28-10-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला संगमावर सेवा करून गायन योग्य बनायचे आहे, मग भविष्यामध्ये
पुरुषोत्तम बनल्यामुळे तुम्ही पूजा लायक बनाल”
प्रश्न:-
कोणती व्याधी
मुळापासून नष्ट होईल तेव्हा बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळेल?
उत्तर:-
(१) देह-अभिमानाची व्याधी. या देह-अभिमानामुळे साऱ्या विकारांनी महारोगी बनवले आहे.
हा देह-अभिमान नष्ट झाला तर तुम्ही बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवाल. (२)
बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवायचे असेल तर विशाल-बुद्धी बना, ज्ञान-चितेवर बसा.
रुहानी सेवेला लागा आणि तोंडाने बोलण्यासोबतच बाबांची चांगल्या प्रकारे आठवण करा.
गीत:-
जाग सजनियाँ
जाग...
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी गाणे ऐकले - रुहानी बाबांनी या जुन्या साधारण तनाद्वारे
मुखावाटे सांगितले. बाबा म्हणतात - मला जुन्या देहामध्ये जुन्या राज्यामध्ये यावे
लागले. आता हे रावणाचे राज्य आहे. शरीर देखील परक्याचे आहे कारण या शरीरामध्ये तर
आधीपासूनच आत्मा आहे. मी परक्या शरीरामध्ये प्रवेश करतो. स्वतःचे शरीर असते तर
त्याचे नाव असते. माझे नाव बदलत नाही. मला तरीही शिवबाबा म्हणतात. गाणे तर मुले रोज
ऐकतात. नवयुग अर्थात नवीन दुनिया सतयुग आले. आता कोणाला म्हणतात जागे व्हा?
आत्म्यांना, कारण आत्मे घोर अंधारामध्ये झोपलेले आहेत. काहीही समजत नाहीत. बाबांना
सुद्धा जाणत नाहीत. आता बाबा जागे करण्यासाठी आले आहेत. आता तुम्ही बेहदच्या बाबांना
जाणता. आता त्यांच्याकडून बेहदचे सुख मिळणार आहे नवीन युगामध्ये. सतयुगाला नवे
म्हटले जाते, कलियुगाला जुने युग म्हणणार. विद्वान, पंडित इत्यादी कोणीही जाणत
नाहीत. कोणालाही विचारा की, नवीन युग मग जुने कसे होते, तर कोणीही सांगू शकणार नाही.
म्हणतील ही तर लाखो वर्षांची गोष्ट आहे. आता तुम्ही जाणता आपण नवीन युगातून मग
जुन्या युगामध्ये कसे आलो आहोत अर्थात स्वर्गवासीचे नरकवासी कसे बनलो आहोत. मनुष्य
तर काहीही जाणत नाहीत, ज्यांची पूजा करतात, त्यांचे जीवनचरित्र सुद्धा जाणत नाहीत.
जशी जगदंबाची पूजा करतात पण ती अंबा कोण आहे, हेच जाणत नाहीत. खरे तर अंबा मातांना
म्हटले जाते. परंतु पूजा एकीची झाली पाहिजे. शिवबाबांचे देखील एकच अव्यभिचारी
यादगार आहे. अंबा देखील एक आहे. परंतु जगत अंबाला जाणत नाहीत. ही आहे जगत अंबा आणि
लक्ष्मी आहे जगाची महाराणी. तुम्हाला माहीत आहे की जगत अंबा कोण आहे आणि जगत महाराणी
कोण आहे. या गोष्टी कधीच कोणीही जाणू शकत नाही. लक्ष्मीला देवी आणि जगत अंबाला
ब्राह्मणी म्हटले जाईल. ब्राह्मण संगमावरच असतात. या संगमयुगाला कोणीही जाणत नाहीत.
प्रजापिता ब्रह्माद्वारे नवीन पुरुषोत्तम सृष्टी रचली जाते. पुरुषोत्तम तुम्हाला
तिथे बघायला मिळतील. या वेळी तुम्ही ब्राह्मण गायन योग्य आहात. सेवा करत आहात, नंतर
मग तुम्ही पूजा-लायक बनाल. ब्रह्माला इतक्या भुजा दाखवतात मग अंबाला सुद्धा इतक्या
भुजा का नाही देणार. त्यांची देखील सर्व मुले तर आहेत ना? आई-वडीलच प्रजापिता बनतात.
मुलांना प्रजापिता म्हणणार नाही. लक्ष्मी-नारायणाला कधी सतयुगामध्ये जगत-पिता
जगत-माता म्हणणार नाही. प्रजापित्याचे नाव प्रसिद्ध आहे. जगत-पिता आणि जगत-माता एकच
आहेत. बाकी सर्व आहेत त्यांची मुले. अजमेर मध्ये प्रजापिता ब्रह्माच्या मंदिरामध्ये
जाल तर म्हणतील - बाबा कारण आहेतच प्रजापिता! हदचे पिता मुले जन्माला घालतात तर ते
हदचे प्रजापिता झाले. हे आहेत बेहदचे. शिवबाबा तर सर्व आत्म्यांचे बेहदचे पिता आहेत.
हा देखील फरक तुम्हा मुलांना लिहायचा आहे. जगत अंबा सरस्वती आहे एकच. परंतु नावे
किती ठेवली आहेत - दुर्गा, काली इत्यादी. अंबा आणि बाबांची तुम्ही सर्व मुले आहात.
ही रचना आहे ना. प्रजापिता ब्रह्माची मुलगी आहे - सरस्वती, तिला अंबा म्हणतात.
बाकीचे आहेत मुलगे आणि मुली. आहेत सगळे दत्तक. इतकी सर्व मुले कुठून येऊ शकतील! ही
सर्व आहे मुखवंशावळी. मुखाद्वारे स्त्रीची (ब्रह्मा माँची) रचना रचली तर रचता झाले.
म्हणतात - ही माझी आहे. मी हिच्याद्वारे मुलांना जन्म दिला आहे. हे सर्व आहेत दत्तक.
मग ही (ब्रह्मा बाबा) आहे ईश्वरीय मुखाद्वारे रचना. आत्मे तर आहेतच. त्यांना दत्तक
घेतले जात नाही. बाबा म्हणतात - तुम्ही आत्मे कायम माझी मुले आहात. मग आता मी येऊन
प्रजापिता ब्रह्माद्वारे मुलांना दत्तक घेतो. मुलांना (आत्म्यांना) दत्तक घेत नाही,
मुलगे आणि मुलींना घेतो. या देखील अतिशय सूक्ष्म समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. या
गोष्टींना समजल्यामुळे तुम्ही हे लक्ष्मी-नारायण बनता. कसे बनायचे ते आम्ही सांगू
शकतो. अशी कोणती कर्म केली ज्यामुळे हे विश्वाचे मालक बनले. तुम्ही प्रदर्शनी
इत्यादीमध्ये देखील विचारू शकता. तुम्हाला माहीत आहे यांनी हे स्वर्गाचे राज्य कसे
घेतले. तुमच्यामध्ये देखील सगळेच काही यथार्थ रीतीने समजावून सांगू शकत नाहीत.
ज्यांच्यामध्ये दैवीगुण असतील, या रुहानी सेवेमध्ये गुंतलेले असतील ते समजावून सांगू
शकतात. बाकीचे तर मायेच्या व्याधींमध्ये अडकलेले असतात. अनेक प्रकारचे रोग आहेत.
देह-अभिमानाचा देखील रोग आहे. या विकारांनीच तुम्हाला रोगी बनवले आहे.
बाबा म्हणतात - मी
तुम्हाला पवित्र देवता बनवतो. तुम्ही सर्वगुण संपन्न... पवित्र होता. आता पतित बनला
आहात. बेहदचे बाबा असे म्हणतील. यामध्ये निंदेचा काही प्रश्नच नाही, ही समजावून
सांगण्याची गोष्ट आहे. भारतवासीयांना बेहदचे बाबा म्हणतात - मी इथे भारतामध्ये येतो.
भारताची महिमा तर अपरंपार आहे. इथे येऊन नरकाला स्वर्ग बनवतात, सर्वांना शांती
देतात. तर अशा बाबांची देखील महिमा अपरंपार आहे. पारावार नाही. जगत अंबा आणि तिच्या
महिमेला कोणीही जाणत नाहीत. यांच्यातील (जगत अंबा आणि लक्ष्मी मधला) फरक सुद्धा
तुम्ही सांगू शकता. हे जगत अंबेचे जीवनचरित्र, हे लक्ष्मीचे जीवनचरित्र. हीच जगत
अंबा मग लक्ष्मी बनते. नंतर लक्ष्मीच ८४ जन्मा नंतर जगत अंबा बनेल. चित्र सुद्धा
वेगवेगळी ठेवायला हवीत. दाखवतात लक्ष्मीला कलश मिळाला परंतु लक्ष्मी मग संगमावर
कुठून आली. ती तर सतयुगामध्ये झाली आहे. या सर्व गोष्टी बाबा समजावून सांगतात.
चित्र बनविण्यासाठी जे नेमून दिलेले आहेत त्यांनी विचार सागर मंथन करायला हवे. तर
मग समजावून सांगणे सोपे होईल. इतकी विशाल-बुद्धी हवी तेव्हाच बाबांच्या हृदयामध्ये
स्थान मिळवू शकता. जेव्हा बाबांची चांगल्या रीतीने आठवण कराल, ज्ञान-चितेवर बसाल
तेव्हा हृदयामध्ये स्थान मिळवू शकाल. असे नाही की जे खूप चांगली वाणी चालवतात (भाषण
करतात), ते हृदयामध्ये स्थान मिळवू शकतात. नाही, बाबा म्हणतात - हृदयामध्ये स्थान
शेवटी मिळवाल, नंबरवार पुरुषार्थानुसार जेव्हा देह-अभिमान नष्ट होईल.
बाबांनी समजावून
सांगितले आहे ब्रह्म ज्ञानी, ब्रह्ममध्ये लीन होण्याची मेहनत करतात परंतु असा कोणी
लीन होऊ शकत नाही. बाकी मेहनत करतात, उत्तम पद प्राप्त करतात. असे-असे महात्मा
बनतात ज्यांचे मग प्लॅटिनम मध्ये वजन केले जाते (तुला केली जाते) कारण ब्रह्ममध्ये
लीन होण्याची मेहनत तर करतात ना. तर मेहनतीचे देखील फळ मिळते. बाकी
मुक्ती-जीवनमुक्ती मिळू शकत नाही. तुम्ही मुले जाणता आता ही जुनी दुनिया गेली की
गेली. इतके बॉम्ब्स बनवले आहेत - ठेवण्यासाठी थोडेच बनवले आहेत. तुम्ही जाणता जुन्या
दुनियेच्या विनाशासाठी हे बॉम्ब्स कामी येतील. अनेक प्रकारचे बॉम्ब आहेत. बाबा
ज्ञान आणि योग शिकवतात तर मग राज-राजेश्वर डबल मुकुटधारी देवी-देवता बनाल. कोणते
उच्च पद आहे. ब्राह्मण शेंडी आहे वरती. शेंडी सर्वात वर आहे. आता तुम्हा मुलांना
पतितापासून पावन बनविण्यासाठी बाबा आले आहेत. मग तुम्ही देखील पतित-पावनी बनता - असा
नशा आहे का? आम्ही सर्वांना पावन बनवून राज-राजेश्वरी बनवत आहोत? नशा असेल तर खूप
आनंदात राहतील. आपल्या मनाला विचारा आम्ही किती जणांना आप समान बनवतो? प्रजापिता
ब्रह्मा आणि जगत अंबा दोघेही एक समान आहेत. ब्राह्मणांची रचना रचतात. शूद्रापासून
ब्राह्मण बनण्याची युक्ती बाबाच सांगतात. हे कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीये. हे
आहे देखील गीतेचे युग. महाभारत लढाई देखील खरोखर झाली होती. राजयोग एकाला शिकवला
असेल का. लोकांच्या बुद्धीमध्ये मग अर्जुन आणि कृष्णच आहेत. इथे तर पुष्कळ लोक
शिकतात. बसले देखील पहा कसे साधारण आहेत. छोटी मुले अल्फ, बे शिकतात ना. तुम्ही बसले
आहात, तुम्हाला देखील अल्फ, बे शिकवत आहेत. अल्फ आणि बे, हा आहे वारसा. बाबा
म्हणतात - ‘माझी आठवण करा तर तुम्ही विश्वाचे मालक बनाल. कोणतेही आसुरी काम करायचे
नाही. दैवीगुण धारण करायचे आहेत. बघायचे आहे की माझ्यामध्ये कोणते अवगुण तर नाही
आहेत ना? ‘मज निर्गुण हारे में कोई गुण नाही’. आता निर्गुण आश्रम सुद्धा आहे परंतु
अर्थ काहीच नाही. निर्गुण अर्थात माझ्यामध्ये कोणतेही गुण नाहीत. आता गुणवान बनवणे
हे तर बाबांचेच काम आहे. बाबांच्या टायटलची टोपी (उपाधीची पगडी) मग स्वतःवर ठेवली
आहे. बाबा किती गोष्टी समजावून सांगतात. डायरेक्शन सुद्धा देतात. जगत अंबा आणि
लक्ष्मी यांच्यातील कॉन्ट्रास्ट बनवा (फरक सांगणारे चित्र बनवा). ब्रह्मा-सरस्वती
संगमाचे, लक्ष्मी-नारायण आहेत सतयुगाचे. हे चित्र आहे समजावून सांगण्यासाठी. सरस्वती
ब्रह्माची मुलगी आहे. शिकत आहेत मनुष्यापासून देवता बनण्यासाठी. आता तुम्ही
ब्राह्मण आहात. सतयुगी देवता देखील मनुष्यच आहेत परंतु त्यांना देवता म्हणतात,
मनुष्य म्हटल्याने जसा त्यांचा इन्सल्ट होतो म्हणून देवी-देवता अथवा भगवान-भगवती
म्हणतात. जर राजा-राणीला भगवान-भगवती म्हटले तर मग प्रजेला देखील म्हणावे लागेल,
म्हणून देवी-देवता म्हटले जाते. त्रिमूर्तीचे चित्र सुद्धा आहे. सतयुगामध्ये इतके
थोडे मनुष्य, कलियुगामध्ये इतके प्रचंड मनुष्य आहेत. ते कसे समजावून सांगाल.
त्यासाठी मग गोळ्याचे (सृष्टी चक्राचे) चित्र सुद्धा जरूर हवे. प्रदर्शनीमध्ये
इतक्या सर्वांना बोलावतात. कस्टम कलेक्टरला तर कधी कोणी निमंत्रण दिलेले नाहीये. तर
अशा प्रकारे विचार करावा लागेल, यासाठी खूप विशाल-बुद्धी पाहिजे.
बाबांचा (ब्रह्मा
बाबांचा) तर रिगार्ड ठेवायला हवा. हुसेनच्या घोड्याला किती सजवतात. पटका किती छोटा
असतो, घोडा किती मोठा असतो. आत्मा सुद्धा किती छोटा बिंदू आहे, त्याचा शृंगार किती
मोठा आहे. हे अकालमुर्तचे तख्त आहे ना. सर्वव्यापीची गोष्ट देखील गीतेमधून घेतली आहे.
बाबा म्हणतात मी आत्म्यांना राजयोग शिकवतो मग सर्वव्यापी कसे असतील. पिता-टीचर-गुरु
सर्वव्यापी असे असतील. बाबा म्हणतात मी तुमचा पिता आहे तर ज्ञानाचा सागर देखील आहे.
तुम्हाला बेहदचा इतिहास-भूगोल समजल्याने बेहदचे राज्य मिळेल. दैवीगुण सुद्धा धारण
केले पाहिजेत. माया एकदम नाकाला पकडते. चलन खराब होऊन जाते मग लिहितात अशी-अशी चूक
झाली. मी काळे तोंड केले. इथे तर पवित्रता शिकवली जाते आणि मग जर कोणी कोसळले जरी
तरी त्यामध्ये बाबा काय करू शकतील. घरामध्ये कोणी मुलगा खराब काम करतो, काळे तोंड
करतो तर वडील म्हणतात तू तर मेला असतास तर चांगले झाले असते. बेहदचे बाबा जरी
ड्रामाला जाणतात तरीही असे बोलतील तर खरे ना. तुम्ही दुसऱ्यांना शिकवून मग स्वतः
घसरता (पतित बनता) तर हजार पटीने पाप चढते. म्हणतात - मायेने थप्पड लावली. माया असा
काही ठोसा मारते जी एकदम अक्कलच नाहीशी करून टाकते.
बाबा समजावून सांगत
राहतात, डोळे मोठे धोकेबाज आहेत. कधीही कोणते विकर्म करायचे नाही. वादळे तर खूप
येतील कारण युद्धाच्या मैदानामध्ये आहात ना. कळत देखील नाही की काय होईल. माया
थप्पड मारते. आता तुम्ही किती समजदार (ज्ञानी) बनता. आत्माच समजदार बनते ना. आत्माच
बेसमज होती. आता बाबा समजदार (ज्ञानी) बनवतात. बरेच देह-अभिमानामध्ये आहेत. समजत
नाहीत की आपण आत्मा आहोत. बाबा आम्हा आत्म्यांना शिकवत आहेत. मी आत्मा या कानांनी
ऐकत आहे. आता बाबा म्हणतात कोणतीही विकाराची गोष्ट या कानांनी ऐकू नका. बाबा
तुम्हाला विश्वाचा मालक बनवत आहेत, ध्येय खूप मोठे आहे. मृत्यू जेव्हा समीप येईल
तेव्हा मग तुम्हाला भीती वाटेल. लोकांना मरते वेळी देखील मित्र-संबंधी इत्यादी
म्हणतात ना - भगवंताची आठवण करा किंवा कोणी आपल्या गुरु इत्यादीची आठवण करतील.
देहधारीची आठवण करायला शिकवतात. बाबा तर म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. हे
तर तुम्हा मुलांच्याच बुद्धीमध्ये आहे. बाबा आदेश करतात - मामेकम् (मज एकाची) आठवण
करा, देहधारींची आठवण करायची नाही. माता-पिता सुद्धा देहधारी आहेत ना. मी तर
विचित्र आहे, विदेही आहे, यांच्यामध्ये बसून तुम्हाला ज्ञान देतो. तुम्ही आता ज्ञान
आणि योग शिकता. तुम्ही म्हणता ज्ञान सागर बाबांद्वारा आम्ही ज्ञान शिकत आहोत,
राज-राजेश्वरी बनण्यासाठी. ज्ञान सागर ज्ञान देखील शिकवतात, राजयोग सुद्धा शिकवतात.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) समजदार (ज्ञानी)
बनून मायेच्या वादळांकडून कधीही हार पत्करायची नाही. डोळे धोका देतात म्हणून आपली
काळजी घ्यायची आहे. कोणत्याही विकारी गोष्टी या कानांनी ऐकायच्या नाहीत.
२) आपल्या मनाला
विचारायचे आहे की, मी किती जणांना आप समान बनवतो? मास्टर पतित-पावनी बनून सर्वांना
पावन (राज-राजेश्वरी) बनविण्याची सेवा करत आहे का? माझ्यामध्ये कोणते अवगुण तर
नाहीत ना? दैवी गुण कितपत धारण केले आहेत?
वरदान:-
प्रत्येक
संकल्प अथवा कर्माला श्रेष्ठ आणि सफल बनविणारे ज्ञान स्वरूप समजदार भव
जे ज्ञान स्वरूप,
समजदार (ज्ञानी) बनून कोणताही संकल्प किंवा कर्म करतात, ते सफलता मूर्त बनतात.
याचेच यादगार भक्तीमार्गामध्ये कार्याला आरंभ करतेवेळी स्वस्तिक काढतात आणि गणेशाला
नमस्कार करतात. हे स्वस्तिक, स्व-स्थिती मध्ये स्थित होण्याचे आणि गणेश नॉलेजफूल
स्थितीचे प्रतीक आहे. तुम्ही मुले जेव्हा स्वतः नॉलेजफूल बनून प्रत्येक संकल्प किंवा
कर्म करता तर सहज सफलतेचा अनुभव होतो.
बोधवाक्य:-
ब्राह्मण
जीवनाची विशेषता आहे खुशी, त्यामुळे खुशीचे दान करत रहा.
अव्यक्त इशारे:- स्वयं
प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
जसे कोणतेही सायन्सचे
साधन यूज कराल तर पहिले चेक कराल की लाईट आहे की नाही. अगदी तसेच जेव्हा योगाचा,
शक्तींचा, गुणांचा प्रयोग करता तर पहिले हे चेक करा की मूळ आधार आत्मिक शक्ती,
परमात्म शक्ती किंवा लाईट (हलकी) स्थिती आहे का? स्थिती आणि स्वरूप जर डबल लाइट
असेल तर प्रयोगामध्ये खूप सहज सफलता प्राप्त करू शकता.