29-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - या जुन्या दुनियेवर आणि देहधारीवर कधीही मन जडू देऊ नका, जर मन जडले तर नशीब फुटेल”

प्रश्न:-
बाबांनी मुलांना या नाटकाचे कोणते एक गूढ रहस्य सांगितले आहे?

उत्तर:-
मुलांनो, आता हे नाटक संपणार आहे म्हणून सर्व आत्म्यांना इथे उपस्थित व्हायचेच आहे. सर्व धर्मांचे आत्मे आता इथे उपस्थित होतील कारण सर्वांचे पिता इथे उपस्थित झाले आहेत. सर्वांना पित्या समोर सलामी देण्यासाठी यावेच लागेल. सर्व धर्मांचे आत्मे ‘मनमनाभव’चा मंत्र घेऊन जातील. ते काही ‘मध्याजी भव’च्या मंत्राला धारण करून चक्रवर्ती बनणार नाहीत.

गीत:-
दिल का सहारा टूट न जाये…

ओम शांती।

सर्व सेंटर्सच्या मुलांनी गाणे ऐकले. तुम्ही आज ऐकत आहात, बाकीची मुले २-४ दिवसानंतर ऐकतील. जर जुन्या दुनियेवर, जुन्या शरीरावर मन जडले तर नशीब फुटून जाईल कारण हे शरीर या जुन्या दुनियेतील आहे. जर देह-अभिमानी बनाल तर एवढे भाग्य जे बनत आहे ते उद्धवस्त होईल. आता दुर्भाग्यशाली पासून तुम्ही सौभाग्यशाली बनत आहात म्हणून जितके होईल एका बाबांची आठवण करा, जे बेहदचा वारसा देतात.

बाबांची आणि वारशाची आठवण करा, या जुन्या दुनियेमध्ये फार थोडा वेळ बाकी आहे. या वेळेमध्ये तुम्हाला पुरुषार्थ करून सर्व गुण संपन्न जरूर बनायचे आहे. अनेक आहेत, जे पवित्र देखील राहतात. बरेचजण तर वारंवार घसरत राहतात (अधोगती होते). बाबा म्हणतात - तुम्हाला बाबांसोबत सेवेमध्ये मदतगार बनले पाहिजे, खूप मोठी सेवा आहे, साऱ्या दुनियेला पतितापासून पावन बनवायचे आहे. असे देखील नाही की सर्वच बाबांना मदत करतील. ज्यांनी कल्पापूर्वी मदत केली आहे, ब्राह्मण कुल भूषण बी.के. बनले आहेत, तेच हुशार बनतील. प्रजापिता ब्रह्माचे नाव तर गायले गेले आहे. ब्रह्माच्या मुलांना जरूर बी. के.च म्हटले जाईल. जरूर पास्ट होऊन गेले आहेत. आदि देव, आदि देवीची देखील आठवण करतात, जी गोष्ट होऊन गेली आहे ती पुन्हा जरूर होणार आहे. तुम्ही हे जाणता - सतयुग होऊन गेले आहे, त्यामध्ये आदि सनातन देवी-देवतांचे राज्य होते, जे आता नाही आहे. देवी-देवता जे पवित्र प्रवृत्तीमार्ग वाले राज्य करत होते, ते आता ८४ जन्माच्या अंतामध्ये आहेत. आता ना पवित्र आहेत आणि ना ती राजाई देखील आहे, पतित बनले आहेत. आता बाबा आले आहेत, पावन बनविण्याकरिता. म्हणतात - पतितांशी बुद्धीयोग लावू नका, एका बाबांची आठवण करा.

तुम्ही जाणता - आपण बाबांच्या सल्ल्यानुसार चालून बाबांकडून वारसा घेत आहोत. वारसा कसा घ्यायचा आहे ती युक्ती देखील सांगतात. मनुष्य तर अनेक प्रकारच्या युक्त्या रचतात. कोणी विज्ञानशास्त्राचे घमेंडी आहेत, कोणी डॉक्टरीचे (वैद्यकशास्त्राचे) घमेंडी आहेत. त्यांनी असे लिहिले आहे की, मनुष्याचे हार्ट खराब होते तेव्हा दुसरे प्लास्टिकचे हार्ट बनवून शरीरामध्ये बसवू शकतो. नॅचरल हार्ट काढून कृत्रिम घालून चालवत राहतात. ही देखील केवढी मोठी कला आहे. हे झाले अल्पकालीन सुखाकरिता. उद्या जर मृत्यू झाला तर शरीरच नष्ट होईल; प्राप्ती तर काहीच होत नाही, अल्पकाळा करिता मिळाले. विज्ञानाद्वारे खूप काही चमत्कार करून दाखवतात, ते देखील अल्पकाळाकरिता. ही तर गोष्ट एकदम वेगळी आहे. पावन आत्मा ८४ जन्म घेत-घेत आता पतित बनली आहे. त्या पतित आत्म्याला पुन्हा पावन बनविणे ते तर बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही करू शकत नाही. एकाचेच गायन आहे - सर्वांचे पतित-पावन, सर्वांचा सद्गती दाता, सर्वांवर दया दृष्टी ठेवणारा, सर्वोदया लीडर आहे. मनुष्य स्वतःला सर्वोदया लीडर म्हणवून घेतात, आता सर्व अर्थात त्यामध्ये सगळेच आले. सर्वांवर दया करणारे तर एक बाबाच गायले जातात. ज्यांना दयाळू, ब्लिसफुल म्हटले आहे. बाकी मनुष्य सर्वांवर कशी काय दया करु शकतील! स्वतःवरच करू शकत नाहीत तर इतरांवर काय करतील! हे (दुनियावाले) दया करतात ती अल्पकाळासाठी. नावे किती मोठी-मोठी ठेवली आहेत.

आता बाबा म्हणतात - तुम्हाला एव्हरहेल्दी, एव्हरवेल्दी बनण्याची मी किती सोपी युक्ती सांगतो. युक्ती अगदी सोपी आहे, फक्त माझी आठवण करा कारण तुम्ही मलाच विसरले आहात. सतयुगामध्ये तर तुम्ही सुखी असता त्यामुळे माझी तुम्ही आठवणच करत नाही. तुमच्या ८४ जन्मांची हिस्ट्री-जिओग्राफी तुम्हाला सांगितली आहे. तुम्ही असे-असे राज्य करत होता, कायम सुखी होता आणि मग दिवसें-दिवस उतरता-उतरता तमोप्रधान, दुःखी पतित बनला आहात. आता बाबा पुन्हा तुम्हा मुलांना कल्पापूर्वीप्रमाणे वारसा देत आहेत,

जो तुम्ही कल्प-कल्प येऊन वारसा घेता, श्रीमतावर चालता; श्रीमत आहेच बापदादांचे मत. त्यांच्या शिवाय श्रीमत कुठून मिळणार. बाबा म्हणतात - तुम्ही विचार करा - ही कला कोणामध्ये आहे? नाही. एखाद्याला विश्वाचा मालक बनविणे - त्याची युक्ती बाबाच सांगतात. म्हणतात याच्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. उच्च पद प्राप्त करण्याकरिता पतित-पावन बाबाच नॉलेज देतात. असे नाही की, फक्त सृष्टीचक्र जाणल्याने तुम्ही पवित्र बनाल. बाबा म्हणतात - माझी आठवण करा या योगअग्नीद्वारे तुमच्या पापांचा घडा जो भरलेला आहे, तो खाली होईल.

बाबा म्हणतात - तुम्हीच ८४ जन्म घेता-घेता खूप पतित बनले आहात. आजकाल तर मग स्वतःला शिवोहम्, ततत्वम् म्हणतात, नाहीतर मग म्हणतात - तुम्ही परमात्म्याचे रूप आहात, आत्मा सो परमात्मा. तुम्ही जाणता - आता बाबा आलेले आहेत तर शिवबाबांची आठवण करून द्यावी लागेल. सर्वांचे सद्गती दाता एक परमपिता परमात्माच आहेत. शिवाची मंदिरे वेगळ्या प्रकारे बनतात, शंकराचे रूपच वेगळे आहे. प्रदर्शनीमध्ये देखील दाखवायचे आहे. शिव निराकार आहेत आणि शंकर आकारी आहेत. श्रीकृष्ण तर साकारमध्ये आहे. सोबत राधेला दाखविणे ठीक आहे. त्याने सिद्ध होईल की हेच नंतर मग लक्ष्मी-नारायण बनतात. श्रीकृष्ण काही द्वापरमध्ये गीता ऐकविण्यासाठी येत नाहीत. पतित असतात कलियुगाच्या अंतामध्ये, पावन असतात सतयुगामध्ये. तर जरूर संगमावरच येतील. हे बाबाच जाणतात, तेच त्रिकालदर्शी आहेत. श्रीकृष्णाला त्रिकालदर्शी म्हटले जात नाही, तो थोडेच तिन्ही काळांचे ज्ञान सांगू शकेल.त्याला सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञानच नाही आहे. म्हणतात - लहान मुलगा आहे, दैवी प्रिन्स-प्रिन्सेस कॉलेजमध्ये शिकण्याकरिता जातात. अगोदर इथे देखील प्रिन्स-प्रिन्सेसचे कॉलेज होते, आता मिक्स झाली आहेत. श्रीकृष्ण प्रिन्स होता अजूनही प्रिन्स-प्रिन्सेस असतील. एकत्र शिकत असतील. तिथे तर आहेच व्हाइसलेस दुनिया. एक शिवबाबाच सर्वांचे सद्गती दाता आहेत. मनुष्य सर्वांचा सद्गती दाता असू शकत नाही. बाबाच येऊन सर्वांना मुक्ती-जीवनमुक्ती देतात. हे देखील समजावून सांगितले जाते - देवतांच्या राज्यामध्ये इतर कुठलाही धर्म नव्हता, ते तर येतातच अर्ध्या कल्पा नंतर, मग ते सतयुगामध्ये कसे काय असू शकतील? ते आहेतच हठयोगी, निवृत्ती मार्गवाले. ते राजयोग काही समजू शकणार नाहीत. हा राजयोग आहे प्रवृत्तीमार्गवाल्यांकरिता. भारत पवित्र प्रवृत्तीमार्गवाला होता, आता कलियुगामध्ये पतित प्रवृत्तीमार्गवाले बनले आहेत. भगवानुवाच - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. जुनी दुनिया अथवा देहाच्या नात्यांमध्ये मन गुंतवाल तर नशीब फुटून जाईल. अनेकांचे नशीब फुटून जाते. कोणते अकर्तव्य (अयोग्य काम) केले असेल तर अखेरीला ते सर्व, समोर येईल, साक्षात्कार होईल. बरीच मुले लपवतात खूप, या जन्मामध्ये केलेली पाप कर्म बाबांना ऐकविल्याने अर्धी सजा माफ होईल, परंतु लाजेपोटी सांगत नाहीत. घाणेरडी कामे तर खूप करतात. बुद्धीमध्ये आठवण तर राहते, सांगितल्याने माफ होईल. हे अविनाशी सर्जन आहेत. लाजेपोटी आजार जर सर्जनला सांगितला नाहीत तर सुटका कशी होणार. कोणतेही विकर्म जर केले असेल तर सांगितल्याने अर्धे माफ होईल. सांगितले नाही तर त्याची वृद्धी होत जाते. जास्तच अडकत जाल. मग भाग्य नष्ट होईल आणि दुर्भाग्य वाट्याला येईल. बाबा म्हणतात - देहाशी देखील नाते ठेवू नका, नेहमी मामेकम् (मज एकाची) आठवण करत राहा म्हणजे मग कोणतेही घाणेरडे काम होणार नाही. हे (बाबा) धर्मराज देखील आहेत, त्यांच्या पासून देखील लपवत राहाल तर मग तुमच्या सारखी सजा इतर कोणालाच मिळणार नाही. जितकी वेळ जवळ येईल तितका सर्वांना साक्षात्कार होत जाईल. आता सर्वांच्या (कयामतची) महाविनाशाची वेळ आहे, सर्व पतित आहेत.

पापांचा दंड जरूर मिळतो. जशी एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळते तशीच एका सेकंदामध्ये होणाऱ्या सजेची अशी जाणीव होते जणू काही खूप काळापासून सजा भोगतच आलो आहे. ही अतिशय सूक्ष्म मशिनरी आहे. सर्वांची महाविनाशाची वेळ आहे. सजा तर जरूर भोगायची आहे. मग सर्व आत्मे पवित्र बनून निघून जातात. बाबाच येऊन पतित आत्म्यांना पावन बनवतात. बाबां व्यतिरिक्त इतर कोणाचीच ताकद नाही. ६३ जन्म पाप करत-करत आता तुमच्या पापाचा घडा भरला आहे. मायेचे ग्रहण सर्वांना लागलेले आहे. मोठे ग्रहण तुम्हाला लागले आहे. सर्वगुण संपन्न तुम्हीच होता, मग तुम्हालाच ग्रहण लागले आहे, ज्ञान देखील आता तुम्हा मुलांनाच मिळाले आहे. बाबा सांगत आहेत - तुम्ही भारताचे मालक होता मग ८४ जन्म तुम्हीच भोगले आहेत. किती स्पष्टपणे सांगतात की, तुम्ही खरोखर देवी-देवता धर्माचे होता मग पतित झाल्या कारणाने हिंदू म्हटले गेले आहे. हिंदू धर्माची स्थापना कोणीही केलेली नाही. मठ-पंथाला डिनायस्टी (घराणे) म्हणता येणार नाही, डिनायस्टी राजांची असते. लक्ष्मी-नारायण द फर्स्ट, सेकंड, थर्ड… अशी राजाई चालते. हे देखील निश्चित आहे, पावन पासून पतित बनायचेच आहे. पतित असल्या कारणाने देवी-देवता म्हणू शकत नाही. तुम्ही समजता - आपण पूज्य आदि सनातन देवी-देवता धर्माचे होतो. आपल्या धर्माच्या चित्रांचीच पूजा करतात. फक्त हेच विसरून गेले आहेत की, आपणच पूज्य देवी-देवता होतो, आता पुजारी बनलो आहोत. आता तुम्ही समजता - बाबांनी वारसा दिला होता, परंतु नंतर मग पतित बनलो आहोत तर आपल्याच चित्रांची बसून पूजा केली आहे. ‘आपे ही पूज्य, आपे ही पुजारी’, हे भारता शिवाय इतर कोणालाच म्हणता येणार नाही. बाबा देखील भारतामध्येच येऊन ज्ञान देतात, पुन्हा सो देवता बनविण्याकरिता. बाकीचे सर्व हिशोब चुकता करून परत निघून जातील. सर्व आत्मे बाबांनाच बोलावत राहतात - ‘ओ गॉड फादर’, ही देखील समजून घेण्याची गोष्ट आहे. यावेळी तुम्हाला ३ पिता आहेत. एक - शिवबाबा, दुसरे - लौकिक पिता आणि हे अलौकिक पिता प्रजापिता ब्रह्मा. बाकी सर्वांना दोन पिता आहेत. लौकिक आणि पारलौकिक. सतयुगामध्ये फक्त एकच लौकिक पिता असतो. पारलौकिक पित्याला जाणतच नाहीत. तिथे तर आहेच सुख तर मग पारलौकिक पित्याची आठवण कशाला करतील बरे! दुःखामध्ये सर्वच आठवण करतात. इथे मग तुम्हाला ३ पिता असतात, ही देखील समजून घेण्याची गोष्ट आहे. तिथे आत्म-अभिमानी असतात नंतर मग देह-अभिमानामध्ये येतात. इथे तुम्ही आत्म-अभिमानी देखील आहात तर परमात्म-अभिमानी देखील आहात. शुद्ध अभिमान आहे की आपण सर्व बाबांची मुले आहोत, त्यांच्याकडून वारसा घेत आहोत. ते पिता, शिक्षक, सद्गुरु आहेत. ही त्यांची महिमा देखील सांगावी लागेल. तेच येऊन सर्व मुलांना वारसा देतात. सतयुगामध्ये तुम्हाला वारसा मिळाला होता आणि मग ८४ जन्म घेऊन गमावला आहे. आता हे समजावून सांगणे किती सोपे आहे. बाबांना म्हटले जाते पतित-पावन, सर्वांचे सद्गती दाता. ही दुनियाच पतितांची आहे. कोणीही सद्गती कसे बरे देऊ शकतील. बाकी जर कोणी खूप शास्त्रे वाचलेली असतील तर, ‘अंत मती सो गति’ होते, मग बालपणापासूनच तोंड पाठ असते. तर बाबा तुम्हा मुलांना किती सुंदर गोड-गोड गोष्टी सांगत आहेत. मुलांनो, तुम्ही तमोप्रधान बनले आहात. आता पुन्हा बाबांची आठवण करा तर भेसळ निघून जाईल. आता नाटक पूर्ण होत आहे, इथे सर्वांना उपस्थित व्हायचेच आहे. क्राइस्ट इत्यादी सर्वांची आत्मा उपस्थित आहे, ती देखील बाबांकडे सलामी देण्यासाठी येईल. चक्रवर्ती राजा तर बनायचे नाहीये. फक्त बाबांची आठवण करतील, ‘मनमनाभव’चा मंत्र घेऊन जातील. तुमचा आहे मनमनाभव आणि मध्याजीभवचा डबल मंत्र. बाबा किती सुंदर युक्ती सांगतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या जुन्या दुनियेमध्ये राहात असताना पुरुषार्थ करून सर्व गुण संपन्न जरूर बनायचे आहे. या जुन्या शरीरावर किंवा जुन्या दुनियेवर मन जडू द्यायचे नाही. भाग्यवान बनायचे आहे.

२) आत्म-अभिमानी आणि परमात्म-अभिमानी होऊन राहायचे आहे. या महाविनाशाच्या वेळी बाबांपासून काहीही लपवायचे नाही. अविनाशी सर्जन कडून मत (सल्ला) घेत राहायचे आहे.

वरदान:-
संग दोषापासून दूर राहून नेहमी बाबांच्या समीपतेचे भाग्य प्राप्त करणारे पास विद् ऑनर भव

जर बाबांपाशी राहायला आवडत असेल तर, कधीही कोणत्या संगदोषापासून दूर राहायचे आहे. कितीतरी प्रकारचे आकर्षण पेपरच्या रूपामध्ये येईल परंतु आकर्षित व्हायचे नाही. संग दोष अनेक प्रकारचे असतात, व्यर्थ संकल्प किंवा मायेच्या आकर्षणाच्या संकल्पांचा संग, नातेवाईकांचा संग, वाणीचा संग, अन्न दोषाचा संग, कर्माचा संग… या सर्व संग दोषापांसून स्वतःला वाचविणारेच पास विद् ऑनर बनतात.

बोधवाक्य:-
तुम्ही फरिश्ता बना, म्हणजे मग कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबा स्वतः तुमची छत्रछाया बनतील.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

नेहमी एकरस, अचल-अडोल बनण्याची आणि बनविण्याची विशेष शक्ती हा ड्रामाचा पॉईंट आहे. याला शक्तीच्या रूपामध्ये धारण करणारा कधीही हार खाऊ शकत नाहीत. परंतु सर्वप्रथम ड्रामाचा बिंदू लावून व्यर्थ संकल्पांना शुद्ध संकल्पांमध्ये परिवर्तन करा. म्हणजे मग मायेच्या येणाऱ्या अनेक प्रकारच्या विघ्नांना ईश्वरीय निष्ठेच्या आधारे नष्ट कराल.