29-03-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   25.10.2009  ओम शान्ति   मधुबन


सर्व खजिन्यांनी संपन्न आपल्या चेहऱ्याद्वारे अथवा वर्तनाद्वारे अलौकिकतेचा साक्षात्कार घडवा


आज सर्व खजिन्यांचे दाता आपल्या खजिन्यांचे मालक असलेल्या मुलांना पाहत आहेत. प्रत्येक मूल सर्व खजिन्यांनी संपन्न आहे कारण बाबांनी सर्व मुलांना एक सारखेच आणि एकाच वेळी सर्व खजिने दिले आहेत. तर बापदादा आपल्या बालक सो मालक मुलांना भेटण्यासाठी आले आहेत. मुलांनी बोलावले म्हणून बाबा मुलांच्या प्रेमापोटी पोहोचले आहेत. खजिने तर पुष्कळ आहेत, सर्वात पहिला खजिना आहे - ज्ञान धन, ज्या ज्ञान धनामुळे मालामाल झालात, महादानी बनून इतरांना देखील वाटत राहता. ज्या ज्ञानाच्या खजिन्यामुळे विविध बंधनांमध्ये अडकून पडलेले आत्मे, त्या सर्व बंधनांमधून मुक्त झाले. बंधनयुक्त पासून बंधनमुक्त झाले. त्याच सोबत - योग अर्थात आठवणीचा खजिना, ज्याद्वारे अनेक शक्ती प्राप्त केल्या आहेत. तसेच धारणेद्वारे सर्व गुणांची अनुभूती अर्थात खजिना मिळाला आहे. त्या सोबतच धारणेच्या शक्तीद्वारे सर्वांप्रती स्नेहाची शक्ती, सर्वांचे प्रिय आणि न्यारेपणाच्या शक्तीचा खजिना प्राप्त केला, सर्वांच्या स्नेहाचा खजिना अनुभव केला. त्याच सोबत सर्व ब्राह्मण नात्याद्वारे अपार आनंदाच्या खजिन्याचा अनुभव केला. परंतु सर्व खजिन्यांसोबत जो विशेष खजिना आहे तो आहे - संगमातील वेळेचा खजिना. ज्या आत्म्यांना वेळेच्या खजिन्याचे महत्व आहे ते सदैव अनेक प्राप्तींचे मालक बनतात कारण संगमयुगाचा कालावधी फार कमी आहे परंतु या कालावधीच्या तुलनेमध्ये प्राप्ती जास्त आहेत. सर्वात जास्त संगमयुगाची श्रेष्ठ ते श्रेष्ठ प्राप्ती आहे - स्वयं भगवान पित्याच्या रूपामध्ये, शिक्षकाच्या रूपामध्ये, सद्गुरूच्या रूपामध्ये प्राप्त होतात. संगमयुगातील छोट्याशा जन्मामध्ये २१ जन्मांची प्राप्ती, ज्यामध्ये तन, मन, धन, जन सर्व प्रकारची प्राप्ती आहे आणि गॅरंटी आहे २१ जन्म फुल, अर्धा नाही, पाऊण नाही परंतु फुल २१ जन्मांची गॅरंटी आहे. तर सर्वात जास्त जे महत्त्व आहे ते आहे संगमयुगाचा एक-एक सेकंद अनेक वर्षांच्या समान आहे. तर सांगा, सर्व खजिन्यांनी संपन्न तर आहात ना? संपन्न आहात ना? म्हणूनच बापदादा नेहमी वेळेची स्मृती करून देत आहेत. बरीच मुले समजतात की एक-दोन मिनिटे जर दुसरा काही विचार केला, तर २ मिनिटेच तर आहेत. परंतु जेवढे वेळेचे महत्त्व आहे त्यानुसार तर २ मिनिटे नाहीत, २ महिने देखील नाहीत, तर दोन वर्षांच्या बरोबरीने आहेत. इतके संगमाच्या वेळेचे महत्त्व आहे. सर्व शक्तींची, सर्व गुणांची, परमात्म प्रेमाची, ब्राह्मण परिवाराच्या प्रेमाची आणि कल्पापूर्वीच्या ईश्वरीय अधिकाराची, ह्या सर्व प्राप्ती या छोट्याशा युगामध्ये आहेत इतर कोणत्याही युगामध्ये या सर्व प्राप्ती नाहीत. राज्य भाग्य असेल, तुम्हा सर्वांचे राज्य असेल, सुख-शांती सर्व काही असेल परंतु परमात्म मिलनाचे, अतींद्रिय सुखाचे, सर्व ब्राह्मण परिवाराच्या प्रेमाचे, आदि-मध्य-अंताच्या नॉलेजचे भाग्य आता संगमावरच मिळाले आहे, प्रत्येक कल्पामध्ये मिळत राहील.

बापदादा प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरून पाहतात की किती खजिने जमा आहेत? खजिने तर मिळाले आहेत परंतु प्रत्येकाने जमेचे खाते किती वाढविले आहे, ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून, वर्तनामधून दिसून येते आणि तुम्ही देखील सर्व आपल्या स्वतःला जाणता की मी किती जमा केले आहे! आता बापदादांची अंतःकरणापासून हीच आशा आहे की खजिने तर मिळाले आहेत परंतु आता वेळ फक्त वर्णन करण्याची नाही परंतु तुमचा चेहरा आणि वर्तन प्रत्यक्ष अनुभव करवू दे की, हे आत्मे कोणी विशेष आहेत, न्यारे आहेत आणि परमात्म्याला प्रिय आहेत कारण पुढे जाऊन काळ परिवर्तन झाल्यामुळे तुमची सेवा केवळ वर्णन केल्याने नाही, वेळ नाजूक झाल्याने इतका वेळ कोणी काढू शकणार नाही परंतु तुमच्या खजिन्यांनी संपन्न असलेल्या चेहऱ्याद्वारे, वर्तनाद्वारे तुमच्या अलौकिकतेचा दुरूनच साक्षात्कार होईल. तर आता आपला असा पुरुषार्थ प्रत्यक्ष करा. जसे ब्रह्मा बाबांना पाहिले, भले संघटनमध्ये जरी असले तरी देखील दुरूनच ती पर्सनॅलिटी, ते तेज अनुभवास आले. तसेच आता डबल विदेशी विशेष डबल पुरुषार्थ करा. बापदादा डबल पुरुषार्थी म्हणतात तर बापदादा आज निमित्त डबल विदेशी मुलांना पाहून खुश आहेत. वृद्धीचा पुरुषार्थ चांगला करत आहात, निमित्त बनलेल्या आत्म्यांद्वारे पालना देखील सर्वांना खूप चांगली मिळत आहे आणि बापदादांना सर्वांची एक गोष्ट खूप आवडते ती ही की, सर्व आत्मे दरवर्षी आपल्या संघटनचे मिलन मधुबनमध्ये विशेष रीतीने करतात कारण मधुबनचे वायुमंडळ रिफ्रेशमेंटसाठी खूप सहयोग देते आणि एकच जबाबदारी आहे - स्व-परिवर्तन, मनसा सेवा, एकमेकांच्या अनुभवांचा देखील चांगला चान्स मिळतो. तर बापदादा या गोष्टीसाठी मुबारक देत आहेत.

आता काहीतरी कमाल आपापल्या ठिकाणी जाऊन करा, काहीतरी वेगळेपणा असावा जो बाबांना आवडतो तो प्रॅक्टिकल मध्ये अनुभव करवून द्या, ज्यामुळे मधुबनच्या रिफ्रेशमेंटचा सहयोग तिथे देखील अनुभव करत राहतील. तर आज विशेष डबल पुरुषार्थी ग्रुपचे मिलन आहे आणि पहा सर्वांवर इंडियातील मुलांचे इतके प्रेम आहे जे पहिला चान्स तुम्हालाच देतात. तर पहिल्या चान्सचा रिझल्ट पहिला नंबर घ्यायचा आहे. चांगले वाटते, बापदादांनी यापूर्वी सुद्धा ऐकवले आहे की, डबल विदेशी किंवा डबल पुरुषार्थी मुलांनी बाबांचे एक विशेष टायटल प्रत्यक्ष केले आहे. जे विदेशातील बहुतांशी ठिकाणाहून बाबांच्या मुलांना शोधून काढून त्यांच्याही नशिबाचे चित्र (तकदीर की तस्वीर) बनविले आहे. म्हणूनच जे आवडीने चोहो बाजूंना मेहनत करत आहेत, त्यामुळे बाबांचे विश्व कल्याणकारी कर्तव्य प्रसिद्ध केले आहे म्हणूनच बापदादा प्रत्येक मुलाला वाह! बच्चे वाह! अशी मुबारक देतात. आता देखील जसे भारतामध्ये कानाकोपऱ्यात संदेश देण्याची सेवा चालत राहते तसेच तिथेही उमंग-उत्साह आहे की राहिलेल्या देशातही संदेश देऊ या; कारण वेळेचा काहीच भरवसा नाही. बापदादांनी अगोदरच सांगितले आहे की अचानक काहीही होऊ शकते म्हणूनच संदेश देण्याचा अथवा आपल्या प्रोग्रेसचा, कधी-कधी नाही, आताच्या आत्ता विचार करा; बापदादांनी सांगितलेलेच आहे की, खरेतर ब्राह्मणांच्या डिक्शनरी मध्ये ‘कधी-कधी’ हा शब्द शोभत नाही, ‘आताच्या-आता’, संकल्प केला की करायचेच आहे. बघूया, करूया, असा ‘या-या’ हा शब्दच नको आहे, म्हणूनच तुमच्या मम्माने देखील हेच लक्ष्य ठेवले आणि सर्वांना आठवण करून दिली की, “आता नाही तर कधीच नाही”.

तर डबल पुरुषार्थी मुले आताच्या आता करणारे आहेत की कधी-कधी करणारे आहेत? जे समजतात की आताच्या आता करून दाखविणारे आहोत, त्यांनी हात वर करा. करायचेच आहे. करायचेच आहे. करू नाही, परंतु करायचेच आहे. लक्षात ठेवा, आपणच आपला चार्ट ठेवा आणि बापदादांनी आधीच सांगितले आहे की दररोज रात्रीला बापदादांना आपल्या पूर्ण दिवसाचा चार्ट सांगितल्यानंतर आपले डोके रिकामी करून झोपल्यामुळे तुम्हाला झोपही चांगली येईल आणि त्याच सोबत बाबांना रोजचा हालहवाल दिल्याने दुसऱ्या दिवशी आठवण राहते की बाबांना मी त्याबद्दल काही सांगितले आहे, तर ती स्मृती तुम्हाला मदत करते. आणि मग धर्मराजपुरीमध्ये जावे लागणार नाही. देऊन टाकले ना आणि परिवर्तन केले तर धर्मराजपुरी पासून वाचाल. आता पुढचे वर्ष, पाहिले तर कोणीच नाहीये परंतु आता लक्ष्य ठेवा, वर्षाला सोडा, कमीत कमी जितक्या थोड्या वेळामध्ये बाबांची जी आशा आहे की चेहरा दिसावा, वर्तन दिसावे, ते लवकरात लवकर प्रॅक्टिकलमध्ये करून दाखवा. हिंमत असेल, तर हात वर करा. हिंमत आहे? हिंमत आहे? छान, मुबारक असो! बापदादा तर प्रत्येक मुलामध्ये निश्चय आणि हिंमतीचा उमंग-उत्साह आतातरी पहात आहेत, परंतु जाता-जाता प्लेनमध्ये थोडा कमी करू नका. वाढवत रहा. बापदादांनी जी दृढ संकल्पाची चावी दिली आहे ती सदैव कायम ठेवा. करायचेच आहे, आताच्या आता, करूया-बघूया हे ‘या-या’ नको. तो काळ आता गेला. होऊन जाईल, नाही; व्हायचेच आहे. बापदादांनी डबल पुरुषार्थीचे जे टायटल दिले आहे, ते नेहमी लक्षात ठेवा.

बाकी बापदादांनी रिझल्ट ऐकला, बापदादांनी जो सेवेचा प्लॅन दिला, त्यामध्ये भारताने देखील काही कमी केलेले नाही आणि परदेशाने देखील कमी केलेले नाहीये. या वरदानाला बहुतांशी ठिकाणी उमंग-उत्साहाने केले आहे आणि रिझल्ट देखील वेगवेगळ्या ठिकाणाहून येत आहे. तर बापदादा भले भारतातील मुलांना, किंवा परदेशातील मुलांना पद्म-पद्म पटीने प्रॅक्टिकलमध्ये आणल्याबद्दल मुबारक देत आहेत.

आता या वर्षामध्ये विशेष कोणती गोष्ट प्रॅक्टिकलमध्ये करायची आहे, ते ऐकवले की आता तुम्हाला जो कोणी बघेल त्याला तुमच्या चेहऱ्यावर ते तेज दिसून यावे. प्रत्यक्षतेसाठी निमित्त बनायचे आहे, बाबांना प्रत्यक्ष करायचे आहे तर काय करायचे आहे? सदैव हसरा चेहरा, कोणत्याही चिंतनामध्ये, कोणत्याही संभ्रमामध्ये नाही. बापदादांनी सांगितले होते की, आता दोन शब्द लक्षात ठेवा - मायेला इशारा करा गेट आऊट आणि स्वतःला गेस्ट हाऊसमध्ये अनुभव करा. ही दुनिया तुमची नाही, गेस्ट हाऊस आहे, आता तर घरी जायचेच आहे. घराचे (परमधामचे) नजारे मनामध्ये, बुद्धीमध्ये दिसून यावेत. तर ऑटोमॅटिकली घर आले की आले. तुमचे एक गाणे आहे - “अब घर चलना है”. तर ही लाट प्रत्येक स्थानावर असावी, भले भारत असो किंवा विदेश असो, आता हा अनुभव प्रत्यक्ष करून दाखवा. बेहदचे वैराग्य, गेस्ट हाऊसमध्ये मन लागत नाही, ‘जायचे आहे, जायचे आहे’, हेच लक्षात राहते. तर हे बेहदचे वैराग्य कोणत्याही प्रकारच्या मनातील संकल्पांना, आपसातील संघटनमधील मायेच्या विघ्नांना पूर्णपणे समाप्त करेल. हे मायेचे तुफान तुमच्यासाठी तोहफा बनतील. हे जे छोटे-मोठे पेपर (परिस्थिती) येतात ते तुम्हाला पेपर वाटणार नाहीत परंतु एक अनुभव वाढविणाऱ्या लिफ्ट वाटतील. गिफ्ट आणि लिफ्ट. समजले. आता ध्येय ठेवा बेहदचे वैरागी आणि हिंमत उमंग-उत्साहाच्या पंखांनी उडत रहा आणि इतरांना उडवत रहा. आता उडण्याची वेळ आहे. आपले पंख नेहमी चेक करा कमजोर तर होत नाहीत ना!

बापदादा डबल विदेशींचा विस्तार पाहून खुश आहेत, आता काय पाहू इच्छितात? प्रत्येक मूल बाप समान संपन्न आणि संपूर्ण, सर्व खजिन्यांनी संपन्न आणि प्रत्येक श्रीमत जे मिळत राहिले आहे त्यामध्ये संपूर्ण. पसंत आहे? पसंत असेल तर टाळ्या वाजवा. अच्छा. ही टाळी दररोज आठवायची आहे, आपणच आपल्या मनामध्ये वाजवायची, बाहेरून नाही मनामध्ये वाजवायची. हा होमवर्क आहे. अच्छा.

९० देशांमधून २३०० भाऊ-बहिणी आले आहेत:- (पाचही खंडातील भाऊ-बहिणींना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये उभे केले) १- अमेरिका, कॅनडा आणि कॅरेबियनचे भाऊ-बहिणी, २- ऑस्ट्रेलिया, आशिया, न्यूझीलंड, फिजी, ३- युरोप, यु.के., मिडल ईस्ट, ४- आफ्रिका, साऊथ आफ्रिका, मॉरिशस, ५- रशिया, सी.आय.एस., बाल्टिक कंट्रीज.

सर्वांनी पुढे जाण्याचा संकल्प देखील केला आहे आणि आपसामध्ये रूह रिहान देखील केले आहे. बापदादांकडे समाचार येत असतो. आता एव्हररेडी ग्रुप बनवा. जे देश जितके पण आले आहेत, त्या देशांमध्ये बापदादा प्राईज (बक्षीस) देतील, कोणते प्राईज देतील ते त्या वेळी पाहू. परंतु बापदादा डबल पुरुषार्थी मुलांच्या प्रत्येक एरियाच्या ग्रुपला हेच सांगत आहेत की कोणताही ग्रुप जो नंबर वन येईल त्याला प्राईज देणार. एका देशातील प्रत्येक शहरामध्ये जेवढी सेंटर्स आहेत, समजा अमेरिका आहे, अमेरिकेच्या कनेक्शनमध्ये जेवढे देश आहेत, त्या सर्व देशांनी आपसामध्ये सल्लामसलत करून प्रोग्राम बनवावा की, इथे सर्वजण निर्विघ्न राहतील, एव्हररेडी राहतील, मायाजीत राहतील, स्नेही आणि सेवेमध्ये सहयोगी राहतील. जो नंबर वन असेल त्याला बापदादा प्राईज देतील. चला, एकाला नाही तर तिघांना देऊ. एक दोन तीन. तीन नंबर. तसे तर एकालाच दिले जाते परंतु डबल पुरुषार्थी आहात ना म्हणून तिघांना चान्स देऊ. पसंत आहे? हो, हात हलवा. पसंत आहे? किती वेळ पाहिजे? हे टिचरनी सांगावे, किती वेळ पाहिजे प्राईज घेण्यासाठी? सांगा. (सर्वांनी म्हटले - फेब्रुवारी पर्यंत). सर्व देशातील टिचर्सनी हात वर करा. ठीक आहे? तयार व्हाल ना! मग बापदादा प्राईज देतील. खूप छान. यासाठी टाळ्या तर वाजवा. अच्छा. भारताचा देखील टर्न येईल. आता तर तुम्हा लोकांचा टर्न आहे. बापदादा देखील खुश होतात - ‘वाह तीव्र पुरुषार्थी मुलांनो वाह!’ अच्छा.

चोहो बाजूंच्या तीव्र पुरुषार्थी हिंमत आणि उमंग-उत्साहाने उडणाऱ्या, चालणाऱ्या नाही, उडणाऱ्या, चोहो बाजूंच्या बाप समान संपन्न आणि संपूर्ण बनणाऱ्या बापदादांच्या दिलतख्तनशीन, सदैव बाबांच्या कंबाइंड रूपाचा अनुभव आणि सहयोग घेणाऱ्या बाबांच्या प्रत्येक लाडक्या, स्नेही मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

दादींसोबत संवाद:- बाबांसोबत तुम्हा सर्वांचा देखील सहयोग राहिला आहे ना. मुले आणि बाबा दोघांच्या सहयोगाने यज्ञ चालला आहे, चालत राहील. निमित्त तर तुम्ही देखील आहात ना. साकारमध्ये एकाने म्हटले दुसऱ्याने केले. एकमेकांचे सहयोगी बनून उडत आहात. बाबा उडताना पाहून खुश होतात. (दादी जानकी म्हणाल्या - कमाल आहे, गुलजार दादींची). त्या तर सोबत आहेतच. बापदादांची हीच शुभ इच्छा आहे की तुम्ही सर्व जे निमित्त आहात ते सदैव एक असल्याचे दिसून यावे. वेगवेगळे नाही, एक असल्याचे दिसावे. एकाने म्हटले दुसऱ्याने सल्ला दिला आणि एक झाले. म्हणूनच तर यज्ञ चालत आहे. तुम्हा सर्वांच्या एकतेनेच चालला आहे, भले बाहेरून दिसत नसेल परंतु संकल्पामध्ये, विचारांमध्ये एक राहून अजून पुढे वाढवायचे आहे कारण आता तुम्हा सर्वांवर नजर आहे. अच्छा.

वरदान:-
आपल्या श्रेष्ठ वृत्तीद्वारे शुद्ध वायुमंडळ बनविणारे सदा शक्तिशाली आत्मा भव

जे सदैव आपल्या श्रेष्ठ वृत्तीमध्ये स्थित राहतात ते कोणत्याही वायुमंडळ, वायब्रेशनमध्ये डगमगू शकत नाहीत. वृत्तीद्वारेच वायुमंडळ बनते, जर तुमची वृत्ती श्रेष्ठ असेल तर वायुमंडळ शुद्ध बनेल. बरेच जण वर्णन करतात की, काय करू वायुमंडळच असे आहे, वायुमंडळामुळे माझी वृत्ती चंचल झाली - तर त्या वेळी शक्तिशाली आत्म्याऐवजी कमजोर आत्मा बनतात, परंतु व्रताच्या (प्रतिज्ञेच्या) स्मृती द्वारे वृत्तीला श्रेष्ठ बनवा म्हणजे मग शक्तिशाली बनाल.

सुविचार:-
गुणमूर्त बनून सर्वांना गुणमूर्त बनविणे हेच महादानी बनणे आहे.

हे अव्यक्त इशारे:- “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”

आपसामध्ये एकमेकांप्रती जर खरा स्नेह असेल, तर स्नेही आत्म्याप्रती कधीही अनुमान (शंका) उत्पन्न होणार नाही. त्यांचे स्नेहाचे बोल, साधारण असून सुद्धा मनाला फील होणार नाहीत. त्यांचे साधे बोलणे देखील असे वाटेल की यांनी नक्कीच काहीतरी चांगल्या उद्देशाने म्हटले असेल. निरर्थक, व्यर्थ वाटणार नाहीत. जिथे स्नेह असतो, तिथे फेथ (विश्वास) नक्कीच असतो. तर ब्राह्मण परिवारामध्ये एकमेकांप्रती स्नेह आणि फेथ (विश्वास) ठेवून, संपूर्ण निश्चयबुद्धी बना तेव्हाच ब्रह्मा बाबांच्या आशांना पूर्ण करू शकाल.