28-08-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो, तुम्ही
ड्रामाच्या गुप्त रहस्याला जाणता की हे संगमयुगच चढत्या कलेचे युग आहे, सतयुगापासून
कला कमी होत जातात”
प्रश्न:-
सर्वात उत्तम
सेवा कोणती आहे आणि ती सेवा कोण करते?
उत्तर:-
भारताला
स्वर्ग बनविणे, रंकाला राव बनविणे, पतिताला पावन बनविणे - हीच सर्वात उत्तम सेवा आहे.
अशी सेवा एका बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही करू शकत नाही. बाबांनी अशी महान सेवा केली
आहे तेव्हाच तर मुले त्यांचा आदर करतात, सर्वात पहिले सोमनाथाचे मंदिर बांधून
त्यांची पूजा करतात.
गीत:-
आखिर वह दिन
आया आज…
ओम शांती।
गोड-गोड
आत्मिक मुलांनी हे गाणे ऐकले. जशी आत्मा गुप्त आहे आणि शरीर प्रत्यक्ष आहे, आत्मा
या डोळ्यांनी दिसू शकत नाही, इनकॉग्निटो (अदृश्य) आहे. आहे जरूर, परंतु या शरीराने
झाकलेली आहे, म्हणून म्हटले जाते - आत्मा गुप्त आहे. आत्मा स्वतः म्हणते - मी
निराकार आहे, इथे साकारमध्ये येऊन गुप्त बनली आहे. आत्म्यांची निराकारी दुनिया आहे.
तिथे तर गुप्त असण्याची गोष्टच नाही. परमपिता परमात्मा देखील तिथेच राहतात, त्यांना
म्हटले जाते - सुप्रीम. उच्च ते उच्च आत्मा. पार-पलीकडे राहणारे आहेत - परमपिता
परमात्मा. बाबा म्हणतात - जसे तुम्ही गुप्त आहात, मला देखील गुप्तपणे यावे लागते.
मी गर्भ-जेलमध्ये येत नाही. माझे ‘शिव’ हे एकच नाव चालत आले आहे. जेव्हा मी
यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करतो, तेव्हा माझे नाव बदलत नाही. यांच्या
आत्म्याचे जे शरीर आहे, त्याचे नाव बदलते. मला तर ‘शिव’च म्हणतात, सर्व आत्म्यांचे
पिता. तर तुम्ही आत्मे या शरीरामध्ये गुप्त आहात. या शरीराद्वारे कर्म करता. मी
देखील गुप्त आहे. तुम्हा मुलांना हे ज्ञान आता मिळत आहे की मी आत्मा या शरीराने
झाकलेली आहे. आत्मा आहे - इनकॉग्निटो (अदृश्य). शरीर आहे - कॉग्निटो (दृश्यमान). मी
देखील अशरीरी आहे. अदृश्य बाबा या शरीराद्वारे ऐकवतात. तुम्ही देखील अदृश्य आहात,
शरीराद्वारे ऐकता. तुम्ही जाणता बाबा आलेले आहेत. भारताला पुन्हा गरीबा पासून
श्रीमंत बनविण्याकरिता बाबा येतात. तुम्ही म्हणाल आमचा भारत गरीब आहे. सर्वजण
जाणतात परंतु त्यांना हे अजिबात माहीत नाहीये की, आपला भारत
कधी श्रीमंत होता, कसा
होता. तुम्हा मुलांना खूप अभिमान आहे - आमचा भारत तर खूप श्रीमंत होता. दुःखाची
गोष्टच नव्हती. सतयुगामध्ये दुसरा कोणताही धर्म नव्हता. एकच देवी-देवता धर्म होता,
हे कोणालाही ठाऊक नाही. हा जो जगाचा इतिहास-भूगोल आहे, तो कोणीही जाणत नाही. आता
तुम्ही चांगल्या रीतीने समजता आपला भारत खूप श्रीमंत होता. आता खूप गरीब आहे. आता
पुन्हा बाबा आले आहेत श्रीमंत बनविण्याकरिता. भारत सतयुगामध्ये खूप श्रीमंत होता,
जेव्हा देवी-देवतांचे राज्य होते, मग आता राज्य गेले कुठे, हे कोणीही जाणत नाही.
ऋषी-मुनी इत्यादी देखील म्हणतात आम्ही रचयिता आणि रचनेला जाणत नाही. बाबा म्हणतात -
सतयुगामध्ये या देवी-देवतांना रचयिता आणि रचनेचे ज्ञान नव्हते. आदि-मध्य-अंताला
जाणत नाहीत. जर त्यांना हे ज्ञान असते की, आपण शिडी उतरत रसातळाला जाणार आहोत; तर
मग बादशाहीचे सुखही अनुभवता येणार नाही. चिंता लागून राहील.
आता तुम्हाला चिंता
लागून राहिली आहे की आपण तमोप्रधानापासून सतोप्रधान कसे बनावे. आपण आत्मे जे
निराकारी दुनियेमध्ये राहत होतो तिथून पुन्हा सुखधाममध्ये कसे आलो - हे देखील ज्ञान
आहे. आम्ही आता चढत्या कलेमध्ये आहोत. ही ८४ जन्मांची शिडी आहे, याच्या मधल्या
काळामध्ये काय होते, हे देखील तुम्ही जाणता. सतयुगामध्ये सगळेच काही येणार नाहीत.
ड्रामा अनुसार प्रत्येक ॲक्टर नंबरवार आपल्या ठरलेल्या वेळी येऊन पार्ट बजावेल.
आता तुम्ही मुले जाणता
‘गरीब-निवाज’ कोणाला म्हटले जाते, दुनिया जाणत नाही. गाण्यातही ऐकले - ‘आखिर वह दिन
आया आज…’ ही सर्व आहे भक्ती. भगवान कधी येऊन आम्हा भक्तांना या भक्तीमार्गातून
सोडवून सद्गतीमध्ये घेऊन जातात, हे देखील समजले आहे. रामराज्य, रावणराज्य कशाचे नाव
आहे, हे सुद्धा कोणी मनुष्य जाणत नाही. आता तुम्ही मुले समजता - बाबा पुन्हा या
शरीरामध्ये आले आहेत. शिवजयंती देखील साजरी करतात तर शिव जरूर येतात. बाबा असे
देखील म्हणत नाहीत की, मी श्रीकृष्णाच्या तनामध्ये येतो, नाही. बाबा म्हणतात -
श्रीकृष्णाच्या आत्म्याने ८४ जन्म घेतले आहेत. जो पहिल्या नंबरमध्ये होता तो आता
अंतामध्ये आहे, तत्-त्वम्. मी तर येतोच साधारण तनामध्ये. तुम्हाला येऊन सांगतो की,
तुम्ही कसे ८४ जन्म भोगता. या वेळी तर एकही कोणी स्वतःला देवता धर्माचा समजत नाही
कारण सतयुगाला खूप दूर घेऊन गेले आहेत. कल्पाचा कालावधी लाखों वर्षे लिहून ठेवला आहे.
वास्तविक ड्रामाची हिस्ट्री तर फार थोडी आहे. यामध्ये कोणत्या धर्माची ५०० वर्षे,
कोणाची २५०० वर्षांची हिस्ट्री आहे. तुमची हिस्ट्री आहे - ५ हजार वर्षांची. देवता
धर्माचेच स्वर्गामध्ये येतील, बाकीचे धर्म तर येतातच मागाहून. देवता धर्माचेच इतर
धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत. ड्रामा नुसार पुन्हा तसेच कन्व्हर्ट होतील. पुन्हा
आपापल्या धर्मामध्ये परत येतील.
बाबा समजावून सांगत
आहेत - ‘मुलांनो, तुम्ही तर विश्वाचे मालक होता’. तुम्ही आता समजता बाबा स्वर्गाची
स्थापना करणारे आहेत तर मग आपण का नाही स्वर्गात असणार. बाबांकडून आम्ही वारसा जरूर
घेणार. तर यावरून सिद्ध होते की हा आपल्या धर्माचा आहे, जो नसेल तो येणारच नाही.
म्हणतील परक्या धर्मामध्ये का जाऊ. तुम्ही मुले जाणता सतयुग नवीन दुनियेमध्ये
देवतांना भरभरून सुख होते. सोन्याचे महाल होते. सोमनाथाच्या मंदिरामध्ये कित्ती सोने
होते. असे दुसरे कोणतेही मंदिर नाही. त्यामध्ये भरपूर हिरे-माणके होती. बौद्ध
इत्यादींचे काही हिरे-माणकांचे महाल असणार नाहीत. तुम्हा मुलांना ज्या पित्याने इतके
उच्च बनवले आहे त्यांचा तुम्ही किती आदर ठेवला आहे. जे चांगले कर्म करून जातात
त्यांचा आदर ठेवला जातो. आता तुम्ही जाणता सर्वात चांगले कर्म पतित-पावन बाबाच
करतात. तुमची आत्मा म्हणते - सर्वात उत्तम ते उत्तम सेवा बेहदचे बाबा येऊन करतात.
आम्हाला रंका पासून राव, बेगर पासून प्रिन्स बनवतात. जे भारताला स्वर्ग बनवतात
त्यांचाही कोणी आदर करत नाही. तुम्ही जाणता - उच्च ते उच्च मंदिर गायले गेले आहे -
सोमनाथाचे, ज्याला लुटून घेऊन गेले. लक्ष्मी-नारायणाच्या मंदिराला कधीही कोणी लुटले
नाही. सोमनाथाच्या मंदिराला लुटले आहे. भक्तिमार्गामध्ये हे अत्यंत श्रीमंत असतात.
राजांमध्ये देखील नंबरवार असतात ना. ज्यांचा उच्च मर्तबा असतो त्यांचा कमी मर्तबा
असणारे आदर करतात. दरबारामध्ये देखील नंबरवार बसतात. बाबा (ब्रह्मा बाबा) तर अनुभवी
आहेत ना. इथला दरबार आहे, पतित राजांचा. पावन राजांचा दरबार कसा असेल. जर का
त्यांच्याकडे इतकी अफाट संपत्ती असेल तर त्यांचे घर देखील तितकेच भव्य असेल. आता
तुम्ही जाणता बाबा आम्हाला शिकवत आहेत, स्वर्गाची स्थापना करत आहेत. आम्ही स्वर्गाचे
महाराजा-महाराणी बनतो आणि नंतर मग आपण खाली घसरतो, आणि मग आपण सर्वात आधी शिवबाबांचे
पुजारी बनतो. ज्यांनी आपल्याला स्वर्गाचा मालक बनवले, त्यांची आपण पूजा करतो. ते
आम्हाला खूप श्रीमंत बनवतात. आता भारत किती गरीब आहे. आधी इतका गरीब नव्हता. खूप
आनंदात राहत होते. जी जमीन ५०० रुपयांमध्ये घेतली होती, ती आज ५ हजाराला सुध्दा
मिळत नाही. तिथे तर जमिनीला काहीच किंमत नसते, ज्याला जितकी हवी तितकी घ्यावी.
प्रचंड प्रमाणात जमीन उपलब्ध असेल. गोड्या नदीच्या काठावर तुमचे महाल असतील ना. फार
थोडे मनुष्य असतील, प्रकृती दासी असेल, अतिशय सुंदर फळे-फुले मिळतील. आता तुम्ही
किती मेहनत करता. परंतु दुष्काळ पडला तर अन्न मिळत नाही. तर गाणे ऐकून तुम्ही
रोमांचित झाले पाहिजे. बाबांना तुम्ही ‘गरीब-निवाज’ म्हणता. आता अर्थ समजला ना.
कोणाला श्रीमंत बनवतात? जरूर इथे जे येतील त्यांना श्रीमंत बनवतील ना. तुम्ही मुले
जाणता आम्हाला पावनपासून पतित बनण्यासाठी ५ हजार वर्षे लागली आहेत. आता पुन्हा बाबा
आम्हाला झटक्यात पतितापासून पावन बनवतात. उच्च ते उच्च बनवतात. एका सेकंदामध्ये
जीवनमुक्ती मिळते. म्हणतात - ‘बाबा, आम्ही तुमचे आहोत’. बाबा म्हणतात - ‘मुलांनो,
तुम्ही विश्वाचे मालक आहात’. मुलगा जन्माला आला आणि वारसदार बनला. किती आनंद होतो.
परंतु मुलीला पाहून चेहराच उतरतो. इथे तर सर्व आत्मे मुले आहेत. आपण स्वर्गाचे मालक
बनलो आहोत, आता समजले आहे की आपण ५ हजार वर्षांपूर्वी स्वर्गाचे मालक होतो. बाबांनी
आपल्याला असे बनवले होते. शिवजयंती देखील साजरी करतात - परंतु हे जाणत नाहीत की ते
कधी आले होते. लक्ष्मी-नारायणाचे राज्य कधी होते, काहीही जाणत नाहीत. वास्तविक
भारताची लोकसंख्या सर्वात जास्त असली पाहिजे. भारताची जमीनही सर्वात मोठी असायला हवी.
लाखों वर्षे असतील मग तर पुष्कळ जमीन पाहिजे. साऱ्या दुनियेची जमीन देखील पुरेशी
पडणार नाही. लाखों वर्षांमध्ये किती मनुष्य पैदा होतील. अगणित मनुष्य होतील. इतके
काही नाही आहेत. या सर्व गोष्टी बाबा बसून समजावून सांगतात. मनुष्य ऐकतात तर
म्हणतात - या गोष्टी तर कधी ऐकलेल्या नाहीत, ना कोणत्या शास्त्रांमध्ये वाचल्या, या
तर वंडरफुल गोष्टी आहेत.
आता तुम्हा मुलांच्या
बुद्धीमध्ये संपूर्ण चक्राचे नॉलेज आहे. हे (ब्रह्मा बाबा) अनेक जन्मांच्या
अंतामध्ये आता पतित आत्मा आहेत, जो सतोप्रधान होता तो आता तमोप्रधान आहे, पुन्हा
सतोप्रधान बनायचे आहे. तुम्हा आत्म्यांना आता शिकवण मिळत आहे - आत्मा जेव्हा
शरीराद्वारे ऐकते तेव्हा शरीर डोलू लागते कारण आत्मा ऐकते ना. खरोखर, आपण आत्म्यांनी
८४ जन्म घेतले आहेत, तर जरूर ८४ आई-वडील मिळाले असतील. हा देखील हिशोब आहे ना.
बुद्धीमध्ये येते ८४ जन्म घेतो; मग अजून कमी जन्म असणारे देखील असतील. कमीतकमी आणि
जास्तीत जास्त याचा हिशोब असेल ना. बाबा बसून समजावून सांगतात शास्त्रामध्ये
काय-काय लिहून ठेवले आहे. तुमच्यासाठी तर तरीसुद्धा ८४ जन्म म्हणतात, माझ्यासाठी तर
असंख्य, बेसुमार जन्म म्हटले आहेत. कणा-कणामध्ये, बस्स जिथे पाहतो, तूच तू...
कृष्णच कृष्ण आहे. मथुरा-वृंदावनामध्ये म्हणतात - श्रीकृष्ण सर्वव्यापी आहे. राधे
पंथवाले मग म्हणतील - राधेच राधे. म्हणतात - आम्ही राधा-स्वामी आहोत. कृष्ण स्वामी
वेगळे आहेत. ते राधेला मानतात, जिथे पाहतो तिथे राधाच राधा. तुम्ही सुद्धा राधा,
आम्ही सुद्धा राधा.
आता बाबा बसून
समजावून सांगतात खरोखर मी गरीब निवाज़ आहे ना. भारतच सर्वात श्रीमंत होता. आता
सर्वात गरीब बनला आहे म्हणून मला भारतातच यावे लागेल. हा पूर्वनियोजित ड्रामा आहे,
यात जरासुद्धा फरक पडू शकत नाही. हा ह्युज ड्रामा (विशाल ड्रामा) आहे. ड्रामा जो
शूट झाला तो हुबेहूब रिपीट होईल. ड्रामा विषयी देखील माहित असले पाहिजे. ड्रामा
अर्थात ड्रामा. तो असतो हदचा ड्रामा, हा आहे बेहदचा ड्रामा. याच्या आदि-मध्य-अंताला
कोणीही जाणत नाही. तर गरीब-निवाज निराकार भगवंतालाच मानतील, श्रीकृष्णाला मानणार
नाहीत. श्रीकृष्ण तर अतिशय श्रीमंत सतयुगाचा प्रिन्स बनतो. भगवंताला काही स्वतःचे
शरीर नाहीये, ते येऊन तुम्हा मुलांना श्रीमंत बनवतात. तुम्हाला राजयोगाचे शिक्षण
देतात. ते (दुनियावाले) देखील शिक्षणाने बॅरिस्टर इत्यादी बनतात आणि मग कमाई करतात.
बाबा देखील तुम्हाला आता शिकवतात. तुम्ही भविष्यामध्ये नरापासून नारायण बनता. तुमचा
जन्म तर होईल ना. असे तर नाही की स्वर्ग समुद्रातून प्रकट होईल. श्रीकृष्णाने देखील
जन्म घेतला ना. कंसपुरी इत्यादी तर त्या वेळी नव्हती. श्रीकृष्णाच्या नावाचे किती
गायन केले जाते. त्यांच्या पित्याचे इतके नाव नाहीये, त्यांचे पिता कुठे आहेत. जरूर
राजाचा मुलगा असेल ना. तिथे मोठ्या राजाच्या घरात जन्म होतो. परंतु ते पतित राजे
असल्यामुळे त्यांचे नाव थोडेच होईल. श्रीकृष्ण जेव्हा असतो तेव्हा थोडेसे पतित
देखील असतात. जेव्हा ते पूर्णपणे नष्ट होतात तेव्हा श्रीकृष्ण गादीवर बसतात, आपले
राज्य घेतात; तेव्हाच त्यांचे संवत सुरू होते. लक्ष्मी-नारायणापासून संवत सुरू होते.
तुम्ही संपूर्ण हिशोब लिहिता - ‘यांचे राज्य इतका वेळ मग यांचे इतका वेळ’, तेव्हाच
लोकांच्या लक्षात येईल की, असा तर कल्पाचा कालावधी इतका मोठा होऊच शकत नाही. ५ हजार
वर्षांचा पूर्ण हिशोब आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) रचयिता आणि
रचनेचे ज्ञान बुद्धीमध्ये ठेवून सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. फक्त एकच
चिंता करायची आहे की आम्हाला सतोप्रधान जरूर बनायचे आहे.
२) या बेहदच्या
ड्रामाला बुद्धीमध्ये ठेवून अपार आनंदामध्ये राहायचे आहे, बाबांसारखा आदर प्राप्त
करण्यासाठी पतितांना पावन बनविण्याची सेवा करायची आहे.
वरदान:-
अधिकारीपणाच्या
स्मृतीद्वारे सर्व शक्तींचा अनुभव करणारे प्राप्ती स्वरूप भव
जर बुद्धीचे नाते
सदैव एका बाबांशी जोडलेले असेल तर सर्व शक्तींचा वारसा अधिकाराच्या रूपामध्ये
प्राप्त होतो. जे अधिकारी समजून प्रत्येक कर्म करतात त्यांना काही बोलण्याची अथवा
संकल्पामध्ये देखील मागण्याची गरज राहत नाही. या अधिकारीपणाची स्मृतीच सर्व
शक्तींच्या प्राप्तीचा अनुभव करविते. तर नशा रहावा की, सर्व शक्ती हा माझा
जन्मसिद्ध अधिकार आहे. अधिकारी बनून चाला म्हणजे मग अधीनता संपुष्टात येईल.
बोधवाक्य:-
स्वतःसोबतच
प्रकृतीला देखील पावन बनवायचे असेल तर संपूर्ण लगाव मुक्त बना.
हे अव्यक्त इशारे -
अपवित्रतेच्या बीजाला देखील नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.
जर पवित्रतेचा नियम
पक्का असेल तर लगाव मुक्त, ईर्ष्या आणि क्रोधापासून देखील मुक्त बना. चिडचिडेपणा
देखील नसावा. ही देखील आसक्ती ठेवू नका की असे झालेच पाहिजे. स्वार्थ किंवा
ईर्ष्येच्या वश तुम्ही एखादी गोष्ट बोलाल आणि ती पूर्ण झाली नाही तर क्रोध उत्पन्न
होईल; त्यामुळे पवित्रतेच्या पिलरला पक्के करा म्हणजे हा पिलर लाईट हाऊसचे काम करेल.