल्याण थोडेच झाले. आत्मा-परमात्मा ची ओळख मिळाले तर समजतील बरोबर आम्ही त्यांची
मुले आहोत. बाबाच पतित-पावन आहेत. ते येऊन आम्हाला दुःखापासून सोडवितात. ते देखील
बिंदू आहेत. तर बाबांची निरंतर आठवण करावी लागेल. बाकी इतिहास-भूगोल जाणणे काही मोठी
गोष्ट नाहीये. भले समजून घेण्यासाठी येतात परंतु या अवस्थेमध्ये तत्पर राहतील की,
‘मी आत्मा आहे’, यामध्ये मेहनत आहे. आत्मा आणि परमात्म्याची गोष्ट तर तुम्हाला
देखील बाबाच येऊन समजावून सांगतात. सृष्टीचे चक्र तर सोपे आहे. जितके शक्य असेल
तितके उठता-बसता देही-अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे. देही-अभिमानी अतिशय शांत
राहतात. ते समजतात की आपल्याला सायलेन्समध्ये जायचे आहे. निराकारी दुनियेमध्ये जाऊन
विराजमान व्हायचे आहे. माझा पार्ट आता पूर्ण झाला आहे. बाबांचे रूप छोटी बिंदू
समजतील. ते काही असे मोठ्या लिंगासारखे नाहीत. बाबा अति सूक्ष्म आहेत. तेच नॉलेजफुल,
सर्वांचे सद्गती दाता आहेत. मी आत्मा देखील नॉलेजफुल बनत आहे. असे चिंतन जेव्हा
चालेल तेव्हा उच्च पद प्राप्त करू शकाल. अख्ख्या दुनियेमध्ये कोणीही आत्म्याला आणि
परमात्म्याला जाणत नाहीत.
तुम्हा ब्राह्मणांना
आता जायचे आहे. संन्यासी देखील जाणत नाहीत. ना येऊन समजून घेणार. ते तर सर्व
आपल्या-आपल्या धर्मांमध्येच येणारे आहेत. हिशोब चुकता करून निघून जातील. तुम्हालाच
ही मेहनत केल्याने बाबांकडून वारसा मिळेल. आता पुन्हा देही-अभिमानी बनायचे आहे. मन
तर आत्म्यामध्ये आहे ना. आत्म्यालाच बाबांवर मन जडवायचे आहे. मन शरीरामध्ये नाहीये.
शरीराची तर सर्व स्थूल कर्मेंद्रिये आहेत. मनामध्ये गुंतवणे हे तर आत्म्याचे काम आहे.
स्वतःला आत्मा समजून मग परमात्मा बाबांमध्ये मन गुंतवायचे आहे. आत्मा अति सूक्ष्म
आहे. इतकी अति सूक्ष्म आत्मा, पार्ट किती बजावते. ही आहे कुदरत (निसर्गाचा चमत्कार).
इतक्या छोट्याशा वस्तू मध्ये किती अविनाशी पार्ट भरलेला आहे. तो कधीही पुसला जाणार
नाहीये. अति सूक्ष्म आहे. तुम्ही प्रयत्न कराल तरी देखील मोठ्या वस्तूची आठवण येईल.
मी आत्मा सूक्ष्म तारा आहे तर बाबा देखील सूक्ष्म आहेत. तुम्हा मुलांना सर्वप्रथम
ही मेहनत करायची आहे. इतकी सूक्ष्म आत्माच आता यावेळी पतित बनली आहे. आत्म्याला
पावन बनविण्याचा सर्वात पहिला उपाय हा आहे. शिक्षण शिकायचे आहे. बाकी खेळणे-बागडणे
ही वेगळी गोष्ट आहे. खेळणे ही देखील एक कला आहे. शिक्षणाने पद मिळते.
खेळण्या-बागडण्याने पद मिळत नाही. खेळ इत्यादीचे डिपार्टमेंट वेगळे असते. त्याच्याशी
ज्ञान अथवा योगाचे काहीच कनेक्शन नाही. हा भोग इत्यादी लावणे हा देखील खेळ आहे.
मुख्य गोष्ट आहे आठवणीची. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
धर्मराजाच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी आठवणीची गुप्त मेहनत करायची आहे. पावन
बनण्याचा उपाय आहे - स्वतःला आत्मा बिंदू समजून बिंदू बाबांची आठवण करणे.
२) ज्ञानामध्ये
स्वतःला मियाँ-मिट्ठू समजायचे नाही, एकरस अवस्था बनविण्याचा अभ्यास करायचा आहे.
बाबांचा जो आदेश आहे त्याचे पालन करायचे आहे.
वरदान:-
प्रत्येक कर्म
करत असताना कमल आसनावर विराजमान राहणारे सहज आणि निरंतर योगी भव
निरंतर योगयुक्त
राहण्यासाठी सदैव कमलपुष्पाच्या आसनावर विराजमान रहा परंतु कमल आसनावर तेच स्थित
राहू शकतात जे लाइट आहेत. कोणत्याही प्रकारचे ओझे अर्थात बंधन नसावे. मनातील
संकल्पांचे ओझे, संस्कारांचे ओझे, दुनियेतील विनाशी वस्तूंच्या आकर्षणाचे ओझे,
लौकिक नातलगांच्या प्रेमाचे ओझे - जेव्हा ही सर्व ओझी नष्ट होतील तेव्हाच कमल
आसनावर विराजमान राहणारे निरंतर योगी बनू शकाल.
बोधवाक्य:-
सहनशीलतेचा
गुण धारण करा तर असत्याचा आधार घ्यावा लागणार नाही.
हे अव्यक्त इशारे -
महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.
ज्यांचे संस्कार सरळ,
मधुर असतात ते संस्कार त्यांच्या स्वरूपामध्ये दिसून येतात. जेव्हा संस्कार
बापदादांसमान बनतील तेव्हा बापदादांचे स्वरूप सर्वांना दिसून येईल. जसे बापदादा तसे
हुबेहूब तेच गुण, तसेच कर्तव्य, तेच बोल, तेच संकल्प अनुभव होतील. सर्वांच्या
मुखातून निघेल - हे तर तेच वाटतात (हे तर बापदादाच वाटतात).