28-10-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, बाबा किती दूरवरून तुम्हाला शिकविण्यासाठी येतात, शिकवण्याची फी देखील घेत नाहीत, तर मग किती आवडीने शिकले पाहिजे”

प्रश्न:-
रूहानी गव्हर्नमेंटने सर्व दुनियेसाठी ही मोफत शाळा उघडली आहे - का?

उत्तर:-
कारण सर्व अनाथ, निराधार झाले आहेत. अशा गरीब मुलांकडून बाबा फी काय घेणार. या शेवटच्या जन्मामध्ये बाबा तुम्हाला असे शिक्षण देतात ज्यामुळे तुम्ही विश्वाचे मालक बनता. जी नवी-नवी मुले शिकण्यासाठी येतात, त्यांचा देखील काही तोटा होत नाही. भले उशिरा आले आहेत परंतु थोडी मेहनत करून जुने असलेल्यांपेक्षा देखील पुढे जाऊ शकतात.

गीत:-
जाग सजनियाँ जाग...

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांनी गाणे ऐकले रूहानी बाबांनी म्हटले - इथे तुम्हा मुलांना आत्म-अभिमानी होऊन बसायचे आहे. परमपिता परमात्मा आणि मुले आता एकत्र येऊन भेटली आहेत. याला म्हटले जाते आत्मा आणि परमपिता परमात्मा यांचा या सृष्टीवरील मेळावा. हा मेळावा एकदाच होतो. अर्धे कल्प सतयुग, त्रेतामध्ये कोणी बोलावतच नाहीत. तुम्ही मुले सुखी असता, जे सुख तुम्ही आत्मे आता प्राप्त करत आहात. तुम्ही पहिले सतोप्रधान होता, आता तमोप्रधान, पतित बनला आहात. आता पुन्हा बाबा पावन बनवत आहेत. जेव्हा पुजारी बनता तेव्हा दुःखी असता. ५ विकारांमुळेच दुःख होते. जितकी-जितकी शिडी उतरत जाता तितके दुःखी होत जाता. आता तुम्ही मुले जाणता दुःखाचे डोंगर कोसळणार आहेत. या जुन्या दुनियेचा आता विनाश होणार आहे. तुमची बुद्धी जाणते - बाबा निराकार आहेत, ते टीचर बनून आम्हा शाळीग्रामांना शिकवत आहेत. म्हणतात - ‘मुलांनो, मी पुन्हा तुम्हाला विश्वाचा मालक बनविण्यासाठी आलो आहे’. ५ हजार वर्षांपूर्वी देखील तुम्ही स्वर्गाचे मालक होतात, लक्षात आहे ना. संगमावरच तुम्हाला बनवले होते. आता पुन्हा तुम्हाला मनुष्यापासून देवता, वैकुंठ स्वर्गाचे मालक बनविण्यासाठी आलो आहे. तुम्हाला हा वारसा दिला होता, आणि मग तुम्हाला ८४ जन्म घ्यावे लागले. आता तुमचे ८४ जन्म पूर्ण झाले आहेत. आता मी आलो आहे, आता पुन्हा तुम्हाला पहिल्या नंबरच्या जन्मापासून सुरुवात करायची आहे. मी तुमचा पिता तुम्हाला शिकवतो देखील. आता बाबा तुम्हा मुलांकडून शिकवण्याची फी घेतील का? मुलांकडून फी कशी घेणार! मी एक पैसा देखील फी घेत नाही. किती दूर परमधामहून तुम्हाला शिकविण्यासाठी येतो. ही नोकरी करण्यासाठी रोज येतो. एखाद्याची नोकरी दूर कुठे तरी असते तर रोज यावे-जावे लागते ना. तुम्ही जाणता बाबा ज्ञानाचा सागर आहेत, जे आम्हाला सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान देतात. भगवानुवाच - ‘मी निराकार परमात्मा आहे, श्रीकृष्ण नाही’. तुम्ही ज्या श्रीकृष्णाला भगवान समजता, तो भगवान असूच शकत नाही. तो तर पूर्ण ८४ जन्म घेतो. भगवंताला काही स्वतःचे शरीर नाहीये. जसे तुम्ही आत्मा आहात, ते देखील आत्मा आहेत. परंतु फक्त ‘आत्मा’ म्हटले तर त्यांची गणना इतर सर्वांसोबत केली जाईल, म्हणून मला ‘परम आत्मा’ म्हटले जाते. ड्रामा प्लॅन अनुसार मज आत्म्याचे नाव ‘शिव’ आहे. मी निराकार आहे. मला म्हणतातच - शिवबाबा. माझे खरे नाव एकच आहे. बाकी वेगवेगळी नावे ठेवली आहेत. माझे नाव काही रुद्र नाहीये. ना श्रीकृष्णाने कोणता यज्ञ रचला आहे. हे सर्व खोटे आहे. मीच येऊन तुम्हाला सत्य सांगतो. तुम्हाला खरे-खरे नरापासून नारायण बनविण्यासाठी मी आलो आहे. माझे घर खूप दूर आहे. इथे येऊन या शरीराद्वारे तुम्हाला शिकवतो. पूर्ण दिवस या शरीरामध्ये बसून राहत नाही. फेरी मारत राहतो. माझी ग्लानी (निंदा) केल्यामुळे तुम्ही अतिशय दुःखी, महान पतित बनले आहात. ब्रह्माला देखील कोणी ‘आदि देव’ म्हणतात, कोणी ‘ॲडम’ म्हणतात, कोणी ‘महावीर’ म्हणतात. तुम्ही ‘प्रजापिता’ म्हणता. तुम्ही माझी अर्धा कल्प आठवण केली आहे. म्हणून मला या परक्या देशामध्ये यावे लागले आहे. सर्व पतित दुःखी आहेत. अनाथ आहेत. कोणी धनी-धोरी (मालक, वाली) राहिलेला नाही. अनाथ असणाऱ्यांना शिकवण्यासाठी गव्हर्नमेंट फी घेत नाही. हे तर खूप मोठे रुहानी गव्हर्नमेंट आहे. बेहदच्या बाबांना कोणीही जाणत नाही. किती जप-तप, दान-पुण्य इत्यादी करतात. जर विचारले की, ‘हे कशासाठी करत आहात?’ तर म्हणतील - या मार्गाने आम्ही भगवंताकडे पोहोणार. कोणी जप-तप करून पोहोचतील, कोणी शास्त्रे वाचून पोहोचतील. बाबा म्हणतात - असे तर काही नाहीये. भक्ती करता-करता तर तुम्ही जास्तच पतित बनला आहात. तुमचे पंख तुटले आहेत. जोपर्यंत तुमच्यामध्ये ज्ञान-घृत पडत नाही तोपर्यंत तुम्ही उडू शकत नाही. घृत अथवा तेल संपल्यामुळे ज्योत विझली आहे. मग मी येऊन भरतो.

तुम्ही जाणता - बाबा आलेले आहेत. इथे तुम्ही आनंदात राहता. घरी गेल्यावर तुम्ही विसरून जाता. तुमच्याकडून मी या शिक्षणाची फी घेत नाही. तुम्ही म्हणाल, हे मूठभर तांदूळ देतो. हे मूठभर तांदूळ तर तुम्ही भक्तिमार्गामध्ये देत आला आहात, ज्याचा रिटर्न (परतावा) मग दुसऱ्या जन्मामध्ये मिळतो. आता तर तुम्ही जाणता - बाबा सन्मुख बसले आहेत, तुम्हाला मोफत शिकवत आहेत; कारण जाणतात यांच्याकडे आहेच काय! तर बाबा थोडेच तुमच्याकडून काही घेतील. त्या शिक्षणामध्ये तर किती खर्च करावा लागतो. किती परीक्षा द्याव्या लागतात. मी तर एकच गोष्ट शिकवतो. शाळेमध्ये जे येत जातात त्यांना ॲड करत जातो.

हां, जे उशिरा येतात त्यांना थोडी जास्त मेहनत करावी लागते. त्याच्या बदल्यात मग उशिरा येणाऱ्यांना अजून चांगले पॉईंट्स मिळतात. जे भराभर शिकतात त्यांना काही तोटा नाही; नवे-नवे चांगले पॉईंट्स मिळाल्यामुळे जुन्या मुलांपेक्षाही वेगाने पुढे जातात. बाबा म्हणतात - सुरवातीला जे आले ते किती तरी पळून गेले. चांगले झाले की तुम्ही उशिरा आलात, तर आता तुम्हाला अजूनच अति गुह्य पॉईंट्स मिळत आहेत. बाबा म्हणतात - लौकिक शिक्षण देखील घ्या. शरीर निर्वाहअर्थ नोकरी-व्यवसाय भले करा, फक्त माझी आठवण करा आणि सृष्टीचक्राची आठवण करा. हे विसरता कामा नये. हे तर समजता ना, की आता आपल्या ८४ जन्मांचा शेवट आहे.

बाबा समजावून सांगत आहेत - माझी आठवण करा, तेव्हाच तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. आठवण तर तुम्ही लौकिक पित्याची देखील करता आणि पतीची देखील करता. आता मी तुमचा पतींचाही पती, पित्यांचाही पिता आहे, टीचर देखील आहे. मी तुमचा सर्व काही आहे. सुख देणारा आहे. ते पतित नातेवाईक इत्यादी तर तुम्हाला दुःखच देतील. सतयुगामध्ये कोणी कोणाला दुःख देत नाहीत. आता मी आलो आहे तुम्हाला सतयुगाचे राज्य-भाग्य देण्याकरिता. तुम्ही जाणता या संगमावरच बाबांकडून आम्ही वारसा घेतो. तर आता जितके तुम्ही शिकाल. शिक्षण देखील खूप सोपे आहे. हे आहेच सहज ज्ञान, सहज आठवण (सोपे ज्ञान, सोपी आठवण). मृत्यू देखील समोर उभा आहे. मी आलो आहे तुम्हा सर्वांना नेण्यासाठी, म्हणून मला काळांचाही काळ असे देखील म्हणतात. हे म्हणतात देखील की, ‘याला काळाने खाल्ले’. काळ शरीराला खातो, आत्म्याला तर खाऊ शकत नाही. आत्मा तर एक शरीर सोडून जाऊन दुसरे घेते. पार्ट बजावते. आता तुम्ही जाणता एकाच झटक्यात हे सर्व नष्ट होईल; मृत्यू असे होतील की कोणी कोणासाठी रडणार नाही. सर्वांना परत जायचेच आहे. रडतात तेव्हा, जेव्हा पुन्हा-पुन्हा दुःखाच्या दुनियेतच पुनर्जन्म घेतात. तुम्ही बाबांना बोलवताच याच्यासाठी की बाबा, आम्हाला तुमच्या सोबत घेऊन जा. तर आता बाबा आलेले आहेत, जे काही मनुष्यमात्र आहेत त्या सर्वांना घेऊन जातात. विनाश होईल तेव्हा सर्व मरतील. कोणीही राहणार नाही. गव्हर्नमेंट आपला प्लॅन बनवत आहे. मनुष्य सृष्टी तर वाढतच जात आहे. छोट्या-छोट्या फांद्यांना देखील किती पाने फुटतात. झाड तर वाढेलच. परंतु त्याची आयुर्मर्यादा देखील जरूर आहे. कल्पवृक्षाचे आयुष्य काही लाखो वर्षे थोडेच असू शकते? आता बाबा तुम्हाला पूज्य देवी-देवता बनविण्याकरिता शिकवत आहेत. सर्वात पहिले तर बाबा तुम्हालाच भेटतात, इतर धर्माचे तर येतातच मागाहून. सतयुगामध्ये तुम्ही येता, मी शिकवतो देखील फक्त तुम्हालाच. फक्त एवढेच सांगतो - पावन दुनियेमध्ये यायचे असेल तर विकारामध्ये जाऊ नका. तरीही तुम्ही मानत का नाही? विषा शिवाय तुम्ही राहू शकत नाही काय? माझ्या मतावर चालला नाहीत तर उच्च पद सुद्धा मिळणार नाही. तुमची इच्छाच होती मुळी कृष्णपुरीमध्ये जाण्याची. तर श्रीकृष्णाच्या राज्यामध्ये जाणार की प्रजेमध्ये जाणार? श्रीकृष्णासोबत तर राजकुमार-राजकुमारीच खेळतील-बागडतील, प्रजा थोडीच खेळणार. हे मम्मा, बाबा देखील शिकत आहेत. तुम्ही जाणता हे राधे-कृष्ण मग स्वयंवरानंतर लक्ष्मी-नारायण बनतील. राज्यकर्ते असणाऱ्यांचीच माळा बनते ना. ८ मण्यांमध्ये या; ठीक आहे, ८ मध्ये नाही) तर मग १०८ मध्ये तर या. कमीत-कमी १६,१०८ मध्ये तर या. हा आहेच राजयोग. बाबांच्या श्रीमतावर चालले पाहिजे. घरातील सभासदांना देखील हे ज्ञान समजावून सांगा. इतरांना समजावून सांगण्यासाठी बाबा तुम्हाला हे ज्ञान समजावून सांगत आहेत. जुन्या दुनियेचा विनाश होणारच आहे. महाभारताचे युद्ध देखील प्रसिद्ध आहे, ज्यावेळी भगवान आले होते. भगवंतानेच येऊन राजयोग शिकवला होता, स्वर्गाची स्थापना आणि नरकाचा विनाश झाला, तीच ही वेळ आहे. मग राज्य स्थापन होईल. सतयुगामध्ये दुसरा धर्म असतच नाही. भारत किती सर्वश्रेष्ठ होता, अत्यंत समृद्ध होता, सर्व ख्रिश्चन लोक याच भूमीतून इतके श्रीमंत झाले आहेत. सोमनाथाच्या मंदिरातून देखील उंटांचे ताफेच्या-ताफे भरून अमाप संपत्ती लुटून घेऊन गेले. ही तर फक्त एका मंदिराची गोष्ट आहे. भारतामध्ये तर अशी अनेक मंदिरे होती. बाबा सर्व झाडाचे रहस्य समजावून सांगत आहेत. मी बीज वरती आहे. हे उलटे झाड आहे ना. नॉलेजफुल मी आहे. तुम्ही मला बोलावताच मुळी - ‘पतित-पावन या’. आणि तरीही म्हणता नावा-रूपा पासून न्यारा आहे. रावणाने सर्वांना एकदम बुद्धू बनवले आहे. आता तुम्हाला स्मृती आली आहे, आमचे पिता कोण आहेत. हे चक्र कसे फिरते. सर्वांची बुद्धी एकसारखी तर असत नाही. एकाची बुद्धी दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. एकाची फीचर्स दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाहीत. तर आता तुम्हा मुलांना बाबांचे बनले पाहिजे ना. ते पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, तर सद्गुरू देखील आहेत. तुम्ही जाणता हे काही फी घेत नाहीत. एकही पैसा खर्च न करता तुम्हाला २१ जन्मांसाठी राज्यपद मिळते. तुम्ही भक्तिमार्गामध्ये ईश्वरअर्थ काही देत होतात त्याचे फळ तुम्हाला दुसऱ्या जन्मामध्ये मिळत होते. आता तर मी डायरेक्ट येऊन भारताला स्वर्ग बनवतो. याच्यासाठी जो काही खर्च होतो तो मुलांचाच लागतो. मुलांनाच म्हणतील - ‘खर्च करायचा आहे’. खर्च करण्यासाठी या एका ब्रह्माला व्यवस्थित पकडले आहे. यांच्यामध्ये प्रवेश करून यांच्याकडून सर्व काही करवून घेतले. हे तर लगेचच स्वाहा झाले. सर्वकाही जे यांच्याकडे होते, ते सर्व यज्ञामध्ये देऊन टाकले. बाबा म्हणाले - गरीब बन, तर मग तुला मी असा राजकुमार बनवेन, साक्षात्कार घडवला. विचार आला - आता याचे काय करायचे. विनाश तर होणारच आहे. बाबांनी सांगितले - माकडासारखी मूठ बंद करू नको, उघड. लगेच उघडली. नाहीतर मग इतक्या मुलांचा खर्च कसा चालला असता? बच्चू बादशाह, पीरू वजीर (मुले हेड बनली आणि स्वतः सल्लागार बनले) असा यांचा (ब्रह्मा बाबांचा) प्रवास राहिला. धन सेवेसाठी एकालाच पकडले. तुम्हा मुलांची भट्टी बनायची होती. शाळा देखील बनल्या होत्या. आता तुम्ही हुशार बनले आहात तर मग दुसऱ्यांना देखील शिकवता. तुम्ही कित्येकांचे कल्याण करता. बाबा आहेतच मुळी कल्याणकारी, सर्वांना नरकातून काढून स्वर्गामध्ये घेऊन जातात.

आता जितका पुरूषार्थ कराल तितके उच्च पद प्राप्त कराल. प्रजेसाठी देखील प्रदर्शनी इत्यादी सारख्या युक्त्या अजूनही निघत राहतील. भरपूर प्रजा बनत जाईल. राजा-राणी तर थोडे असतात. प्रजा तर करोडोच्या संख्येत असते ना. किंग-क्वीन तर एकच आहेत. तिथे भांडणे अथवा युद्ध इत्यादी काहीही होत नाही. मुले जाणतात - आता तर मृत्यू समोर उभा आहे. जितके योग मध्ये (आठवणीमध्ये) रहाल तितके पाप-आत्म्याचे पुण्य-आत्मा बनाल; दुसरा कोणताही उपाय नाही. सपूत बच्चे (गुणी मुले) आई-वडिलांना फॉलो करतात. वडील पवित्र बनले आणि मुलगा बनला नाही तर तो कुपुत्र मुलगा झाला ना. याबाबतीत तर नष्टोमोहा बनायचे असते. ‘माझे तर एक शिवबाबा, दुसरे कोणीही नाही’; वारसा देखील त्यांच्याकडून मिळेल. आता बाबांकडून नवीन दुनियेचा वारसा घ्यायचा असेल, तर पतित बनू नका. पावन बनल्याशिवाय नवीन दुनियेमध्ये जाऊ शकणार नाही. जन्मो-जन्मी पापे केलेली आहेत, त्याची शिक्षा भोगावी लागते. जणूकाही ६३ जन्मांच्या पापांची सजा मिळते. गर्भ-जेलमध्ये देखील सजा भोगतात. सतयुगामध्ये काही जेल इत्यादी नसते. तो आहेच स्वर्ग. आता बाबा एका सर्वसामान्य देहामध्ये आले आहेत, म्हणून बाबांना ओळखत नाहीत. बाबांशी योग लावल्यानेच आत्मा पावन बनेल. बाबा म्हणतात - ‘मी पतित दुनियेमध्ये, पतित शरीरामध्ये येतो, मग यांना नंबरवन पावन बनवतो. तत त्वम्. तुम्ही देखील पावन बनता. तुम्ही बाबांची संतान बनला आहात. प्रजापिता ब्रह्माची देखील मुले आहात, म्हणून ‘बाप-दादा’ असे म्हटले जाते. बाबा म्हणतात - आता वेळ फार कमी आहे. शरीराचा काही भरवसा नाही. बाबांची आठवण करत राहा, स्वदर्शन चक्रधारी बना. पूर्ण दिवस याच गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पूर्णपणे नष्टोमोहा बनायचे आहे. ‘एक शिवबाबा दुसरे कोणीही नाही’, हा धडा पक्का करायचा आहे. सुपुत्र बनून माता-पित्याला फॉलो करायचे आहे.

२) बिना कवडी खर्चण्याच्या अभ्यासाने २१ जन्मांची राजाई मिळते आहे तर खूप मन लावून शिकायचे आहे. स्वदर्शनचक्रधारी बनायचे आहे.

वरदान:-
सदैव आपल्या श्रेष्ठ भाग्याच्या नशेमध्ये आणि खुशीमध्ये राहणारे पद्मा-पदम भाग्यशाली भव

पूर्ण विश्वामध्ये जे काही धर्म पिता अथवा जगद्गुरु म्हणून संबोधले जाणारे बनले आहेत त्यापैकी कोणालाही मात-पित्याच्या नात्याने अलौकिक जन्म आणि पालना प्राप्त होत नाही. ते अलौकिक मात-पित्याचा अनुभव स्वप्नामध्ये देखील करू शकत नाहीत आणि तुम्ही पद्मापदमपती श्रेष्ठ आत्मे रोज मात-पित्याची अथवा सर्व नात्यांची प्रेमपूर्वक आठवण प्राप्त करण्यासाठी पात्र आहात. स्वयं सर्वशक्तिवान बाबा तुम्हा मुलांचे सेवक बनून प्रत्येक पावलावर साथ देत आहेत, तर याच श्रेष्ठ भाग्याच्या नशेमध्ये आणि खुशीमध्ये राहा.

बोधवाक्य:-
तानाला आणि मनाला नेहमी आनंदी ठेवण्यासाठी आनंदाने भरलेले समर्थ संकल्प करा.

हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.

बापदादा सदैव श्रीमत देतात की मनामध्ये प्रत्येक आत्म्यासाठी शुभ भावना आणि शुभ कामना ठेवा. अपकारीवर देखील उपकाराची वृत्ती ठेवा - हे आहे स्वच्छ मन. स्वतःसाठी अथवा इतरांसाठी व्यर्थ संकल्प येत असेल तर हे काही स्वच्छ मन नाहीये. स्वच्छ मन, क्लीन आणि क्लिअर बुद्धी असेल तर डबल लाईट स्थिती बनू शकेल. पित्यासमान स्थिती बनविण्याचे हेच सोपे साधन आहे.