29-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - पतित जगाशी असलेले नाते तोडून एका बाबांशी बुद्धियोग जोडा, तर मायेकडून हार पत्करावी लागणार नाही”

प्रश्न:-
समर्थ बाबा सोबत असताना देखील यज्ञामध्ये अनेक विघ्ने का पडतात? त्याचे कारण काय आहे?

उत्तर:-
ही विघ्ने तर ड्रामानुसार पडणारच आहेत, कारण जेव्हा यज्ञामध्ये असुरांची विघ्ने पडतील, तेव्हाच तर पापाचा घडा भरेल. यामध्ये बाबा काहीही करू शकत नाहीत, हे तर ड्रामामध्ये नोंदलेलेच आहे. विघ्ने पडणारच आहेत, परंतु त्या विघ्नांना तुम्ही घाबरायचे नाही.

गीत:-
कौन है माता, कौन पिता है…

ओम शांती।
मुलांनी बेहदच्या बाबांचा आदेश ऐकला. हे जे या जगाचे मम्मा-बाबा आहेत, हे जे तुमचे नाते आहे, ते देहाशी संबंधित आहे कारण देहामुळे सर्वात आधी मातेची आणि मग पित्याची ओढ लागते, त्यानंतर भाऊ-बांधव इत्यादींची ओढ लागते. तर बेहदच्या बाबांचे म्हणणे आहे की, या जगामध्ये तुमचे जे माता-पिता आहेत, त्यांच्याशी असलेला बुद्धियोग तोडून टाका. या जगाशी नाते ठेवू नका कारण ही सर्व कलियुगी छी-छी नाती आहेत. जगत अर्थात दुनिया. या पतित दुनियेमधून बुद्धीचा योग तोडून मज एकाशी जोडा आणि मग नवीन जगाशी जोडा, कारण आता तुम्हाला माझ्याकडे यायचे आहे. फक्त नाते जोडण्याची गोष्ट आहे, दुसरी कोणतीही गोष्ट नाही आणि कोणताही त्रास नाही. नाते तेच जोडतील ज्यांना डायरेक्शन मिळते. सतयुगामध्ये सुरुवातीला नाते चांगले असते, सतोप्रधान असते, नंतर मग हळूहळू खाली उतरत जातात. मग जे सुखाचे नाते आहे ते हळूहळू कमी होत जाते. आता तर पूर्णपणे या जुन्या दुनियेशी असलेले नाते तोडावे लागेल. बाबा म्हणतात माझ्याशी नाते जोडा. श्रीमतवर चाला आणि देहाची जी ही नाती आहेत ती सर्व सोडून द्या. विनाश तर होणारच आहे. मुले जाणतात की बाबा, ज्यांना परमपिता परमात्मा म्हटले जाते, ते देखील ड्रामा अनुसार सेवा करतात. ते देखील ड्रामाच्या बंधनामध्ये बांधील आहेत. मनुष्य तर समजतात ते सर्वशक्तिमान आहेत. जसे श्रीकृष्णाला देखील सर्वशक्तिमान मानतात, त्यांना स्वदर्शन चक्र दिले आहे. समजतात की, त्याने श्रीकृष्ण गळा कापतात. परंतु हे समजत नाहीत की देवता हिंसेचे काम कसे बरे करतील. ते काही असे करू शकत नाहीत. देवतांसाठी तर म्हटले जाते - अहिंसा परमो धर्म होता. त्यांच्यामध्ये हिंसा कुठून आली? ज्याला जे सुचले ते त्यांनी बसून लिहून ठेवले आहे. धर्माची किती निंदा केली आहे. बाबा म्हणतात या शास्त्रांमध्ये सत्य तर अगदी पिठात मीठ असल्यासारखे (नावालाच) आहे. हे देखील लिहिलेले आहे की, रुद्र ज्ञान यज्ञ रचला होता. त्यामध्ये असुर विघ्न टाकत होते. अबलांवर अत्याचार व्हायचे. ते तर योग्य लिहिले आहे. आता तुम्ही समजता की - शास्त्रांमध्ये खरे काय आहे आणि खोटे काय आहे. भगवान स्वतः म्हणतात की, या रुद्र ज्ञान यज्ञामध्ये विघ्ने जरूर पकडणार. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. असे नाही की परमात्मा सोबत आहेत तर ते विघ्नांना दूर करतील. यामध्ये बाबा काय करणार! ड्रामामध्ये होणारच आहे. हे सर्व विघ्नं निर्माण करतील तेव्हाच तर पापाचा घडा भरेल ना. बाबा समजावून सांगतात की ड्रामामध्ये जे नोंदलेले आहे, तेच घडणार आहे. असुरांची विघ्नं जरूर पडतील. आपली राजधानी जी स्थापन होत आहे. अर्धा कल्प मायेच्या राज्यामध्ये मनुष्य किती तमोप्रधान बुद्धीचे, भ्रष्टाचारी बनतात. मग त्यांना श्रेष्ठाचारी बनविणे हे बाबांचे काम आहे ना. अर्धे कल्प लागते भ्रष्टाचारी बनायला. मग एका सेकंदामध्ये बाबा श्रेष्ठाचारी बनवतात. निश्चय व्हायला वेळ थोडाच लागतो. अशी खूप चांगली मुले आहेत ज्यांना निश्चय होतो, ती लगेच प्रतिज्ञा करतात, परंतु माया देखील पैलवान आहे ना. ती काही ना काही मनसामध्ये वादळे उत्पन्न करते. पुरुषार्थ करून हे कर्मणामध्ये (कृतीमध्ये) येऊ द्यायचे नाही. सर्वजण पुरुषार्थ करत आहेत. कर्मातीत अवस्था तर अजून झालेली नाही. कर्मेंद्रियांकडून काही ना काही चुकीचे काम होते. कर्मातीत अवस्थेपर्यंत पोहोचे पर्यंत विघ्नं जरूर पडणार. बाबांनी समजावून सांगितले आहे - पुरुषार्थ करता-करता शेवटी जाऊन कर्मातीत अवस्था होते, त्यानंतर मग हे शरीरच राहाणार नाहीये, म्हणून वेळ लागतो. काही ना काही विघ्न पडतात. कुठे माया हरवूनही टाकते. बॉक्सिंग आहे ना. इच्छा असते की बाबांच्या आठवणीमध्ये राहावे, परंतु राहू शकत नाहीत. थोडा-बहुत वेळ जो शिल्लक आहे, हळूहळू ती अवस्था धारण करायची आहे. कोणी जन्मतःच राजा तर असत नाही. लहान मूलगा हळूहळू मोठा होईल ना, यामध्ये देखील वेळ लागतो. आता तर थोडा वेळ उरला आहे. सर्व काही पुरुषार्थावर अवलंबून आहे. अटेंशन द्यायचे आहे की, आम्ही कसेही बाबांकडून वारसा जरूर घेणार. मायेशी जरूर सामना करणार, म्हणूनच प्रतिज्ञा करतात. माया देखील काही कमी नाहीये. ती अगदी साध्या-साध्या रूपामध्ये सुद्धा येते. रुस्तम समोर (पैलवाना समोर) ती चांगलाच जोर लावते. या गोष्टी कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीत. बाबा म्हणतात की, मी तुम्हा मुलांना आता समजावून सांगतो. बाबांद्वारे तुम्ही सद्गती प्राप्त करता. मग या ज्ञानाची गरजच राहत नाही. ज्ञानाने सद्गती होते. सद्गती म्हटले जाते सतयुगाला.

तर गोड-गोड मुलांना लक्ष्य मिळाले आहे - हे देखील समजतात की ड्रामानुसार झाड वाढायला वेळ तर लागतोच. विघ्नं तर खूप पडतात. चेंज व्हावे लागते. कवडी पासून हिऱ्यासमान बनावे लागते. रात्रं-दिवसाचा फरक आहे. देवतांची मंदिरे आजही बनवतच राहतात. तुम्ही ब्राह्मण आता मंदिरे बनवणार नाही कारण तो आहे भक्तिमार्ग. दुनियेला हे ठाऊकच नाहीये की आता भक्तिमार्ग संपून ज्ञानमार्ग जिंदाबाद होणार आहे (ज्ञानमार्गाचा विजय होणार आहे). हे फक्त तुम्हा मुलांना माहीत आहे. मनुष्य तर समजतात की कलियुग अजून छोटे बाळ आहे. त्यांचा सर्व आधार आहे - शास्त्रांवर. तुम्हा मुलांना तर बाबा बसून सर्व वेदांचे, शास्त्रांचे रहस्य समजावून सांगत आहेत. बाबा म्हणतात - आतापर्यंत तुम्ही जे वाचले आहे, ते सर्व विसरून जा. त्याने कोणाचीही सद्गती होत नाही. फारफार तर अल्पकाळाचे सुख मिळत आले आहे. कायमचे सुखच सुख मिळेल, असे होऊ शकत नाही. हे आहे क्षणभंगुर सुख. मनुष्य दुःखीच राहतात. मनुष्य हे जाणत नाहीत की सतयुगामध्ये दुःखाचे नामोनिशाण सुद्धा नसते. त्यांनी तिथल्या साठी देखील अशा गोष्टी सांगितल्या आहेत. तिथे कृष्णपुरीमध्ये कंस होता, असे होते... श्रीकृष्णाने तुरुंगामध्ये जन्म घेतला. अशा पुष्कळ गोष्टी लिहिल्या आहेत. आता श्रीकृष्ण स्वर्गाचा पहिल्या नंबरचा प्रिन्स (राजकुमार), त्याने काय पाप केले? या आहेत दंतकथा, त्या देखील तुम्हाला आता समजत आहेत, जेव्हा हे बाबांनी तुम्हाला सत्य सांगितले आहे. बाबाच येऊन सचखंड स्थापन करतात. सच-खंडामध्ये किती सुख होते, झूठ-खंडामध्ये किती दुःख आहे. हे सर्वजण विसरले आहेत. तुम्ही जाणता की, आपण श्रीमतावर सचखंड स्थापन करून त्याचे मालक बनणार आहोत.

बाबा समजावून सांगतात की, अशा प्रकारे श्रीमतावर चालल्याने तुम्ही उच्च पद प्राप्त करू शकाल. मुले हे जाणतात की, आपल्याला हे शिक्षण शिकून सूर्यवंशी महाराज-महाराणी बनायचे आहे. उच्च पद मिळविण्याची इच्छा देखील सर्वांचीच असते. सर्वांचा पुरुषार्थ चालू आहे. जे चांगले पक्के भक्त असतात ते आपल्या सोबत फोटो ठेवतात, जेणेकरून वेळोवेळी त्यांची आठवण येत राहील. बाबा देखील म्हणतात की त्रिमूर्तीचे चित्र सोबत ठेवा, म्हणजे वारंवार आठवण येईल. बाबांची आठवण केल्याने आपण सूर्यवंशी घराण्यामध्ये येऊ. खोलीत त्रिमूर्तीचे चित्र लावलेले असेल तर वारंवार नजर त्याच्यावर पडेल. बाबांद्वारे आपण या सूर्यवंशी घराण्यामध्ये जाणार. पहाटे उठताच नजर त्यावर जाईल. हा देखील एक पुरुषार्थ आहे. बाबा सल्ला देतात - चांगले-चांगले भक्त खूप पुरुषार्थ करतात. डोळे उघडता क्षणी श्रीकृष्णाची आठवण यावी, म्हणून त्याचा फोटो समोर ठेवतात. तुमच्यासाठी तर हे अजूनच सोपे आहे. जर सहज आठवण येत नसेल, माया हैराण करत असेल, तर ही चित्रे मदत करतील. शिवबाबा आम्हाला ब्रह्माद्वारे विष्णूपुरीचे मालक बनवतात. आम्ही बाबांकडून विश्वाचे मालक बनत आहोत. या आठवणीमध्ये राहिल्याने देखील खूप मदत मिळेल. जी मुले समजतात की, आठवण वारंवार विसरायला होते; ते त्यांना बाबा सल्ला देतात की, चित्र समोर ठेवा म्हणजे बाबा देखील आठवतील आणि वारसा देखील आठवेल. परंतु ब्रह्माची आठवण करायची नाहीये. जेव्हा लग्न ठरते, तेव्हा मध्यस्थाची आठवण थोडीच येते. तुम्ही चांगल्या प्रकारे बाबांची आठवण करा, तर बाबा देखील तुमची आठवण करतील. आठवणीला आठवण मिळते. आता माशुकच्या ऑक्युपेशन विषयी तुम्हाला माहिती आहे. शिवाचे किती असंख्य भक्त आहेत. शिव-शिव म्हणत राहतात. परंतु ते चुकीचे आहे - शिवकाशी, विश्वनाथ आणि मग गंगा म्हणतात. नदी किनारी जाऊन बसतात. हे समजत नाहीत की ज्ञानाचा सागर बाबा आहेत. बनारसमध्ये अनेक फॉरेनर्स इत्यादी पहायला जातात. मोठे-मोठे घाट आहेत, तरीही सर्वांच्या पित्याचे मंदिर तर आकर्षित करते. सर्वजण त्यांच्याकडे जातात. मंदिर तर काही कोणाकडे जाणार नाही. मंदिरातील देवता आकर्षित करतात. शिवबाबा देखील आकर्षित करतात. नंबर वन आहेत शिवबाबा, मग सेकंड नंबर मध्ये हे ब्रह्मा, सरस्वती सो विष्णू. विष्णू सो ब्रह्मा. ब्राह्मण सो विष्णूपुरीचे देवता. विष्णूपुरीचे देवता सो ब्राह्मण. आता तुमचा हाच धंदा आहे की, आपण सो देवता बनत आहोत, तर इतरांनाही मार्ग सांगायचा आहे. बाकीचे सर्वजण आहेत जंगलामध्ये घेऊन जाणारे. तुम्ही जंगलातून काढून बगीच्यामध्ये घेऊन जाता. शिवबाबा येऊन काट्यांना फूल बनवतात. तुम्ही देखील हाच धंदा करता. या गोष्टी फक्त तुम्हीच जाणता. आता कोणी राजा-राणी तर नाहीत ज्यांना तुम्ही समजावून सांगाल. गायले गेले आहे की, पांडवांना पृथ्वीची ३ पावले सुद्धा मिळत नव्हती. बाबा समर्थ होते तर त्यांना विश्वाची बादशाही देऊन टाकली. आता देखील तोच पार्ट बजावला जाईल ना. बाबा आहेत गुप्त. श्रीकृष्णाला तर कोणतेही विघ्न येऊ शकत नाही. आता बाबा आलेले आहेत, बाबांकडून येऊन वारसा घ्यायचा आहे, यासाठी मेहनत करावी लागते. दिवसेंदिवस नवनवीन पॉइंट्स निघत राहतात. असे दिसून येते आहे की, प्रदर्शनीमध्ये समजावून सांगितल्याने चांगला प्रभाव पडतो. बुद्धीने विचार केला जातो की, प्रदर्शनीद्वारे चांगला प्रभाव पडतो की प्रोजेक्टरद्वारे? प्रदर्शनीमध्ये समजावून सांगताना समोरच्याचा चेहरा पाहून समजावून सांगू शकतो. तुम्ही समजता की, गीतेचा भगवान, बाबा आहेत, तर बाबांकडून पुन्हा वारसा घेण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. ७ दिवस द्यायचे आहेत. लिहून द्या. नाहीतर बाहेर जाताच माया विसरायला लावेल.

तुमच्या बुद्धीमध्ये हे आले आहे की, आपण ८४ चे चक्र पूर्ण केले आहे, आता परत जायचे आहे. तमोप्रधान पासून सतोप्रधान बनायचे आहे. ही चित्रे तर सोबत असायलाच हवीत. खूप चांगली आहेत. बिर्ला इत्यादी सुद्धा हे जाणत नाहीत की या लक्ष्मी-नारायणाने हे राज्य-भाग्य कधी आणि कसे मिळवले. तुम्ही जाणता, तर तुम्हाला खूप आनंद झाला पाहिजे. लक्ष्मी-नारायणाचे चित्र घेऊन लगेच कोणालाही समजावून सांगाल. त्यांनी हे पद कसे मिळवले? या गोष्टी बुद्धीने समजून घेण्याच्या आणि समजावून सांगण्याच्या आहेत. ध्येय खूप उच्च आहे. जो जसा टीचर आहे, तो तशीच सेवा करतो. पाहतो - कोण-कोण सेंटर सांभाळत आहेत, आपल्या अवस्थेनुसार. नशा तर सर्वांना आहे. परंतु विवेक सांगतो की समजावून सांगणारा जितका हुशार असेल तितकी सेवा चांगली होईल. सगळेच काही हुशार असू शकत नाहीत. सर्वांना एक सारखा शिक्षक मिळू शकत नाही. जसे कल्पापूर्वी चालले होते, तसेच आताही चालले आहे. बाबा म्हणतात - आपल्या अवस्थेला अधिक मजबूत करत राहा. ही कल्प-कल्पाची बाजी आहे. दिसून येत आहे - कल्पापूर्वी प्रमाणेच प्रत्येकाचा पुरुषार्थ चालू आहे. जे काही घडते - आपण म्हणतो की, कल्पापूर्वी देखील असेच घडले होते. मग आनंदही होतो आणि शांतीही वाटते. बाबा म्हणतात की कर्म करत असताना बाबांची आठवण करा. बुद्धीचा योग तिथे लटकलेला रहावा म्हणजे मग खूप कल्याण होईल, जो करेल तोच मिळवेल. चांगले करेल तर चांगले मिळवेल. मायेच्या मतावर चालून सर्वजण वाईटच करत आले आहेत. आता मिळत आहे - श्रीमत. भले कराल तर भले होईल. प्रत्येकजण स्वतःसाठी मेहनत करतो. जसे कराल तसे प्राप्त कराल. मग का नाही आपण योग करत सेवा करत रहावी. योगाने आयुष्य वाढेल. आठवणीच्या यात्रेने निरोगी बनायचे आहे, तर का नाही आपण बाबांच्या आठवणीत राहावे! यथार्थ गोष्ट आहे, तर का नाही आपण प्रयत्न करावा. ज्ञान तर अगदी सोपे आहे. लहान मुले देखील समजून घेतात आणि समजावून सांगतात. परंतु ते योगी तर झाले नाहीत ना. हे तर पक्के करून घ्यायचे आहे की बाबांची आठवण करा. ज्यांना वाटते की आपण वारंवार विसरतो, त्यांनी समोर फोटो लावून ठेवावा, ते देखील चांगले आहे. सकाळी फोटोला बघताच आठवण येते. शिवबाबांकडून आम्ही विष्णूपुरीचा वारसा घेत आहोत. हे त्रिमूर्तीचे चित्रच मुख्य आहे, ज्याचा अर्थ तर तुम्हाला आता समजला आहे. दुनियेमध्ये असे त्रिमूर्तीचे चित्र इतर कोणाकडेही नाही. हे तर अगदी सोपे आहे. आपण लिहिले किंवा नाही लिहिले; हे तर सर्वजण जाणतात ब्रह्मा द्वारे स्थापना आणि विष्णू द्वारे पालना. अच्छा !

गोड गोड खूप वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) मायेशी होणाऱ्या बॉक्सिंगमध्ये कधीही हार होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. कल्पापूर्वीच्या स्मृती द्वारे आपल्या अवस्थेला मजबूत करायचे आहे. आनंदात आणि शांती मध्ये राहायचे आहे.

२) स्वतःचे कल्याण करण्यासाठी श्रीमतावर चालायचे आहे. या जुन्या दुनियेशी असलेले नाते तोडून टाकायचे आहे. मायेच्या वादळांपासून बचाव करण्यासाठी समोर फोटो ठेवून बाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे.

वरदान:-
मनन करून बाबांच्या प्रॉपर्टीला आपली प्रॉपर्टी बनविणारे दिव्य बुद्धिवान भव

बाबांकडून जो काही खजिना मिळतो, त्याचे मनन करा म्हणजे तो तुमच्यामध्ये सामावत जाईल. प्रॉपर्टी तर सर्वांना एकसारखीच मिळालेली आहे, परंतु जे मनन करून त्याला आपली बनवतात, त्यांनाच त्याचा नशा चढतो आणि आनंद होतो; म्हणूनच म्हटले जाते - ‘अपनी घोट तो नशा चढे’. जे मनन करण्याच्या मस्तीमध्ये नेहमी मश्गुल राहतात त्यांना दुनियेतील कोणतीही वस्तू, गुंतागुंत आकर्षित करू शकत नाही. त्यांना दिव्य बुद्धीचे वरदान स्वतः प्राप्त होते.

बोधवाक्य:-
मनातील गुंतागुंत समाप्त करण्यासाठी निर्णय शक्तीला वाढवा.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

असे समजू नका की, आम्ही तर नेहमी झुकतच राहतो परंतु आम्हाला काहीच मान नसतो आणि जे झुकत नाहीत तसेच खोटे बोलतात त्यांचाच मान ठेवला जातो - परंतु असे नाहीये. हे अल्पकाळासाठी आहे, परंतु तुम्ही तुमची बुद्धि दूरदृष्टीवाली ठेवा, इथे जितक्या लोकांसमोर तुम्ही झुकाल, अर्थात नम्रतेच्या गुणाला धारण कराल, तर संपूर्ण कल्पभर सर्व आत्मे तुमच्यासमोर नतमस्तक होतील. सतयुग-त्रेतामध्ये राजाच्या नात्याने आदरापोटी मान झुकवून नाही परंतु मनातून झुकतील आणि द्वापर-कलियुगामध्ये मानेतून झुकवतील.